Blog

  • Material purchase | चंद्रपूर मेडिकल कॉलेजबाबत महत्त्वाची बैठक

    Material purchase

    Material purchase : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक पार पडली.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    या बैठकीत 57 कोटी रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचे निर्देश एचबीसीसी कंपणीला देण्यात आले आहेत तसेच, इतर वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग मिळाला आहे.


      या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकिय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकिय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित विभागाचे उप सचिव आणि अवर सचिवांची उपस्थिती होती.

    शेतात विजेचा प्रवाह एकाचा मृत्यू


          नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीसाठी ( Material purchase) निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.


        चंद्रपूर मेडिकल कॉलेजची (GMC chandrapur) सुमारे ५० एकरातील नवीन वास्तू पूर्णत्वास आली असली तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध नव्हता. विशेषतः गडचिरोली, यवतमाळ, तसेच तेलंगणातील आसिफाबाद आणि करीमनगर येथील रुग्ण उपचारासाठी चंद्रपुरात येतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज चालवले जात आहे.

    रुग्णसंख्येत वाढ झाल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे आणि गैरसोय होत आहे. तसेच निवासी डॉक्टरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतीत कॉलेज हलविण्याची मागणी होत आहे. मात्र, साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रखडले होते.


       सदर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गुरुवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फर्निचर खरेदीसाठी 57 कोटी आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी 41 कोटी रुपये असा एकूण 100 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.

    यावेळी फर्निचर खरेदीचे निर्देश एचबीसीसी कंपनीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तर इतर साहित्य खरेदीसाठी निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

  • tiger death news | चंद्रपुरात वाघाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ

    tiger death news

    tiger death news : सिंदेवाही – नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

    सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिट वनरक्षक सकाळी गस्त करीत असताना मौजा लाडबोरी शेतशिवारातील रमेश पांडुरंग गंडाईत राहणार सिंदेवाही यांच्या शेतातील नाल्याजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आला.

    शेतात जिवंत विद्युत तारेच्या प्रवाहाने धक्का लागून एकाचा मृत्यू

    वनरक्षकाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली, माहिती मिळताच घटनास्थळी उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक चोपडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे दाखल झाले.

    यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे निरीक्षण करण्यात आले, सदर मृत वाघ हा नर असून तो वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले. वाघाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता. मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत होते. Chandrapur tiger death

    घटनास्थळी वाघाच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करीत उत्तरीय तपासणीकरिता विसेरा घेण्यात आला, पंचासमक्ष घटनास्थळी वाघाचे दहन करण्यात आले. वनविभागाने या प्रकरणी वनगुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे.

    सदर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत शवविच्छेदनाचा विस्तृत अहवाल आल्यावर त्याचे निदान करण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

  • electric current | विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

    electric current

    electric current : वरोरा : शहरापासून १२ किलोमीटर असलेल्या सालोरी येथे अति दुर्दैवी घटना घडली. शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जिवंत विद्युत प्रवाहाचा वापर करुन सभोवताल तारांना करंट लावणे हे गुन्हा असून सुद्धा करंट लावल्याने सालोरी येथे अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करणाऱ्या संजय मारुती शिरपूरकर या व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला.

    चंद्रपुरात 804 नागरिकांवर कारवाई

    अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करण्याकरीता सालगडी म्हणून संजय शिरपूरकर हा व्यक्ती काम करायचा, दि.२९ डिसेंबर ला रात्रो ९ वाजता अरून शेरकुरे यांच्या शेतात संजय हा जागली करीता गेला परंतु तो घरी काही परतला नाही. संजय ची दुसऱ्या दिवशी शोधाशोध त्याच्या परिवाराकडून करण्यात आली परंतू त्याची काही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मृतकाचा भाऊ राजेंद्र शिरपूरकर यांनी शेगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली.

    एक यु टर्न बेतला जीवावर, तिघांचा मृत्यू

    पोलिसांनी या प्रकरणी शोधाशोध केली असता मारोती नागोसे राहणार सालोरी यांच्या शेतात इलेक्ट्रिक करंट लावून असलेल्या ताराला जवळ संजय हा मृत अवस्थेत मिळुन आला. नागोसे यांनी त्याचे शेतातील पिकाच्या संरक्षणाकरिता शेतात असलेल्या मीटर मधून ताराने जिवंत वीज प्रवाह शेताच्या भोवताल सोडला.

    मृतक हा त्या ताराला चिटकून मरण पावला प्राप्त तक्रारीवरून नागोसे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्यामार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शहारे हे करीत असून गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे.

  • oppo find n5 | ओप्पो चा फोल्डेबल मोबाईल बाजारात येणार

    oppo find n5

    OPPO Find N5 हा कंपनीचा पुढील फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे ज्याला आता अनेक जागतिक स्तरावर प्रमाणपत्रे मिळाली आहेत. यामुळे हा फोन लवकरच बाजारात दिसू शकतो असे संकेत मिळत आहेत. हा फोन 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये विविध प्रमाणपत्रांद्वारे त्याचे स्पेसिफिकेशन पुढे आले आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा असेल.

