Blog

  • Sudhir Mungantiwar on Kishor Jorgewar : तुमचा उजवा हात माझ्यावर घाणेरडी टीका करतोय – सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar on Kishor Jorgewar : तुमचा उजवा हात माझ्यावर घाणेरडी टीका करतोय – सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar on kishor jorgewar चंद्रपूर लोकसभेची रणधुमाळीत निवडणुकीच्या रणांगणात उभ्या असलेल्या उमेदवारांवर टीकेचे राजकारण सुरू आहे, अश्यातच चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार हा प्रश्न यावेळी उपस्थित झाला असला तरी सध्यातरी जोरगेवार यांनी बोलणे टाळले मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ

    2 एप्रिल ला सर्व जाती धर्माच्या मेळाव्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार जोरगेवार यांच्यावर भाष्य केले. sudhir mungantiwar on kishor jorgewar

    हे ही वाचा : मुलगी म्हणते पालकांना, आई – बाबा मतदान अवश्य करा

    आमदार जोरगेवार हे सध्या महायुती सरकारमध्ये असले तरी त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांचा उजवा हात असलेल्या माणसाने माझ्यावर रोज घाणेरडी टीका करण्याचे काम सुरू केले आहे, ही बाब जोरगेवार यांना माहीत नसणे म्हणजे आश्चर्यकारक आहे, जोपर्यंत त्यांच्या उजव्या हात असलेल्या माणसाने माझ्याविरुद्ध लिखाण करणे थांबविले नाही तर पुढच्या वेळेस मी मदत करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. sudhir mungantiwar on kishor jorgewar

  • Dr.Gavture joins congress : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठा उलटफेर

    Dr.Gavture joins congress : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठा उलटफेर

    Dr.Gavture joins congress चंद्रपूर – ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये चंद्रपुरातील सामाजिक कार्यात व बहुजन चळवळीत अग्रेसर असलेले गावतुरे दाम्पत्य यांनी आज कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मध्ये कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

    हे ही वाचा : लव्ह जिहादच्या नावाने चंद्रपुरात व्हिडीओ व्हायरल, तो व्हिडीओ शेअर करू नका, चंद्रपूर पोलिसांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

    भाजप पक्ष दररोज विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश करवून घेत आहे, मात्र डॉ. गावतुरे यांच्या प्रवेशाने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसचे पारडे जड होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. Dr.Gavture joins congress

    हे ही वाचा : चंद्रपुरात आचारसंहितेचा झोल, माजी नगरसेवकाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आव्हान

    गावतुरे दाम्पत्य मागील 15 वर्षांपासून चळवळी मध्ये सक्रियपणे काम करीत आहे, कोरोना काळात गावतुरे दाम्पत्यानी सामाजिक बांधिलकी जोपासत बाधित नागरिकांची सेवा केली. Dr.Gavture joins congress

    हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात, तुमचा उजवा हात माझ्यावर घाणेरडी टीका करतोय, थांबवा त्याला, अन्यथा पुढच्या वेळेस मी मदत करणार नाही 

    बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे व पॅथॉलॉजीस्ट डॉ. राकेश गावतुरे यांच्या कांग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार हे नक्कीचं.

     

    कोण आहे डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे ?

    गावतुरे दाम्पत्यांचे गेल्या पंधरा वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुजन चळवळीमध्ये तसेच ओबीसी चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. 2020 च्या संविधान दिनी निघालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी मोर्चाचे नेतृत्व केले.

     

    आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोना काळामध्ये डॉ अभिलाषा गावतुरे यांनी दिलेली निस्वार्थ सेवा याची दखल तर केवळ महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय मीडियाने सुद्धा घेतली होती. त्यांच्या भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन असो कामगारांचा हक्काचा लढा असो वा गाव तिथे वाचनालय ही मोहीम असो ,महिला सक्षमीकरणाची चळवळ असो ,चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबीराच्या मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा देणे, तसेच बाल रोग तज्ञांच्या संघटनेचे सचिव असताना कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांचा मोफत उपचार आणि संगोपन करण्याचे मोठे कार्य असो, वन्यजीव प्राण्यांच्या संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा प्रश्न उचलून धरणे, आदिवासींच्या हक्काच्या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या मुळे जिल्हाभरातील विशेष करून बल्लारपूर मुल विधानसभेमधून त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग निर्माण झालेला आहे.

