Blog

  • Elderly Harassment Police | चंद्रपुरात 82 वर्षीय वृद्धाने पोलीस अधिक्षकाकडे केली तक्रार

    Elderly Harassment Police

    Elderly Harassment Police : चंद्रपूर – राज्यात आज गुन्हेगारीने डोकं वर केल्याचं दिसून येत आहे, गुन्हेगाराला अनेकदा पोलिसांनी सहकार्य केल्याचं दिसून येतंय, अजूनही पोलिसांच्या भूमिकेत बदल होताना दिसून येत नाही आहे.
    एखाद्याची तक्रार घेत ऐकून घ्यावं इतकीही मानसिकता आता पोलीस दलात आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Chandrapur Police)


    चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण मोहीम सुरू केली, या मोहिमेचा सर्व सामान्य नागरिकांना काही प्रमाणात फायदा मिळाला मात्र काही बाबी उलट घडल्या.
    चंद्रपूर जिल्ह्यातील 82 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली, वृद्धाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित महिला पोलिसाने 4 हजार रुपये घ्या पण तक्रार करू नका असे पीडित वृद्धांच्या पत्नीला म्हटले, पैसे घेण्यास नकार दिल्यावर महिला पोलिसाने या म्हातारीला बाजूला करा, नाहीतर लॉकअप मध्ये टाका असे खडसावले. व पीडित वृद्धाला बाजूला नेत आपण 2 हजार रुपये घ्या पण तक्रार करू नका असे सांगत तुमचे उपचार मारहाण करणारे करतील असे सांगितले. Police Complaint Refused


    आरोपीने वृद्धाला दवाखान्यात नेत उपचार केले, विशेष बाब म्हणजे वृद्धाची तक्रार घेण्यात आली नाही. महिला पोलिसाच्या सांगण्यावरून पीडित वृद्धाला पैसे दिले, आपल्यावर झालेल्या मारहाणीमुळे अस्वस्थ झालेल्या वृद्धाने रात्री पुन्हा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. सोबतच पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार व त्या महिला पोलिसांच्या वागणुकीची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. Chandrapur Police Misbehavior

    घटना काय?

    चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी येथील देवीधर डोनाजी काटेकर वय ८२ वर्षे यांना घराजवळ राहणाऱ्या युवकांने मारहाण केल्याची तक्रार चिमूर पोलिसात दिनांक २७ फेब्रुवारी ला दाखल केली असून आरोपी विजय प्रभाकर बारेकर वय ४० यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    22 मार्च रोजी चंद्रपुरात राष्ट्रीय लोक अदालत


    नेरी येथील ज्योतिबा फुले वॉर्डात राहणारे देवीधर काटेकर शेळ्या गाई राखण्याचे काम करतात त्यांच्या गाई घराजववळ बांधून असताना शेजारी राहणारे विजय बारेकर आपली गाडी धूत असता गाडी दूर धुवावी असे म्हटले असता विजय बारेकर यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व काठीने सुद्धा मारल्याची तक्रार पोलिसात दिली. चिमूर पोलिसांनी तक्रारी वरून विजय बारेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला तर विजय बारेकर यांनीही दिलेल्या तक्रारी वरून वृद्ध देवीधर काटेकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.


    पोलिसांच्या या कार्यप्रणालीमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडत आहे, अन्याय झालेल्या वृद्धाची तक्रार घेण्याऐवजी त्याला पैश्याचे आमिष दाखवीत माघारी पाठविण्याचे काम करणाऱ्या त्या महिला पोलीसाला निलंबित करावे अशी मागणी होऊ लागली आहे. असे प्रकार पोलिसांच्या हातून घडणार तर न्याय कुणाला मिळणार हा प्रश्न त्या महिला पोलिसांच्या कार्य प्रणालीमुळे उपस्थित झाला आहे. त्या महिला पोलिसाने असा प्रकार यापूर्वी केला आहे काय? याची सुद्धा चौकशी करण्यात यावी.

  • National Lok Adalat Chandrapur । न्यायालयीन वादातून मुक्ती: चंद्रपुरात २२ मार्चला राष्ट्रीय लोक अदालत!

    National Lok Adalat Chandrapur

    National Lok Adalat Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून ‍विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे  सहभागी होऊन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा एस.एस.भीष्म यांनी केले आहे.

