Tag: सुधीर मुनगंटीवार

  • मोरवा–विमानतळ मार्ग उन्नतीला ६ कोटींची मंजुरी; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    Morwa Airport Road Upgrade : चंद्रपूर, दि.१२ डिसेंबर २०२५ (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून मोरवा ते मोरवा विमानतळ मार्गाच्या सुधारणा व उन्नतीसाठी तब्बल ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता लक्षात घेता अत्यावश्यक असलेल्या या कामासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

    मोरवा विमानतळ परिसरात नागपूर उडान क्लबच्या DGCA-अनुमोदित प्रशिक्षण सुविधा कार्यरत आहेत. सुरक्षित आणि आधुनिक विमान संचालनासाठी दर्जेदार रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विमानतळाच्या आधुनिकीकरणासोबत जोडणाऱ्या मार्गाचे उन्नतीकरण अत्यावश्यक झाले होते. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे मागणी करत सविस्तर पाठपुरावा केला होता. (हे हि वाचा – १४ वर्षीय मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार)

    रस्ता सुधारणा झाल्यानंतर वैमानिक प्रशिक्षण, विमानतळ सेवा, तसेच स्थानिक रहदारी या सर्वांना मोठा दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्याच्या विमानतळ विकासाला नवी गती मिळणार आहे. Morwa Airport Road Upgrade

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मोरवा विमानतळाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून चंद्रपूरच्या भविष्यातील प्रगतीचा कणा आहे. विमानतळाशी जोडणारा मार्ग सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार झाल्यावर प्रशिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या संधींना व्यापक चालना मिळेल. चंद्रपूरला आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे आणि येथील तरुणांना हवाई सेवा क्षेत्रात नवी दारे खुली व्हावीत, हे माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

  • चिंतलधाबा आरोग्य क्रांती: ६१ लाखांचे PHC भूमिपूजन!

    आ. मुनगंटीवार यांच्यामुळे सौरऊर्जा व ग्रामीण सुविधा उभारणीला नवी गती

    rural health center : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चिंतलधाबा गावाने सर्वांगीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. गावाच्या आरोग्यसेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने दि. ५ डिसेंबर रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तसेच, कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही आ.मुनगंटीवार यांनी केले असून, या उपक्रमामुळे  स्थानिक महिलांसाठी रोजगाराची नवी दालने खुली झाली आहेत. (हे हि वाचा : पोंभुर्णा मध्ये महिला बचत गटाच्या बाजारपेठेचे भूमिपूजन)

    यावेळी, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच सौ. शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदींची उपस्थिती होती.

    आरोग्य उपकेंद्रासाठी तब्बल ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आपल्या परिसरातच मिळणार आहेत.

    गावाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या मागण्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ठोस बळ मिळाले आहे. चिंतलधाबाच्या विकासासाठी त्यांच्या या प्रयत्नांना आता वेग आणि दिशा मिळत असून गाव सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

    दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस

    नागरिकांनी मांडलेल्या दोन प्रमुख मागण्यांचाही विचार करण्यात आला. यामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तत्काळ घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. चिंतलधाबाची विजेची समस्या सोडविण्यासाठी महावितरणसोबत सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी उथळपेठ हे गाव १००% सोलार करण्यात आले होते; त्याच धर्तीवर चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने आगामी वर्षभरात या सोलार प्रकल्पाबद्दल गतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले. rural health center

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांमुळे चिंतलधाबा गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून आरोग्य, ऊर्जा आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीला निर्णायक दिशा मिळेल. आगामी काळातही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने आणि जबाबदारीने कार्यरत राहू, असा ठाम विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

    कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र

    चिंतलधाबा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ, मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील तरुणी व महिला यांच्या प्रशिक्षण कौशल्याचा भविष्यात विचार व्हावा, त्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी येत्या सहा महिन्यात त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.यासाठी प्रशिक्षणार्थी तरुणी व महिलांची यादी तयार करावी.

    कायम सक्षम आरोग्य सुविधेचा मानस

    आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक बळ देताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच कळमना येथे २ कोटी ६८ लाखांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उमरी पोतदार येथे ८ कोटी ७५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य संकुलाचे लोकार्पण केले आहे. अर्थमंत्री असताना शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत ७.५ कोटींचे एमआरआय मशीन, १.५ कोटींची मोबाईल कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देऊन जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा देण्यात आली. तसेच १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्रे, ६ स्मार्ट रुग्णालये, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल यांसारख्या भव्य प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था उभी करण्याचा मोठा उपक्रम त्यांनी साध्य केला.

  • Maharashtra government housing loans for police | सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजारांहून अधिक पोलिसांना मिळणार हक्काचे घर

    Maharashtra government housing loans for police

    Maharashtra government housing loans for police : चंद्रपूर ७ नोव्हेम्बर (News३४) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटला आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिसांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांच्या हक्काच्या घराचा प्रश्न संवेदनशीलतेने सोडविल्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

    Also Read : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; मेडिकल कॉलेजचे जानेवारी महिन्यात लोकार्पण

    शासनाकडून मिळणाऱ्या डीजी लोन (पोलीस गृहबांधणी अग्रीम) योजनेपासून राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदार दोन वर्षापासून वंचित होते. यासंदर्भातील माहिती मिळताच आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने डीजीलोन करीता १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिवांनी काढले.

    महाराष्ट्र पोलिस दलासाठी डीजी गृह कर्ज योजना अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे अंमलदार यांना घर बांधण्यासाठी थेट पोलिस गृहविभागाकडून मूळ वेतनाच्या १२५ टक्के कर्ज मिळते. ज्या अधिकारी व अंमलदारांकडे स्वतःचे निवासस्थान नाही. अशा कर्मचाऱ्यांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळावे या करीता ही योजना राबविली जाते. ऑगस्ट २०२३ पासून आजपर्यंत राज्यातील जवळपास पाच हजार ४५९ अंमलदारांनी डीजी लोन करीता अर्ज दाखल केले होते.

    परंतु दोन वर्षात शासनाकडून योजनेतील एकाही अंमदाराचा अर्ज मंजूर करण्यात आलेला नव्हता. डीजी लोन करीता शासनाकडे राज्यभरातून सुमारे ४ हजार ७११ आणि मुंबईतून ७४८ इतके अर्ज दाखल केले आहे. हे संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर कले आहेत. यामध्ये ४ हजार ७११ अर्जाकरीता १२५५ कोटी ८७ लाख रुपयांची तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातंर्गत ७४८ प्रलंबित अजौरणठी २१२ कोटी २० लाख रुपयांची आवश्यकता होती. Mungantiwar role in police housing loan

    संवेदनशील, तत्पर अन् पाठपुरावा

    गृहकर्जासाठी (डिजी लोन) गेल्या दोन वर्षांपासून पोलीस अंमलदार शासनदरबारी पाठपुरावा करीत होते. पोलीस स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित असल्याचा मुद्दा आ. श्री. मुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेतला. पाठपुरावा करीत विधानसभेत हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. अखेर शासनाने डीजीलोन करीता १७६७,०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. आ. श्री. मुनगंटीवार यांची संवेदनशीलता, तत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा याचेच हे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • Sudhir Mungantiwar farmers relief । चंद्रपूरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – मुल तालुका मदतीच्या यादीत समाविष्ट

    Sudhir Mungantiwar farmers relief

    Sudhir Mungantiwar farmers relief : चंद्रपूर १२ ऑक्टोबर : (News३४ वृत्तसेवा) राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले होते. प्रारंभी या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका समाविष्ट नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नांनंतर केवळ काही तासांतच शासनाने सुधारणा करून १० ऑक्टोबर रोजी नवीन शासनादेश काढत मुल तालुक्याचाही समावेश केला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आ. मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द काही तासांतच पूर्ण करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

    Also Read : राजुरा नगरपरिषद निवडणूक, मतदारयादीत घोळ कायम

    आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. मुल,पोंभुर्णा , बल्लारपूर, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजचा थेट लाभ मिळणार आहे. Mul taluka included relief package

    राज्य शासनाने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. शासन आदेशानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती, वीज बिलात तिमाही माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क व शैक्षणिक फीमध्ये माफी अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.यासोबतच खरीप हंगाम जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. यासाठी नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे. flood affected farmers Maharashtra

    शेतकऱ्यांनी मानले मुनगंटीवार यांचे आभार

    राज्यभरातील विविध तालुक्यांप्रमाणेच आता मुल तालुकाही आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आला असून,या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासन आदेशात स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे या सवलतींचा थेट लाभ चंद्रपूर जिल्ह्यासोबतच मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

    ही सकारात्मक घडामोड म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटत राहणे हीच त्यांची कार्यसंस्कृती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

  • Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme । सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी संगणक चालकांचे मानधन मार्गी

    Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme

    Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme : चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या पुढाकारामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन मिळणार आहे. यासाठी कंत्राटी संगणक चालकांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    चंद्रपुरात महिला बचत गटाच्या मासिक बैठकीत सिमेंट रेलिंग कोसळली, ३ महिला जखमी

    कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना नोकरीत सुरक्षितता नाही. शिवाय मानधनही कमी आहे आणि ते वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत मानधन मिळावे, यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.

    आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्षांपासून शासकीय कामकाज करत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत असुरक्षितता तर असतेच पण मानधनही कमी असते. इतर शासकीय सोयी सुविधादेखील मिळत नाहीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटुनही अनुदान न आल्याचे कारण पुढे करत मानधनापासून वंचित ठेवले जाते. दर महिन्याच्या एक तारखेला मानधन मिळावे, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन मागणी आहे. हे सर्व कर्मचारी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. नियमित मानधन न मिळाल्याने त्यांना सामाजिक संघर्षाला नेहमीच तोंड द्यावे लागते,’ याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते. Government contract workers payment issue

    आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर अखेर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने एक शासन निर्णय जारी केला असून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. Maharashtra contract employees salary issue

    कर्मचाऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

    पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेअंतर्गत जिवती येथे कार्यरत असलेले कंत्राटी संगणक चालक के. एम.कोटनाके यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत आ. सुधीर मनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. ‘गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आमचे मानधन मिळण्याबाबत अडचणी होत्या. ही अडचण सोडवण्या संदर्भात आम्ही आ. मुनगंटीवार यांच्याकडे जाऊन समस्या सांगितली. त्यांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा केला आणि आमची मोठी अडचण दूर केली,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

  • Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award । राज्याचा हिरा लंडनमध्ये चमकणार

    Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award

    Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधून भारतात आणणण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे आ. श्री. मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमिमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी लंडन येथे आयोजित ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’मध्ये आ. श्री. मुनगंटीवार यांना हा सन्मान बहाल करण्यात येईल. Sudhir Mungantiwar

    चंद्रपूरकरांना स्मार्ट मीटर चा करंट

    ‘लोकमत’च्या ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’ या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षीं हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे. भारताच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

    या सोहळ्यात ‘कोहिनूर ऑफ इंडिया’, ‘भारत भूषण’, ‘महाराष्ट्र रत्न’, ‘ग्लोबल सखी’ आणि ‘गुजरात रत्न’ अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिले जाणार आहेत. Kohinoor of India Award

    आ. श्री. मुनगंटीवार यांना राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘लोकमत कोहिनूर ऑफ इंडिया’ हा जाहीर करण्यात आला.‘देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्या विलक्षण कार्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे पत्र आ. श्री. मुनगंटीवार यांना ‘लोकमत’ माध्यम समूहाचे चेअरमन श्री. विजय दर्डा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

    यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरव

    आ. श्री. मुनगंटीवार यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार व सन्मान बहाल करून गौरविण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने मानाची डी.लिट. प्रदान करण्यात आली. पर्यावरण व वन्यजीव तसेच संस्कृती व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या योगदानासाठी ही डी.लिट. प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच विद्यापीठातर्फे डी.लिट. जाहीर होणे हा देखील एक विलक्षण योगायोग ठरला. Sudhir Mungantiwar

    १९९९ मध्‍ये राष्‍ट्रकुल संसदिय मंडळाच्‍या वतीने विधानसभेतील उत्‍कृष्‍ट आमदार, २००८ मध्‍ये अंध कल्‍याणाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनिय काम केल्‍याबद्दल राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाच्‍या वतीने जी.एल. नर्डेकर स्‍मृती पुरस्‍कार, वृक्षारोपण मोहीमेच्या संदर्भात किर्लोस्‍कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्‍थेचा कर्मवीर मासा कन्‍नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्‍ट फायनान्‍स मिनिस्‍टर पुरस्‍कार, आफ्टरनुन व्‍हॉइस या संस्‍थेद्वारे बेस्‍ट परफॉर्मिंग मिनिस्‍टर पुरस्‍कार, जे.सी.आय. महाराष्‍ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्‍कार, फेम इंडिया तर्फे उत्‍कृष्‍ट मंत्री पुरस्‍कार अशा प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. Sudhir Mungantiwar

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ४ लिम्का रेकॉर्डसह ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षररचना व ‘ग्रीन भारतमाता’ साकारण्यासाठी २ गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड मिळाले, विक्रमी वृक्षलागवडीसाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये विशेष उल्लेख केला, तसेच त्यांच्या कार्यालयाला देशातील पहिला आयएसओ दर्जा प्राप्त झाला. वित्तमंत्री म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘आज तक’ व ‘इंडिया टुडे’ने त्यांना ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’ म्हणून गौरविले, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ११,९७५ कोटी रुपयांचा महसुली आधिक्य असलेला ऐतिहासिक अर्थसंकल्प त्यांनी सादर करून देशात अभूतपूर्व नोंद केली.

