Tag: MH34

  • Chandrapur police murder । चंद्रपुरात पोलिसांसमोर पोलिसाची हत्या, थक्क करणारं कारण आलं समोर

    Chandrapur police murder

    Chandrapur police murder चंद्रपूर ८ मार्च (News३४) : 2 लहानपणाचे पोलीस मित्र बिअर पिण्याचा बेत आखतात मात्र काही वेळातच या मित्रांपैकी एकाचा निर्घृण खून होतो. ही हादरवणारी घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा जवळील पिंक पॅराडाईज बार जवळ 7 मार्चला घडली.

    मृतक पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण मोटर परिवहन विभागात कार्यरत होता, तर राजुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत संदीप चाफले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

    37 वर्षीय पोलीस कर्मचारी संदीप चाफले हे 26 फेब्रुवारी पासून वैद्यकीय कारणापासून रजेवर होते, त्यांचं घर हे चंद्रपुरातील पठाणपुरा जवळ आहे.
    26 फेब्रुवारी पासून समीर चाफले आपल्या घरी चंद्रपुरात राहत होते, दिलीप चव्हाण सोबत ते रोज भेटत होते.
    7 मार्च दिलीप व समीर नेहमीप्रमाणे भेटले, मात्र हा दिवस मैत्रीचा शेवट होता असे दोघांनाही वाटले नव्हते.
    आज आपण बिअर प्यायची असा बेत दोघांनी आखला. आणि पठाणपुरा येथील पिंक पॅराडाईज बार मध्ये दोघे बिअर पिण्यासाठी गेले. Police officer killed in Chandrapur

    चंद्रपूर हादरलं, बार समोर खुनी तांडव


    बार मध्ये समीर च्या लहान भावाचे मित्र भेटले होते, हाय हॅलो केल्यानंतर नितेश जाधव (समीर च्या लहान भावाचा मित्र) याचे बारच्या काउंटरवर ड्रिंक च्या पैश्याबाबत बोलणे सुरू होते.
    त्यावेळी नितेश ला समीर ने कशाला हुज्जत करतो पैसे देऊन टाक असे म्हणाला मात्र नितेशचा मित्र अक्षय शिर्के हा समीर ला शिवीगाळ करू लागला. तू बार चा मॅनेजर आहे काय? असे म्हणत समीर ला अश्लील भाषेत आई-बहिणीवरून शिविगाळी केली, शिव्या कशाला देत आहे या शब्दात दिलीप चव्हाण ने मध्यस्ती केली यावरून दिलीप व अक्षय मध्ये झटापट झाली. Dilip Chavan murder case


    वाद वाढत असताना समीर ने आपण बार च्या बाहेर बोलू असे सांगितले, व नितेश, समीर, दिलीप व अक्षय हे बाहेर आले, त्या दरम्यान अक्षय ने आपल्या मित्राला कॉल करीत सामान घेऊन ये असा बोलला.
    नितेश, समीर व दिलीप हे तिघे बोलत असताना अक्षय ने गल्लीत या असा दम दिला.
    त्यावेळी अनोळखी युवकाने अक्षयला धारदार हत्यार दिले, काही समजायच्या आत अक्षय ने दिलीप व समीर वर सपासप वार केले. Crime in Chandrapur city


    दिलीप च्या हातावर, छातीवर व पाठीवर व समीर च्या हातावर वार केला, अचानक घडलेल्या या घटनेमुळे समीर ने दिलीप ला उचलत बाजूला केले, नागरिक व समीरच्या पत्नीने दोघांना दुचाकीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दिलीप ला मृत घोषित केले.
    शहरात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली ही बाब वाऱ्यासारखी पसरली, पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी या प्रकरणात अक्षय शिर्के, नितेश जाधव व यश समुद या तिघांना अटक केली.

