Blog

  • Ola dushkal : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – दिनेश चोखारे

    Ola dushkal : चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – दिनेश चोखारे

    Ola Dushkal अतिवृष्टीमुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतमाल पाण्याखाली आले तर शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले तर काही पिक माती खाली दबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    अवश्य वाचा : कार पाण्यात वाहत असताना युवकांनी घेतली उडी, बघा चंद्रपूरात असं काय घडलं?

    Ola dushkal सोबत वरोरा व भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पण केली आहे.
    त्यात त्यांनी म्हटले आहे कि,  मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीतुन येथील शेतकरी,शेतमजूर सावरत नाही तोच बँकेकडुन पिक कर्ज काढून तसेच हात उसणवारी रक्कम घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी,रोवणी केली होती.
    मात्र जुलै महिण्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुनधरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत. अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.

    अवश्य वाचा : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार? खासदार धानोरकर यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मु यांची भेट


    त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहुन  वरोरा व भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ भरीव मदत देण्यासह मागील वर्षी अतिवृष्टी, नदीला आलेला पुर व त्यानंतर झालेला रोगाचा प्रादुर्भाव,या संदर्भात करण्यात आलेल्या मोका चौकशीच्या आधारे थकीत नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
    याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

  • Cast Wise Census : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार?

    Cast Wise Census : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार?

    cast wise census महाराष्ट्रात मराठा समाज मनोज जंरागे याचे नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी आदोंलन करित असतानां खा.प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत जातीनिहाय जनगणेची मागणी केली.


    विविध जातीचा आरक्षणासाठी लढा सुरु असुन अनेक आदोंलने महाराष्ट्रात सुरु आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आदोंलन सुरु आहे. या आदोंलनाचा तिढा अदयापही राज्य शासन  सोडवु शकले नाही. अनेक आदोंलन कर्त्यानी आरक्षणासाठी प्राण देखिल गमावले. मागिल 14 वर्षापासून अदयापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. यामुळे सरकारकडे कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात युवकांचा जीवघेणा स्टंट

    Cast wise census या पार्शभूमीवर खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत, महाराष्ट्रातील तिढा सोडविण्याची मागणी या वेळी केली.राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार कढुन केंद्र सरकारने अहवाल मागवुन जातनिहाय जनगणना करुन 50 टक्के अरक्षणाची मर्यादा वाढवावी अषी मागणी देखिल यावेळी करण्यात आली.

    अवश्य वाचा : ओबीसींच्या 18 जातींचा केंद्रीय सूचित समावेश होणार – हंसराज अहिर

    या संदर्भात राष्ट्रपती यांनी सकारात्मक चर्चा होवुन भविष्यात या मध्ये सरकारला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत खासदार वंसतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील, खासदार संजय जाधव याची देखिल उपस्थिती होती.

  • Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

    Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

    hansraj ahir महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर दि. 26 जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली.

    अवश्य वाचा : चंद्रपूरात 2 युवकांचा जीवघेणा स्टंट

    Hansraj ahir मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह 16 जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होणार

    या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व 18 जातींचा समावेश केंद्रीय सुचीमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.

  • Chandrapur : चंद्रपुरात घडला थरारक प्रकार, कार पाण्यात आणि युवकांनी घेतली उडी

    Chandrapur : चंद्रपुरात घडला थरारक प्रकार, कार पाण्यात आणि युवकांनी घेतली उडी

    Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, जिल्ह्यातील अनेक धबधब्याजवळ काही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे.

    अवश्य वाचा : वाढदिवस नको, सेवा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय


    मात्र चंद्रपूर शहरात काही अतिउत्साही युवकांनी स्टंट केला मात्र तो स्टंट जीवावर बेतता बेतता राहिला मात्र स्टंट त्या युवकांना महागात पडला. 28 जुलैला सायंकाळी 4.30 वाजता चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी मार्गावरील स्मशानभूमीसमोर असलेल्या पुलावरून झरपट नदीचे पाणी वाहत असल्याने 2 युवकांनी त्या पुलावरून चारचाकी वाहन नेले, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि वाहन सरळ पाण्यात कोसळले.

    अवश्य वाचा : चीचपल्ली व पिंपळखुट गावात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची मदत

    Chandrapur सुदैवाने वाहनात असलेल्या दोघांचा जीव वाचला मात्र वाहन पाण्यात वाहून गेले. यामध्ये बॉबी पडाल व त्याचा सहकारी अभिजित बागलवार त्या वाहनात होते. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहनाचा शोध लागला नाही. घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

    अन्यथा मोठा अनर्थ घडला असता..


    पोलीस विभागाने आधीच नागरिकांना पुलावरून पाणी वाहत असताना जाऊ नये असे आवाहन केले मात्र पोलिसांच्या आवाहनाला दोन्ही युवक जुमानले नाही, विशेष म्हणजे सदर वाहन काही अंतरावर गेल्याने दोन्ही युवकांनी वाहनातून उडी मारली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, पावसाच्या संततधार मुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, कुणीही असा स्टंट करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • Sudhir mungantiwar birthday : वाढदिवसाला जल्लोष नाही तर सेवा करा – हरीश शर्मा

    Sudhir mungantiwar birthday : वाढदिवसाला जल्लोष नाही तर सेवा करा – हरीश शर्मा

    Sudhir mungantiwar birthday 30 जुलै रोजी राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस, दरवर्षी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो मात्र यंदा त्यांनी जल्लोष करू नका असे आवाहन कार्यकर्त्याना केले आहे अशी माहिती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिला की नाही? आमदार किशोर जोरगेवार यांचा सवाल


    Sudhir mungantiwar birthday संतकृपा हॉटल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, यंदा राज्य सहित जिल्हयात अतिवृष्टी मुळे शेतकरी व नागरिक यांचे मोठे नुकसान झाले आहे, इतकेच नव्हे तर अजूनही पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे माझ्या वाढदिवसाला घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे व 30 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी सेवा सप्ताह म्हणून साजरा करावा.
    यामध्ये पूर ग्रस्तांची मदत, आरोग्य शिबीर व नागरिकांसाठी धार्मिक स्थळी महा आरतीचे आयोजन करावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले अशी माहिती हरीश शर्मा यांनी दिली आहे.

    अवश्य वाचा : मुसळधार पावसाचा इशारा

    जिल्ह्यात अजूनही पावसाने हाहाकार माजविला आहे, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने यंदा चा वाढदिवस त्या पूरग्रस्त नागरिकांची सेवा करीत सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.

  • Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

    Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

    chandrapur rainfall चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टीवासीय गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व ताळपत्रीचे वितरण अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे करण्यात आले.

    अवश्य वाचा : पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख

    Chandrapur rainfall मुसळधार पावसाने मागील सहा दिवसापासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशा कुटुंबांच्या मदतीसाठी महेश मेंढे यांनी तात्काळ धाव घेतली असून तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही गरजूना आर्थिक मदत देण्यात आली.


    मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागांना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरत्या छप्पर म्हणून वापरल्या जातील. त्यामुळे त्यांना थोडा सहारा मिळेल या उद्देशाने त्यांना ताळपत्रीचे वाटप करण्यात आले. ताळपत्री वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. सदर उपक्रमात लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
    यावेळी मीराबाई लक्ष्मण जंगळे, नीता घनश्याम वालदे, नविना गणेश अवचारे, हनुमान नरसंहरू सेंगेरप, भारत सेंगेरप, कमलाबाई देवांगण, पिंकी शंकर बंदरकर यांना मदत करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात थरारक घटना


    यावेळी आर्थिक मदत व ताळपत्रीचे वाटप करतांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांचेसह मनपाचे माजी उपमहापौर वसंतदादा देशमुख, समाजसेविका सौ. वैशाली चंदनखेडे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चंदनखेडे, उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम, समीर सोनवाने, सर्वेश पिसे, राहुल बंडावार, सचिन रणदिवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

  • chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

    chandrapur news today : चंद्रपूर :- मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. अश्यातच अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीक असलेले तलाव फुटल्याने चिचपल्ली व पिंपळखुट गावातील घराघरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले.तीन दिवस घरात पाणी घुसून असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

    Chandrapur news today अनाज,पाणी, कपडे इतकेच नव्हे अनेकांचे शैक्षणिक दस्तऐवज सुद्धा पुरात वाहून गेले.संकटाच्या घडीत पुरग्रस्तांच्या दुखात साथ देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै शनिवारला पुरग्रस्त गाव चिचपल्ली व पिंपळखुट येथील नागरिकांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व कुटुंबातील महिलेसाठी एक साडी भेट म्हणून देत त्यांच्या दुखात सहभागी झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व सीईओ उतरले चिखलात

    अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीकचा तलाव फुटला यात चिचपल्ली येथील ३०० तर पिंपळखुट येथील ११० घरात पाणी शिरले.यात घरातील संसार उपयोगी सामानाचे तसेच धान्य,शैक्षणिक दस्तऐवज पुरात वाहून गेले.काहींचे बकऱ्या व शेती उपयोगी वस्तूही वाहून गेले.यात फार मोठे नुकसान झाले.या संकटाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांसोबत मोठ्या आस्थेने विचारपूस केली व दुःखात मी सोबत आहे असा विश्वास दिला.

    चिचपल्ली व पिंपळखुट येथील पूरपीडित कुटुंबीयांना जीवन उपयोगी वस्तूंची किट व महिलांसाठी साडी भेट म्हणून दिले.पुरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आपल्यातला माणूस असल्याचा त्यांनी परिचय करून दिला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही

    यावेळी उपजिल्हाप्रमुख सिकी यादव,शालिक फाले, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मधू मेश्राम,युवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,महिला आघाडीचे जिल्हा संघटीका कल्पना गारगोटे,विनय धोबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार,राहुल विरुटकर, मा.नगरसेवक सरफराज शेख, नागाळाचे उपसरपंच विनोद पिलरवार, पिंपळखुटचे सरपंच विनोद मेश्राम, बल्लरपूरचे माजी नगरसेवक अमित पाझारे,सागर राऊत,बब्बू पाठक,बाबा साहू,राहुल भोयर,राजू ठाकरे,सूरज घोगे, हेमराज बावने,प्रणित अहीरकर, सिकंदर शेख,गिरीश कटारे,वसीम भाई,सिकंदर शेख.शाबाज शेख, इलाजभाई, व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • Leopard Attack : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

    Leopard Attack : चंद्रपूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

    leopard attack सावली – जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे त्यांना जखमी व्हावे लागत आहे. शनिवारी २७ जुलैला दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप -लेकाला जखमी केल्याची घटना घडली. दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ जेव्हा चिखलात उतरले, आणि केलं हे काम


    Leopard attack चंद्रपुरात आज ऑरेंज अलर्ट आहे. संततधार पाऊस सुरू आहे. याच पावसात सावली तालुक्यातील पालेबारसा गावात दुपारी बाराच्या सुमारास बिबट पाळीव जनावरांची शिकार करण्याच्या उद्देशाने माधव मेश्राम यांच्या घरी शिरला. घरी त्यांचे दोन छोटे नातवंडे हे जेवण करीत असताना त्यांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे मेश्राम व शेजारी नेताजी कावळे हे हातात दंडे घेऊन हाकण्यासाठी गेले. घरा शेजारी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच बिबट्याने नेताजी कावळे यांच्यावर हल्ला केला. वडिलांवर बिबट हल्ला करीत असल्याचे पाहून मुलगा लेंस नेताजी कावळे हा धावून आला. बिबट्याने पहिले वडिलांवर त्यानंतर मुलगा लेंसवर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने जंगालच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे, वनाधिकारी पवनरकर, गोडसेलवार, धनविजय, आदे, चुदरी यांचा ताफा आला. बिबट्याला गावात व गावाशेजारी पाहण्यात आले परंतु तो पर्यंत तो पळून गेला होता.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला काय? आमदार किशोर जोरगेवार

    पालेबारसा गाव जंगलालगत आहे.त्यामुळे गावात रात्री- बेरात्री वन्यप्राणी येतात. आता तर दिवसाही येऊ लागले आहेत. जखमींना सर्वप्रथम उपचाराकरीता रूग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरीता वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. कॅमेरे लावण्यात आले असून, पिंजरा बोलावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी गस्त देणे सुरू केले आहे. भर दिवसाच बिबट्याने बापलेकावर हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दशहत पसरली आहे.

    दरम्यान १९ जुलैला सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी नलेश्वर गावात पहाटे बिबट्याने गावात शिरकाव करीत ६ नागरिकांवर हल्ला करीत जखमी केले होते. तर १६ जुलै रोजी सावली तालुक्यात रान डुक्कराने शाळकरी मुलींवर हल्ला करीत एका शेतकऱ्याला ठार केले होते, रान डुक्करच्या हल्ल्यात ६ नागरिक जखमी झाले होते.

    नागरिकांनी पेरणी करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, सध्या या घटनेमुळे पाले बारसा गावात दहशतीचे वातावरण आहे.

  • chandrapur ias officer’s : जिल्हाधिकारी व सीईओ उतरले चिखलात

    chandrapur ias officer’s : जिल्हाधिकारी व सीईओ उतरले चिखलात

    Chandrapur ias officer’s चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र 4 लक्ष 58 हजार हेक्टर असून यापैकी 1 लक्ष 88 हजार हेक्टरवर (35 टक्के) भाताचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने धानाच्या रोवणीने जोर पकडला आहे. अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावून चिखल तुडवत यांत्रिकी आणि पारंपरिक पध्दतीने धानाची रोवणी केली.  

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक नाही, आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला प्रश्न

    Chandrapur ias officers मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले. यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पध्दत जाणून घेतली.

    Chandrapur ias officers पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली तर प्रति एकर चार ते साडेचार हजार रुपये रोवणीचा खर्च येतो, मात्र यांत्रिकी पद्धतीने रोवणी केली तर एका दिवसात दोन एकर रोवणी करता येते. व एका एकराला जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मजुरीची बचत होते आणि खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. भात रोवणी यंत्राची किंमत 4 लक्ष रुपये असून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी केल्यास योग्य अंतरावर लागवड होते. त्यामुळे पिकास योग्य प्रमाणात हवा, सूर्यप्रकाश मिळतो. परिणामी भाताचे फुटवे जास्त येतात, बियाणे कमी लागते व उत्पादनात वाढ होते.

    यावेळी कृषि उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.व्यवहारे, मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, गट विकास अधिकारी श्री. राठोड व कर्मचारी उपस्थित होते.

    तालुक्यातील इतरही ठिकाणी भेटी : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी  ग्रामपंचायत मारोडा येथील सोमनाथ ऍग्रो टुरिझम पर्यटन केंद्राला भेट देऊन पाहणी केली व येथील उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच सोमनाथ येथील गोसदन प्रकल्प, मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबर्धन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.

    यावेळी संध्या गुरनुले,  मारोडा येथील सरपंच व सदस्य, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

  • Chandrapur Crime : चंद्रपुरात पोलिसांचा धाक राहिला का नाही? आमदार जोरगेवार यांचा सवाल

    Chandrapur Crime : चंद्रपुरात पोलिसांचा धाक राहिला का नाही? आमदार जोरगेवार यांचा सवाल

    Chandrapur Crime पिस्तुल घेऊन गुन्हेगार सर्रास वावरत असेल तर ही बाब कायदा सुव्यवस्थेसाठी चिंतेची आहे. वर्दळीच्या ठिकाणी  भरदिवसा गोळीबार केल्या जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित करत जिल्हात आणखी किती बळी जाऊ देणार आहात असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक  मुमक्का सुदर्शन यांना विचारला असुन रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर कार्यवाही करत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या सूचना केल्या आहे.

    अवश्य वाचा : तो नरभक्षक अडकला वनविभागाच्या जाळ्यात


       Chandrapur crime शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,  पोलीस निरीक्षक पंकज बनसोडे, पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, माता महाकाली महोत्सव  समितीचे सचिव अजय जयस्वाल, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक करणसिंह बैस आदींची उपस्थिती होती.
        शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांत शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके उचलले आहे. काही घटनांमध्ये पिस्तूलचा वापर करण्यात आला असून, ही गंभीर बाब आहे. पोलीस विभागाने सतर्क राहून, ही शस्त्रे चंद्रपूरात दाखल कशी होतात याची चौकशी करून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी गुन्हेगारीत लिप्त असलेल्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशा सूचना जोरगेवार यांनी केल्या आहेत.

         बैठकीत मागील काही दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांची तपशीलवार चर्चा करण्यात आली. विशेषतः पिस्तूलचा वापर करून झालेल्या घटनांमुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारच्या गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. शस्त्रे चंद्रपूरात कशी येतात, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. गुन्हेगारीत लिप्त असलेल्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही केली जावी. अशा गुन्हेगारांना तातडीने अटक करून न्यायालयात सादर करावे, मोठी घटना घडण्याआधीच गुप्तचर विभागा मार्फत त्याची माहिती पोलिस विभागाला मिळत असते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पून्हा सक्षम करावी, आलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता त्याची सत्यता तपासण्यात यावी अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
          अवैध व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. गस्त वाढवणे, संदिग्ध व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्या आहे.