Tag: रोजगार मेळावा

  • Rishi August ITI Chandrapur job fair । 🎯 2025 ची सुवर्णसंधी! Rishi August ITI चंद्रपूरमध्ये भव्य रोजगार मेळावा!

    Rishi August ITI Chandrapur job fair

    Rishi August ITI Chandrapur job fair : चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट (News३४) : ऋषी अगस्त शासकीय औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे 11 ऑगस्ट 2025  रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून  जिल्ह्यातील जी.एम. आर. इन्फ्रा, साई वर्धा पॉवर, मल्टी ऑरगॅनिक, मल्टी व्ह्यू फायबर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे. PM Apprenticeship Mela Chandrapur 2025

    चंद्रपुरातील एमडीआर मॉल मध्ये बांबू वस्तू विक्री स्टॉल सुरु

             प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या व्दारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्यांची व रोजगाराची संधी उपलब्ध होते. 

    विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धडे मिळतात. प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याअंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य वैभव बोंगिरवार तसेच बीटीआरआय कार्यालयाच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.

              शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन  ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर तसेच बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित  होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी आयटीआयचे गटनिदेशक श्री. टोंगे व बीटीआरआयचे योगेश धवणे यांच्याशी संपर्क साधावा.

  • Pandit Deendayal Upadhyay Employment Fair । 📢 मोबाईलपेक्षा करिअर महत्वाचं! चंद्रपूरातील रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांचा सहभाग

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair : चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मील, कोळसा खाणी, सिमेंट, बांबु  व इतर उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील युवा वर्गाला रोजगार देण्याचा संकल्प उद्योगांनी केला आहे. त्यामुळे युवक – युवतींनीसुध्दा आपल्या गुणवत्तेच्या आधारावर रोजगार मिळवून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. Chandrapur youth job fair 2025

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सरदार पटेल महाविद्यालय आणि मॉडेल करीअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करतांना डॉ. व्यवहारे बोलत होते. मंचावर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, डॉ. जयेश चक्रवर्ती, उपप्राचार्य स्वप्नील माधवशेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन

    आजच्या युवा वर्गाला रोजगार देणे, हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा व इतर सोयीसुविधा प्राप्त करायच्या असेल आणि चांगले जीवन जगायचे असेल तर रोजगाराची आवश्यकता आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. येथील कंपन्यानी युवकांना रोजगार देण्याचा केलेला संकल्प हा अभिनंदनीय आहे. उद्योगांनी आपली निवड केली पाहिजे, ही जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण करा, जेणेकरून कंपन्यांना वाटले पाहिजे की, या तरुण-तरुणीची आपल्या कंपनीला गरज आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली प्रगती झाली तर, आपले कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान राहील, असेही डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले. First stage selection 637 candidates job fair Chandrapur

    प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. मोबाईलचा उपयोग केवळ वेळ वाया घालविण्यासाठी करू नये तर करीअर घडविण्यासाठी करा. प्रत्येकच आई-वडीलांना मुलांकडून चांगल्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तर प्राचार्य डॉ. काटकर म्हणाले, महाविद्यालयात अनेक उपक्रम सुरू असतात. मात्र पदवी मिळाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न आजच्या पिढीसमोर उभा आहे. त्यासाठीच  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व तरुण – तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. Career fair collaboration with Sardar Patel College Chandrapur

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाळे यांनी केले. संचालन डॉ. अनिता मत्ते यांनी तर आभार डॉ. स्वप्नील माधवशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, रोजगार इच्छुक तरुण – तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    637 उमेदवारांची प्राथमिक निवड :

     पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण 1107 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. तसेच सहभागी कंपन्यांनी 1030 रिक्त पदे कळविली होती. यापैकी 637 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

  • campus placement after iti course । 🎯 ITI नंतर थेट नोकरी! कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अनेकांची निवड

    campus placement after iti course

    campus placement after iti course : चंद्रपूर (२७ जून) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

    शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते, आप ने केली कारवाईची मागणी


    कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, चंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंग, धूत ट्रान्समिशन, पटले प्लेसमेंट सर्विसेस, स्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेड, ब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविला. या रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला. iti apprenticeship benefits for students

    विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

    यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिप, त्याचे फायदे, निवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.


    कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केले. यावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळे, मनोज पाटील, श्री. खोब्रागडे तसेच इतर समन्वयक, बीटीआरआयच्या श्रीमती लोखंडे, श्री. महातो तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्री. नंदेश्वर, निमसरकार, चांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • government ITI job mela Chandrapur 2025 । 🔧 चंद्रपुरात आयटीआय जॉब मेळावा; संधी दारात!

    government ITI job mela Chandrapur 2025

    government ITI job mela Chandrapur 2025 : चंद्रपूर २४ जून (News३४) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चंद्रपूर येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय ” शिकाऊ उमेदवार मेळावा तसेच रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.

    रेल्वे भूखंड संपादनात गोंधळ, हंसराज अहिर यांनी सांभाळली बाजू

    उपस्थित राहा

    शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

    अधिक माहितीसाठी योगेश धवणे (9405912096) लोखंडे मॅडम (9423690138) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.

