Tag: Chandrapur Crime News Today

  • चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य

    Minor girl abuse by teacher in Chandrapur : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना गाजत असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

    Read Also : चंद्रपुरातील या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याला दिला मानसिक त्रास, विद्यार्थ्यांची आत्महत्या, संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करा

    पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे.

    तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत. Minor girl abuse by teacher in chandrapur

    …असे आले प्रकरण उघडकीस

    नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. Minor girl abuse by teacher in chandrapur

    घुग्घुस केंद्रातही तक्रार

    दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

  • lcb chandrapur arrests illegal scrap gang । चंद्रपूर LCB ची धडक कारवाई! लोखंडी भंगार चोरी प्रकरणात पाच जण अटक; 7.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

    lcb chandrapur arrests illegal scrap gang

    lcb chandrapur arrests illegal scrap gang : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत अवैधरित्या लोखंडी भंगाराची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पिकअप वाहनासह सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    Read Also : चोरीच्या भीतीने दागिने ठेवले वाहनात, १७ लाखांचे दागिने लंपास

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरून अवैधरित्या लोखंडी भंगार चोरीची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 8653 ला ताब्यात घेतले.

    या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी चंद्रपूर येथील रहिवासी आहेत: दुर्गेश तुळशीराम भागडे (वय २१), रोशन उमेश भोयर (वय २१), कृष्णा संजय गदईकर (वय १९), अशोक बनेश झाडे (वय ४१), दिवाकर तुळशीराम भागडे. याशिवाय, साबिर शेख नामक एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. lcb chandrapur arrests illegal scrap gang

    जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

    पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण ₹ ७,८२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे: पिकअप वाहन (क्र. MH 34 BZ 8653) ५,००,०००/-, लोखंडी भंगार (२५०० किलो) २,५०,०००/-, गॅस कटर सिलेंडर (०३ नग) ३०,०००/-, घरगुती सिलेंडर २,०००/-.

    याप्रकरणी आरोपींवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर च्या पथकाने केली. कारवाई पथकात PSI संतोष निंभोरकर, PSI सुनील गौरकर, ASI धनराज करकाडे, HC गणेश भोयर, संतोष येलपुलवार, PC सुमित बरडे, आणि प्रफुल गारघाटे यांचा समावेश होता.

  • Chandrapur juvenile criminals rise city crime । चंद्रपूर शहरात गुन्हेगारीचा नवा चेहरा; अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता ट्रेंड!

    Chandrapur juvenile criminals rise city crime

    Chandrapur juvenile criminals rise city crime : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर शहरात गुन्हेगारी धुमाकूळ घालत असून आता या गैरकायदेशीर कृत्यात अल्पवयीन गुन्हेगारांची एंट्री झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठया प्रमाणात वाढत असून पोलीस व नागरिकांसाठी हि एक चिंतेची बाब आहे.

    चंद्रपूर शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यात एका आरोपीसह २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ११ जुलै रोजी फिर्यादी आपल्या पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेड वाहनावर आलेल्या एका आरोपीने गाडी आडवी थांबविता फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावीत पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला होता. जबरी मोबाईल हिसकावणाऱ्या २० वर्षीय शेख राजा मन कुरेशी राहणार बगडखिडकी चंद्रपूर या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीजवळून ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. crime wave Chandrapur

    Also Read : गुन्हेगारांची पत्रकारिता, देहविक्री करणाऱ्या महिलेला मागितली खंडणी

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यातील सहभागी बाबुपेठ मधील अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाकडून ३ दुचाकी वाहनसह एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    घुटकाला वार्डात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या मुलाकडून २ मोबाईल सह एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

    एका आरोपीसह २ अल्पवयीन मुलांकडून चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड, ३ दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे, यांच्यासह पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Chandrapur Foreign Liquor Seized | ड्राय डे च्या दिवशी चंद्रपुरात दारूविक्री

    Chandrapur Foreign Liquor Seized

    Chandrapur Foreign Liquor Seized : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – २ ऑक्टोबर गांधी जयंतीला देशभरात ड्राय डे असतो त्यानंतरही काहीजण अवैधरित्या दारूची विक्री करतात, असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात घडला. पोलिसांनी यावेळी १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा विदेशी दारूसाठा पकडला.

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी दारूचा साठा

    २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ड्राय डे असतो, त्यानंतरसुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री केल्या जाते, चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटें यांना मिळाली.

    घरून सुरु होती दारूविक्री

    माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकोरी वॉर्डातील ५६ वर्षीय सुनीलकुमार राजकुमार मुल्ले यांच्या राहत्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी विदेशी दारूचा १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आरोपी मुल्ले ला अटक करीत महाराष्ट्र दारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि कोलटें, निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर. निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.