Blog

  • Sudhir mungantiwar on ministry | आपलं विमान पुन्हा उतरणार – सुधीर मुनगंटीवार

    Sudhir mungantiwar on ministry

    Sudhir mungantiwar on ministry : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत. आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचाने केली कमाल

    कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. त्यामुळे ‘बाजीगर’ होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar mla) यांनी सत्काराला उत्तर दिले.

    घुग्घुस येथे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले. आठवडी बाजार घुग्घुस येथील स्व. प्रमोद महाजन रंगमंचावर आयोजित या सोहळ्याला आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम आदि नागरीक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

    विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काही ठिकाणी संघर्ष बघायला मिळाला. पण कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा आत्मविश्वास असेल तर जगातील कुठलीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  

    महायुतीला या निवडणुकीत जनतेने व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. या यशात सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. आम्हाला बहिणींनी भाऊबिजेचे रिटर्न गिफ्ट दिले, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तर घुग्घुसच्या जनतेने प्रेम दिलेच याचा उल्लेख आ. श्री. मुनगंटीवार यांनी केला. सत्कार सोहळ्याच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी विवेक बोढे व त्यांच्या टीमचेही श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले.

    देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) हे त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी काम करतील, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका आपण जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    १६ मार्च १९९५ मध्ये घुग्घुसने माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून दिली. याच गावातील जनतेने मला निवडून दिलं नसतं तर देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढविणारी कामे करू शकलो नसतो. पक्षाने संधी दिली, पण लोकांनीही संधी दिली, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.  घुग्घुसच्या विकासासाठी मी कायम सोबत आहे. आमच्यावर लोकांनी प्रेम केले आहे. त्याचे ऋण विकासकामे करूनच फेडण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आज आमचा सत्कार नसून भविष्याच्या झंझावाती विकासकामांची ऊर्जा आहे, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    sudhir mungantiwar satkar

    धुकं कायमस्वरुपी नसतात
    आम्हाला सत्तेची भूक नाही, आम्हाला विकासाची भूक आहे. पदाचीही भूक नाही. मी पदाची चिंताही केली नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला. आज मुंबईहून नागपूरला विमानाने निघालो, पण विमान नागपुरात उतरलेच नाही. कारण नागपूरच्या आकाशात धुकं होते. शेवटी विमान हैदराबादला उतरले. एक तासाने वातावरण चांगले झाले आणि आम्ही नागपूरच्या विमानतळावर उतरू शकलो. आयुष्याचे असेच असते. काही क्षण धुकं येतात, पण ते कायमस्वरुपी नसतात. पुन्हा आपले विमान उतरणार, हे निश्चित असते.  (Sudhir mungantiwar mla)

    भाग्यवान चंद्रपूर जिल्हा
    अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जगातील कोणत्याही भक्ताला माझ्या जिल्ह्यातील सागवनाने तयार झालेल्या दरवाज्यातूनच जावे लागते. देशातील कोणत्याही खासदाराला आम्ही तयार केलेल्या दरवाज्यातूनच संसदेत प्रवेश करावा लागतो. पीएमओमधील पंतप्रधानांची खूर्ची देखील आम्हीच तयार केली आहे. असा भाग्यवान आमचा जिल्हा आहे,असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • Eco-friendly products | चंद्रपूर जिल्ह्यातील या सरपंचाने केली कमाल

    Eco-friendly products

    Eco-friendly products : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कळमना हे पंचकोशीत स्मार्ट सरपंच (smart sarpanch) नंदकिशोर वाढई यांच्या ध्येय वेड्या सामाजिक उपक्रमांसाठी आता बऱ्यापैकी ओळखले जात आहे.

    राष्ट्रसंतांच्या विचारांचे कार्यकर्ते श्री. वाढई त्यांच्या चिकित्सक अभ्यासु वृत्तीने कळमना गाव स्वच्छ, सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक करण्यासाठी शासनाच्या विविध योजना येथे हिरिरीने राबवितात.

    अमित शाह विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक

    शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण पूरक विविध उपक्रम, वुक्ष लागवड अश्या अनेक बाबींवर त्यांनी काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या पासून पर्यावरण पूरक असे बरीकेट्सची निर्मिती करून त्यांच्या सहाय्याने वृक्ष संवर्धनासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

    त्रासाला कंटाळून युवकांनी केला खून

    यासाठी त्यांच्या उपक्रमाला गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व गावातील सामाजिक काम करणारे होतकरू तरुण यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे पर्यावरणाचा रास होणार नाही आणि वुक्षाच संवर्धन व जतन होईल अशी ध्येये वेळी कल्पना अमलात आणली आहे.


    या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा प्रत्यक्ष वापर करण्याला येथे सुरुवात करण्यात आली असून याचा शुभारंभ स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्तुजी पिंपळशेंडे, गणपती कुकुडे, मदन वाढई, अमोल कावळे, विठ्ठल विदे, सुरेश मुठलकर, दौलत विदे, शामराव अटकारे, सुधाकर पिंगे, घनश्याम वाढई, प्रभाकर पिंगे, जेष्ठ नागरिक कवडु पिंगे, सुभाष वाढई, अशोकराव कावळे, कवडु मुठलकर, भाऊराव कावळे, पुंडलिक मेश्राम व होतकरू तरुण रमाकांत वाढई, आशिष ताजणे, श्रावण कुचणकर, दिवाकर पिंगे, अतुल क्षिरसागर, संदीप गिरसावळे, ज्ञानेश्वर बोढे, शैलेश पिंगे, गोलु आंबिलकर, अतुल अटकारे यश विदे, गणेश वाढई, विशाल नागोसे, भारत टेकाम यासह स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मला कळमना येथील माय बाप जनते करीता काम करता येते आहे हि गोष्ट माझ्यासाठी फारच आनंदाची बाब आहे माझ्या वर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे त्यामुळे च मी गावातील च नव्हे तर परिसरातील जनतेची सेवा करीत आहेत आणि यापुढेही नेहमीच नवीन नवीन कल्पकतेने सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व कळमना हे आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करत राहील.

    आज पिण्याच्या पाण्याचा रिकाम्या बाटल्या पासून पर्यावरण पूरक वुक्ष संवर्धनासाठी बरीकेट मला सर्वांच्या मदतीने तयार करता आले त्याचा मला आनंद आहे गुरुदेव सेवा मंडळ, जेष्ठ नागरिक व गावातील सामाजिक काम करणारे होतकरू तरुण मंडळी यांचे सहकार्य मला वेळोवेळी लाभते आहे त्यांचा मला अभिमान आहे असे मत नंदकिशोर वाढई सरपंच कळमना तथा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर यांनी व्यक्त केले

  • Ambedkari Janta on amit shah : अमित शाह राजीनामा द्या, दुर्गापुरात कडकडीत बंद

    Ambedkari Janta on amit shah

    Ambedkari Janta on amit shah : लोकसभा अधिवेशन दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने देशातील जनतेने शाह यांचा कडाडून विरोध केला.

    शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद चंद्रपुरातील दुर्गापुरात बघायला मिळाले, 28 डिसेंबर रोजी संविधान रक्षण समितीच्या वतीने अमित शाह यांच्या विरोधात निषेध मोर्चा व दुर्गापूर बंद करीत निदर्शने करण्यात आली.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, कायदा दिला मात्र आज देशातील सर्वोच्च पदावर बसलेले नेते मंत्री त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे, त्या वक्तव्याचा दुर्गापुरातील जनतेने कडाडून विरोध करीत निषेध केला.

    वारंवार त्रास देतो म्हणून युवकांनी केली एकाची हत्या

    अमित शाह (amit shah) यांनी देशातील जनतेची माफी मागत, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनात उपस्थित महिला आंदोलनकर्त्यांनी केली.

    संविधान रक्षण समितीने पुकारलेल्या बंद मध्ये उर्जानगर व दुर्गापुरातील जनतेने कडकडीत बंद पाडला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पासून काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

  • murder case : वारंवार त्रास देतो म्हणून केली हत्या

    murder case

    murder case 🙁गुरू गुरनुले) मूल: वारंवार त्रास देणाऱ्या युवकाला काही युवकांनी चाकूने सपासप वार करून निघृन हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी(दि.२८) रात्री १०.३० वाजता दरम्यान शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. घटनेने मूल शहरात दहशत पसरली.


    रितिक अनिल शेंडे वय (२४ वर्ष) वार्ड क्रमांक १६ विहिरगाव असे मृत युवकांचे नाव आहे. राहुल सत्तन पासवान (२० वर्ष),अजय गोटेफोडे(२२ वर्ष) व 1 विधिसंघर्ष बालक सहित तिघांना अटक केली असून हत्या प्रकरणात 1 आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

    ग्रामीण भागातील कलावंतांनी तयार केला मराठी चित्रपट काजू

    रितीक शेंडे हा पंचायत समिती कार्यालयासमोरील बसस्थानकाजवळ दुचाकीवर भ्रमणध्वनीवर बोलत असताना अचानक आरोपी युवकांनी रितिकच्या छातीवर,पोटावर व कंबरेवर सपासप वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्यात रितीक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.


    आरोपी यावरच थांबले नाही तर रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांना चाकू दाखवून ”चले जाओ नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे” अशी चेतावणी दिली.भीतीने जवळपास असलेले नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये गेले.मात्र रीतिकला वाचवायला कुणीही धावून गेले नाही.

    रितीक ला मारल्यांनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आगडे यांनी रीतिकला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले.

    वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रितिकला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.

    घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे दाखल होत त्यांनी पंचनामा केला, आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने प्रयत्न करीत राहुल पासवान, अजय गोटेफोडे व विधिसंघर्ष बालकाला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. Chandrapur crime news

    घटना कशी घडली?

    मृतक रितीक शेंडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, रितीक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने तो वारंवार राहुल पासवान ला धमकी देत त्रास द्यायचा, रितीक वारंवार त्रास देतो म्हणून राहुल ने हा त्रास कायमचा सम्पविण्याचा निर्णय केला व यामध्ये आपल्या मित्रांची साथ घेत 27 डिसेंबर रोजी रितीक वर चाकूने वार करीत त्याची हत्या केली. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

    शहर कडकडीत बंद

    रितीक च्या हत्येनंतर मूल शहरातील नागरिकांनी आरोपीना तात्काळ अटक व्हावी यासाठी बाजारपेठ बंद पाडली. व्यापाऱ्यांनी नागरिकांनी पुकारलेल्या बंद ला पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी यासाठी ताबडतोब कारवाई करीत पथके तयार केली व 24 तासांच्या आत आरोपीना अटक केली. या प्रकरणातील 1 आरोपी अद्याप पसार आहे.


    आरोपीवर कलम 103 (1), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करीत मूल पोलीसांच्या ताब्यात दिले.
    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. (Murder case)


    प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.

  • new marathi movie release : ग्रामीण भागातील कलाकारांचा मराठी चित्रपट काजू

    New marathi movie release

    new marathi movie release : चंद्रपूर : चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. केवळ मुंबईतील निर्माते चित्रपट तयार करू शकतात असा काहीसा अनुभव आहे. ग्रामीण भागातील युवक चित्रपट निर्माण करू शकत नाही, हा समज चंद्रपूर आणि यवतमाळ येथील तरुणांनी मोडीत काढला आहे.

    रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी दारू घेऊ शकतो काय? रेल्वेचे नियम काय सांगतात..

