Tag: Chandrapur news

  • चंद्रपुरात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला

    Chandrapur Wild boar Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आतापर्यंत ४२ नागरिकांचा या संघर्षात बळी गेला आहे. १४ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ आंबेडकर नगर भागात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रान डुकराने हल्ला करीत जखमी केले. (हे हि वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर पोलिसांच्या रडारवर)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधील दुर्गा नगर मध्ये सकाळी ६ वाजता भारती विश्वनाथ शेंडे हि महिला अंगणात काम करीत होती, त्यावेळी रान डुक्कराने भारती शेंडे वर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भारती शेंडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी नागरिक जमा झाले व रानडुकरांना तिथून हुसकावून लावले.

    विशेष म्हणजे या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते, याची माहिती वनविभागाला सुद्धा दिली मात्र वनविभागाने यावर काही पाऊल न उचलल्याने आज हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दुर्गा नगर भागात धाव घेतली. Chandrapur Wild boar Attack

    वनविभागाला या हल्ल्याची माहिती देत, जखमी भारती शेंडे या महिलेला तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. राजू कुडे यांनी यावेळी वनविभागावर ताशेरे ओढत, या घटनेला जबाबदार वनविभाग असून त्यांनी तात्काळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ जंगल परिसरात तारांची सुरक्षा जाळी लावावी. यावेळी राजू कुडे सह वाहतूक अध्यक्ष जय देवगडे उपस्थित होते.

  • पोंभूर्णा येथे महिला बचतगट बाजारपेठेचे भूमिपूजन

    Pombhurna Market Bhumipujan : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे भूमिपूजन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी रोजगाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचा आनंद आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या बाजारपेठेच्या माध्यमातून केवळ पोंभूर्णाच नव्हे, तर संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हे हि वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार धानोरकरांचा पाठपुरावा)

    पोंभूर्णा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आयोजित महिला बचत गट बाजारपेठ भूमिपूजन सोहळा आणि बचत गट महिला मेळाव्याला अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी कल्पनाताई क्षीरसागर, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, तहसीलदार मोहनीश शेलवटकर, नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल लांडगे, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, ऋषी कोटरंगे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ज्योती बुरांडे, वैशाली बोलमवार, अजय मस्के, गंगाधर मडावी, बंडू बुरांडे, ईश्वर नैताम, ओमदास पाल आणि आदि मान्यवरांची उपस्थिती होती. Pombhurna Market Bhumipujan

    या सोहळ्यात उमेदच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे विमोचन तसेच कृषी विभागाच्या एआय आधारित शेतीविषयक माहितीपत्रकाचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ

    आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज पोंभूर्णा येथे १ कोटी रुपये निधीतून होत असलेल्या बाजारपेठेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने यशस्वी पाऊल टाकण्यात आले आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. पोंभूर्णा येथील महिला बचतगटांच्या बाजारपेठेचे भूमिपूजन निश्चितच बल्लारपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ देईल.’

    हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी

    यावेळी त्यांनी बल्लारपूरमध्ये सुरु असलेल्या एसएनडीटी कॉलेजमुळे ६२ कौशल्याधारित अभ्यासक्रमांद्वारे हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे विशेषत्वाने सांगितले. महिला व शेतकरी बांधवांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेली ८० कोटी रुपयांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आधुनिक बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणार असल्याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात

    ते पुढे म्हणाले, ‘आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात, आत्मनिर्भर व्हाव्यात हा केवळ आपला ध्यास नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळणे म्हणजे एका कुटुंबाची, एका समाजाची आणि पुढील पिढीची प्रगती होय. यासाठी बचतगटांनी कष्टाने तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या परिश्रमाला योग्य किंमत मिळावी, त्यांच्या उत्पादनांना खात्रीशीर मागणी निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढत राहावे, यासाठी सशक्त, कायमस्वरूपी आणि आधुनिक बाजारपेठ निर्माण करणे हा आपल्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.’

    भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ

    महिला बचत गटांनी उद्योगातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण शासनस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. त्यांना प्रशिक्षण, वित्तीय मदत, विक्रीचे मार्ग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे उचललेले प्रत्येक पाऊल भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल, याची जाणीव ठेवून आपण कार्यरत आहोत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

  • prenatal sex determination । 🚨 चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक कारवाई!

    prenatal sex determination

    prenatal sex determination : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ –  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे व गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ.भास्कर सोनारकर, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    दूरसंचार विभागाचे केबल चोरणारी टोळी जेरबंद

    जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहितीच्या आधारे खातरजमा होऊन संबंधित व्यक्ती किंवा केंद्राविरुद्ध खटला दाखल झाल्यास माहिती देणाऱ्यास शासनातर्फे 1 लाख रुपये व चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच, स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलेस न्यायालयीन खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लाख व महापालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. reward for reporting illegal fetal sex

    सर्व अल्ट्रासाऊंड केंद्रे, रुग्णालये व दवाखान्यांची काटेकोर तपासणी करावी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशन्स वाढविणे, सर्व सोनोग्राफी केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी करणे, तसेच 12 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भपात करणाऱ्या केंद्रांना आवर्जून भेट देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल व नोंदवही काटेकोर तपासावीत, यामध्ये निष्काळजीपणा होऊ नये, आवश्यकतेनुसार पोलिस विभाग व इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सुचविले. district collector orders unregistered ultrasound center raids

    टोल फ्री द्वारे माहिती द्या

    जन्मापूर्वी मुलगा किंवा मुलगी आहे हे जाणून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा बेकायदेशीर कृत्याची माहिती नागरिक खालील टोल फ्री क्रमांक व माध्यमांद्वारे देऊ शकतात : 18002334475 (शासन टोल फ्री हेल्पलाईन), 104 (आरोग्य टोल फ्री क्रमांक), 18002574010 (मनपा टोल फ्री क्रमांक), व्हॉट्सॲप : 8530006063, संकेतस्थळ : www.amchimulgimaha.in, तक्रार निवारण ॲप :  https://grievance.cmcchandrapur.com /complaint_registration/add इत्यादी.

    गर्भलिंग निवडीच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

  • police solve aluminium wire theft case । 🚨 २४ तासांत अल्युमिनियम तार चोरी उघडकीस – भिसी पोलिसांनी दाखवली तत्परता

    police solve aluminium wire theft case

    police solve aluminium wire theft case : भिसी ३० ऑगस्ट २०२५ – १७ विजेच्या खांबावर विजेची अल्युमिनियम तार लावणायचे काम जांभूळगाव ते खापरी या गावजवळ समीक्षा अँड डिम्पल इलेकट्रीकल कंपनी चामोर्शी च्या वतीने सुरु होते, यासाठी कंपनीने अल्युमिनियम तार मार्गावर ठेवण्यात आला होता. मात्र २७ ऑगस्ट रोजी तार चोरी गेल्याची तक्रार कंपनीचे सुपरवायझर नितेश गव्हारे यांनी भिसी पोलिसात दिली. पोलिसांनी जलद तपास करीत २४ तासांच्या आत आरोपीना अटक करीत तार जप्त केली.

    चंद्रपूर मनपाची डेंगू तपासणी मोहीम

    जांभूळगाव ते खापरी मार्गावरील विजेची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, यासाठी कंपनीने तार आणून ठेवली होती मात्र अज्ञातांनी सदर तार चोरी केली, याबाबत भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी जांभुळघाट गावातील २१ वर्षीय आनंद गुलाब नेवारे व २४ वर्षीय मंगेश नीलकंठ बोरकर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर अल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली. aluminium wire theft

    ७ आरोपी अटकेत

    तसेच सदर चोरी करण्यासाठी जांभूळगावातील २३ वर्षीय क्रिष्णा रमेश मीटपल्लीवार याने मदत केली, व चोरीचा माल २२ वर्षीय रोशन अण्णाजी हजारे, १९ वर्षीय कुणाल गणेश हजारे यांना विकला व चोरीचा माल हा २६ वर्षीय सागर अण्णाजी हजारे, २१ वर्षीय विजय नंदकिशोर भेंडवाल यांच्या सहकार्याने कुणाल हजारे याने चारचाकी वाहनाने घेऊन जात जांभूळगाव ते खापरी रोडवरील झुडपात लपवून ठेवला.

