Tag: MH34

  • Chandrapur fire accident | चंद्रपुरात अग्नितांडव

    Chandrapur fire accident

    Chandrapur fire accident : चंद्रपूर शहराजवळील मोरवा येथे एक भीषण आगीची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ईगल नावाच्या ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या अवैध गोदामात घडली. या गोदामालगत असलेल्या भंगार गोदामालाही आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोदामात डीझेल आणि ऑइलचा अवैध साठा होता, ज्याला आग लागल्याचे समजले आहे.

    आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    आगीची तीव्रता इतकी होती की, आसपासच्या विविध अग्निशमन सेवांनी घटनास्थळी बंब पाठवले. ऐन महामार्गालगत असलेल्या या अवैध गोदामातील आग फार दूरवरूनही दिसत होती. सध्या या जागेच्या मालकीबाबत संभ्रम आहे. पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास सुरू आहे. Illegal warehouse fire

    दुर्दैवाने, या आगीत एक व्यक्ती जाळली गेल्याची माहिती आहे. तपासादरम्यान अधिक माहिती सामोरी येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अवैध गोदाम आणि धोकादायक सामग्रीच्या साठ्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • Vinay Gowda GC initiatives । “जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा आश्रमशाळांना दौरा, विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी संवाद”

    Vinay Gowda GC initiatives

    Vinay Gowda GC initiatives :  राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

    महाकाली यात्रेसाठी १ कोटींचा निधी द्या – सुधीर मुनगंटीवार

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली. Vinay Gowda GC initiativ

    तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. District Collector school visit

    जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.

  • Maharashtra Government Scholarship Schemes । विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू, वेळेत अर्ज सादर करा

    Maharashtra Government Scholarship Schemes

    Maharashtra Government Scholarship Schemes : अनूसूचित जाती प्रवर्गातील ‍विद्यार्थ्याकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती,  फ्रीशिप, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना या पाच योजनांचे नविन व नुतनीकरणाच्या अर्जाची महाडीबीटी प्रणालीद्वारे स्वीकृती सुरू झाली आहे. MahaDBT Scholarship Application

    स्वाधार योजनेतील त्रुट्या तात्काळ करा दुरुस्त

    महाडीबीटी प्रणालीवर ज्या ‍विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही वा मागील वर्षातील अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहे, अशा अर्जदारास  त्यांचा अर्ज सादर करण्याबाबत महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी  लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच‍ विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज सादर न केल्यास सदर योजनेच्या लाभापासून अर्जदार वंचित राहिल्यास याची  सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची विद्यार्थ्यांनी दखल  घ्यावी, अशाही सूचना देण्यात याव्या. तसेच महाविद्यालयाने प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची  नोंदणी  होईल या दृष्टिने प्रयत्न करावेत. MahaDBT Portal Registration

    महाडीबीटी प्रणालीवरील द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाकरिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे  नूतनीकरणाच्या अर्जाकरिता प्रथम प्राधान्य देऊन सदर अर्ज प्राचार्यांनी निकाली  काढावेत. प्रथम वर्षातील ज्या अभ्यासक्रमांचे संबंधित शैक्षणिक यंत्रणा/ विभागामार्फत महाविद्यालयांचे शैक्षणिक  शुल्क मंजुर झालेले आहे, अशा द्यमहाविद्यालयांनी नविन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सर्व दस्ताऐवजांची पडताळणी, अभ्यासक्रम शुल्क, आधार बँक लिंकस्थिती, इत्यादि बाबींची खातरजमा सर्व  अर्ज 10 मार्च 20254 पर्यत  जिल्हा कार्यालयास तात्काळ पाठवावेत.

    महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी  जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहिल, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण  यांनी कळविले आहे.

  • Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana । “स्वाधार योजनेच्या अर्जात त्रुटी? विद्यार्थ्यांनो त्वरित दुरुस्ती करून अर्ज सबमिट करा!”

    Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

    Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश  न मिळालेल्या, तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक  साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी  करण्यात येत आहे. Swadhar Yojana Maharashtra

            शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात आले आहेत. सदर अर्जाची छाननी केले असता अनेक अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्रुटी पुर्ततेकरीता सदर अर्ज विद्यार्थी लॉगीनला  Revert/Send Back करण्यात आले आहे.