    अवघ्या ३०-३५ वयाच्या युवकांनी ग्रामीण भागातच तंत्रज्ञानाचा वापर करून काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. शूटिंग साठी लागणारे तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगी आणि वडिलांच्या हळव्या नात्याची विण असलेला काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीत येऊ पाहणार्‍या तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. काजू हा मराठी चित्रपट येत्या ३ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. (Latest marathi movie)

    यानिमित्त काजू या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन दुपारे, मुख्य कलावंत अमित राऊत, अभिनेत्री रेणुका, बालकलावंत शरयू या कलावंतानी आज दिनांक २७ डिसेंबर रोजी चंद्रपूरला भेट दिली. यावेळी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ येथे काजू चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी मिट द प्रेस आयोजित केली होती. यावेळी दिग्दर्शक रोशन दुपारे यांनी काजू चित्रपटाची निर्मिती आणि त्याचा प्रवास याविषयी पत्रकाराशी संवाद साधला. तर चित्रपटात बापाची भूमिका साकारणारे अमित राऊत यांनी मुलगी आणि वडिलांच्या भावनिक नात्यावर भाष्य केले.

    अभिनेत्री रेणुका हिने मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाची होणारे आर्थिक घालमेल आणि संघर्ष याचा उलगडा केला. तर बालकलावांत शरयु हिने शूटिंग दरम्यान झालेले. काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. पत्रकारांच्या प्रश्नांचे समाधान करून चंद्रपुरात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन काजू चित्रपट बघण्याचे यावेळी आवाहन केले.

    यावेळी चित्रपटातील डायलॉग सादर करून उपस्थिताची कलाकारांनी मने जिंकली.यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रवीण बतकी, उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे यांची आवर्जून उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.

    संचालन बाळू रामटेके यांनी तर आभार प्रवीण बतकी यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मजहर अली, मराठी पत्रकार संघाचे राजेश सोलापण, अमित वेल्हेकर, राहुल आसूटकर, दिनेश एकवनकर, राजेश निचकोल, राजू अलोणे, हिमायू अली, देवानंद साखरकर, अल्का वायचळ, गौरव पराते, गोलू बारहाते, मंगेश देशमुख, तनशील पठाण आदि उपस्थित होते.

  • alcohol in train | रेल्वे प्रवासात दारू घेऊ शकता काय?

    alcohol in train

    alcohol in train : रेल्वे प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाचा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. रेल्वे गाड्यांमध्ये दारू नेण्याचे नियम आपणास माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही रेल्वेमध्ये दारू घेऊन जाऊ शकता का? जर होय तर किती बाटल्या? जाणून घ्या सविस्तर माहिती.

    नवीन वर्षात आगमन होत असल्याने सुट्टीचे वातावरण आहे म्हणजे यंदा भरपूर रेल्वे ने प्रवास होईल. मात्र या दरम्यान नागरिक नियम मोडताना नक्कीच दिसणार.

    लहान बाळांसाठी नावे शोधत आहात? जाणून घ्या

    या रेल्वे प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाचा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ट्रेनमध्ये दारू नेण्याचे काय नियम आहे. तुम्ही ट्रेनमध्ये दारू घेऊ शकता का? जर होय तर किती बाटल्या? आपण ते घेऊ शकत नाही आणि तरीही ते घेऊ शकत नाही तर काय? हे जाणून घ्या.

    ट्रेनमध्ये दारू नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. म्हणजे तुम्ही दारू घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. तुमच्याकडे सीलबंद बाटली असली तरीही रेल्वे प्रवासात दारू घेऊन जाणे यावर पूर्णतः बंदी आहे जर तुम्ही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा 1989 च्या कलम 165 अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

    मद्य हे सिलिंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे, त्यामुळे दारूसह पकडल्यास वरील कायद्यानुसार 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच ६ महिने कारावासाची तरतूद आहे. याशिवाय व्यक्तीने आणलेल्या प्रतिबंधित साहित्यामुळे कोणतेही नुकसान किंवा अपघात झाल्यास त्याचा खर्चही दोषी व्यक्ती उचलेल.

