district court mediation drive Chandrapur : चंद्रपूर, दि. 17 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर न्यायालय व जिल्ह्याअंतर्गत सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ ही 90 दिवसांची विशेष मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमेचा उद्देश हा न्यायालयीन प्रकियेत प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे परस्पर सहमतीने जलद निवारण करणे, पक्षकारांचा वेळ, खर्च व श्रम वाचवणे आणि न्यायव्यवस्थेवरील भार कमी करणे, तसेच पक्षकारांच्या नातेसंबंधात कटुता निर्माण न करता जिव्हाळयाचे संबंध निर्माण करणे, हा आहे. chandrapur court mediation program July‑September 2025
या प्रकरणात होणार मध्यस्थी
या मोहिमेअंतर्गत न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणांमध्ये (आपसी तडजोड लायक प्रकरणे) तसेच सर्व दिवाणी प्रकरणे कलम 138 एन.आय ॲक्ट (धनादेश न वटणे ) प्रकरणे, बॅंकाची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, घरगुती हिंसाचाराची प्रकरणे, आपसी मध्यस्थी ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन एस. एस. भिष्म व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव एस. एस. इंगळे, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच नागरिकांना आपली प्रकरणे सदर मोहिमेत ठेवायची असल्यास त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपुर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Success in stopping child marriage : चंद्रपूर, दि. 17 : बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर रोख बसवण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि चाईल्ड हेल्पलाईन यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, चंद्रपूर शहरात एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह थांबवण्यात आला आहे.
चाईल्ड हेल्प लाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका 17 वर्ष 2 महिन्यांच्या बालिकेचा विवाह दिनांक 7 जुलै 2025 रोजी नियोजित होता. या माहितीच्या आधारे दिनांक 4 जुलै 2025 रोजी त्वरित पावले उचलण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व जिल्हा चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांच्या मार्गदर्शनात केस वर्कर अंकुश उराडे व किरण बोहरा यांनी संबंधित बालिकेच्या घरी भेट दिली. त्यांनी जन्मदाखला व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली असता मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. district administration stopping minor marriage
समुपदेशनाने विवाह थांबला
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे विवाहवेळी किमान वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत बालिकेच्या कुटुंबीयांना समज दिली गेली तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. या समुपदेशनामुळे नियोजित विवाह थांबवण्यात यश आले. यानंतर बालिकेला पालकांसह बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर समुपदेशनासाठी उपस्थित करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सजग राहून अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे..
corruption in reject coal sales by washeries : पावसाळी अधिवेशन १७ जुलै मुंबई – महाजेनकोच्या वॉशरीजद्वारे ‘कोल वॉश’ प्रक्रियेनंतर तयार होणारा चांगल्या दर्जाचा कोळसा जाणीवपूर्वक ‘रिजेक्ट कोल’ म्हणून दर्शवून खुल्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. हा मोठा भ्रष्टाचार असुन याची चौकशी करण्याची मागणी यावेळी औचित्याच्या मुद्दयावर बोलतांना त्यांनी अधिवेशनात केली आहे. washed coal sold as reject coal
वेकोलि, एमसीएल, एसईसीएल, एमईसीएल आणि एससीसीएल या कंपन्यांच्या खाणींमधून दरवर्षी १३ कोटी ७८ लाख टनांपेक्षा अधिक कोळसा काढला जातो. महाजेनकोने यातील कोळशाची गुणवत्ता वाढवण्यासाठी खासगी वॉशरीजना कोळसा धुण्याचे कंत्राट दिले असून, वॉशरीजमधून तयार होणार्या कोळशाची वाहतूक करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडे देण्यात आली आहे.
उच्च दर्जाचा कोळसा रिजेक्ट कोल
मात्र, वॉशरीजकडून तयार होणारा उच्च दर्जाचा कोळसा ‘रिजेक्ट कोल’ म्हणून नोंदवला जातो आणि त्याची किंमत कमी दाखवून तो खुल्या बाजारात विकला जात आहे. एकूण २ कोटी ७५ लाख ७६ हजार टन कोळसा अशा पद्धतीने खासगी कंपन्यांना विकण्यात आल्याचे समोर आले असून, त्याचा बाजारभाव सरासरी ५ हजार रुपये प्रति टन आहे. त्यामुळे एकूण गैरव्यवहाराची रक्कम १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसत असून हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कोळसा घोटाळा असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात असा गैरव्यवहार टाळण्यासाठी कोल वॉशरीज थेट विद्युत प्रकल्पांच्या परिसरातच स्थापन कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना केली आहे.
illegal use of tullu pump for water supply : चंद्रपूर 17 जुलै – नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या 28 नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.
