Tag: MH34

  • tiger killed by train in Rajura । रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

    tiger killed by train in Rajura : चंद्रपूर ३० नोव्हेम्बर (News३४) : बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी रेल्वे मार्ग जीवघेणा ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

    वन्यजीव हल्ला : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

    मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा वन विभागाच्या चनाखा बीटमधील विहिरगाव राऊंड, कक्ष क्रमांक १६० येथे रेल्वे रुळावरून मालगाडी जात असताना ही वाघीण रूळ ओलांडत होती. त्याचवेळी तिला रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी होऊन रुळाच्या उजव्या बाजूला पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

    रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजुरा येथील उपविभागीय वन अधिकारी एम. डी. गिरडकर आणि राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. tiger killed by train in Rajura

    वन्यजीवांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर

    वन अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात वाघिणीचे दात आणि सर्व अवयव शाबूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पुढील कार्यवाही राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे करत आहेत. या घटनेमुळे वन्यजीव आणि रेल्वे मार्गालगतच्या भागातील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • why municipal elections postponed in chandrapur । चंद्रपुरात नगरपरिषद निवडणुका रद्द नाही, पण! आयोगाचा ताजा आदेश जाहीर

    घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती

    why municipal elections postponed in chandrapur : चंद्रपूर, दि. 30 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती,  वरोरा, ब्रम्हपुरी,  मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

    मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

    उमेदवारांचा हिरमोड

    प्रशासन व न्यायालयाच्या या आदेशाने भावी नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे, मागील आठवडाभरापासून प्रचारात शक्ती लावत सामान्य मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र २ दिवसांनी होणार मतदान पुढे ढकलल्याने उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे.

    या काळात राष्ट्रीय पक्ष कांग्रेस, भाजप, शिवसेना दोन्ही व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दोन्ही यांचे स्टारप्रचारकांनी सभा घेतल्या होत्या, सभेसाठी लागलेला खर्च व पुढे होणारा खर्च यामुळे उमेदवार यांचं बजेट बिघडले आहे, सदर निवडणूक हि डिसेम्बर महिन्याच्या २० तारखेला होण्याची शक्यता आहे. why municipal elections postponed in chandrapur

    त्या अनुषंगाने घुग्गुस  नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. 10 –  ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला), 

    मूल न.प.ची जागा क्र. 10 –  ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

  • Rajura political rally Chandrapur । मत चोरांच्या भुलथापाला, आमीशाला बळी पडू नका : माजी आमदार चटप व धोटे यांचे आवाहन

    Rajura political rally Chandrapur : राजुरा ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) :– कांग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणभाऊ धोटे तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक आणि जवाहर नगर येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आल्या. दोन्ही सभांना तसेच कार्नर सभांना हजारो स्वाभिमानी नागरिकांची उसळलेली गर्दी पाहता, राजुरा शहरातील जनतेचा विकासाभिमुख कल अधिक ठळकपणे दिसून आला.

    सेलिब्रेटी : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

    सभेत बोलताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी नागरिकांना जोरदार आवाहन केले. मत चोर, बनवेगीरी करणारे, रेती-कोळसा चोरीतून शहराला लुटणारे, परवानगी करात भ्रष्टाचार करणारे, आणि आमचे उमेदवारही चोरी करून घेऊन जाणारे पार्सल लोक पुन्हा फसवणुकीच्या भुलथापात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आमीशाला बळी पडू नका, असे आवाहन नेत्यांनी केले.


    राजुराच्या शाश्वत विकासासाठी आणि शहरातील तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरविकास आघाडीच एकमेव सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट करत चटप-धोटे म्हणाले, आम्ही दोन्ही माजी आमदार कोणाला घाबरून एकत्र आलो नाही. राजुराच्या जनतेच्या हितासाठी, शहराचा विकास अधिक भक्कम करण्यासाठी आणि सध्याच्या बेबंदशाहीला पूर्णविराम देण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसेच भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपच्या आमदारांनाच सक्षम वाटत नसल्याने ते जीथे तिथे मला पाहून मत द्या असे आवाहन करीत असून तसे न झाल्यास नधी मिळणार नाही असा खोटा कांगावा करीत फिरत आहेत. मात्र आम्ही दोन्ही आमदार आणि अरूण धोटे यांनी अनेक वर्षे केंद्रात, राज्यत आमचे सरकार नसतांना आणि पालकमंत्री आपले नसतांनाही राजुराचा विकास करून दाखविला आहे. या पुढेही शाश्वत विकासासाठी झटत राहु असा विश्वास व्यक्त केला.


    यावेळी सभे पूर्वी स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंचावर नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरूणभाऊ धोटे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांचेसह काँग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्र पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

  • Rinku Rajguru in Chandrapur । सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

    Rinku Rajguru in Chandrapur : बल्लारपूर ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभांचे सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. मुल आणि बल्लारपूर येथे होणाऱ्या या सभांना ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे.