    भिसी पोलिसांनी यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी ९४९७, अल्युमिनियम तार असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल सह ७ आरोपीना २४ तासांच्या आत अटक केली. suspect arrests for aluminium wire theft

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, रेखलाल पटले व वैभव गोहणे यांनी केली.

  • चंद्रपुरात असंख्य युवक-युवतीचा राष्ट्रवादी कांग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे काही पदाधिकारी अजित पवार गटात गेल्याने आज राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये चंद्रपूरात असंख्य युवक व युवतींनी पक्षात प्रवेश केला. Nokia च्या या स्मार्टफोन वर 26 टक्क्यांची सूट…आजच खरेदी करा Amazon वर

     

    आयोजित बैठकी मध्ये चंद्रपुर शहरातील विविध प्रभागातिल युवक आणि युवतिंनी मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्यांच्या विचाराला प्ररित होऊंन मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड़ ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मधे प्रवेश घेण्यात आला व शहर युवक राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ति करण्यात आली.

     

    तय मधे यश बोरकुटे शहर सचिव, प्रियंका दत्ता शहर उपाध्यक्ष,संतोष निमगड़े शहर उपाध्यक्ष,सुब्रोतो मिस्त्री शहर सचिव,सिद्धान्त खोटे ह्याची चंद्रपुर विधानसभा उपाध्यक्ष प्रियंका देवांगन शहर सचिव,सोमेश भरमे प्रभाग अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली,
    बैठकीचे आयोजन युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांनी करुण आपल्या प्रस्ताविक मधे युवक कार्यक्रत्यांना मार्गदर्शन केले.

     

    बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील काळे विधानसभा अध्यक्ष, आकाश निरटवार, राहुल वाघ,संजू बिस्वास, मनोज सोनी,कपिल ऊईके,चेतन अनंतवार, अरविंद लोधी,अंकित लाड,विपील लभाणे,प्रतीक देशपांडे, आकाश राजपूत ,संजिविनी भगत, पायल मळावी,ममता हेडाऊ,हर्षदा पाटील,प्रज्वल कटकांतीवर, अजय मंडल,सौरभ कुरवतकर,अक्षय भालमे,संकेत पिंपळे,सचिन अजमेरा,निखिल लोधे,काजू सरकार,तृप्ती मंडल,नेहा दास,प्रियांका मंडल,रिया मंडल,रूपा पांडे, सुश्मिता मलिक, खुसबु मजुमदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहरातील या भागात पेट्रोल-डीझल चोरांचा धुमाकूळ

    News34 petrol thief crime

    चंद्रपूर – गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तुळशीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहने या बेशिस्त चोरट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनांच्या वारंवारतेमुळे नागरिक हताश आणि संतप्त झाले आहेत. आपला जुना फोन द्या आणि नवा घ्या, काय आहे अमेझॉन ची ऑफर क्लिक करा

     

    इंधन चोरीच्या घटना वाढत आहेत, ज्यामुळे परिसरातील व्यक्ती आणि व्यवसायांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चोरीचे इंधन अनेकदा काळ्या बाजारात कमी किमतीत विकले जाते, ज्यामुळे अयोग्य स्पर्धा आणि संभाव्य सुरक्षा धोके निर्माण होतात.

     

    पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढणे ही तुळशीनगर वासीयांसाठी चिंतेची बाब आहे. यामुळे बाधित व्यक्तींवर आर्थिक भार तर पडतोच पण त्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होतात. अशा घटना नागरिकांच्या मनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकू शकतात, स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांवरचा त्यांचा विश्वास कमी करू शकतात.

     

    दुर्गापूर पोलीस ठाण्याने या भयावह प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. तुळशीनगर परिसरात पाळत ठेवणे आणि असुरक्षित वेळेत गस्त वाढवणे संभाव्य चोरांना प्रतिबंधक म्हणून काम करू शकते. याव्यतिरिक्त, वाहन मालकांमध्ये विश्वासार्ह अँटी-थेफ्ट उपकरणांमध्ये गुंतवणुकीच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केल्याने महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.