  • Chandrapur police attack | चंद्रपूर हादरले! पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

    Chandrapur police attack

    Chandrapur police attack : चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून आता गुन्हेगारांनी पोलिसांवरच हल्ला करण्याची धमक दाखवली आहे. 7 मार्च रोजी पठाणपुरा गेटच्या आत पिंक पॅराडाईज बार मध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते, त्यावेळी त्यांचा युवकासोबत वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, त्यानंतर त्या युवकाने काही जणांना सोबत घेत पोलिसांवर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व समीर चाफले वर सपासप वार केले. या भ्याड हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी समीर चाफले हा गंभीर जखमी आहे.

    वाघाने घेतला मेंढपाळाचा बळी

    पठाणपुरा गेट च्या आत असलेल्या एका बारमध्ये झालेल्या वादातून हा हल्ला घडला. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, हा परिसर अनेक अवैध हालचालींनी बदनाम आहे, आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Chandrapur murder case


    या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते, आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं असल्याची माहिती पुढे आली. Chandrapur police news


    चंद्रपूर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांची टोळकी कायद्याला धाब्यावर बसवून सर्रास गुन्हे करत आहेत. पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून, आता पोलिसांसाठीही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.


    या हत्याकांडानंतर गुन्हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच पोलिसांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Jivati taluka PM Award nomination । “जिवती तालुक्याचा भारतात 49वा क्रमांक, आकांक्षित तालुका कार्यक्रमात उल्लेखनीय यश!”

    Jivati taluka PM Award nomination

    Jivati taluka PM Award nomination : देशातील सर्वात मागासलेल्या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण पाच थीम व नऊ सेक्टर दिले आहेत. या नऊ सेक्टरमध्ये जिवती तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने आकांक्षित तालुका कॅटेगिरीमध्ये पीएम अवार्ड करिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. PM Awards for Excellence in Public Administration

    आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वच्छता, कृषी आणि संबंधित सेवा, पेयजल आणि स्वच्छता, आर्थिक समावेशन, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास आदींचा समावेश आहे. भारत सरकारने 2024 च्या सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार योजनेला मान्यता दिली आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कारांची रचना देशभरातील नागरी सेवकांनी केलेल्या अनुकरणीय कार्याची दखल घेण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी करण्यात आली आहे.  Jivati taluka development ranking

    महिला सरपंच व ग्रामसेवकाला लाचखोरी प्रकरणी अटक

    या अनुषंगाने प्राधान्य क्षेत्रातील कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा समग्र विकास या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार प्रदान केले जातील. आकांक्षित तालुका कार्यक्रम या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार तर केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्ये, जिल्हे यांच्यासाठी नवोपक्रम या श्रेणीअंतर्गत सहा पुरस्कार प्रदान केले जातील.

    20 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान पुरस्कार पोर्टल सुरू करण्यात आले. 27 जानेवारी  ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणी आणि नामांकन सादर करण्यासाठी हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या अंतर्गत पीएम पुरस्कार पोर्टलवर 1588 नामांकने प्राप्त झाली. यात जिल्ह्यांचा समग्र विकास करीता 437 नामांकने, आकांक्षित तालुका कार्यक्रम करीता 426 नामांकने तर नवोपक्रम अंतर्गत 725 नामांकने प्राप्त झाली. यात आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. PM Awards portal 2025

    आकांक्षित कार्यक्रम सुरू झाल्यापासून एप्रिल ते जून 2023 च्या आधारावर प्रथम डेल्टा रँकिंग प्रदर्शित करण्यात आली होती. त्यात जिवती तालुक्याचा भारतातून 500 पैकी 290 वा क्रमांक होता. त्यानंतर मागील एका वर्षात सर्व विभागनीय काम केल्यानंतर सहाव्या डेल्टा रँकिंग नुसार जिवती तालुक्याचा क्रमांक संपूर्ण भारतामध्ये 500 पैकी 49 वा आहे. तसेच झोन फोर- पश्चिम विभाग यामध्ये 69 आकांक्षित तालुक्यांपैकी जिवतीचा पाचवा क्रमांक आहे.

