Blog

  • Irai River Deepening in Chandrapur । चंद्रपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण – इरई नदी खोलीकरण मोहिमेची भव्य सुरुवात!

    Irai River Deepening in Chandrapur

    Irai River Deepening in Chandrapur : चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणारी ही नदी एकप्रकारे चंद्रपूर शहराचे नाक आहे. त्यामुळे ती सुंदरच असायला पाहिजे. इरईचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करणे हे केवळ एका व्यक्तिचे काम नव्हे तर यात शासन आणि प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांचेसुध्दा योगदान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकसहभागातून आणि सर्वांच्या सहकार्यानेच इरई नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस आहे, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. Irai river cleaning project

    “बौद्धगया महाविहाराची सुटका हवीच! चंद्रपूरातून हजारोंचा शांतता मोर्चा”

    जिल्हा प्रशासनद्वारे इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. local river restoration campaign

    इरई नदी खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, लोकसहभागातून हे खोलीकरण अभियान नक्कीच यशस्वी होईल. ही आपली नदी आहे, हे आपले अभियान आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांनी ठेवावी. तसेच या अभियानाबद्दल जास्तीतजास्त जनजागृती करावी, जेणेकरून लोकांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग. या नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता ही दोन्ही कामे हाती घेण्यात येईल. आजपासून 45 दिवस हे अभियान निरंतर चालणार आहे. प्रत्येक दिवसाचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.

    विरोधकांनी इरई नदीच्या अभियानात सहभाग घ्यावा : केवळ नावासाठी विरोध करून इरई नदी स्वच्छ होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या अभियानात सामील व्हावे. नदीच्या खोलीकरण अभियानाबद्दल कोणीही शंका – कुशंका मनात आणू नये. आपल्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही, याचीसुद्धा दक्षता घ्यावी. इरई नदीच्या खोलीकरणातून चंद्रपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी, मंत्री म्हणून त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ता असे एकूण 5 लक्ष रुपयांचा धनादेश इरई नदीच्या खोलीकरण अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. Chandrapur river deepening

    इरई नदीच्या 17 कि.मी. साठी दीर्घकालीन उपाययोजना करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून इरई नदी खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. नदी खोलीकरणासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांतून निधी गोळा होईल. मात्र अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा आपले वेतन देतात, ही अभिमानाची बाब आहे. नद्यांबाबत नागरिकांमध्ये गंभीरता असावी. मंत्री असताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून आपण राज्यात 108 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले होते.

     इरई नदीमध्ये ओव्हर बर्डन जास्त जमा होत असल्यने डब्ल्यूसीएल आणि सीटीपीएस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. इरई नदीच्या 17 कि.मी.साठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी उत्तम नियोजन व्हावे, तसेच हे अभियान निरंतर चालावे. पर्यावरण तज्ज्ञांचीसुद्धा एक स्थायी स्वरूपाची समिती यासाठी गठित करावी, असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार या अभियानासाठी देत असल्याचे जाहीर केले.  Irai River Deepening in Chandrapur

    संपूर्ण क्षमतेने नदीचे खोलीकरण अभियान राबवावे – आमदार किशोर जोरगेवार

    नद्यांच्या काठावर मानवी वस्ती वसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इरई, झरपट, वैनगंगा, वर्धा या नद्या वाहतात. पहिल्या टप्प्यात इरई नदीचे खोलीकरण व त्यानंतर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे संपूर्ण अभियान प्रशासनाने पूर्ण क्षमतेने राबवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. पुढे ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. 17 किलोमीटरची जीवनवाहिनी असलेल्या या नदीवर आणखी तीन ते चार बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच धानोरा बॅरेज प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यात यावा. इरई नदी पूर संरक्षण भिंतीचा प्रस्ताव शासन स्तरावर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी 2 लक्ष 55 हजार रुपयांचा धनादेश अभियानासाठी पालकमंत्र्यांकडे सुपुर्द केला. Irai River Deepening in Chandrapur

