Tag: अमृत योजना

  • road construction issues । आधी काम मग खोदकाम, आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    road construction issues

    road construction issues : चंद्रपूर – शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह पाहणी केली. शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खोदलेले रस्ते दुरुस्ती झाल्याशिवाय नवीण खोदकाम न करण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी अधिका-यांना दिले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

              यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रविंद्र हजारे, एमजीपीचे कापसे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरणे, दिवाकर पूटड्डवार यांच्यासह कंत्राटदारांची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याशिवाय पुढील कोणतेही खोदकाम सुरू करू नये. नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आधी खोदलेले आणि निकृष्ट अवस्थेत असलेले रस्ते तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही निर्देश दिले. amrut scheme urban

    नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

     रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे लोट, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यात होणारे चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कामे करताना जनतेचा त्रास कमी करण्याचे कर्तव्य प्रशासनाचे आहे. नागरिकांनीही जर डागडुजी न झाल्यास अशा नवीन खोदकामाला विरोध करावा असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित ही कामे महत्त्वाची असली तरी त्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. कामांची गुणवत्ता, वेळेत होणारी दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापन या सर्व बाबींवर लक्ष ठेवले जाईल, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवरी कॉलरी, महाकाली कॉलरी परिसरासह शहरातील इतर भागांची पाहणी केली

  • BJP political stunt water supply । अमृत योजना अपूर्ण, भाजपचा नवा शो सुरु – काँग्रेसचा सडेतोड हल्लाबोल!

    BJP political stunt water supply

    BJP political stunt water supply : चंद्रपूर | केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी  केली आहे. BJP failure in urban development

    विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू, महावितरणचा हलगर्जीपणा

    चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला. AMRUT scheme implementation issues

    आमदार अपक्ष असताना फक्त घोषणा आणि आता


    चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे.  हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.

    प्रसिद्धीसाठी निवेदन

    चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.

  • city roads damaged by amrut scheme work । 🛑 अमृत योजनेत खड्ड्यांचे साम्राज्य! रस्त्यांच्या दुरावस्थेवर भाजप आक्रमक

    city roads damaged by amrut scheme work

    city roads damaged by amrut scheme work : चंद्रपूर – अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्यासाठी विविध भागांत मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु हे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याने संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, नागरिकांचे जीव धोक्यात आले असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अमृत 2.0 योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था दुरुस्ती होईपर्यंत काम थांबवावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. road damage due to pipeline work

    चंद्रपुरात वाळू माफियांची मुजोरी, थेट तहसीलदार समोरच…

                  आज भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, माजी नगर सेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, राजेंद्र खांडेकर, दिनकर सोमलकर, राकेश बोमनवार, शेखर शेट्टी, रंजन ठाकूर, अ‍ॅड. हरीश मंचलवार, गणेश रासपायले, विजय चव्हाण, मुकेश गाडगे, मंगेश अहिरकर, चंदा ईटनकर, दुर्गा वैरागडे, विमल कातकर,  छाया सातपुते, अनीज दीक्षित, शीतल रंगदळ, छाया चवरे, रेशमा पांडे, मंजू टोरे, अंजू मोडपल्लीवार, विनोद पेंडलीवार आदींची उपस्थिती होती.

    शहरातील रस्ते धोकादायक

                शहरातील रस्ते सध्या अत्यंत धोकादायक झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा सुरु झाला असताना काम पूर्ण न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कंत्राटदारांकडून कामे अत्यंत संथगतीने व निष्काळजीपणे सुरू आहेत. पावसाचा जोर वाढल्यास खोदलेले रस्ते अधिकच खराब होतील, जलसंचयन होईल आणि अपघातांचा धोका वाढेल. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. demand to stop amrut 2.0 work temporarily

    ही बाब लक्षात घेता, जेवढी रस्ते खोदली आहेत त्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होईपर्यंत पुढील काम थांबवावे, अशी स्पष्ट मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या कामांसाठी आवश्यक निधी आधीच मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याच निधीतून रस्त्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chanda fort station heritage design features । ‘अमृत भारत योजना’तून चांदाफोर्ट स्थानकाचा कायापालट – 116 वर्षांचा इतिहास पुन्हा उजळला!

