Blog

  • Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    big road accident गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावरील निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ आज 13 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    राजकीय : विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मतांची आघाडी घेत निवडून येणार


    Big road accident जिवती तालुक्यातील 5 तरुण MH-04 FR-4081 या अर्टिगा कारने चंद्रपूर वरून गडचांदूर कडे येत असताना गडचांदूर पासून अवघ्या 5 ते 7 किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-18 N-6656 ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज गव्हाले वय 22 रा. शेणगाव, सुनील किजगीर वय 27 रा. शेणगाव, आकाश पेंदोर 22 रा. पाटण, श्रेयश पाटील वय 22 रा. टाटाकोहोड ह्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय गायकवाड रा. कोलामगुडा हा गंभीर जखमी झाला.


    अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठविला व गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र जखमी युवक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगारांची चंद्रपुरात गोळ्या झाडून हत्या


    मागच्या आठवड्यात सुद्धा याच मार्गावर उभ्या ट्रकला धडक दिल्याने दोन जणांच्या मृत्यू झाला होता. परत रात्री अशीच पुनरावृत्ती झाल्याने मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोक संतापले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करत उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन मध्ये आणले व रास्ता खुला रहदारीस केला. समोरील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

    भोयेगाव-गडचांदूर मार्गावर अपघाताचे सत्र

    काही वर्षांपासून सुरू झालेल्या या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, सदर मार्गावर रोज 2 ते 3 अपघात होतात, या मार्गावर सर्व्हिस रोड नाही, रस्त्यावर वाहने उभे करू नका असे प्रशासनाचे निर्देश असताना सुद्धा चालक वर्ग प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नाही.

  • Muddy Water : चंद्रपूर जिल्ह्यातील या नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी

    Muddy Water : चंद्रपूर जिल्ह्यातील या नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी

    muddy water पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर गावात मागील आठ दिवसांपासून ताप,सर्दी, अतिसाराची साथ पसरली आहे. आतापर्यंत गावातील २० लोकांना साथ रोगाची लागण झाली आहे. या साथीत चार दिवसापुर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळ माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी गंगापूर वासीयांची भेट घेतली व चार दिवसापुर्वी दि.८ ऑगस्टला गंगापूर गावातील ४२ वर्षीय शोभा भिकाजी वाघाडे या महिलेचा तापाने मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

    Muddy water गंगापूर गावातील नागरिकांना गावात जलशुद्धीकरण संयंत्र नसल्याने नाईलाजाने वैनगंगा नदितील गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावातील नागरिकांनी शुध्द पाण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती.मात्र प्रशासनाने याकडे आजपर्यंत कानाडोळाच केला आहे. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अख्खा गाव वैनगंगा नदितील गढुळ पाणी पितात.त्यामुळेच गंगापूर गावात मागील आठ दिवसांपासून ताप, सर्दी, अतिसार, हगवनची साथ पसरली आहे.या गावातील २० लोकांना साथीच्या रोगाची लागण झाली आहे.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फायदा फक्त याच महिलांना मिळणार

    ताप,सर्दी,हगवण,उल्टी यामुळे गावात भयंकर वातावरण पसरले आहेत.गावातील अर्धे लोकं साथीच्या आजारांनी परेशान आहेत.चार दिवसापूर्वी साथीच्या आजारांने गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी गंगापूर येथे येऊन गंगापूर वासियांची भेट घेतली.व मृतक महिलेच्या मुलीची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, ग्रा.पं.सदस्य वैभव पिंपळशेंडे राहुल भोयर उपस्थिती होते

    गंगापूर गावातील लोकं पर्याय नसल्याने वैनगंगा नदितील गढुळ पाणी पित असल्याने त्यांना अतिसाराची लागण झाली आहे.या समस्येबद्दल चेक ठाणेवासना येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांनी गावकऱ्यांच्या मदतीला धावून गेले.त्यांना यथोचित मदत केले.व गंगापूर गावातील भिषण वास्तविकता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना याबाबत माहिती दिली.

    राजकारण : विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मतांच्या आघाडीने निवडून येणार

    माहिती मिळताच संदिप गिऱ्हे दि.१२ ऑगस्ट सोमवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास गंगापूर वासियांची भेट घेतली. गढुळ पाणी न पिण्याची विनंती केली.व गंगापूर वासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही सुद्धा दिली.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावात मेडिकल कॅम्प लावण्याच्या संबंधित विनंती करणार असल्याचेही त्यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला.यावेळी येथील प्रत्येक घरी जीवन ड्रापचे वाटपही करण्यात आले.

  • Warora Vidhansabha : मला विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मताने निवडून येणार

    Warora Vidhansabha : मला विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मताने निवडून येणार

    warora vidhansabha राज्याची आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांनी होणार आहे, त्यापूर्वी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व नव्या चेहऱ्यानी विधानसभा क्षेत्रात तयारी सुरू केली आहे.

    मात्र भद्रावती येथील माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख यांनी उमेदवारी दिल्यास मी 75 हजार मतांची आघाडी घेत निवडणूक जिंकणार असा दावा केला आहे, त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचेकडे विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे.

    गुन्हेगारी : चंद्रपुरात भरदिवसा गोळीबार, टोळीयुद्ध भडकले, कुख्यात गुंड हाजी सरवर ची हत्या

    Warora vidhansabha विशेष म्हणजे आत्राम यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे, त्यांच्या मागणीवर पक्षप्रमुख काय करतात ही तर येणारी वेळ सांगणार, त्यापूर्वी मीनल आत्राम कोण आहे याबाबत आपण जाणून घेऊ…

    शिवसेना जिल्हा प्रमुख महीला आघाडी चंद्रपूर
    चंद्रपूर जिल्हयातील वरोरा विधानसभा ७५ हि विधानसभा शिवसेना पक्षाचे गड आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना माणनारा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे. येथे शिवसेना पक्षाचे संघटन तसेच महिलांचे संघटन मजबुत असुन या क्षेत्रामध्ये कार्यकत्यांची खुप मोठी फळी असून या विधानसभेची मागणी सौ मिनलताई आत्राम यांनी एकनाथजी शिंदे साहेब, मुख्य नेते शिवसेना पक्ष तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे केली आहे.

    योजना : लाडकी बहीण योजनेचे फक्त या महिलांना मिळणार 3 हजार रुपये

    सौ मिनल ज्ञानेश्वर आत्राम भद्रावती ता. भद्रावती जि.चंद्रपूर येथील मुलगी असून आदीवासी समाजाची मुलगी आहे. त्या गेल्या ३० वर्षापासून शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ काम करीत असून शिवसेना पक्षाची कट्टर शिवसैनिक महिला कार्यकर्ती आहे. आत्राम ह्या भद्रावती नगर पालीकेची माजी नगराध्यक्षा असून तिन वेळा नगरसेवक म्हणुन निवडून येत आहे व विद्यमान नगर सेवक आहे. अध्यक्ष पदाच्या कारकीर्दी मध्ये भद्रावती शहराचा सर्वांगीन विकास करुन डेव्हलपमेन्ट सिटी तयार केली. पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्वाना सोबत घेवुन गावाचा विकास केला त्यामुळे विकास कामाच्या नावाने व शिवसेना पक्षामुळे माझे चांगले नाव आहे तसेच या क्षेत्रामध्ये माझी चागली पकड असुन भद्रावती-वरोरा शहरामध्ये शिवसेना पक्षाचे अनेक आंदोलन केले आहे.

    विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन महिलांचे संघटन मजबूत केले तसेच महिलांचे मेळावे घेतले व महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मदत केली. या विधानसभे मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून आता परत एकदा शिवसेना पक्षाने शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी चंद्रपूर या पदाची जबाबदारी दिली असुन यामुळे पक्षाचे कार्यक्रम घेणे, संकटकाळी नागरीकांना मदत करने यामुळे पुन्हा माझा जनसंपर्क वाढला आहे. सध्या आत्राम ह्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत असून चंद्रपूर जिल्हयात संपूर्ण तालूका प्रमुख व शहर प्रमुख महिलांच्या नियुक्ति करुन महिलांचे संघटन मजबूत फळी तयार केली असुन ते माझ्या पाठीशी भक्कम पणे उभे आहे. या विधानसभा क्षेत्रातला प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता व पदाधिकारी याचा मला पाठींबा असुन माझ्या सोबत खंबीरपणे उभे आहे.

    वरोरा-भद्रावती विधानसभा ७५ या क्षेत्रातील संपूर्ण आदिवासी समाज माझ्या सोबत असून मी आदिवासी समाजाची विदर्भ अध्यक्ष महिला या पदावर काम करीत आहे. तसेच दलित, ओ.बी.सी व ईतर समाज माझ्या सोबत असून सर्व जनतेचा मला पाठींबा असल्याने यांचा आशिर्वादा माझ्या सोबत असल्याने या विधानसभे मध्ये माझा विजय निश्चीत आहे व मी ७५ हजार मतांनी लीड घेऊन निवडून येणार.

    मी सर्व क्षेत्रामध्ये सक्षम असुन येथे मला तोड नाही. तरी एकनाथजी शिंदे साहेब आपण माझ्या ३० वर्षापासुन पक्षात केलेल्या कामाची दखल घेवून मला कामाची पावती म्हणून वरोरा विधानसभा ७५ ची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हा प्रमुख महीला आघाडी चंद्रपूर यांनी एकनाथजी शिंदे यांचेकडे केलेली आहे.

  • chandrapur rular : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांच्या कुटुंबाला मदत

    chandrapur rular : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांच्या कुटुंबाला मदत

    chandrapur rular गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष यांना आठ दिवसापूर्वी वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार, कुख्यात गुन्हेगार हाजी ची हत्या

    Chandrapur rular याबाबत राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन हल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांची पत्नी श्रीमती पूर्णाबाई मराठे यांना दिनांक १२/८/ २०२४ रोजी शासनाच्या वतीने १० लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला.

    याप्रसंगी चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, चीचपल्ली वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, नंदू रणदिवे व वन कर्मचारी उपस्थित होते. झालेली घटना अशी की, गाई बैल चरायला नेणारा गुराखी रात्री पर्यंत घरी न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याच्या मृतदेह मीळाला होता. ही घटना माहीत होताच विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी केळझर येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.

    महत्त्वाचे : शेतात रोवणी करीत असताना महिलांसमोर आला मोठा अजगर, आणि घडलं असं

    तसेच वनविभाग व पोलीस प्रशासनाने आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेश झिरे व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सी वनरक्षक यांनीही तात्काळ दखल घेऊन वनविभागाच्या वतीने सहकार्य केले व तसा अहवाल शासनाकडे तात्काळ पाठविण्यात आला होता.

  • shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

    shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

    shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली.

    योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार

    घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखा येथे आत्मसर्पण केले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
    विशेष म्हणजे जुलै महिन्यात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहे.

    घटना काय?

    Shootout दुपारच्या सुमारास हाजी व त्याचे सहकारी बिर्याणी खाण्यासाठी हॉटेल शाही दरबार येथे दाखल झाले, मात्र काही वेळाने त्यांच्यावर पाळत ठेवून असणारे युवक तिथे दाखल झाले आणि हाजीवर गोळीबार केला या गोळीबारात हाजी चा सहकारी शिवा यांच्या पायाला गोळी लागली, 2 गोळ्या हाजी वर झाडण्यात आल्या, त्यानंतर हाजीवर चाकू हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात हाजी सरवर शेख चा मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच रामनगर व स्थानिक गुन्हे शाखा त्याठिकाणी दाखल झाली, 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले असून यामध्ये मुख्य आरोपी म्हणून समीर हे नाव पुढे आले आहे.

    आमदार जोरगेवार यांनी पोलीस यंत्रणेवर उपस्थित केले होते प्रश्नचिन्ह

    जुलै महिन्यात लागोपाठ 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, पोलीस प्रशासनाने पहिल्या घटनेनंतर कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, जोरगेवार यांनी पोलीस विभागाला धारेवर धरल्यावर थातुरमातुर कारवाई केली मात्र ठोस कारवाई झाली नाही.

    आरोपी व मृतक हे दोघेही आधी मित्र होते, त्यांनतर दोघांनी मिळून गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं, मात्र या क्षेत्रात एकच वाघ असतो त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्वातून ही घटना घडली अशी माहिती पुढे आली आहे.

  • Python : रोवणी सुरू असताना शेतात आला अजगर

    Python : रोवणी सुरू असताना शेतात आला अजगर

    python गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात सध्या धान रोवणीचे काम जोरात सुरु असून सकाळ पासूनच शेतकरी बांधव व महिला मजूर शेतात जातात. रोवनिच्या कामासाठी भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवन्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. त्यामुळे महिला घाबरून गेल्या. अतीशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचे याचं महिलांना मिळणार 3 हजार रुपये

    शेतमालकाने तात्काळ संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचेशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. माहिती मीळताच संस्थेचे सदस्य अंकुश वाणी ला सोबत घेऊन शेतातील त्या भल्या मोठ्या अजगराला स्थानिक दोन युवकांच्या मदतीने पकडले.

    राजकीय : भावी अधिकाऱ्यांच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

    Python भंजाळी हे गाव पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात येत असल्याने ही माहिती वनरक्षक विनोद कस्तूरे यांना देण्यात आली. भल्या मोठ्या अजगराला पकडुन गावकरी आणि महिला मजुरांना भयमुक्त केल्यामुळे त्यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांचे आभार मानले. अजगराची लांबी जवळपास साडेबारा फुट असुन वजन तीस कीलोच्या जवळपास आहे.

    अजगरांच्या विभिन्न जाती

    अजगरांच्या बऱ्याच जाती आहेत. पायथॉन रेटिक्युलेटस हा सर्वांत मोठा अजगर ब्रह्मदेश व इंडोचायनापासून फिलिपीन्स बेटांपर्यंत आढळतो त्याची लांबी १० मी. पर्यंत असते. पा.मोलुरस ही भारतातील सामान्य जाती सुमात्रा आणि जावामध्येही आढळते. पा. सेबी ही आफ्रिकेतील जाती सुमारे ६ मी. लांब असते. पा. रेजियस आणि पा. स्पायलोटिस या अनुक्रमे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्‍या जाती दिसायला सुंदर असतात.

    भारतीय अजगर सामान्यतः २․५-५ मी, लांब असतो, पण ७-८ मी. लांबीचे नमुनेही आढळतात. त्याचे शरीर बरेच अवजड असते. रंग फिक्कट पिवळा असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे साधारण चौकोनी सुंदर ठिपके असतात. डोक्यावर बाणाच्या आकृतीचा एक मोठा डाग असतो.

    लहान खडकाळ टेकड्यांच्या उतरणीवर आणि नद्या व मोठे तलाव यांच्या आसपास तो आढळतो जंगलातही तो असतो. अजगराला वरचेवर तहान लागत असल्यामुळे पाण्याच्या जवळपास रहाण्याची त्याला जरूरी भासते.

    पक्षी आणि हरणाएवढे सस्तन प्राणी यांवर तो आपली उपजीविका करतो ऑस्ट्रेलियातील अजगर सुसरींवरदेखील उपजीविका करतात.

    उंच झाडावरील फांदीला शेपटीने विळखे घालून शरीर लोंबकळत ठेवून तो भक्ष्याची अत्यंत जागरूकतेने टेहळणी करीत असतो. भक्ष्य आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याच्या अंगाभोवती विळखे घालून तो घट्ट आवळतो भक्ष्याच्या फुप्फुसावर आणि हृदयावर दाब पडल्यामुळे ते गुदमरून मरते नंतर खूप मोठा आ वासून तो ते हळूहळू गिळतो. अजगर विषारी नसतो. अचाट शक्ती असलेला हा प्रचंड साप सुस्त असून त्याच्या हालचाली मंद असतात. तो सहज माणसाळतो.

  • Competitive Exam Preparation : भावी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

    Competitive Exam Preparation : भावी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार

    Competitive Exam Preparation ब्रम्हपूरी शहरातील बोंडेगाव वार्ड येथे प्रज्ञा राजकुमार मेश्राम ही युवती राहते. सदर युवती ही अनाथ असुन काही वर्षापुर्वी तिचे आईवडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हा पासून ती आपल्या आत्यासह दोघीच जणी राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला शिक्षण घेतांना अनेक अडथळे निर्माण होत होते. तरी सुद्धा या युवतीने ब्रम्हपूरी येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र तिला भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनायचे असल्याने ती पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.

    योजना : लाडक्या बहीण योजनेचे फक्त या महिलांना मिळणार 3 हजार रुपये

    Competitive Exam Preparation आता पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती दिल्ली येथे जाणार आहे. मात्र दिल्ली येथील स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेची शुल्क भरण्यासाठी तिच्या कडे पैसे नव्हते. मात्र तिने ऐकले होते की ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे नेहमीच प्रत्येक गरजुंच्या मदतीला धावून जात असतात. व त्यांच्या कडे आपली समस्या घेऊन गेलेला माणुस कधीच निराश होऊन परतत नाही. म्हणून ती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी येथील निवासस्थानी आली व त्यांना भेटुन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीकरीता तिला येत असलेल्या अडचणीबाबत माहीती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सदर युवतीला दिल्ली येथील संस्थेत शुल्क भरण्यासाठी लागणार असलेली सर्व आर्थिक मदत तात्काळ त्या युवतीला दिली. यावेळी न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार यांनी देखील तिला आर्थिक मदत दिली. युवतीने देखील आमदार विजय वडेट्टीवार व न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार यांचे आभार मानत हसऱ्या चेहऱ्याने प्रशासकीय अधिकारी बनून ब्रम्हपुरीचे नाव उंचावणार असे सांगितले.

    ब्रह्मपुरी विधानसभा असो की इतर क्षेत्र त्यामध्ये गरजू नागरिकांच्या मदतिला धावून जाणारे विजय वडेट्टीवार हे आपल्या कार्याने नेहमी चर्चेत असतात, नागरिकांना न्याय आणि त्यांचा अधिकार वडेट्टीवार हे अग्रक्रमाने मिळवून देतात.

  • ladki bahin yojana : फक्त याचं महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार रुपये

    ladki bahin yojana : फक्त याचं महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार रुपये

    ladki bahin yojana सध्या राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भुरळ पाडत आहे, निवडणुकी आधी महायुती सरकारने मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्प अधिवेशनात अजित पवार यांनी केली होती.

    योजनेत अर्ज करण्यासाठी विविध अटी ठेवण्यात आला, केसरी रेशनकार्ड, आधार कार्ड, हमी पत्र, शाळा सोडल्याचा दाखला असे विविध कागदपत्राच्या आधारावर सदर योजनेत महिला पात्र असणार, अर्ज करण्याची तारीख येताच महिलांनी सेतू केंद्रावर अमाप गर्दी केली, योजनेचे सर्व्हर जाम झाले, सरकारने नारीशक्ती ऐप काढली महिलांनी घरूनच अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले.

    योजना लाडकी बहीण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

    Ladki bahin yojana दिवसा अर्ज भरण्यास महिलांना अडचण येत असल्याने अनेकांनी मध्यरात्री आपले अर्ज भरले, अर्ज केल्यावर महिला निश्चिन्त झाल्या, मात्र अर्ज स्वीकारल्यावर काय सूचना येणार याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले, काही दिवसांनी नारीशक्ती व लाडकी बहीण योजना पोर्टलवर अनेकांचे अर्ज in review, pending, approved, disapprove असे संदेश दिसायला लागले अनेकांना काही समजले नाही, त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज चुकले त्यांना पुन्हा एकदा अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली.

    महायुती सरकारने योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला देणार असल्याचे जाहीर केले, मात्र अनेक महिलांचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांचा अर्ज मंजूर होणार की नाही अशी चिंता आजही महिलांच्या मनात आहे, तर आपण याबाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया.

    सध्या अर्जाची स्थिती काय आहे?

    Pending Status – पेंडिंग अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास सदर अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं.

    Reject Status – अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द असा शेरा असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल्याचं लक्षात घ्यावं.

    Review Status – अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे असं समजा.

    Approval Status – हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दर्शवतो.

    वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळते. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं.

    अर्ज प्रलंबित विंका पुनरावलोकन टप्प्यांमध्ये असला तर निधी येण्यासाठीची प्रतीक्षा आणखी वाढत असून, अर्ज रिजेक्ट म्हणजेच रद्द झाल्यास मात्र खात्यावर कोणतीही रक्कम जमा होत नाही. राहिला मुद्दा एखादा अर्ज प्रलंबित का राहतो याविषयीचा, तर यामागं काही कारणं आहेत.

    अनेकदा अर्ज भरताना काही चूका झालेल्या असतात. पण, अर्ज भरताना काहीही चूक न होताही अर्ज प्रलंबित दिसत असल्याच अर्जदारांनी चिंता करू नये. हा अर्ज पुढील प्रक्रियेतून जात असून, तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळंही Pending Status दाखवलं जातं.

    असं कळेल अर्जाचं स्टेटस?

    > मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करा
    > अॅप सुरु करून त्यात लॉगइन करा.
    > अर्डाचा क्रमांक किंवा अर्जदार महिलेचं नाव टाकून Get Status वर क्लिक करा.
    > तुमच्यासमोर अर्जाच्या स्टेटसचे तीन पर्याय दिसणार असून, तिथं तुम्ही नेमकं स्टेटस पाहू शकता.

  • Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

    Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

    har ghar tiranga हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक येथे करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    राजकीय वार्ता : चंद्रपुरात मनसेचे इंजिन धावणार


       शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतल्या जात असुन १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

    सामाजिक : चंद्रपुरातील जीवघेण्या खड्ड्यात अपघात


      Har ghar tiranga शहरातील सर्व महाविद्यालये, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये यांना पत्र देऊन रॅलीत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने विद्यार्थी, शासकीय कर्मचारी,राजकीय पक्ष,मनपा अधिकारी – कर्मचारी व इतरांचा प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. बाईक रॅली असल्याने हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.  

       
        प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ते परत सावरकर चौक ते प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट ते अंकलेश्वर गेट ते बागला चौक ते अंचलेश्वर गेट असा रॅलीचा मार्ग असुन मनपा कार्यालय गांधी चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे.

    राजकीय : खड्डयासोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे


        त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट रोजी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले असुन मनपा अधिकारी कर्मचारी व व्यावसायिक कलाकार यात सहभागी होणार आहेत.स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या आप्तजनांना या कार्यक्रमांत सन्मानित करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियान सर्वांचे असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

    Chandrapur Mns आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
    आज 10 ऑगस्टला शहरातील महेश भवन येथे चंद्रपूर मनसेचा विधानसभा मेळावा आयोजित केला होता.
    आयोजित मेळाव्यात मनसे नेते राजू उंबरकर, मनसे प्रवक्ते योगेश चिले, शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील नाकर्तेपणाच्या खड्ड्यात झाला अपघात


    Chandrapur mns यावेळी प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की मनसे चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागेवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आमच्याकडे उमेदवार सुद्धा तयार आहे, लवकरच पूर्व विदर्भात राज साहेब ठाकरे यांचा दौरा होईल, 5 वर्षे सरकार जनतेला आश्वासन देत आहे आता आम्ही मैदानात उतरलो आहे, सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सध्या सुरक्षित बहीण योजना राबविण्यात यावी. बहिणींना सध्या सुरक्षेची गरज आहे.

    राजकीय : चंद्रपूर कांग्रेसचे सेल्फी विद खड्डा स्पर्धा व आंदोलन

    आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे ला फारसे यश मिळाले नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा जागेवर रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, राष्ट्रीय पक्षाना राजूरकर यांनी चांगलाच घाम फोडला होता, मात्र आता रमेश राजूरकर हे भाजप पक्षात गेले असल्याने मनसेला उमेदवारांची वानवा आहे.

    राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभेतील निवडणूक लढविणार्या मनसे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, आता या पार्श्वभूमीवर मनसे 6 जागा लढविणार आहे मात्र उमेदवार कोण आहे? याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 200 ते 225 जागेवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले मात्र ज्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता आहे त्यांना उमेदवारी देणार असे म्हटले होते, मात्र चंद्रपुरात जिंकण्याची शक्यता असलेला उमेदवार सध्या तरी पक्षात नसल्यासारखे चिन्ह आहे, तरीही मनसे प्रयत्न करीत उमेदवार निवडत निवडणूक लढविणार आहे.