    एसएनडीटी विद्यापीठात सायबर सुरक्षा जनजागृती


    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्म यांच्या मागदर्शनाखाली चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. Court Case Settlement


            झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्टय आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या  आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामएवढेच महत्व असते आणि त्याची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते, वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो, सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क खर्च लागत नाही.


               चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या लोकअदालततीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) बॅकांची कर्ज वसूली वर्ग प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक – भाडेकरु वाद, कौटुंबिक वाद  (विवाह –विच्छेदन वगळता), इलेक्ट्रीसिटी ॲक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसुल पाणीपट्टी  वीजबिल आपसी समझोत्यायोग्य करीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन एस.एस. भीष्म यांनी केले आहे. Lok adalat maharashtra.

    अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा ‍विधीसेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वत: येऊन किंवा हेल्पलाईन फोन नंबर 07172-271679 कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934 वर संपर्क करावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

  • Cyber security awareness । एस.एन.डी.टी. विद्यापीठात सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरता कार्यशाळा

    Cyber security awareness

    Cyber security awareness : विसापूर, दि. [२ मार्च २५ ]: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई (SNDT Women’s University) आणि वुमन्स डॉक्टर्स विंग, आयएमए चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींसाठी “युथ फॉर डिजिटल लिटरेसी व सायबर सुरक्षा” या विषयावर राष्ट्रीय शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, विसापूर येथे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Digital literacy

    शिक्षकानेच पुरविली कॉपी, चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

    या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन (Police superintendent Chandrapur) आणि अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर हायजिन प्रॅक्टिशनर मुजावर अली यांनी विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, ऑनलाईन सतर्कता आणि उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

    कार्यक्रमाची सुरुवात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूरचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. राजेश इंगोले यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. वुमन्स डॉक्टर्स विंग, आयएमए चंद्रपूरच्या उपाध्यक्ष डॉ. पुनम नगराळे आणि सचिव डॉ. समृद्धी आईचवार यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. Cyber crime prevention

    या कार्यक्रमात श्री उमेश आडे, समाज सेवा अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर आणि विद्यापीठातील शिक्षिकांसह 70 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी उत्तरे दिली.

  • court case for traffic violation । वाहनांवरील दंड: ‘हे’ न केल्यास कोर्टात खटला!

    court case for traffic violation
    वाहतूक दंड: भरला नाही, तर थेट कोर्टात खटला!

    court case for traffic violation : जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल आणि दंड भरला नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता वाहनांवर थकीत दंड असल्यास, वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटला दाखल होणार आहे. त्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही माध्यमातून दंड भरू शकणार नाही.

    अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्याकडून आदेश जारी:

    राज्यातील कसूरदार वाहनचालक/मालक यांच्यासाठी ‘वन स्टेट वन ई-चलन‘ अंतर्गत वाहनावर थकीत दंड असल्यास, तो ९० दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे. दंड न भरल्यास, थेट न्यायालयात तुमच्याविरुद्ध खटला दाखल होऊ शकतो. e-challan payment online

    चंद्रपुरात शिक्षकचं निघाला कॉपी बहाद्दर

    चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वाहनांवर दंड प्रलंबित:

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांवर दंड प्रलंबित आहे. त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशन किंवा वाहतूक शाखेत जाऊन थकीत दंड भरावा. न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वी नागरिकांनी आपल्या वाहनावरील थकीत दंड भरावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेद्वारे करण्यात आले आहे. Chandrapur traffic rules

    महत्त्वाचे मुद्दे:

    • ९० दिवसांची मुदत: ‘वन स्टेट वन ई-चलन’ (one state one e-challan system
      ) अंतर्गत दंड भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत आहे.
    • न्यायालयात खटला: मुदतीत दंड न भरल्यास, थेट न्यायालयात खटला दाखल होईल.
    • तातडीने दंड भरा: चंद्रपूर जिल्ह्यातील वाहनचालकांनी तातडीने थकीत दंड भरावा.
    • आवाहान: चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेकडून नागरिकांना दंड भरण्याचे आवाहन.
  • CBSE 10th exam । CBSE च्या नवीन परीक्षा पद्धतीला खासदार धानोरकरांचा विरोध!

    CBSE 10th exam

    CBSE 10th exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने 2026 पासून 10वी च्या परीक्षांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी मसुदा तयार करुन नविन नियमांना मंजुरी दिली आहे. नविन नियमाअंतर्गत 10वी बोर्डाची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar MP) यांनी नविन मसुदा नियमांना विरोध दर्शवित त्या आशयाचे पत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पाठविले आहे.

    केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या नविन नियमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा द्यावी लागणार असल्याने व माध्यमिक शिक्षा मंडळाने बदलविलेल्या मसुदा नियमांच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहित आक्षेप नोंदविलेला आहे.

    या पत्रामध्ये त्यांनी सदर परीक्षा पध्दतीतून दोष निर्माण होणार असल्याचे सांगितले. तसेच, मे महिन्यातील तापमानामुळे विदर्भात सदर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जिवघेणी ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, या पत्रातून शाळांना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असून शालेय वेळापत्रक देखील कोलमडणार आहे व शिक्षकांना सदर परीक्षापद्धती अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे सध्याची प्रचलीत परीक्षापध्दती योग्य असून हिच परीक्षा पध्दत कायम ठेवण्याची आग्रही भुमीका खासदार धानोरकर यांनी घेतली आहे. CBSE exam pattern change

    चंद्रपुरात परीक्षा केंद्रावर धाड, कॉपी चा ढीग आणि शिक्षकांची मदत

    या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने मागविलेल्या हरकती वर खासदार धानोरकरांनी पत्रातून आक्षेप नोंदविला आहे. या संदर्भात खासदर धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री यांची भेट घेणार आहेत. बोर्डाने कुठलाही निर्णय घेण्याआधी विद्यार्थी, शिक्षक व शालेय प्रशासक यांचा देखील विचार करावा असे देखील खासदार धानोरकर यांनी पत्रातून सांगितले.

  • Chandrapur farmers relief । मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींची मदत

    Chandrapur farmers relief

    Chandrapur farmers relief : चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. पण त्याचसोबत या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर व्हावी यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला होता. आता राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचेच हे यश असून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. Sudhir Mungantiwar farmers aid

    चंद्रपूर जिल्ह्यात वाढतोय मानव वन्यजीव संघर्ष, तात्काळ उपाययोजना करा

    अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये पुन्हा शेतकरी उभा राहू शकला पाहिजे, यादृष्टीने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखील मदत देण्यात येते. शासनाकडे जून ते सप्टेंबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रस्ताव आले होते. यात नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या विभागांमधून प्रस्ताव आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने यावर निर्णय घेत राज्यभरासाठी 2925.61 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्याला मंजुरी दिली आहे. Chandrapur agriculture loss compensation

    विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचं काम शिक्षकांच्या खांद्यावर, चंद्रपुरातील प्रकार

    या प्रस्तावांमध्ये चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव तयार करावे, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्या कालावधीत दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने नागपूर विभागांतर्गत चंद्रपूरचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार जून व जुलै 2024 या कालावधीत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5309 शेतकऱ्यांना 7 कोटी 48 लक्ष 89 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यांना 16.4 लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे. Chandrapur flood relief fund

    एकूण 2,254.76 हेक्टर शेतीचे नुकसान या चार महिन्यांच्या कालावधीत झाले होते. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळणार आहे.

    शेतकऱ्यांनी मानले आभार
    मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. तर शेतकऱ्यांच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्यालाही न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

  • Ashok Uike minister | ताडोबाच्या वाघांमुळे चंद्रपूर जगप्रसिद्ध, पण संघर्ष वाढतोय

    Ashok Uike minister

    Ashok Uike minister : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे (Tadoba Andhari Tiger Reserve) चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. मानवाच्या संरक्षणासोाबतच वन्यजीवांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. मात्र आपला अधिवास सोडून जंगलातील वाघ गावांच्या जवळ येत आहे. त्यामुळे मानव – वन्यजीव संघर्ष (Human-wildlife conflict) वाढत असल्याचे निदर्शनास येते. हा संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आणखी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    चंद्रपुरात कॉपी चा महापूर, शिक्षण विभागाच्या पथकाने मारली धाड


    वीस कलमी सभागृह येथे वन विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत कुमार, संचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, राकेश सेपट, कुशाग्र पाठक, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सचिन शेंडे, बापू येळे, वन्यजीव मंडळाचे सदस्य धनंजय बापट व वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


    पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, मानव – वन्यजीव संघर्षात ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यु झाला असेल, त्या कुटुंबातील सदस्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर वनविभागाने नियमित रोजगारसुध्दा उपलब्ध करून द्यावा. प्राचीन काळापासून जल, जंगल, जमीनचे संरक्षण येथील आदिवासी करीत आले आहेत. या आदिवासी युवक-युवतींना कौशल्य विकासातून चांगले प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे. त्यासाठी वन विभागाने धोरण निश्चित करावे. अनुसुचित जमातीच्या शेतक-यांकडून सागवान, झाडे व इतर वनोपज विकत घेतल्यानंतर या शेतक-यांना वेळेवर मोबदला देण्यात यावा. याबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आतापर्यंत किती शेतक-यांना मोबदला दिला, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.


