News 34 impact : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सट्टा पट्टी जुगारावर गडचांदूर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत News34 ने दोनदा सट्टापट्टी व जुगार खेळताना फोटो सहित बातमी प्रकाशित केली होती. Gadchandur satta patti gambling raid
2 मे रोजी लक्ष्मी टॉकीज परिसरात जुगार व सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळाली होती. लक्ष्मी टॉकीज जवळ काही इसम हे एकाला पैसे देत सट्टापट्टी जुगार खेळताना आढळली. पोलिसांनी सापळा रचून एकाला पकडले, पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव 35 वर्षीय सचिन रामकिशन चितकुंटलवार राहणार गडचांदूर कोरपना असे सांगितले. पोलिसांनी चितकुंटलवार ची अंगझडती घेतली असता 800 रुपये रोख व सट्टापट्टीचे आकडे लिहलेल्या चिठया आढळल्या. News34 report on Gadchandur gambling
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सूरज ढोले यांनी केली.
बातम्या प्रकाशित गडचांदूर शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी बाहेरील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतो, या मजूर वर्गाचे आर्थिक शोषण करीत बेकायदेशीर रित्या सट्टापट्टी चालविल्या जात असल्याची व त्यामागील सूत्रधार कोण अशी बातमी News34 ने प्रकाशित केली. उशिरा का होईना पण पोलिसांना अखेर जाग आली. येणाऱ्या काळात लक्ष्मी टॉकीज परिसरात किंवा इतर भागात असले धंदे सुरू झाले तर त्याबाबत सुद्धा बेधडकपणे बातमी प्रकाशित करण्यात येणार.
मोदी सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत!
BJP supports caste based census : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आता जातिनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे लोकशाही मजबूत होईल.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल।पावडे यांनी केले. Narendra Modi caste census decision 2025
चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी गांधी चौक येथे निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करतांना ते बोलत होते.
माजी पालकमंत्री व बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वा हे आयोजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.मोदी हैं तो मुमकींन हैं अशी घोषणाबाजी करण्यात आली.
कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, सुरज पेदुलवार,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे,शीला चव्हाण, नम्रता टेमसकर,पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार,शिला चव्हाण, चाद सय्यद, रवी सहारे, मनीषा महातव, शाम कनकम, सारिका संदुरकर, मधुकर राऊत, प्रवीण गुरमवार, महेश जीटे, बी बी सिंग,बाळू कोलनकर, कैलास संगेवार, मुन्ना अलटम,दीपक प्रलय सरकार, महेंद्र जुमडे, आकाश मस्के, आकाश ठोसे, कविता जाधव, राजेंद्र खांडेकर, प्रदीप किरमे, गणेश गेडाम, अनिल सुरपाम, प्रमोद शास्त्रकार, पराग मलोडे, उपस्थित होते.
पडोली आणि घुग्घूस मध्ये लाडू वाटपाने जल्लोष; मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत
Kishor Jorgewar supports caste census initiative : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा, सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा आणि सामाजिक समतोल प्रस्थापित करणारा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पडोली आणि घुग्घूस येथे लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. BJP celebrates caste census decision in Chandrapur
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथ ठाकूर, नेते नामदेव डाहुळे, प्रकाश देवतळे, संजय तिवारी, नीता चौधरी, इमरान खान, राकेश पिंपळकर, दयानंद नागरकर, आशिष मासिरकर, आशिष वाढई, सुभाष पिंपळकर, विजय आगरे, अजय कार्लेकर, रमेश बुच्चे, रमाकांत बलकी, सुरेश पिदुरकर, डॉ. दशरथ झाडे, दुर्गा बावणे, मीना मानुसमारे, रजनी ढुंगणे, ममता मोरे, शितल कोटा, नकुल वासमवार, कोसारा गावचे माजी सरपंच गुड्डू सिंग, उषा आगदारी, सुचिता लुटे, अनिल बाम, श्याम आगदारी, महेश डोंगरे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, जय मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. Caste census celebration in Padoli and Ghugghus
बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जातीय जनगणनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख मिळणार असून त्यांच्या अडचणी व गरजा समजून घेऊन योजनांची आखणी करता येणार आहे. आजवर अनेक सरकारांनी जातीवर आधारित आकडेवारीची मागणी फक्त घोषणा आणि आश्वासनांपुरती मर्यादित ठेवली. मात्र केंद्रातील भाजप सरकारने प्रत्यक्षात हे पाऊल उचलून समाजातील वंचित, शोषित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची दिशा स्पष्ट केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी ‘मोदी सरकार जिंदाबाद’, ‘सामाजिक न्यायाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमात नागरिकांना लाडू वाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे अतिक्रमण प्रकरणी मुनगंटीवारांचा पुढाकार, म्हाडाची घरे लवकरच
