Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Mp pratibha dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

    Mp pratibha dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

    Mp pratibha dhanorkar महाराष्ट्र सरकार ने पावसाळी अधिवेशनात मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. परंतु सदर योजनेचा कालावधी 1 जुलै ते 15 जुलै असल्याने त्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शक्य नसल्याने सदर योजने करीता अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यंमत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे केली होती. त्यांच्या मागणी ला यश आले असून अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करुन सदर कालावधी 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी नव्या कायद्याबाबत जनजागृती सुरू केली आहे, याबाबत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे, कायद्यात नेमके बदल काय झाले? सविस्तर वाचा

    Mp pratibha dhanorkar महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ची घोषणा केल्या नंतर सदर योजनेचा कालावधी कमी असल्याने व आवश्यक कागदपत्रांसाठी वेळ पुरेसा नसल्याने सदर योजनेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीला यश प्राप्त झाले असून सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, आता सोप्या पद्धतीने करा अर्ज, वाचा सविस्तर

    Mp pratibha dhanorkar अर्ज भरण्याची कालमर्यादा 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. त्या सोबतच रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या अटी मध्ये देखील बदल करुन पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागु राहणार नाही. त्यासोबतच पाच एकर शेती अट देखील वगळण्यात आली आहे. योजनेच्या पात्रता वयोमर्यादेच्या निकषात 60 एवजी 65 वर्ष असा बदल करण्यात आला आहे. तसेच रहिवाशी दाखल्या एवजी 15 वर्ष जुने रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळख पत्र असा बदल करण्यात आला आहे.

     

    सदर मागणी मान्य झाल्याने खासदार धानोरकर यांनी शासनाचे आभार मानले आहे व या योजनेकरीता महीलांसाठी लवकरच तालुका स्तरावर सेवा कंेद्र सुरु करण्याची खासदार धानोरकर यांनी आश्वासीत केली आहे.

  • 200 unit chandrapur : विधानसभेत 200 युनिटबाबत काय म्हणाले आमदार जोरगेवार

    200 unit chandrapur : विधानसभेत 200 युनिटबाबत काय म्हणाले आमदार जोरगेवार

    200 unit chandrapur राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. यामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. मात्र, या योजनेतील काही अटी रद्द करण्यात याव्यात तसेच महिलांना कागदपत्र तयार करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/agricultural-pump-connection-guardian-minister-mungantiwars-letter-to-superintendent-of-police/

        मुंबई येथील अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, नद्यांना पूर आल्याने होणाऱ्या नुकसानीसाठी सरकारने केलेल्या योजनांचे आहे. सोबतच चंद्रपूरात इरई नदीला दरवर्षी पूर येतो, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता इरई नदीवर संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलताना आ. जोरगेवार यांनी केली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात शिक्षणाच्या बाजारीकरणाला राष्ट्रवादी कांग्रेसचा विरोध

    200 unit chandrapur पर्यटनामुळे सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत असतो. चंद्रपूरातही पर्यटनदृष्ट्या विकास केला गेला पाहिजे. चंद्रपूरात जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आहे. प्राचीन महाकाली मंदिर चंद्रपूरात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पवित्र झालेली दिक्षाभूमी येथे आहे. येथे औद्योगिक आणि मायनिंग पर्यटन होऊ शकते, त्यामुळे येथे टुरिझम सर्किट तयार करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

     

    चंद्रपूरात इरई नदी हे एकमात्र पाण्याचे स्रोत आहे. येथील पाणी उद्योगासाठी, पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे दुसरा पाण्याचा स्रोत तयार करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धनोरा बॅरेज सरकारने तयार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. शासकीय महाविद्यालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, ते लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही  त्यांनी केली आहे.

     

    विज उत्पादक जिल्हांना 200 युनिट विज मोफत द्या

    मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

     

    200 unit chandrapur यावर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरात 5 हजार मेगावॅट पेक्षा अधिक विज आम्ही तयार करतो. असे असतानाही मुंबई आणि चंद्रपूर येथील नागरिकांना विज दर सारखेच आहेत. मुंबईच्या नागरिकांचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. चंद्रपूरहून येथे विज पाठवित असताना लाईन लॉस होतो. असे असतानाही मुंबई आणि चंद्रपूरच्या नागरिकांना विज दर समान कसे, असा प्रश्न यावेळी त्यांनी सभागृहात बोलताना उपस्थित केला. दोन ते अडीच रुपयांत तयार होत असलेली विज आम्हाला 9 ते 20 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकली जाते. त्यामुळे विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.

  • Majhi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी – खासदार प्रतिभा धानोरकर

    Majhi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी – खासदार प्रतिभा धानोरकर

    Majhi ladki bahin yojana महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेची नुकतीच पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. सदर योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी फक्त 15 दिवस असल्याने व त्या कालावधी आवश्यक कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

    अवश्य वाचा : मुलाच्या खिशातून लायटर पडला, आणि पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला

    महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा निवडणूका डोळîासमोर ठेवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सदर योजनेचा अर्ज भरण्याची दि. 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यत असून या करीता अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्या  मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र व रहीवासी दाखल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

    माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे व कसा कराल? जाणून घ्या

    Majhi ladki bahin yojana या दोन शासकीय कागदपत्रांसाठी शासनाकडे किमान पंधरा दिवस लागतात. अशा वेळेस या योजनेचा लाभ कमीत कमी महीलांना मिळावा हा तर शासनाचा हेतू नाही ना? अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केली. त्यामुळे सदर योजना खरचं तळागळातील महिलांपर्यंत पोहचवायची असल्यास या योजनेच्या अर्ज भरण्याचा कालावधी किमान 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Chandrapur Police News : हत्येच्या आरोपीमुळे वरोरा पोलीस आली गोत्यात

    Chandrapur Police News : हत्येच्या आरोपीमुळे वरोरा पोलीस आली गोत्यात

    Chandrapur police news चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल 25 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 30 जून ला सकाळी 8.30 वाजता घडली.

    वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    अवश्य वाचा : आईने लहान बाळाला पाजले विष

    Chandrapur police news आरोपी समाधान माळी ला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.

    आरती चंद्रवंशी या तरुणीचा 26 जूनला बुधवारी घरात शिरून आरोपीने खून केला होता.
    प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून करण्यात आला होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान ला 27 जून ला अटक केली होती.
    आरोपीने लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याने चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे मात्र आता पोलीस कोठडीत सुद्धा अश्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

     

    Chandrapur police news 29 जून ला आरोपी समाधान माळी वर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता, आरती ची हत्या केल्यावर समाधान कुठेही पळून गेला नव्हता, पोलिसांनी समाधान ला आनंदवन मधून अटक केली, मात्र गुन्हा केल्यावर तो नैराश्यात गेला होता. त्या नैराश्यातून आज सकाळी त्याने स्वतःच्या जोड्याच्या लेस ने गळफास घेतला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/maharashtra-prevention-of-defacement-of-property-act-chandrapur-mahanagar-palika/

    विशेष म्हणजे आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली म्हणून पोलीस स्वतःची पाठ थोपटवीत होते मात्र आरोपीने आत्महत्या केल्यावर पोलिसांचे बोट एकमेकांवर उठत आहे. याप्रकरणात सुद्धा काही लहान पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे आरोपीचा मृत्यू झाला असा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार हे नक्की, मोठे अधिकारी मात्र यातून बचावाचा मार्ग काढणार. पोलिसांच्या चुकीमुळे सदर प्रकार घडला असून आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला आहे.

  • Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar
    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली.

    Chandrapur Mp Pratibha dhanorkar तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी-पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता 70 कोटी रुपये त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील माजरी-पळसगांव-नंदोरी-भटाळी-चोरा-चंदनखेडा या रस्त्याकरीता 40 कोटी रुपये, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 371 ते पिंपळगांव(सिंगरु) ते तुमगांव वाही या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाकरीता 50 कोटी रुपये, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता 75 कोटी रुपये तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता 46 कोटी रुपये तसेच सास्ती-कोलगांव-कढोली-चढी-निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता 13 कोटी रुपयांची मागणी करुन निधी उपलब्ध करुण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात आली.
    यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.
  • Press Conference : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – प्रकाश पाटील मारकवार

    Press Conference : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – प्रकाश पाटील मारकवार

    Press conference सत्ताधारी शासनाला प्रश्न विचारत सामान्यांना न्याय देण्याचं काम हे पत्रकार बांधवांचे असते, मात्र आज पत्रकार राजकीय नेत्यांच्या पायाशी लोटांगण घालताना दिसत आहे, आमदार, खासदार, मंत्री व राजकीय नेते यांच्या पायथ्याशी आज अनेक पत्रकार आश्रय घेताना दिसून येतात.

    महत्त्वाचे : राज्यातील महिलांना मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये 

    असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात घडला आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने वृत्तपत्रात इच्छुक उमेदवार बाबत वृत्त प्रकाशीत होत आहे.

    मात्र हे करताना एकाची बाजू कमजोर तर जवळच्या नेत्याला ताकदवर व प्रशंसा करीत त्यालाच तिकीट मिळायला हवं असे वृत्त प्रकाशित करण्यात आले, मात्र सदर वृत्त हे चुकीचे आहे याकरिता त्या पत्रकाराला मी सांगितले मात्र दोन दिवसांनी माझ्या विरोधात अनेक निवेदने देण्यात आली हा प्रकार म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा होता असा आरोप कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी 26 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

    हे ही वाचा : पत्रकार संजय पडोळे यांना धमकी

    Press conference ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथून मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहो, यासाठी मी तयारी सुद्धा केली आहे, पण माझ्या व्यतिरिक्त इतरांनी सुद्धा कांग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली आहे.

    अश्यात मूल चे पत्रकार संजय पडोळे यांनी माझ्या विरोधात चुकीचे वृत्त प्रकाशीत केले व सदर प्रकार हा 2 ते 3 वेळा करण्यात आला.

    नुकतेच त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून हवसे नवसे उमेदवार बाबत वृत्त प्रकाशित केले मात्र त्या वृत्तात एका कंत्राटदार असलेल्या इच्छुक उमेदवार बाबत त्याची प्रशंसा केली तर दुसऱ्या बाजूने इतर उमेदवार किती कच्चे आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते.
    याबाबत प्रकाश पाटील यांनी पत्रकार संजय पडोळे यांना विचारणा केली, मी त्यांना कसलीही धमकी दिली नाही मात्र 2 दिवसांनी माझ्याविरोधात चुकीचे निवेदने देत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार या लोकांनी सुरू केला.

     

    Press conference पत्रकार संजय पडोळे यांनी चांगलं काम करावं त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहणार मात्र काही कारण नसताना माझ्याविषयी असे चुकीचे काही लिहू नये, यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहो अशी प्रतिक्रिया कांग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar मोदीजी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्लीम, आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या.

     

    पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Sudhir mungantiwar bjp
    बल्लारपूर विजयी शंखनाद सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : कर्नाटक एमटा प्रशासन अखेर नरमले, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटणार

    ‘देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    Minister sudhir mungantiwar ते पुढे म्हणाले, ‘सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले.

     

    आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म ( गॅरंटी गार्ड )घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला’.भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    ‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार
    ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    ‘टायगर अभी जिंदा है’

    Minister sudhir mungantiwar निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले.

    ‘मी थकणारा आणि थांबणारा नाही’
    लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन
    विजयी उत्सव सभेपूर्वी बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे काम जिल्हा स्तरावरील नगरोत्थान योजनेतून २२ लक्ष रुपये खर्चातून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर नगरपरिषद अग्निशमन विभागाला जिल्हा अग्निशमन योजनेतून मिळालेल्या अग्निशमन वाहनाचेही यावेळी लोकार्पण झाले. हे वाहन अरुंद गल्लीबोळातून जाण्यास सक्षम असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणार आहे.

  • Balbharati marathi books : चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 963 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

    Balbharati marathi books : चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 963 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

    Balbharati marathi books इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, तसेच शाळेत सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशत: अनुदानित शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2024-25 करीता मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : भावी पोलिसांसाठी पोलिसांनी केली राहण्याची व्यवस्था

    Balbharati marathi books चंद्रपूर जिल्ह्यात 1 लक्ष 60 हजार 963 विद्यार्थ्यांकरीता 6 लक्ष 30 हजार 849 पाठ्यपुस्तकाची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुका स्तरावरून शाळेपर्यंत पोहचती करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : 32 लाखांची टाटा कंपनीची गाडी, आणि फसवणूक

    सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य / गावातील पदाधिकारी / अधिकारी / पालक / प्रतिष्ठित नागरीक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना वितरीत करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. यांनी कळविले आहे.

  • Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today acb trap news चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जूनला कारवाईचा चौकार मारीत, दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 जणांना अटक केली.

    पहिली कारवाई 
    वैद्यकीय अहवाल पाहिजे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे 58 वर्षीय वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर व वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय दीपक केशव सज्जनवार यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाची दादागिरी

    Today acb trap news तक्रारदार हे वणी तालुक्यातील वेडाबाई जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून ते एसटी महामंडळ चंद्रपूर येथे वाहक या पदावर कार्यरत आहे.
    वर्ष 2022 मध्ये बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे तक्रारदार यांचा अपघात झाल्याने त्यांच्या पायात रॉड टाकण्यात आला, काही दिवसानंतर पायातील रॉड चे स्क्रू निघाल्याने त्यांच्या पायात पायजन झाले, त्यावेळी नागपूर येथील एम्स मध्ये त्यांचा उपचार करण्यात आला, या कालावधीत ते रजेवर होते.

    महत्त्वाचे : शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    Today acb trap news उपचार झाल्यावर त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र हवे होते, प्रमाणपत्रासाठी ते जून महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले, तपासणी झाल्यावर त्यांना फिट फॉर लाईट ड्युटी एकस्पेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करीत वैद्यकीय अहवाल कार्यालयात सादर केला, परंतु वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील वरिष्ठ सहायक अशोक बाबूरावजी बगुलकर यांना वारंवार भेटून वैद्यकीय अहवाल देण्याबाबत विनंती केली.परंतु बगुलकर यांनी वैद्यकीय अहवाल देण्यात टाळाटाळ केली, 18 जून रोजी तक्रारदार यांना तुला लगेच वैद्यकीय अहवाल हवा असेल तर 10 हजार रुपये लागतील नाहीतर तुझे काम होणार नाही असे म्हणत बगुलकर यांनी लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

    तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी आधी तक्रारीची पडताळणी केली. बगुलकर यांनी सदर लाच रक्कम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

     

    Today acb trap news 19 जून रोजी हॉटेल सेलिब्रेशन, दाताला रोड च्या बाजूला असलेल्या रोमा इलेक्टरीक दुकानासमोर दीपक सज्जनवार याला 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली, त्यावेळी सज्जनवार यांनी बगुलकर यांना पैसे मिळाले असल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले व चमू ने अशोक बगुलकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    सदरकची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, मेघा मोहूर्ले व रवी तायडे यांनी केली.

    कारवाई दुसरी 

    घरकुल चे उर्वरित पैसे खात्यात जमा करण्याकरिता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) याने 20 हजार रुपयांची लाच मागितली, या प्रकरणी तडजोडीअंती 10 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.
    27 वर्षीय मिलिंद मधुकर वाढई, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय,चिमूर व 28 वर्षीय आशिष कुशाब पेंदाम, मिस्त्रिकाम यांना अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    Today acb trap news तक्रारदार हे मौजा कळमगाव पोस्ट जामगाव, तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते रोज मजुरीचे काम करतात, तक्रारदार यांच्या नावाने शबरी आवास योजनेच्या वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते.

    घरकुल बांधकामकरिता चार टप्प्यात बांधकामासाठी रक्कम जमा होणार होती, त्यांना 2 किस्त 65 हजार रुपये जमा झाले होते, तर तिसरा व चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे रक्कम 45 व 20 हजार असे जमा करून देण्याकरिता अभियंता मिलिंद वाढई तक्रारदाराला 20 हजार रुपयांची लाच मागितली.

     

    Today acb trap news अभियंता वाढई यांचे मित्र आशिष पेंदाम यांनी तक्रारदाराला पैसे देण्यास प्रोत्साहित केले, तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले.
    तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधत त्यांना याबाबत तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी केल्यावर 19 जून ला सापळा कारवाई दरम्यान पंचायत समिती कार्यालयात 10 हजार स्वीकारताना अभियंता वाढई यांना रंगेहात अटक करण्यात आली, सोबतच आशिष पेंदाम यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व सतीश सिडाम यांनी केली.

  • Flood of unemployment : आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    Flood of unemployment : आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    Flood of unemployment आपलं गाव आणि घर सोडून, मैलोनमैल प्रवास करत, मोठ्या शहरात तरुण डोळ्यांत खाकी वर्दीचे स्वप्न आहे.

    या तरुणांच्या स्वप्नांची वाट यंदा खडतर बनून गेली आहे. कारण पोलीस भरतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या.. पोलीस खात्यातील एका जागेसाठी 101 अर्ज आले आहेत.   

    अवश्य वाचा : neet परिक्षेविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    Flood of unemployment राज्यभरात आजपासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत.

     

    Flood of unemployment पोलीस खात्यात शिपाई पदासाठी बारावी तर चालक आणि बॅण्ड पथकात भरतीसाठी  शिक्षणाची अट इयत्ता दहावी उत्तीर्ण इतकी आहे. तरी अत्यंत उच्चशिक्षित तरुणांनीही या पदांसाठी अर्ज केले आहेत. डॉक्टर, इंजिनीअर अगदी एमबीए केलेल्या तरुणांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत.विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. 

    महत्त्वाचे : पोलीस भरती मध्ये आलेल्या उमेदवारांना आमिष दिल्यास कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    कोणत्या जागेसाठी किती अर्ज?

    पोलीस शिपाई  – 9 हजार 595 पद असून 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत.

    चालक पदासाठी – 1 हजार 686 पदांसाठी, 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेत.

    बँड्समन – 41 पद असून 32 हजार 26 अर्ज आलेले आहेत.

    एसआरपीएफ – 4 हजार 349 जागा असून 3 लाख 50 हजार 592 अर्ज आलेले आहेत.

    तुरुंग शिपाई – 1 हजार 800 पदांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत.

     

    Flood of unemployment बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज आले आहेत.या पदाच्या एका जागेमागे 781 उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे.

     

    भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी

    एका पदासाठी एकशे एक अर्ज… अशी सगळी परिस्थिती असताना, अनेक भागांत पाऊस पडत असल्याने भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. तर, भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आल्यास भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल. तसेच अनेक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन्ही ठिकाणी एकच  तारीख मिळाली असल्यास ती तारीख बदलून दिली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिलीय.

     

    प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या बेरोजगारीमुळे यंदाची पोलीस भरती म्हणजे एक फुल, लाखो माली… अशी गत होऊन बसलीय.