    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरळ लाभ मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उभारावी. या योजनेसोबतच कौशल्य विकासाची जोड देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. चंद्रपूरचे वनवैभव पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी (Wildlife tourism Maharashtra) रस्त्यांची सोयीसुविधा उच्च दर्जाचीच असावी. ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत वनसमित्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके (Ashok Uike minister) यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.


    सादरीकरणात चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, जिल्ह्यात एकूण 4845.30 चौ. कि.मी. म्हणजे एकूण भौगालिक क्षेत्राच्या 42.34 टक्के वनक्षेत्र आहे. महाराष्ट्रात आज वाघांची संख्या 450 च्या आसपास असून यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 225 वाघ आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये 95 ते 100 वाघ आहेत. आतापर्यंत 26829 शेतक-यांना सौर उर्जा कुंपनाचा लाभ देण्यात आल्याचे सांगितले. सोबतच जिल्ह्यातील वन विभागाच्या महत्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली.

  • 10th exam cheating । चंद्रपुरात परीक्षा केंद्रावर धाड, शिक्षकांचा धक्कादायक प्रकार उघडकीस

    10th exam cheating

    10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये सर्रास कॉपी

    10th exam cheating : इयत्ता 10 वीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. हा प्रकार शनिवार (दि. 1) रोजी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला.

    सराईत गुन्हेगाराला दुर्गापूर पोलिसांनी केले स्थानबद्ध


    शनिवारी 10 वी चा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपुर्वा बासूर यांनी नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयाला भेट दिली. येथील वर्गखोली क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करीत असतांना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या कॉपी गोळा करीत होते. तत्पुर्वी तुराणकर यांनी कॉपी बहाद्दरांवर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मुकसंमतीच दिल्याचे निदर्शनास आले. तसेच वर्गखाली क्रमांक 7 मध्ये आणि संपूर्ण शाळेत इतर ठिकाणीसुध्दा मोठ्या प्रमाणात कॉपी असल्याचे आढळून आले. Copy case in exam


    याप्रकरणी संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परिक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच कॉपी करतांना आढळून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकरणे रजिस्टर करून बोर्डाकडे वेगळी पाठविण्यात आली आहे. तर कॉपी करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांचा अहवाल बोर्डाकडे पाठविला जाईल. बोर्डाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे यांनी सांगितले. Chandrapur exam center raid   

    तसेच जिल्ह्यात कुठेही परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणे निदर्शनास आली तर नागरिकांनी परीक्षा परिरक्षक किंवा शिक्षण विभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  • Sudhir Mungantiwar initiatives | झरपट नदीचे पुनरुज्जीवन: सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक पाऊल

    Sudhir Mungantiwar initiatives

    Sudhir Mungantiwar initiatives : आ. सुधीर मुनगंटीवार यांचा गोंड राजवंशाचा गौरव आणि वारसा जतनासाठी पुढाकार

    चंद्रपूर : चंद्रपुरातील या यात्रेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचे पवित्र तीर्थ म्हणून महत्त्व आहे, परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे. यातून गोंड राजवंशाचा इतिहास आणि वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. झरपट नदीच्या पुनरुज्जीवनातून गोंड राजवंशाचा गौरव अधोरेखित होईल. असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

    यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी झरपट नदीची पाहणी करुन नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना बैठकीत दिलेत. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, डाॅ.मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दूलवार, प्रज्वलंत कडू, राजीव गोलीवार, किरण बुटले, सविता कांबळे, विशाल निंबाळकर,चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र वराडे, उपअभियंता श्री. सय्यद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. अमरशेट्टीवार, निरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ.अतुल मधुरे,माजी नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाकडून या प्रकल्पासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आणि प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी चर्चा झाली आहे.”
    नदी पुनरुज्जीवनाच्या पहिल्या टप्प्यात यात्रेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, तर नंतर दीर्घकालीन आणि स्थायी स्वरूपात नदीच्या पुनरुज्जीवनाची योजना आखली जाईल. गोंड राजवंशाच्या ऐतिहासिक वारसाला अधोरेखित करून, त्याचा गौरव टिकवण्यासाठी ही पुनरुज्जीवन मोहीम संपूर्ण ताकदीने आणि समर्पणाने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे बैठकीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि इतर संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 3 एप्रिल 2025 पासून ते 12 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वप्रथम नदीचे जल परीक्षण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसात यात्रे संदर्भातील सर्व रस्त्याची पाहणी करावी. Maharashtra cultural heritage preservation

