Tag: जुनी पेन्शन योजना

  • Implement the old pension scheme |अनुकंपा कर्मचाऱ्यांवर अन्याय! जुनी पेन्शन योजना लागू होणार का?

    Implement the old pension scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र 

    Implement the old pension scheme : चंद्रपूर: अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (शुक्रवार, १४ जून २०२५)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका महत्त्वाच्या पत्राद्वारे (पत्र क्र. ५४३/२०२५)  केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

    या पत्रात खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे यांची उपस्थिती होती. (Old Pension Scheme for Compassionate Appointment Cases)

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, ०२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना देण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. हे सर्व कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने अनुकंपा धारकांसाठीच्या धोरणाचा शासन निर्णय काढताना या महत्त्वाच्या बाबीचा विचार केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. government decision on OPS for compassionate employees 2025

    चंद्रपूर जिल्ह्यात वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण, शेतकऱ्याचा मृत्यू

    अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करा

    त्यामुळे, केंद्र शासनाने त्यांच्या अनुकंपा धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सक्षम अधिकारी मार्फत सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर निवड झालेल्या अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी शिफारस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अनुकंपा कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी रास्त असून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • Old Pension : जुनी पेन्शन योजना सुरू होणार? खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    Old Pension : जुनी पेन्शन योजना सुरू होणार? खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    Old Pension खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध मागन्या संदर्भात शासनाकडे चर्चा करुन प्रसंगी अनेक वेळा आमदार असतांना विधानसभेत तर आता लोकसभेत मागणी केली त्यापैकी शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन च्या मागणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करुन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 95 नागरिकांनी केली कॅन्सर वर केली मात

    Old pension चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकभिमुख अनेक मागण्या शासन दरबारी केल्या होत्या. त्यासंदर्भात शासनाने अनेक मागण्यांची पुर्तता देखील केली होती. प्रतिभा धानोरकर आमदार असतांना विधानसभेत शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी याकरीता विधानसभेत प्रश्न उचलून धरला होता. लोकसभेत देखील पहिल्याच अर्थसंकल्पीया भाषणा दरम्यान त्यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात आवाज उठविला होता. त्यांच्या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांसंदर्भात शासनाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार समावेशित समिती स्थापन केली आहे.

    कोटपा कायद्यात अडकले चंद्रपुरातील शासकीय कर्मचारी

    हि समिती जुनी पेन्शन लागू केल्यास शासनावर किती आर्थीक भार येणार या संदर्भात अभ्यास करुन शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील निवडणूका लक्षात घेता ही समिती स्थापन केली का? असा देखील प्रश्न या निमित्त्याने शिक्षकांना पडला आहे. परंतु खासदार धानोरकर यांनी या निर्णयाचे स्वागत करीत समिती या संदर्भात लवकर अहवाल सादर करुन 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आशा व्यक्त केली आहे.

  • Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा ‘व्होट फॉर ओपीएस’ नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. Old pension scheme

     

    आतापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्‍या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे. तो अहवाल अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मध्ये सभागृहात सादर करून राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, असेही निवदेनात म्‍हटले आहे. Retirement plan

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्‍यान १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने राज्‍यातील कर्मचारी सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्‍यान सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्‍मक असल्‍याचे सभागृहात म्‍हटले होते. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई काढण्यात येत असलेल्‍या संकल्प पदयात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक-कर्मचारी सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. financial security

    कर्मचाऱ्यांत वाढता असंतोष बघता सरकारने राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्‍काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.  Government employee

  • सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना लागू करणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काॅंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे.

     

    आगामी काळात राज्यात आमची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

     

    यावेळी मंचावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनीष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या ९ कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडला. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा आमचाच असून सत्तेत येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. असे वचनही या प्रसंगी त्यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्निग्धा कांबळे यांनी केले. तर सुत्रसंचलन डांगे यांनी केले.

     

    महिला कर्मचाऱ्यांनी बांधल्या राख्या…

    मेळाव्यात राज्य जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना राख्या बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती केली.

    मी तुमच्या संघर्षात पुढे राहील…

    जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्या संघर्षात मी खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहिल. असे अभिवचन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले.

  • शिक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात होणार भव्य आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    राज्य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती व शासकीय शाळा खासगी संस्था / कंपन्यांना देण्याचा डाव आखला आहे. देशाचं भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्रात सरकारने केलेल्या खासगीकरणाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जनआंदोलन उभारणे आवश्यक आहे. या आंदोलनाबाबत नियोजन सभा नुकतीच मातोश्री विद्यालय, तुकुम चंद्रपूर येथे पार पडली.

     

    “आरक्षण अप्रत्यक्षरित्या संपविण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने आखला आहे” तो हाणून पाडण्यासाठी उभारण्यात येत असलेले जनआंदोलन एक लोक चळवळ व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी असताना सरकार दत्तक शाळा योजना राबवित आहे. यामुळे भविष्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, यामुळे आपण सुजाण नागरिक म्हणून जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.

     

    सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई पोटदुखे, गजाननराव गावंडे, जगदीश जुनघरी, नंदू नागरकर, सुरेश पचारे, मनदीप रोडे, पप्पू देशमुख, प्रा. दिलीप चौधरी, बळीराज धोटे, गंगाधर वैद्य, प्रा. निलेश बेलखेडे, दीपक जेऊरकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, हरीश ससनकर, रामराव हरडे, महादेव पिंपळकर, नागेश सुखदेवे, कोटेवार, वाढई, आसुटकर, बिजवे, नामदेव मोरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेला जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त करीत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा प्रखर विरोध केला.

     

    २ ते ५ ऑक्टोंबरदरम्यान आंदोलनातील मागण्यांचे निवेदन आपआपल्या संस्था/ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना पाठवावे. त्यानंतर सर्वांनी ६ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले, डॉ. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके व विविध संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.