Tag: सुधीर मुनगंटीवार

  • Sudhir Mungantiwar on railway encroachment । चंद्रपूरमधील रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी 900 नवीन घरे!

    Sudhir Mungantiwar on railway encroachment

    रेल्वे अतिक्रमण प्रकरणी मुनगंटीवारांचा पुढाकार, म्हाडाची घरे लवकरच

    Sudhir Mungantiwar on railway encroachment : चंद्रपूर, दि. 3: चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्म वीर मीना यांनाही पत्र पाठवून चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा उपस्थित केली होती. railway housing project in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, आतापर्यंत १३ नागरिकांची शिकार

    चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले उचलल्या जात असून अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    नियोजन भवन येथे आढावा

    नियोजन भवन सभागृह येथे रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देणे व इतर समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागिय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, रेल्वे विभागाचे सहाय्यक मंडळ अभियंता सुबोध कुमार, कार्यकारी अभियंता नवीन शर्मा, उपकार्यकारी अभियंता योगेंद्र कुमार तसेच नागरिकांची उपस्थिती होती. alternative housing for railway encroachers

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात सध्या तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पात सुमारे 640 घरे बाधित होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम जबरदस्तीने न करता नागरिकांच्या सहकार्याने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. या प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या 68 घरांचे सर्वेक्षण करून, संबंधित नागरिकांशी बैठक घ्यावी. तसेच रेल्वे विभागाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस व्यवस्था करावी. या पुनर्वसनासाठी म्हाडा येथील उपलब्ध घरांची पाहणी करण्यात येईल. MHADA homes for displaced families Chandrapur

    alternative housing project in chandrapur

    ९०० घरे उपलब्ध होणार

    महानगरपालिकेने रेल्वे लाईनमधून जाणाऱ्या नाल्यांची योग्यरीत्या स्वच्छता करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिक्रमित घरांची सविस्तर यादी तयार करावी. रेल्वे लाईनसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सीएसआर (CSR) अंतर्गत स्थानिक विकासासाठी निधी खर्च करावा. दरम्यान, रेल्वे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत अतिक्रमित 68 घरे हटविण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना म्हाडामार्फत 100 घरे तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्याने एकूण 900 घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

    या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झूमद्वारे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    सर्व नागरिकांना कठीण व मानसिक तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढल्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • Railway land encroachment rehabilitation । रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी मिळणार नव्या घरांचा ठराव, जाणून घ्या काय होणार?

    Railway land encroachment rehabilitation

    Railway land encroachment rehabilitation – चंद्रपूर : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार, चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक यांना पत्र पाठवून मुंबई येथे बैठक घेण्याची विनंती केली होती. चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्यासोबत बैठक पार पडली. Chandrapur railway land dispute

    केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्देशांनुसार ही बैठक घेण्यात आली. यामध्ये ९०० घरे हटविण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच बैठक घेण्यात आली.

    चंद्रपूर शहरातील व आजूबाजूच्या भागातील २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्याकडे केली. या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे विभाग नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांनी आश्वासित केले. Railway station yard encroachment removal

    Chandrapur railway land dispute

    त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला न्याय

    मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री धर्म वीर मीना, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय दुबे, अनिल डोंगरे,अमित निरंजने, राकेश बोमनवार, होमेश्वर नंदनवार, महेश झिटे सुभान पठाण आणि सुरेंद्र मंचलवार तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी झूमद्वारे उपस्थित होते.

    चंद्रपूर शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, रेल्वे स्टेशन यार्ड, रयतवारी, लखमापूर या भागांतील रेल्वे विभागाच्या जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून काही मजूरांनी पक्की घरे बांधलेली आहेत. रेल्वे विभागाकडून या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी विविध उद्योग सुरू असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर मजूर वास्तव्य करत आहेत. त्यांनी रेल्वे विभागाच्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून त्यांच्या राहण्यासाठी नवीन घरे उभारणे अत्यंत आवश्यक आहे. Chandrapur new railway line development

    आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुंबई येथे रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये. या बैठकीत चंद्रपूर रेल्वे स्टेशन वार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • Sudhir Mungantiwar latest news । कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सुधीर मुनगंटीवार यांचा यशस्वी संघर्ष

    Sudhir Mungantiwar latest news

    Sudhir Mungantiwar latest news : चंद्रपूर –  राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ४५ कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त झाले आहेत. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले, अशी भावना व्यक्त करून कक्ष सेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत. Chandrapur medical college jobs

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाणीवरून निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर व्हा तयार

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गत १० ते १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल मार्फतीने नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आल्यामुळे उक्त ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. Contract workers appointment news

    या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत, मे.स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फतीने  सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याने या पदावर त्यांना सेवेची संधी मिळण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सफाई कामगारांना सदर कंपनीमार्फत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करून ४५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना मे. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांना न्याय मिळाला आहे.