  • House Patta Distribution । 12 हजार घरपट्ट्यांच्या महाअभियानाची सुरुवात – बल्लारपूरचा ऐतिहासिक क्षण!

    House Patta Distribution

    House Patta Distribution : चंद्रपूर, दि.14 : बल्लारपूरच्या विकास प्रवासात ऐतिहासिक पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    बल्लारपूर, नाट्यगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूलन निवासी पट्टेवाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे,शहर अध्यक्ष रणजंय सिंग, समीर केने, जयश्री मोहूर्ले, राजू दारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ,तहसीलदार रेणुका कोकाटे, उपअधीक्षक भूमि अभिलेख अनिल देशमुख, अग्निशमन अधिकारी शुभम रत्नपारखी, नायब तहसीलदार श्री. फुलझेले आदींची उपस्थिती होती.

    गाईच्या किंकाळ्यांनी हादरले गाव

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात माझा मतदारसंघ प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, क्रीडा संकुल, अभ्यासिका, सिमेंट रस्ते, छटघाट व विविध बगीचे अशा अनेक सुविधा उभारल्या असून, सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. बल्लारपूर मतदारसंघ हा विकासकामात सदैव आघाडीवर राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar’s Vision for Ballarpur

    बहिणींना शिक्षणात संधी

    एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्रात 62 कोर्सेस सुरू होणार असून, यामुळे येथील बहिणींना शिक्षणात संधी व दर्जाची समानता मिळेल. स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत, शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी निर्माण करण्यात आली आहे. Urban Housing Scheme Ballarpur

    बल्लारपूरमधील साधारणतः अंदाजे 12 हजार कुटुंबे स्वतःच्या हक्काच्या जमिनीअभावी शासकीय योजना व बँक कर्जापासून वंचित आहेत. यासाठी झुडपी जंगल कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्रजी यादव यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. हा पट्टे वाटपाचा कार्यक्रम केवळ 210 पट्ट्यांपुरता मर्यादित न ठेवता, भविष्यातील सुमारे 12 हजार पट्ट्यांच्या वाटपाच्या महाअभियानाची सुरुवात आहे. कुटुंबाला स्वतःच्या हक्काचा घरपट्टा मिळाल्यावर त्यांचे अनेक प्रश्न कायमचे मार्गी लागतील, असा विश्वास श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

  • Sudhir Mungantiwar Raksha Bandhan Speech । माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा-आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार 

    Sudhir Mungantiwar Raksha Bandhan Speech

    Sudhir Mungantiwar Raksha Bandhan Speech : चंद्रपूर -लाडक्या बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच मी आज जनसेवेसाठी सक्षमपणे उभा आहे. माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा अमूल्य वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    बल्लारपूर नाट्यगृहात, भाजपा बल्लारपूर तालुकाद्वारा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष रणजयसिंग, महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई जोशी, आरती अक्केवार, कांताबाई ढोके, शिवचंद्र द्विवेदी, जयश्रीताई मोहूर्ले, संध्याताई मिश्रा, रेणुकाताई दुधे, सारिका कणकम, किशोर मोहूर्ले, सतीश कणकम, गुलशन खान, देवेंद्र वाटकर, नजमा खान, उत्तरा सोनटक्के, उन्नती टेकाडे, सुनीता निवलकर, सुरेखा श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.

    रामाला तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या मोहिमेला गती

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधनाचा हा पवित्र उत्सव आहे. लाडक्या बहिणींच्या मनातील प्रत्येक इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. राखीचा हा धागा हा केवळ प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक नाही, तर रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ असा अतूट बंध आहे. हा दिवस माझ्यासाठी अत्यंत सौभाग्यशाली असून शेकडो लाडक्या बहिणींनी राखी बांधून मला आपुलकीचा मान दिला. Raksha Bandhan cultural event Ballarpur BJP

    महिला आत्मनिर्भर होत आकाशात उंच भरारी घेतील

    या राखीने माझ्यावर लाडक्या बहिणींचा विश्वास, प्रेम, सुरक्षितता आणि काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आत्मनिर्भर होत आकाशात उंच भरारी घेतील. असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.

  • Sudhir Mungantiwar road inspection । 📢 चंद्रपूर रस्त्यांवरून संतापले आमदार! ‘काम दर्जेदार नसेल तर ठेकेदार जबाबदार’

    Sudhir Mungantiwar road inspection

    Sudhir Mungantiwar road inspection : चंद्रपूर – सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कायम आग्रही असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार घेतला आहे. तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. यातून जनहिताच्या कामांमधील त्यांची तत्परता पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. pothole accidents in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगार देशी कट्ट्यासह परतला आणि केली एकाची हत्या

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-बामणी-कोठारी, चंद्रपूर-मुल आणि चंद्रपूर-जाम या प्रमुख मार्गांवरील खड्डे आणि उखडलेले रस्ते, ही गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यावरील खड्डे म्हणजे थेट मृत्यूचे निमंत्रण ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत चिंताजनक असून संबंधित विभागांना तात्काळ रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

    बल्लारपूर-बामणी-कोठारी आणि चंद्रपूर-मुल या दोन्ही रस्त्यांच्या डागडुजी संदर्भात बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात आ. श्री. मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

    यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भाजपा नेते रामपाल सिंग, चंदू मारगोनवार, अक्षय पगारे, उपअभियंता संजोग मेंढे, राज्य महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. बोबडे, उपविभागीय अभियंता श्री. अंबुले, श्री. चव्हाण, श्री.राठोड, आदींची उपस्थिती होती.

    ‘रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून तीन दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी. पावसाचा खंड पडताच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. खड्ड्यांमुळे अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला असून, अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्ते अपघाताच्या बाबतीत कायदा प्रस्थापित करणे आवश्यक आहे. रस्ता उखडलेला असेल किंवा मोठे खड्डे पडले असतील, तर अशा ठिकाणी 100 फुटांपर्यंतचा रस्ता खोदून त्याचे रेडियम पट्ट्यासह संपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे,’ असे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. bad road conditions in Chandrapur

    त्यासोबतच बीओटी मार्गांवर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, तर अपघातग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘बामणी येथे सर्व्हिस रोड देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोठारीकडे जाणारा रस्ता आणि कोठारी पुलाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे. सर्व रस्त्यांचा ‘रफनेस इंडेक्स’ तपासून तो निर्धारित मानकांनुसार आहे की नाही, हे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, मुल रस्त्यावरील अपघातांने किती मृत्यू झाले आहेत, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. Chandrapur road repair update

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी केली तसेच संबंधित विभागाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. ज्या दर्जेदार रस्ते तयार होणे अपेक्षित आहे, त्या दर्जाचे काम कंत्राटदारांकडून होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्पासाठी दिला जाणारा ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’ (DLP) हा पाच वर्षांचा असून, त्या कालावधीत संबंधित रस्त्याचा ‘रफनेस इंडेक्स’ मोटरेबल ठेवणे बंधनकारक आहे. pothole accidents in Chandrapur

    खड्डा लहान असतानाच त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक असून, गरज असल्यास त्यावर कार्पेटिंग करावे. मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या व उखडलेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला यावेळी दिले.

  • sudhir mungantiwar latest news chandrapur । सुधीरभाऊ आले तर आम्ही सगळे अलर्ट मोडमध्ये – शिवेंद्रसिंहराजे भोसले

    sudhir mungantiwar latest news chandrapur

    sudhir mungantiwar latest news chandrapur : चंद्रपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आधी आपण लंडनला जाऊन बघायचे अन् परत यायचो. ते भारतात आणण्याचे काम आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारा येथे आणली. सातारा ही मराठ्याची राजधानी होती. भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला. नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते, तो त्यांचा अधिकारही होता. पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली. मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला. सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊंबद्दल प्रचंड आदर आहे, असे गोरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुरात ३५५ कार्यक्रम

    राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शनिवारी (२६ जुलै) चंद्रपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ.मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि चंद्रपूरकरांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी आ.मुनगंटीवार परिवाराकडून बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते. sudhir mungantiwar contribution to chandrapur development

