Tag: MH34

  • illegal tobacco supply chain in Chandrapur । चंद्रपुरात १२ लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडला

    illegal tobacco supply chain in Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठी खेप शिंदेसनेच्या लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी वरोरा शहरात पकडली, नगरपरिषदेचे मतदान झाल्यावर तंबाखू माफिया पुन्हा सक्रिय झाला मात्र राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिबंधित तंबाखू वाहतूक एकूण मुद्देमाल १७ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा पकडत प्रशासनाच्या हवाली केल्याने माफियांचे चांगलेच धाबे दणाणले.

    २ महिन्यापूर्वी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्याकडे महिलांनी सुगंधित तंबाखू विक्री वरोरा शहरात थांबवावी असे निवेदन दिले होते, मात्र निवडणुकीच्या काळात यावर कारवाई झाली नाही, निवडणूका संपताच जिवतोडे यांनी महिलांच्या निवेदनावर लक्ष देत ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एकार्जुना तालुका वरोरा येथे अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू वाहन क्रमांक MH३४ BG १००९ उभी होती, जिवतोडे यांनी आपल्या सहकाऱ्यासमक्ष वाहनांची झडती घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इगल हुक्का तंबाखू, शिशा, ईगल झेन, विमल, पान पराग पान मसाला असा एकूण १२ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. illegal tobacco supply chain in Chandrapur

    गुन्हेगारी – मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक

    याबाबत मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला याबाबत सूचित केले, वरोरा पोलीस पथक एकार्जुना मध्ये दाखल होते वाहन चालक ५२ वर्षीय मिथुन लहानू घोटेकर राहणार चंद्रपूर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सांगितले कि सदर माल हा वरोरा शहरातील अनिल बोधे यांच्याकडे पोहचविण्यात येत होता.

    वरोरा पोलिसांनी वाहन चालक घोटेकर व बोधे यांच्यावर कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानदे २००६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच अनिल बोधे पसार झाले.

    झोपलेल्या प्रशासनाला आली जाग

    शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध सुगंधित तंबाखू पकडल्यानंतर वरोरा पोलीस व अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले, ४ डिसेंबर रोजी वरोरा शहरात ठिकठिकाणी अनिल फुलचंद शर्मा यांनी साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू किंमत ६ लक्ष ४९ हजार १७० रुपये जप्त करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्हा तंबाखू माफियासांठी अत्यंत सेफ झोन आहे, चंद्रपुरात ठिकठिकाणी खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री होते मात्र यावर अन्न व औषध प्रशासन सह पोलीस विभाग डोळेझाक करीत असतात. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची उलाढाल होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूचा व्यवसाय कोण करत? हे प्रशासनाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण प्रशासन यावर निद्रावस्थेत असल्याची भूमिका घेते.

  • SC ST atrocity victims heir job । SC/ST अत्याचार पीडित कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा!

    सरकारी नोकरी देण्यासाठी जिल्हा समिती सक्रिय

    SC ST atrocity victims heir job : चंद्रपूर, दि. 04 डिसेंबर (News३४) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शैक्षणिक अर्हतेनुसार गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

    गुन्हा : चंद्रपुरात कांग्रेस नेत्यावर खंडणी चा गुन्हा दाखल

    या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक आज (दि. 04 ) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या मृत्यू प्रकरणातील पात्र वारसांना शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार तात्काळ सेवा नियुक्त्या देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    संबंधित विभागांनी प्रकरणांची छाननी करुन आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करावीत, तसेच योग्य पात्र वारसांची निवड करुन शासनाच्या निर्णयानुसार नियुक्ती प्रस्ताव तात्काळ पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. समितीने या प्रकरणातील विलंब टाळण्यासाठी सर्व विभागांना वेळबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. SC ST atrocity victims heir job

    बैठकीला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे व इतर अधिकारी उपस्थित होते.

  • special train for Mahaparinirvan Diwas । महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या – खासदार धानोरकर

    special train for Mahaparinirvan Diwas : चंद्रपूर 4 डिसेंबर (News३४): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    खंडणी : वाळू घाट बंद पाडतो, खंडणीचा गुन्हा दाखल

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समृद्धी महामार्गावर (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग) टोलमधून संपूर्ण सवलत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा, तसेच त्यांना वेळेवर आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी बौद्ध अनुयायांची वाहने टोलमुक्त करावीत. महाराष्ट्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा हा मोठा सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. special train for Mahaparinirvan Diwas

    दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र पाठवून बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरून मुंबईसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला जातात. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, अनुयायांच्या सोयीसाठी ०५ डिसेंबर रोजी बल्लारपूरहून मुंबईसाठी (अप) आणि ०७ डिसेंबर रोजी मुंबईहून बल्लारपूरसाठी (डाऊन) अशी एक विशेष रेल्वेगाडी त्वरित चालवावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.

  • Pt Deendayal Upadhyay cancer hospital । चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलचे नामकरण

    Pt Deendayal Upadhyay cancer hospital : चंद्रपूर, दि.०३ – चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली असून आता हे रुग्णालय अधिकृतपणे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ या नावाने ओळखले जाणार आहे.

    २८० कोटींचा प्रकल्प

    चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटींचा १४० खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवदानाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.

    पैश्याचा बाजार : नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा घोडेबाजार

    अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सततच्या प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्वविदर्भासाठी ‘नवजीवनाचा आशादायी प्रकाश’ देणारा ठरणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. २०१८ मध्ये शासन निर्णयानंतर उभारणीला गती मिळाली आणि आज हे केंद्र पूर्णत्वास आले आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.मोहनजी भागवत व राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून पूर्व विदर्भासाठी हे रुग्णालय महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

    रुग्णालयाची वैशिष्ट्ये
    तळमजला + ४ मजले : १,००,०००+ चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र,Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.

  • Chandrapur MCOCA arrest case update । MCOCA आरोपी आकाश उर्फ मोनू बहुरियाला अटक

    Chandrapur MCOCA arrest case update : चंद्रपूर: शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) अंतर्गत गंभीर गुन्ह्यात घटनास्थळावरून फरार झालेल्या एका सराईत आरोपीला अखेर चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या विशेष तपास पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई करत आरोपीला वर्ध्यातील सावंगी येथून अटक केली.

    गुन्ह्याची पार्श्वभूमी:

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ७५८/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम $३१०(४) नुसार, तसेच भारतीय हत्यार कायदा (Arms Act) च्या कलम ३, ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), १९९९ च्या कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४)$ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात सहभागी असलेला आणि घटनेनंतर लगेचच पोलिसांना चकमा देऊन फरार झालेला प्रमुख आरोपी नामे आकाश उर्फ मोनू बिरजू बहुरिया, वय ३४ वर्ष, रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड, बल्लारपूर, हा पोलिसांच्या हिटलिस्टवर होता.

    खंडणी : वाळू घाट बंद पाडण्याची धमकी, कांग्रेस नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

    गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर पोलीस या फरार आरोपीच्या मागावर होते. त्याचे संभाव्य ठिकाणे आणि हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत होते. आरोपी हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याने, तो सतत आपले ठिकाण बदलत होता आणि पोलिसांच्या हाती लागणार नाही याची काळजी घेत होता.

    विशेष पथकाची यशस्वी कामगिरी:

    आरोपी आकाश उर्फ मोनू बहुरिया हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या विशेष तपास पथकाला मिळाली. माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता, पथकाने तातडीने सावंगीकडे कूच केले आणि अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच, आरोपीला नियोजनबद्ध पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. कोणताही प्रतिकार न करता आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश आले.

    या यशस्वी कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला आहे आणि परिसरात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. MCOCA सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाल्यावरही आरोपी फरार झाल्यास, पोलीस त्याचा पाठपुरावा करत त्याला कायद्याच्या चौकटीत आणतात, हे या कारवाईतून सिद्ध झाले आहे.

    वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:

    सदरची मोलाची आणि यशस्वी कार्यवाही पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांच्या अचूक नियोजनामुळे ही कारवाई शक्य झाली.

    अटक करणारे पथक:

    या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय कोलाटे, पोलीस अंमलदार रुपेश पराते, शेखर माथनकर, सुरज शेडमाके, योगेश पिदूरकर आणि रामकांत गाव्हणे यांचा समावेश असलेल्या मोक्का पथकाने विशेष परिश्रम घेतले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

  • Vaibhav Pimpalshende extortion case update । वाळूघाट बंद करण्याच्या धमक्या, २.४३ लाखांची खंडणी, वैभव पिंपळशेंडे वर खंडणीचा गुन्हा

    Vaibhav Pimpalshende extortion case update : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) – वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे नेते वैभव पिंपळशेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    निवडणूक : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    दोन दिवसांपूर्वी वैभव पिंपळशेंडे व शिवा कोरेवार यांच्यामधील संभाषणाची क्लिप चंद्रपूर जिल्ह्यात व्हायरल झाली होती, कोरेवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिली या आशयावर सदर क्लिप व्हायरल करण्यात आली मात्र खंडणी प्रकरणामुळे त्या संभाषणावर पडदा पडला आहे, वैभव पिंपळशेंडे यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    वाळूघाट बंद पाडण्याच्या धमक्या

    तालुक्यातील चेकवेळवाचा वाळूघाट लिलावात चंद्रपुरातील शिवकुमार शंकर कोरेवार यांना मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंपळशेंडे याने घाटातून वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळे निर्माण करणे सुरू केले होते. घाट बंद पाडण्याच्या धमक्या त्याने शिवकुमार कोरेवार यांना दिल्या होत्या. पिंपळशेंडे यांच्या त्रासाला कंटाळून शिवकुमार कोरेवार यांनी ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना एकूण १ लाख ४३ हजार रुपये इतकी रक्कम दिली. Vaibhav Pimpalshende extortion case update

    याशिवाय वाळूघाटावर असलेल्या सुपरवायझरकडून एक लाख रुपये पिंपळशेंडे यांनी घेतल्याचे कोरेवार यांनी तक्रारीत म्हटले. आतापर्यंत वैभव पिंपळशेंडे याने २ लाख ४३ हजार रुपयाची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने रामनगर पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली. तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.याप्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहाराची शहानिशा करण्यात येत आहे. या प्रकरणाची पोंभूर्णा तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.

  • Chandrapur polling percentage | चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक; निवडणुकीत पैसे वाटप ईव्हीएम फोडली

    Chandrapur polling percentage : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) – ९ नगरपालिका व १ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले, २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लोकशाहीच्या उत्सवाची ऐशीतैशी केल्याचे चित्र दिसून आले. गडचांदूर, राजुरा अश्या अनेक भागात खुलेआम सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप करण्यात आले, त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल झाले मात्र प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नाही.

    गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा नगरपरिषद व भिसी नगरपंचायत साठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

    कुठे किती मतदान?

    नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण ३ लक्ष ३९ हजार ४९ मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा हक्क बजावणार होते मात्र यापैकी २ लक्ष १३ हजार ४९१ मतदारांनी मतदान केले, जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी ६२.९७ टक्के होती.सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बल्लारपूर ५५.३१ टक्के तर गडचांदूर नगरपरिषदेची ५९.५० टक्के तर सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी भिसी नगरपंचायतीसाठी झाले. Chandrapur polling percentage

    • बल्लारपूर नगरपरिषद – ५५.३१ टक्के एकूण मतदार ८३ हजार ८२१, मतदान ४६ हजार ३६०
    • भद्रावती – ६०.५६ टक्के एकूण मतदार ५२ हजार ५७२, एकूण मतदान ३१ हजार ८३६
    • ब्रह्मपुरी – ६७.९० टक्के, एकूण मतदार ३३ हजार ७७९, एकूण मतदान – २२ हजार ९३६
    • चिमूर – ७२.१२ टक्के, एकूण मतदार – २२ हजार ५५७ तर मतदान १६ हजार २६७
    • गडचांदूर – ५९.५० टक्के, एकूण मतदार २४ हजार ४५७ तर एकूण मतदान १४ हजार ५५२
    • मूल – ६८.०८ टक्के एकूण मतदार २१ हजार ७४५, एकूण मतदान – १४ हजार ८०३
    • नागभीड – ७८.५३ टक्के, एकूण मतदार – २० हजार ९९२ तर एकूण मतदान १६ हजार ४८५
    • राजुरा – ६१.८० टक्के, एकूण मतदार – २६ हजार ८५५ तर एकूण मतदान – १६ हजार ५९७
    • वरोरा – ६०.७१ टक्के, एकूण मतदार – ४३ हजार ३२९ तर प्रत्यक्षात मतदान – २६ हजार ३०६
    • भिसी नगरपंचायत – ८२.१९ टक्के, एकूण मतदार – ८ हजार ९४२, प्रत्यक्षात मतदान – ७ हजार ३४९

    वोट चोरीचा ठप्पा लागलेल्या राजुरा विधानसभेत मतदानात मोठा गोंधळ उडाला, गडचांदूर शहरात नगारा वर ईव्हीएम बटन दाबल्यावर कमळ चिन्हाचा लाईट लागला म्हणून मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडून टाकली, यानंतर मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता. भाजप पदाधिकारी तर थेट रस्त्यावर खुलेआम पैसे वाटताना दिसले. भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे असे जनतेला सांगायचे आणि स्वतः लोकशाहीची चेष्टा करायचं हे काम सत्ताधारी भाजपने चालविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपने लोकशाहीची चेष्टा करून टाकली असे चित्र २ डिसेंबर रोजी सर्व जनतेने बघितले.

  • india post electric vehicle initiative । इंडिया पोस्ट मधील पोस्टमॅनला मिळणार इलेक्ट्रिक दुचाकी

    india post electric vehicle initiative : मुंबई ३ डिसेंबर (News३४) : मुंबईतील नागरिकांना शेवटच्या टप्प्यातील वितरण सेवा अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पार्सलच्या संख्येत झालेली वाढ आणि वितरणाची उत्पादकता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, इंडिया पोस्टने पारंपरिक पायी वितरणाऐवजी ‘स्मार्ट मोबिलिटी’चा नवा पर्याय स्वीकारला आहे.

    ई-वाहनाद्वारे होणार जलद वितरण

    इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने ‘स्मार्ट मोबिलिटी इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स (TVS VMS) च्या सहकार्याने टपाल वितरकांसाठी (पोस्टमन/पोस्टवूमन) इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण सेवा प्रणाली सुरू केली आहे.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम

    • वितरण केंद्रे: मुंबई जीपीओ, सायन, दादर, काळबादेवी आणि चाकाला यांसारख्या नव्याने स्थापन केलेल्या स्वतंत्र वितरण केंद्रांवर टपाल वितरकांना टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
    • सेवा: या वाहनांच्या माध्यमातून नियमित मेल, अकाऊंट्स मेल (नोंदणीकृत/स्पीड पोस्ट) आणि पार्सलसह सर्व प्रकारच्या टपाल सेवांचे वितरण केले जाईल.

    पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपक्रम

    या उपक्रमांतर्गत, एकूण २११ इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे सुरळीत, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर संचालन सुनिश्चित करण्यासाठी टपाल कार्यालयांमध्ये समर्पित चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) देखील बसविण्यात आले आहेत.

    ४ डिसेंबर रोजी शुभारंभ

    हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता चाकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून सुरू केला जाईल. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंग, इंडिया पोस्ट, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालिका श्रीमती काया अरोरा आणि टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • Armed Forces Flag Day Fund । ध्वजदिन निमित्त चंद्रपूरमध्ये शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान; ९ डिसेंबरला विशेष कार्यक्रम

    Armed Forces Flag Day Fund : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४): देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या सन्मानार्थ दरवर्षी ७ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी‘ (Armed Forces Flag Day Fund) म्हणून पाळला जातो. या निधी संकलनाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते होणार आहे.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे भव्य सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

    निवडणूक गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    हा कार्यक्रम विशेषतः शौर्य आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, ज्यात पुढीलप्रमाणे सत्कार होणार आहेत:

    • उत्कृष्ट निधी संकलन: ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
    • वीरांचा सन्मान: देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता यांचा तसेच शौर्य चक्र प्राप्त सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव केला जाईल.
    • माजी सैनिकांच्या पाल्यांना मदत: माजी सैनिकांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करून शैक्षणिक व इतर मदतीचा हात दिला जाणार आहे.

    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक बांधवांना शौर्याचा हा सोहळा आणि मदतकार्याचा शुभारंभ कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

  • evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

    evm machine vandalized in gadchandur polling : कोरपना/गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान दिवसभर विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. कुठे तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले, तर कुठे मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले. या सगळ्या गोंधळात गडचांदूर येथे एक अत्यंत गंभीर घटना घडली, जिथे एका संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन फोडून टाकली.

    पोलीस आदेश : चंद्रपूर जिल्ह्यात कलम ३६ लागू

    ही घटना गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे घडली. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) नावाच्या मतदाराने मतदान करताना ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबले असता, अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या कथित प्रकारामुळे संतापाच्या भरात दुर्गे यांनी ईव्हीएम मशीनवर हल्ला करत ती फोडून टाकली.

    घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने मतदारांनी गर्दी केली आणि संतप्त नागरिकांनी **“भाजप मुर्दाबाद”**च्या जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेला ब्रेक बसला आणि वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. evm machine vandalized in gadchandur polling

    परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ ईव्हीएम मशीनचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

    या घटनेमुळे गडचांदूरमधील राजकीय तापमान अधिक वाढले असून, मतदान केंद्राबाहेर अजूनही तणाव असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

    युवकाला अटक

    गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 9 येथील मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्रासोबत छेडछाड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत सुरू केले. विशेष म्हणजे यावेळी कंट्रोल युनीट पुर्णपणे सुरक्षित होते.

    विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी असून आज गडचंदुर येथील मतदान केंद्र क्रमांक 9/2 येथे मतदान करताना त्याने बॅलेट युनिट ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर उपस्थित पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने सदर मतदान केंद्रावर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले आहे.