    या आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    विद्यार्थी लॉगीनला दिसत असलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने तात्काळ परत सबमीट करणे आवश्यक आहे. तसेच अर्जाची प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाजकल्याण  कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. ऑनलाईन अर्जासोबत सादर करण्यात येत असलेले सर्व कागदपत्रे हे स्पष्ट दिसणारे असावेत. तसेच ऑफलाईन कागदपत्रे हे विद्यार्थ्यांने स्व:साक्षांकीत (Self Attestd) असावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण  विनोद मोहतुरे  यांनी केले आहे. Swadhar Yojana documents required

  • Labor minister Maharashtra । “कामगार सुरक्षेसाठी मोठा निर्णय: कायद्यात सुधारणा आणि चंद्रपूर दौऱ्याची कामगार मंत्र्यांची घोषणा”

    Labor minister Maharashtra Akash Fundkar

    Labor minister Maharashtra : राज्यात कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचे दुर्दैवी मृत्यू होतात. तसेच अशा घटनांमध्ये काही कामगार जखमी होतात. अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी जाऊन याप्रकरणी तपासणी करतात.  तपासणीअंती अहवाल सादर करतात. जास्तीत जास्त कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. अशा दुर्घटनांमध्ये कामगाराच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अधिवेशन संपताच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगातील कामगार सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात  दौरा करण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिले. Industrial safety in Maharashtra

    महाकाली यात्रेसाठी निधी द्या – सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. धारिवाल सह जिल्ह्यातील अन्य उद्योगामध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याने कामगारांचे बळी जात आहेत याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. कामगार मंत्र्यांनी जिल्ह्यातील उद्योगात कामगार सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री  राजू तोडसाम, नाना पटोले,  हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला. Workplace accidents statistics Maharashtra

    लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदनाची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. Labor laws Maharashtra

    चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल.सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

  • Chandrapur Mahakali Yatra । लाखो भाविकांचा महाकाली यात्रेत सहभाग – सोयीसुविधांसाठी १ कोटींची मदत मिळणार?

    Chandrapur Mahakali Yatra

    Chandrapur Mahakali Yatra : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात भव्य यात्रा भरते. विदर्भातील अष्टक त्रीपिठांपैकी एक असलेल्या या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. चंद्रपूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत लाखो भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांची भेट घेऊन यात्रेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. Chandrapur Mahakali Yatra facilities

    या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचा विचार करता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. Chandrapur Mahakali Yatra arrangements

    औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करा – आमदार जोरगेवार

    यात्रेदरम्यान फक्त 15 ते 20 दिवसांत सुमारे 10 लाख भाविक येथे येतात.  यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तात्पुरती निवासव्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालये, विद्युत रोषणाई, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी व इतर आवश्यक बाबींच्या उपलब्धतेसाठी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत,यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर चर्चा केली. Chandrapur Mahakali Temple infrastructure

    मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
    चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी 1 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा व सुविधांची गरज लक्षात घेता, निधी मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

    झरपट नदीचे पावित्र्य राखण्यासाठी
    आ. श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार

    चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थ म्हणून झरपट नदीचे महत्त्व आहे. परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे, याकडे नागरिकांच्या मागणीनुसार आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आणि त्यासंदर्भात तातडीने काम करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले.

    यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी
    भाविकांसाठी स्नानगृह उभारावे. त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित करावे. महानगरपालिकेने गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम, चार ट्यूबवेल्स व फवारे बसवावेत तसेच अंचलेश्वर मंदिर येथे टाइल्स लावण्याचे कार्य हाती घ्यावे, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

  • Kishor Jorgewar demand for safety audit । चंद्रपूरमध्ये औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट होणार? आमदार जोरगेवार यांची सभागृहात ठाम मागणी

    Kishor Jorgewar demand for safety audit

    Kishor Jorgewar demand for safety audit : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून, येथे कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही घटनांवर नजर टाकता, कामगारांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांची सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

    आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष चंद्रपूरातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेकडे वेधले. यावेळी, येथे पूर्णवेळ कामगार आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात बोलताना केली. Chandrapur industrial safety

    धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत घडलेल्या दुर्दैवी घटनेत कर्णधर शेळके या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करत  कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. Contract workers safety Maharashtra

    चंद्रपूर हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा असून, येथे स्टील, सिमेंट आणि पेपर उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामगार सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील घटनेने कामगार सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. Industrial safety audit demand

    कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाय नसल्यामुळे अनेक कामगारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना नोकरीची शाश्वती नसल्याने त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी या गंभीर समस्येचे गांभीर्य ओळखून विधानसभेत आवाज उठवला. कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियम लागू करणे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरमध्ये पूर्णवेळ कामगार आयुक्ताची नियुक्ती करण्यात यावी आणि सर्व औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे.

  • Shiv Sena protests against Abu Azmi । आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    Shiv Sena protests against Abu Azmi

    Shiv Sena protests against Abu Azmi : चंद्रपुर :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपट सुरु असतांना संभाजी महाराजांच्या शौर्याचे चित्रण करित तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त विधान केलं आहे. Abu Azmi on Aurangzeb

    छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई विषयी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या असून वारंवार जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने रामनगर पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक आसिफरजा शेख यांना लेखी तक्रार देवून करण्यात आली. Chandrapur political news

    चंद्रपुरातील प्रदूषणबाबत आमदार मुनगंटीवार यांचा तारांकित प्रश्न

    यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वात बल्लारपुर महिला आघाडी संघटिका क्रिष्णाताई सुरमवार, चंद्रपुर उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, युवासेना माजी महानगर प्रमुख दिपक रेड्डी, भद्रावती महिला आघाडी उप तालुका प्रमुख राधाबाई कोल्हे, भद्रावती युवासेना माजी उप शहरप्रमुख विवेक दुर्गे, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे व शिवसैनिक निखिल सुरमवार यांची लेखी तक्रार देतांना उपस्थिती होती.

    राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना सपा नेते व मानखुर्द- शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे देखील विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती, असा आशयाचे विधान जाणीवपूर्वक समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. Abu Azmi vs Shiv Sena

    “छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही,” असंही अबू आझमी यांनी म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून वारंवार जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. Maharashtra politics latest news

  • Chandrapur district collector । चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मान

    Chandrapur district collector

    Chandrapur district collector : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या  नेतृत्वात महिला व बालविकास विभागाने बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, POCSA यासारख्या काय‌द्याची प्रभावी अंबलबजावणी करून बाल संगोपन योजनेसाठी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘बालस्नेही’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. Maharashtra child rights

    चंद्रपुरातुन अवैध दारू वाहतुकीचा प्रयत्न फसला

    हा पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मनिषा कायंदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, आयोगाचे सदस्य प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या सोबतच दीपक बानाईत यांना ‘बालस्नेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ हा वैयक्तिक पुरस्कार, बाल कल्याण समिती चंद्रपूर यांना ‘बालस्नेही सीडब्ल्यूसी’ पुरस्कार तसेच बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांना ‘बालस्नेही डीसीपीयू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत. Child protection laws

    जिल्हा प्रशासनाची मंत्रालयात दखल : तीन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा नुकताच मंत्रालयात सत्कार करण्यात आला होता. तर आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एकप्रकारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्रालय स्तरावर होत असून जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.

  • Chandrapur thermal power plant pollution । चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणावर कारवाई – MPCB कडून कठोर पावले

    Chandrapur thermal power plant pollution

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा तारांकित प्रश्न

    Chandrapur thermal power plant pollution : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणात वाढ झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. १७/०१/२०२५ रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मे. दुर्गापुर खुली खाण या उद्योगांची पाहणी करण्यात आली. भेटी दरम्यान आढळुन आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधित उद्योगांवर नियामाप्रमाणे आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. Western Coalfields Limited Durgapur mine environmental impact

    चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत आमदार जोरगेवार यांची महाजेनको अधिकाऱ्यांशी बैठक

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र या उद्योगास दि. १७/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ३०/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड दुर्गापुर या उद्योगास दि. २९/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ०७/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच उपरोक्त दोन्ही उद्योगांची अनुक्रमे रू.१५.०० लक्ष व रू.५.०० लक्ष बँक हमी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. Chandrapur air quality concerns

     चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर, कोंडी व नेरी येथील वेकोलि दुर्गापूर सीएचपी बंकर, सीएचपी रोप-वे व महाऔष्णीक विद्युत केंद्र प्रकल्पातून २४ तास निघणाऱ्या धुळीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होत असल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुळ तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणली. प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या व त्वचेच्या होणाऱ्या विकारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ही प्रदुषणकारी उपकरणे हटविण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी सदर प्रश्नाद्वारे केली. Coal mining impact on agriculture in Chandrapur


    चंद्रपूर तालुक्यातील येरूर येथील एमआयडीसीतील कारखान्यामुळे तसेच अल्ट्राटेक व माणिकगड सिमेंट कंपन्यामुळे गडचांदूर, नांदा फाटा व लगतच्या गावांमध्ये जल व वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे निदर्शनास आणली. या विषयाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळा मार्फत प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यानी लेखी उत्तरात सांगितले.