चंद्रपूर मनपा पाणीपुरवठा विभागाने अभियंत्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रत्येकी 7 कर्मचाऱ्यांच्या 3 टीम बनविल्या असुन या टीमद्वारे सलग 4 दिवस कारवाई करून सिस्टर कॉलनी परिसरातील ज्ञानेश्वर चिमुरकर,विजय कांबळे,जमुनादास मुन,भाऊराव बेंदले यांच्या घरून 4,तुकूम मातोश्री शाळा परिसरातील रविन्द्र हजारे,जमीर खान,तिवारी,झाडे,वांढरे यांच्या इथे 5,सिस्टर कॉलनीतील सोनकुसरे,पाटील,देविदास उपरे,सिध्दीकी,चिवंडे यांच्या घरून 5, समाधी वार्ड येथील वसंत झाडे, राजु हिवरे,राजेन्द्र टिपले,राजु वानखेडे येथील 6,उत्तम नगर येथील चंदन पाल,हेमराज धात्रक,बबन नवघरे,नाग बिश्वास यांच्या घरून 8 असे एकुण 28 टिल्लू पंप जप्त केले आहेत.
जलमापक काढत पाण्याचा उपसा
मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. कारवाई दरम्यान सदर नळधारकांद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे. municipal crackdown on illegal water connections
नळाचे देयके कमी करण्यासाठी जलमापकाचा पाईप काढणे सुरु
सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. tampering water meter
त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.
rooftop solar projects in municipal buildings : चंद्रपूर,16 जुलै: चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींसह एकूण 45 इमारतींवर रूफटॉप सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्युत विभागाच्या पुढाकाराने ही प्रणाली सुरू करण्यात आली असून, 399 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांद्वारे महापालिकेला वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर सुनिश्चित होत असून, शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
महापालिकेची मुख्य इमारत, झोन कार्यालये, करसंकलन केंद्रे, संगणक कक्ष तसेच नागरिकांना सेवा पुरवणारी यंत्रणा – जसे की सीसीटीव्ही, वायफाय झोन, डिजिटल साईनबोर्ड, स्मार्ट मीटरिंग इत्यादीसाठी आवश्यक वीज आता स्वच्छ सौर ऊर्जेतून मिळत आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत, तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर 600 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या केंद्रामार्फत शहरासाठी पिण्याचे पाणी शुद्ध करून घरोघरी पोहोचवले जाते. वीजेच्या प्रचंड गरजेमुळे हे केंद्र अखंड सुरू असते, आणि यामुळे सौर ऊर्जेचा वापर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. savings from solar energy in urban governance
भविष्यात मनपाच्या इतर इमारतींवरही अशाच सौर ऊर्जा प्रणाली उभारण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जा ही स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक ऊर्जा असून, ती कार्बन उत्सर्जन कमी करते आणि ऊर्जा सुरक्षेत भर घालते. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका हरित ऊर्जा उपक्रमांची कास धरून इतरही उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे.
वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी
“सौर प्रणालीमुळे कार्यालयीन यंत्रणा अखंड कार्यरत राहतात आणि महापालिकेचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे. सध्या 399 किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प सुरू असून, त्यातून नेमकी किती बचत होते हे लवकरच विश्लेषण करून जाहीर करण्यात येईल” – प्रगती भुरे,उपअभियंता,विद्युत विभाग,चंद्रपूर महानगरपालिका
Vacancies in Revenue Department : चंद्रपूर : नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विभागात नायब तहसीलदार पदांच्या पदोन्नतीला दिरंगाई का होत आहे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकण विभागातील पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
नागपूर महसूल विभागात अंदाजे ४५ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी एका नायब तहसीलदाराकडे दोन ते तीन सर्कलचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास विलंब होत आहे. revenue department promotion delay
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या निवडसूची २०२४-२५ नुसार विभागीय पदोन्नती समितीद्वारे मंजूर केलेली निवडसूची मार्च २०२५ मध्येच शासनाकडे सादर केली आहे. असे असूनही, गेल्या दोन महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहे, ही चिंतेची बाब आहे. pending promotion file deputy tehsildar
कोकण विभागातील अशाच प्रकारच्या पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेला विलंब का होत आहे, आणि विशेषतः महसूलमंत्री स्वतः नागपूरचे असताना हा अन्याय का, असा सवालही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्देशांचाही संदर्भ दिला, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने निवडणुकीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत रिक्त पदे भरण्याची ग्वाही
याव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात सर्व विभागांतील रिक्त पदे १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार भरण्याची ग्वाही दिली होती. या ग्वाहीकडे महसूल विभागाने लक्ष देऊन तातडीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आग्रह केला आहे की, या महत्त्वाच्या पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन जनतेची कामे वेळेवर मार्गी लागावीत आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी महसूलमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे.
National Backward Class Commission hearing : चंद्रपूर: दि. 16 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. टाकळी-जेना-बेलोरा, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन प्रा.लि. बरांज (मो.) कोळसा खाण, पी.एम. गतिशक्ती अंतर्गत रेल्वे लाईनचे वेकोलि संबंधित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व मागण्या या संबंधी धरणे आयोजित केले होते.
या धरणे कार्यक्रमास अधिकांश इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांची संख्या असल्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांची तक्रार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केल्यामुळे आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी गंभीरपणे दखल घेवून धरणे स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून समस्यांची सुनावणी व नोंदी घेतल्या. backward class commission intervention
शेतकरी व प्रकल्पग्रस्तांवर होत असलेले अन्याय, राज्य सरकारच्या निती धोरणाला डावलून जिल्हा प्रशासन अधिकारी, मायनिंग अधिकारी, भुमी अधिग्रहण अधिकारी, पुनर्वसन, वनविभाग, जिल्हा परिषद, महसुल अधिकारी, रेल्वे अधिकारी, वेकोलि अधिकारी तसेच या संबंधित अधिकारी राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात जावून खासगीकरण व सरकारी कंपनीच्या बाजूने काम करीत असल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी केला.
त्यांच्या तक्रारी नोंदवून झालेल्या अन्यायाची नोंद घेवून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मागासवर्गीयांना राज्य सरकारकडून नोकरी, वेतन, जमिनीचा मोबदला, गावाचे पुनर्वसन व त्यातील तफावती या सर्वावर आयोगाकडून न्याय मिळेल ही भावना व्यक्त केली. आयोगाने सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेवून त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिग घेतली. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून लिखीत स्वरूपात त्याची नोंद घेतली. farmers rights in coal mining project
पहिल्यांदाच अशी सुनावणी
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या धरणे मंडपात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी आंदोलन स्थळी जावून सुनावणी घेवून एक नविन स्तुत्य उपक्रम केला.
यावेळी वरोराचे आमदार श्री. करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे समक्ष उपस्थित केल्या. यावेळी खुशालजी बोंडे, विजयजी राऊत, अनिलजी फुलझेले, डॉ. अशोकजी जिवतोडे, महानगर अध्यक्ष भाजपा सुभाषजी कासनगोट्टूवार, युवा नेते रघुवीर अहीर, विनोदजी शेरकी, नामदेव डाहुले,स्वप्निल डुकरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला समर्थन दिले.
या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता श्री. प्रदीप महाकुलकर, श्री. धनंजय पिंपळशेंडे, सुनिल नामोजवार, गोविंदा बिंजवे, रामा मत्ते, गोपाल गोसवाडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, विशाल दुधे, संजय वासेकर, शाम महाजन, श्री. विठ्ठल पुनवटकर, विजय वानखेडे, दत्तात्रय गुंडावार, पुनम तिवारी, गौतम यादव, चेतन शिंदे, आशय चंदनखेडे, मयुर भोकरे, राहुल सुर्यवंशी, संजय खनके, संजय रॉय, जमील शेख आदींनी प्रयत्न केले.
seed plantation activity : चंद्रपूर : अ. भा. वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय अध्यक्ष स्वर्गीय जगदेवजी राम उरांव यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ बीज रोपण महोत्सव 2025 चे आयोजन विदर्भ वनवासी कल्याण आश्रम अंतर्गत जनजाती सुरक्षा मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आले होते. दिनांक 15 जुलै रोज मंगळवार ला 11-30 वाजता इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर लगत असलेल्या जंगल सुरक्षा भिंतीच्या आत लागून असलेल्या जंगलात 20,000 पेक्षा जास्त बीज रोपण करण्यात आले. त्यात जांभूळ, आंबा,चिकू,सिताफळ,चिंच,फणस,आवळा, मोहा,बेहडा,खजूर इत्यादी फळाचे बीज होते.
सदर महोत्सवाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक डॉ. दीनदयालजी कावरे होते, तर महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून वनवासी कल्याण आश्रम चे विभाग संघटन मंत्री प्रज्योत हेपट चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी श्री. संजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्री.विकास राचेर्लावार, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापान,विदर्भ समाचार संपादक अनिल देठे, गुरवालेजी, स्व. बापूराव वानखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आकुलवार मॅडम,जय लहरी कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका श्रीमती चंदाताई जीवतोडे, यांची उपस्थिती होती. महोत्सवाचे उद्घाटन भारत माता,शहीद बिरसा मुंडा,बाबुराव शेडमाके व स्व. जगदेव राम उरांव यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. seed plantation activity
एक बीज एक आठवण
यावेळी वानखेडे विद्यालयातील शेकडो विद्यार्थी,शिक्षक वृंद व परिसरातील आणि शहरातील अनेक गणमान्यवर नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना जनजाती सुरक्षा मंच चे जिल्हा सह संयोजक धनराज कोवे यांनी महोत्सव आयोजन करण्याचे महत्व सांगितले त्यात विविध फळाचे ११ हजार बीज रोपण उदिष्ट होते मात्र नागरिकांना पत्रकाद्वारे आव्हान केले होते की “चला निसर्गासाठी आणि स्मृतीसाठी एक पाऊल पुढे टाकूया एक बीज एक आठवण या संकल्पनेला बळ देऊया” आप्तेष्ट,प्रिय किंवा परिवारातील व्यक्तींच्या नावे बीज अर्पण करून या पवित्र कार्यास सहभागी होऊ शकता. tribal youth environmental contribution
१ लाख बीज रोपण करण्यात
तर नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिल्याने २० हजार पेक्षा जास्त बीज गोळा झाले. त्यामुळे पुढच्या वर्षीचे उदिष्ट वाढवून १ लाख बीज रोपण करण्यात येईल असे सांगितले. उपस्थिताना उदघाटनपर उद्बोधन करतांना कावरे यांनी सांगितलं की भविष्यातील निसर्गाचे धोके टाळण्याठी सर्व नागरिकांनी प्लास्टिक चा वापर बंद करणे पाण्याचा वापर जपून करणे झाडाची कत्तल बंद करणे प्रत्येकाच्या जन्मदिना निमित्त अधिका अधिक वृक्ष लावणे आणि बीज रोपण सारखे महोत्सव आयोजित करणे हे संस्कार अंगीकारणे तर नक्की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. एसडीओ पवार यांनी महोत्सवाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना दैनदिन जीवनात बीज रोपण करत राहण्याचा संदेश दिला. fruit seed reforestation
संपादक सोलापन यांनी सुद्धा सदर उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले व शुभेच्या दिल्या. संघटन मंत्री प्रज्योत हेपट यांनी सांगितले की जगदेवजी यांचे जीवन समाजा साठी समर्पित होते. त्यांचे कार्य स्मरणात सदैव राहवे या करिता हा महोत्सव प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वनवासी कल्याण आश्रम करीत राहील असे समारोपीय संबोधन केले. नंतर ढोल पथक सह उपस्थित विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् भारत माता की जय घोष करीत बीज रॅली काढली व जंगलच्या सुरक्षा भिंतीलगत मोठ्या संख्येनी फळाचे बीज रोपण केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी गुल्ल्यार द्वारा सिडबॉल जंगलात लांब पर्यंत फेकले. low cost seed planting techniques
या महोत्सवात इंदिरा नगर येथील वानखेडे विद्यालय,कृष्ण नगर येथील एम बी कॉन्व्हेन्ट,संजय नगर येथील जय लहरी बाबा कॉन्व्हेन्ट चे विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंद यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. महोत्सवाच्या यशस्विते साठी प्रलय सरकार,यशोधर खम्ममकर,संजय जोशी,अवताडे सर,रामराव हर्डे,चंद्रशेखर देशमुख,अनिल मने, पप्पू बोपचे,नंदू रहांगडाले,गजानन राऊत,संजय पटले,विभावरी वखरे,दीपलक्ष्मी वेखंडे,वर्षा परचाके, दीपाली जोशी,वर्षा सोमलकर,विक्रम खुबवाणी,विक्की मेश्राम,महेश शिडाम,मुकेश मेश्राम,अरविंद ननावरे,महेश तुरिले,एकनाथ चवरे,नंदू कामतवार,घनश्याम,मालू ननावरे,प्रकाश असूटकर,शुभम शेंडे,प्रवीण वाकडे,मंगेश सोनवणे अथक परीश्रम घेतले.
Chandrapur Brutal Crime राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात सास्ती गावात भावाने भावाचा खून केल्याची घटना 15 जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली अशी माहिती आहे.
मृतकाचे नाव 45 वर्षीय मारोती भाऊजी भिवनकर तर आरोपीचे नाव 40 वर्षीय दत्तू भाऊजी भिवनकर असे आहे.
घटनेच्या पूर्वी जीवे मारण्याची धमकी
मृतक व आरोपीला दारूचे अतिव्यसन असल्याने दोघांच्या पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही, दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, 14 जुलै रोजी दोन्ही भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, भांडण सोडविण्यासाठी आई मालन भिवनकर या गेल्या मात्र आरोपी दत्तू ने तिला ढकलून दिले. मारोती कशाला घरी राहतो, त्याला मारून टाकल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दत्तू ने दिली होती. Latest crime news
दुसऱ्या दिवशी आई मालन ही तब्येत बरी नसल्याने मुलीने त्यांना दवाखान्यात नेले होते.
15 जुलै रोजी घरी कुणी नसल्याने दोघा भावात पुन्हा वाद झाला, या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, लहान भाऊ दत्तू ने लाकडी दांड्याने मोठ्या भाऊ मारोतीच्या डोक्यावर जोरदार वार केला, या हल्ल्यात मारोती जागेवर कोसळला आणि गतप्राण झाला.
घरी आल्यावर बहिणीला मारोती रक्तबंबाळ अवस्थेत दिसला, याबाबत राजुरा पोलिसांना माहिती दिली असता राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारोतीची हत्या केल्यावर दत्तू घटनास्थळावरून पसार झाला. राजुरा पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
farmer training visit abroad scheme maharashtra : चंद्रपूर, दि. 15 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील अद्ययावत शेती तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात संधी व बाजारपेठेतील मागणी यांची थेट माहिती करून देण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर शाश्वत व आधुनिक शेती पद्धती अवगत करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स या देशांमध्ये शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांना संबंधित देशांतील कृषी संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यात केंद्रे, शेतकरी गट तसेच प्रात्यक्षिक शेतभेटीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात वाढ होऊन त्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.
निविदा GeM पोर्टलवर प्रसिध्द
या अभ्यास दौ-यांचे आयोजन योग्य व नियोजनबद्ध पध्दतीने करण्यासाठी प्रवासी कंपनीची निवड करण्यासाठी GeM (Government e-Marketplace) पोर्टलवर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर निविदा 14 जुलै 2025 रोजी GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
निविदापूर्व बैठक 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये इच्छुक प्रवासी कंपन्यांना निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व स्पष्टता मिळवता येणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे.
सर्व पात्र व अनुभवी प्रवासी कंपन्यांनी GeM पोर्टलवर निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागमार्फत करण्यात येत आहे.