    राजकीय – भाजप उमेदवारासाठी कांग्रेस महिला शहर अध्यक्षाचा राजीनामा

    मूल येथे सायंकाळी ५ वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी ७ वाजता या जाहीर सभा होणार आहेत. मूल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ (गांधी चौक), अभिनेत्री रिंकू राजगुरू नागरिकांशी संवाद साधणार आहे. युवक, महिला आणि सर्व नागरिकांसाठी ही प्रेरणादायी भेट ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    रिंकू राजगुरू यांचा ‘आशा’ हा चित्रपट येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या आशा सेविकेची प्रमुख भूमिका रिंकू राजगुरू  हिने साकारली आहे. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला व प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक आवाज आहे. त्यादृष्टीने आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांमध्ये रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

  • dry day during local body elections । चंद्रपूर जिल्ह्यात ३ दिवस ‘ड्राय डे’ जाहीर!

    dry day during local body elections : चंद्रपूर, दि. २९ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि १ नगर पंचायत क्षेत्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सलग तीन दिवस ‘मद्य विक्री बंदी’ (ड्राय डे) चे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

    राजकीय : वरोरा कांग्रेस मध्ये संकट, महिला अध्यक्षांनी दिला राजीनामा

    जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वातावरण शांत व निर्भय राहावे, याकरिता ही दारूबंदी लागू करण्यात आली आहे.

    या काळात दारूबंदी:

    • मतदानाच्या पूर्वसंध्येला: १ डिसेंबर २०२५
    • मतदानाच्या दिवशी: २ डिसेंबर २०२५
    • मतमोजणीच्या दिवशी: ३ डिसेंबर २०२५

    या तिन्ही संपूर्ण दिवसांदरम्यान निवडणुकीच्या क्षेत्रात मद्य, बिअर आणि ताडी विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

    निवडणूक कुठे?

    बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, राजूरा, घुग्घुस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या नगर परिषदा आणि भिसी नगर पंचायतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. dry day during local body elections

    जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध (परवानाधारक) नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

  • Warora city Congress leaders resign । वरोरा काँग्रेस संकटात! प्रचाराच्या तोंडावर महिला अध्यक्षांचा राजीनामा

    Warora city Congress leaders resign : वरोरा/चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४): चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, वरोरा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

    काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष दीपाली माटे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर शहर महिला अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने वरोरा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

    बातमी जंगलाची : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला, वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    नाराजीमुळे पक्षाला गळती

    नगर परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वरोरा काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. दीपाली माटे यांच्या राजीनाम्यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. Warora city Congress leaders resign

    • जिल्हा महासचिव शिरोमणी स्वामी आणि तहसील महासचिव मनोहर स्वामी यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
    • त्याचप्रमाणे, तीन वेळा नगर परिषद स्वीकृत सदस्य राहिलेले राजू महाजन आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही काँग्रेस सोडली आहे.

    आता शहर महिला अध्यक्षा दीपाली माटे यांनीही राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसने त्यांच्यासोबत लावलेल्या उमेदवारांचे फलक आणि बॅनर तातडीने उतरवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महत्त्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाल्याने, वरोरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

  • Chandrapur breaking news today tiger attack । चंद्रपूर हादरले! गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार

    Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    प्रशासनाचा आदेश : जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी

    सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack

    विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.

  • foreign liquor illegal stock raid Chandrapur । निवडणूक काळात मोठी कारवाई! ब्रह्मपुरी येथे अवैध दारूसाठा जप्त

    foreign liquor illegal stock raid Chandrapur : चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४) : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दारूबंदी लागू असताना, मौजा उदापूर येथे ५ लाख १६ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

    विभागीय उपायुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) आणि अधीक्षक नितीन धार्मिक (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा उदापूर, तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या दारूचा मोठा साठा घरात ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.

    शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. या छाप्यात विदेशी दारूच्या विविध क्षमतेच्या एकूण २२६३ बाटल्या आणि देशी दारूच्या २०० बाटल्या, असा एकूण ५ लाख १६ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. foreign liquor illegal stock raid Chandrapur

    दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटे, संजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.

  • Paid Leave for Workers on Voting Day । निवडणुकीत कामगारांना भरपगारी सुट्टी! चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जाहीर

    Paid Leave for Workers on Voting Day : चंद्रपूर, दि. 29 नोव्हेम्बर (News३४) : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदान करण्याकरीता चंद्रपुर जिल्हयात काम करणा-या कामगार मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2 ते 2 तासाची सवलत देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

    प्रशासनाचा आदेश : निवडणूक आणि मतदानासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जारी केले नवे नियम

    महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील, (खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.)

    अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 ते 3 तासांची सवलत मिळेल. याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

    वर नमूद केल्यानुसार आस्थापनांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी  अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, अशी तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपुर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा  ई-मेल द्वारे assttcommrchd @gmail.com तक्रार करावी, असे कामगार विभागाने कळविले आहे.

  • Chandrapur local news accident । विहिरीवर पाणी आणताना तोल गेला; चंद्रपुरात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

    Chandrapur local news accident : पोंभूर्णा २९ नोव्हेम्बर २०२५ (News३४): तालुक्यातील खरमत येथे स्वतःच्या शेतातील विहिरीत तोल गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०), रा. खरमत, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार यादिवशी राहणार बंद

    प्राप्त माहितीनुसार, मृत शेतकरी प्रदीप हेपटे हे आपल्या शेतात धान बांधणीचे काम करत होते. काम सुरू असताना पिण्याचे पाणी घेण्यासाठी ते विहिरीवर गेले. मात्र, याच वेळी त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत कोसळले.

    काही वेळाने ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. परंतु, खूप उशीर झाला होता; विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. Chandrapur local news accident

    या घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खरमत गावात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील असा आप्त परिवार आहे.