    कंत्राटी तत्वावर कक्षसेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रूपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निमसरकार, पृथ्वीराज मरस्कोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे आदींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले

  • Sudhir Mungantiwar social initiatives । आराध्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य – मुनगंटीवारांचे सामाजिक कार्य ठरले दीपस्तंभ

    Sudhir Mungantiwar social initiatives

    “जेव्हा राजकारण संवेदनशील मनाने बोलते…”

    कधीकाळी hopeless वाटणाऱ्या परिस्थितीचा turning point ठरला, जेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. अवघ्या एका वर्षाची आराध्या, जिला complete hearing loss होता, तिच्या आयुष्यात एक miracle moment आला – जेव्हा कॉक्लियर इम्प्लांटसारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिने life’s first sounds ऐकले. वाघमारे कुटुंबासाठी तो क्षण emotional आणि unforgettable ठरला.

    Sudhir Mungantiwar social initiatives चंद्रपूर, दि. १३ – राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांसाठी १२ एप्रिल २०२५ हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्यांची मुलगी आराध्या मंगेश वाघमारे हिची कॉक्लियर इम्प्लांट ही अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला नसता तर आम्हाला आज हा आनंद अनुभवता आला नसता, या शब्दांत वाघमारे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत. Best ENT surgeon for cochlear implant

    चंद्रपुरात पोलिसांवर २ युवकांनी केला हल्ला

    आराध्या अवघी १ वर्षांची असताना दोन्ही कानांना पूर्णतः बहिरेपणा असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वाघमारे कुटुंब चिंतेत होते. प्राथमिक उपचारांमध्ये काहीच यश न मिळाल्यानंतर त्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष दिले. सागर खडसे यांना वाघमारे कुटुंबाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

    आ. श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी योग्य मदत व पाठबळ दिल्यामुळे टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ. श्वेता लोहिया यांच्या मार्गदर्शनात आराध्याचे ऑपरेशन पार पडले. आज आराध्या ऐकू शकते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू या यशोगाथेची साक्ष देतात. वाघमारे कुटुंबाने सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. Tata Trust cochlear implant program

    मंगेश वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आ. श्री. मुनगंटीवार यांना देवदूत म्हटले आहे. ‘आमच्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले आहेत. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आरोग्य सेवेत मानवी दृष्टीकोन व संवेदनशील नेतृत्व किती महत्त्वाचे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करणार आहो,’ अश्या भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केल्या.

    सुधीर मुनगंटीवार यांचे संवेदनशील नेतृत्व

  • Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

    Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

    Union budget date विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

    या अर्थसंकल्पातून रोजगार, कौशल्य विकास लघु व सुक्ष्म उद्योगास चालना, मध्यम वर्गास न्याय, कृषी उत्पादन वृध्दी, कृषी संशोधन व अन्य क्षेत्राशी निगडीत रचनात्मक विकासाला वाव देण्याचा कसोशिने प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करुन सरकारने कृषीक्षेत्रात अनेक महत्वकांक्षी योजनांना पुरस्कृत करण्याचा व्यापक प्रयत्न केला आहे. नवरोजगारासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतुद करीत महिला उत्थानास गती देण्याची भुमिका आहे. पी-एम सुर्यघर योजनेंतर्गत एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज कर्मचारी पेन्शनधारकांना कर प्रस्तावात सवलत, शिक्षण, स्वास्थ्य, ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पातून भर दिला आहे.

    अवश्य वाचा : केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळाला ठेंगा

    Union budget date हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला असून हा अर्थसंकल्प विकसित भारताचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रीया हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.

    विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा तरी वित्तीय तूट कमी करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. २३ जुलै २०२४ : देशाच्या विकासाला अधिक गती देत असतांनाच सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भारताचे लाडके आदरणीय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रभाई मोदी जी यांच्या नेतृत्वात भारतमातेला विश्वगुरू बनविण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारा या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.

    चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात

    ना.श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की आजच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.९% इतकी कमी राखली गेली आहे, हे कौतुकास्पद आहे. देशात विकासात्मक कामांवरील आणि कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढत असतांना तूट कमी करण्याचे आव्हान मोदी सरकारने पेलून दाखवले आहे. त्याच्या जोडीला आयकराची केलेली पुनर्रचना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. जीएसटी मधे विविध वस्तूंना दिलेली सवलत, आयात व सीमा शुल्कातून विविध अत्यावश्यक औषधांना दिलेली सूट समाजाला समाधान देणारी आहे. तर मोबाईल फोन, त्याचे सुटे भाग यांच्यावरील घटवलेले कर हे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायजेशनला अधिक वेग देणारे आहेत, असे ते म्हणाले.

    Union budget date या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला गेला आहे असे सांगून ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की या अर्थसंकल्पामुळे खते व बीबियाणे स्वस्त होतील. हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अधिक दमदार पाऊले टाकणारा आहे. तेलबियांच्या उत्पादनाला दिलेल्या सवलती व चालना देशाला खाद्यतेल क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याकडे नेणाऱ्या आहेत. तर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता ग्रामपंचायत पातळीवर दिलेल्या योजना व सवलती हे आपली जमीन, जल व धान्य निर्वीष करणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.

    आजच्या अर्थसंकल्पात हवाई वाहतुक व जल वाहतुकीला तसेच जहाज व विमान दुरूस्ती व देखभाल या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता जाहिर केलेल्या योजना या देशाला या ही क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवत पुढे नेणाऱ्या आहेत अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनांचे कौतुक केले आहे. बिहार, ओदीशा, प.बंगाल, झारखंड व आंध्र या पूर्व भारतातील भागात रस्ते, वीज , गृहनिर्माण व पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधांसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या आहेत, त्यातून याभागात उद्योग व रोजगार वाढून विकासाचा अनुशेष भरून निघेल असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बिहार व आंध्र प्रदेशाला दिलेले विशेष पॅकेज या राज्यामधील बेरोजगारी कमी करणारी ठरतील असे ते म्हणाले.

    ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी अभिलेखांचे डिजिटायजेशन तसेच नवीन सर्वेक्षण, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून जमिनीचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईल, तसेच विकासाचे नियोजन नियंत्रण करणाऱ्या संस्थांना व प्राधिकरणांना अधिक चांगले काम करता येईल असे ते म्हणाले. भूमी अभिलेख क्षेत्रात बरेच दिवस प्रलंबित असलेले प्रश्न या अर्थसंकल्पामुळे सुटतील असेही त्यांनी सांगितले.

    सर्वसामान्यांना आयकरात सवलत देतांनाच कॉर्पोरेट क्षेत्रालाही सवलती दिल्या आहेत, त्या सवलती रोजगार निर्मितीशी जोडल्याने (एम्प्लॉयमेंट बेस्ड इंसेंटीव्हज) कंपन्यांना तंत्रज्ञान व नफा यासोबतच आता रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यां्नी सांगितले.

    एकुणात हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, विकासाची गती वाढविणारा, रोजगार निर्मिती करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा, शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहे, असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय – आ. किशोर जोरगेवार

    आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी सादर केलेल अर्थसंकल्प देशाला विकासाची नवी दिशा देणारा आहे. उद्योग, ग्रामीण विकास, रोजगार, सुरक्षा या विषयांना केंद्र स्थानी ठेवून सदर अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

      यावर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून स्टार्टअप्स आणि रोजगार निर्मिती उपक्रमांवर दिलेला भर ही एक चांगली बाब आहे. अनेक क्षेत्रांमधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत. सर्वच क्षेत्रांमधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात असून उद्योग विश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे.पूरस्थिती नियंत्रणासाठी साधारणपणे ११ हजार ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत १ कोटी गरीब व मध्यम वर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून १ कोटी घरांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

    कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण आदी क्षेत्रावर अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.