Tag: MH34

  • cabinet expansion : पंतप्रधान मोदी यांनी घेतली कार्याची दखल पण….

    cabinet expansion

    cabinet expansion : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

    राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले. याशिवाय 50 कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. Maharashtra cabinet

    चंद्रपुरात गांजा व सुरा जप्त

    चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती.

    हा तर अन्याय आहे

    महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती.

    मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

    विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

    मंत्रिपद मिळणे होते गरजेचे

    2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजारांवर मतं मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी 33 हजार 440 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे.

    25 हजार 985 मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत.

    जिल्ह्याच्या प्रगतीत मुनगंटीवारांचे योगदान

    सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे. भारतीय जनता पार्टीला चंद्रपूरमध्ये अभेद्य किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे देखील चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भाजपकडून मोठी अपेक्षा होती.

    मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय जनता पार्टी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

  • ganja seized |चंद्रपुरात गांजा आणि सुरा जप्त

    ganja seized

    ganja seized चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी गुन्हेगारीने डोके वर काढले, अनेक हत्येचे प्रकरण झाले, गोळीबाराच्या घटना घडल्या, आता या घटना घडू नये यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे.

    15 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी गांजा, लोखंडी सुरा एका आरोपिकडून जप्त करीत एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

    त्यांना पोलीस बनायचं होत पण आधी काळ आला, चंद्रपुरात दुर्दैवी घटना

    चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर द्वारे शहरात गांजा विक्री (ganja seized) एका इसमाद्वारे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Chandrapur city police

    माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी बिनबा चौक, दर्गा वार्डात 35 वर्षीय शारीक जलील कुरेशी यांच्या घरी धाड मारली.

    मंत्रिमंडळातून भाजप जेष्ठ नेते मुनगंटीवार यांना डच्चू

    या धाडीत शहर पोलिसांना 93.05 ग्राम गांजा, रोख 3 हजार 900 रुपये, क्यू आर कोड स्टॅण्ड, एक मोबाईल व लोखंडी सुरा असा एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शारीक कुरेशी वर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

    सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. राहुल ठेंगणे, पोउपनि. संदिप बच्छीरे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोहवा. कपुरचंद खरवार, म.पो.हवा. भावना रामटेके, पो हवा. इम्रान शेख, सचिन राठोड, पो.अं. इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली असून पुढील तपास पो. उप. नि. पल्लवी काकडे करीत आहे.

  • Chandrapur death | त्यांना पोलीस व्हायचे होते पण नदीत असं घडलं की…..

    Chandrapur death

    Chandrapur death : ग्रामीण व शहरी भागातील मुले-मुली शासकीय नोकरीत लागावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सोबतच अनेक मुली व मुलांना आपल्या अंगावर खाकी वर्दी यावी यासाठी पोलीस भरती चा सराव करीत आहे.

    भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून मिळाला डच्चू

    हा सराव करताना आज 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास पोलीस भरतीचा सराव करताना भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत दोघे बुडाले यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

    जिल्ह्यातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती पुढे आली आहे, यात दोन तरुणी एक तरुणाचा समावेश आहे यातील एका मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. Chandrapur death

    सदर घटना धानोरा भोयगाव मार्गांवरील नदीच्या पत्रात आज सकाळी घडली असून संध्या शिंदे वय २० वर्ष रा. जिवती (पहाड वणी), युगल नागापुरे वय १९ वर्ष रा.सोनापूर गोंडपिपरी असे मृत्तकांची नावे असून समीक्षा शेंडे वय २० वर्ष बाबुपेठ चंद्रपूर या तरुणीला पाण्यात बुडाली असता वाचविण्यात यश आले आहे.

    ग्रामीण भागासह शहरी भागात पोलीस भरतीसाठी (police bharti) विद्यार्थी तसेच तरुण तरुणी मेहनत घेत सकाळी रनिंग व्यायाम करताना दिसत आहेत अश्याच आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे यांनी आपल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गांवरील वर्धा नदीवर आणले होते.

    व्यायाम झाल्यानतर काही मूल मुली नदीच्या पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली नदीच्या पात्रात बुडाल्या त्यातल्या एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तो ही पाण्यात बुडाला तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्यात आला तर वाचविण्यासाठी उडी मारलेल्या मुलाचा मृत्तदेह अजूनही पाण्यात बुडून असल्याची माहिती आहेत.

    घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घुग्गुस व गडचांदूर पोलिसांनी धाव घेतली असून युगल नागापुरे या तरुणाचा शोध सुरु असून अधिक तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.

  • Devendra Fadnavis Cabinet Expansion : कोण होणार मंत्री?

    Devendra Fadnavis Cabinet Expansion

    Devendra Fadnavis Cabinet Expansion महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवीत महायुतीने 200 च्या वर जागा जिंकल्या, बहुमतचे सरकार आल्यावर आता मंत्रिमंडळात कुणाला सामील करायचे व कुणाला डच्चू द्यायचा याबाबत महायुती पुढे मोठा पेच उभा आहे.

    आज नागपुरातील राज भवनात दुपारनंतर मंत्री मंडळाचा विस्तार करीत मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, अनेक आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला असला तरी अनेक जेष्ठ आमदारांना फोन न आल्याने धाकधूक वाढली आहे.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात रोजगाराची संधी, मिळेल 50 हजार पगार

    भाजपने आधीच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याची माहिती दिली होती, तसेचं महायुती मधील घटकपक्षांनी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला असल्याची माहिती आहे.

    ज्यांना मंत्रीपदासाठी कॉल आला नाही त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार (sudhir mungantiwar), रवींद्र चव्हाण तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनाही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. ज्यांना मंत्री पदासाठी फोन आले त्यांची संभाव्य यादी सुद्धा पुढे आली आहे.

    मंत्रिमंडळात या नावांची शक्यता


    भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे

    शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल

    राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 7 वेळा जिंकणारे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अजूनही फोन आला नसल्याची माहिती आहे.

    चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया (bunty bhangdiya) यांनी विजयाची हॅट्रिक मारली असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.


  • Tadoba Jobs 2024 | ताडोब्यात नोकरी, पगार 50 हजार

    Tadoba Jobs 2024

    Tadoba jobs 2024 जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 10 पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना 13 ते 50 हजार पगार मिळणार आहे.

    यामध्ये संप्रेषण व्यवस्थापक 1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी 1, लेखापाल (सेवानिवृत्त) 1, डेटा एंट्री ऑपरेटर 3, कॉल सेंटर सहायक 3, मल्टी परपज स्टाफ 1 अश्या एकूण 10 पदांची पदभरती करायची आहे. Tadoba national park


    जाहिरात बाबत अधिकृत माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
    या पदभरती मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात 20 डिसेम्बर 2024 सायंकाळी 5 स्वीकारण्यात येणार आहे. Tadoba jobs 2024

    अर्ज प्रक्रिया पार पडल्यावर अर्जाची छाननी करण्यात येईल, छाननी नंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, तारीख व स्थळ दूरध्वनी व ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
    पदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडल्यावर आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट घेण्यात येणार, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

    कांदा राखणार तुमच्या केसांची निगा

    पदासाठी पात्रता काय?


    संप्रेषण व्यवस्थापक – वयोमर्यादा 18 त 60 वर्षे, मानधन – 50 हजार
    शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर व जनसंचार /जाहिरात/जनसंपर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा.

    सीएसआर व्यवस्थापण अधिकारी – वयोमर्यादा 18 त 40 वर्षे, मानधन – 50 हजार, शैक्षणिक पात्रता – Business Administration/social sciences/environmental studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

    लेखापाल (सेवानिवृत्त) – वयोमर्यादा 58 ते 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. मानधन – 20 हजार. शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी – 40 आणि मराठी 30, MS CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

    डेटा एंट्री ऑपरेटर – वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष. मानधन – 18 हजार. शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी 40 आणि मराठी 30, MSCIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

    कॉल सेंटर सहायक – वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे. मानधन – 13 हजार 500
    शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक )

    मल्टी परपज स्टाफ – वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे. मानधन – 15 हजार शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (hsc बोर्डाचे मार्कशीट आवश्यक)

    जाहिरात बघा – क्लिक करा

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

  • Nyay Mandir | बल्लारपूर मध्ये होणार न्यायाची नवीन इमारत

    Nyay Mandir

    Nyay mandir : चंद्रपूर -‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे.

    एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

    रोजगार ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार जोरगेवार

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

    ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. Nyay Mandir

    न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

  • security guard board | ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार किशोर जोरगेवार

    security guard board

    Security guard board चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे उद्योगांमध्ये कामगारांची आणि सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

    यामुळे शासन स्तरावरील अडचणी आमच्या माध्यमातून सोडवून घेत रोजगार प्रक्रियेची गती वाढवावी आणि ती योग्य पद्धतीने राबवावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना दिले आहेत.

      आ. किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी गार्ड बोर्डच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यालयात कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेसह इतर कामगारांच्या रोजगार समस्यांवर चर्चा करण्यात आली.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, ‘‘गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारांना रोजगार मिळवून देणे ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण  प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर सिएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती (employment) प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुशरिफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी गार्ड बोर्डकडून होणार्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

    सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. लिंक सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्वरित नोंदणी करून आपली शारीरिक चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    बैठकीदरम्यान, आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले की, गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये. शासन पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, पण कामगारांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

  • mla kishor jorgewar birthday | सेवा सप्ताहाने होणार वाढदिवस साजरा

    mla kishor jorgewar birthday

    Mla kishor jorgewar birthday भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यासाठी पुढील सहा दिवस तुकूम प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

    शुक्रवार पासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन कार्यक्रमाने या सेवा सप्ताहाला सुरवात करण्यात आली आहे.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      १७ डिसेंबरला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार mla kishor jorgewar यांचा वाढदिवस मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जाणार आहे.

    या निमित्ताने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आठवडाभर तुकूम परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

     यात १३ तारखेला सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, १४ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, १५ डिसेंबरला योग शिबिर, १६ डिसेंबरला राष्ट्रवादी नगर येथील जगन्नाथ महाराज यांचा महाप्रसाद, १७ डिसेंबरला रक्तदान, रोगनिदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, लाडकी बहीण योजनेचा मेळावा, तर १८ डिसेंबरला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले आहे.

  • hair growth tips | कांद्याचा रस राखणार तुमच्या केसांची निगा

    hair growth tips

    hair growth tips : कांद्याच्या रसामध्ये काही घटक आढळतात, जे टाळूतील बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.


    सध्या केस गळणे ही एक समस्या आहे ज्याचा सामना जवळजवळ प्रत्येकजण करत आहे. विशेषत: थंडीच्या मोसमात हा त्रास आणखी वाढला आहे. जर तुम्हीही या हिवाळ्यात केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर केसांशी संबंधित समस्यांसाठी जादूचा घटक मानला जाणारा कांद्याचा रस वापरा. हे तुमचे केस गळणे कमी करण्यास उपयुक्त ठरेल. हिवाळ्यात केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. Best home remedy for hair growth

    विमानात प्रवास करताय मग हा नियम वाचा


    जे टाळूवर बुरशी किंवा बॅक्टेरियाच्या वाढीमुळे होते. कांद्याच्या रसामध्ये काही घटक आढळतात, जे स्कॅल्प फंगस नष्ट करण्यासाठी प्रभावी आहेत. याशिवाय केसांना कांद्याचा रस लावून मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे मुळे मजबूत होतात.

    वापरण्याचा योग्य मार्ग

    कांद्याचा रस लावणे केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. परंतु केसांना जास्तीत जास्त फायदे आणि पोषण देण्यासाठी, ते योग्यरित्या लागू करणे फार महत्वाचे आहे.

    दही-कांद्याचा रस

    दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि प्रथिने मुबलक प्रमाणात राहतात. कांद्याच्या रसात दही मिसळून टाळूवर लावता येते. यामुळे तुमची केसगळतीची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल. hair growth tips

    कोरफड-कांद्याचा रस

    त्वचेची निगा आणि केसांची काळजी घेताना कोरफड खूप महत्त्वाची आहे. कोरफड त्वचा, टाळू आणि केसांसाठी खूप सुखदायक आहे. कांद्याच्या रसात कोरफडीचा गर मिक्स करून लावू शकता. हे केवळ कोंडा आणि गोरा गळणे कमी करणार नाही तर तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार लुक देखील देईल.

    अंडी-कांद्याचा रस

    बायोटिन बद्दल तुम्ही ऐकलेच असेल, हा एक घटक आहे जो केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. अंड्यातील बायोटिन तुमच्या केसांच्या आरोग्याची काळजी घेते. तुम्ही ते कांद्याच्या रसात मिसळून केसांना लावू शकता. या हेअर पॅकमुळे तुमचे केस फक्त रेशमी आणि गुळगुळीत दिसत नाहीत तर वाढीलाही गती देतील.

    मध-कांद्याचा रस

    हिवाळ्याच्या मोसमात केस खूप खडबडीत होतात, त्यामुळे केस गुळगुळीत आणि रेशमी दिसण्यासाठी केमिकलयुक्त स्प्रे आणि इतर हेअर प्रोडक्ट्सचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. अशा वेळी कांद्याच्या रसात मध मिसळून लावल्यास खूप फायदा होतो. डॅमेज कंट्रोल सोबतच हे तुमचे केस मजबूत देखील करते.

    खोबरेल तेल-कांद्याचा रस

    शॅम्पूपूर्वी खोबरेल तेलाने मसाज करण्याचा सल्ला दिला जातो आणि कदाचित तुम्हीही असे करत असाल. कांद्याचा रस खोबरेल तेलात मिसळून लावल्याने तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळतील. यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि केस गळण्याची समस्या कमी होईल.

  • bamboo art and craft | विदर्भातील बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

    bamboo art and craft

    bamboo art and craft विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई. पी.स.एच) या संस्था एकत्र येऊन विदर्भातील बांबू उद्योजक, बांबू कारागीर समूह यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन वन अकादमी येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या कार्यशाळेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यातून 80 बांबू उद्योजक व कारागीर सहभागी झाले होते.

    कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी नागपूर डी.जी. एफ. टी. च्या सहाय्यक निदेशक स्नेहल ढोके, वन प्रबोधनीच्या अपर संचालक मनिषा भिंगे, मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी सुधीर आकोटकर, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे, महिला आर्थिक विकास मंहामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. काठोळे, श्री. पंधरे, बी.आर.टी.सी.चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी.मल्लेलवार आदी हजर होते.

    प्रास्ताविकेत बोलतांना सहायक निदेशक स्नेहल ढोके म्हणाल्या, जगातील हस्तकला वस्तूच्या व्यापारात भारताचा 40 टक्के वाटा असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबू हस्तकला वस्तूची बरीच मागणी आहे.

    विदर्भातील या बांबू वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी डी.जी.एफ. टी. कार्यालयातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

    आंतरराष्ट्रीय व्यापारात विदर्भातील बांबू वस्तूची (bamboo crafts) विक्री ही मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांचा  फायदा बांबू उद्योजक व कारागीर यांनी घेतला पाहिजे असे आवाहन, वन प्रबोधिनीच्या अप्पर संचालक मनिषा भिंगे यांनी केले.

    तज्ञ मार्गदर्शक तथा ई.पी.सी.एच.चे सहायक निदेशक क्रिष्णा चंदर यांनी हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी श्री. आकोटकर यांनी देशभरात डाक विभागाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून हस्तशिल्प व्यापारासाठी डाक विभागाने अनेक योजना तयार केल्या आहेत. त्याचा फायदा बांबू उद्योजक व कारागीरांनी घ्यावा. तसेच या कार्यशाळेत उपस्थितांसमक्ष बी.आर.टी.सी. सोबत सामंजस्य करार केला. bamboo art and craft

    माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी बी.आर. टी.सी. व माविम या विभागांनी एकत्र येऊन सामुहिक उपयोगिता केंद्राच्या माध्यमातून महिला बांबू कारागिराच्या रोजगार निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

    बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे यांनी बांबू उद्योजक व कारागीरांचे उद्योग वाढीसाठी बँक बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य योजनांची संक्षिप्त माहिती  दिली. तर अमेझॉन ग्लोबलचे यश दवे यांनी बांबू वस्तूच्या विक्रीसाठी आॅनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रीयेबाबत माहिती दिली.

    विदर्भातील बांबू उद्योजकाच्या बांबू हस्तकला वस्तूंना आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थान मिळावे, याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन,शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन प्रबोधिनीचे संचालक श्री. एम. एस. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे यांच्या  मार्गदर्शनात करण्यात आले.

    कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी बांबू उद्योजक व कारागीरांनी बी.आर. टी.सी.चे आभार मानले. कार्यशाळेचे संचालन पर्यवेक्षिका योगिता साठवणे तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवार यांनी मानले.