Tag: राष्ट्रीय ओबीसी महासंघ

  • OBC community : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची संवाद बैठक

    OBC community : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची संवाद बैठक

    OBC community ४ ते ९ऑक्टोबर दरम्यान विदर्भातील जिल्हात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका, विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४आक्टो. ला गडचिरोलीपासून सुरू होऊन ९ ऑक्टोबर ला नागपुरात समारोप

    OBC community नागपूर : केंद्र व राज्य शासनाने गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या निर्णयांची माहिती देणे. २४ सप्टेंबर २०२४रोजी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४ऑक्टोबर ते ९ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती अजूनही समाजापर्यंत पोहोचलेली नाही. ही माहिती संवाद सभेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.२४सप्टेंबर २०२४ रोजी च्या परिपत्रका मुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानले जातील.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात राज्यपाल येणार पण हे मार्ग असणार बंद

    संवाद सभा गडचिरोली जिल्ह्यातून ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर करणार असून, गोदिया, भंडारा, वर्धा, खामगाव, वाशीम, यवतमाळ, वणी, चिमूर मार्गे ९ ऑक्टोबरला नागपुरात समारोप होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आता पर्यंत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला ,ज्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ओबीसी मुद्द्याचे समर्थन केले जाईल, त्या पक्षांचे ओबीसी महासंघ स्वागत करेल. OBC community


    डॉ तायवाडे म्हणाले की, महासंघ संविधानाच्या मर्यादेत राहून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारशी लढा देत आहे. यापुढील काळातही संघर्ष सुरूच राहणार आहे. जात जनगणना हा आपला मुख्य मुद्दा आहे. आता देशातील विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहेत. Reservation

    महत्त्वाचे : चंद्रपुरात आता अदानी देणार शिक्षणाचे धडे

    हे ओबीसींसाठी हे चांगले लक्षण आहे. ओबीसी कोट्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून कधीच आरक्षण मिळू शकत नाही. ते म्हणाले की, महासंघात सर्व राजकीय पक्षांचे सदस्य समाविष्ट आहेत. सर्वांना या संवाद यात्रेत आमंत्रित केले आहे.ज्या राजकीय पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख जाहीरनाम्यात ओबीसींच्या हिताचे मुद्दे असतील त्या पक्षासोबत ओबीसी समाज राहील.

    सभेला शाम लेडे, प्रकाश साबळे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, गुनेश्वर आरिकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोगे ,सुषमा भड, ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, रेखाताई बाराहाते,, उपस्थित होते, या सभेला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, लातुर, हिंगोली,जालना, गोंदिया, भंडारा, याठीकानाहुन प्रमुख, महिला ,युवक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन रुषभ राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार निलेश कोडे यांनी केले, बैठकीच्या यशस्वते साठी, प्रा, शिंदे,विजय डवांगे ,राजू चौधरी, रामदास कामडी ,विजय पिनाटे, प्रा. उमेश शिंजनगुडे,राहुल, लक्षे, मांगे सर, भाऊ, आसुटकर, कवडू लोहकरे,विनोद हजारे, दिलीप हरणे, सूरज बेलोकर, राहुल भांडेकर,रुपेश राऊत, घनश्याम अकोले, आणि इतरांनी सहकार्य केले.

  • Obc Hostel : ओबीसी वस्तीगृहांना डॉ.पंजाबराव देशमुख यांचं नाव

    Obc Hostel : ओबीसी वस्तीगृहांना डॉ.पंजाबराव देशमुख यांचं नाव

    obc hostel महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वस्तगृहांना डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे-राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी

    Obc hostel दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी ५-००वाजता , देवगिरी वर झालेल्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी , राज्यातील ओबीसी वस्तगृहांना भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याचे अभिवचन दिले.


    या बैठकीत प्रश्नांची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्याचे २९सप्टे.२३च्या बैठकीत आश्वासन दिले होते. त्याच मुद्दाला धरुन सुरुवात केली. तसेच केंद्र सरकारने ५०%ची अट शिथिल करण्यसंबधाने राज्य सरकारचे धोरण काय या बाबतीत पाठपुरावा करीत आहोत. शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी ८लाख रु ची अट, तसेच नॉनक्रीमीलेअरची अट या दोन्ही अटी ऐवजी फक्त नानक्रीमीलेअरची अट तेवढी ठेवण्यात यावी यावर अर्थमंत्रालयाकडुन अहवाल आल्यानंतर फक्त एकच अट ठेवण्यात येईल असे सांगितले. या शिवाय ओबीसी वसतीगृहाच्या बाबत जो वेळकाढूपणा सुरू आहे त्यावर लवकर कार्यवाही करण्यात यावी, विद्यार्थी वर्गाच्या भावना तीव्र झाल्या आहेत असे सचिन राजूरकर ह्यांनी सांगितले.

    Obc hostel तसेच ज्या अधिकार्यांचे निलंबन केले आहे त्यांना पुर्वव्रत कामावर रुजू करण्यात यावे ही सुध्दा मागणी लावून धरली. महात्मा फुल्यांचे समग्र साहित्य ५०रु मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, मुलांना सुध्दा १००% शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेऊन जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याची संख्या ७५वरुन १००करण्यात यावी खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती बंद करून स्पर्धा परीक्षा घेऊन कायम स्वरुपी भर्ती करण्यात यावी. या शिवाय ओबीसींच्या अनेक समस्यांना हात घालून त्या लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे असे सर्वांनी सांगितले.

    या बैठकीत महासंघाचे महासचिव सचीन राजुरकर, समन्वयक डॉ अशोक जिवतोडे,सहसचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्षा सुषमा भड, कार्याध्यक्षा डॉ शरयु तायवाडे, अँड रेखाताई बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, चंद्रपूर येथुन दिनेश चोखारे, प्रा. कुकडे,, अमरावती प्रकाश साबळे, अध्यक्ष कीसान महासंघ,, बुलढाणा विजय ढवंगे,बेलोकार, गोंदिया बबलू कटरे, परमेश्वर राऊत, शकील पटेल, राजु चौधरी, विजय पिदूरकर उमेश शिजनगुडे, संजय मत्ते, सुरेश भांडेकर, दादाजी चुधरी शशिकांत वैद्य, विष्णू इतनकर, डॉ राजेश्वर उकारे अरविंद इंगोले, प्रवीण तायडे, सविता भेदरकर, प्रवीण वानखेडे, गणेश आवारी, दीनदयाळ दमाये, डॉ रामलाल गहाने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, अकोला,भंडारा, गडचिरोली, वर्धा, येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे व इतर ओबीसी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.बैठक यशस्वीपणे पार पडली,पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे सांगण्यात आले.

  • OBC : पंजाब येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे अधिवेशन

    OBC : पंजाब येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे अधिवेशन

    OBC राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी ५० टक्क्यांची अट रद्द करा यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल. समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर भाजपचा विजय होणार

    OBC अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब विधानसभेचे उपसभापती जय क्रिष्ण सिंग, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातील ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, गोव्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, क्रिकेटपटू तथा राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान, वर्ध्याचे खासदार अमर काळे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार डॉ. शोभा बच्चाव, खासदार संजय देशमुख, खासदार बाळू मामा म्हात्रे, तेलंगानाचे खासदार इटेला राजेंदर, तेलंगानाचे सदस्य रविचंद्र वड्डीराजू, तेलंगानाचे खासदार सुरेश शेटकर, पंजाबमधील ‘आप’चे आमदार संतोष कटारिया, पंजाबमधील ‘आप’चे आमदार तरणप्रित सिंग सोंड, हरयाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, माजी मंत्री महादेवराव जानकर, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, सेवानिवृत्त अधिकारी अशोक बाथ यांची प्रमुख उपस्थित राहील.

    14 ऑगस्टला मनपा अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण


    Obc माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग हे उद्घाटन सत्राचे स्वागतपर भाषण करतील. अधिवेशनामागची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मांडतील. या दरम्यान मान्यवाराच्या हस्ते लढा संविधानिक हक्काचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे या नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षीय भाषण करतील.
    दुपारी ३ वाजता होणाऱ्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी तेलंगाना आणि आंध्र प्रदेश बीसी वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जाजूला श्रीनिवास गौड राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून अमृतसर पूर्वचे आमदार जीवनजोत कौर, माजी खासदार तथा अभिनेते राज बब्बर, माजी खासदार इम्तियाज जलील सय्यद, पंजाबचे माजी मंत्री लाल सिंग कम्बोज, पंजाबमधील अंजालाचे माजी आमदार अमरपाल सिंग बोनी, पंजाबमधील भाजपचे माजी आमदार डॉ. राम कुमार, बॅकफिनो आणि एसजीपीसी मीबरचे उपाध्यक्ष बावा सिंग गुमनपुरा, पंजाबमधील वन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष राजिंदर बिट्टा, पंजाबमधील माजी मंत्री संगत सिंग गिलिजिआन, पंजाबचे माजी आमदार हरजिंदर सिंग ठेकेदार, पंजाबमधील माजी आमदार दर्शन लाल मांगूपूर, ‘पीईडीए’चे अध्यक्ष एच. एस. हंसपाल, पंजाबमधील उद्योजक हरचरण सिंग रनौता, अमृतसरमधील उद्योजक राजिंदर सिंग सफर, पंजाबमधील बसपचे माजी अध्यक्ष सी.डी. सिंग कम्बोज, पंजाबमधील सैनी कल्याण बोर्डाचे माजी उपाध्यक्ष डॉ. गुरुनाम सिंग सैनी, पंजाबमधील सैनी कल्याण बोर्डाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंग बासेरके, पंजाबमधील ‘एसजीपीसी’चे सदस्य राम सिंग, पंजाबमधील प्रजापती कल्याण बोर्डाचे उपाध्यक्ष अमरजित सिंग निज्जर, गुरू नानक देव विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतपाल सिंग सोखी यांची प्रमुख उपस्थिी राहणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषरावं येलेकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे यांनी केले आहे

  • Chandrapur News: ते राजपत्र रद्द करा, जातनिहाय जनगणना करा – सचिन राजूरकर

    Chandrapur News: ते राजपत्र रद्द करा, जातनिहाय जनगणना करा – सचिन राजूरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचना मध्ये बरेच बदल केली आहे व ओबीसी ( विजा , भज, व विमाप्र ) अनुसूचित जाती/ जमाती, इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 ला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, विजा, भज व विमाप्र समजा तर्फे महामोर्चाचे आयोजन केले आहे, मोर्चाची नियोजन बैठक धनोजे समाज सभागृह वडगाव रोड,चंद्रपुर येथे ऍड पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Gazette of Maharashtra Govt

     

    महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम २००० मध्ये बदल कारणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी आणि ओबीसी ( विजा , भज , विमाप्र ) “अनुसूचित जाती /जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे.cast wise census

     

     

    या बेठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,आदिवासी विकास परिषद,आदिवासी संघर्ष कृती समिती(सर्व जमाती व संघटना संलग्नीत), बहुजन समता पर्व व सर्व SC,ST, OBC, VJ ,NT &SBC समाजातील संघटना तर्फे सचिन राजूरकर, डॉ संजय घाटे, नंदू नागरकर, दिनेश चोखारे , अनिल धानोरकर , प्रमोद बोरीकर, जयदीप रोडे,राजेश नायडू, विजय नळे, राजू अडकीने, मनीष चौधरी, दिनेश कष्टी, देवराव सोनपित्तरे, रणजित डवरे,अजय बलकी, योगेश बोबडे, एस बी मटाले , राजू मारांडे, अरुण देऊलकर, निळकंठ पावडे, सुनील आवारी, उमेश काकडे, शाम लेडे ,अशोक बनकर,प्रा सूर्यकांत खणके , प्रा शिंदे सर, रवींद्र टोंगे, प्रमोद बोरीकर, सतीश भिवगडे , कृष्णा मसराम, विनोद ताजने, देवा पाचभाई,मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, स्नेहल चौथाले उपस्थित होते.

  • पतंजलीचे रामदेवबाबा यांचे ओबीसी समाजाबद्दल अपशब्द

    पतंजलीचे रामदेवबाबा यांचे ओबीसी समाजाबद्दल अपशब्द

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागिल काही दिवसांपासून मिडिया मध्ये रामदेव बाबा यांची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्या मध्ये ते स्वतः ला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेतांना, ओबीसी समाजाची ऐसी तैसी उच्चारुण ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे. या त्यांच्या कृत्याला अनुसरून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर रामदेवबाबा यांच्या विरोधात 15 जानेवारीला निदर्शने तसे निषेधाचे आंदोलन करण्यात आले.

     

    ओबीसी समाजाचा अपमान केल्याने रामदेवबाबा यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे, बाबाची दुकानदारी या देशातील ६५% ओबीसी समाजाच्या खरेदी विक्री करून चालत आहे, याचे भान या भांडवलदारी बाबाने राखावयास पाहिजे, समाजामध्ये जाणुनबुजून सामाजिक गतिरोध निर्माण करुन ओबीसी समाजाविषयी अपशब्द बोलणे टाळले पाहिजे, अन्यथा यांच्या दुकानासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल असे सुध्दा आंदोलन दरम्यान सांगण्यात आले. १५ दिवसाचे आत माफी न मागितल्यास आंदोलन उग्र करण्यात येईल.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, गणेश आवारी, डॉ संजय घाटे, कर्मचारी संघटनेचे देवराव दिवसे, प्रदीप पावडे, रजनी मोरे, अजय बलकी, रोशन पचारे, गोविंदा उपरे, विलास भगत, रंगराव पवार, पवन अगदारी, नागेश बोडे, अतुल मोहितकर,नंदू टोंगे, सुरेश विधाते,रणजित पिंपलशेडे, तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर ,दिनेश भोंगडे, भास्कर सोनेकर लखन हिकरे इ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    News34 chandrapur

    नवी दिल्ली/चंद्रपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

     

    बैठकीत, सर्व प्रतिनिधींनी विशेषतः राहुल गांधी यांच्याशी ओबीसींची जातनिहाय प्रगणना, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती लागू करणे यासारख्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी हे प्रश्न सोडवण्याची कटिबद्धता व्यक्त केली. देशातील ओबीसी समाजातील 70 कोटी लोक कर म्हणून जीएसटी भरतात, मात्र त्या तुलनेत त्यांना त्यांचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच हा समाज त्याच जागी अडकून राहिला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व परिस्थितीत ओबीसींची जात जनगणना करण्याचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी याबाबत आपली कटिबद्धता दर्शवली.

     

    बैठकीत विविध राज्यातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली, जी राहुल यांनी लक्षपूर्वक ऐकली. बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही.ईश्‍वारय्या, सामाजिक क्रांती आघाडीचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग यादव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, हंसराज जंगीड , अमेरिका मधून आलेले हरी ईपन्नापली, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक प्राध्यापक अनिल यादव, बीसी वेलफेअर अशोसीएशन तेलंगाणाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, प्रा सुरज मंडल, प्रा सुधानशू ,विभा पटेल, डॉ विजय भास्कर यांच्यासह एकूण देशातील 37 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

  • मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे.

     

    जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

     

    जरांगे हे मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरुवातीपासून या मागणीला विरोध केला. चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. याची दखल घेत सरकारने २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, मुख्य सचिव व ओबीसी संघटनांची बैठक घेतली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार नाही, असे सांगितले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविले होते.

     

    मागण्यापूर्तीच्या अनुषंगाने लेखी पत्रही दिले होते. हे सारे घडत असतानाही जरांगे पाटील आता नवी मागणी करू लागले आहेत. त्यांच्या मागण्यांचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी खुशाल करावी. तसे आरक्षणही लढा देऊन मिळवावे. आमचा विरोध ओबीसींमधून आरक्षणाला आहे. तो अजूनही कायम आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागून आहे. समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातील तथ्यही लवकरच बाहेर येईल. ओबीसी समाज या अहवालातील बाबींकडे लक्ष ठेवून आहे, असेही सचिन राजुरकर यांनी मटले आहे.

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता ओबीसी मंत्री मा. श्री अतुल सावे जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न झाली. संघटनेच्या १० पैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या.

     

    उर्वरीत मागण्यासंबंधीदेखील लवकरच सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची आधार योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक कर्जासंबंधी तरतूद, विश्वकर्मा योजना, महाज्योती योजना यासंबंधीच्या मागण्या सदर बैठकीत मान्य करण्यात आल्या. शिक्षण, उद्योग विश्वास प्रगतीची आस असलेल्या ओबीसी बांधवांकरिता ही मोठी आनंददायी बाब आहे.

     

    या बैठकप्रसंगी माजी मंत्री डॉ परीनय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विद्यार्थी अध्यक्ष श्वृषभ राऊत, परमेश्वर राऊत, रामदास कामडी,श्रीहरी सातपुते, ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे ओबीसी सचिव सौ. वनिता वेद सिंहल, ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    बैठकीनंतर रात्री उशिरा डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते चिमूर येथील दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेले अक्षय लांजेवार , व अजित सुकारे यांच्या अन्नत्याग आंदोलन निम्बु शरबत पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी चिमुरात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोषणाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

  • चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

     

    दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

     

    आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.