  • Maharashtra government land encroachment । “खासदार धानोरकरांची मागणी: 30-40 वर्षांपूर्वीच्या अतिक्रमीत जागांना कायमस्वरूपी पट्टे द्यावेत”

    Maharashtra government land encroachment

    Maharashtra government land encroachment : महाराष्ट्रात न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक घरांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे कारण दाखवून अतिक्रमीत जागा 7  दिवसांच्या आत घरासह खाली करण्याचे पत्र अनेक नागरीकांना प्राप्त झाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व महसुल मंत्री यांना पत्र लिहून वरील विषयात नागरीकांची बाजू न्यायालयात मांडून कायमस्वरुपी पट्टे देण्याची मागणी केली आहे. Pratibha Dhanorkar letter to CM

    जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शासकीय जागेवर अतिक्रमीत केलेल्या रहीवासी असलेल्या नागरीकांना प्रशासनाचे न्यायालयाच्या आदेशान्वये जागा रिक्त करण्याचे पत्र आल्याने अनेक नागरीकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्र चंद्रशेखर बावणकुळे यांना पत्र लिहून न्यायालयात शासनाने नागरीकांची बाजू मांडावी. तसेच, त्यांना बेघर होण्यापासून थांबवावे अशी विनंती खासदार धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. Permanent lease for encroachers

    वाळू तस्करांवर कारवाई करा – शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    30 ते 40 वर्षांहून अधिक कालावधी लोटून गेल्याने नागरीकांनी अतिक्रमीत करून घरे बांधलेल्या जागांना कायमस्वरुपी पट्टे देऊन नियमानुकूल करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात खासदार धानोरकर यांचेकडे नागरिकांचे निवेदन प्राप्त होताच त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच, शासकीय जागेवर भविष्यात शासनाची कुठलीही विकासात्मक योजना नसल्यास अशा जागांवरील अतिक्रमण धारकांना शासनाने पट्टे द्यावेत अशी देखील मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.  Rehabilitation of encroachers in Maharashtra

  • Chaitra Navratri Mahakali Yatra Chandrapur । महाकाली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज – आमदार जोरगेवार यांचे महत्त्वाचे निर्देश!

    Chaitra Navratri Mahakali Yatra Chandrapur

    Chaitra Navratri Mahakali Yatra Chandrapur : चैत्र महिना आला की, लाखो भक्तगण श्रद्धेने माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात येतात. या यात्रेची महती संपूर्ण देशात पोहोचावी आणि भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने प्रभावी व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि मागील वर्षांच्या अनुभवावर आधारित उणिवा दूर करून भाविकांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यावर भर द्यावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

     आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेसह शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, शाखा अभियंता श्रिकांत भट्ट, मनपा उपायुक्त मंगेश खवले, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता बहुरिया, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी रांजनकर यांच्यासह संबधित विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.

    तातडीने उपाययोजना व सोयी सुविधांवर भर द्या   

    ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्र महाकाली यात्रेत यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. यात्रा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, यासाठी नियमित स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे आणि त्यांची नियमित देखभाल करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले आहेत. Mahakali temple pilgrimage

    माता महाकाली यात्रेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, या यात्रेची महती देशभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल माध्यमांतून यात्रा व्यवस्थेची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवावी. तसेच मार्गदर्शन केंद्र उभारून यात्रेतील सेवा व सुविधा यांची माहिती भाविकांना द्यावी. Chaitra Navratri temple visit

    चंद्रपूर महानगरपालिका कर्जबाजारी होणार?

    यात्रेकरूंच्या सुरळीत हालचालीसाठी वाहतूक व्यवस्थापन काटेकोर असावे. वाहन पार्किंगसाठी पटेल, कोठारी, बागला यांच्या जागेसह इतर जागा निश्चित करून तेथे भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वाहतूक विभागाने यात्रेकरूंच्या वाहनांना अडवू नये, कोणत्याही गैरसोयीशिवाय ते मंदिर परिसरात पोहोचतील, अशी व्यवस्था करावी. गर्दी नियंत्रणासाठी वळण मार्गांची योग्य रचना करण्यात यावी. अधिकाधिक भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरणात दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी वॉटरप्रूफ पंडाल उभारून यात्रेचा विस्तार वाढवावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. Chandrapur Mahakali Yatra 2025

    विकासकामांवर विशेष भर

    चंद्रपूरच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या योजनांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पुतळा उभारणी प्रकल्प, शहरातील पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत सांगितले.

