Blog

  • Sudhir mungantiwar on sanjay raut : माझ्यामध्ये दोन वाघांची शक्ती – सुधीर मुनगंटीवार

    Sudhir mungantiwar on sanjay raut : माझ्यामध्ये दोन वाघांची शक्ती – सुधीर मुनगंटीवार

    Sudhir mungantiwar on sanjay raut चंद्रपुरात कितीही सभा घेतल्या तरी विजय हा धानोरकरांचाचं होणार असे वक्तव्य राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते, त्यावर चंद्रपूर महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांचा समाचार घेतला.

     

    राऊत हे नेहमी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात, त्यांना विदर्भातील जनतेचा राग आहे म्हणून ते असे बोलत असतात, कोरोना काळात सुद्धा ज्यांनी पाप केलं त्यांना कोरोना झाला असे वादग्रस्त वक्तव्य ते करीत असतात, पण त्यांच्या वक्तव्याला आम्ही व तुम्हीपण गंभीरपणे घेऊ नका, त्यांची पत्रकार परिषद असली की आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवत पुन्हा ते नवं ज्ञान देणार मात्र ते ज्ञान मनात रुजवू नका असं मनात ठेवत चला. Sudhir mungantiwar on sanjay raut

     

    वर्ष 2014 ला पंतप्रधान मोदी चंद्रपुरात आले होते, त्यावेळी भाजप उमेदवार हंसराज अहिर जिंकले होते, मात्र 2019 ला ते न आल्याने व उमेदवार पडले आता या वर्षीच्या निवडणूक रणसंग्रामात पहिली सभा मोदी यांची होत आहे, त्यावर मुनगंटीवार म्हणाले की मी त्याचा काही विचार केला नाही मात्र हे ऐकून मला आता दोन वाघांची शक्ती मिळाली आहे, जनता मला मतरुपी आशीर्वाद देणार हे नक्की.

  • Election campaign vehicle : त्या सरपंचावर गुन्हा दाखल

    Election campaign vehicle : त्या सरपंचावर गुन्हा दाखल

    Election campaign vehicle चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आर्णी विधानसभा क्षेत्रातील बारभाई या गावात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार वाहनाला सरपंच प्रदीप जाधव यांनी बाहेरचा रस्ता दाखविला, याबाबत समाजमाध्यमावर व्हिडीओ सुद्धा व्हायरल करण्यात आला होता.

    हे अवश्य वाचा : नितीन गडकरी यांच्या तोंडून निघालं शिलाजीत चा उल्लेख, आणि मग हश्या पिकला

    सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार वाहनाला बाहेरचा रस्ता दाखविणे सरपंच जाधव यांना महागात पडले आहे, कारण वाहन चालक ज्ञानेश्वर जाधव यांनी पारवा पोलीस स्टेशनमध्ये सरपंच जाधव विरोधात तक्रार दाखल केली. Election campaign vehicle

     

    व्हिडीओ मध्ये नेमकं काय?

    भाजपने आमच्या खात्यात 15 लाख रुपये अजून टाकलेले नाही, महागाई वाढवली, 400 रुपयांचा सिलेंडर आज अकराशे रुपयांपर्यंत गेला आहे, कास्तकारांच्या समस्येवर काही निराकरण नाही, त्यामुळे हा प्रचार वाहन आमच्या गावात नको असे बोल सरपंच जाधव यांनी वाहन चालकाला सुनावले होते.

     

    त्यामुळे वाहन चालक ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीवरून पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी पोलीस दूरक्षेत्र इंथे कलम 500,504,506,34 IPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. Election campaign vehicle

  • Electoral Roll Published : चंद्रपुरातील या संकेतस्थळावर इलेक्टोरल रोल प्रसिध्द

    Electoral Roll Published : चंद्रपुरातील या संकेतस्थळावर इलेक्टोरल रोल प्रसिध्द

    Electoral Roll Published मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.  जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या chanda.nic.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

    हे ही वाचा – 7 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्याने पाऊस झोडपणार

    मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, ते तपासून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. Electoral Roll Published

     

    13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा हे चार विधानसभा मतदार संघ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णि विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. Electoral Roll Published

    हे ही वाचा : चंद्रपुरात शिलाजीत चे राजकारण

    तर ब्रम्हपूरी आणि चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार संघ गडचिरोली लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघनिहाय सदर इलेक्टोरल रोल संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून सदर यादी संबंधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय, मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुध्दा प्रसिध्द करण्यात आली आहे.

  • Orange alert for thunderstorms : चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार

    Orange alert for thunderstorms : चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार

    Orange alert for thunderstorms मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे, 6 एप्रिलला हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 7 एप्रिलला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस येणार असा अंदाज वर्तविला आहे.

    हे ही वाचा : तर पॉवरफुल शिलाजीत देणार – नितीन गडकरी यांचं राजुरा येथील जाहीर सभेत वक्तव्य

    नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. Orange alert for thunderstorms

    हे अवश्य वाचा : आपण ही मानवी साखळी बघितली काय?