    Irai river cleaning project

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आज अतिशय महत्त्वकांक्षी कामाचा शुभारंभ होत आहे. चंद्रपूर शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. इरई नदी ही चंद्रपूरची लोकवाहिनी आहे. त्यामुळे तिला वाचवणे आपले कर्तव्यच आहे. 17 कि.मी.च्या तीन टप्प्यात एकूण 5 लक्ष ब्रास गाळ, वाळू मिश्रित गाळ नदीतून काढण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येईल. त्यामुळे त्यांची शेती सुपीक होण्यास मदत होईल. घरकुल लाभार्थ्यांना या नदीतील वाळू मोफत देण्यात येणार आहे तर शासकीय व इतर कंत्राटदारांना अल्प दरात वाळू मिळेल, असे त्यांनी सांगितले. Irai River Deepening in Chandrapur

    प्रास्ताविकात मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, नदी असलेली शहरे ही भाग्यवान असतात. विकासाच्या भारामुळे इरई नदी घुसमटत आहे. त्यामुळे खोलीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला. यासाठी पालकमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आराखडा तयार केला आणि लोकसहभागाने हे अभियान राबविण्याच्या सूचना केल्या. या अभियानात शासन – प्रशासन, यांच्यासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला नुकतेच 8 लक्ष रुपयांचे दोन पुरस्कार मिळाले असून दोन्ही पुरस्काराची रक्कम या अभियानासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते खोलीकरणाच्या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन आणि नदीच्या पात्रात कुदळ मारून खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रिध्दी उईके यांनी तर आभार अधिक्षक अभियंता प्रवीण झोड यांनी मानले.

  • Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest । बोधगया आमचा आहे! चंद्रपूरच्या रस्त्यावर गगनभेदी घोषणा

    Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest

    Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest : बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.

    आपल्या परिसरात अनधिकृत बालगृह आहे काय? तात्काळ करा तक्रार

    रखरखत्या उन्हात नागरिक या शांतता मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते, आम्हाला आमचे पवित्र स्थळ परत करा अश्या घोषणा या शांतता मोर्च्यात करण्यात आल्या.

    बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनही झाले. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल. भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यांत आंदोलन केले. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्द्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. bodhgaya temple controversy

    हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 चा बीटी कायदा रद्द करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर, भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे. बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले.

  • vulture conservation project Maharashtra । ताडोबात गिधाडांची दुसरी तुकडी दाखल, प्रकल्पाचा नवा टप्पा

    vulture conservation project Maharashtra

    vulture conservation project Maharashtra : चंद्रपूर:पूर्णपणे नामशेष होत असलेल्या संकटग्रस्त प्रजातीला पूर्नस्थापित करण्याकरीता पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची (Gyps bengalensis) दुसरी तुकडी आज गुरूवारी (24एप्रिल) ला जटायू संवर्धन प्रकल्प अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात सोडण्यात आली. पांढऱ्या पाठीचे हे गिधाडे हरियाणामधील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र (VCBC) येथून स्थानांतरित करण्यात आले आहेत. Tadoba vulture release news

    जननी शिशु योजना ठप्प होण्याच्या मार्गावर, खासदार धानोरकर यांनी घेतली दखल


    या दुसऱ्या तुकडीत पाच गिधाडांचा समावेश असून त्यामध्ये तीन नर व दोन मादी आहेत. प्रत्येक गिधाडाचे स्वतंत्र ओळख क्रमांक व वय नोंदवलेले आहे. नर गिधाडांमध्ये F24 (वय ६ वर्ष), N16 (वय 2 वर्षे) आणि N77 (वय 1.4 वर्षे) यांचा समावेश आहे, तर z.25 (वय 6 वर्ष) व z 34 (वय 3 वर्षे) मादी गिधाडे आहेत.
    हा प्रकल्प महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. पक्षीगृहात सोडण्यात आलेली गिधाडे सध्या चांगल्या प्रकृतीत असून, त्यांच्या वर्तणूक व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. Jatayu vulture project India

    Tadoba vulture release news


    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात ही दुसरी तुकडी सोडण्यात आली आहे. या आधी 2024 मध्ये 10 गिधाडांची पहिली तुकडी सोडण्यात आली होती, ज्यापैकी दोन गिधाडे n 10 आणि j 74 जिवंत आहेत. सध्या या परिसरात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची नैसर्गिक लोकसंख्या अस्तित्वात नाही. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरु असलेला हा प्रकल्प संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरत आहे. या परिसरातून पूर्णपणे नामशेष झालेल्या या अत्यंत संकटग्रस्त प्रजातीला पुन्हा स्थापन करण्याचे उदिष्ठ्य या उपक्रमामागे आहे.


    प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, BNHS चे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, BNHSचे संचालक किशोर रिठे आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. डॉः श्रवण सिंह, डॉ. काझवीन उमीगर, हेमंत बाजपेयी, मयंक बर्डे, मनन महादेव, कोळसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर व त्यांच्या चमूने गिधाडांची सुरक्षित वाहतूक व पक्षीगृहात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

  • Bhadravati land survey news । गावठाण मोजणी न झाल्यास तीव्र आंदोलन होणार!” – मिनलताई आत्रामांचा इशारा

    Bhadravati land survey news

    Bhadravati land survey news : भद्रावती – भद्रावती शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना जागेची आखीव पत्रिका तात्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी दिला आहे.

    या संदर्भात सौ. आत्राम यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भद्रावती गावठाण क्षेत्रातील जमिनींच्या सिटी सर्व्हे संदर्भात पाठपुरावा सुरू असूनही संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे महत्त्वाचे काम थंड बस्त्यात गेले आहे. परिणामी येथील नागरिकांना शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाहीये. Drone land survey

    आपल्या क्षेत्रात अनधिकृत हॉस्टेल आहे का? तक्रार करा

    गौराळा वार्डसह शहरातील इतर ९ गावठाण वसाहतींमध्ये अनेक नागरिक गेली १०० वर्षे राहत आहेत. मात्र त्यांच्या जमिनींची व मालमत्तांची कुठलीही अधिकृत नोंद नसल्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनांपासून ते जातीचा दाखला काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेत नागरिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. Drone land survey benefits

    केंद्र शासनाच्या ‘स्वामित्व योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये गावठाण मालमत्तांचे ड्रोनद्वारे मोजमाप करण्यात येत आहे. हे मोजमाप अचूक आणि जलद गतीने होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळतो. याद्वारे घरे, रस्ते, नाले, खुल्या जागा आदींचे सीमांकन स्पष्टपणे होणार असून, शासनाच्या ताब्यातील जमिनींचे संरक्षणही शक्य होईल. सर्वेक्षणानंतर मिळकत नकाशा आणि कायदेशीर हक्काचा अभिलेख तयार करून नागरिकांना अधिकृत पत्रिका देण्यात येईल, ज्यामुळे बँक कर्ज मिळविणेही सुलभ होईल.

    मात्र, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील जनरल मॅनेजर यांनी या ड्रोन मोजणीला आक्षेप घेतल्याने भद्रावती शहरातील गावठाण मोजणीची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सौ. मिनलताई आत्राम यांनी केली आहे.

    “मा. पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून गौराळा आणि इतर गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे करून नागरिकांना जागेची अधिकृत आखीव पत्रिका तात्काळ द्यावी, अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

  • Municipal water supply solutions । इरई नदीचा गाळ उपसून शहराला पाणी! आमदार जोरगेवार यांनी सुचविला उपाय

    Municipal water supply solutions

    Municipal water supply solutions : शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक बैठक पार पडली. इरई नदीतील गाळ उपसा तसेच शहरातील विविध मूलभूत सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.

    १ मे पासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अभियान

    या बैठकीस मनपा आयुक्त विपिन पालिवाल, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, स्वच्छता विभागाचे निरीक्षक डॉ. अमोल शेडकी, बांधकाम विभागाच्या अभियंता वैष्णवी रिठे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबूलकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, करणसिंग बैस, करण नायर, विनोद अनंतवार आदी उपस्थित होते.