    अनेक विकासकामे प्रलंबित असून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे. चंद्रपूरच्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार कामांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. शहरातील ऐतिहासिक आणि महापुरुषांचे पुतळे उभारणीचे काम पूर्ण करणे, तसेच वाहतूक, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करणे ही तातडीची गरज आहे. Best time to visit Mahakali temple Chandrapur

    यासोबतच, चंद्रपूर शहरातील रस्ते, वळण मार्ग, सायकल वाटप योजना, नदीकाठावरील विकास प्रकल्प आणि गुंठेवारीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत संबधित अधिकार्यांना दिले आहेत. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, महाकाली मंदिर चे विश्वस्त सुनिल महाकाले, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, मनोज माल, माजी नगर सेवक देवानंद वाढई, अमोल शेंडे, मंगेश अहिरकर, सलिम शेख, नकुल वासमवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

  • Municipal Corporation loan । चंद्रपूर मनपा कर्जबाजारी होणार? कुणी केला हा दावा?

    Municipal Corporation loan

    Municipal Corporation loan : दिनांक 6 मार्च रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय समितीची अर्थसंकल्पीय सभा पार पडली. यावेळी 2025-26 च्या अर्थसंकल्पा बाबत प्रसिद्धी माध्यमांद्वारे चंद्रपूरच्या जनतेला माहिती देताना आयुक्त विपिन पालीवाल यांनी हेतूपुरस्पर कर्जाबाबतची माहिती लपविल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. मनपा जवळपास 250 कोटी रुपयांचे कर्ज घेणार असून प्रशासकीय समितीने तशा प्रकारचे ठराव यापूर्वीच मंजूर केले आहे. कर्जाची मागणी करणारे प्रस्ताव सुद्धा संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे. तरीसुद्धा याबाबतची माहिती लपविण्याचा धक्कादायक प्रकार देशमुख यांनी उघडकीस आणला. Financial crisis

    जिल्ह्यातील वाळू माफियांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक


    शासनाच्या निधीतून शहरात अमृत पाणीपुरवठा योजना (Amrut Water Supply Scheme) टप्पा-2 (270 कोटी रु.),, भूमिगत मल:निसारण योजना(506 कोटी रु.), तसेच रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्र( 27 कोटी रु.) अशा तीन योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांसाठी शासनाकडून निधी मिळतो. मात्र कामाच्या किमतीच्या 33% हिस्सा मनपाला द्यावा लागतो. अमृत पाणीपुरवठा योजना टप्पा-2 करिता 85.791 कोटी रुपये, मल:निसारण योजने करिता 162.61 कोटी रुपये व रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला 9 कोटी रुपये मनपाचा हिस्सा म्हणून द्यावे लागणार आहेत.


    अर्थसंकल्पा बद्दल माध्यमांना माहिती देताना आयुक्त पालीवाल (Commissioner Paliwal) यांनी रामाळा तलाव पुनर्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी मनपाचा हिस्सा म्हणून 9 कोटी रुपये खनिज विकास निधीतून प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी यावर्षी 70 कोटी व मल:निसारण योजनेसाठी 20 कोटी रुपये मनपाचा हिस्सा म्हणून तरतूद केल्याचे नमूद केले. मात्र यावर्षीचा हा निधी कसा उभा करणार याची माहिती हेतूपुरस्पर व अत्यंत हुशारीने नमूद करण्याचे टाळले. मल:निसारण व अमृत पाणीपुरवठा योजनेकरिता लागणारा एकूण अंदाजे 250 कोटी रुपये मनपाचा हिस्सा कसा देणार याबद्दलची माहिती देण्याचे सुद्धा त्यांनी टाळले. Chandrapur budget

    चंद्रपूर मनपावर कर्जाचा भार वाढणार
    आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे 250 कोटी रुपयांचा निधी देणे मनपाला शक्य नाही. त्यामुळे शहरी पायाभूत विकास निधीतून(UIDF) कर्ज घेऊन मनपा हा निधी उभारणार आहे. पुढील दोन वर्षानंतर व्याजासह या कर्जाची परतफेड करावी लागेल. कर्जाचा हा भार मनपाला भविष्यात जड जाणार. कर्जाचे हप्ते फेडणे मनपाला शक्य झाले नाही तर आर्थिक दिवाळखोरी निघेल.गरज व आर्थिक क्षमता नसताना मनपाने मर्जीतील नेते व कंत्राटदारांच्या हितासाठी कामाच्या किंमती फुगवून मल:निसारण व अमृत पाणीपुरवठा टप्पा दोनच्या योजनेला मंजुरी दिली.याचे परिणाम चंद्रपूरकरांना भविष्यात भोगावे लागतील, भविष्यातील विकास कामांवर याचे गंभीर परिणाम होतील.
    …….. पप्पू देशमुख

  • Shiv Sena Against Sand Mafia । रेती तस्करांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा – शिवसेनेची मागणी

    Shiv Sena Against Sand Mafia

    Shiv Sena Against Sand Mafia : चंद्रपूर जिल्ह्यात रेती घाट बंद असतांना सुद्धा चंद्रपूरातील नदी, नाले व जंगलामधील अवैध रेतीची तस्करी जोमात सुरु असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्यांचे वाहन व रेती तस्करी करीता शक़्कल लावून वापरणारे इतर सर्व साधने ताब्यात घेवून आळा घालण्यात येवून रेती माफियांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. Chandrapur District Collector Action

    वाळू तस्करीवर प्रशासन झोपेत
    मागील एक ते दीड वर्षापासून जिल्ह्यात रेती घाट बंद असल्यामुळे जिल्ह्यातील महसूल तर कमी झालेच पण रेतीवर अवलंबून असलेले सर्व उद्योग, व्यापारावर परिणाम झाला असून उद्योगाशी निगडीत सर्व लोकांवर बेरोजगारीने उपसमारीची पाळी येवून देखील प्रशासना कुंभकर्णी निद्रेत झोपी गेले आहे. निवडणूका असल्यास जिल्ह्यातील सर्व अवैद्य धंदे करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती तस्करी करणाऱ्यांवर आळा बसविण्यात प्रशासन यशस्वी देखील होते. परंतु निवडणुका संपताच जिल्ह्यात सर्वत्र रेती माफिया रेती तस्करी जोमाने करत असून रेती घाट बंद असतांना एवढ्या मोठया प्रमाणावर रेती शहरात व संपूर्ण जिल्ह्यात येत कुठून आहे? अशी सर्व सामान्य माणसांना व जनतेला प्रश्न पडलेला आहे. Illegal Sand Mining in Chandrapur

    कारवाईचा देखावा

    फक्त निवडणुकीपुरता प्रशासन प्रामाणिकपणाचा देखावा करून आज घाट बंद असून सुद्धा रेती माफिया दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर, ट्रक, व हाईवा भरून बांधकामाच्या ठिकाणी रेती टाकत असून यांना प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांची, पोलीस व महसूल विभागाची भीती राहिलेली नाही. उलट सर्व सामान्य माणसानी त्यांना रेती विषयी विचारपूस केली असता तेच उलट सामाजिक कार्यकर्त्यांना व जनतेला धमकावून ज्यांना तक्रार करायची त्यांना करा! आमचं कुणीही काहीच वाकडे करू शकत नाही, आम्ही तहसीलदार व पोलीस विभागाला महिन्याचे पैसे देतो म्हणून सांगतात? Strict Action on Sand Smuggling


    त्यामुळे असे स्पष्ट होते की, रेती तस्करांचे प्रशासकीय व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी संगमताने आर्थिक व्यवहार सुरु असून त्याकरिताच जिल्ह्यातील रेती घाट बंद ठेवण्यात तर आले नाहीत ना!शासनाचा महसूल बुडवून भष्ट्र अधिकारी खिसे भरण्यात येत आहे. यात कुणाचा निजी स्वार्थ लपलेला आहे. हे उघड़ झाले पाहिजे! जेव्हा की, घरकुल धारकांना घरे बांधण्यासाठी रेती मिळत नसल्याने त्यांना जादा किमतीत रेती घ्यावी लागत असून एक हायवाला 45,000/- द्यावे लागत आहे. मग घरकुलचे घर बांधकाम कसे होईल! त्यांना शासन घरकुलचे वाढीव रक्कम देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    वाळू माफियांकडून हफ्ते

    त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एका आठवड़यात प्रशासकीय अधिकारी यांच्या आशिर्वादाने सुरु असलेली अवैद्य रेती तस्करी थांबवावी व शासनाचा महसूल लुटण्यापासून बचाव करावा व लवकरात लवकर रेती घाटाचा लिलाव करून जनतेला रेती उपलब्ध करून द्यावी. तसेच अवैद्य मार्गाने, मनमानी भावाने रेती विकणारे व जिल्यातील रेती माफिया यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून यांची वाहने जप्त करावी. जिल्हा प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी रेती माफिया व अवैद्य धंदे करणाऱ्यांना पाठीशी अभय देवून रेती माफिया कडून हप्ते घेऊन त्यांना अवैद्य धंदे व व्यवसाय करण्यात मदत करीत आहे, अश्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून जनतेमध्ये एक इमानदार प्रशासनाचा संदेश द्यावा.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार

    जर रेती माफिया विरोधात कार्यवाही करण्याकरिता जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कमी पडत असेल तर शिवसेनेची किंवा जनतेची मदत घ्यावी. प्रशासनाने तक्रार नं. पब्लिक डोमेन मध्ये प्रसिद्ध करून जनतेला मदतीचे आव्हान करावे व कुठेही अवैध रेती आढळून आल्यास जनतेनी प्रशासनाला संपर्क करावा असे आव्हान जनतेला प्रशासनाच्या वतीने करावे. Illegal Sand Transportation News


    करीता आपण योग्य तो निर्णय घेवून अवैद्य रेती वाहतूक बंद करून लवकरात लवकर रेती घाट सुरू करावे. अन्यथा शिवसेनेकडून अवैद्य रेती वाहतुकीच्या विरोधात व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात जिल्ह्यात मोठे आंदोलन पुकारण्यात येईल व शिवसेना स्वतः रस्त्यावर उतरून संपूर्ण अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या माफियांच्या गाड्या रस्त्यावर अडवून त्या गाड्यातील रेती रोडवर टाकून शिवसेना पद्धतीने आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल, असा इशारा चंद्रपुर शिवसेनेकडून देतांना चंद्रपुर तालुका संघटक संजय शिंदे, उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, उप महानगर प्रमुख सूचक दखने, योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी उपस्थित होते. Illegal Sand Transportation News

  • Tiger attack in Mul MIDC | मूल एमआयडीसी परिसरात वाघाचा थरार: मेंढपाळाचा बळी

    Tiger attack in Mul MIDC

    Tiger attack in Mul MIDC : मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका वाघाने शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार (रा. चांदली बुज., ता. सावली) याला ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    लाच प्रकरणी चंद्रपुरातील महिला सरपंच व ग्रामसेवकाला अटक

    चिमढा शेतशिवारात केलझरकर यांच्या शेतात निलेश कोरेवार आणि त्याचा भाऊ योगेश कोरेवार हे शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन मुक्कामी होते. रात्री 11.30 च्या सुमारास वाघाने हल्ला करून निलेशला ओढत नेले. Man killed by tiger in Chandrapur

    घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी पथकासह शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान राजुरी कंपनीच्या मागील जंगलात निलेशचा मृतदेह आढळून आला. Human-wildlife conflict Maharashtra

    2025 मध्ये मानव-वन्यजीव संघर्षातील हा सहावा बळी आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने परिसरात गस्त वाढवली आहे.

  • Chandrapur Municipal Budget | चंद्रपूर मनपाचा वाढता खर्च आणि कमी महसूल – उपाययोजना कोणत्या?

    Chandrapur Municipal Budget

    Chandrapur Municipal Budget : चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी सन २०२४-२५ चे सुधारित आणि २०२५-२६ चे वार्षिक अर्थसंकल्प प्रशासक समितीच्या मान्यतेसाठी सादर केले आहे. गतवर्षी ६१४.५८ कोटीचे शिलकी अंदाजपत्रक होते. तर, यावर्षीचे अंदाजपत्रक हे ६८७.१८ कोटीचे आहे.

        २०२५-२६ यावर्षीचे अंदाजपत्रक हे तुटीचे आहे. यामुळे या वर्षात महसुली उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच महसुल वाढीसाठी उत्पन्नात वाढ आणि उद्दिष्टानुसार कराची वसुली करावी लागणार आहे. चालू वर्ष २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पात मनपाच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतापासून ५०.२४ कोट रुपये अपेक्षित आहे. Chandrapur Municipal Corporation

    मात्र, नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत केवळ २४.१० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुढील चार महिन्यांत २६.१४ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. मालमत्ता करापासून थकबाकीसह ३६.७१ कोटी रुपये अपेक्षित होते. तर, यावर्षी हे उत्पन्न ३५ कोटी एवढे ठेवण्यात आले आहे. Chandrapur municipal revenue

      मूलभूत सेवेसाठी कंत्राटी तत्वावर मजूर कर्मचारी घेण्यात आली आहेत. या कंत्राटी मजुरांना किमान वेतनासह महागाई भत्ता व इतर देयके देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये या कर्मचाऱ्यांवर ३८ कोटी ५७ लाख २२ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र, यावर्षी खर्चात कपात करून ३३ कोटी ९० लाख एवढा निर्धारित करण्यात आला आहे. कंत्राटी मजुरी दरात झालेल्या वाढीचा खर्च मनपाला स्व उत्पन्नातून करावा लागत आहे. यामुळे महसुली खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम विकासकामावरील निधीवर होत आहे. Chandrapur budget 2025-26

    गतवर्षी माझी वसुंधरा अभियान, श्री गणेशोत्सव, दिव्यांग कल्याण योजना, महिला व बालकल्याण धोरण, स्पार्क अवार्ड, आयुष्यमान भारत आदी उपक्रम राबविण्यात आले होते. शहरातील सात नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राच्या माध्यमातून २० आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. अमृत अभियान-२ मध्ये मनपाला ३० टक्के म्हणजेच ८५.७९१ कोटी वाटा टाकावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या अंदाजपत्रकात ७० कोटीचा समावेश केला आहे. मलनिस्सारण प्रकल्प पहिला टप्पा यात १६२.६१ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार असल्याने २० कोटीचा समावेश आहे. रामाळा तलाव पुनरुज्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी लागणारे ९ कोटी खनिज विकास निधीतून प्राप्त होणार आहे. Chandrapur municipal projects

        वीज बिलावर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेद्वारा २५० किलोवॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले असुन पुढील आर्थिक वर्षात यात १ हजार किलोवॅटची वाढ करण्याचे नियोजन आहे.सौर ऊर्जेच्या माध्यमातुन वीजबिलात बचत करण्यासाठी ऊर्जा खरेदी करार (पावर पर्चेस अग्रीमेंट) ची अंमलबजावणी PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) द्वारे करण्यात येऊन वीजबिलावर होणाऱ्या सुमारे १२ कोटी रुपये खर्चाच्या ६० टक्के बचतीचे उद्दीष्ट आहे.  

    चंद्रपुरात लाचखोर सरपंच व ग्रामसेवकाला अटक       

    नागरीकांना मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन देणार – महानगरपालिकेद्वारा एकुण ५८ सेवा या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरीकांना घर बसल्या दिल्या जात आहेत. यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास प्रत्येक घरी क्युआर कोड यंत्रणा लावण्यात येणार आहे.   

    उत्पन्नाचे घटक –

       मालमत्ता कर व इतर करातून ५१.९८ कोटी, सफाई शुल्क ६.२५ कोटी, उपयोगिता शूल्क १२ कोटी, वाढीव चटई क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी प्रदान करणे यातून १४ कोटी, खासगी बांधकामे, फ्लॅट नियमानुकूल करणे ५ कोटी, जीएसटी सहायक अनुदानातून १५ व्या वित्त आयोग २०२४-२५ मध्ये १४ कौटीपैकी ७ कोटी प्राप्त होणे बाकी आहे. त्यामुळे यावर्षीचे १५ कोटी आणि थकीत ७ असे २२ कोटी मिळणे अपेक्षित आहे.

    माझी वसुंधरा अभियानाच्या बक्षीस रकमेतून ५ कोटी, स्वच्छ सर्वेक्षण बक्षीस ७.५० कोटी मिळणे अपेक्षित आहे. तसेच मनपाच्या इमारती, गोळे भाड्यातून २.७० कोटी, पाणीपुरवठा कर ७ कोटी, पाणीपुरवठा मिटरिंग व टेलिस्कोपिंग शुल्कातून ५ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे.

    यावर होणार खर्च –

       आस्थापना खर्च वेतन, भत्ते यावर ३४.०८ कोटी, निवृत्तीवेतन व त्यावरील लाभापोटी २५ कोटी, अग्निशमन, यांत्रिकी, स्वच्छता, पाणीपुरवठा, उद्यान विभाग व इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ३३.९० कोटी, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान, भूमिगत गटार योजना, पायाभूत, अमृत २, घनकचरा व्यवस्थापन, बॉयोगॅस प्रकल्प, बांधकाम, पाडकाम प्रक्रिया प्रकल्प, शिक्षण विभाग वेतन, निवृत्ती वेतन यावर मनपाचा हिस्सा ६४.५ कोटी, महिला व छोटी मुले विश्रामगृह, बालोद्यान, 

    महिलांकरिता सुविधा व योजना राबविण्यासाठी १.८ कोटी, तृतीयपंथी व्यक्तीच्या विकासासाठी प्रशिक्षण २५ लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकाकरिता सुविधा पुरविणे ३० लाख, नागरी दलित वस्ती २० कोटी, दिव्यांग धोरण १.३० कोटी, शहर सौंदर्यीकर ७५ लाख, रस्ता बांधकाम ३.५० कोटी, मनपा झोनकरिता ६० लाख आणि नाली, चेंबर, रस्ता, संडास, मुत्रीघर, मनपा इमारत, सार्वजनिक विहिरी गाळ उपसा, सुरक्षा जाळी, आकस्मिक खर्च यासाठी १.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • Anti Corruption Bureau Maharashtra | चंद्रपुरात लाचखोरीचा पर्दाफाश: सरपंच, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

    Anti Corruption Bureau Maharashtra

    Anti Corruption Bureau Maharashtra : शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात शेतजमीन खरेदी करून व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असतात, परंतु त्यासाठी त्यांना लाच द्यावी लागते, असा धक्कादायक प्रकार चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर गावात घडला आहे. शेतजमिनीची फेरफार ग्रामपंचायतीत नोंदणी करण्यासाठी आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचाने 15 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोघांना अटक केली आहे. Chandrapur bribe case

    चंद्रपुरात अवैध डीझल गोदामाल आग

    तक्रारदार चंद्रपूरमध्ये राहतात. त्यांनी अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केली होती. त्यावर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी 8 जानेवारीला ना हरकत प्रमाणपत्र आणि फेरफार नोंदणीसाठी अर्ज केला होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या आमसभेत फेरफारचा विषय ठेवण्यात आला, तेव्हा सरपंच नलिनी तलांडे यांनी 10 हजार रुपये आणि ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली.

    लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 1 मार्चला ACB कडे तक्रार केली. 4 आणि 5 मार्चला झालेल्या पडताळणीत सरपंच आणि ग्रामसेवक लाच घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. 6 मार्चला ग्रामसेवक तेलमासरे यांना पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच, सरपंच तलांडे यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. Poultry farm NOC bribe

    पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मेघा मोहूर्ले आणि सतीश सिडाम यांनी ही कारवाई यशस्वी केली.