    Zarpat river rejuvenation project

    सहा दिवसात रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करावे. तीन दिवसात शॉर्ट टेंडर काढून 15 दिवसात रस्ते बांधून तयार करावे. वेकोलीने 15 मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरू करावा. नीरी विभागाने नदीच्या वरच्या बाजूस बंधारा बांधावा. सिंचाई विभागाने नदीचा नकाशा उपलब्ध करून द्यावा. 15.2 किलोमीटरची नदी, तिच्या उगमाविषयी माहिती घेत युद्ध पातळीवर काम सुरू करावे. Chandrapur Mahakali Yatra 2025

    दुर्गापूर पोलिसांची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

    सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम पूर्णत्वास न्यावे. मिशन मोडमध्ये झरपट नदीचे सौंदर्यीकरण कामाला सुरुवात करावी. इतर विभागाने संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. या ठिकाणचा बंधारा दुरावस्थेत असून पुढील वर्षी बंधाऱ्याचे नवीनतम बांधकाम करण्यात येईल. तसेच नदीचे सौंदर्यीकरणाचे कार्य देखील हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

    भाविकांसाठी सुधारित सुविधा:
    यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृह उभारावे त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित करावे. महानगरपालिकेने बंधाऱ्याचे गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम, तसेच अंचलेश्वर मंदिर ते नदीपात्रा दरम्यान टाइल्स लावण्याचे कार्य हाती घ्यावे. नदीपात्र व परिसरातील साफसफाईचे अंदाजपत्रक तयार करावे. झरपट नदी परिसराचा विकास व सोयीसुविधांकरिता नाविन्यपूर्ण योजनेमधून 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करु असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    पाहणीदरम्यान दिलेले आवश्यक निर्देश:
    प्राथमिक टप्प्यामध्ये नदी परिसरातील जलपर्णी वनस्पती काढुन नदीपात्रातील साफसफाई व स्वच्छता करावी. नदीपात्रात येणारे सांडपाणी बंद करावे. 31 मार्चपर्यंत नदीचं पात्र स्वच्छ पाण्याने वाहते करावे. योग्य ठिकाणी गट्टू बसवावे. दोन टप्प्यांमध्ये काम करावे. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यातील कामाला प्राधान्य द्यावे, याकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी आपण पाठपुरावा करु असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • Criminal Detention under MPDA । चंद्रपूरमध्ये पोलिसांचा दणका! MPDA कायद्यान्वये गुन्हेगाराला तुरुंगात डांबले

    Criminal Detention under MPDA

    Chandrapur Crime News: Dangerous Criminal Arrested Under MPDA Act

    Criminal Detention under MPDA : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या २७ वर्षीय करीम फिरोज सय्यद याला महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. Chandrapur Police Action

    ओबीसी समाजाच्या समस्येवर सरकारने लक्ष द्यावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कठोर कारवाई

    करीम फिरोज सय्यद हा दुर्गापूर भागात सतत गंभीर गुन्हे करत होता आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविला. पुढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.

    जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता व आरोपीचे स्थानबद्धीकरण

    जिल्हाधिकारी यांनी MPDA अंतर्गत प्रस्तावास मान्यता देऊन करीम फिरोज सय्यद याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशाची प्रत दुर्गापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले व त्याला चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. MPDA Act Maharashtra

    यशस्वी कारवाईत पोलिसांचा महत्त्वाचा सहभाग

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अरुण खारकर आणि गुन्हे शोध पथकाने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे वर्ष २०२४ मध्ये व वर्ष २०२५ च्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

    MPDA कायद्याची अंमलबजावणी गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाची

    MPDA कायद्यांतर्गत आरोपीला काही काळासाठी स्थानबद्ध करता येते, ज्यामुळे तो समाजात पुन्हा गुन्हे करू शकत नाही. यामुळे पोलिसांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर पावले उचलण्याची संधी मिळते आणि नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव येतो.

    चंद्रपूर पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात अशाच प्रकारे कठोर कारवाई करून पोलिसांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.