  • Nitin Gadkari Speech in Chandrapur : तर पॉवरफुल शिलाजीत देऊ – नितीन गडकरी

    Nitin Gadkari Speech in Chandrapur : तर पॉवरफुल शिलाजीत देऊ – नितीन गडकरी

    Nitin gadkari speech in chandrapur पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे, 6 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात मतदानाची साखळी

    आयोजित सभेत नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत भाजपच्या स्थापना दिवस व मुनगंटीवार यांच्यासोबत मंत्रिमंडळात केलेल्या कामाची माहिती दिली, जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम मुनगंटीवार हे करीत आहे, एडवांटेज चंद्रपूर च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल ही संकल्पना मुनगंटीवार यांची आहे, आम्ही चंद्रपूर जिल्ह्याला 474 किलोमीटर चे राष्ट्रीय महामार्ग दिले, 10 हजार कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. Nitin gadkari speech in chandrapur

    हे अवश्य वाचा – ऐन उन्हाळ्यात चंद्रपुरात पाण्याची समस्या

    देशात मागील अनेक वर्षांपासून माणूस माणसाला खेचत होता आमचं सरकार आल्यावर आम्ही ई रिक्षा बाजारात आणला त्यामुळे देशात सामाजिक क्रांती आली. Nitin gadkari speech in chandrapur

     

    आपण सर्व सुज्ञ आहात, जातीपातीचे राजकारण करू नका, कारण जो गॅस सिलेंडर हिंदूंना ज्या दरात मिळतो त्या दरात तो मुस्लिम बांधवनाही मिळतो, पुढील 5 वर्षात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार अशी माहिती गडकरी यांनी दिली.
    मात्र भाषणाच्या शेवटच्या वाक्यात गडकरी हडबडले, ते म्हणाले की सुधीर मुनगंटीवार यांना तुम्ही लोकसभेत पाठविले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी स्वतः राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार त्यांच्या ताकदीने पाठीशी राहणार, आम्ही त्यांना पॉवरफुल शिलाजीत देऊ, असे म्हटल्यावर गडकरी यांना आपण कुठे चुकलो तर नाही याचा प्रत्यय त्यांना येताच ते म्हणाले शिलाजीत म्हणजे विकासकामांसाठी देऊ, कारण मी फोकनाड्या माणूस नाही जे म्हणतो ते मी करतो, कुणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही. Nitin gadkari speech in chandrapur

     

    सध्या भर दुपारी सभा होत असल्याने अतिउष्ण जिल्ह्यातील नागरिक सभेला जाणे टाळत आहे, फक्त कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते बनले मात्र बायपास मार्गाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, त्यावर नितीन गडकरी यांनी बोलण्याचे टाळले.

  • Voting awareness campaign : मतदान करा, चंद्रपुरात मानवी साखळी

    Voting awareness campaign : मतदान करा, चंद्रपुरात मानवी साखळी

    Voting awareness campaign निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्‍यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

     

    आज चंद्रपुरातील श्री महर्षी विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी ‘मतदान करा’ हे शब्द ड्रोन द्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. Voting awareness campaign

     

    या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा अधिकारी विनय गौडा म्हणाले असे उपक्रम जिल्ह्यात राबविले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढु शकेल, कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यांच्या माध्यमातून हि जनजागृती राबवली तर ते आपल्या आई वडिलांना मतदान नक्की करावे यासाठी ते प्रोत्साहित करतील. Voting awareness campaign

  • No Parking Zone : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा नवा आदेश

    No Parking Zone : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा नवा आदेश

    No Parking Zone पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 एप्रिलला चंद्रपुरात दाखल होत आहे.

     

    महायुतिचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी हे मोरवा येथे सभा घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमननिमित्त पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. No Parking Zone

    हे ही वाचा : जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा नवा आदेश

    आयोजित सभेकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33-1 ब नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत राहत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवत जनतेला त्रास होऊ नये यासाठी 7 एप्रिल दुपारी 2 वाजता ते 8 एप्रिल चे रात्री 8 वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून मोरवा टी-पॉईंट, पडोली चौक ते वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. No Parking Zone

     

    या दोन्ही मार्गावर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये व मार्गावर कुणी दुकाने हात ठेले लावू नये याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आदेश निर्गमित केला आहे.

  • Prohibition on the use of drones : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचा महत्वाचा आदेश

    Prohibition on the use of drones : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचा महत्वाचा आदेश

    Prohibition on the use of drones लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

    हे ही वाचा : चंद्रपुरात अजित पवार गट राष्ट्रवादी कांग्रेसला शरद पवार गटाने जोरदार धक्का

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच अवकाशीय उपकरणांद्वारे (फ्लाईंग ऑब्जेक्ट, ड्रोन इत्यादी) चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 7 एप्रिलच्या रात्री 12.01 वाजतापासून 8 एप्रिलच्या रात्री 24 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. Prohibition on the use of drones

    हे ही वाचा : चंद्रपुरात आचारसंहितेचा फज्जा, आप ने केली तक्रार

    या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) मधील कलम 144 (1)(3) अन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 7 एप्रिलच्या रात्री 12.01 वाजतापासून 8 एप्रिलच्या रात्री 24 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत केला आहे. सदर आदेश 5 एप्रिल 2024 रोजी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्या स्वाक्षरीने पारीत करण्यात आला आहे.

  • Sharad Pawar Ncp : राजेंद्र वैद्य यांनी दिला अजित पवार गटाला जोरदार धक्का

    Sharad Pawar Ncp : राजेंद्र वैद्य यांनी दिला अजित पवार गटाला जोरदार धक्का

    Sharad pawar ncp चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी(शरद पवार) चे संघर्सयोद्धा आणि युवकांचे लोकप्रिय नेतृत्व आ. रोहीतदादा पवार आणि आ.सुनील भुसारा तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित शाहरुख शेख आणि शहर अध्यक्ष रियाजभाई शेख यांच्या नेतृत्वात NCP अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा NCP शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात घरवपासी करण्याचा निर्णय घेतला.

     

    शाहरुख शेख तसेच रियाजभाई व त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुल येथे आ. रोहितदादा पवार यांनी पक्षात प्रवेश दिला.या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्ष सू.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष श्री.सुमित समर्थ,ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस श्री हिराचंद बोरकुटे,नागभीड तालुकाध्यक्ष डॉ.रघुनाथ बोरकर, मुल शहर अध्यक्ष श्री.महेश जेंगठे,महीला तालुका अध्यक्ष निता गेडाम,शहर महीला अध्यक्षा सौ.अर्चनाताई चावरे,श्री.भरतकर,श्री.निपचंद शेरकी गुरुजी, सिंदेवाही तालुका अध्यक्ष इब्राहिम शेख,शहर अध्यक्ष श्री.कुळमेथे,श्री.मनोज सैनी इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. Sharad pawar ncp

     

    या प्रसंगी शाहरुख शेख यांची नागभिड तालुका NCP कार्याध्यक्ष पदावर तर श्री.श्रावण धारणे यांची नागभीड शहर NCP अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमात नागभिड तालुक्यातून राष्ट्रवादी ( अजित पवार) गटात गेलेले जवळपास ९५% कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) यात प्रवेश करून घरवापसी केली.सर्व नाव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत आ.रोहित पवार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. Sharad pawar ncp

     

    हिंगणघाट विधानसभेसाठी समनव्यक म्हणून राजेंद्र वैद्य यांची नियुक्ती

     

    वर्धा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी-राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) चे अधिकृत उमेदवार श्री.अमर काळे यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) + काँग्रेस + शिवसेना + AAP + समाजवादी पार्टी व इतर घटक पक्षांतर्गत समन्वय साधून हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात श्री.अमर काळे यांच्या प्रचारात सर्व घटक पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक करून त्यांच्या अडचणी जाणून घेवून त्या दूर करून आपसात ताळमेळ घडवून आणून सर्वांना जोमाने निवणुकीच्या प्रचारार्थ लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) तर्फे हिंगणघाट विधानसभा समन्वयक म्हणून चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची नियुक्ती विदर्भाचे पक्षाचे प्रभारी आ.अनीलबाबु देशमुख यांनी प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार केली आहे.

  • Aam Aadmi Party Chandrapur : मयूर राईकवार यांनी भाजपला दिला जोरदार धक्का

    Aam Aadmi Party Chandrapur : मयूर राईकवार यांनी भाजपला दिला जोरदार धक्का

    Aam Aadmi Party Chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर, राजीव गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालय (RCERT), चंद्रपूरने 4 एप्रिलला काढलेले नोटीस रद्द करून आज 5 एप्रिलला नवीन नोटीस जारी केले आहेत. या नव्या नोटीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.

     

    याआधी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी RCERT कुलगुरू विजय आइंचवार यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी स्वत:च्याच संचालित असलेल्या महाविद्यालयात सुधीर मुनगंटीवार यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. परंतु आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या तक्रारीमुळे महाविद्यालयाला हा निर्णय रद्द करावा लागला. म्हणजेच विजय आइंचवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या पहिल्याच कार्यक्रमावर फेरबदल करावे लागले. म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवातीलाच “क्लीन बोल्ड” मिळाले. Aam Aadmi Party Chandrapur

     

    या घटनेमुळे आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका आणखी बळकट झाली आहे. महाविद्यालयाच्या या पावलामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली आहे. Aam Aadmi Party Chandrapur

     

    जिल्ह्यात आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. कॉंग्रेस जरी जिल्ह्यातील मुख्य विरोधी पक्ष असली तरी भाजपाच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीने केल्याचे पाहायला मिळते. Aam Aadmi Party Chandrapur

     

    महाविद्यालयाने कार्यक्रमाच्या आयोजनात बदल करून राजकीय उमेदवाराला निमंत्रित करण्याचा निर्णय रद्द केला आहे. ही घटना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील लोकशाहीच्या लढ्याची एक महत्त्वपूर्ण विजय आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले, “आम्ही नियमांच्या राजवटीसाठी आणि निवडणुकीतील अधिकृत प्रक्रियेसाठी लढत आहो. लोकशाहीची शक्ती ही त्या नियमांमध्येच आहे.” Aam Aadmi Party Chandrapur

     

    महाविद्यालयाच्या या पावलामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळण्यास मदत झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जाईल.