    Chanda fort station heritage design features

    Chanda fort station heritage design features : चंद्रपूर : भारत सरकारने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत 22 मे 2025 रोजी देशभरातील 103 स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

    या राष्ट्रीय कार्यक्रमात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवाडी, डोंगरगड, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, चांदाफोर्ट व आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.

    माझ्या बाळाचा जीव वाचवा, चंद्रपुरातील ४ महिन्याच्या बालकाला आहे उपचाराची गरज

    चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा इतिहास व विकास:

    महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानक गोंदिया–नागभीड–बल्हारशाह या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर स्थित आहे. या स्थानकाची स्थापना इ.स. 1908 मध्ये झाली असून, 1999 मध्ये ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व 2018 मध्ये विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. हे स्थानक कृषिप्रधान भागात असून, प्रवाशांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. Amrit Bharat Scheme Chandafort station inauguration

    chanda fort

    अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत चांदाफोर्ट स्थानकाचा 19.3 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश स्थानकाचा कायापालट करून ते आधुनिक, प्रवासी अनुकूल व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केंद्रात रूपांतरित करणे आहे.

    करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा व सुविधा:

    पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण-उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – चांदाफोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत, ‘खुर्दा पॅटर्न’नुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट व एस्केलेटर (दुसऱ्या टप्प्यात) – सुलभ प्रवासासाठी, कोळसा उद्योग व गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, 12 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन इत्यादी. Chandafort station redevelopment cost and features

    स्थानकांची वैशिष्ट्ये :

    या स्थानकाच्या नव्या रचनेत चांदाफोर्ट किल्ल्याच्या स्थापत्यशैलीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये झरोखे, बुर्ज, बलुआ दगडाची रंगसंगती व पारंपरिक सजावट यांचा समावेश असून, स्थानिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे उत्कृष्ट मिश्रण येथे पाहायला मिळते.

    Powered by myUpchar

    नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती दिली की, चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा हा कायापालट स्थानिक इतिहास, वारसा व आधुनिक सुविधा यांची सांगड घालणारा आहे. हा विकास केवळ रेल्वे विभागासाठी नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व परिसरातील नागरिक व पर्यटकांसाठीही अभिमानाची बाब ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या स्थानकाचे लोकार्पण होईल, तेव्हा चांदाफोर्ट रेल्वे स्थानक हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे व तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणून उभे राहील.

  • amrut scheme water supply problems । अमृत योजनेचा फटका; पाणी नाही, जनता आहे त्रस्त!, आपने दिला आंदोलनांचा इशारा

    amrut scheme water supply problems

    amrut scheme water supply problems : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर प्रभागात पाण्याच्या तीव्र टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, अमृत योजनेअंतर्गत पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला जोरदार हाक दिली आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने जनतेचे हाल सुरू असून, मूलभूत सुविधेसाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

    पडोली मध्ये १ कोटी रुपयांची आधुनिक अभ्यासिका

    या गंभीर परिस्थितीबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. “स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्याकडून बाबुपेठ वर वीज पाण्याची सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे, प्रशासकीय अधिकारीही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप राजू कुडे यांनी केला आहे. aam aadmi party water protest

    तर तीव्र आंदोलन करणार

    राजू कुडे पुढे म्हणाले, “अमृत योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना एक थेंब पाणी मिळत नाही. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे.” त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र विधानसभेत चंद्रपूर महानगरपालिकेतील ९० टक्के अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु या वक्तव्यानंतरही प्रत्यक्षात आंबेडकर नगरसारख्या भागात नागरिकांना एका थेंब पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही बाब खेदजनक आणि खोट्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे.

    Powered by myUpchar

    स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाण्याविना रोजचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या टंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.

    आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, याकडे आता जनतेचे लक्ष्य लागले आहे.

  • चंद्रपुरातील अमृत योजनेच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका – हंसराज अहिर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अमृतजल नळ पाणी पुरवठा योजना ही मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी योजना असतांनाही चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व नियोजनशुन्यतेमुळे 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणारी ही योजना अजुनही भरकटत असून लोकांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित दोषी कन्सट्रक्शन कंपनी व मालकाला संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या संदर्भात घेतलेल्या समिक्षा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

    सदर योजनेबाबत महानगरातील मागासवर्गीय, दलित नागरीकांच्या तसेच भाजप पदाधिकारी खुशाल बोन्डे , विनोद शेरकी यांचेकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

     

    या तक्रारींची दखल घेवून हंसराज अहीर यांनी दि. 15 सप्टें. 2023 रोजी शासकीय विश्रामगृहात मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची याप्रश्नी समिक्षा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मजीप्रा चे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी, मुख्य अभियंता महेश बारई, उपअभियंता बोरीकर, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजु घरोटे, रविंद्र गुरनुले उपस्थित होते.

     

    अमृतचे कार्य करणाऱ्या संतोष कन्सट्रक्शन कंपनीने या कामात प्रचंड घोळ करीत कामे पुर्ण न करता पैसे घेवून पळ काढल्याने या योजनेवर 240 करोड खर्ची घालुनही लोकांना पाणी मिळत नाही ही अत्यंत गंभीर बाब असून या महा. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे अहीर यांनी म्हटले. कामाची प्रगती, गुणवत्ता तपासणी न करता मजीप्राच्या शिफारसीने तत्कालीन मनपा आयुक्तांनी अपूर्ण काम व योजना पुर्णत्वास न गेली असतांना कंत्राटदाराला अपूर्ण कामाचे व आगावू रक्कम दिल्याची बाब उघडकीस आली असून हा प्रकार अक्षम्य आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारास त्वरीत काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. या विषयी पुढील महिण्यात या योजनेसंदर्भात जनसुनावणी घेण्यात येणार असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगीतले.

     

    सुरूवातीला सदर योजना 2019 पर्यंत पुर्णत्वास जाण्याचा करार होता. मात्र शासनाने या करारास 2 वर्षे मुदतवाढ दिल्याने ही योजना 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणे अपेक्षीत असतांना हे काम वेळेत पुर्ण करून घेण्यास असमर्थ ठरल्याचे अधिकाऱ्यांनी समिक्षा बैठकीत मान्य केले. त्यावेळी अहीर यांनी नाराजी व्यक्त करतांनाच अधिकाऱ्यांनी कंपनीला अप्रत्यक्षपणे सहकार्यच केल्याचे अहीर यांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. त्यांनी योजनेविषयी गंभीर स्वरूपाच्या अनेक बाबींवर भाष्य करीत सदर कंपनीला तातडीने बोलावून काम पूर्ण करण्याच्या सुचना कराव्या अन्यथा पोलिस तक्रार करावी, अतिरिक्त दंडाची आकारणी करावी, आगावू अदा केलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. संतोष कन्सट्रक्शन कंपनीच्या विषयात अडकून न पडता सदर योजना कशी मार्गी लावता येईल याविषयी नियोजन करण्याची सुचनाही अहीर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

     

    उपस्थित नगरसेवकांनीही यावेळी त्यांच्या भागातील तक्रारींचा पाढा वाचला. बैठकिस नगरसेवक राजेंद्र अडपेवार, जयश्रीताई जुमडे, शाम कनकम, मायाताई उईके, प्रदिप किरमे, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवी आसवाणी, कल्पनाताई बगुलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, पूनम तिवारी, महेंद्र जुमडे, सुभाष आदमने, नकुल आचार्य उपस्थित होते.