Blog

  • Chandrapur Shirdi direct bus । खासदार धानोरकरांचा पुढाकार! चंद्रपूर-शिर्डी बस सेवा पुन्हा सुरू होणार?

    Chandrapur Shirdi direct bus

    Chandrapur Shirdi direct bus : चंद्रपूर : चंद्रपूर ते शिर्डी व शिर्डी ते चंद्रपूर अशी थेट एस.टी. महामंडळाची बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 

    शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात. कोरोना काळापासून हि बस सेवा  बंद करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांचे बुकिंग वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि खाजगी वाहनांनी प्रवास करणे अनेकांना परवडत नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे एस.टी. महामंडळाने थेट चंद्रपूर – शिर्डी अशी सेवा सुरू केल्यास भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरेल, असे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. Chandrapur to Shirdi bus

    चंद्रपुरात आता मायनिंग टुरिझम

    चंद्रपूरच्या महाकाली देवी मंदिरापासून ते शिर्डीच्या साई मंदिरापर्यंतचा धार्मिक प्रवास बस सेवेमुळे अधिक सुलभ होईल आणि ग्रामीण भागातीलही भाविक या सेवेमुळे लाभ घेऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या. राज्य परिवहन महामंडळाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच ही सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Chandrapur to Shirdi Direct Bus Service

  • free sewing training for women । शिवणकामातून स्वावलंबनाची वाट – आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून महिलांसाठी विशेष शिबिर

    free sewing training for women

    free sewing training for women : निशुल्क शिवणकला शिबिर म्हणजे केवळ शिवणकाम शिकण्याचे साधन नव्हते, तर तो स्वावलंबनाचा एक पहिला टप्पा होता. आपल्या हातात कौशल्य असेल, तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण स्वतःला सक्षम करू शकतो, आपले कुटुंब सुदृढ करू शकतो. आमच्यासाठी महिला सशक्तीकरण ही केवळ घोषणा नसून ती एक कृती असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. women empowerment through skills

    घुग्गुस शहरात तलवारीसह हद्दपार आरोपीला अटक

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नागीनाबाग वार्ड येथे महिलांसाठी निशुल्क शिवणकाम, फॅशन डिजायनींग, ड्रेस कटिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक महिना चाललेल्या शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला असून, यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या १०० हून अधिक प्रशिक्षणार्थी महिलांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका व कवयित्री गीता रायपुरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रशिक्षिका कौसर खान, आशू फुलझेले, वंदना हजारे, सुरेखा चहारे, स्वाती, पूजा तावडे, राम जंगम, प्रतीक शिवणकर, ताहिर हुसेन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, मागील तीन वर्षांत आपण शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, मेकअप यांसारखी अनेक निशुल्क शिबिरे आयोजित करून हजारो महिलांना प्रशिक्षण दिले आहे. यातील अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे. आज येथे १०० हून अधिक महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून आपण जे काही शिकलात, ते आता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवा. हे कौशल्य रोजगाराच्या संधी निर्माण करणारे ठरेल.  fashion designing course for women free

    women empowerment through skills

     काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, तर काही जणी घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील. यासाठी अधिक मदतीची गरज भासल्यास आमचे कार्यालय सदैव तुमच्या सेवेस तत्पर राहील. शिबिराचे यश केवळ प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचेच नाही, तर त्या प्रशिक्षणाला दिशा देणाऱ्या प्रशिक्षकांचे, संयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. या समारोपीय कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • local crime news today । घुग्गुसमध्ये तलवार घेऊन दहशत माजवणारा गुन्हेगार अटकेत – पोलिसांची तातडीने कारवाई

    local crime news today

    local crime news today : घुग्गुस शहरात हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला घुग्गुस पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते अशी माहिती आहे. banned criminal entry

    १९ एप्रिल रोजी नाणी उर्फ कार्तिक स्वामी कोडापे राहणार एलसीएच क्वार्टर नकोडा हा सायंकाळी ६ वाजेदरम्यान लता मंगेशकर चौकात हातात तलवार घेऊन स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता, याबाबत घुग्गुस पोलिसांना माहिती मिळताच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

    खंडणीचा खोटा गुन्हा येणार अंगलट?, विक्रांत सहारे यांचे खळबळजनक आरोप

    आरोपी नाणी उर्फ कार्तिक कोडापे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलाने ६ महिन्याकरिता जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती, मात्र आरोपी हा पोलिसांची नजर चुकवीत हद्दपार कारवाईला न जुमानता घुग्गुस शहरात दाखल झाला व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायला लागला.

    विशेष बाब म्हणजे हद्दपारीची कारवाई आरोपीवर झाली असताना सदर आरोपी घुग्गुस शहरात आला कसा? पोलिसांची गुप्तचर यंत्रणेला त्या आरोपीची चाहूल का बरं लागली नाही असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले आहे.

    सदरची यशस्वी कारवाई घुग्गुस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तायवाडे, पोलीस कर्मचारी संजय आतकूलवार, रवि वाभीटकर, नितीन मराठे, महेश भोयर व विजय ढपकस यांनी केली.

  • coal mining site visit | ऊर्जा राज्यमंत्र्यांचा कोळसा खाण प्रकल्पात थेट प्रवेश – पाहा काय घडलं पुढे!

    coal mining site visit

    coal mining site visit : चंद्रपूर : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी शनिवारी(दि.19) वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी राखली जाते, कोळसा खाण प्रबंधन कसे केले जाते, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच पाईप कन्व्हेनरचे निरीक्षण सुद्धा जाणून घेतले. पाईप कन्व्हेनरच्या माध्यमातून रोज 6 हजार टन कोळसा पाईपद्वारे वाहतूक होते. त्यामुळे प्रदूषण थांबण्यास मदत होते, याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. Meghana Sakore Bordikar official visit

    युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा

    यावेळी बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, कोळसा खाण प्रकल्पात महिला कर्मचारी व अधिकारी सुद्धा कार्यरत आहे, हे जाणून आनंद झाला. सर्वांनी अतिशय चांगले काम करावे. महिला आज पुरुषांसोबत कोळसा खाण प्रकल्पामध्ये काम करीत आहे. चांगल्या कामामुळे आणखी वीज निर्मिती होईल. असेच काम भविष्यात सुद्धा सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इरई धरणाची सुद्धा पाहणी केली.

    Meghana Sakore Borde official visit

    यावेळी ऑपरेशनल डायरेक्टर संजय मारुडकर, मुख्य अभियंता विजय राठोड, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, यांच्यासह एरिया जनरल मॅनेजर हर्षद दातार, क्षेत्र प्रबंधक पुनम ढोबळे, खाण प्रबंधक मोहम्मद, डी.एन. तिवारी, सुनील ताजने, हरीश गव्हाळे आदी उपस्थित होते

    महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते कोळसा खाण प्रकल्पात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विना गिरडकर, सारिका पोडे, प्रतिभा नांदे व इतर महिलांचा समावेश होता.

  • false extortion case | “तक्रार केली म्हणून खोटा गुन्हा?” – विक्रांत सहारे यांचा पलटवार

    false extortion case

    false extortion case : चंद्रपूर – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याविरोधात माती उत्खनन करणाऱ्या कावेरी कंपनीने 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. उबाठा शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माझ्यावर कावेरी कंपनीने खोटे गुन्हे दाखल केले आहे असा आरोप लावला. child labor in mining

    भंगार दुकानाची आग शासकीय वसाहतीच्या दारात


    चंद्रपुर जिल्हा कोळसा खाणीने वेढला असून यामुळे इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे, भटाळी कोल माईन्स मधून माती चे उत्खनन करण्याचे काम आंध्रप्रदेश मधील कावेरी सी 5 जेवी या कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे स्थानिकांना कंपनीत रोजगार मिळेल अशी आशा अनेकांना लागली मात्र त्या कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून पैसे घेत कामावर घेण्यात आले, डिसेंम्बर महिन्यात अल्पवयीन मुलगा कामावर लागला मात्र कावेरी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर वेंकटेश्वर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला बोलावीत तू कामाला लागण्यासाठी पैसे का दिले म्हणून त्याला मारहाण करीत कामावरून काढले व ही बाब कुणाला सांगू नको असे खडसावले, सदर घटना जानेवारी 2025 मधली आहे. youth leader news

    सदर अल्पवयीन मुलाला कामाचा मोबदला मिळाला नाही उलट त्याला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या आईने न्यायासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे मदत मागितली. false extortion case


    20 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी अल्पवयीन मुलगा व त्याची आई यांना सोबत घेत कावेरी कंपनीत कामाचा मोबदला व मारहाण का केली याबाबत जाब विचारला मात्र मॅनेजर रेड्डी यांनी अरेरावी ची भाषा करीत तुम्हाला जे करायचं ते करा असे उत्तर दिले. 22 मार्चला सहारे यांनी कावेरी कंपणीविरुद्ध कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागितली, सदर कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून अवजड कामे करून त्यांना मोबदला न देता मारहाण करण्यात येते अशी तक्रार केली. याबाबत कारवाई संदर्भात कामगार आयुक्ताने संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार सुरू केला.

