Tag: MH34

  • A unique honor | आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

    A unique honor

    A unique honor आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूरमधील फळ विक्रेते आणि जिल्हा फुटपात दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात भेट घेत अनोख्या पद्धतीने सत्कार केला.

    फुलांच्या पारंपरिक गुलदस्त्यांऐवजी ताज्या फळांनी भरलेल्या टोपल्या देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या अभिनव आणि आगळ्या स्वागताबद्दल आमदार जोरगेवार (mla jorgewar) यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    चंद्रपुरातील 18 वर्षीय मुलांना लागला गुन्हेगारीचा चस्का


     माणूस पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असतो याचे जिवंत उदाहरण आज एकदा अनुभवयास मिळाले फळ विक्रेत्यांनी आपल्या मेहनतीचे प्रतीक म्हणून एक नव्हे तर डजनभर टोपलीभर ताजी फळे देत आमदार किशोर जोरगेवार यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी फळ विक्रेत्यांनी सांगितले की, “आमदार जोरगेवार यांनी नेहमीच चंद्रपूरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना नेहमीच प्रोत्साहन आणि आधार मिळाला आहे. त्यांचे आमदार होणे आम्हाला आनंददायक आहे, आणि या अनोख्या पद्धतीने आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे. A unique honor

    mla jorgewar


     सत्कार स्वीकारतांना आमदार जोरगेवार म्हणाले, “हा सत्कार केवळ माझ्यासाठी नव्हे, तर समाजात सामजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे. फळ विक्रेत्यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी दाखवलेली आत्मीयता आणि सन्मान खूप महत्त्वाचा आहे.

    फळ विक्रेत्यांनी दिलेली फळे लगेचच चंद्रपूर शहरातील रुग्णालयामध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ही फळे वाटण्यात आली.

  • air travel cash limit | फ्लाइटमध्ये प्रवास करतायं, जवळ रोख रक्कम किती हवी?

    air travel cash limit

    Air travel cash limit अनेक वेळा विमान प्रवासाचे नियम माहीत नसल्यास लोक अडचणीत येतात. तुम्हाला माहित आहे का की फ्लाइटमध्ये रोख रक्कम घेऊन जाण्यावर मर्यादा आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की ही मर्यादा देशांतर्गत उड्डाणांसाठी वेगळी आहे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वेगळी आहे.

    फ्लाइट कॅश लिमिट

    दुसऱ्या देशात जाणे किंवा स्वतःच्या देशात कुठेतरी प्रवास करणे असो, लोक सहसा तेथे फ्लाइटने जाणे पसंत करतात. कारण इतर पद्धतींच्या तुलनेत तुम्ही फ्लाइटद्वारे कमी वेळेत तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकता.

    प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या सामानात ठेवलेल्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून काहीही मागे पडणार नाही. किंवा सामानाचे वजन मर्यादेपेक्षा जास्त नसावे, कारण वजन जास्त असेल तर फी भरावी लागेल. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही किती पैसे सोबत flight cash limit घेऊन जाऊ शकता याची मर्यादा असते.

    थायलंड जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी


    तुम्ही ते बरोबर ऐकले आहे, जर तुम्ही फ्लाइटने प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत रोख रक्कम घेऊन जाऊ इच्छित असाल, तर तुम्ही तुमच्या बॅगेत फक्त मर्यादित रोकड घेऊन जाऊ शकता.

    जरी भारतात आणि परदेशात पैसे काढण्याची सुविधा सहज उपलब्ध आहे, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या सोयीसाठी अधिक रोख रक्कम सोबत ठेवायला आवडते. अशा लोकांना विशेषत: ते त्यांच्यासोबत किती रोकड घेऊन जाऊ शकतात हे जाणून घेतले पाहिजे.

    तुम्ही विमानात किती रोख रक्कम घेऊ शकता?


    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (reserved bank of india) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही देशांतर्गत विमानाने प्रवास करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये रोख घेऊन जाऊ शकता. पण जर तुम्ही विमानाने परदेशात जात असाल तर हा नियम लागू होत नाही.

    परदेशी प्रवासासाठी किती रोख रक्कम घेऊन जाऊ शकतो?