  • Rojgar Melava : चंद्रपुरातील आजचा रोजगार मेळावा रद्द

    Rojgar Melava : चंद्रपुरातील आजचा रोजगार मेळावा रद्द

    rojgar melava मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मिळावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात विविध कारणांनी होणा-या बंदच्या पार्श्वभुमीवर मेळाव्यासाठी येणा-या युवक-युवतींना नाहक त्रास होऊ नये, यासाठी 23 ऑगस्ट रोजी होणारा रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच रोजगार मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत हाणामारी

    उमेदवारांची पात्रता : 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर.  विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/महामंडळ  यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेणे व कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना  फक्त एकाच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल.

    विद्यावेतन: 12 वी पास करीता प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार रुपये याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल.

    अधिक माहिती करीता संपर्क : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय  इमारत, पहिला माळा, चंद्रपूर येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

    जिल्हाधिकारी विनय गौडा काय म्हणतात?

    Rojgar Melava जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शासनाच्या महास्वयंम पोर्टलवर तांत्रिक अडचण आल्याने शासकीय तथा खाजगी आस्थापनांनी उमेदवारांची निवड करतांना शासन निर्णयातील अटी – शर्तीनुसार ऑफलाईन पध्दतीने थेट प्रक्षिणार्थी म्हणून नियुक्ती द्यावी. निवड झालेल्या उमेदवारास प्रशिक्षणाच्या कालावधीत उपस्थितीनुसार शासनामार्फत विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयास तसेच खाजगी आस्थापनांना प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनांच्य निधीची आवश्यकता असणार नाही. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व त्यांची कौशल्यवृध्दी व्हावी, त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

    पुढे ते म्हणाले, शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना एकुण मंजुर पदाच्या 5 टक्के इतक्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी निवड करता येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आपल्या कार्यालयाअंतर्गत प्रशिक्षणार्थी निवडीचे दिलेले उदिष्ट पूर्ण करावे. जेणेकरून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना या योजनांचा फायदा होईल. प्रशिक्षणार्थीना शैक्षणिक पात्रतेनुसार दैनंदिन कामकाज सोपवावे. कुठल्याही प्रकारे त्यांच्या मानसन्मानास धक्का पोहचणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनांमार्फत अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.

  • Mega Job Fair : शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

    Mega Job Fair : शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

    mega job fair चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या संकल्पनेतून २८ जुलैला मुल येथील नवभारत विद्यालयाच्या पटांगणावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.भरपावसात युवक-युवतींची तोबा गर्दी होती.या मेळाव्यात आलेल्या हजारच्या संख्येने युवक युवतींना मुलाखती घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले असून त्यांना आता रोजगार उपलब्ध झाले आहे.

    अवश्य वाचा : पुन्हा पूर, चंद्रपुरातील हा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद

    Mega job fair मुल येथे आयोजीत रोजगार मेळाव्यात देशातील ५० पेक्षा अधिक उद्योग,सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होते.दोन हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या गेले या मुलाखतीत पात्र उमेदवारांची निवड करून तत्काळ नियुक्ती पत्र दिले गेले.साधारण एक हजार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून अनेक दिवसांपासून बेरोजगारीच्या गर्तेत सापडलेल्या शिक्षीत व कुशल युवक युवतींनी शिवसेने कडून आयोजित मेळाव्याचे व जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांचे मनस्वी आभार मानले.

    मेळाव्याला उपस्थित शिवसेना संपर्क प्रमुख तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कदम,कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते,शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अँड.अनिल वैरागडे,गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली सिनेट सदस्य प्रा.दिलीप चौधरी, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डाहाके, सामाजिक कार्यकर्ते नथुजी पाटील आरेकर, मेळाव्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, उपजिल्हाप्रमुख सीक्की यादव, प्रा.शलिक फाले,महिला आघाडी जिल्हा संघटीका कल्पना गोरगाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तालुका प्रमुख प्रशांत गट्टवार,सुरज माडुरवार,राजू ठाकरे,राहुल भोयर, विनय धोबे,नगरसेवक सरफराज शेख,अमित पाझरे,प्रशांत मेश्राम, सागर राऊत, बबु पाठक,नगरसेवक बालाजी मेश्राम,आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात युवकांचा जीवघेणा स्टंट, कार गेली पुरात वाहून

    बल्लारपूर विधानसभेतील शिक्षीत व कुशल युवक युवतींनी शहर व खेड्या पाड्यातून येत मुल येथीलआयोजित रोजगार मेळाव्यात हजेरी लावली होती.भरपावसात सुद्धा मेळाव्यात आलेल्या युवक युवतींचा उत्साह कायम होता.यावेळी इंजिनिअरींग,आयटीआय,कृषी पदवीधर,एमबीए, पदवीधर,दहावी,बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. पुणे,नागपूर,मुंबई,गडचांदुर, चंद्रपू र,औरंगाबाद,येथील नामवंत कंपनीकडून मुलाकात घेऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांनी आयोजकांचे आभार मानले व बेरोजगारांच्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचा विश्वास यावेळी बोलून दाखवला.
    बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुल येथील रोजगार मेळावा हि सुरूवात आहे.बेरोजगारांच्या हितासाठी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव तत्पर रहाणार आहे.यापुढेही यासारखे रोजगार मेळावे आयोजित केल्या जातील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी यावेळी बोलून दाखवला.

    उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी केल्या गेले होते. क्यूआर कोडद्वारा उमेदवारानी नोंदणी फॉर्म भरला होता.रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती.