Blog

  • fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात

    fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात

    Fatal potholes चंद्रपूर शहरातील जीवघेणा मार्ग म्हणजे बागला चौक ते लालपेठ, या मार्गावर जगात कुठेही नसलेले खड्डे तयार झाले आहे, त्या खड्ड्यातून नागरिक आपली वाट काढतात, विशेष बाब म्हणजे दुहेरी मार्ग असलेल्या या रस्त्यावर फक्त 100 मीटर रस्ता तयार झाला आणि उर्वरित रस्ता निधी अभावी रखडला.
    या मार्गावर चंद्रपूर गडचिरोली विभागाचे महावितरण कार्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, मात्र त्यानंतर सुद्धा प्रशासन व जनप्रतिनिधी झोपल्याचे सोंग करून आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील रस्त्यावर खड्डयासोबत काढा सेल्फी, आणि मिळवा रोख बक्षिसे


    Fatal potholes 10 ऑगस्टला रात्री mh34 d 7491 हा ऑटोरिक्षा लालपेठ कडे जात होता, ऑटो मध्ये 3 ते 4 प्रवासी होते, महावितरण कार्यालय पर्यंत रस्ता बरा असल्याने ऑटो व्यवस्थित जात होता मात्र अर्धवट मार्ग संपल्यावर ऑटो जीवघेण्या खड्ड्यात फसला व ऑटोचे चिमटा तुटला, यामुळे ऑटो चा पुढील भाग खड्ड्यात अडकला, या खड्डेमय अपघातात प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली.
    ऑटो रिक्षा चालकाने सरळ मनपा व जनप्रतिनिधी यांच्यावर आरोप करीत लालपेठ व बाबूपेठ भागात जनावरे राहतात काय? असा प्रश्न उपस्थित करीत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली.

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    चंद्रपूर शहरातील लालपेठ व बल्लारपूर येथे जाणाऱ्या ह्या मार्गावर रोज हजारो वाहने जातात मात्र जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते.
    मागील 3 ते 4 वर्षांपासून हा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला असून पावसाळ्यात रस्त्यावर फक्त पाणी दिसते, सदर मार्गावरील रस्ता जणू चोरीला गेला की काय अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. या मार्गावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा प्रवास केला मात्र या खड्ड्यांकडे त्यांचं लक्ष गेलं नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

  • Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

    Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

    Selfie with khadda शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूरकर जनतेला १५ ऑगस्टपर्यंत खड्ड्यांसोबतचा सेल्फी काढून पाठवायचा आहे. परिक्षकांच्या निवडीनंतर प्रथम (५ हजार), द्वितीय (३ हजार) आणि तृतीय (२ हजार) रुपयांची बक्षीसे देऊन विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाची सेल्फी विद तिरंगा स्पर्धा


    Selfie with khadda चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे दोन मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावर मुख्य बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांची या रस्त्यांने नेहमी वर्दळ असते. मागील महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील या दोन्ही मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यासोबतच तुकुम, बंगाली कॅम्प, सिव्हील लाईन व अंतर्गत रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  

    योजना – लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही नागरिक जखमीसुद्धा झाले आहेत. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने कुणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपातील अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहेत. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात चंद्रपूरकर जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन खड्ड्यांसोबतचा सेल्फी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
    —

    या क्रमांकावर पाठवा सेल्फी
    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कासिफ अली (मो. ९८६००५१११), राजू खजांची (मो. ९३२६८६९०९९) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

  • Tiger Attack : केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    Tiger Attack : केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष हे 9 ऑगस्टला वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही माहिती शुक्रवारी सायंकाळी उशीरा मीळाल्याने आणि गुराखी घरी न आल्यामुळे आज सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला.वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    योजना : लाडकी बहीण योजना यादी जाहीर


    Tiger attack मृतक गुराखी लक्ष्मण मराठे याच्या पत्नीला प्रियंका आर.वेलमे , वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादेशिक) यांचे हस्ते ३००००/- (तीस हजार) रूपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली.यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था,मूल एम.आर.वाघमारे वनरक्षक सांडाळा,आर.जे.गुरनुले वनरक्षक जानाळा, शितल बेंदले वनरक्षक सुशी, स्वप्नील आक्केवार व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.

    मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यामध्ये ग्रामीण भागात अनेक नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेला आहे त्यानंतर सुद्धा ह्या घटना नियंत्रीत करण्यास वनविभाग अपयशी ठरले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात हवाई सेवा सुरू होणार

    या घटना न व्हाव्या यासाठी वनविभागाच्या वतीने ग्रामीण भागात नुकतेच मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळू शकतो याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. वाघांची संख्या जिल्ह्यात वाढली असल्याने त्यांच्या अधिवसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ह्या घटनेत सध्या वाढ होताना दिसत आहे.

  • Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे(नागपूर )व अशोक पोतदार, (भद्रावती)ठरले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्टला मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने,मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तीक लोखंडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.

    News18 lokmat
    उत्कृष्ट वार्तांकन वर्गातून मिळाला पुरस्कार

    योजना : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    Journalist award यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.यात स्व.चांगुणाताई डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती प्रित्यर्थ ना.मुनगंटीवार यांचे तर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील(वरोरा पुण्यनगरी), द्वितीय प्रशांत खुळे,(वरोरा तरुण भारत),तृतीय अमर बुद्धारपवार (नवरगाव, पुण्यनगरी), प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार,(शंकरपूर लोकमत),प्रशांत डांगे,(ब्रह्मपुरीमहासागर) यांना दिला जाणार आहे. तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी स्व.छगनलाल खजांची स्मृती प्रित्यर्थ,अ‍ॅड.प्रशांत खजांची तर्फे शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचनकर(लोकमत चंद्रपूर), स्व सुरजमलजी राधाकीसन चांडक स्मृती प्रित्यर्थ,गिरीश चांडक यांचे कडून मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार निलेश व्याहाडकर(दै. भास्कर, चंद्रपूर) स्व.रामकुंवर सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ,के के.सिंह यांचे कडून शोध पत्रकारिता डिजिटल (पोर्टल) विभाग विजय सिद्धावार(पब्लिक पंचनामा मूल), स्व श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ किर्तीवर्धन दीक्षित यांचे तर्फे उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) हैदर शेख (टीव्ही 18 लोकमत), इतिहास तज्ञ अशोक सिंह ठाकूर यांचे तर्फे वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे (लोकमत,सिंदेवाही )यांना घोषीत करण्यात आला आहे. तसेच पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणार्‍या माजी पत्रकारांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.यात पंकज शर्मा, स्व. गजानन ताजणे, अरविंद खोब्रागडे, प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे.

  • Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

    महत्त्वाचे : वाहतुकीचे हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन


        या सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ७०००/- तृतीय रु. ५०००/-  तसेच ५०० रुपयांची १० प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन harghartiranga.com या वेबसाईटवर तसेच चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर पाठवायचे आहेत. तसेच QR कोड स्कॅन करून देखील करता येईल. तसेच सेल्फी नागरिकांना त्यांच्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात लवकरचं सुरू होणार हवाई सेवा

    अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये तिरंगा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा कालावधी ०९ ते १५ ऑगस्ट असुन सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही  आहे.स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे.  

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


          शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.

  • Karale Master : स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द चिकाटी परिश्रम घेऊन माणूस बना – नितेश कराळे 

    Karale Master : स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द चिकाटी परिश्रम घेऊन माणूस बना – नितेश कराळे 

    Karale Master गुरू गुरनुले मूल :- स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल, तर पहिले माणूस बना आणि जिद्द चिकाटी परिश्रम घेऊन अभ्यास करा आणि आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्या असा मौलिक सल्ला राज्यातील प्रसिदध वक्ते नितेश कराळे सर यांनी विदयार्थ्यांना दिला.                  
    मुल संतोष सिंह रावत मित्र परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विदयार्थी गौरव सोहळा व विदयार्थी मेळाव्या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत स्वतःचे जिवंत उदाहरण देत बोलत होते. 

             

    Karale Master मूल येथील कर्मवीर कन्नमवार सभागृहात शुक्रवारी क्रांती दिना निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन गांडवाना विदयापीठाचे निवृत्त संचालक डॉ.एन.एस.कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत  होते.प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,संचालक घनश्याम येनूरकर,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले, सामाजिक कार्यकर्त्या ममता रावत यांची उपस्थिती होती.

    महत्त्वाचे : वाहतुकीचे नियम पाळा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    सरस्वती पुजन,दीपप्रज्वलन व शारदा स्तवन गायनानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी बोलताना नितेश कराळे म्हणाले,विदयार्थ्यांनी निष्ठा आणि माणूसकी निर्माण केली पाहिजे. आयुष्यात  यशस्वी व्हायचे असेल,तर शिक्षणाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. शेती करा आणि शेतीला पुरक व्यवसायाची जोड दया. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. संकटातून यशाचा मार्ग सापडतो. असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी विदयार्थ्यांना केले. त्यांच्या प्रत्येक वाक्याला विदयार्थ्यांनी टाळया वाजवून तेवढीच दाद दिली.  

    कोणतीही गोष्ट बलिदानाशिवाय मिळत नाही.संगणकाचा शोध विदर्भातील एका गरीब शेतकऱ्यांच्या मुलानेच लावला. कष्टाने विद्वत्ता निर्माण करता येते ,असे प्रतिपादन उदघाटक डॉ.एन.एस.कोकोडे यांनी उद्घघाटन प्रसंगी व्यक्त केले. 

    अवश्य वाचा : चंद्रपुरात लवकर सुरू होणार हवाई सेवा               

    समारंभाचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी विदयार्थ्यांनी सकारात्मक विचार मनात ठेवून अभ्यास केल्यास  याशाची पायरी चढता येते. असे शेरो शायरी मधून मत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष सिंह रावत मित्र परिवाराच्या वतीने नितेश कराळे, डॉ.कोकोडे, अॅड.अनिल वैरागडे यांचा शाल श्रीफळ,स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पोलिस उपनिरिक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कविता कुमरे या विदयार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

    तालुक्यामधून प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या दहावी, बारावी आणि पदवीच्या परिक्षेतील २२ गुणवंत विदयार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल शेरकी यानी केले. संचालन संयोजक संजय पडोळे यांनी केले तर आभार सहसंयोजक गुरू गुरनूले यांनी मानले.कार्यक्रमाला  हजारोच्या संख्येने विदयार्थी, पालक,महिला नागरिक व संतोष सिंह रावत मित्र परिवार समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

    वर्तमानपत्राचे महत्व :- वर्तमानपत्राच्या वाचनाअभावी मी स्पर्धा परिक्षेत कमी पडलो. त्यामुळे नितेश कराळे यानी आवर्जून उपस्थित विदयार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाचे महत्व सांगितले. वर्तमानपत्रातून आपल्याला राष्टीय ,आंतरराष्टीय,क्रीडा आणि महत्वाच्या घडामोडी माहित होतात. सामान्य ज्ञान हे वर्तमानपत्रातून नियमित मिळत असते.तसेच कराळे यांनी विविध महत्वाच्या घडामोडी आणि स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी हे त्यांनी आपल्या मार्मिक देह बोलीतून विदयार्थ्यांना सांगितले.

  • Char dham Yatra : 18 हजार किलोमीटरचा प्रवास, मयूर चा सत्कार

    Char dham Yatra : 18 हजार किलोमीटरचा प्रवास, मयूर चा सत्कार

    Char dham yatra आजची तरुणाई भरकट चाललेली आहे ,नशेच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आरोग्य खराब करत आहे, म्हणजेच तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे असे सगळे आरोप एका बाजूला होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पौंभुर्णा तालुक्यामध्ये राहणारा घनोटी या छोट्या गावातील 23 वर्षीय मयूर देऊरमले यांनी 18000 किलोमीटर सायकलने प्रवास करून बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा पूर्ण करून पाच महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम स्थापित केला.

    महत्त्वाचे : पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी करून दिली वाहतूक नियमांची आठवण

    Char dham yatra चंद्रपूर येथे स्थानिक वरोरा नाका चौक मध्ये तो आला असता त्या ठिकाणी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, जीवन ज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे व त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचे स्वागत व सत्कार केले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात लवकर सुरू होणार हवाई सेवा


    डॉक्टर विश्वास झाडे भारतातल्या लद्दाख, मुंबई , हैद्राबाद, गोवा,बंगलोर, नागपूर व इतर अनेक मध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले होते, तसेच चंद्रपुरातील पहिले आयरन मॅन म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना शारीरिक खेळात आवड आहेच हे दिसून येते. खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ होते असे त्यांनी म्हटले आहे. मयूरचा हा सायकल प्रवास नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरेल, असे डॉक्टर विश्वास झाडे यांनी सांगितले.. त्यांचा सोबत सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर, प्राध्यापक श्याम हेडाऊ, झी मीडियाचे आशीष अंबाडे, सामाजिक कार्यकर्ते अमर रामटेके, दिक्षांत बेले व उपस्थित मित्रपरिवराने त्याचे स्वागत केले.

  • Traffic Rule : हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    Traffic Rule : हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    traffic rule आपली मुलं शाळेत व्यवस्थित जात आहे काय? ज्या वाहनातून मुले जातात ती सुरक्षित आहे का? याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शिक्षणाधिकारी, ऑटोरिक्षा तसेच स्कुल बस संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    हवाई सेवा : चंद्रपुरात लवकर सुरू होणार हवाई सेवा, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा


    Traffic rule पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना सूचना केल्या कि सर्व शाळांनी स्कुल बस सुरक्षितता नियमांचे पालन करावे, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची काळजी घ्यावी, आपला मुलगा सुरक्षितपणे शाळेत जातो काय याबाबत पालकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, सर्व शाळांनी स्कुल बस समिती स्थापन करावी, परिवहन कार्यालयातर्फे तालुका स्तरावर मोटर वाहन निरीक्षक व सहायक मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शाळेत येणारी स्कुल बस वाहने वैद्य आहेत किंवा नाही याची तपासणी स्कुल बस समिती मार्फत करण्यात यावी. सर्व स्कुल बसेस यांना gps ट्रॅकर व सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे, चालक व वाहक यांना वर्षातून एकदा अग्निशमन यंत्र बाबत प्रशिक्षण द्यावे, विद्यार्थिनीवर होणारे छळ याबाबत पोलिसांना कळविणे, ऑटोरिक्षा मध्ये अतिरिक्त विद्यार्थी वाहतूक करू नये, चालकांची नियमित नेत्र तपासणी करण्यात यावी. अश्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिल्या.

    महत्वाचे : मुख्याध्यापकाचे काम करून देण्यासाठी लिपिकाने मागितली 15 हजाराची लाच


    शाळेबाबत काही तक्रार असल्यास rto कार्यालय व्हाट्सएप क्रमांक 07172-272555 व ईमेल आयडी dyrto.34-mh@gov.in वर संपर्क करावे किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे क्रमांक 7020212092 या क्रमांकावर संपर्क करावा असे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले.

  • Chandrapur district : चंद्रपुरात लवकरचं हवाई सेवा सुरू होणार

    Chandrapur district : चंद्रपुरात लवकरचं हवाई सेवा सुरू होणार

    Chandrapur district सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा घेत असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळाच्या कामासंदर्भात खासदार धानोरकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. किंजरापू राममोहन नायडू यांची दिल्ली येथे भेट घेतली.

    लाचखोर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढोणा गावातील शाळेत मुख्याध्यापकाला लिपिकाने मागितली लाच

    Chandrapur district चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच विमानतळ व्हावे या मागणीसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी सरकार च्या काळात केंद्र सरकार कडे मागणी केली होती. त्यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली असून प्रस्तावित विमानतळाला लागणाऱ्या 840 एकर जागेपैकी 700 एकर जागेचे भुमी अधिग्रहण झाले असून उर्वरीत जागेचे तात्काळ भुमी अधिग्रहन करुन मुर्ती विमानतळाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या कडे केली.

    त्यासोबतच मोरवा विमानतळाच्या रनवे 700 मीटर पर्यंत वाढवून हवाई सेवा सुरु करण्याची मागणी देखील यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्याने हवाई मार्ग सुखकर व्हावा यासाठी सदर विमानतळाचे काम त्वरीत पुर्ण करावे. यासंदर्भाने देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. यासंदर्भात माहिती घेऊन लवकरच निर्णय घेणार असल्याचे विमान वाहतुक मंत्री श्री. किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितले.

    योजना – लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

    लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, यापूर्वी सुद्धा त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्येबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. आता हवाई सेवेचा प्रश्न निकाली लागल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना नक्की होणारचं.

  • Today Acb trap : मुख्याध्यापकाला त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिकाने मागितली लाच

    Today Acb trap : मुख्याध्यापकाला त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिकाने मागितली लाच

    today acb trap मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सेवा कालावधी दरम्यान जमा असलेल्या अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्याकरिता व मुख्याध्यापक यांचे कवरिंग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठविण्याकरिता मुख्याध्यापक यांच्या शाळेतील लिपिकाने सदर काम करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागीतिली, मात्र माजी मुख्याध्यापक यांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार देत कनिष्ठ लिपिक व त्यांच्या खाजगी इसमाला अटक करायला लावली.

    महत्त्वाचे : 17 ऑगस्टला चंद्रपुरात सुरू होणार ओबीसी वसतिगृह

    Today acb trap वाढोणा तालुका नागभीड येथील समाजसेवा विद्यालयातून वर्ष 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेले तक्रारकर्ते मुख्याध्यापक यांनी सेवा कालावधी दरम्यान अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणिकरण करण्याकरिता मुख्याध्यापक यांचे कवरिंग पत्र लेखाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठवायचे होते मात्र त्याच विद्यालयातील कनिष्ठ लिपिक 54 वर्षीय मोहम्मद अकील इस्माईल शेख यांनी सदर काम करण्यासाठी माजी मुख्याध्यापकाला 15 हजार रुपयांची लाच मागीतली.


    लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने माजी मुख्याध्यापक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 6 ऑगस्टला तक्रार नोंदविली. 7 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली.
    8 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला लिपिक मोहम्मद शेख यांनी तडजोडीअंती पहिला हफ्ता 5 हजार व काम झाल्यावर नंतर 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.


    वाढोणा येथील अपना टी स्टोल अँड नास्ता पॉईंट येथे मोहम्मद शेख यांनी माजी मुख्याध्यापकला बोलाविले.
    त्याठिकाणी 5 हजार रुपये कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकिल इस्माईल शेख यांनी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये स्वीकारत ते पैसे खाजगी इसम 34 वर्षीय श्रीकृष्ण परसराम शेंडे यांच्याकडे दिली, त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिक व खाजगी इसम शेंडे यांना रंगेहात अटक केली.
    दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नरेश नन्नावरे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मेघा मोहूर्ले, रवी तायडे यांनी केली.

    विशेष बाब म्हणजे ज्या शाळेत मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी घडविले, त्याना चांगली शिकवण दिली पण त्याच शाळेतील लिपिक हे चांगल्या शिक्षणाचा बोध घेऊ शकले नाही. मात्र मुख्याध्यापकाने शिस्तबद्धता पाळत लाचखोर वृत्तीला ठेचून काढले.