    याप्रसंगी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, सौ.सपनाताई मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,राहूल पावडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राऊत,  सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू, डॉ. मंगेश गुलवाडे, अल्काताई आत्राम, किरण बुटले, सविता कांबळे, मीनाताई देशकर, नम्रता ठेमसकर, सर्व तालुका अध्यक्ष, भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ना.शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही सर्व जण राज्यात काम करतोय. त्यांचे स्थान आमच्या सर्वाच्या दृष्टीने फार वरचे आणि महत्वाचे आहे. मी सुधीरभाऊंएवढा दांडगा अभ्यास आणि वक्तृत्व शैली आजवर बघितली नाही. इतिहास आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास, प्रत्येक विषयाची आकडेवारीनिशी अचूक माहिती, हे भाऊंकडे बघूनही शिकणे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. सुधीरभाऊंकडे बघून जेवढे शिकता येईल, तेवढे शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. सुधीरभाऊ कुठल्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या विभागातही गेले. तरी सगळे अलर्ट मोडमध्ये येतात. भाऊंना काहीही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल तेच त्यांना पाहिजे. विधानसभेतही आम्ही बघितलं की सरकारची, मंत्र्यांची चुकही ते दाखवतात, असे ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले. sudhir mungantiwar

    लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. भाजप आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे, आपल्यासाठी नाही तर ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्याप्रमाणे काम झाले पाहिजे. अधिकाऱ्यांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली पहिले शिक्षा समजले जायचे. पण आता उलटं झालं आहे. भाऊंचे नेतृत्व असल्यामुळे विकास वेगाने झाला आहे. हा परिसर आता दुर्लक्षित राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी या परिसराला नवी ओळख दिली. मंत्री झाल्यापासून असं स्वागत अद्याप कुणीही केलं नाही, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. sudhir mungantiwar latest news chandrapur

    मा.सुधीरभाऊंच्या सुचनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते, पूल सर्व कामे मार्गी लाऊ, असे आश्वासन देत त्यांनी आ.मुनगंटीवार यांना सातारा येथे प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले.

    Somayya institute of technology

    यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात पहिली भेट सुधीर मुनगंटीवार यांची घेतल्याबद्दल त्यांच्या नम्रतेचे कौतुक करीत आभार मानले. आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं, हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले. sudhir mungantiwar

    एकच राजा

    श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. महाराजांच्या १३व्या पिढीचा वारसा चालवणारे आहेत. आपण मावळे म्हणून १३व्या पिढीतील शिवभक्त आहोत. ते घरी आल्यामुळे आज अत्यानंद झाला. आपसूक ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष निघत होता. या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की, एक बेशुद्ध व्यक्तीसुद्धा शुद्धीवर येईल. १२ गडकिल्ले युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी इतर देशातील लोक बैठकीत बसले होते. तेव्हा आम्ही छत्रपतींचे वैशिष्ट्य सांगितले. आजवर झालेल्या सर्व राजा महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने वेगळे राजे होऊन गेले. कारण सर्व राजे ‘हे माझे राज्य आहे..’, असे म्हणायचे. पण छत्रपती शिवराय म्हणायचे की ‘हे रयतेचे राज्य आहे..’, असे सांगणारा आणि माननारा हा एकच राजा होऊन गेला, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. sudhir mungantiwar latest news chandrapur

    छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर

    आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला आहे. यासाठी आम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते. छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवरील मातीचा कण अन् कण जगातल्या कुठल्याही धातुपेक्षा महागडा आहे. कारण धातुपासून महागड्या वस्तू बनवता येतील. पण या मातीच्या कणाकणांतून माणूस घडवता येतो. या मातीची किंमत केवळ भारत देशच नाही, तर जगातील सर्वच देश मानतात. आता तर दरवर्षी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सरकारच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराजांनी ज्या वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनख व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझीअमने आपल्याला तीन वर्षांसाठी दिले आहेत. वाघनख येथेच कायम रहावे, हा आपला पुढचा प्रयत्न असणार आहे.  sudhir mungantiwar latest news chandrapur

    शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे महत्वाचे खाते आहे. शिवेंद्रराजे यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत रस्ते आणि टनेल बांधायचे आहेत. छत्रपतींच्या मातोश्री आपल्या विदर्भाच्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर आहे. आजही तेथे त्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. तेथे भव्य शिवसृष्टी उभारली जाते आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.