    शहर व परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर इरई नदीतील गाळ उपसा हे एक महत्त्वाचे काम ठरत असून, या कामाच्या प्रगतीचा व अडचणींचा सविस्तर आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळ उपसण्याची सद्यस्थिती, यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि कामाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. River dredging for irrigation

    शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी टँकरद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. झोननिहाय पाणीवाटप अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्या आणि टँकरच्या स्थान निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला यावेळी देण्यात आले. Sustainable urban water management

    परिसरातील रस्ते व बांधकामाच्या कामांची सविस्तर समीक्षा करताना, या प्रकल्पांना गती देण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार म्हणाले केली. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करताना डिव्हायडर देखभाल, फुलझाडे लावणे यांसारख्या सौंदर्यीकरण च्या उपक्रमांना अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने आणि प्रभावीपणे सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला संबधित अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • unregistered child hostel complaint । आपल्या परिसरात अनधिकृत छात्रावास आहे का? तात्काळ 1098 वर फोन करा

    unregistered child hostel complaint

    unregistered child hostel complaint : आपल्या परिसरात अनाधिकृत छात्रावास, अनाधिकृत बालगृह/ बालकांचे निवासी संस्था सुरु असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री नंबरवर तसेच महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

    रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी गौडा यांची ग्रामीण भागात भेट

    परिसरात अनाधिकृत बालगृह व छात्रावास सुरु असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 1098 ला माहिती द्यावी व  बाल शोषण रोखण्याकरीता सहकार्य करावे. पुणे जिल्ह्यात आळंदी आणि ठाणे जिल्ह्यात खडवली येथे विनापरवाना, अनाधिकृत बालगृह, छात्रावास आणि अनाथालय चालवण्यात येत असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत. या ठिकाणी बालकांना इच्छा नसताना ठेवले जाते व त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण झाले आहे. हे प्रकरण खुप गंभीर आहे. illegal child shelter report

    बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व संशोधित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 चे उल्लंघन आहे. या अधिनियम मधील कलम 42 नुसार अशा संस्थाना आवश्यक मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विना नोंदणी प्रमाणपत्र बालगृह/संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास आणि कमीतकमी 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

                 त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात व क्षेत्रात असे अनाधिकृत बालकांच्या संस्था/बालगृह व छात्रावासबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर 1098 वर माहिती देवून बालकांचे शोषण थांबविण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले आहे. childline 1098 India

  • district collector visit updates । जिल्हाधिकाऱ्यांचा पोंभुर्णा दौरा: भर उन्हातही विकासकामांचा आढावा

    district collector visit updates

    district collector visit updates : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.

    कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे अभियान

    23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला. employment under MGNREGA

    क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली.

    पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले. government health facility inspection

    employment under MGNREGA

    सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.

  • compost pit for village । 1 मे पासून चंद्रपुर जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीमेची सुरुवात

    compost pit for village

    compost pit for village : चंद्रपुर : 24 एप्रिल 2025 ग्रामीण जनतेमध्ये स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उदेश्याने  दि. 01 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” मोहीम चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. organic waste composting at home

    जननी शिशु सुरक्षा योजना संकटात?

              स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा 2 कार्यक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिलकित सिंग  यांचे मार्गदर्शनात व  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांचे नेतृत्वात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरू आहे. गावात निर्माण करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. 

    दि. ०१ मे ते दि. ३० सप्टेंबर २०२५ असे एकूण १३८ दिवस पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती व सार्वजनिकस्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे  दि. २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येईल.  दि. 29 ते 30 एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी होईल. eco friendly waste disposal methods

    महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. ०१ मे २०२५ ला “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. दि. ०१ मे ते दि. १० मे  या  कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेप मध्ये कचरा भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची  प्रक्रिया होईल. सदर अभियाना राबविणेबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना निर्देश देण्यात आले आहे.

