Tag: तोतया पोलीस

  • fake cops extortion case । 🧠 चंद्रपुरात बोगस पत्रकार ते बनावट पोलीस – टोळीचा गुन्हेगारीचा डबल रोल उघड!

    fake cops extortion case

    fake cops extortion case : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा खनिज संपत्तीने संपन्न जिल्हा आहे, मात्र याठिकाणी संपन्न संपत्तीवर अनेकांच्या नजरा जडलेल्या आहे, त्या वक्रदृष्टीवर नजर टाकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात काम चंद्रपूर पोलीस पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे करीत आहे.

    अल्युमिनियम तार चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

    पोलिसांचे भरारी पथक असल्याचे भासवीत लोकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळक्याला मूल पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे कधी पोलीस तर कधी पत्रकार बनत हा खंडणीचा खेळ हे टोळकं खेळत होत मात्र पोलिसांनी आपला डाव साधत त्या टोळक्याला जेरबंद केले.

    ३ जुलै रोजी चिरोली गावातील ३६ वर्षीय सुरेश लक्ष्मण गनमेनवार यांच्या घरी पांढऱ्या रंगाची अर्टिगा वाहन क्रमांक MH३४ CJ५८२४ येऊन धडकली व आम्ही पोलीस भरारी पथक चंद्रपूर आहो असे म्हणत त्यांच्या घरी मिळून आलेल्या विना परवाना दारूवर कारवाई करण्याचा धाक दाखवीत १५ हजार रुपयांची मागणी केली तडजोडीअंती १० हजार रुपये देण्यात आले.

    मौजा डोंगरगाव येथील एजाज शेख इब्राहिम शेख यांच्या अंडा आम्लेट दुकानात काही व्यक्ती हे दारू पीत होते, त्याठिकाणी हे पोलीस भरारी पथक धडकले व कारवाई करण्याचा धाक दाखवीत १० हजार रुपये द्या अन्यथा आत टाकू अशी धमकी दिली. तडजोडीअंती त्या भरारी पथकाला ५ हजार रुपये देण्यात आले. याबाबत १३ जुलै रोजी मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा त्या पोलीस पाठकविरोधात दाखल करण्यात आला. Criminals arrested and assets seized in extortion case

    यापूर्वी मूल तालुक्यात गुन्हे शाखेच्या पथकाच्या नावाने काही युवकांनी खंडणी वसूल केली होती, पुन्हा असा प्रकार घडत असल्याने पोलिसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली, पोलिसांनी याबाबत कसून तपास करीत या प्रकरणात ३६ वर्षीय बादल दुर्गाप्रसाद दुबे, २७ वर्षीय संगीता बादल दुबे दोन्ही राहणार साकोली जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम भिवापूर वार्ड चंद्रपूर, ३१ वर्षीय अजय विजय उईके राहणार गजानन मंदिर रॉड शीतला माता मंदिरच्या मागे चंद्रपूर, ३० वर्षीय देवेंद्र चरणदास सोनवणे राहणार साकोली जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम भिवापूर वॉर्ड चंद्रपूर यांना अटक केली असून आरोपीजवळून ३ मोबाईल, व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. fake reporters threatening locals for money

    विशेष बाब म्हणजे बादल व संगीता हे दोघे पती-पत्नी आहे, काही महिन्यापूर्वी चंद्रपुरातील कहाणी बोगस पत्रकार भंडारा जिल्ह्यात रेती व्यावसायिकाकडून खंडणी मागायला गेले होते त्यावेळी स्थानिकांनी त्यांचा व्हिडीओ शूट केला होता, त्याठिकाणी बादल दुबे तिथे होता.

    चंद्रपुरात ज्यांना वाचता, लिहता विशेष म्हणजे बरोबर बोलता येत नाही ते अडाणी लोक आज पत्रकार बनले आहे, पत्रकारितेचे नियम व कायदे काय याबाबत कसलंही ज्ञान या लोकांना नाही निव्वळ पत्रकार सांगून खंडणी वसूल करायची हा प्रकार सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु आहे. Criminal background of fake journalists,

    कसं काम करत हे बोगस नेटवर्क?

    भाड्याने चारचाकी वाहन करायचं व सोबत एक दोन जोडीदार, त्यांना पोलीस किंवा सहज उपलब्ध असलेले पत्रकाराचे ओळखपत्र देत पुढचा प्रवास वाळू घाट, सट्टा व इतर व्यावसायिकांकडे जात त्यांना कायद्याचा धाक दाखवीत खंडणी वसूल करायची. हे महान कार्य चंद्रपुरातील काही बोगस पत्रकार सतत करीत आहे.

    प्रामाणिक पत्रकारांच्या या क्षेत्रात आता गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुंड शिरल्याने प्रामाणिक पत्रकारिता काही प्रमाणात मागे पडत असल्याचे चित्र आहे, या खंडणी बहाद्दरांवर मूल पोलिसांची कारवाई म्हणजे आता बोगस पत्रकारांच्या मुसक्या आवळणार या दिशेची आहे. extortion gang pretending to be police busted by local cops

    पोलिसांचे आवाहन

    याबाबत पोलीस विभागातर्फे खंडणी बाज पत्रकार व तोतया पोलिसांच्या धमकी ला बळी न पडता, तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष चंद्रपूर क्रमांक ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. fake cops extortion case

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोलीस कर्मचारी जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, शंकर बोरसरे व संदीप चुधरी यांनी केली.

  • safety tips against fake police fraud । चंद्रपुरात तोतया पोलिस? चंद्रपूर पोलिसांचे आवाहन

    safety tips against fake police fraud

    safety tips against fake police fraud : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगार आता नवीन युक्त्या काढत गुन्हे करीत आहे, काही महिन्यापूर्वी तोतया पोलिसांनी मूल तालुक्यात वाळू तस्करांकडून पैसे घेतले होते, त्यांनतर वाळू तस्कराने याबाबत पोलिसांना सूचना देत त्या तोतया पोलिसांना जेलवारी करायला लावली, मात्र त्या वाळू तस्करावर काही कारवाई झाली नाही, हे विशेष.

    चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे कि सध्या जिल्ह्यात काहीजण पोलीस असल्याचे सांगत एकट्या दुकट्या नागरिकांना लक्ष करीत त्यांना लुटत आहे.

    परप्रांतीय कामगाराना आता पोलीस पडताळणी आवश्यक, आमदार अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश

    मोटार सायकलवर सध्या वेशातील तोतया पोलीस रस्त्यावर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस असल्याचे सांगत सध्या दागिन्यांसाठी हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत आहे त्यामुळे आपण आपले दागिने काढून रुमालात किंवा कागदात गुंडाळून ठेवण्याचा सल्ला देत हात चलाखीने दागिने लुटून पळ काढत आहे. fake police officer scam

    संपर्क साधा, डायल ११२

    त्यामुळे असा प्रसंग ओढवू नये याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, जर कुणी असे सांगितले तर त्याला त्याचे ओळखपत्र मागावे व जवळील पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष येथील टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क करून माहिती द्यावी. fake police robbing people

    चंद्रपूर पोलीस हे गणवेशातच पेट्रोलिंग करतात, व नागरिकांना दागिने काढून रुमालात ठेवा असे कुणाला सांगत नाही, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अश्या तोतया पोलिसांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देत सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.