Blog

  • Chandrapur city municipal corporation : मनपाचा आदेश झुगारला, पोलिसात तक्रार दाखल

    Chandrapur city municipal corporation : मनपाचा आदेश झुगारला, पोलिसात तक्रार दाखल

    Chandrapur city municipal corporation चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू असुन याअंतर्गत आतापर्यंत ३३ मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.  

    महत्त्वाचे : विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ.अभिलाषा गावतुरे

    शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले होते,त्यामुळे अश्या ३३ मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

    Chandrapur city municipal corporation  जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा यापुढेही सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जात आहे. तसेच मोकाट जनावरे दिसल्यास नागरिकांना तक्रार करता यावी म्हणुन मनपातर्फे ०९५१८९७६६५० हा संपर्क क्रमांकसुद्धा देण्यात आला असुन यावर तक्रार केल्यास कारवाई केली जाणार आहे.

  • School student : शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ. गावतुरे

    School student : शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ. गावतुरे

    School student एकीकडे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च होत आहे पण शालेय विद्यार्थ्यांना मात्र बस सुविधे अभावी शाळेपासून वंचित रहावे लागणे ही गंभीर समस्या सध्या उभी राहत आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

    शाळा व महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या भरपूर असल्याने काही विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे, तर उर्वरित विद्यार्थ्यांना बस मध्ये घेतल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून मुकावे लागत आहे.

     

    School student तसेच ज्या बसेस सुरू आहेत त्यांच्या वेळा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा तास व वर्ग सोडून बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.  त्यामुळे वायगाव,निंबाळा व मामला परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

    या परिसरात बसेसच्या वेळा वाढवीत त्यांची वेळ शालेय विद्यार्थ्यांना सोयीची होईल या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यासह डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम 2 महिन्यात पूर्ण करा – आमदार किशोर जोरगेवार 

    बस एकच आणि विद्यार्थी आणि प्रवासी जास्ती त्यामुळे एका बसमध्ये सारे प्रवासी बसू शकत नाही, कित्येक जणांना बसमध्ये घेतल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते बसेसच्या वेळा व शाळा सुटण्याच्या वेळेत फरक असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा शेवटच्या तासाला मुकावे लागते आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होत आहे, करोडो रुपये खर्च करून बस स्टेशन व इतर सुशोभीकरणाच्या,देखाव्याच्या वस्तू, बांधणारे सरकार व पालकमंत्री यांना विद्यार्थ्यांचे हे दुःख समजत नाही काय? असा प्रश्न यावेळी डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी उपस्थित केला.

    ही मागणी येत्या दोन दिवसात मंजूर न झाल्यास विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला.
    याप्रसंगी समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या समस्याचा पाढा वाचून आपला रोष व्यक्त केला.

  • Single use plastic ban : चंद्रपूर शहरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

    Single use plastic ban : चंद्रपूर शहरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

    Single use plastic ban चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे तुकूम परिसरातील खासरे इंटरप्राइजेस,बाजार वॉर्ड येथील मुनाफ टेभला,बंगाली कॅम्प येथील गुप्ता ट्रेडींग कंपनी, मुल्लाजी चिकन सेंटर अश्या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असुन ४० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम 2 महिन्यात पूर्ण करा – आमदार किशोर जोरगेवार

      Single use plastic ban सदर कारवाई गोदाम, दुकाने यावर करण्यात आली असुन कारवाईदरम्यान प्लास्टिकचे ताट, कप, ग्लास, चमचे,खर्रा पन्नी अश्या स्वरूपाचे प्रतिबंधित प्लास्टिक आढळुन आले. या सर्व दुकानदारांकडुन दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
    प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.
    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
    Single use plastic ban चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके यांच्या उपस्थितीत महेंद्र हजारे,भूपेश गोठे, प्रदीप मडावी व उपद्रव शोध पथकाद्वारे करण्यात आली.
  • Chandrapur : लक्ष्मी सोलापन यांचं निधन

    Chandrapur : लक्ष्मी सोलापन यांचं निधन

    Chandrapur चंद्रपुर : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांची धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मी सोलापन यांचे आज बुधवार ला दुपारी 12:45 वाजता निधन झाले.

     

    त्या 41 वर्ष होत्या ,मागील काही दिवसापासून त्या मेंदूच्या आजाराने ग्रस्त होत्या मागील आठवड्यात दवाखान्यात भरती होत्या उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले, मात्र आज अचानक प्रकृती खालावल्याने राहत्या घरी त्यांची जीवन ज्योत मावळली. त्यांच्या मागे पती, एक मुलगी व मोठा परिवार आहे.

     

    अंतिम यात्रा उद्या गुरुवार ला दुपारी 2:00 वा त्यांचे निवास आक्केवार वाडी, निर्माण नगर,तुकुम चंद्रपुर येथून निघणार असून शांती धाम, बिनबा गेट, येथे होणार आहे.

  • Kishor Jorgewar : 2 महिन्यात बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा, 5 कोटी निधी देणार : आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar : 2 महिन्यात बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा, 5 कोटी निधी देणार : आमदार किशोर जोरगेवार

    Kishor jorgewar निवडून आल्यावर काही प्राथमिक कामांच्या यादीत बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम होते. या पूलाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहिला. रेल्वे विभागातर्फे पुलाच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू होते. त्यामुळे कामात विलंब झाला, मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण करून सदर पूल नागरिकांच्या सेवेत रुजू करा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह

       महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनासह बैठक घेतली. यावेळी सदर उड्डाण पूलाच्या कामासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले असून पुलाचे काम दोन महिन्याच्या आत सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

     

    या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोबाटे, अमूल भुते, अमोल शडके, अमित घुले, शहर अभियंता विजय बोरिकर, रविंद्र हजारे, डॉ. नयना उत्तरवार, राहुल पंचबुद्धे, रविंद्र कांबळे, रफिक शेख, सारिखा शिरभाते, राहुल भोयर, आशिष भारती आदींची उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करा – आमदार सुधाकर अडबाले

      Kishor jorgewar बाबूपेठ रेल्वे रुळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या आहे. येथे उड्डाण पूल तयार करण्यात यावा, अशी येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. आपण निवडून आल्यावर या प्रस्तावित कामाला गती देण्याचे काम केले. मध्यंतर निधी अभावी काम रखडले होते. यासाठी पाठपुरावा केला. नंतर रेल्वे पुलाच्या कामाला गती मिळाली होती. मात्र रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे. केवळ पालिका अंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे आपण ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. यासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मिळवून देणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Chandrapur Police : चंद्रपुरात पुन्हा आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मृतकाच्या हातावर आहे हे नाव

    Chandrapur Police : चंद्रपुरात पुन्हा आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मृतकाच्या हातावर आहे हे नाव

    Chandrapur Police चंद्रपुरात अनोळखी इसमाचे मृतदेह मिळण्याचे प्रमाण वाढले आहे, मृतदेह मिळाल्यावर त्याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र कर्तव्याची जाणं असलेले पोलीस सदर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली नक्की करतात.

    अवश्य वाचा : अशी आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना

    9 जुलै ला शहरातील महाकाली मंदिर परिसरातील मैदानात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, मृतक हा वय 55 ते 60 वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे.

     

    मृतदेहाचे वर्णन

    अंदाजे 55 ते 60 वर्ष, वयाचा, काळा सावळा रंगाचा, उंची 5 फूट 6 इंच, डोक्यावर केस कापलेले टक्कल, दाढी मिशी पांढरी कापलेली, अंगात हिरव्या रंगाचा काळया रेघाटीचा चौकड्याचा फुल शर्ट घातलेला ,तसेच गुलाबी रंगाची गोल रंगाची गळ्याची टी-शर्ट ,व काळया रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला, बांधा सडपातळ तसेच त्याचे उजवे हातावर मंसाराम नेताम केडरी असे नाव गोंदलेले आहे.

    अवश्य वाचा : त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे कडे

    Chandrapur Police सदर अनोळखी इसम पुरूष याचे बाबत माहिती घेतली असता तो अंदाजे चार ते पाच दिवसापासून महाकाली मंदिर परिसरात फिरत असून आजारी होता व त्यास बरोबर बोलता चालता येत नव्हते, तरी सदर अनोळखी इसम याचे बाबत माहिती व ओळखत असल्यास PSI विजय मुके मो.न. 9923401065 पो. स्टे .चंद्रपूर शहर यांना कळवावे ही विनंती व आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.

  • Mukhyamantri Vyoshree Yojana : महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये

    Mukhyamantri Vyoshree Yojana : महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये

    Mukhyamantri Vyoshree Yojana राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, मनस्वास्थ केंद्र, योगापचार केंद्र आदींद्वारे वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पात्र वृध्दांना लाभ मिळण्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज मागविण्यात येत आहे.  

    महत्वाची योजना : दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

    योजनेचे स्वरुप : पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या  शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार चष्मा,  श्रवणयंत्र, ट्रायपाड स्टिक, व्हील चेयर, फोल्डिंग  वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत निधीचे वितरण ऑनलाईन पध्दतीने (महाडीबीटी) 3 हजार रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. Mukhyamantri Vyoshree Yojana

     

    लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष : 1) लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे), ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा व नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. 2) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित  सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याच्या पुरावा सादर करू शकतात. 3) सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य  प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. Mukhyamantri Vyoshree Yojana

    महत्त्वाचे : विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार काय आहे ही योजना?

    4) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात 3 हजार रुपये थेट लाभ वितरीत झाल्यावर विहीत केलेली  उपकरणे खरेदी केल्याचे  तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे  देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करावे. तसेच संबंधित प्रमाणपत्र विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून  सदर रक्कम वसूल करण्यात येईल. 5) निवड/ निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.

     

    उत्पन्न मर्यादा : लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.

    आवश्यक  कागदपत्रे : 1) आधार कार्ड/ मतदान कार्ड   2) राष्ट्रीयकृत बॅकेची बँक पासबुक झेरॉक्स  3)पासपोर्ट आकाराचे 2 फोटो 4) उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले) 5) उपकरण/साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले)

  • Legislative Council of maharashtra : शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी चव्हाण यांना निलंबित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Legislative Council of maharashtra : शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी चव्हाण यांना निलंबित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Legislative Council of maharashtra चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
    चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात श्रीमती कल्पना चव्हाण तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक कार्यरत / सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. त्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आयुक्त (शिक्षण) पूणे यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची केलेल्या तपासणीत वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व इतर अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे, त्यांचे कार्यालयीन कामकाजावर व अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, कामकाजात दप्तर दिरंगाई करणे, लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे, आदी बाबी चौकशीत आढळून आल्या. त्यानंतर श्रीमती चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 10 अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले.
    मात्र, पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. यावर मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अडबाले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सभागृहात केली.
    Legislative Council of maharashtra
    तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर आठवडाभरात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

    आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामुळे झालेला मनस्ताप बघता चंद्रपूरच्या तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यावर कारवाई पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

  • Shiv Sena District Chief Girhe : शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची माणुसकी, 2 चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

    Shiv Sena District Chief Girhe : शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची माणुसकी, 2 चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

    Shiv Sena District Chief Girhe मूल :- मुल तालुक्यातील हळदी येथे दि.६ जुलै शनिवार ला घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने राजेश बोधलकर यांची हत्या करण्यात आली.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.या घटनेची माहिती मिळताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची सांत्वना करीत मृतकाच्या दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत यापुढे मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही संदिप गिऱ्हे यांनी यावेळी दिली.

    अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    Shiv Sena District Chief Girhe मुल तालुक्यातील हळदी येथे दोन दिवसा अगोदर ह्रदयद्रावक घटना घडली.घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने पस्तीस वर्षीय राजेश बोधलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली.राजेश बोधलकर हा गावात अत्यंत शांत,संयमी व गावकऱ्यांशी मनमिळाऊपणे राहत होता.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना मिळाली.गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची भेट घेत सांत्वना केले.

    शिक्षणाची जबाबदारी

    सामाजिक जबाबदारी म्हणून मृतकाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.व यापुढेही मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार शहर प्रमुख आकाश राम,विनोद चलाख,ऋतिक मेश्राम,क्षितिज शेडमाके,लोमेश गावतुरे,वामन चलाख व आदी गावकरी उपस्थित होते.

    महत्त्वाचे : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

    दुःख बघून गिर्हे गहिवरले

    संदिप गिऱ्हे यांच्या सांत्वना भेटीत मृतकाच्या कुटुंबीयाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.कर्ता पुरुष गेल्याच्या दुःखाने पत्नी व मुलांनी एकच हंबरडा फोडला.यावेळी गिऱ्हे यांचेही डोळे पाणावले.यावेळी संदिप गिऱ्हे यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबीयांच्या पाठीशी मी सदैव तत्पर राहिन अशी ग्वाही दिली.

  • Bamani Proteins Company : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार

    Bamani Proteins Company : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार

    Bamani Proteins Company महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी सुरु होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या संचालकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरु करण्याच्या सूचना आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज कंपनी संचालकांना दिल्यात; लवकरच सदर कंपनीला अपेक्षित लेखी पत्र देवून बैठक घेऊन ही कार्यवाही पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने तसेच सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

    अवश्य वाचा : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणी पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार

    कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिले होते. गत मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट देऊन कामगारांची विचारपूसही केली होती.

    Bamani Proteins Company मंगळवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी ऐकून घेतली; पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी विषयाचे गांभीर्य आणि पार्श्वभूमी सांगत हा एक हजार कुटुंबाचा प्रश्न असल्याचे सांगितले. केरळ सरकारकडून संचालित या कंपनीच्या “डिस्चार्ज वॉटर” चा प्रश्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भुमिका त्यांनी विषद केली. मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना यातून सकारात्मक तोडगा काढून कामगारांना न्याय मिळावा यादृष्टीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठ संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन केले.

    महत्त्वाचे : व्यापारी मंडळाने पालकमंत्री मुनगंटीवार यांना दिले निवेदन, त्या आरोपीना अटक करा

    महाराष्ट्र शासन यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल अशी आश्वासन देखील कंपनीच्या संचालकांना दिले. यावर कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या सुचनेचा सन्मान ठेवत, महाराष्ट्र शासनाकडून या संबंधी आवश्यक पत्र व्यवहार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल व नंतर कंपनी सुरु करण्याबाबत सुतोवाच केले.

    सदर बैठकीला भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर व त्यांचे प्रतिनिधी, बामणी प्रोटीन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव श्री. इकबालसिंग चहल, श्री. विकास खारागे, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश ढाकणे, कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनीता सिंघल, कामगार आयुक्त आदी उपस्थित होते.