    अभियानाची पडताळणी :

    138 दिवसाच्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील. eco friendly waste disposal methods

    प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान :

    जास्तीत जास्त गावामंध्ये ही मोहीम राबविण्यासाठी 1 मे पासून सुरू होणाऱ्या याअभियानाची प्रचार प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व  समाज माध्यमां मध्ये करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.

    अभियानाची सूचना व पुर्व तयारी :

    राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पं.स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करतील. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी साज्जा कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. २५ ते 26 एप्रिल या कालावधीत अभियानाची माहिती प्रसारित करण्यात येईल. compost pit for village

    या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर नाडेपद्वारे खत निर्मिती होईल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, ज्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येईल. ग्रामपंचायत, बचत गट आणि युवकांचा सक्रिय सह‌भाग वाढविला जाणार आहे.  त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

  • janani shishu suraksha yojana । गरोदर महिलांसाठी संकट! जननी शिशु योजना ठप्प होण्याच्या मार्गावर

    janani shishu suraksha yojana

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आक्रमक पवित्रा; केंद्र-राज्य सरकारला सवाल

    janani shishu suraksha yojana : चंद्रपूर : जिल्ह्यात जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर महिला व १ वर्षाखालील बालकांसाठी शासन दररोज मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देते. मात्र, रुग्णवाहिकेच्या देखभाल खर्चासाठी मिळणारे अनुदान अत्यंत अपुरे ठरत असून, डिझेल व देखभाल खर्च भागत नाही. परिणामी, जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, याकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. free ambulance service for pregnant women

    चंद्रपूरच्या मातीत मौल्यवान धातूंचा खजाना

          केंद्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मातांना उपचार व औषध पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. यासोबतच या योजनेतील कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. तसेच, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमही आर्थिक अडचणींमुळे अडचणीत आला आहे.

    बालकांचे हृदय वाचविण्यासाठी सरसावले आमदार जोरगेवार

    खासदार प्रतिभाताई  धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. NRHM fund issues Maharashtra

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात निधीअभावी अनेक सेवा विस्कळीत होत असून, संचालक (वित्त व लेखा), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी उपलब्ध शिल्लक निधीतून मानधन देण्याचे आदेश दिले होते. केंद्र शासनाकडून अपेक्षित असलेली पाचव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा धोक्यात सापडली आहे. संबंधित निधी तातडीने अदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

  • Sardar Patel College media students । जनसंवाद चे विद्यार्थी पोहोचले चंद्रपूर आकाशवाणीवर – अनुभवली प्रसारणाची दुनिया!

    Sardar Patel College media students

    Sardar Patel College media students : चंद्रपूर – येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थांनी नुकतीच चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज नेमके कसे चालते हे जाणून घेतले. दरम्यान यावेळी विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले. Chandrapur Akashvani visit

    चंद्रपूरच्या मातीत मौल्यवान वस्तूंचा खजिना

    ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे उद्दिष्ट असलेले आकाशवाणी…मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध झाले असले तरी आकाशवाणी मात्र श्रोत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जनसंवाद विभागाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट दिली. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख डॉ. पंकज मोहरीर, प्रा. संजय रामगिरवार, प्रा.अरविंद खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. जनसंवाद विभागाचे विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते.

    चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे अभियंता चंद्रकांत मत्ते, राजन देशभ्रतार, तंत्राद्य किशोर वसाके, विकास बावणे यांनी केंद्राचे प्रसारण कसे होते हे तंत्रज्ञान विद्यार्थांना समजून सांगितले. यावेळी सहायक संचालक (तांत्रिक) संध्या किलनाके याही उपस्थित होत्या. विद्यार्थांनी आकाशवाणी कार्यक्रमाचे लेखन, नभोवाणी चर्चा, वृतांत याविषयीचीही माहिती कार्यक्रम प्रमुख व अधिकारी नंदा गजभिये यांच्यासह प्रसारण अधिकारी उमेश दुपारे उद्घोषक मंजुषा भास्करवार, हेमा बहादे,अर्चना चौधरी यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी ‘फोन -इन’ अंतर्गत ‘हॅलो फर्माईश’ मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Akashvani Chandrapur working

    दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

    Contents