aluminium wire theft gang arrested । 🧠 गोलू, पवन आणि विष्णुदेवची ‘तार’कट, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

aluminium wire theft gang arrested

aluminium wire theft gang arrested : चंद्रपूर – जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्युमिनियम तयार चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे, या आरोपींची ५ पोलीस स्टेशन हद्दीत अल्युमिनियम तार चोरी केला होता, चोरी केलेला मुद्देमाल आरोपी विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ५ लाख ३३ लाख ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

३८ तोळे सोन्याची चोरी, स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा

१४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पडोली मध्ये सापळा रचत २५ वर्षीय देवेंद्र उर्फ गोलू महादेव गेडाम राहणार दुर्गापूर, २९ वर्षीय पवन कांग्रेस दुर्गे राहणार कोयना गेट चिनाळा व २२ वर्षीय विष्णुदेव भीमराव नैताम राहणार डोणी तालुका मूल या तिघांना अटक केली.

५ ठिकाणी चोरी चे गुन्हे दाखल

आरोपीवर पोलीस स्टेशन पडोली, कोठारी २ गुन्हे व मूल पोलीस स्टेशनमध्ये २ गुन्हे असे एकूण ५ गुन्हे दाखल आहे. आरोपींनी ५ ठिकाणाहून अल्युमिनियम तार चोरी केला असल्याची कबुली दिली. local crime branch action against theft gang

आरोपीना पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरनाचा पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे. सदरची यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, नितीन कुरेकर, नितीन साळवे, इम्रान खान, किशोर वाकाटे व मिलिंद टेकाम यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *