Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • School student : शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ. गावतुरे

    School student : शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ. गावतुरे

    School student एकीकडे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च होत आहे पण शालेय विद्यार्थ्यांना मात्र बस सुविधे अभावी शाळेपासून वंचित रहावे लागणे ही गंभीर समस्या सध्या उभी राहत आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

    शाळा व महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या भरपूर असल्याने काही विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे, तर उर्वरित विद्यार्थ्यांना बस मध्ये घेतल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून मुकावे लागत आहे.

     

    School student तसेच ज्या बसेस सुरू आहेत त्यांच्या वेळा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा तास व वर्ग सोडून बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.  त्यामुळे वायगाव,निंबाळा व मामला परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

    या परिसरात बसेसच्या वेळा वाढवीत त्यांची वेळ शालेय विद्यार्थ्यांना सोयीची होईल या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यासह डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम 2 महिन्यात पूर्ण करा – आमदार किशोर जोरगेवार 

    बस एकच आणि विद्यार्थी आणि प्रवासी जास्ती त्यामुळे एका बसमध्ये सारे प्रवासी बसू शकत नाही, कित्येक जणांना बसमध्ये घेतल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते बसेसच्या वेळा व शाळा सुटण्याच्या वेळेत फरक असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना पहिल्या किंवा शेवटच्या तासाला मुकावे लागते आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होत आहे, करोडो रुपये खर्च करून बस स्टेशन व इतर सुशोभीकरणाच्या,देखाव्याच्या वस्तू, बांधणारे सरकार व पालकमंत्री यांना विद्यार्थ्यांचे हे दुःख समजत नाही काय? असा प्रश्न यावेळी डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी उपस्थित केला.

    ही मागणी येत्या दोन दिवसात मंजूर न झाल्यास विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला.
    याप्रसंगी समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या समस्याचा पाढा वाचून आपला रोष व्यक्त केला.

  • Chandrapur Police : चंद्रपुरात पुन्हा आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मृतकाच्या हातावर आहे हे नाव

    Chandrapur Police : चंद्रपुरात पुन्हा आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मृतकाच्या हातावर आहे हे नाव

    Chandrapur Police चंद्रपुरात अनोळखी इसमाचे मृतदेह मिळण्याचे प्रमाण वाढले आहे, मृतदेह मिळाल्यावर त्याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र कर्तव्याची जाणं असलेले पोलीस सदर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली नक्की करतात.

    अवश्य वाचा : अशी आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना

    9 जुलै ला शहरातील महाकाली मंदिर परिसरातील मैदानात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, मृतक हा वय 55 ते 60 वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे.

     

    मृतदेहाचे वर्णन

    अंदाजे 55 ते 60 वर्ष, वयाचा, काळा सावळा रंगाचा, उंची 5 फूट 6 इंच, डोक्यावर केस कापलेले टक्कल, दाढी मिशी पांढरी कापलेली, अंगात हिरव्या रंगाचा काळया रेघाटीचा चौकड्याचा फुल शर्ट घातलेला ,तसेच गुलाबी रंगाची गोल रंगाची गळ्याची टी-शर्ट ,व काळया रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला, बांधा सडपातळ तसेच त्याचे उजवे हातावर मंसाराम नेताम केडरी असे नाव गोंदलेले आहे.

    अवश्य वाचा : त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे कडे

    Chandrapur Police सदर अनोळखी इसम पुरूष याचे बाबत माहिती घेतली असता तो अंदाजे चार ते पाच दिवसापासून महाकाली मंदिर परिसरात फिरत असून आजारी होता व त्यास बरोबर बोलता चालता येत नव्हते, तरी सदर अनोळखी इसम याचे बाबत माहिती व ओळखत असल्यास PSI विजय मुके मो.न. 9923401065 पो. स्टे .चंद्रपूर शहर यांना कळवावे ही विनंती व आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.

  • Shiv Sena District Chief Girhe : शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची माणुसकी, 2 चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

    Shiv Sena District Chief Girhe : शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची माणुसकी, 2 चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

    Shiv Sena District Chief Girhe मूल :- मुल तालुक्यातील हळदी येथे दि.६ जुलै शनिवार ला घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने राजेश बोधलकर यांची हत्या करण्यात आली.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.या घटनेची माहिती मिळताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची सांत्वना करीत मृतकाच्या दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत यापुढे मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही संदिप गिऱ्हे यांनी यावेळी दिली.

    अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    Shiv Sena District Chief Girhe मुल तालुक्यातील हळदी येथे दोन दिवसा अगोदर ह्रदयद्रावक घटना घडली.घराशेजारी झाडाच्या फ़ांद्यावरून झालेल्या शुल्लक वादात कुऱ्हाडीने पस्तीस वर्षीय राजेश बोधलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली.राजेश बोधलकर हा गावात अत्यंत शांत,संयमी व गावकऱ्यांशी मनमिळाऊपणे राहत होता.कुटुंबातील कर्ता व्यक्तीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले होते.याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना मिळाली.गिऱ्हे यांनी मृतकाच्या कुटुंबीयाची भेट घेत सांत्वना केले.

    शिक्षणाची जबाबदारी

    सामाजिक जबाबदारी म्हणून मृतकाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.व यापुढेही मी आपल्या कुटुंबा सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार शहर प्रमुख आकाश राम,विनोद चलाख,ऋतिक मेश्राम,क्षितिज शेडमाके,लोमेश गावतुरे,वामन चलाख व आदी गावकरी उपस्थित होते.

    महत्त्वाचे : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

    दुःख बघून गिर्हे गहिवरले

    संदिप गिऱ्हे यांच्या सांत्वना भेटीत मृतकाच्या कुटुंबीयाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.कर्ता पुरुष गेल्याच्या दुःखाने पत्नी व मुलांनी एकच हंबरडा फोडला.यावेळी गिऱ्हे यांचेही डोळे पाणावले.यावेळी संदिप गिऱ्हे यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबीयांच्या पाठीशी मी सदैव तत्पर राहिन अशी ग्वाही दिली.

  • Bamani Proteins Company : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार

    Bamani Proteins Company : बामणी प्रोटिन्स कंपनी पुन्हा सुरू होणार

    Bamani Proteins Company महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी सुरु होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या संचालकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरु करण्याच्या सूचना आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज कंपनी संचालकांना दिल्यात; लवकरच सदर कंपनीला अपेक्षित लेखी पत्र देवून बैठक घेऊन ही कार्यवाही पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने तसेच सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

    अवश्य वाचा : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणी पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार

    कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिले होते. गत मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट देऊन कामगारांची विचारपूसही केली होती.

    Bamani Proteins Company मंगळवारी विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी ऐकून घेतली; पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी विषयाचे गांभीर्य आणि पार्श्वभूमी सांगत हा एक हजार कुटुंबाचा प्रश्न असल्याचे सांगितले. केरळ सरकारकडून संचालित या कंपनीच्या “डिस्चार्ज वॉटर” चा प्रश्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भुमिका त्यांनी विषद केली. मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना यातून सकारात्मक तोडगा काढून कामगारांना न्याय मिळावा यादृष्टीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठ संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन केले.

    महत्त्वाचे : व्यापारी मंडळाने पालकमंत्री मुनगंटीवार यांना दिले निवेदन, त्या आरोपीना अटक करा

    महाराष्ट्र शासन यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल अशी आश्वासन देखील कंपनीच्या संचालकांना दिले. यावर कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या सुचनेचा सन्मान ठेवत, महाराष्ट्र शासनाकडून या संबंधी आवश्यक पत्र व्यवहार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल व नंतर कंपनी सुरु करण्याबाबत सुतोवाच केले.

    सदर बैठकीला भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर व त्यांचे प्रतिनिधी, बामणी प्रोटीन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव श्री. इकबालसिंग चहल, श्री. विकास खारागे, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश ढाकणे, कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनीता सिंघल, कामगार आयुक्त आदी उपस्थित होते.

  • Chandrapur District Crime : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार

    Chandrapur District Crime : बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, पोलीस निरीक्षकाला निलंबित करा – विजय वडेट्टीवार

    Chandrapur District Crime चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलेली आहे, मोठ्या शहराप्रमाणे आता लहान शहरात गंभीर प्रकारच्या घटना घडत असतील तर यामागे पोलिसांचा सहभाग आहे आता गृह विभागाने अश्या गुन्हेगारी वृत्तीला ठेचून काढले पाहिजे असा मुद्दा 9 जुलै ला विधानसभा अधिवेशनात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

     

    चंद्रपूर शहरातील व्यापारी संकुल रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला, सदर घटनेला 2 दिवस उलटत नाही तर बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब व गोळीबार हल्ला करण्यात आला होता.

    अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची रस्सीखेच

    Chandrapur District Crime या दोन्ही घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, वर्दळीच्या ठिकाणी होत असलेल्या या गंभीर गुन्ह्याची हिंमत गुन्हेगार करतात तरी कसे? पोलीस हफ्तेखोरी मध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.

    विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातील पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार करणारा आरोपी हा कुख्यात गुंड व हद्दपारीची शिक्षा भोगत आहे, त्यानंतर हा मागील आठवड्यापासून शहरात होता, याबाबत पोलिसांना सूचना दिल्या गेल्या मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही.

    कारण पोलीस अश्या गुन्हेगारांना संरक्षण देत पाठीशी घालण्याचे काम करते, पोलिसांना ज्यावेळी तडीपार बाबत सूचना दिली असता त्यांनी त्याला अटक करायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, त्यामुळे भरदिवसा इतकी मोठी घटना बल्लारपूर शहरात घडली.

    सविस्तर वाचा : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार

    Chandrapur District Crime त्यामुळे बल्लारपूर पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली आहे, या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याची जबाबदारी कोण घेणार?

    पोलीस कारवाई करणार की गुन्हेगारांना पाठीशी घालणार हा मोठा प्रश्न आहे, विदर्भातील गृहमंत्री असल्यावर सुद्धा विदर्भात असे गंभीर गुन्हे घडत आहे, त्यांनी तात्काळ दोषी पोलिसांवर कारवाई करायला हवी अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    जिल्ह्यातील या वाढत्या गुन्हेगारीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, गृहमंत्री फडणवीस यांनी या विषयांवर लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली असून लवकरचं याबाबत गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेत चर्चा करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले आहे.

    बल्लारपूर शहरातील मालू वस्त्र भांडार संचालक मालू कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी व्यापारी मंडळाने केली आहे.

  • Ballarpur Firing Case : व्यापारी एकटवले, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले पोलीस विभागाला निर्देश

    Ballarpur Firing Case : व्यापारी एकटवले, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले पोलीस विभागाला निर्देश

    Ballarpur Firing Case चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात 7 जुलै रोजी मालू वस्त्र भांडार येथे 3 अज्ञात युवकांनी पेट्रोल बॉम्ब टाकत दुकान जाळण्याचा प्रयत्न करीत गोळीबार केला. या घटनेनंतर बल्लारपूर येथील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध करीत आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
    गांधी चौकातील गजबजलेल्या परिसरात भरदिवसा हा हल्ला झाल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली, व्यापाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेतून आपला रोष व्यक्त केला होता.

    अवश्य वाचा : जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

    मालू वस्त्र भांडार प्रतिष्ठानचे संचालक अभिषेक मालू व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी व अश्या घटनांवर आळा बसावा यासाठी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री तर्फे पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.

     

    Ballarpur Firing Case चंद्रपूर नंतर बल्लारपूर शहरात झालेली घटना म्हणजेच शहरात दहशतीचे निर्माण करणे होय, या घटनांवर तात्काळ कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा व प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी असे FTCI संघटनेचे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांच्या नेतृत्वात पालकमंत्री मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आले.

    महत्त्वाचे : पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण, व्यापाऱ्यांची मागणी आरोपीना अटक करा

    बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्ब घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मालू कुटुंबियांची भेट घेतली यावेळी FTCI चे पदाधिकारी व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपस्थित होते.
    मालू कुटुंबियांना सुरक्षा, व बल्लारपूर वस्ती भागात पोलीस चौकी चे निर्माण व या गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिले.
    यावेळी संदीप माहेश्वरी, संतोष चिल्लरवार, गिरीश चांडक, पंकज शर्मा, नवीन चोरडिया, बल्लारपूर व्यापारी असोसिएशनचे नरेश मुंदडा व व्यापारी उपस्थित होते.

    Ballarpur Firing Case जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, घुग्गुस, राजुरा याठिकाणी अश्या गोळीबाराच्या घटना पूर्वी सुद्धा घडलेल्या आहे, पोलिसांच्या कारवाई नंतर सुद्धा या घटनेत वाढ होत आहे, म्हणजेच गुन्हेगारांच्या मनात खाकीचा धाक संपला की काय? अशी स्थिती जाणवू लागली आहे.

     

    विशेष बाब म्हणजे वर्ष 2024 मध्ये हत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अवैध शस्त्र, तलवार यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केल्यावर सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रांचा वापर वाढत चालला आहे.

    यामागे प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारी विश्वातून राजकिय क्षेत्रात गुन्हेगारांची होत असलेली एंट्री, राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण व्हावा यासाठी गुन्हेगारी वृत्तीचा वापर आज चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहे, त्यामुळे ही गुन्हेगारी जिल्ह्यात फोफावायला लागली आहे.

  • Ladki bahin chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

    Ladki bahin chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

    Ladki bahin chandrapur राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असली तरी त्यानंतरसुध्दा ही योजना सुरू राहणार आहे. शेवटच्या लाडक्या बहिणीपर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    अवश्य वाचा : पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर बल्लारपूर शहरातील व्यापारी आक्रमक

    Ladki bahin chandrapur नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात, महिलांसाठी तसेच इतर योजनांचा जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, श्री. रमेश राजुरकर आदी उपस्थित होते.

    लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटीची तरतूद

    Ladki bahin chandrapur ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ मिळवून देण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास 7 लक्ष पात्र लाभार्थ्यांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो. त्यासाठी प्रशासनासोबतच सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळण्यासाठी राज्य शासनाने अनेक अटी शिथील केल्या आहेत. तरीसुध्दा विनाकारण गर्दी वाढत आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2024 नंतरही सुरू राहणार आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे अनिवार्य आहे, कारण दरमहा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 46 हजार कोटींची तरतूद केली आहे.

    पैसे मागत असेल तर तक्रार करा 

    शासनाने नि:शुल्क सुरू केलेल्या कोणत्याही योजनेसाठी पैसे आकारण्यात येत असेल तर संबंधितांविरुध्द त्वरीत गुन्हा नोंद करावा. तसेच बनावट नावाने योजना सुरू असल्याचे आढळल्यास जिल्हा प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करावी. एवढेच नव्हे तर जो विभाग, किंवा अर्ज भरून घेणारे केंद्र लाभार्थ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावरसुध्दा कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले.

    अन्नपूर्णा योजना

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणतेही पात्र कुटुंब या योजनेपासून वंचित रहाता कामा नये. शेतीविषयक योजना जलदगतीने शेतक-यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येणार आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/cm-eknath-shinde-calling-amma-will-be-felicitated-in-mumbai/

    आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ओबीसी प्रवर्गातील मुलींच्या व्यवसायीक शिक्षणासाठी शासनाने 1900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पदवी व पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी दरमहा 10 हजार रुपये देण्यात येणार आहे. पैसे सरकार देणार, कौशल्य उद्योगांनी द्यावे, यासाठी शासनाने 10 हजार कोटींची योजना सुरू केली आहे. वयोश्री योजनेतही चंद्रपूर जिल्ह्याला पुढे न्यायचे आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  • Crime capital chandrapur : साहेब चंद्रपुरात गुन्हेगारीचा हैदोस वाढतोयं, लक्ष द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Crime capital chandrapur : साहेब चंद्रपुरात गुन्हेगारीचा हैदोस वाढतोयं, लक्ष द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Crime capital chandrapur चंद्रपूर जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु अलिकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या वाढत्या गुन्हेगारी बद्दल चिंता व्यक्त करीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी केली आहे.

    चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात अलिकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे च्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या घालुन जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच बल्लारपूर येथे जुन्या वैमनस्यातून गोळीबार करुन पेट्रोल बॉम्ब फेकत व्यापाऱ्यावर भ्याड हल्ल्यात एक जखमी झाला.

     

    Crime capital chandrapur या एकदिवसाआधीच वडील आणि मुलाने मिळून शेजाऱ्याची निघृन हत्या केली. मागील एका वर्षात गुन्हेगारीचे अनेक प्रकरण समोर येत आहे. या सर्व बाबींवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांसदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर तात्काळ आढा घालण्याची मागणी केली आहे.

    महत्त्वाचे : दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

    चंद्रपूर जिल्ह्यात सतत होणाऱ्या घटनांवर आळा न घातल्यास भविष्यात गुन्हेगारीचा उद्रेक निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती खासदार धानोरकर यांनी व्यक्ती केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयासंदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर नंतर बल्लारपूर शहरात गोळीबार

    Crime capital chandrapur वर्ष 2024 मध्ये हत्येच्या अनेक घटना घडल्या, सतत घडणाऱ्या या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. सध्या तर या वाढत असलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण राहिलेलं नाही असं चित्र निर्माण झालं आहे.

  • Chandrapur Zp Education : चंद्रपुरात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

    Chandrapur Zp Education : चंद्रपुरात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

    Chandrapur zp education चंद्रपूर – आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी नवेगाव मोरे आणि विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी निदर्शने करण्यासाठी पालकांसहित आणि गावकऱ्यांसहित जिल्हा परिषद येथे धडकले. गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या शाळेमध्ये 6 वर्ग आणि १८७ विद्यार्थी असताना सुद्धा फक्त 2 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्या भरवशावर ही शाळा सोडलेली आहे. प्रत्येक वर्गासाठी शिक्षक द्या, गेले कित्येक वर्ष आमच्या जिल्हा परिषद च्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.

     

    पोम्भूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व बल्लारपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी प्रशासनविरोधात रोष व्यक्त केला.

    अवश्य वाचा : श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

    Chandrapur zp education नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद शाळा दोन शिक्षकांच्या भरवशावर असून वर्ग 5 वि ते दहावी कसे काय चालू शकतात आणि या सात वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा होऊ शकतो अशा खोचक प्रश्न यावेळी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना केला.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात प्रतिबंधित 15 किलो खर्रा प्लॅस्टिक जप्त

    कित्येकदा विनंती करून विनवण्या करून निवेदन देऊनही शाळेला शिक्षक मिळत नाही आहेत आणि असलेल्या शिक्षकांची नियुक्ती सुद्धा प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या गावच्या शाळेमध्ये करण्यात आली आणि त्यामुळे शाळा सुरू होऊन सुद्धा योग्य प्रकारचे शिक्षण भेटत नाहीये अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

     

    Chandrapur zp education आज चिमुकल्या विद्यार्थ्यांवर स्वतः आंदोलन करून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याची वेळ आली हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि शिक्षणाची गंगा प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवायचं सोडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सर्व शाळांचे कंत्राटीकरण वीस पटसंख्या खाली असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण आणि समूह शाळा बनवून खेड्यापाड्यातील शाळा बंद करण्याचे धोरण या शिक्षण विरोधी सरकारने अवलंबलेला आहे असा आरोप मोर्चेकरांनी केला.

    अवश्य वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विष शोध यंत्रणा उपलब्ध नाही

    नवेगाव मोरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील एक शिक्षक ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहे, त्यानंतर शाळेत केवळ एकच शिक्षक असणार ही बाब विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या समक्ष ठेवली, मात्र शासनाने शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या नसल्याने जॉन्सन त्यांच्या प्रश्नावर निरुत्तरीत राहिले.

     

    Chandrapur zp education आठवडाभरात शिक्षकांची शाळेवर नियुक्ती करू असावं आश्वासन मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी परिस्थिती विसापूर येथील शाळेची आहे त्याठिकाणी 200 विद्यार्थी आणि शिक्षक केवळ 2, पालकांनी याबाबत उपमुख्यकार्यकारी अधिकारी वाखर्डे व शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना जाब विचारला मात्र शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी पालकांसमोर पळवाट काढत निघून गेल्या.

     

    यावेळी शिक्षण बचाव आंदोलनाच्या डॉ अभिलाषा गावतुरे, ग्रामपंचायत नवेगाव मोरे चे सरपंच जगदीश शेमले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुसुमाकर येंगुले, उपसरपंच रेखा मोरे,उपसरपंच रेखा दत्तू मोरे माजी सरपंच प्रतिमा बोरकर सदस्य देवेंद्र कष्टी, हर्ष आनंद दुर्गे अमोल लोहे, बंडू अर्जुनकार कमलाकर झाडे ,प्रवीण झाडे ,संजय झगडकर आशिष कावटवार उपस्थित होते.

    विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी देखील आपल्या पालकांसोबत आणि नागरिकांसोबत जिल्हा परिषदेत हजर होते विसापूर मधील प्रदीप गेडाम, मनस्वी गिर्हे वर्षाताई कुडमेथे, सरपंच संकेश्वर मेश्राम उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

     

    शिक्षण हे मूलभूत संवैधानिक अधिकार असताना रास्त मागण्या चे गांभीर्य पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दखल घेत पूर्ण करण्याचा आश्वासन दिले.
    शिक्षण हक्क अधिनियम 2009 लागू असताना शासन व प्रशासन त्याची पूर्तता करताना दिसत नाही. जर येत्या सोमवार पर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागन्या मान्य झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी दिला.

  • Poison detection system : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही यंत्रणा उपलब्ध नाही – आमदार जोरगेवार

    Poison detection system : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही यंत्रणा उपलब्ध नाही – आमदार जोरगेवार

    Poison detection system विष प्राशन केलेल्या रुग्णाने नेमके कोणते विष प्राशन केले याची पडताळणी करणारी विषशोध यंत्रणा चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नाही. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागतो.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 15 किलो खर्रा पन्नी जप्त

    ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महविद्यालयात  विषशोध पडताळणी यंत्रणा (टॉक्सिकोलॉजी सेंटर) उपलब्ध करा, अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

     

       Poison detection system सदर मागणीवर उत्तर देताना विष शोध पडताळणी यंत्रणेच्या पडताळणी बाबत  समिती घोषित करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, १४ कोटी लोकसंख्येच्या राज्यात केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि छ. संभाजीनगर या सहा शहरात टॉक्सिकोलॉजी सेंटर आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार

    राज्यात हजारो विषबाधेची प्रकरणे येत असताना विषबाधेचा प्रकार शोधणारे सेंटर केवळ चार शहरात आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टॉक्सिकोलॉजी सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे. यावर उत्तर देताना याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले असून विषशोध पडताळणी यंत्रणेबाबत समिती घोषित करण्याची घोषणा केली आहे.