Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Bihar Assembly NDA victory celebration । बिहार विधानसभेत NDA चा विजय: चंद्रपूरमध्ये BJP कार्यकर्त्यांचा जल्लोष

    Bihar Assembly NDA victory celebration

    Bihar Assembly NDA victory celebration : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) – बिहार विधानसभेतील एन.डी.ए. गटबंधनच्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात लाडू वाटप करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, महामंत्री रवींद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अॅड. सारिका संदुरकर, युवा मोर्चा महिला महामंत्री सायली येरणे, पुष्पा उराडे, प्रज्ञा बोरगमवार, वंदना तिखे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, कौसर खान, आदिवासी आघाडी अध्यक्ष जितेश कुळमेथे, अमोल शेंडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, अरुण तिखे, देवानंद वाढई, विठ्ठल डुकरे, शितल आश्रम, राजेंद्र अडपेवार, भाग्यश्री हांडे, मुग्धा खांडे, राकेश बोमनवार, सुदामा यादव, उग्रसेन पांडे, रंजन ठाकुर, शेखर शेट्टी, जयश्री आश्रम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. Bihar Assembly NDA victory celebration

    Read Also : भाजपला उमेदवार मिळेना

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे. बिहारमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा विजय नाही, तर तो देशातील सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा, विकासाच्या दिशेने जात असलेल्या राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीचा विजय आहे.

    chandrapur celebration

    भारतामध्ये विकास, सुशासन आणि पारदर्शक नेतृत्वालाच जनतेचा आशीर्वाद मिळतो, हे बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आज चंद्रपूरमध्ये आपण जल्लोष करत असलो तरी हा जल्लोष आपल्या विचारांचा, आपल्या राष्ट्रनिष्ठेचा आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या समर्पित परिश्रमांचा सुद्धा आहे. बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या अपार विश्वासाचा पुरावा आहे. Bihar Assembly NDA victory celebration

    मोदीजींनी देशाला विकासाच्या नवीन वाटा दाखवल्या, गरीब कल्याणाच्या योजना घराघरात पोहोचवल्या आणि देशात नवी ऊर्जा निर्माण केली. त्या ऊर्जेचे प्रतिबिंब बिहारमध्ये स्पष्टपणे दिसून आले.ना. अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकार्यातील दृढनिश्चयी नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून, ढोल-ताश्याच्या गजरात मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.

  • tiger safari project Chandrapur progress । 🌳 चंद्रपूरच्या वाघनगरीत आता जागतिक पर्यटकांचे आकर्षण

    tiger safari project Chandrapur progress

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती.

    tiger safari project Chandrapur progress : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. नुकत्याच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी चंद्रपूर येथे विशेष भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह त्यांनी वन अकादमी लगतच्या टायगर सफारीच्या जागेची पाहणी केली.

    Also Read : वाघाच्या भूमीत लक्झरी स्टे

    यावेळी मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजम, प्रादेशिक व्यवस्थापक दिव्यभारती एम., विभागीय वन अधिकारी राजन तलमले, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहाय्यक व्यवस्थापक व्यंगटरमन जंगीलवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, अजय जैस्वाल, बलराम डोडाणी, श्याम धोपटे, महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, महिला अध्यक्ष कौसर खान, सायली येरणे, देवानंद वाढई, श्याम धोपटे, अरुण तिखे, संजय बुरघाटे, संजीव सिंग, कार्तिक बोरेवार, दिनकर सोमलकर, प्रलय सरकार आदींची उपस्थिती होती. tiger safari project Chandrapur progress

    ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प

    यावेळी वन विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत टायगर सफारी प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर झुरमुरे यांनी अधिकार्‍यांसह ५१५ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी टायगर सफारीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. (tiger safari project 600 crore investment) सुमारे ६०० कोटी रुपयांच्या निधीतून उभारला जाणारा हा प्रकल्प चंद्रपूरच्या आर्थिक, पर्यटन आणि पर्यावरणीय विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन रोजगारनिर्मिती, पर्यटन वाढ आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

    tiger safari chandrapur

    प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगभरातील पर्यटक चंद्रपूरकडे आकर्षित होतील आणि वाघनगरी चंद्रपूरचे जागतिक पर्यटन नकाशावर स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. हा टायगर सफारी प्रकल्प राज्य शासनाच्या विशेष प्राधान्यक्रमावर असून, लवकरच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. सदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरच सुरू करू, असे यावेळी एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी सांगितले. Chandrapur wildlife tourism tiger safari

    चंद्रपूर जिल्हा हा वन, वाघ आणि पर्यावरण यांचा संगम असलेला जिल्हा आहे. येथे उभारण्यात येणारा हा टायगर सफारी प्रकल्प फक्त पर्यटन वाढविणारा उपक्रम नसून, तो चंद्रपूरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे चंद्रपूर शहरातील व्यापारी, हॉटेल उद्योग आणि स्थानिक उत्पादन क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  • BJP youth women wing activities । युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. किशोर जोरगेवार