Sudhir Mungantiwar on railway encroachment : चंद्रपूर, दि. 3: चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्म वीर मीना यांनाही पत्र पाठवून चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा उपस्थित केली होती. railway housing project in Chandrapur
चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले उचलल्या जात असून अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
नियोजन भवन येथे आढावा
नियोजन भवन सभागृह येथे रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देणे व इतर समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागिय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, रेल्वे विभागाचे सहाय्यक मंडळ अभियंता सुबोध कुमार, कार्यकारी अभियंता नवीन शर्मा, उपकार्यकारी अभियंता योगेंद्र कुमार तसेच नागरिकांची उपस्थिती होती. alternative housing for railway encroachers
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात सध्या तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पात सुमारे 640 घरे बाधित होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम जबरदस्तीने न करता नागरिकांच्या सहकार्याने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. या प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या 68 घरांचे सर्वेक्षण करून, संबंधित नागरिकांशी बैठक घ्यावी. तसेच रेल्वे विभागाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस व्यवस्था करावी. या पुनर्वसनासाठी म्हाडा येथील उपलब्ध घरांची पाहणी करण्यात येईल. MHADA homes for displaced families Chandrapur
९०० घरे उपलब्ध होणार
महानगरपालिकेने रेल्वे लाईनमधून जाणाऱ्या नाल्यांची योग्यरीत्या स्वच्छता करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिक्रमित घरांची सविस्तर यादी तयार करावी. रेल्वे लाईनसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सीएसआर (CSR) अंतर्गत स्थानिक विकासासाठी निधी खर्च करावा. दरम्यान, रेल्वे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत अतिक्रमित 68 घरे हटविण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना म्हाडामार्फत 100 घरे तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्याने एकूण 900 घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.
या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झूमद्वारे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सर्व नागरिकांना कठीण व मानसिक तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढल्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Chandrapur tiger attack update : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, या संघर्षाने काल गुरुवारी (1 मे) पुन्हा एक जीव घेतला. शौचासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय युवकावर वाघाने अचानक हल्ला करून त्याचा जागीच बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव दिवाकर बाबुराव जुमनाके असून तो चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी होता. man killed by tiger in forest
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर जुमनाके हे रात्री सुमारे 10 वाजता चक पिंपळखुट गावालगतच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर वनविभागाच्या कक्ष क्रमांक 1005 मध्ये शौचासाठी गेले होते. अंधार व वनक्षेत्राच्या सीमेवर वावरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यात दिवाकर यांचा जागीच मृत्यू झाला. tiger kills man near forest
🛑 प्रशासनाची कारवाई:
या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील कारवाईसाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
🧓 कुटुंबावर दुःखाचा डोंगर:
या अनपेक्षित घटनेने दिवाकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वनविभागाच्या वतीने तत्काळ मदतीच्या स्वरूपात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनि वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
🐅 वाघाच्या हल्ल्याचा १३ वा बळी:
ही घटना चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यातील १३ वा बळी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाघांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मागील काही महिन्यांपासून वाघांचे मानववस्तीत व मानवांचे जंगलात घुसण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे वनविभागावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढली आहे.
🗣️ स्थानिकांची मागणी:
चक पिंपळखुट व परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेनंतर वनविभागाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या असून, या भागात वाघाचा वावर रोखण्यासाठी तत्काळ पिंजरा लावणे, नाईट पेट्रोलिंग वाढवणे आणि लोकजागृती करणे यासारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
unseasonal rain Nagbhid paddy loss : चंद्रपूर – १ मे गुरूवारी रात्री आठ वाजताचे सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने नागभिड तालुक्यातील चिंधीचक, चिंधीमाल, तळोधी (बा), उश्राळमेंढा परिसरात उन्हाळी धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातात येणारे पिकच अस्मानी संकटाने जमिनदोस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाचे तात्काळ उन्हाळी धानपिकांच्या नुकसानी पंचनामे करून भरपाई देण्याची अशी मागणी उन्हाळी धान शेतकऱ्यांनी केली आहे. compensation for paddy damage in Nagbhid farmers
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात धानपिकांची लावगड केली जाते. यावेळी खरीप हंगामात प्रचंड तुट आल्यानंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकांकडे लक्ष केंद्री केले होते. नागभिड, सिंदेवाही, तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बारीक व ठोकळ धानपिकांची लागवड केली होती. रब्बी हंगामात म्हणजे उन्हाळी धानपिकाची नागभिड तालुक्यात यावेळी जानेवारी फरवरी महिण्यात लागवड करण्यात आली. hail damage to summer paddy in Nagbhid
चार महिण्याचा कालावधी होत असताना उन्हाळी धानपिक हातात येण्याची आशा होती, परंतु अस्मानिक संकटाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. ऐन तोंडचा घासच गुरूवारी रात्री आठ साडेआठच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने हिरावला आहे. चिंधीचक व तळोधी बाळापूर परिसरातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला शेतशिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. सोबतच गारपिटही मोठ्या प्रमाणात झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धान काढणीला आला असताना बोराच्या आकाराच्या पडलेल्या गारपिटीने धानाचे कबंरडले मोडले आहे. धान मोठ्या प्रमाणात खाली झडले आहे. farmer distress due to crop damage Maharashtra
पिक खाली लोळले आहे. तब्बल अर्धा ते पाऊन तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सोबत गारपिठही झाल्याने शेतकरी भयभित झाला आहे. मागील खरीप हंगामात किडींमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. पिकांत प्रंचड घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खचून न जाता उन्हाळी धानपिकाची लागवड करण्याची तयारी सुरू केली. जानेवारी ते फरवरी महिण्यात नागभिड तालुक्यात सिंचन व्यवस्था असलेल्या शेकऱ्यांनी बारीक ठोकळ हलक्या जातीच्या उन्हाळी धानपिकाची लागवड केली.
लागवडीला साडेतिन महिण्याचा कालावधीत होत असताना शेतकऱ्यांनी पिकाची निगा राखली. पंधरवाड्यात हातात पिक येण्याची शक्यता असतानाच काल गुरूवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 70 ते 80 टक्के उन्हाळी धानपिकांचे गारपिटीने जमिनदोस्त झाले आहे. तसेच काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. या परिसरात अवकाळी पाऊस येत असल्याने उरले सुरले पिकही हातातून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तविलीआहे. compensation for paddy damage in Nagbhid farmers
उन्हाळी धानपिकाच्या लागवडीला होतो दुप्पटीने खर्च
खरीप हंगामात दरवर्षीच शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडत आहे. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाने शेतकरी पुरता कमकुवत होत आहे. अंगावर कर्जाचे ओझे चढत आहे. कर्ज फेडणे शेतकऱ्यांना डोईजड जात आहे. अशाही परिस्थीतमध्ये सिंचन सुविधा असलेले शेतकरी उन्हाळी धानिकाची लागवड करीत आहेत. खरीपापेक्षा उन्हाळी धानपिकांमध्ये जास्त उत्पादनाची आशा असते. परंतु पिकाच्या लागवडीकरीता दुप्पटीने खर्च होतो. नागंरटी, चिखलटी, रोवणी, पऱ्हे हंगाम, खत, निंदा, धानपिक कापणी, मळणी तसेच किटकनाशके आदींवर होणारा खर्च एकत्र केला तर दुप्पटीने उन्हाळी धानपिकावर खर्च झालेला आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकाची लागवड करण्यास कर्जाची सुविधा नाही. त्यामुळे कर्ज किंवा उसणवारे घेऊन पैशाची जमवाजमव करून खर्च करावा लागतो आहे. काही शेतकरी त्यांच्याकडे असलेले दागिने गहाण ठेवणू उन्हाळी पिकांची लागवड करतात. agricultural news Nagbhid Maharashtra
उन्हाळी धान उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :
चिंधीचक व चिंधीमाल शेतशिवारात झालेलया वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हातात येणारा शेतकऱ्याच्या तोंडातील घासच अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे झालेले नुकसान कधीही भरून निघणारी नाही. गारपिटीमुळे सुमारे 70 ते 80 टक्के धान जमिनी वरती झडलेले आहेत. उन्हाळी धानपिक लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिंधीचक ग्राम पंचायतीचे उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी केली आहे.
Pratibha Dhanorkar on Irai River desilting : चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनदायिनी आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही नदी सद्यस्थितीत मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नदीच्या खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र, आजपर्यंत पार पडलेले चार अभियान अपयशी ठरले आहेत. त्याप्रमाणे हे अभियानसुद्धा केवळ फार्स ठरू नये, अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. Irai River Chandrapur desilting project
इरई नदी ही चंद्रपूर शहराला ९ किलोमीटर समांतर वाहते. त्यानंतर पुढे ही नदी १७ किलोमीटर अंतरावर वर्धा नदीला जाऊन मिळते. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणीतील ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. नदी पात्रात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या नदीच्या खोलीकरणाचे अभियान २०१५ मध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने पहिल्यांदा राबविण्यात आले. त्यानंतर तीनवेळा हे अभियान राबविण्यात आले. कोट्यवधींचा निधी खर्च झाला. परंतु, नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण झाले नाही.
आता पुन्हा प्रशासनाने खोलीकरण अभियान सुरू केले आहे. लोकसहभागातून हे अभियान ४५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जाहीर केले आहे. त्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या कामासाठी यंत्रसामग्री साठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे हे अभियान लोकसहभागातून आहे की जिल्हा प्रशासनाकडून हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने हे अभियान केवळ प्रसिद्धीसाठी इव्हेंट करू नये. प्रत्यक्षात नदीचे खोलीकरण होऊन नदीचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी प्रत्येक चंद्रपूरकरांची अपेक्षा असल्याचेही खासदार धानोरकर म्हणाल्या. — वाळू चोरट्यांचे काय…?
जिल्हा प्रशासनाने इरई नदी खोलीकरणाचे अभियान धुमधडाक्यात सुरू केले आहे. तर, दुसरीकडे वाळूतस्करांनी नदीला अक्षरशः पोखरून काढले आहे. शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीचा ओरबडले जात असताना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय वाळू चोरट्यांची हिंमत वाढली नसावी, अशीही शंका या निमित्ताने येते. त्यामुळे प्रशासनाने खोलीकरणाच्या कामासोबत नदीला ओरबडणाऱ्या वाळूतस्करांवर कारवाई करावी, अशीही मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. sand mining Irai River Chandrapur illegal
Pombhurna agriculture office inauguration : चंद्रपूर – पोंभुर्णा येथील नवीन कृषी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम सेवा मिळतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा जयजयकार करण्यासाठी कृषी क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, असे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथील कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. Sudhir Mungantiwar Pombhurna agriculture office
पोंभुर्णा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आधुनिक आणि देखणी व्हावी यासाठी स्थानिक शेतकरी आणि या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपले म्हणणे मांडले होते. तालुका ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची नवी इमारत व्हावी यासाठी निवेदन दिले. जनसमस्यांना तातडीने सोडवण्यासाठी तत्पर असलेले आ. सुधीर मुनगंटीवारांनी त्याच कार्यक्रमात सुंदर व सुसज्ज इमारत बांधण्याची घोषणा केली होती. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत, तर या तालुका कृषी अधिकारी कार्यालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यात देत त्यासाठी 249.95 लक्ष रूपयांचा निधीही मंजुर केला. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते याच सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. त्यामुळे ‘दिला शब्द केला पूर्ण’ याची आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. new agriculture office in Pombhurna benefits
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,अधीक्षक अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार रेखा वाणी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, गटविकास अधिकारी विवेक बेलालवार, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, राहुल संतोषवार, बंडू गोरकार, रवींद्र मरपल्लिवार आदींची उपस्थिती होती. Sudhir Mungantiwar Pombhurna agriculture office
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. यासाठी सर्वप्रथम चंद्रपूरचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या प्रगती व उत्पन्न वाढीसाठी कृषी अधिकारी योग्य ते मार्गदर्शन करेल आणि या कार्यालयाच्या माध्यमातून कृषी अधिकारी शेतकरी बांधवांचे मनापासून सेवा करेल.’ agriculture department Pombhurna services
बाजार समिती महाराष्ट्रात सर्वोत्तम करण्याचा मानस शेतकऱ्यांच्या प्रगीतीसाठी मी सदैव पुढाकार घेतला आहे. बल्लारपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीसाठी मान्यता घेतली असून बल्लारपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात सर्वात उत्तम करण्याचा मानस आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सदैव पाठीशी पोंभुर्णा तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर, मागेल त्याला विहिरी दिल्या. कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे यासाठी मुलमध्ये नवे कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून कृषी क्षेत्राशी संबंधित कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र चंद्रपुरात होत आहे. कृषी क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. बंधारे, माजी मालगुजारी तलाव, धडक सिंचन विहिरी, मागील त्याला सिचंन विहीर दिल्या, याचा उल्लेख करून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. benefits of agriculture office for farmers
202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप मुंबईमध्ये मूल व पोंभुर्णा तालुक्यातील पिकवलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात विकला जातो. कृषी क्षेत्रामध्ये सामूहिक शेती तसेच पोखराच्या माध्यमातून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पुढील महिन्यापर्यंत धानाचा 1800 कोटी बोनस प्राप्त होणार आहे. शिवाय पोंभुर्णा तालुका येत्या पाच ते दहा वर्षात पोंभुर्णा आणि गोंडपिपरीच्या मध्ये 30 हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. आतापर्यंत 202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
NEET exam instructions for Chandrapur candidates : चंद्रपूर – रविवार, दि. 4 मे 2025 रोजी जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर NEET (UG) ची परीक्षा होणार असून जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत.
नीट (यूजी) उमेदवारांसाठी सूचना : हे करा : प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेचा योग्य पत्ता, केंद्र गाठले आहे की नाही, यांची पडताळणी करा. मुख्य गेटवर आपले ओळखपत्र आणि प्रवेश पत्र दाखवा. कृपया तपासणी साठी सुरक्षा कर्मचाऱ्याला सहकार्य करा. केंद्राबाहेर दर्शविलेल्या आसन योजनेसह आपला रोल नंबर, केंद्र क्रमांक, खोली क्रमांक तपासा. ॲडमिट कार्डची हार्ड कॉपी, पोस्टकार्ड साइज फोटो प्रिंट कॉपी सोबत ठेवा. केंद्रात पारदर्शक पाण्याच्या बाटलीला परवानगी आहे. केंद्रात प्रवेशाच्या क्रमाचे अनुसरण करा (बाण चिकटवलेले). तपासणी, नोंदणी आणि बायोमेट्रिक मधून जा आणि परीक्षा कक्षात पोहोचा. परीक्षा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश आहे. NEET 2025 Chandrapur students reporting time
हे करू नका : उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. शिवाय, उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नाही.
पाठ्यपुस्तकसामग्री मुद्रित किंवा लिखित, कागदांचे तुकडे, भूमिती/ पेन्सिल बॉक्स,प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर इत्यादि कोणतीही स्टेशनरी वस्तू, मोबाइल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थबँड इत्यादि कोणतेही कम्युनिकेशन डिव्हाइस, वॉलेट,गॉगल्स, हॅडबॅग्ज, बेल्ट कॅप इत्यादि इतर वस्तु कोणतेही घडयाळ/मनगटी घडयाळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणतीही खाण्यायोग्य वस्तू उघडलेली किंवा पॅक केलेली वगैरे. मायक्रोचिप, कॅमेरा ब्लूटूथ डिव्हाइस इत्यादि संप्रेषण साधने लपवून अनुचित सांधनासाठी वापरली जाणारी इतर कोणतीही वस्तू. list of prohibited items NEET exam Chandrapur
केंद्रात कोणत्याही उमेदवाराकडे प्रतिबंधित वस्तूपैकी कोणतीही वस्तू आढळल्यास ती अनुचित मार्गाचा वापर मानली जाईल आणि संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल. NEET exam day guidelines Chandrapur Maharashtra
परीक्षा केंद्र व पार्किंग व्यवस्था : 1) केंद्रीय विद्यालय डब्ल्यूसीएल दुर्गापूर, चंद्रपूर (पार्किंग – शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 2) पी.एम. श्री. केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्ट्ररी चांदा, भद्रावती (समोरील मार्केट परिसर) 3) गर्व्हमेंट कॉलेज आॉफ इंजिनियरींग, चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)
4) डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स, चंद्रपूर (चांदा क्लब ग्राऊंड) 5) नारायणा विद्यालय, पडोली चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) 6) इंदिरा गांधी गार्डन स्कूल, रामनगर चंद्रपूर (संत्रा मार्केट) 7) श्री. महर्षी विद्या मंदीर, चंद्रपूर (शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 8) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) आणि 9) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग रिसर्च ॲन्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर. (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) NEET exam day guidelines Chandrapur Maharashtra
Best district collector in Maharashtra 2025 : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक जिल्हधिकारी कार्यालय, कोल्हापूर (गुण 81.14), तृतीय जिल्हाधिकारी जळगाव (80.86), चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला (78.86) आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड (66.86 गुण) यांनी पटकाविला. Vinay Gowda Chandrapur district achievements
याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांचे यात मोठे योगदान आहे. लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा कशा देता येईल, शासन त्यांच्यापर्यंत कसे पोहचले, याबाबत योग्य नियोजन करण्यात आले. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, अभ्यागतांसाठी सोयीसुविधा, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अधिकार व कर्मचा-यांना प्रशिक्षण, गुंतवणूकीस प्रोत्साह आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा यात समावेश होता, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. Top performing districts in Maharashtra 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, गुणवत्ता मोहिम एक सुरवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुल्यांकन पध्दत : भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत संकेतस्थळ अद्यावतीकरण व कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.