    मलेशियाच्या SIRIM डेटाबेसमध्ये फोन स्पॉट झाला आहे. याशिवाय, हे इंडोनेशियाच्या SDPPI सर्टिफिकेशन मध्ये बघितला गेला आहे. टेक आउटलुकच्या रिपोर्टनुसार, फोन कॅमेरा FV-5 सर्टिफिकेशनमध्ये देखील स्पॉट झाला आहे. येथे फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बरीच माहिती समोर आली. (Oppo mobile)

    गुगल पिक्सेल चा हा मोबाईल 37 हजार रुपयांनी मिळणार स्वस्त

    कॅमेरा द FV-5 सूचीनुसार फोनमध्ये प्रगत इमेजिंग क्षमता असेल. यात 12.6MP रियर कॅमेरा असेल. 7.1MP फ्रंट कॅमेरा असेल. मागील मुख्य कॅमेरा पिक्सेल बायनिंगसह 50MP सेन्सर असेल. तर फ्रंट कॅमेरा पिक्सेल बायनिंगसह 28MP सेन्सर असल्याचे सांगितले आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन असेल.

    Oppo Find N5 मध्ये मोठे अपग्रेड्स दिसतील. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट यामध्ये दिसू शकतो. फोन Android 15 सह येणार आहे ज्यावर ColorOS 15 स्किन असेल. मुख्य डिस्प्ले 8 इंच आकारात येऊ शकतो. फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश दर दिसू शकतो. हा फोन अल्ट्रा फ्लॅट डिझाइनमध्ये येण्याची शक्यता आहे.

    फोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सिस्टम प्रदान केला जाऊ शकतो ज्यामध्ये तीन 50MP चे 3 कॅमेरा लेन्स असतील. मुख्य सेन्सर वाईड अँगल लेन्स असेल, दुसरा सेन्सर अल्ट्रावाइड असेल आणि तिसरा सेन्सर पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स असेल. यामध्ये 3X झूम क्षमता पाहता येईल.

    Oppo च्या या फोल्डेबल फोनमध्ये 5700mAh ची बॅटरी असू शकते. ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग असेल. हे IPX8 रेटिंगसह सुसज्ज असू शकते, ज्यामुळे मोबाईल वॉटरप्रूफ असेल. हे समोर येत आहे की फोनमध्ये झिरो-क्रीज हिंग असेल.

  • District sports awards | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय का?

    District sports awards

    District sports awards : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, दरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात.

    चंद्रपुरात भीषण अपघात, 3 जण ठार

    त्याअनुषंगाने, सन 2024-25 करिता जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता (krida purskar) अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज 15 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.

    चंद्रपुरात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. अर्जदाराने वयाची 35 वर्ष पुर्ण केलेले असावे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे.

    अर्ज करतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. 10 हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

  • importance of traffic rules : चंद्रपुरात 3 दिवसात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    importance of traffic rules

    importance of traffic rules : चंद्रपूर – नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात एकीकडे तरुणाई सज्ज झाली होती तर दुसरीकडे काही अप्रिय घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलीस आपले कर्तव्य बजावीत होते.

    चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या (chandrapur traffic police) वतीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात नाकेबंदी करीत मद्य प्राशन करून वाहन चालविणे, बुलेट सायलेन्सर मध्ये बदल व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यावर कारवाई मोहीम राबवली.

    चंद्रपुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, यु टर्न जीवावर बेतला

    नव वर्षाच्या स्वागत दरम्यान स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उभारत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 406 चालक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे 374, बुलेट दुचाकी वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेच्या या कारवाईत एकूण 40 हजार दंड वसूल करण्यात आला.

    नव्या वर्षात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू राहणार अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली. 3 दिवसात एकूण 804 नागरिकांवर कारवाई करण्यात आली हे विशेष.

  • road accident news | चंद्रपुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

    road accident news

    road accident news : 31 डिसेंबर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर मार्गावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

    नातेवाईकांची भेट घेत वाटेतील हॉटेलात जेवण करीत वणी आपल्या स्वगावी जाणाऱ्या नागपूरे कुटुंबावर घात झाला.

    सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, एकीकडे वणी येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथील नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी आली, भेट आटोपल्यावर नागपुरे कुटुंब आपल्या दुचाकी क्रमांक MH29 A Z 9949 ने परतीच्या प्रवासावर निघाले.

    नागरिकांचा गळा कापण्यासाठी जिल्ह्यात आला प्रतिबंधित नायलॉन मांजा


    जाण्यापूर्वी हॉटेलात जेवण केल्यावर चंद्रपूर-नागपूर हायवेवरील डॉली पेट्रोल पंप जवळ यु टर्न घेताना MH40 AK 2095 या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
    धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 51 वर्षीय सतीश भाऊराव नागपुरे, 47 वर्षीय मंजुषा सतीश नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 वर्षीय माहिरा राहुल नागपुरे या बालिकेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. Road accident news


    अपघातात 7 वर्षीय स्मायली कामतवार ही मुलगी किरकोळ जखमी झाली.
    अपघातानंतर ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.
    एकीकडे नविन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज होते तर या दिवसात अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.
    तरीसुद्धा दुर्दैवाने हा अपघात घडला या अपघातामुळे नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • google pixel 8 pro | गुगल पिक्सल आता 37 हजार रुपये स्वस्त

    google pixel 8 pro

    google pixel 8 pro : जर तुम्ही Google Pixel 8 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. सेल मध्ये किंमत कपात आणि बँक ऑफरमुळे बचत होत आहे.

    विधी अधिकारी पदाची नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. येथे आम्ही तुम्हाला 8 Pro वर उपलब्ध असलेल्या डील आणि ऑफर्सबद्दल तपशीलवार सांगत आहोत.

    Google Pixel 8 Pro किंमत, सवलत

    Google 8 Pro किंमत, सवलत

    Google Pixel 8 Pro चा 12GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, तर तो 1,06,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 4000 रुपयांची सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 65,999 रुपये होईल. एक्सचेंज ऑफरद्वारे तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 39,150 रुपये वाचवू शकता. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा बदल्यात दिलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.

    Google Pixel 8 Pro

    Google Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1344×2992 पिक्सेल आहे, रिफ्रेश रेट 120Hz आणि 2400 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. 8 Pro मध्ये Google Tensor G3 चिपसेटसह Titan M2 सुरक्षा प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, 8 Pro च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, दुसरा 48-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तिसरा 48-मेगापिक्सेल क्वाड-PD 5x झूम कॅमेरा आहे. 8 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 8 Pro मध्ये 5,050mAh बॅटरी आहे

  • Legal Officer Jobs : चंद्रपुरात विधी अधिकारी पदासाठी अर्जाची मागणी

    Legal Officer Jobs : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये, दि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरिता, पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

    शैक्षणिक अहर्ता व अनुभव:

    उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी वकिली (Lawyer) व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार महसूल, सेवाविषयक तसेच प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी आदीबाबत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षमतेने पार पाडू शकेल. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

    चंद्रपुरात बॅनर लावायचा तर गुन्हा होणार दाखल

    सदर पदाकरिता एकत्रित मानधन रु. 30 हजार असून दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5 हजार असे एकत्रित मानधन रुपये 35 हजार प्रति महिना देय राहील. या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.

    महसूल विभागाच्या (Revenue Department) शासन निर्णयानुसार, विधी अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारित राहील. विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी तसेच कोणताही गुन्हा नोंद नसावा.

    विधी अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरूपातील नेमणूक रद्द करण्यात येईल. तसेच विधी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर इतर खाजगी कामे करता येणार नाही.

    पदभरतीबाबत कार्यक्रम :

    सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या यादीमधील चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये समक्ष लेखी अर्ज करण्याची 16 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. तर झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

    उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणी, प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दि. 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

    उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे,  प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कार्यालयाच्या  https://chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती,  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा, स्थगित, रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांना राहील.

  • Unauthorized banner hoarding | चंद्रपुरात बॅनर लावंताय, गुन्हा दाखल होणार

    Unauthorized banner hoarding

    Unauthorized banner hoarding : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी होर्डिंग, बॅनर, जाहीरात फलक उभारणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले असुन अनधिकृत होर्डींगसाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधी व बॅनर छापणाऱ्या प्रिंटर्सना सोमवार ३१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाद्वारे अवगत करण्यात आले.  


        घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर सुस्वराज फाऊंडेशनची दाखल जनहित याचिका क्र.१५५ / २०११ नुसार मा.उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत होर्डींग,बॅनर, जाहीरात फलकांवर सक्त कारवाई निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने पोलीस विभाग व मनपा प्रशासनाद्वारे मनपा क्षेत्रातील प्रिंटर्स व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात आयुक्त यांनी संबंधितांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत केले व शहरात कुठलेही अवैध बॅनर,जाहीरात फलक,होर्डिंग लाऊ नये अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पना दिली.  

    चंद्रपुरात 4 वाघनखे जप्त

                 
       अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त असून गुन्हाही दाखल केला जाणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीसाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड नसेल तर कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सहभागासाठी वॉर्ड निहाय समिती सुद्धा स्थापन केली जाणार असुन तक्रार करण्यास वेबसाईट तसेच संपर्क क्रमांक मनपातर्फे (chandrapur mahanagar palika) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    अनधिकृत बॅनर,पोस्टर्स होर्डींग वर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रश्न यांनी पुरेसे संरक्षण उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यकता असल्यास हत्यारबंद पोलीस देखील पुरविण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे.

    चंद्रपुरात नागरिकांचे गळे कापणारे सक्रिय


         याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा,सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार, अनिलकुमार घुले तसेच राजकीय पक्षांचे व प्रिंटिंग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थीत होते.