    इतकेच नाही तर तुमच्याजवळ दारूची उघडी बाटली आढळल्यास शांतता भंग केल्याबद्दल आरपीएफ तुमच्यावर दंड आकारू शकतो. याशिवाय जर रेल्वे (indian railways) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल, तर त्यात दारूबाबत करचुकवेगिरीचेही प्रकरण असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला जीआरपीकडे सोपवले जाईल आणि त्यानंतर त्या राज्याचे उत्पादन शुल्क विभाग नियमानुसार कारवाई करेल. हा नियम त्या राज्यांसाठी आहे जिथे दारूवर बंदी नाही. गुजरात किंवा बिहार सारख्या कोणत्याही राज्यात दारू वाहून नेताना पकडले गेल्यास मोठा दंड आणि शिक्षेसाठी तयार राहा. याचा अर्थ, रेल्वे प्रवासात अल्कोहोल कोणत्याही स्थितीत घेता येत नाही. (Alcohol in train)

    विशेष परिस्थितीत, तुम्ही तुमच्यासोबत 1.5 लिटर मद्य घेऊन जाऊ शकता. मात्र त्यासाठी आधी संबंधित रेल्वे झोन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. पण सदर दारू प्यायला घेत नाही हे कारणही द्यावे लागेल. उदाहरणार्थ चाचणीसाठी किंवा प्रयोगशाळेसाठी. यानंतर तुम्हाला त्या बाटलीची पावती तुमच्याकडे ठेवावी लागेल. बाटली पूर्णपणे सीलबंद केली पाहिजे. हे पण माहीत असू द्या.

  • Vadhu var parichay melava : उप वर-वधु परिचय मेळाव्यात विवाह करुन समाजासमोर आदर्श मांडा – खासदार प्रतिभा धानोरकर

    Vadhu var parichay melava

    Vadhu var parichay melava : चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर धनोजे कुणबी समाजाच्या (Dhanoje kunbi samaj) वतीने आयोजित उप वर-वधू परिचय मेळावा व कृषी मेळाव्याचे उद्घाटन 27 डिसेंबर 2024 रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

    चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा करार

    या उद्घाटन सोहळ्यात खासदार धानोरकर यांनी समाजाच्या भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची महत्त्वाची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भविष्यातील परिचय मेळाव्यांमध्ये केवळ परिचय करणे नाही, तर विवाह देखील पार पडले पाहिजे, जेणेकरून समाजात आदर्श निर्माण होईल.

    कृषी मेळाव्याच्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन घेण्याची प्रेरणा दिली आणि तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन केले. या उद्घाटनावेळी समाजाची कृतज्ञता व्यक्त करताना खासदार धानोरकर म्हणाल्या, “समाजाने मला बरेच काही दिले आहे, आणि मी सदैव ऋणी आहे.”

    यावेळी मंचावर आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तमराव सातपूते, श्री. मालेकर, डॉ. विजय झाडे, विलास माथनकर, मनोहर पाऊनकर, राहूल पावडे, गजानन सातपुते, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, उमाकांत धांडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

  • Environmental Conservation : चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती

    Environmental Conservation

    Environmental Conservation : चंद्रपूर महानगरपालिका व डॉ.खत्री महाविद्यालयात (Khatri College Chandrapur) सामंजस्य करार करण्यात आला असुन याअंतर्गत वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन या पर्यावरण विषयक महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन


       मनपा आयुक्त विपीन पालीवाल व डॉ.खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने झालेल्या या सामंजस्य करारानुसार मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग (rain water harvesting) व घनकचरा व्यवस्थापन, ई वाहने,प्लास्टीक बंदी,कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी उपक्रमांविषयी आता डॉ.खत्री महाविद्यालयातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.


      शासन निर्देशानुसार चंद्रपूर मनपातर्फे पर्यावरण विषयक महत्वाच्या सर्व विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या स्पर्धा, उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे असते,कारण जनसहभागातूनच पर्यावरण संवर्धन व रक्षण करणे शक्य आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जर नागरिकांची साथ मिळाली तर कोणताही उपक्रम यशस्वी होणे शक्य होते.      

     
       मनपातर्फे दर महिन्यास पर्यावरण विषयक उपक्रमांची जनजागृती करण्याचे ठराविक लक्ष महाविद्यालयास देण्यात येणार असुन महाविद्यालयातर्फे योजनाबद्ध रीतीने परिणामकारक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे व केलेल्या कामांची माहिती मनपास देण्यात येणार आहे.

    महाविद्यालयांच्या सहभागाने युवा वर्गाचा पर्यावरण संरक्षण व संवर्धनात सहभाग होणार असुन याचप्रकारे इतर महाविद्यालयांनीही सहयोग करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Baby boy name | भागवदगीतेमधून निवडा मुलांची नावे

    Baby boy name

    Meaningful baby boy name : जर तुम्हाला तुमच्या मुलाला सुसंस्कृत बनवायचे असेल तर तुम्ही ही नावे निवडू शकता, जी पूर्णपणे अद्वितीय आणि अर्थपूर्ण आहेत.

    पालक होणे ही मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तो एक चांगला माणूस बनू शकेल. पालक म्हणून तुमची जबाबदारी मुलाला चांगले आणि अर्थपूर्ण नाव देण्याची आहे. Unique boy names

    या घरगुती उपायाने पांढरे केस करा काळे

    नावाचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने नाव विचारपूर्वक निवडणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, आम्ही येथे लहान मुलाच्या नावांची यादी सामायिक करत आहोत, ज्यावर पवित्र ग्रंथ भगवद्गीतेचा प्रभाव आहे.

    ही आहे अर्थपूर्ण नावाची यादी

    • अर्जुन – अर्जुन, श्री कृष्णाचा प्रिय सहकारी आणि एक महान योद्धा, ज्याचा भगवान श्रीकृष्णाने गीतेत उपदेश केला.
    • कृष्ण – भगवान श्री कृष्णाचे नाव.
    • संजय – गीताचा संवादक, ज्याने धृतराष्ट्राला युद्धभूमीची घटना कथन केली.
    • योगेश – भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये योगाचे महत्त्व सांगितले.
    • विश्वरूप – भगवान श्रीकृष्णाचे दिव्य रूप, गीतेदरम्यान अर्जुनाने पाहिले.
    • कृष्णेश्वर – भगवान श्रीकृष्णाचे दुसरे नाव.
    • सत्येंद्र – सत्येंद्र म्हणजे “सत्याचा स्वामी”.व्यास – महाभारताचे लेखक आणि गीताचे संकलक.
    • अमिश- या नावाचा अर्थ खरा आणि विश्वासार्ह व्यक्ती असा होतो.
    • अद्वैत- जे प्रत्येकापेक्षा वेगळे आणि अद्वितीय आहे.
    • अच्युत- हे देखील भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • गिरधर- हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • केशव – तुम्ही हे नाव पण ठेवू शकता. हे देखील श्रीकृष्णाच्या सुंदर नावांपैकी एक आहे.
    • मुरली- हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • माधव- हे नावही ठेवू शकता.
    • नेता – प्रत्येक कामात अग्रेसर असणारी व्यक्ती.
    • पलाश- हे नावही खास आहे. हे त्या झाडाचे नाव आहे ज्याच्या फुलांना रंग येतो.

    जर तुम्हाला तुमच्या मुलाला सुसंस्कृत बनवायचे असेल तर तुम्ही ही नावे निवडू शकता, जी पूर्णपणे वेगळी आणि अर्थपूर्ण आहेत.

  • Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

    Former PM Manmohan Singh Passes Away

    Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.

    विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.

    1 जानेवारी पासून नियम बदलणार

    यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले. PM Manmohan Singh

    तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

    1987-1990 पासून जिनिव्हा. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली.