Tag: राजुरा विधानसभा

  • Deorao Bhongale latest political move । राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकिय भूकंप, कांग्रेसच्या गडाला भाजपचं खिंडार

    Deorao Bhongale latest political move

    Deorao Bhongale latest political move : चंद्रपूर जिल्हा कांग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाला भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी सुरुंग लावला असून गोंडपिपरी नगरपंचायत मधील कांग्रेसचे सत्ता पालटवत त्याठिकाणी भाजपची सत्ता प्रस्थापित करण्यात आमदार भोंगळे यांना यश मिळाले आहे. BJP strategy in Rajura assembly

    सुधीर मुनगंटीवार यांचं फिरतं जनसंपर्क कार्यालय, नागरिकांच्या समस्येचं निराकरण

    गोंडपिपरी नंतर आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यात मोर्चा वळवीत जिवती नगरपंचायतमधील कांग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार कांग्रेसच्या नगरसेवकांना भाजप पक्षात प्रवेश करीत नगरपंचायत मध्ये भाजपच्या सदस्यसंख्येत वाढ करण्यास यश प्राप्त केले. हा कांग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे, काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार असून त्यापूर्वी भाजप पक्षाने राजुरा विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.

    जिवती नगरपंचायतीचे ५ नगरसेवक भाजपच्या गळाला

    जिवती नगरपंचायतमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पाच नगरसेवक आणि विविध पक्षातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत जिवती शहरात पार पडला. या कार्यक्रमात नगरसेवकांसह देवलागुडा येथील सरपंच आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले.

    जिवती नगरपंचायत मध्ये एकूण १७ सदस्य संख्या असून यामध्ये कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची सत्ता आहे, पूर्वी भाजपचा केवळ एकच सदस्य जिवती नगरपंचायतमध्ये होता मात्र आमदार भोंगळे यांच्या खेळीने नगरसेवकांची संख्या आता ६ वर आली आहे. गोंडवाना गणतंत्र पक्षाचे ५ नगरसेवक असून भाजपच्या या खेळीने कांग्रेस-राष्ट्रवादी अल्पमतात आल्याने नवी युती होणार असल्याची शक्यता आहे. Jiwati BJP membership growth

    आमदार भोंगळे यांनी नवीन सदस्यांचे भाजपच्या दुपट्ट्याने स्वागत केले या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद भक्कम झाली असून, काँग्रेस पक्षाच्या स्थानिक गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    जिवती शहरात पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात सुनीता किशन जाधव सरपंच देवळागुडा, जिवती नगरपंचायतीचे नगरसेवक शामराव लच्छु गेडाम, नगरसेविका अहिल्याबाई केशव मेश्राम, अनुसयाबाई पंढरी राठोड, लियाकत रसूल शेख, अश्विनी विष्णू गुरमे यांचा समावेश आहे.

  • Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

    Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    14 ऑगस्टला अनुकंपा धारकांचे मनपा समोर आमरण उपोषण

    Self defense या उपक्रमाचे प्रशिक्षक सेऩसाई ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॉन कुंदन पेंदोर सर आहेत. सध्या हा उपक्रम गोंडपीपरी मध्ये सुरू करण्यात आला असून लवकरच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे.

    देशात व राज्यात महिला असुरक्षित असल्याचे प्रमाण खूप जास्त आहे, त्याकरिता महिला व मुलींना आत्म रक्षणाचे धडे गिरविणे महत्वाचे आहे, ग्रामीण ते शहर हे प्रमाण सध्या सतत वाढत आहे, हे कुठेतरी थांबायला हवे, जोपर्यंत महिला स्वतःची रक्षा करण्याबाबत जागरूक होणार नाही तोपर्यंत विकृत मानसिकता वाली विक्रुती वाढत जाणार त्याकरिता महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    भारत राष्ट्र समितीने महिला व मुलींच्या हितासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच निरंतर सुरू ठेवावे म्हणजेच गरजू मुलींना याचा लाभ नक्कीच मिळणार. न घाबरता महिला व मुलींनी समाजातील विकृतीचा धाडसपणे सामना करावा अशी इच्छा आयोजकांनी यावेळी व्यक्त केली आहे., करीता महिला व मुलींनी या निःशुल्क शिबिराचा लाभ घ्यायला हवा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की

    News34 chandrapur

    राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत.

     

    ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात यलगार पुकारला. काल पांढरपौनी गावातून भव्य मोर्चा काढत, अवैध दारू बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत राजुरा शहर गाठून पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेराव घातला. येथील अधिकाऱ्यांना गावातील अवैध दारू बंद करण्याचे निवेदन देत पूर्णपणे अवैध दारू बंद करण्यात यावी अन्यथा या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम होऊन पांढरपौनी गावांमध्ये सुरू असलेले जवळपास सर्वच अवैध दारू विक्री केंद्रे तातडीने बंद झालित मात्र ही अवैध दारू बंदी केवळ फार्स ठरते की काय असे वाटायला लागले आहे. कारण गावापासून थोड्याच अंतरावर असलेले बसस्थानक आणि पांढरपौनी साईडिंग येथे मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा वळवला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरूच आहे.

     

    आश्चर्याची बाब म्हणजे आज गावात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतः महिलांनीच पुढाकार घेऊन गस्त वाढवली. या दरम्यान सकाळी १० : ३० च्या सुमारास गावातील एका अवैध दारू विक्रेत्याच्या घरून दारूच्या बाटला पोत्यात भरून बुलेट गाडीवर घेऊन जाणाऱ्या काही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न स्थानिक महिलांनी केला. मात्र या तरुणांनी महिलांच धक्काबुक्की करून पळ काढला. यात एक महिला जखमी झाली आहे. या घटने नंतर गावकर्‍यांनी राजुरा पोलीस ठाण्यात सुचना केली असता संबंधितांनी आपण फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करू शकतो असे सांगितले मात्र पोलिसांकडून तातडीने मदत होत नसल्याने स्थानिक जनतेत कमालीचा असंतोष पहायला मिळत आहे.

     

    यानंतर कुठे माशी शिंकली की काय तासाभरात पोलिसांची जिप्सी गावात आली. दरम्यान पोलीस यायच्या आधी महिलांना एका अवैध दारू विकणाऱ्या महिलेला ग्रामपंचायत मध्ये पकडून ठेवले होते आणि पोलिस आल्यावर अवैध दारू विक्रेत्या महिलेच्या घरात देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटलांचा ढिगच आढळून आला तर काही दारूच्या बाटल्या सापडल्याचेही महिलांनी सांगितले.

     

    पोलीस विभाग आता त्या महिलेसह इतर चार ते पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि पोलीस कारवाई होण्याच्या शक्यतेने सर्व अवैध दारू विक्रेत्यांनी जवळील स्टाक अन्यत्र हलविला तसेच घराशेजारी असलेल्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावली असल्याने पोलिसांच्या हाती फारसे काही सापडले नाही. त्या महिलेच्या घरून बुलेटवर दारू घेऊन जाणारे ते तरूण गडचांदूर येथील असून त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीशी संबध आहे का याचाही शोध घेऊन कठोर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. त्या बुलेटचा नंबरही गावकर्‍यांनी पोलीसांना सांगितल्याचे कळते.

     

    एकंदरीत अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी गावातील महिलांनी चंग बांधला असून महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास त्यांचे मनोबल वाढून येणाऱ्या काळात विरोध करणाऱ्यांपैकी काही निवडक नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची असेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.