Pratibha Dhanorkar on OBC issues : देशात ओबीसी प्रर्वगातील नागरीकांची संख्या लक्षणीय असनू केंद्र सरकार ने ओबीसींच्या न्याय मागण्यांकडे गांर्भीयाने लक्ष देण्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय ओबीसी समितीच्या दिल्ली येथे आयोजित बैठकी दरम्यान व्यक्त केले. OBC Committee meeting Delhi
केंद्रीय ओबीसी समितीची बैठक दिल्ली येथे दि. 28 फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने अलिगढ मुस्लीम विद्यापीठ तसेच जामीया मिलीया इस्लामिया या विद्यापीठातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या त्या सोबतच ओबीसी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातने चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती वर चर्चा केली. विद्यापीठातील राखीव ओबीसींच्या आरक्षणावर देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चर्चा केली. ओबीसींची संख्या देशात लक्षणीय असल्याने ओबीसींना मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील मत यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
या बैठकीवेळी ओबीसी कमेटीची चेअरमन गणेश सिंह, सचिव संजीव शर्मा यांसह ओबीसी कमेटीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व सोयी-सुविधांवर भर – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रशासनाला तातडीची कार्यवाही करण्याची सूचना
Chandrapur Sanjay Gandhi Niradhar Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे. विशेषतः चंद्रपूर शहरातील 1300 लाभार्थ्यांचे अर्ज निकाली निघालेले नाहीत. हे सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे,तहसीलदार सीमा गजभिये, छबुताई वैरागडे, शालुताई कुंदोजवार, साक्षीताई कार्लेकर, आदी उपस्थित होते.
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य शासनाने निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन स्वरूपात अनुदान वितरित केले होते. मात्र, डिसेंबर 2024 पासून ऑनलाइन वितरणाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 62 हजार 204 लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ योजनेचे 1 लक्ष 7 हजार 175 लाभार्थी आहेत.’ 1500 रुपयाच्या मागे केंद्र शासनाचे 300 रुपये चार महिन्यापासून अप्राप्त आहेत, याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. Shravan Bal Yojana beneficiaries
मुल तालुक्यातील 236 लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत 178 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. बल्लारपूर येथे 204 तर चंद्रपूर शहरातील 1300 अर्ज प्रलंबित आहेत. ते अर्ज त्वरित निकाली काढण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार श्री. मुनगंटीवार यांनी दिले. बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर शहरातील निराधार आणि श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाला गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत.
जानेवारी 2025 पर्यंत 88 हजार 655 लाभार्थ्यांपैकी 56 हजार 422 लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र, 32 हजार 233 लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्याने त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या नव्या धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत मार्च 2025 अखेरपर्यंत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आश्र्वस्त केले आहे. Pending grants in Chandrapur
निराधारांच्या पाठीशी सदैव! आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार असताना विधानसभेत निराधारांसाठी ठामपणे आवाज उठवला होता. अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी निराधारांना मिळणाऱ्या 600 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1200 रुपये केले. पुढे राज्य सरकारने यामध्ये अधिक वाढ करत अनुदान 1500 रुपये पर्यंत केले.आ. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच निराधारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत,हे विशेष. Sudhir Mungantiwar welfare initiatives
“उसगावमध्ये खाण कंपनीविरोधात नागरिकांचा आवाज; आमदार जोरगेवार यांनी हस्तक्षेप केला”
Mining company environmental impact : उसगाव लगतच्या महामिनरल मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यप्रणाली मुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने आणि गावकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेतली असून, आमदार किशोर जोरगेवार यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे. यावेळी उसगाव ग्रामपंचायत सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुरकर, सदस्य यमुना राजुरकर, रेखा कोडापे, वर्षा बोंदरे, धनंजय ठाकरे, रमेश काळे, कवडू ठोबरे, मोहनदास राजुरकर, दिलीप ठाकरे, उसगाव पोलिस पाटील नरेंद्र बुच्चे, इमरान खान, संजय तिवारी, निरिक्षण तांडा, संतोष नुने, मिन्टु कलवल, पसी गादे, विशाल अड्डूर, इमरान खान, स्वप्निल वाढई, नंदकिशोर यादव, विजय कपूर, सागर रामटेके, रमन तांडा, महेश लठ्ठा, मयुर कलवल, राहुल चुपाका, सागर गेडाम, उदय कलवल, अरुण दाभेरे, हेमराज बोबडे,यांची उपस्थिती होती.
कंपनीच्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे (Mining company road damage complaints). हे रस्ते गावकऱ्यांच्या दैनंदिन रहदारीसाठी असून, कंपनीने त्वरित त्यांची डागडुजी करावी तसेच अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करावा. कंपनीतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे आणि कोळसा वॉशरीजमधून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि इतर रहिवाशांना श्वसनासंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. कंपनीच्या प्रदूषणामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून, कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावीत. त्याचप्रमाणे, या निधीच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांवर भर द्यावा. ग्रामपंचायतीकडे प्रलंबित असलेला कर तातडीने भरावा, अशा सूचनाही निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. Health issues due to mining pollution
कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच गावकऱ्यांच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे स्थानिकांना प्राथमिकता देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावर येत्या 10 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. Local community mining protests
Chandrapur Zilla Parishad achievements : चंद्रपूर जिल्ह्यातील विकासात्मक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक जॉन्सन यांचा राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विवेक जॉन्सन यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव जिल्ह्यातील विकासात्मक कार्यक्रमांच्या अभूतपूर्व यशाचा पुरावा आहे. Vivek Johnson CEO Chandrapur
नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात विवेक जॉन्सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासाच्या नवीन मानदंड घालण्यात आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
मिशन सक्षम: जिल्ह्यातील युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा हा उपक्रम.
मिशन अंकुर: शिक्षणक्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
खुली विज्ञान बाग: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी ही बाग तयार करण्यात आली.
स्टेम लॅब: विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
ॲस्ट्रॉनॉमी लॅब: खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी विशेष प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
मोबाईल प्लॅनेटोरीयम: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी मोबाईल प्लॅनेटोरीयम सुरू करण्यात आले.
स्मार्ट पीएचसी: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली.
मोबाईल कॅन्सन व्हॅन: कर्करोगाच्या लवकर निदानासाठी मोबाईल कॅन्सन व्हॅन सुरू करण्यात आली.
स्मार्ट वाचनालय: ज्ञानप्रसारासाठी स्मार्ट वाचनालये सुरू करण्यात आली.
बचतगट मॉल: महिला बचतगटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मॉलची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
बळीराजा समृद्धी मार्ग अभियान: शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले.
सोमनाथ कृषी पर्यटन: कृषी आधारित पर्यटन विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
ई-ऑफिस प्रणाली: प्रशासकीय कामकाज अधिक सुगम आणि पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला.
राज्य स्तरावर दखल विवेक जॉन्सन यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाचे नवे परिमाण गाठले गेले आहे. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. Devendra Fadnavis honors Chandrapur CEO
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक जॉन्सन यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटले, “विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्यातील लोकांचे जीवन सुधारले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर जिल्ह्यांनीही स्वीकारला पाहिजे.”
Criminal arrest in Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी कोरोना काळात आकस्मिक अभिवचन रजेवर बाहेर आले होते. मात्र, रजेचा कालावधी संपल्यानंतर ते परत न जाता ४ वर्षांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहिम राबवत त्यांचा शोध घेतला आणि अखेर दोघांना अटक करण्यात यश मिळवले.
इंदिरानगर, चंद्रपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी हा ४५ दिवसांच्या रजेवर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. तसेच, राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यानेही कारागृहातून रजा घेतली होती, परंतु दोघेही परत न जाता फरार झाले होते. Chandrapur police latest news
गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकमुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार, २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष फरार बंदी शोध मोहीम राबवली. त्यादरम्यान, दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा मिळवत त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करून त्यांची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. Chandrapur LCB operation success
यशस्वी कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी : ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बल्की, अजय बागेसर, किशोर वैरागडे, नरोटे आणि अराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
छत्रपतींच्या अपमानाला शिवप्रेमींचा जोरदार प्रतिकार, पोलिसांकडे कारवाईची मागणी
Legal action against Prashant Koratkar : चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या तसेच इतिहासतज्ञ श्री इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर (नागपूर) यांच्या विरोधात शिवप्रेमींचा रोष वाढत आहे. दिनांक २५ फेब्रुवारीला मध्यरात्री प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलवरून फोन करून धमकी दिली. या संभाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरली असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आक्षेपार्ह टीका केली. Threats to historian Indrajit Sawant
या संभाषणात प्रशांत कोरटकर यांनी खालील विवादास्पद विधाने केली: १) “संभाजी महाराज अय्याश होते, हे लोकांना सांगा.” २) “बाजीप्रभू देशपांडे नसते तर तुमचा महाराज आज जिवंत नसता.” ३) “तुमचे महाराज पळून गेले.” ४) “जेम्स लेन यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे शिवाजीचा बायोलॉजिकल फादर कोण होता, हे लोकांना सांगा.” ५) “जास्त मराठा-मराठा करू नका, तुम्हाला ब्राह्मणांची औकात काय आहे ते दाखवू.” ६) “शिवाजी महाराजांना देशभर भालजी पेंढारकर यांनी पोहचविले, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीतही पडलं नसतं.”
या घटनेमुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे कोणत्या विकृत शक्ती आहेत, याची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवप्रेमींचा आग्रह आहे की, प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करण्यात यावी. Prashant Koratkar arrest demand
या संदर्भात इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अशी आक्षेपार्ह विधाने करणे हा केवळ व्यक्तिगत अपमान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासाविषयीचा अनादर आहे. या प्रकारच्या वक्तव्यांना नकार दिला पाहिजे.”
शिवप्रेमींनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवली आहे. त्यांची मागणी आहे की, या प्रकरणात त्वरित कार्यवाही करून प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलली जावीत.
अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप चौधरी, शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर, शिवप्रेमी संतोष कुचनकर, निशिकांत देशमुख, दिलीप रिंगणे, गजानन नागपुरे आदींनी केली.
Marathi Bhasha Gaurav Din celebration : चंद्रपूर : सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालीत बजाज विद्या भवनमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या निर्देशिका ममताजी बजाज आणि मुख्याध्यापिका रुबिना शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषा आणि तिच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. त्यानंतर वर्ग तिसरीचा विद्यार्थी यथार्थ ठाकरे याने मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे प्रभावी भाषण दिले. Bajaj Vidya Bhavan cultural programs
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभ पांडे , रियांश नगराळे , प्रियांशी चवलढाल आणि स्पृहा गांगवे यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. विद्यार्थ्यांच्या कला आणि प्रतिभेला वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वर्ग तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे गोडवे गाणारे सामूहिक गीत सादर केले, तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध आणि मनमोहक नृत्याविष्कार सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन घडवले. Marathi Diwas activities for students
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. या नाटकाद्वारे मराठीचे जतन व तिचे महत्व उत्कृष्ट पणे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. व भविष्यात आपली मराठी भाषा जतन करण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारे प्रयत्न शाळेमार्फत करण्यात आला. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौतुक केले आणि मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश दिला. शाळेच्या शिक्षिका शीतल आभारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या मराठी विभागाच्या शिक्षिका भाग्यश्री आईंचवार, शितल आभारे , राजश्री हिवराळे , वैशाली नन्नावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विशेष मेहनत घेतली.
चंद्रपूरचा उन्हाळा आणखी तीव्र होणार? उष्णतेपासून संरक्षणासाठी महत्त्वाच्या सूचना
Chandrapur heatwave action plan : चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरवात झालेली आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. याकरीता 27 फेब्रुवारी रोजी उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. (Chandrapur summer safety tips)
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगीतले की, कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपातर्फे आरोग्य विभागातर्फे उष्माघात कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे.आज समितीची प्रथम आढावा बैठक असुन १५ मार्च पर्यंत समितीच्या सर्व सभासदांनी नेमुन दिलेली कार्ये जबाबदारीने पार पाडून त्याचा लेखी अहवाल द्यावा.
उन्हाळ्यात घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा (Cool roof technology) वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. मागील वर्षी शहरात २१ जागी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.यावर्षी त्याहुन अधिक पाणपोईची व्यवस्था स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे करण्यात यावी.घर बांधकामाच्या रचनेत उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक आहे. (Heat stroke prevention in Chandrapur)
स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करणे, अनेकदा भिकारी बेघर निवाऱ्यात येत नाही तेव्हा पोलीस विभागाला सोबत घेऊन नियोजन करणे तसेच मानसीक रुग्ण यांच्यासाठीही ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल. काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी जर आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी,व्यापारी संघटनांनी याचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Hot city Chandrapur weather)
महाकाली यात्रेसाठी मनपाचे नियोजन महाकाली यात्रेला निवाऱ्यासाठी शेड तसेच पाण्यासाठी स्प्रिंकलर्सची व्यवस्था दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते तसेच स्प्रिंकलर्स शहरात इतर कुठे लावता येईल याची निश्चिती करणे,ट्रॅफीक सिग्नल दुपारी बंद ठेवणे ,सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व व्यापक जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी डॉ.नयना उत्तरवार यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सदस्यांना हीट ॲक्शन प्लॅन संबंधी विस्तृत माहिती दिली.
याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार,उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ.अश्विनी भारत, डॉ. अमोल शेळके, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. नरेंद्र जनबंधू,तसेच विविध शासकीय कार्यालय व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.
उष्माघाताचा विशेष धोका कुणाला – ५ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षावरील नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,अल्कोहोल, धूम्रपान करणारे, शुगर, डायबिटिजचे रुग्ण यांना उष्माघाताचा विशेष धोका असतो.
उष्माघाताची लक्षणे – अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी,अतिसार,भारी घाम येणे, मळमळणे,फिकट त्वचा,हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही लक्षणे आहेत.
संरक्षणासाठी काय करावे – उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये.
थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.
Modern study center Chandrapur : खनिज विकास निधीतून जिल्हा ग्रंथालय येथे तयार होत असलेली आधुनिक अभ्यासिका फक्त एका इमारतीपुरती मर्यादित न राहता चंद्रपूर शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक बनली पाहिजे. ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे शक्तिशाली माध्यम बनावी असे नियोजन करत शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या अभ्यासिकेला मॉडेल म्हणून विकसित करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.
खनिज विकास निधीतून मंजूर झालेल्या 15 कोटी रुपयांच्या जिल्हा ग्रंथालय येथे उभारल्या जात असलेल्या आधुनिक अभ्यासिकेच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. Advanced study facilities for students
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय अभियंता विवेक अंकुले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नलावडे, कार्यकारी अभियंता पगारे, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, सलीम शेख, रुपेश पांडे, कुमार जुनमुलवार, संजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती.
सदर बैठकीत कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच अडचणींवर चर्चा करत आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचवण्यात आल्या. बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, विद्युत व जलव्यवस्थापनाची योग्य तयारी करावी आणि अभ्यासिकेच्या सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करावा. सदर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम असून, त्यामध्ये वाचन, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल शिक्षण आणि ग्रंथसंपदेचा उत्तम उपयोग यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. Chandrapur educational progress
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुविधा-संपन्न अभ्यासिकेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रंथालय प्रशासनाने नियमित समन्वय साधत अडचणी दूर कराव्यात ही अभ्यासिका केवळ एक इमारत नसून, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसाधनेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पूर्तता वेळेत आणि उत्कृष्ट दर्जात व्हावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष भर द्यावा. विद्यार्थी येथे दिवसरात्र अभ्यास करतील, त्यामुळे सुविधाजनक बैठक व्यवस्था, चांगला वाय-फाय, योग्य वायुवीजन आणि प्रकाशव्यवस्था असणे अत्यावश्यक आहे.
विद्युत आणि जलव्यवस्थापनाच्या अडचणी त्वरित सोडवल्या जाव्यात, विद्यार्थ्यांसाठी केवळ पारंपरिक वाचनालय न राहता डिजिटल अभ्यासिकेची संकल्पना राबवावी. त्यामुळे येथे ई-लायब्ररी, ऑनलाइन अभ्यास साहित्य, आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. ही अभ्यासिका केवळ बांधून थांबण्याचा प्रकल्प नाही, तर सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रित व्यवस्था आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
Plastic seizure in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे दादमहाल वॉर्ड येथील वाशिम खान यांच्या घरून 250 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. (Chandrapur Municipal Corporation plastic ban)
प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Illegal plastic storage in Chandrapur)
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे,रुचिर कोरेकर यांनी केली.