    जर तुम्ही नेपाळ आणि भूतान सोडून इतर कोणत्याही देशाला विमानाने भेट देणार असाल तर तुम्ही 3000 डॉलर्सपर्यंतचे विदेशी चलन सोबत घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला यापेक्षा जास्त रोकड घेऊन जायचे असेल तर तुम्हाला स्टोअर व्हॅल्यू आणि ट्रॅव्हल चेकची आवश्यकता असेल.

    फ्लाइटमध्ये सामानाचे वजन किती असावे?


    ज्याप्रमाणे तुम्ही फ्लाइटमध्ये एका मर्यादेपर्यंत रोख रक्कम घेऊन जाऊ शकता, त्याचप्रमाणे फ्लाइटमध्ये सामानाच्या वजनाबाबतही एक नियम आहे. तुम्ही तुमच्या हँडबॅगमध्ये 7 ते 14 किलो वजन ठेवू शकता. बोर्डिंग पास मिळवताना तुम्ही काउंटरवर दिलेल्या चेक-इन बॅगेजचे वजन २० ते ३० किलो असू शकते. Airport rule

    हाच नियम आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही लागू होतो. तुम्हाला वजनाबद्दल अचूक माहिती हवी असल्यास, तुम्ही तुमच्या फ्लाइटच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता. Flight rule tips


    फ्लाइटमध्ये प्रवास करताना सोबत काय नेले जाऊ शकत नाही?


    फ्लाइटने प्रवास करताना तुम्ही काही वस्तू सोबत ठेवू शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, विमान प्रवासादरम्यान काही वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्यासोबत क्लोरीन, आम्ल, ब्लीच यासारखी रसायने घेऊ शकत नाही.

  • water pump motor | 18 वर्षीय मुलांना लागला गुन्हेगारीचा चस्का, थेट शेतातचं केलं कृत्य

    water pump motor

    Water pump motor शेत शिवारात रात्री पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आवश्यक असते ते मोटार पंप मात्र आता त्या पंपावर सुद्धा चोरांचा डोळा आहे.

    नांदगाव पोडे या भागात शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरी होत असल्याच्या तक्रारी शहर पोलिसांना प्राप्त झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी (chandrapur city police) तपास करीत 3 आरोपीना अटक करीत मोटार पंप जप्त केले.

    खासदार धानोरकर यांनी दिला मदतीचा हात


    नांदगाव पोडे येथे शेतशिवारात शेतीला पाणी देण्यासाठी लावण्यात आलेले मोटार पंप चोरी होत होते.
    याबाबत चंद्रपूर शहर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला असता रात्रीच्या सुमारास लालपेठ परिसरातील काही मुले फिरताना दिसले.

    महाकाली मंदिर परिसराच्या मागे आढळला महिलेचा मृतदेह


    पोलिसांनी 19 वर्षीय लोकेश उर्फ शालू पिंकू चव्हाण, 19 वर्षीय सलमान साहेबअली शेख व 18 वर्षीय प्रेम दीपक उपरकर तिघे राहणार लालपेठ जुनी वस्ती परिसर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी शेत शिवारातून मोटार पंप चोरी केली असल्याची कबुली दिली. Water pump motor

    मोटार पंपाचे काय करीत होते?

    शहर पोलिसांनी मोटार पंप चोरी प्रकरणात तिघांना अटक केली, सदर गुन्हा तिघांनी संगनमत करून केला होता.
    चोरी केलेले मोटार पंप फोडून त्यामधील तांब्याचे तार वेगळे करून ते विक्री करणार होते, लपवलेले मोटार पंप व तांबे पोलिसांनी जप्त केले.


    तांब्याचा भाव 700 ते 800 रुपये kg असा बाजारभाव आहे, झटपट पैसे कमविण्याच्या नादात 18 व 19 वर्षे वयाच्या आरोपीनी गुन्हेगारीचा उंबरठा पार केला.


    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कुमार कनकम, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, विक्रम मेश्राम व इर्शाद खान यांनी केली.

  • kishor jorgewar on mahanagar palika | स्वच्छतेच्या कामात ढिलाई, आमदार जोरगेवार संतापले

    kishor jorgewar on mahanagar palika

    Kishor jorgewar on mahanagar palika चंद्रपूर शहरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या कामात झालेल्या ढिलाईवर नाराजी व्यक्त करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला विशेष मोहिम राबवून 15 दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.

    महापालिकेच्या हिराई सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्वच्छतेशी संबंधित समस्या मांडत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

     शहरातील विविध विषयांना घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हिराई सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    संवेदनशील खासदार प्रतिभा धानोरकर

    यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त अक्षय गडलींग, संतोष गरगेलवार, शहर अभियंता विजय बोरिकर, कार्यकारी अभियंता रवींद्र हजारे, यांत्रिकी उपअभियंता रविंद्र कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल भसारकर, वैष्णवी रीठे, आशिष भारती, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोनू थुल, सहायक अभियंता अमित फुलझले, कनिष्ठ अभियंता सागर सिडाम, आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी नयना उत्तरवार यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. माजी नगरसेवकही या बैठकीत सहभागी झाले होते. Chandrapur mahanagar palika

      या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, माजी नगरसेवकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शहरातील नालेसफाई व्यवस्थित होत नाही, कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत, आणि कंत्राटदारांचा हलगर्जीपणा वाढत चालला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    आमदार जोरगेवार यांची कमाल, घुग्गुस शहराचा मोठा प्रश्न मिटला

    ही स्थिती बदलण्यासाठी माजी नगरसेवकांच्या सहकार्याने एकत्रित काम करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. मला शहर स्वच्छ पाहिजे, आणि त्यासाठी विशेष मोहिम राबवून स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करा, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

     बैठकीत माजी नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पथदिवे, रस्त्यांची दुरवस्था आणि पाणीपुरवठा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर तक्रारी मांडल्या. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 

    “विशेष मोहिमेच्या माध्यमातून शहरातील सर्व गल्ल्या, रस्ते आणि नाले स्वच्छ करावेत. ही मोहिम 15 दिवसांत पूर्ण झाली पाहिजे. तसेच, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई करून जबाबदारी निश्चित करा,  असेही ते म्हणाले.

     आ. जोरगेवार (Kishor jorgewar) यांनी पुढील 15 दिवसांत कामाची प्रगती तपासण्यासाठी सहा लोकांची समिती गठित करून त्यांच्या उपस्थितीत पुन्हा आढावा बैठक घेण्याचे सांगितले. आपण प्रामाणिकपणे काम करत माजी नगरसेवकांचे सहकार्य घेतले घेतले तर  चंद्रपूर शहर हे आदर्श स्वच्छतेचे उदाहरण बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीनंतर स्वच्छता मोहिमेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आणि संबंधित विभागांना कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. बैठकीत विविध विकासकामांवर, गटार लाईन, आरोग्य, पोल लाइट इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.

    पाणी नाही तर बिल नाही..

    अमृत कलश योजना अंतर्गत नळ जोडणी केली आहे, परंतु अनेक भागांमध्ये नळाला पाणी येत नाही. काही भागांत नळाला तोटी लावलेली नाही, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या बाबी योग्य नाहीत. त्यामुळे तोटी नसलेल्या नळांना तोटी लावण्यात यावी आणि ज्या नळाला पाणी येत नाही अशा ग्राहकांना नळबिल दिले जाऊ नये, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले. Chandrapur Mahanagar palika

    अमृत 2 योजनेतील दिरंगाई वर नाराजी

    बैठकीत अमृत 2 योजनेच्या कामांचा आढावा घेताना काम मंद गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. कामाची गुणवत्ता आणि गती ची पाहण्यासाठी आपण कामाची पाहणी करणार असून लवकरच अमृत. 2 च्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेणार असल्याचे म्हटले आहे.

  • Sensitive public representative | संवेदनशील खासदार प्रतिभा धानोरकर

    Sensitive public representative

    Sensitive public representative खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या मतदार संघातील नागरीकांसाठी मदतीला धावून येत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.

    मागील काही महिन्यांआधी चंद्रपूर सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याला देखील मदतीचा हात दिला होता.

    घुग्गुसवासीयांना मिळणार हक्काचे घर

    राजुरा येथील एका बालिकेला कॅन्सर असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना कळले. तिचा उपचार मुंबई येथील रिलाएन्स हॉस्पीटल येथे सुरु असल्याचे तिच्या पालकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितले.

    घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व मुलीला कर्करोग असल्याने आर्थिक मदत करण्याचे आवाहन पालकांनी खासदार धानोरकर यांना केले. Mp pratibha dhanorkar

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर पाल्यांना मदतीचे आश्वासन देऊन सतत पाठपूरावा करुन सदर मुलीच्या उपचाराकरीता प्रधानमंत्री सहायता निधीतून 3 लक्ष रुपये मिळवून दिले.

    सदर रक्कम दवाखान्याला मिळणार असून त्यातून सदर मुलीचा उपचार केला जाणार आहे. खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे सदर मुलीच्या पालकांनी खासदार धानोरकर यांचे आभार मानले आहे.

  • pm awas yojana 2.0 : घुग्गुस वासीयांना मिळणार हक्काचं घर

    pm awas yojana 2.0

    pm awas yojana 2.0 आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस वासीयांना आपल्या स्वप्नातील हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

    महाकाली मंदिर परिसराच्या मागे महिलेचा मृतदेह आढळला


    घुग्घूस हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, येथे कोळसा खाणी, लोहशुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट कारखाने अशा मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे येथे कामगार वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. Pm awas yojana 2024

    परंतु, बहुसंख्य नागरिकांकडे पक्क्या घरांची सुविधा नाही. घुग्घूस शहराचे नाव यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेत नव्हते. त्यामुळे या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली होती.

    नवे सरकार स्थापन होताच त्यांनी पुन्हा एकदा सदर मागणी रेटून धरली त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सदर योजनेत घुग्घूसचा समावेश करण्याची विनंती केली.
    केंद्रीय मंत्री खट्टर यांनी या मागणीला तातडीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. परिणामी घुग्घूस नगरपरिषदेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.


    या निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आभार मानले आहेत. यामुळे घुग्घूसवासीयांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.


    आता पात्र नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  • Strategic decisions | अतिक्रमण धारकांना दिलासा मिळणार?

    Strategic decisions

    Strategic decisions जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात महसूल जमिनीवरील अतिक्रमण धारकांना दिलासा देण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (devendra fadnavis) यांना यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

    चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमणधारकांची संख्या मोठी आहे. घरकुल योजनेंतर्गत पट्टे वाटप केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांचे महसूली जमिनीवर अतिक्रमण आहे.

    महाकाली मंदिर परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महसूल जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या हजारो रहिवाशांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

    हे अतिक्रमण 2001 च्या पूर्वीचे असून महसुली जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींमार्फत होत आहे.

    दृश्यम स्टाईल हत्या

    या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून महसुल जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती आ. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

  • Thai Visa | थायलंड जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

    Thai Visa

    Thai visa गैर-थाई नागरिकांनी सर्व प्रकारच्या व्हिसासाठी https://www.thaievisa.go.th वर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार वैयक्तिकरित्या किंवा इतर प्रतिनिधींद्वारे अर्ज करू शकतात. व्हिसा शुल्क सर्व परिस्थितीत परत केले जाणार नाही.


    थाई दूतावासाने बुधवारी जाहीर केले की थायलंडचा ई-व्हिसा 1 जानेवारी 2025 पासून भारतात लागू केला जाईल. भारतीय पासपोर्टधारकांसाठी व्हिसा सूट ६० दिवसांसाठी लागू राहील, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की नवी दिल्लीतील रॉयल थाई दूतावास थायलंडची इलेक्ट्रॉनिक व्हिसा प्रणाली (ई-व्हिसा) भारतात ऑफलाइन पेमेंट प्रणालीसह सुरू करणार आहे. Thai visa for Indians

    थायलंड देशात भाड्याने मिळते पत्नी

    कुठे अर्ज करावा

    दूतावासानुसार, गैर-थाई नागरिकांनी https://www.thaievisa.go.th या वेबसाइटवर सर्व प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार वैयक्तिकरित्या किंवा इतर प्रतिनिधींद्वारे अर्ज करू शकतात. होय, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रतिनिधीने सादर केलेला कोणताही अर्ज अपूर्ण असेल तर त्याला दूतावास आणि वाणिज्य दूतावास जबाबदार राहणार नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया वरील वेबसाइटवर पाहता येईल. Thailand

    व्हिसा फी नॉन रिफंडेबल

    ऑफलाइन पेमेंट पर्यायाद्वारे अर्ज करणाऱ्यांना व्हिसा शुल्क भरावे लागेल, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी ऑफलाइन पेमेंट पर्यायाद्वारे संबंधित दूतावास आणि महावाणिज्य दूतावास येथे तपशील द्यावा लागेल. व्हिसा शुल्क सर्व परिस्थितीत परत केले जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. व्हिसा प्रक्रियेस फी मिळाल्याच्या तारखेपासून सुमारे 14 कामकाजाचे दिवस लागू शकतात.


    दूतावासाने म्हटले आहे की नियुक्त व्हिसा प्रक्रिया कंपन्यांमध्ये सादर केलेले सामान्य पासपोर्ट अर्ज 16 डिसेंबर 2024 पर्यंत स्वीकारले जातील. याव्यतिरिक्त, दूतावास किंवा वाणिज्य दूतावास येथे सबमिट केलेले राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट अर्ज 24 डिसेंबर 2024 पर्यंत स्वीकारले जातील. भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांसाठी पर्यटन आणि छोट्या व्यवसायासाठी 60 दिवसांची व्हिसा सूट पुढील घोषणेपर्यंत लागू राहील.

  • female dead body | महाकाली मंदिर परिसराच्या मागे आढळला महिलेचा मृतदेह

    female dead body

    female dead body : 11 डिसेंबर रोजी चंद्रपुरातील महाकाली मंदिरच्या मागे 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

    सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राकेश मारवे नामक व्यक्तीने शहर पोलिसांना संपर्क करीत महाकाली मंदिराच्या मागील भागात एक महिला पडलेल्या अवस्थेत होती, ती कसलीही हालचाल करीत नसल्याची माहिती मारवे यांनी पोलिसांना दिली.

    गुन्हेगारीचे भूत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिलेचा दृश्यम स्टाईल खून

    पोलीस कर्मचारी निलेश मुळे व सुशांत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी अंदाजे 70 वर्षीय महिला आडब्लून आली, पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. mahakali mandir chandrapur

    सदर अनोळखी महिलेचे कुणी नातेवाईक आहे का? याबाबत परिसरात पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यांना काही याबाबत माहिती मिळाली नाही, पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

    सदर अनोळखी महिलेचे वर्णन..

    वय 70 वर्ष ,चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे लांब, अंगावर निळ्या रंगाचा स्वेटर व कथ्या रंगाचा गाऊन घातलेली, दोन्ही पायास जुन्या आजाराचे डाग आहे.

    सदर तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मुके करीत असून सदर मृतका बाबत माहिती मिळाल्यास psi विजय मुके मो. क्र.9923401065 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • chandrapur drishyam | चंद्रपूर जिल्ह्यातील महिलेचा “दृश्यम’ स्टाईल खून

    chandrapur drishyam

    Chandrapur drishyam बॉलीवूड क्षेत्रातील नावाजलेला अभिनेता अजय देवगण यांचा दृश्यम चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता, दृश्यम चित्रपटाला लाजवेल असा गुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली.


    चिमूर येथील नूतन आदर्श कॉलोनी मध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय अरुणा काकडे यांचा गळा आवळून खून करीत अरुणा चा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळ असलेल्या जंगलात गेला आणि एका शौचालयाच्या टाकीत मृतदेह पुरला.

    15 दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा खून


    ही भयावह घटना घडली 26 नोव्हेंबर रोजी, अरुणा यांचं चिमूर मध्ये देवांश जनरल स्टोर्स चे दुकान आहे, त्या अधूनमधून दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागपूरला येजा करीत होत्या. Chandrapur news today


    घटनेतील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले हा अरुणा चा वर्गमित्र व नातेवाईक, हा 26 नोव्हेंबर रोजी नागपुरात अरुणा ला भेटला, मात्र काही वेळाने दोघात वाद झाला आणि नरेश ने अरुणा चा गळा आवळून खून केला. अरुणा चा खून का केला? कारण काय? याबाबत अजूनही आरोपीने स्पष्टपणे माहिती पोलिसांना दिलेली नाही.

    अशी घडली घटना..

    26 नोव्हेंबर रोजी अरुणा नागपुरात आल्या होत्या, तिथे पोहचल्यावर अरुणा ने पती ला मोबाईल द्वारे पोहचली असल्याचा कॉल केला, सायंकाळच्या सुमारास अरुणा चा मोबाईल बंद होता.


    रात्र झाल्याने अरुणा घरी आली नाही, पती अभय काकडे यांनी इतरत्र शोधाशोध केली.
    मात्र अरुणा यांचा काही पत्ता लागला नाही. याबाबत मिसिंग रिपोर्टची चिमूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. Chandrapur news today

    थांगलान चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित


    बेपत्ता असल्याच्या 15 दिवसांनी अरुणा चा मृतदेह मिळाला, काय झालं? कुणी अरुणा ला मारलं? याबाबत शंका व चर्चा रंगू लागल्या.

    असा लागला शोध….

    अरुणा कुठे गेली? याबाबत स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होती, काही दिवसांनी अचानक अरुणा चा मोबाईल ऑन झाला, गुन्हे शाखेला लोकेशन मिळताच ते पोहचले बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले कडे, गुन्हे शाखेने त्याला मोबाईल बाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

    तो पोलिसांना प्रतिसाद देत नव्हता, मात्र त्याचवेळी गुन्हे शाखेची नजर बाजूला असलेल्या दुचाकीवर गेली, सदर दुचाकी वाहन हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले.
    वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर शहरातील चांडक मेडिकल स्टोर्स जवळून दुचाकी वाहन चोरी झाले होते. Chandrapur drishyam


    डाहूले जवळ मिळालेले दुचाकी वाहन हे त्या गुन्ह्यातील होते, नरेश डाहूले ला चंद्रपुरात आणण्यात आले, अरुणा बाबत त्याला विचारणा केली मात्र तो काही प्रतिसाद व उत्तर देत नव्हता.


    त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी डाहूले ला वाहन चोरी प्रकरणी अटक केली, मात्र यावेळी अरुणा बाबत त्याने शहर पोलिसांना माहिती दिली आणि घटनेचा उलगडा झाला.

    आरोपी नरेश डाहूले यांनी 26 नोव्हेंबर रोजी झुमकार एप्प द्वारे चारचाकी वाहन भाड्याने घेतले, त्यानंतर दोघे रेशीमबाग मैदानजवळ गेले, त्याठिकाणी दोघांचा वाद झाला, नरेश ने अरुणा चा वाहनात ओढणीने गळा आवळत खून केला, आणि त्यानंतर त्याने शौचालयाच्या टाक्यात दगड, माती व प्लास्टिक द्वारे मृतदेहाची विल्हेवाट लावली. Chandrapur drishyam

    कोण आहे नरेश डाहूले?


    वर्ष 2014 मध्ये चंद्रपूर पोलीस दलात डाहूले रुजू झाले, त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये सेवा दिली, वर्ष 2023 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेत डाहूले कार्यरत होते.
    या काळात चंद्रपूर शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी नरेश डाहूले ला अटक केली, आणि त्यानंतर पोलीस दलाने त्याला सेवेतून बडतर्फ केले.


    डाहूले हल्ली नागपुरात वास्तव्यास होता, फूड डिलिव्हरी कंपनीत तो डिलिव्हरी बॉय चे काम करीत असल्याची माहिती आहे, त्याठिकाणी सुद्धा काही गुन्ह्यात त्याचा सहभाग असू शकतो, अशी शक्यता आहे. Chandrapur news today


    पोलीस विभागात राहून गुन्हेगारी काय आहे? त्यातून सुटका कशी करता येते याबाबत त्याला चांगलीच जाणीव होती.
    मात्र त्याला शेअर बाजार व क्रिकेट सट्टा चे व्यसन लागले आणि तो लाखोंचे कर्ज अंगावर घेत त्या ओझ्याखाली दाबला गेला.


    या ओझ्यातून स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने गुन्हेगारी क्षेत्रात उडी घेतली आणि हळूहळू त्याने पोलीस च्या वेशात चोराची भूमिका चांगलीच बजावने सुरू केले.


    विशेष बाब म्हणजे अरुणाची हत्या अपहरण आहे ही सिद्ध करण्यासाठी आरोपीने नरेश ने त्या काळात 2 ते 3 ठिकाणी अरुणा चा मोबाईल ऑन केला होता, जेणेकरून अरुणा चे कुणीतरी अपहरण केले हे पोलीस तपासात आले असते, आणि तपास भरकटला असता.

    अरुणा काकडे प्रकरणी चिमूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व गुन्हे शोध पथकाने चांगली कामगिरी केली.

    11 डिसेंबर रोजी अरुणा काकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

    आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.