Tag: मनसे अधिकृत

  • Aman Andhewar MNS grassroots leadership । अमन अंधेवारांच्या झंझावाती नेतृत्वाखाली 24 कार्यकर्त्यांचा मनसेत भव्य प्रवेश

    Aman Andhewar MNS grassroots leadership

    Aman Andhewar MNS grassroots leadership : चंद्रपूर | जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवसंजीवनी आणणारा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवत तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि तडफदार कार्यशैलीवर प्रभावित होऊन तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

    सणासुदीला हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना

    या पक्ष प्रवेशात विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्ती एकत्र आले. यामध्ये प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी या २४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. MNS Maharashtra organization strength

    या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक ताकद केवळ वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्याचा ठोस परिणाम होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मनसेचा झेंडा आता अधिक वेगाने फडकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

    अमन अंधेवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आज आमच्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू.” mns adhikrut

    पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी घोषणा देत, स्थानिक प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याचा संकल्प केला. रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे ठरविण्यात आले.

    कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

    हा प्रवेश फक्त संख्येचा आकडा वाढवणारा नव्हे, तर तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडले. स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना यानंतर स्पष्ट झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या काळात त्याचा परिणाम निवडणुकीत ठळकपणे दिसेल, अशी शक्यता आहे. Aman Andhewar MNS grassroots leadership

    ही घटना केवळ पक्षासाठी नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल शंका नाही. मनसेच्या झेंड्याखाली नव्या जोमाने आणि नव्या रक्ताने पुढील लढती अधिक तीव्र होतील, हे निश्चित.

  • Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    oyo rooms चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओयो व खाजगी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश बंद करा

    Oyo rooms महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले असून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या आया बहिनींना सुरक्षीत जीवण कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अल्पवयीन मुलीला चॉकलेट खाऊ अशा प्रकारचे आमीश दाखवून राक्षसी वृत्तीचे मानवजातीचे जणावर त्यांच्यावर बळजबरी करतात या प्रकारावर आळा घालण्यासाठी महिला व अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

    अवश्य वाचा : शहराच्या मध्यभागी जेव्हा बिबट येतो

    नुकत्याच झालेल्या घटना या ओयो हॉटेल मध्ये घडल्या असुन यावर वेळीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करून अल्पवयीन मूलामुलींना प्रवेश बंदि करावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असुन याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल.

    चंद्रपुरात बिबट्या

    या निवेदनावर अतिरिक्त पोलीस अधिक्षक जनबंधू मॅडम यांनी सकारात्मक उत्तर देत सांगितले की आम्ही लवकरात लवकर ही मोहीम सुरू करू अणि कठोर कारवाई करू अशे आश्वासनं दिले, या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे ,माजी जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई गायकवाड ,माजी नगरसेविका सिमाताई रामेडवार, जिल्हा सचिव अर्चना आमटे, बल्लापुर तालुका अध्यक्ष कल्पना ताई पोतर्लावार, अजय अल्लेवार, मंगेश धोटे, विशाल मत्ते, निक्की यादव, अवधुत मेश्राम, उज्वल तेलतुमडे, शुभम वांढरे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले असुन निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थीत होते.

  • Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी

    Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी

    raj thackeray 22 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपुरातील ND हॉटेलमध्ये दाखल झाले होते, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची बैठकीत चाचपणी केली व चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातून स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरच्या उमेदवारांचे नाव जाहीर होताच बोरकर विरुद्ध भोयर समर्थक आपसात भिडले. यामुळे पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.

    अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाची दावेदारी

    राज्यातील विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढविणार अशी घोषणा मनसे प्रमुख ठाकरे यांनी केली होती, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहे, मराठवाडा दौरा आटोपल्यावर ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, आज राज ठाकरे चंद्रपुरात दाखल झाले होते, जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी चंद्रपूर व राजुरा विधानसभा मनसे लढविणार अशी घोषणा ठाकरे यांनी बैठकीत केली.

    Raj thackeray चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून चंद्रपूर शहर मनसे अध्यक्ष सचिन भोयर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, बैठक आटोपताच राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडताच भोयर समर्थक व बोरकर समर्थक आपसात भिडले.

    अवश्य वाचा : पाण्याचा उपसा करणार तर चंद्रपूर शहरातील नागरिक जाणार काळ्या यादीत

    राजुरा विधानसभा क्षेत्रातून चंद्रप्रकाश बोरकर इच्छुक होते मात्र ऐनवेळी सचिन भोयर यांनी बाजी मारली, बोरकर हे कोरपना तालुक्यातील नांदा ग्राम पंचायत चे सदस्य आहे, त्याठिकाणी बोरकर यांचे चांगले वर्चस्व आहे, त्यांनी मनसे पक्ष त्याठिकाणी वाढविला मात्र ऐनवेळी बाहेरच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यावर कार्यकर्ते नाराज झाले.

    प्रत्येक वेळी स्थानिकांचा मुद्दा राज ठाकरे उपस्थित करतात मात्र आज त्यांनी स्थानिकांना डावलून बाहेरच्याला उमेदवारी दिली ही बाब कार्यकर्त्यांच्या पचनी न पडल्यामुळे आज हा राडा झाला.

    मनसे हाणामारी

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक परिस्थिती बरोबर नसली तरी मनसे प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत या निमित्ताने मोठा डाव खेळला आहे, या पूर्वी चंद्रपूर विधानसभेत मनसे उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, राजुरा विधानसभेत सुद्धा तेच हाल झाले होते, मात्र यंदा च्या निवडणुकीत काय होणार ही येणारी वेळ सांगेल. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत चुरस बघायला मिळणार हे नक्की.

  • toll naka : टोल नाक्यावर धडकली मनसे

    toll naka : टोल नाक्यावर धडकली मनसे

    toll naka सावली:- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाहि तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

    Toll naka टोलनाका व्यवस्थापकाच्या हलगर्जी पनामुळे पंधरा दिवसाआधी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला होता, अशा विपरीत घटणा वारंवार घडु नयेत यासाठी टोलनाक्याजवळ पडलेले खड्डे तास्काळ दुरस्त करूण दुचाकी वाहनाकरीता बाजूने रस्ता उपलब्ध करून द्यावे आठ दिवसात सदर मागणी पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येणार असून याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात टोलनाका व्यवस्थापकाला देण्यात आले आहे.

    मानव वन्यजीव संघर्ष – मूल तालुक्यात वाघाने केली गुराख्याची शिकार

    यावेळी निवेदन देण्यार्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे मनसेचे मूल तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे, शुभम वांढरे, मंगेश धोटे, निक्की यादव, प्रशांत रामटेके, शंकर भडके आणि मनसे तथा मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते.

    टोलनाक्याचे नियम काय?

    राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी टोलनाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच जर त्या टोल नाक्यावर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागू नये, असं नियम सांगतो. जर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागलं तर तुम्ही टोल ने देता तिथून जाऊ शकता. टोल नाक्यावर 100 मीटरहून अधिकची रांग असता कामा नये, असा नियम आहे.

    गोळीबार : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांड प्रकरणात राजकीय कनेक्शन?

    टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी लेन केलेल्या असतात. या प्रत्येक लेनमध्ये सहापेक्षा अधिक वाहनं नसावीत. प्रत्येक टोल नाक्यापासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रंगाची पट्टी असावी. या शिवाय दोन टोलनाक्यांमध्ये 60 किलोमीटर अंतर असावं, असा नियम आहे. आता यात थोडा बदल करण्यात आला आहे. 60 किलोमीटर अंतराच्या परिघात एकच टोलनाका असावा.

    टोल टॅक्स ही देशात कुठेही एक्सप्रेसवे किंवा हायवे वापरण्यासाठी तुम्ही भरलेली रक्कम आहे. सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात गुंतले आहे, ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो. हा खर्च महामार्गांवरून टोल टॅक्स आकारून वसूल केला जातो. विविध शहरे किंवा राज्यांमध्ये प्रवास करताना महामार्ग किंवा एक्सप्रेसवे हा वापरण्यासाठी सोयीस्कर पर्याय आहे. टोलकर दर संपूर्ण भारतातील विविध महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर बदलते. रक्कम रस्त्याच्या अंतरावर आधारित आहे आणि प्रवासी म्हणून, तुम्हाला त्यासाठी जबाबदार राहावे लागेल.

  • Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
    आज 10 ऑगस्टला शहरातील महेश भवन येथे चंद्रपूर मनसेचा विधानसभा मेळावा आयोजित केला होता.
    आयोजित मेळाव्यात मनसे नेते राजू उंबरकर, मनसे प्रवक्ते योगेश चिले, शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील नाकर्तेपणाच्या खड्ड्यात झाला अपघात


    Chandrapur mns यावेळी प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की मनसे चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागेवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आमच्याकडे उमेदवार सुद्धा तयार आहे, लवकरच पूर्व विदर्भात राज साहेब ठाकरे यांचा दौरा होईल, 5 वर्षे सरकार जनतेला आश्वासन देत आहे आता आम्ही मैदानात उतरलो आहे, सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सध्या सुरक्षित बहीण योजना राबविण्यात यावी. बहिणींना सध्या सुरक्षेची गरज आहे.

    राजकीय : चंद्रपूर कांग्रेसचे सेल्फी विद खड्डा स्पर्धा व आंदोलन

    आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे ला फारसे यश मिळाले नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा जागेवर रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, राष्ट्रीय पक्षाना राजूरकर यांनी चांगलाच घाम फोडला होता, मात्र आता रमेश राजूरकर हे भाजप पक्षात गेले असल्याने मनसेला उमेदवारांची वानवा आहे.

    राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभेतील निवडणूक लढविणार्या मनसे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, आता या पार्श्वभूमीवर मनसे 6 जागा लढविणार आहे मात्र उमेदवार कोण आहे? याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 200 ते 225 जागेवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले मात्र ज्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता आहे त्यांना उमेदवारी देणार असे म्हटले होते, मात्र चंद्रपुरात जिंकण्याची शक्यता असलेला उमेदवार सध्या तरी पक्षात नसल्यासारखे चिन्ह आहे, तरीही मनसे प्रयत्न करीत उमेदवार निवडत निवडणूक लढविणार आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

    चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

    News34 chandrapur

    ब्रम्हपुरी – चंद्रपूर येथील सावली तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील कापसी या गावातील भाजप व काँग्रेस मधील शेकडो तरुण, महिला व पुरुषांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात व गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश साळवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेमधे प्रवेश घेतला.

     

    यावेळी शाखाध्यक्ष पदी उमाजी बुरांडे यांची नियुक्ती करण्यात आली सदर शाखेत बापुरावजी गोलेवार, अंकित चलाख, मुकेश बांदेकर, स्वप्नील बांदेकर, सूरज गेडाम, अनिल मेश्राम, श्रावनजी लटारे यांची नियुक्ती करण्यात आली असून यांच्यासह शेकडो महिला, पुरुषांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

     

    सध्या सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून मनसे मधे प्रवेश केल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी दर्शविल्या.
    शाखा स्थापनेवेळी बोलत असताना पक्षवाढीसाठी काम करीत, स्थानिकांच्या प्रश्नांना न्यान मिळवून देत, बलाढ्य राजकारण्यांच्या राजकारण समोर असतानाही पक्ष प्रवेश केल्याचे कौतुक करीत, भविष्यात सर्वसामान्यांसाठी लढण्याचे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले.
    यावेळी मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, करण नायर, मयूर मदणकर उपस्थित होते

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.

     

    धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.

     

    पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.

     

    शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

     

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.

    येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.

  • चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, राहुल बालमवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

     

    भरत गुप्ता यापूर्वी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. दोन वर्षांपूर्वी वाहतूक सेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून त्यांना पदमुक्त करण्यात आले. यानंतरही ते जिल्हाध्यक्ष पदाचा वापर करीत होते. दोन महिन्यापूर्वी प्रदेश नेतृत्वावाने वाहतूक सेनेचे नवे पदाधिकारी जाहीर केले. यानुसार चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या तीन विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा संघटक म्हणून महेश वासलवार यांची तर वरोरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तीन मतदार संघाची जबाबदारी उमेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

     

    मात्र, भरत गुप्ता समाजमाध्यमे तसेच होर्डिंग्जवर स्वत:चा उल्लेख मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष असा करीत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, गुप्ता केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते जिल्ह्यात कोणत्याही पदावर नाही, असे बालमवार आणि रोडे यांनी स्पष्ट केले.

     

    यानंतरही त्यांच्याकडून अनधिकृतपणे पदाचा गैरवापर होत राहिल्यास वरिष्ठांकडे तक्रार करू अशी माहिती अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला महेश वासलवार, उमेश तिवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.