     

    तुळशीनगरच्या नागरिकांनी एकत्र येऊन या पेट्रोल चोरांवर कठोर कारवाईची मागणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींची पोलिसांकडे त्वरीत तक्रार करून आणि तपासादरम्यान अधिकाऱ्यांना सहकार्य करून,  सर्व रहिवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू शकतात.

  • चंद्रपूर जिल्हा शांतता समितीमध्ये पत्रकारांची एंट्री

    News34

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांचा समावेश आहे.

    या समितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व आमदार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी, जिल्हा साहित्य संघाचे प्रतिनिधी, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हा महिला संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

    या समितीचे मुख्य कार्य म्हणजे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे. यासाठी समिती वेळोवेळी बैठका घेऊन कायदेशीर मार्गाने आवश्यक उपाययोजना करेल.

    पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत. ते चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. मजहर अली हे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
    या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

    News34

    भद्रावती : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दि. ५ सप्टेंबर रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो. थुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख  रविंद्र शिंदे , प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल सोनेकर,सेवानिवृत्त प्राचार्य आबाजी देवाळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे, भद्रावती तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेश्वर वैद्य, सचिव किसनदेव कोरडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊराव कुटेमाटे , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चंद्रकला पारोधे आणि  ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले व्यासपिठावर उपस्थित होते.

    याप्रसंगी दिर्घकाल सेवा देऊन जनतेच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते  भद्रावती व वरोरा तालुक्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक बंधू – भगिनिंचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे, माजी सैनिक विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, संजय बेलेकर, अजित राम, नमोद रामटेके तसेच ट्रस्टचे सचिव संजय टोगट्टीवार ,प्रशांत कारेकर, प्रविण आवारी, भावना खोब्रागडे, शीला आगलावे, दर्शना तेलरांधे, वच्छला रामटेके, द्वारकाबाई रामटेके, माला दासगुप्ता यांच्यासह फार मोठया संख्येत सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भागिनी व प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष  प्रा. धनराज आस्वले, सुत्रसंचलन प्रा. डॉ. सुधीर मोते आणि आभार प्रदर्शन ट्रस्ट्रचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे यांनी केले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात गजराज ची एन्ट्री

    News34 प्रशांत गेडाम

    नागभीड – उडीसा राज्यातून छत्तीसगडमार्गे काही महिन्यांपूर्वी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. कळपाने धानोरा, आरमोरी, वडसा, कोरची परिसरात धुमाकूळ घातला होता.

     

    कळपातील भरकटलेला हत्ती नागभीड वनपरिक्षेत्रातील गोवारपेठ व तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली या परिसरात दिसला. नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या जंगलालगतच्या गावांत वाघ, बिबट, रानगवे, अस्वलाची दहशत असतानाच हत्तीने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांत भीती पसरली आहे.

    सात-आठ दिवसांपासून गोवारपेठ, देवपायली, नवेगाव, हुडेश्वरी या परिसरात हत्तीचा वावर आहे. हत्ती धानपिकाचे नुकसान करीत आहे. हा हत्ती मनुष्यावरही हल्ला करू शकतो. भटकलेला हत्ती एकारा जंगल परिसरातून आवळगाव, मुडझा, नवेगाव, हुंडेश्वरी, देवपायली जंगल परिसरातून आला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    वनपरिक्षेत्र अधिकारी – सालकर

    नवेगाव, हुंडेश्वरी, देवपायली हत्ती दाखल झाला याची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेली आहे . वन विभाग अधिकारी कर्मचारी त्याच्यावर निगरानी ठेवत असून सतर्क आहेत.

  • तर शिक्षकदिनी 2 मुली पोरक्या झाल्या नसत्या

    News34 teacher day 2023

    चंद्रपूर – शिक्षक दिनाच्या 1 दिवसाआधी शहरातील चंद्रपूर-नागपूर मार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाला. त्या लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

    त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात दुखाचं वातावरण पसरलं, त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? रस्ते अपघातात नाहक बळी गेलेल्या शिक्षिका या आपल्या दुचाकीवर रस्त्याच्या बाजूने जात होत्या, भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने त्यांना मागून धडक देत फरफटत नेले.