     

    डॉ राकेश गावतुरे यांचे वडील हे काँग्रेस सेवा दलाचे आजीवन सदस्य आहेत त्यामुळे डॉ राकेश गावतुरे यांना सामाजिक बांधिलकीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने ते काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान वाचवण्याच्या लढाईत अग्रणी शिलेदाराच्या भूमिकेत असतील याची चर्चा समाजातील सर्व स्तरातून होत आहे. या बातमी मुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे . गावतुरे दाम्पत्याच्या काँग्रेस प्रवेशाने चंद्रपूर लोकसभेतील समीकरणे नक्कीच बदलतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना आशा आहे.

  • Love Jihad video viral : तो व्हिडीओ शेअर करू नका – चंद्रपूर पोलीस

    Love Jihad video viral : तो व्हिडीओ शेअर करू नका – चंद्रपूर पोलीस

    Love Jihad video viral चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद च्या नावाखाली एका युवतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, पोलिसांनी त्या व्हिडिओची दखल घेत त्या युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

     

    पोलिसांनी सदर प्रकरणात कायदेशीर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, सदर व्हिडीओ हा लव जिहाद च्या नावाखाली अनेकांनी व्हायरल केला असून तो व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सएप वरून व्हायरल करण्यात आला. Love Jihad video viral

    सदर व्हिडीओ कुणाकडे असल्यास त्यांनी तो तात्काळ डिलीट करावा, सदर व्हिडीओ शेअर केल्याने जातीय ताण तणाव निर्माण होऊन वातावरण खराब होण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. Love Jihad video viral

     

  • Systematic Voters Education and Electoral Participation : आई-बाबा मतदान करा

    Systematic Voters Education and Electoral Participation : आई-बाबा मतदान करा

    Systematic Voters Education and Electoral Participation प्रत्येक बालक हा त्यांच्या पालकाचा लाडका असतो, त्यामुळे त्याच्या आग्रहाला किंवा आवाहनाला पालक संमती देतातच,हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून घेतले जात आहे. यातील संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

     

    निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्‍यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मनपा शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Systematic Voters Education and Electoral Participation

     

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान जाणीव जागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांना संवैधानिक कायदेशीर तरतुदीबाबत माहिती देणे, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याबाबत माहिती देणे, निवडणूक प्रक्रियेबाबत अवगत करणे तसेच महिला, वृद्ध, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी घटकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम स्वीपच्या माध्यमातून केले जात आहे. Systematic Voters Education and Electoral Participation

     

    त्याचाच एक भाग म्हणून मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजवावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात येत आहे. यासाठी मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे.

  • Violation of the ideal code of conduct : मनपा आयुक्तांना जिल्हाधिकारी यांचे अभय? माजी नगरसेवकाची संतप्त प्रतिक्रिया

    Violation of the ideal code of conduct : मनपा आयुक्तांना जिल्हाधिकारी यांचे अभय? माजी नगरसेवकाची संतप्त प्रतिक्रिया

    Violation of the ideal code of conduct चंद्रपूरातील आचारसंहितेमधील 24 कोटी रुपयांच्या निविदा प्रकरण चांगलेच गाजत आहे, माजी नगरसेवकाने थेट जिल्हाधिकारी गौडा यांना आव्हान देत प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे.

    हे ही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांना धमकी?

    आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांचा बचाव करणारी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी एका वाहिनीला दिली. आयुक्त पालीवाल यांनी आदर्श आचार संहिता लागू होण्याच्या पूर्वी प्रसिद्धीस पाठवलेली 24 कोटी रुपयांची ई-निविदा दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शासनाच्या वेबसाईटवर उशिरा प्रकाशित झाली. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेण्याची समज आयुक्त पालीवाल यांना दिली असुन सदर प्रकरण आता बंद केल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी एका वाहिनीला दिली.
    यावर आता जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. Violation of the ideal code of conduct

    हे तर वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात रेशन कार्ड वर मिळणार ब्रँडेड दारू

    जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत.या संवेदनशील पदावर काम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य करून भ्रष्ट अधिकाऱ्याचा असा बचाव करणे योग्य नाही. तसेच या प्रकरणात आयुक्त पालीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्यास त्याची प्रत व आयुक्तांकडून मिळालेले लेखी स्पष्टीकरण सार्वजनिक करावे असे खुले आव्हान देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवडणूक विभागाने आयुक्तांविरुद्ध कोणतीही रितसर कारवाई केली नाही, एवढेच नव्हे तर या प्रकरणातील मूळ तक्रारच आवक-जावृक विभागातून गहाळ झाली. नियम धाब्यावर बसवून निवडणूक विभागाची संपूर्ण यंत्रणा आयुक्त पालीवाल यांचा बचाव करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. Violation of the ideal code of conduct

    मनपा आयुक्तांनी हेतुपुरस्पर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप

    16 मार्चला दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकी बाबत पत्रकार परिषद घेणार अशी घोषणा निवडणूक विभागाने एक दिवसापूर्वी केल्याने 16 मार्चला दुपारी 3 वाजेपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी पूर्वकल्पना सर्व देशावासियांना 15 मार्चला मिळाली होती. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेच्या तारखेची घोषणा केली त्याच दिवशी 15 मार्च रोजी दुपारी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी तडकाफडकी 3 वर्तमान पत्रांमध्ये 24 कोटीच्या वादग्रस्त कामाची जाहिरात दिली. ही जाहिरात 16 मार्चला सकाळी प्रकाशित झाली.जाहिरातीमध्ये सदर कामाची ई-निविदा 18 मार्चपासून शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला.16 मार्चपासून आचारसंहिता लागू होणार याची पूर्वकल्पना असताना आयुक्त पालीवाल यांनी 18 मार्चपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे नियमानुसार योग्य आहे का ? हा हेतूपुरस्पर केलेला आचारसंहिता भंग नव्हे का ? याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. Violation of the ideal code of conduct

    आमचा आक्षेप हा 16 मार्च रोजी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कामाच्या जाहिरातीबाबत नसून आयुक्तांनी 18 मार्चपासून सुरू केलेल्या ई-निविदा प्रक्रिये बाबत आहे.आचारसंहितेचा भंग झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ई-निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याचे तोंडी निर्देश दिले. मात्र राजकीय दबावाखाली जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांचा बचाव करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

  • MPDA Act Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई

    MPDA Act Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई

    MPDA Act chandrapur अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्या व 1 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव (जाट) सिंदेवाही येथील नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या दारू व्यवसायिकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करत चार महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    हे ही अवश्य वाचा – घरगुती वाद आणि सासऱ्याने केली सुनेची हत्या

    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टींवर दारू निर्मिती, विक्री व वाहतूक या विरुद्ध मागील 2 वर्षांपासून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात अवैध दारू विरुद्ध 951 गुन्ह्यांची नोंद करून 761 आरोपींना अटक करण्यात आली आहे. MPDA Act chandrapur

     

    42 वाहने जप्त करून 99 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे. तसेच 1 पेक्षा ज्यास्त वेळा अश्याच प्रकारचे गुन्हे वारंवार करणाऱ्या 156 आरोपींविरुद्ध कलम 93 अंतर्गत प्रस्ताव तयार करून त्यातील 62 आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सुद्धा घेण्यात आले आहे. MPDA Act chandrapur

     

    मात्र याउपरही अवैध दारू व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या 4 आरोपींविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित केली असता नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या इसमाविरुद्ध 4 महिन्यांसाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पारीत केला आहे. एखाद्या दारू व्यावसायिकाविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश देण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. MPDA Act chandrapur

     

    यापुढेही या स्वरूपाची सक्त कारवाई अवैध दारू व्यवसायाशी निगडीत व्यक्तींविरुद्ध सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त अनिल चासकर, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली ईश्वर वाघ, अभिजित लिचडे, चेतन खारवडे, मोनाली सुराडकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

  • chandrapur police conviction rate : सासऱ्याने केली सुनेची हत्या

    chandrapur police conviction rate : सासऱ्याने केली सुनेची हत्या

    chandrapur police conviction rate 12 एप्रिल 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा तालुक्यातील मौजा चेक नवेगाव येथील शेत शिवारात गीता दीपक कन्नाके ची दगडी फरशीच्या तुकड्याने वार करीत हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी आरोपी सासरे 52 वर्षीय भुजंग झित्रू कन्नाके ला पोम्भूर्णा पोलिसांनी अटक केली होती.

    हे ही वाचा : चंद्रपुरातील मतदारांना धमकी?

    आरोपी भुजंग चा सून गीता सोबत घरगुती कारणावरून वाद होत भांडण झाले होते, त्यामधून आरोपीने गीता ची हत्या केली. chandrapur police conviction rate

     

    3 वर्षे न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपी भुजंग कन्नाके ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. chandrapur police conviction rate

    हे ही वाचा : आता रेशन कार्ड वर मिळणार ब्रँडेड दारू

    सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओलालवार यांनी करीत आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून सीमा रामटेके यांनी काम बघितले, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय तर्फे 1 एप्रिल रोजी देण्यात दिली.

  • Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

    Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरातील मतदारांना धमकी? याप्रसंगी काय करणार?

    Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले.

    हे ही वाचा – अजबचं मला खासदार म्हणून निवडून द्या, मी तुम्हाला व्हिस्की व बिअर देणार

    राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. जाटव बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. Chandrapur Lok Sabha Constituency

    हे ही वाचा : लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का

    यावेळी श्री. जाटव म्हणाले, जिल्ह्यात किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनास येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणा-यांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील ॲपचा उपयोग करावा. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    या ॲपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास 100 मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील ऑनलाईन परवानगी करीता ‘सुविधा’ ॲप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा ॲपचा वापर करावा. ऑफलाईन परवानगीकरीता ‘एक खिडकी’ योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. जाटव यांनी सांगितले.

     

    तर खर्च निरीक्षक श्री. हिंगोनिया म्हणाले, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा संघटन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा खर्च करू शकत नाही. यापेक्षा जास्त खर्च करावयाचा असल्यास ऑनलाईन किंवा धनादेशाद्वारे करता येईल. तसेच उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या नोंदवह्या अतिशय अचूक भराव्यात. खर्चाच्या नोंदवहीची पडताळणी तीन वेळा करणे आवश्यक असून नोंदवहीत बाब निहाय खर्च रोज नमुद करावा, अशा सूचना श्री. हिंगोनिया यांनी दिल्या. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांचे सहकार्य आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’, यबाबतही त्यांनी माहिती दिली. सोबतच 27 मार्च रोजी अंतिम झालेली मतदार यादी, 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा, टपाली मतदान, निवडणुकीसाठी पोलिस कर्मचा-यांची तैनाती व इतर मनुष्यबळ, जिल्हास्तरावर व विधानसभा मतदारसंघ स्तरावर मिळणा-या परवानग्या, ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थापन, स्ट्राँग रुम, पेडन्यूज व जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, उमेदवारांच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन आदींबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना अवगत केले. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    असे आहेत संपर्क क्रमांक :

                1.मतदार मदत केंद्र / नियंत्रण कक्ष – 1950 (टोल फ्री)

                2.आदर्श आचार संहिता कक्ष – 8788510061

                3.एक खिडकी (सुविधा) कक्ष – 9673042690

                4.सी-व्हीजील / ई.एस.एम.एस – ॲपद्वारे

  • Chandrapur Loksabha Election : चंद्रपूर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटिका उज्वला नलगे भाजपात

    Chandrapur Loksabha Election : चंद्रपूर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटिका उज्वला नलगे भाजपात

    Chandrapur Loksabha Election महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 31 मार्चला शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला.

    हे अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा उमेदवार म्हणतात आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की व बिअर देणार, खासदार तर बनवा

    देशविकासाच्‍या लाटेत सहभागी होण्‍यासाठी रविवारी शेकडो उत्‍तर भारतीय नेते व पदाधिका-यांनी ‘सोमवार से रविवार जनता की सेवा करेंगे सुधीर मुनगंटीवार’ असा नारा देत भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. Chandrapur Loksabha Election

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्‍तर भारतीय समाजाचे नेते दीपक सिंग यांचेसह शेकडो नेते व पदाधिकारी तसेच, उबाठा महिला प्रमुख उज्‍ज्‍वला नलगे यांचे भाजपात स्‍वागत केले. कार्यक्रमाला भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंग चंदेल, महानगर अध्‍यक्ष राहूल पावडे यांच्‍यासह सुनिल सिंग, वंदना सिन्‍हा, रामपाल सिंग, अजय दुबे, विरेंद्र सिंग, मथुराप्रसाद पांडे, रुद्रनारायण तिवारी, शिवचंद द्विवेदी, डी. के. स‍िंग, मुन्‍ना ठाकूर, प्रकाश देवतळे यांच्‍यासह उत्‍तर भारतीय समाजातील समाजबांधव मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित होते. Chandrapur Loksabha Election

    हे ही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील 6 अट्टल गुन्हेगार तडीपार

    उत्‍तर भारतीय समाजबांधवांना संबोधित करताना सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, भाजपा माझ्यासाठी राजकीय पक्ष नसून परिवार आहे. या परिवारात तसेच, देशाच्‍या विकासाच्‍या ‘जंग’ मध्‍ये उत्‍तर भारतीय नेत्‍यांचे जंगी स्‍वागत आहे. आपल्‍या मतदारसंघातील ज्‍या काष्‍ठाने संसद भवनाचे दरवाजे तयार झाले, ते दरवाजे सोमवार ते रव‍िवार आपल्‍यासाठी खुले राहणार आहेत. आपल्‍या मतदारसंघाचा विकास करण्‍यासाठी मी तिथे चोविस तास काम करील आणि मतदारसंघाची उंची वाढवेल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी दिला. Chandrapur Loksabha Election

    चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात केवळ उत्‍तर भारतीयच नाही 16 राज्‍यातील लोक वास्‍तव्‍यास आहेत. भाजपाचा सैनिक या नात्‍याने जात-पात-रंग-राज्‍य यांचा विचार न करता सर्वांच्‍या विकासासाठी आतापर्यंत काम केले. त्‍यांचे प्रेम मतदानाच्‍या रुपात आतापर्यंत मिळाले असून यापुढेही मिळेल असा विश्‍वास ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Chandrapur Loksabha Election

    दीपक सिंग यांच्‍या नेतृत्‍वात उत्‍तर भारतीय समाजात विकासाचा दीपक चेतवण्‍यासाठी उत्‍तर भारतीय आघाडी चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीणचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्‍ती करण्‍यात येईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी यावेळी दिले.

  • Strange manifesto of Lok Sabha candidate : आनंदाच्या शिधा सोबत व्हिस्की व बिअर देणार – वनिता राऊत, लोकसभा उमेदवार चंद्रपूर

    Strange manifesto of Lok Sabha candidate : आनंदाच्या शिधा सोबत व्हिस्की व बिअर देणार – वनिता राऊत, लोकसभा उमेदवार चंद्रपूर

    Strange manifesto of Lok Sabha candidate चंद्रपूर – सध्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रामुख्याने काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांमध्ये ही लढत आहे. अशात मात्र अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची चर्चा आहे. ती यासाठी की बरेच उमेदवार हे वीज, रस्ते, पाणी, विकास अशा अनेक गोष्टींचे आश्वासन घेऊन जनतेसमोर जातात. मात्र वनिता राऊत ह्या एक वेगळाच मुद्दा घेऊन जाणार आहेत.

     

    प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रेशनच्या दुकानात स्वस्त दरात ही दारू मिळायला हवी. त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची व्हिस्की आणि बिअर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी. अशी मागणी त्यांची आहे. जर लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो तर खासदार निधीचा उपयोग करत आपण व्हिस्की, बिअर उपलब्ध करून देणार असे त्यांचे म्हणणे आहे. Strange manifesto of Lok Sabha candidate

     

    सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी निवासी वनिता राऊत ह्या वर्ष 2019 मधून चिमूर विधानसभा निवडणुकीत उभ्या होत्या, त्यावेळी जिल्ह्यात दारूबंदी होती, राऊत यांनी मला निवडून दिल्यास मी सर्वप्रथम जिल्ह्याची दारूबंदी हटवित प्रत्येक बेरोजगारांना दारूचे परवाने व गाव तिथे बार असा जाहीरनामा त्यांनी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केला होता, मात्र तेव्हा त्यांना यश आले नाही. Strange manifesto of Lok Sabha candidate

     

    5 वर्षांनी राऊत ह्या आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे, प्रस्थापित पक्षांचे जाहीरनामे व आश्वासन अजून आले नसले तर राऊत यांनी आताच आपले मत जाहीरनामा रुपी व्यक्त केले आहे. Strange manifesto of Lok Sabha candidate

    त्या म्हणाल्या की मी जर खासदार म्हणून निवडून आली तर बेरोजगारांना बार चे परवाने मी आपल्या खासदार निधीतून काढून देणार, सरकारने अंत्योदय शिधा धारकांना साड्या वाटप केल्या होत्या, त्यानंतर आनंदाच्या शिधा म्हणून 5 वस्तू दिल्या मात्र मी अंत्योदय शिधा पत्रिका धारकांना धान्य सहित व्हिस्की व बिअर देणार अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.
    लोकसभा क्षेत्रातील मतदार त्यांच्या या आश्वासनाला किती प्रतिसाद देणार हे मतदानानंतर कळेलचं.