    BJP youth women wing activities

    BJP youth women wing activities : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News३४) – आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योजकता या सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्षमपणे काम करत आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी संधी कमी आणि अडथळे जास्त आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाही; ते टिकवण्यासाठी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : वाघाने शिकार केली आणि परत सुखरूप सोडले, पुन्हा व्हिडीओ व्हायरल

    भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, रवि गुरुनुळे, ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद खेवले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, आशिष देवतळे, राकेश पिंपळकर, सुमित बेले, सुभाष पिंपळकर, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Kishor Jorgewar women empowerment speech

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच एक सक्षम समाज उभा राहतो. जेव्हा युवती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ होते, तेव्हा तिचं कुटुंब, तिचं गाव आणि अखेर संपूर्ण देश सक्षम बनतो. हा मेळावा केवळ कार्यक्रम नाही, तर स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. युवतींच्या जिद्दीत जग बदलविण्याची ताकद आहे. ‘मी करू शकते’, ‘मी बदल घडवू शकते’ हा आत्मविश्वास प्रत्येक युवतीच्या मनात जागा व्हावा, असे ते म्हणाले.

    Also Read : चंद्रपुरात जंगलराज? पत्रकार व त्याच्या कुटुंबाला पोलिसांसमोर मारहाण

    ते पुढे म्हणाले की, ‘लाडकी बहिण योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘मुद्रा योजना’, ‘महिला उद्योजकता विकास’ अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान मिळत आहे. तुम्ही या योजनांचा लाभ घ्या, स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि समाजात नवे आदर्श निर्माण करा, असे आवाहन त्यांनी युवतींना केले. women empowerment programs in Maharashtra

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक युवती आत्मनिर्भर व्हावी, यासाठी कौशल्य विकास केंद्रे, प्रशिक्षण शिबिरे आणि स्वयंरोजगार योजना हाती घेण्यात येणार आहेत. आपण यापूर्वी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, शिवण क्लास यांसारख्या महागड्या प्रशिक्षणांची मोफत सोय करून दिली आहे. चंद्रपूर मतदारसंघात झालेल्या ७० हून अधिक प्रशिक्षण शिबिरांमधून तीन हजारांहून अधिक महिला आणि युवतींना आपण प्रशिक्षित केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री हांडे यांनी केले. मेळाव्याला युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Soybean cotton procurement government centers । कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी शासकीय केंद्र तात्काळ सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

    Soybean cotton procurement government centers

    Soybean cotton procurement government centers : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने कापूस आणि सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे आमदार जोरगेवार यांनी मंत्री रावल यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही सादर केले आहे.

    Also Read : चंद्रपूर कांग्रेसमध्ये फेरबदल

    अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, बाजारात कापूस आणि सोयाबीनला अत्यल्प दर मिळत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही भरून निघत नाहीत, अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले.

    त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्यात यावीत. तसेच सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी स्वतंत्र शासकीय केंद्रे स्थापन करून खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. या केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा  वजन काटे, गोदाम व्यवस्था, ट्रॉली थांबे, पेमेंटची सुलभ पद्धत इत्यादी व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. Government procurement cotton soybean Chandrapur

    आमदार जोरगेवार म्हणाले, सध्या बाजारात सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा खूप कमी आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा.

    या भेटीदरम्यान आमदार जोरगेवार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. मंत्री रावल यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत तातडीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांना दिले आहे. Farmer economic relief cotton procurement 

    चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी हजारो शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अवलंबून असतात. परंतु यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादन घटले असून बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने हमीभावाने खरेदी सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Chandrapur tiger safari project approval । विदर्भातील वाघांचे पुनर्वसन आणि टायगर सफारी प्रकल्पाला हिरवा कंदील

    Chandrapur tiger safari project approval

    Chandrapur tiger safari project approval : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमी जवळील १७१ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांसोबतच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच प्राधिकरणाची अधिकृत बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल, असे निश्चित झाले आहे. यामुळे चंद्रपूर टायगर सफारीच्या कामांना गती मिळणार आहे.

    Also Read : चंद्रपुरात देहविक्री करणाऱ्या महिलेला मागितली १ लाखांची खंडणी; ४ तोतया पत्रकारांना अटक

    दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला भारत सरकारचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, तसेच एफडीसीएम गोरवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड नागपूरचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते. Chandrapur tiger safari project approval

    आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधी त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. वनमंत्री नाईक यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली होती.

    चंद्रपूरच्या वन अकादमीच्या जवळ उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
                या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. पर्यटकांना येथे कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी तसेच देशी आणि विदेशी प्राणी पाहता येणार आहेत.
    याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी, २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. environmental tourism development Chandrapur

    दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात मोठी झेप मिळेल. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ताडोबा सफारीसाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांना टायगर सफारीत वाघाचे हमखास दर्शन घडेल, तसेच विदेशी प्राणी पाहण्याचा नवा अनुभव मिळेल. यामुळे चंद्रपूरची पर्यटन ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

    केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान लवकरच अधिकृत बैठक घेऊन प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल असे सांगितले आहे.
    या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील टायगर सफारी प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार असून, जिल्हा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

    विदर्भातील 10 वाघांचे होणार कोल्हापूर येथे पुनर्वसन – आ. किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांपासून मानव–वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत चालली आहे. वनक्षेत्रातील वाघांची वाढती संख्या, घटणारे अधिवास क्षेत्र आणि मानव वस्त्यांच्या सीमारेषा ओलांडणारे वाघ यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही वाघांचे पुनर्वसन करण्याबाबत दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली. tiger relocation Vidarbha to Kolhapur

    आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत विदर्भातील वाघांची संख्या आणि वाढता मानव–वन्यजीव संघर्ष याबाबत सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर सुमारे १० वाघांचे कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली असून लवकरच त्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगितले.

    आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपूरसह विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातून मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून अनेक जीवितहानी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काही वाघांचे नियोजनपूर्वक पुनर्वसन आवश्यक आहे. कोल्हापूर सह्याद्री प्राणी संग्रहालयात १० वाघांचे स्थलांतर केल्यास केवळ संघर्ष कमी होणार नाही, तर या वाघांना योग्य पर्यावरणही मिळेल असे म्हटले आहे. 

  • Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start । घुग्गुस ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा – आमदार जोरगेवार यांची मागणी

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र, आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे घुग्गुस शहरासह आसपासच्या २० ते २५ गावांतील सुमारे ७० हजार नागरिकांना उपचारासाठी चंद्रपूरपर्यंत २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन  घुग्घुस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला स्व. रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर

    या भेटीत आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सार्वजनिक निधीतून उभारलेली ही आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू होणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयाची नवीन इमारत सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असून, केवळ मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी ती वापरात येऊ शकलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

    उपकरणांची तात्काळ खरेदी करा

    रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ अशा विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा व क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णालयासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, डिजिटल क्ष-किरण मशीन, ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, ॲनेस्थेशिया मशीन, व्हेंटिलेटर, ईसीजी मॉनिटर यांसारख्या आधुनिक उपकरणांची तात्काळ खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले. Ghugus hospital modern medical equipment

    आ. जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास  घुग्घुस  ग्रामीण रुग्णालय लगेच कार्यान्वित होऊन परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळेल. त्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ग्रामीण आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.

  • Congress workers join BJP Chandrapur । नकोड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार!

    Congress workers join BJP Chandrapur

    Congress workers join BJP Chandrapur : चंद्रपूर २ नोव्हेम्बर (News३४) – आजचा दिवस नकोडा गावासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी ऐतिहासिक आहे. आज नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एक विचार, एक संस्कार आणि एका राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाशी स्वतःला जोडले आहे. पक्ष बदलणे म्हणजे केवळ ध्वज बदलणे नव्हे, तर तो विचारांचा स्वीकार असतो. आज आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंघात सामील झालात, तेव्हा तुम्ही फक्त एका पक्षात नाही तर सेवा, राष्ट्रभक्ती आणि विकासाच्या प्रवासात सहभागी झाले असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात ताडोबाच्या नावाने देह व्यवसाय, गुन्हे शाखेने केली कारवाई

    शनिवारी नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नकोडा येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा संघटन महामंत्री नामदेव डाहुले, भाजप तालुका अध्यक्ष विनोद खेवले, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घूस शहर महामंत्री इमरान खान, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, आशिष माशिरकर, राकेश पिंपळकर, दुर्गा वैरागडे, भाग्यश्री हांडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur BJP new members induction

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो संस्कार, सेवा आणि संघटनेचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ओळख जागतिक पातळीवर मजबूत झाली आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीची नवी उंची गाठत आहे. जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या योजना  गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी सन्मान, उज्ज्वला, जनधन, प्रधानमंत्री आवास, आयुष्मान भारत अशा अनेक उपक्रमांद्वारे आज सबका साथ सबका विकास हे ब्रीद वास्तवात उतरले आहे. Congress workers join BJP Chandrapur

    नकोडा आणि परिसरात आम्ही विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज भारतीय जनता पक्षात सामील होणारे हे सर्व कार्यकर्ते म्हणजे नवीन ऊर्जा आणि नवसंजीवनी आहेत. तुमचा हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा ओढून त्यांचे पक्षात स्वागत केले. Kishor Jorgewar BJP leadership event

    काँग्रेसला खिंडार – विजय बावरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

    मागील काही महिन्यांमध्ये काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी नकोडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पडोलीचे विजय बावरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विजय बावरे यांच्या पत्नी शारदा बावरे यांनी २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे आता विजय बावरे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढणार आहे.

  • Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event । मानवतेचा प्रकाश फैलवणारा ‘अम्मा का टिफिन’ दिवाळी स्नेहमिलन सोहळा

    Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event

    Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event : चंद्रपूर १ नोव्हेम्बर (News34) – अम्मा हे नाव उच्चारताच ममत्व, प्रेम, काळजी आणि त्याग यांची भावना जागृत होते. आई ही केवळ एक व्यक्ती नसून ती जगाला जगविण्याची प्रेरणा देणारी एक भावना आहे. अम्मा का टिफीन या नावातही सेवा, समर्पण आणि माणुसकीची भावना दडलेली असून, राहू नये कोणीही भुकेला उपाशी, अम्मा का टिफीन येईन घराशी हे ब्रीदवाक्य म्हणजे मानवतेचा खरा दीप प्रज्वलित करणारी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने राजमाता निवासस्थानी अम्मा का टिफिन परिवार याकरिता दीपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत आनंदोत्साहात पार पडला. यावेळी अम्मा का टिफिन परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. Diwali social welfare programs

    Also Read : ते ९ तालुके पुन्हा नक्षलग्रस्त घोषित होणार, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, अम्मा का टिफिन उपक्रमाच्या संयोजिका तथा भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री सविता दंढारे, सूर्यकांत खनके, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, मंडळ अध्यक्षा अॅड. सारिका संदुरकर, सायली येरणे, कौसर खान, दुर्गा वैरागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    अम्मा माझ्या जीवनाची पहिली गुरु

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, अम्मा हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर एक शांत, प्रेमळ, त्यागमय आणि कर्तृत्ववान व्यक्ती उभी राहते. अम्मा माझ्या जीवनाची पहिली गुरु होती. तिच्या शिकवणींनी आणि संस्कारांनीच मला आज समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
    मुला, जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्याला दे. पोटभर खाऊ घाल, कोणाला भुकेलं ठेवू नको. ही तिची वाक्यं आजही माझ्या हृदयात कोरलेली आहेत. त्या शिकवणीमुळेच अम्मा का टिफीन ही संकल्पना जन्माला आली. आईच्या त्या मायेच्या हातचं अन्न, तिचा तो प्रेमळ स्वभाव आणि कोणाचंही पोट रिकामं राहू नये ही भावना हेच या उपक्रमाचं बळ असल्याचे ते म्हणाले. Amma Ka Tiffin social initiative

    आजच्या या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित राहून मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. या उपक्रमात केवळ अन्नदान नाही, तर माणसांमधील आपुलकीचे नाते जपले गेले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थ भावनेने रोज कोणाचातरी पोट भरले जाते हीच खरी सेवा परंपरा आहे.Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event

    आजच्या या स्नेहमिलन सोहळ्यात आपण सर्वजण केवळ दीप प्रज्वलित करत नाही, तर समाजात मानवतेचा प्रकाश पसरवत आहोत. या उपक्रमाची ज्योत अशीच अखंड पेटत राहील. माझी अम्मा, माझी आई आज आपल्या सोबत नसली तरी तिच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम आजही अत्यंत यशस्वीपणे आणि सेवाभावाने सुरू आहे, याचा आम्हाला अपार आनंद आणि अभिमान वाटतो. या उपक्रमामागे अम्माची शिकवण आहे. त्यामुळे हा सामाजिक उपक्रम आपण अधिक विस्तारित करून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचविणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.या स्नेहमिलन सोहळ्यात अम्मा का टिफीन परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

  • Padvidhar Voter Registration । मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. किशोर जोरगेवार

    Padvidhar Voter Registration

    Padvidhar Voter Registration : चंद्रपूर ३० ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – पदविधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
    या बैठकीत मतदार नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती, प्रगती आणि उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली. पदविधर नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर ते बुथ पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

    Also Read : ८५ कोटी रुपयांच्या रस्त्याचे पालकमंत्री वुईके यांच्या हस्ते भूमिपूजन

    या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, शहर महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, रवि गुरुनुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष आणि विविध आघाडी अध्यक्ष उपस्थित होते.

    पदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज

    बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज आहे. त्यामुळे प्रत्येक पदवीधर नागरिकाने आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
    मतदार नोंदणी हा केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याचे प्रभावी साधन आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की,  प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जाऊन त्यांची नोंदणी सुनिश्चित करा. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून लोकशाहीच्या जडणघडणीचा भाग आहे. आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, मतदारसंघातील तरुण पदवीधर, शिक्षक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता वाढविणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजेनोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.