    सकाळी झालेल्या अपघातानंतर शहरात सायंकाळी पुन्हा 2 अपघात झाले त्यामध्ये 2 व्यक्ती ठार झाले व 1 गंभीर जखमी आहे, 4 सप्टेंबर हा चंद्रपूर शहरातील अपघात वार ठरला, एकूणच दिवसभरात 3 अपघात घडले त्यामध्ये तिघांचा नाहक बळी गेला.

    सुट्टीचा अर्ज टाकून त्या शाळेत जायला निघाल्या….

    उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जिप व मनपा च्या शाळांमधील आरटीइच्या निकषानुसार आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधेची पडताळणी सोमवारी पासून करण्यात येणार होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेत पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, बांधकाम विभाग व शिक्षण विभाग सदस्य सचिव उपस्थित राहणार आहेत अश्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी दिल्या होत्या.

    सर्व शाळांनी भौतिक सुविधा (RTE नुसार) नीट व व्यवस्थित असल्याची खात्री करून परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था व इतर सुविधा परिपूर्ण व व्यवस्थित करून घ्यावेत.

    या कामात हयगय होता कामा नये. शाळा तपासणी स.9 वाजेपासून करण्यात येणार आहे. सर्वांनी शाळेत 9.00 वाजता उपस्थित राहावे.असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे होते. सोमवारी अनिताने सुट्टी घेण्याचा बेत आखला होता.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तिने तसा अर्जही लिहिला,परंतु ‘शहरालगत शाळा असल्याने टीम आपल्याच शाळेत आली तर .? या चिंतेत तिने अर्ज लिहूनही शाळेत जाण्याचा निर्णय घेतला,परंतू काळाने तिच्यावर झडप घातली.

    अनिताच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या धास्तीची चर्चा शिक्षकवृंदात आहे. त्या टीमच्या धाकामूळे अनिता शाळेत गेली नसती तर,तिच्या 2 मुली शिक्षकदिनापूर्वी पोरक्या झाल्या नसत्या.अशीही एक चर्चा आहे.

    चंद्रपूर विधानभेचे तत्कालीन आमदार नाना श्यामकुळे यांनी पडोली ते बंगाली कॅम्प पर्यंत उड्डाणपूल निर्माण व्हावा यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर केला होता, त्या उड्डाणपूलाने शहरातून जाणारी जड वाहतूकिला बायपास म्हणून तो सोपा पर्याय होता मात्र राजकीय उदासीनतेमुळे तो उड्डाणपूल कागदावर राहिला.

    शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांची संख्या व अरुंद होणारे रस्ते ही चिंतेची बाब झाली आहे, शहरातील शाळा व महाविद्यालय यांची सुट्टी झाली की अल्पवयीन बाईक रायडर्स चा धुमाकूळ बघायला मिळतो, ही आता नित्याचीच बाब झाली आहे.

    सकाळच्या सुमारास अल्पवयीन बाईक रायडर्स ची संख्या जास्त प्रमाणात रस्त्यावर बघायला मिळते, आज अल्पवयीन बालकांच्या हाती दुचाकी देण्याची फॅशन पालकांनी सुरू केली आहे, ती जर थांबली तर शहरात होणारे अपघात काही प्रमाणात कमी होतील.

    चंद्रपूर शहरात वाढणाऱ्या ट्रॅफिक जॅम ची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, जटपुरा गेटवर दररोज वाहतूक व्यवस्था खोळंबते, यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र ते सर्व फोल ठरले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्री असो की स्थानिक आमदार त्यांनी फक्त मर्यादित कालावधीसाठी जटपुरा गेट च्या वाहतुकीचा मुद्दा उचलला, पण ठोस उपाययोजना काही झाली नाही.

    राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे आज अनेक समस्या चंद्रपुरात उदभवल्या आहे, त्या भविष्यात कधी सुटणार की नाही ही येणारी वेळ सांगेल.