    विक्रांत सहारे यांनी कंपनी बाबत तक्रार का केली म्हणून 31 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी 5 लाखांची खंडणी मागितली असा गुन्हा रेड्डी यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. mining company controversy

    यावर 19 एप्रिलला विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषद घेत कावेरी कंपनी व पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला, ते म्हणाले रेड्डी यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कार्यालयातील 2 कर्मचारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात आले आणि मला कामगार आयुक्तांना तक्रार का केली असे विचारले, त्यावर माझा इगो हर्ट झाला, आता मला 5 लाख रुपये व माझे काही लोक कामावर घ्या असा उल्लेख आहे.


    मात्र या प्रकरणात ते दोन कर्मचारी फिर्यादी व्हायला हवे होते तसे झाले नाही, जे माझ्या कार्यालयात कधी आले नाही ते या प्रकरणात फिर्यादी बनले, विशेष बाब म्हणजे त्यांच्या तक्रारीत उल्लेख असलेले दोन्ही कर्मचारी माझ्या कार्यालयात आलेच नाही, 2 एप्रिलला त्यामधील एका कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये हमीपत्र दाखल केले की आम्ही विक्रांत सहारे यांच्या कार्यालयात कधी गेलेलो नाही, आमचं नाव त्या पोलीस तक्रारीत टाकण्यात का आले हे सुद्धा आम्हाला समजले नाही.

    youth leader news

    यावर रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख म्हणाले की आमच्याकडे कावेरी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रेड्डी यांनी खंडणी मागितली याबाबत फिर्याद दिली, नियमाप्रमाणे आम्ही त्यांची तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल झाल्यावर ती तक्रार खरी की खोटी हे तपासात निष्पन्न होणार, त्यांनतर यावर न्यायालय निर्णय देईल, या प्रकरणी पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं आहे.

    सदर अल्पवयीन कामगार मारहाण प्रकरण आता दिल्ली राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे वर्ग करण्यात आले आहे. लवकरच पुढील कारवाई होणार अशी माहिती आहे.
    आयोजित पत्रकार परिषदेत युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, कांग्रेसचे प्रशांत भारती, आपचे राजू कुडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे संजय ठाकूर उपस्थित होते.

    विक्रांत सहारे यांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला की या गुन्ह्यामागे राजकीय षडयंत्र असून शहरातील एका युवा उद्योजकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वास्तविक बघता माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे, पुढील काही दिवसात त्या उद्योजकांचे नाव आपल्यासमोर आणणार. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहोत.

  • scrap shop fire chandrapur | चंद्रपुरात भंगार जाळताना पेटली आग, सरकारी क्वार्टर्सच्या दारात आली संकटाची ज्वाला

    scrap shop fire chandrapur

    scrap shop fire chandrapur : चंद्रपूर उन्हाच्या तडाख्याने सध्या तापत आहे, तापमान 42 डिग्री सेल्सिअस च्या वर गेल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही आहे, मात्र आज चंद्रपूर-नागपूर मार्गावरील संजय गांधी मार्केटच्या मागील भागात असलेल्या भंगार दुकानातील काही साहित्य जाळल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. chandrapur fire news

    चंद्रपुरातील नरभक्षक वाघ जेरबंद


    या आगीचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहती जवळ पोहचल्याने स्थानिक नागरिकांनी एका घराचे कुलूप तोडत सिलेंडर बाहेर काढले.
    नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला सूचित केले. यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ आगीवर नियंत्रण आणले.


    स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिली की जवळच असलेल्या भंगार दुकानात अनेक दिवसांपासून वेस्ट मटेरियल पडले होते, बहुतेक त्यांनी ते मटेरियल जाळले मात्र त्यामुळे आगीने भीषण रूप धारण करीत आमच्या वसाहतीजवळ पोहचली भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असे सांगितले.

  • tiger captured in Maharashtra । मरणाची छाया बनलेला वाघ अखेर सापडला: ब्रह्मपुरीचा श्वास आता मोकळा

    tiger captured in Maharashtra

    tiger captured in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला १७ एप्रिल रोजी डार्ट मारीत जेरबंद करण्यात आले. problematic tiger captured

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून आतापर्यंत या संघर्षात १२ नागरिकांचा बळी गेला आहे. उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात T-३ वाघाने ४ नागरिकांवर हल्ला करीत दोघांना ठार तर दोघांना जखमी केले होते. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढू नये यासाठी नरभक्षक वाघाला पकडणे गरजेचे असल्याने वनविभागाने वाघ पकडण्यासाठीची मोहीम राबविली. brahmapuri tiger attack

    चंद्रपुरातील नदीत दडलं रहस्य, नदीतून उलगडलं २५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

    १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यानो डार्ट तयार करून दिला, त्यानंतर शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी T-३ वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध करीत जेरबंद केले.

    सदर मोहीम सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग महेश चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे, विकास ताजने, योगेश लडके, प्रफुल वाटगुरे, गूणनक धोरे, दीपेश टेम्भूर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर व राकेश आहुजा यांच्या उपस्थितीत पार पडली.

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय १३ वर्ष असून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

  • Suresh Chopane fossil research । चंद्रपूरच्या नदीत दडलं होतं रहस्य! वाचल्यावर विश्वास बसणार नाही!

    Suresh Chopane fossil research

    Suresh Chopane fossil research : चंद्रपुर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अश्या प्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहेत. ह्या जीवाश्मा सोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहेत. दुर्मिळ हत्तींचे जीवाश्मे आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे सापडणे हे अतिशय महत्वाचे मानले जाते. Extinct elephant fossils Maharashtra

    चंद्रपूरचा कडक उन्हाळा, खासदार धानोरकर यांनी सुचवले उपाय

    ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळ जवळ २५००० वर्शादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. .हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजी चे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा ह्यांनी व्यक्त केले आहे. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले.आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. ह्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) ह्या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने ह्या हत्तीं जीवाश्मांचे चे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. Pleistocene fossils Vidarbha

    प्लेईस्टोसीन ह्या २ लाख ते ११,७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे आणि पाषाण युगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते .ह्याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते.जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा भारतात प्रचंड महापूर आले आणि ह्या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या.त्याच पुरातील गाळात ( अल्लुव्हींयम ) अनेक सजीवांचे पुरावे सापडतात.चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे १५ फुट उंचीचे विशाल जीव होते आणि लुप्त झालेल्या हे स्टेगाडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमताच मिळाली आहेत अशी माहिती संशोधक पा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.


    प्रा सुरेश चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते.त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमता चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली .संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली .त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले असून ही सर्व जीवाश्मे त्यांनि घरी स्थापन केलेल्या ,सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या संग्रहालयात ठेवली आहेत.भूगोल,भूशास्त्र ,जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या संशोधक विध्यार्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. Lost elephant species India


    मिळालेली जीवाश्मे – सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे ,चर्वण करणारी दात (Molar) आणि डोक्याची कवटी ,छातीची हाडे अश्या अवयवांचा समावेश आहे.अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. .गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत.परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत . सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगाना मध्ये हत्त्तीची आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. Lost elephant species India

    Extinct elephant fossils Maharashtra


    पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली – ह्या संशोधनाचा महत्वाचा घटक म्हणजे ह्याच हत्तींच्या जीवाश्मा सोबत पाषाणयुगीन मानवानी बनविलेले दगडी अवजावरे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडन्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते हे सिध्द होते तर मानवाच्या अति शिकारीमुळे आणि देखील हत्त्ती विलुप्त होण्यास मदत झाली असावी असे लक्षात येते. येथे मिळालेल्या अवजारात हात कुऱ्हाडी (हँन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली असून ती प्रा सुरेश चोपणे त्यांच्या संग्रहालयात ठेवलेली आहेत.

  • Guru Yamunamai visit to Chandrapur । श्री गुरु यमुनामाय यांचे चंद्रपूरला आगमन; यात्रेला लाभली आध्यात्मिक ऊर्जा

    Guru Yamunamai visit to Chandrapur

    Guru Yamunamai visit to Chandrapur : शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामाय यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नीने श्री गुरु यमुनामाय यांचे मनःपूर्वक स्वागत केले. अम्मा का टिफिन आणि श्री माता महाकालीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. Chanda Mahakali Yatra

    शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट ओळखपत्र

    प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही चैत्र महिन्यात महाकाली मंदिर परिसरात आयोजित यात्रेत नांदेड जिल्ह्यातून श्री गुरु यमुनामाय यांचे अश्वारूढ होऊन आगमन झाले. यावर्षीही त्यांनी आपल्या उपस्थितीने यात्रेला आध्यात्मिक तेज प्राप्त करून दिले. राजमाता निवासस्थानी झालेल्या भेटीत श्री गुरु यमुनामाय यांनी यात्रेकरूंसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधा – स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नछत्र, आरोग्य व्यवस्था आणि संपूर्ण नियोजनाबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. Mahakali Yatra 2025

    त्यांनी आयोजकांचा सेवाभाव आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मनापासून प्रशंसा केली. गेल्या वर्षी झालेल्या यात्रेदरम्यान श्री गुरु यमुनामाय यांनी स्वर्गीय अम्मा यांची भेट घेतली होती. यंदा अम्मा आपल्यात नसल्याची बाब समजताच त्यांनी अम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भावूक करणारा ठरला.

    chanda mahakali yatra

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, महाकाली यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहे. श्री गुरु यमुनामाय यांचे चंद्रपूरमध्ये आगमन हे आपल्या सर्वांसाठी गौरवाचे आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या साक्षात दर्शनाने यात्रेला नवी उंची मिळाली आहे.
    स्वर्गीय अम्मा यांनी आयुष्यभर सेवा, समर्पण आणि भक्तीचा आदर्श ठेवला. त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणा देत आहे. यंदाच्या यात्रेत त्या नसल्या तरी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. येत्या काळात ही यात्रा आणखी भव्य, सुसंघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    श्री गुरु यमुनामाय म्हणाल्या की, पुढील वर्षी महाकाली यात्रेत भाविकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास आहे. येथे शिस्त, सेवा आणि श्रद्धेचा संगम आहे. त्यामुळे देवतेच्या कृपेने यात्रेचा विस्तार आणि प्रभाव नक्कीच वाढेल असे त्या म्हणाल्या.

  • Farmer ID registration online AgriStack scheme । “डिजिटल शेतीसाठी सरकारचा पुढाकार – शेतकऱ्यांना मिळणार खास ओळख क्रमांक”

    Farmer ID registration online AgriStack scheme

    Farmer ID registration online AgriStack scheme : कृषी क्षेत्राला डिजिटल युगात पुढे नेण्यासाठी केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली ॲग्रिस्टॅक योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सदर योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीन नोंदी, पीक उत्पादन, बाजारपेठेतील संधी, शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने एकत्रित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. digital farming solutions

    आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाळ, नोंदणी सुरु

    या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येत आहे. technology for better crop yield

    चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल व कृषी विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या लाभासाठी डिजिटल शेती डेटाबेस तयार करून, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उत्पादकता वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मिळणार असून, ते आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून शेती व्यवसाय अधिक फलदायी करू शकतील. digital agriculture database

    ॲग्रिस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे :

    सरकारी योजनांचा जलद लाभ : शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केल्यामुळे अनुदान, पीक विमा, कर्ज आणि अन्य योजनांचा लाभ सहज मिळतो.

    शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : हवामान अंदाज, माती परीक्षण आणि पीक उत्पादनाच्या सुधारित पद्धतींबाबत माहिती मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते.

    बाजारपेठेतील संधी : शेतकऱ्यांना बाजारभावाची अद्ययावत माहिती मिळते, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे थेट विक्री करण्याची संधी मिळते.

    आर्थिक सुरक्षितता : थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

    सुलभ नोंदणी प्रक्रिया : विविध योजनांच्या लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज नसते, कारण त्यांची सर्व माहिती एकाच डिजिटल डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते.

    शेतीतील धोके कमी करणे : पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा लाभ सहज मिळतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून निघते.

    कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) 15 एप्रिल, 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे.

    शेतकऱ्यांना आवाहन : फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, प्रशिक्षण आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC, आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तथा जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे