Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • वाळू चोरीचा नवा फंडा

    वाळू चोरीचा नवा फंडा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.

     

    रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव रेती पुरवून लुटमार सुरु असल्याचे चित्र दिसून येते. बैलबंडया वापरल्याने महसूल अधिकाऱ्यांची कटकट नाही. हा फंडा वापरुन मूल तालुक्यात दररोज शेकडो ब्रास रेती रेतीचोर काही ठिकाणी घरपोच तर काही ठिकाणी साठवणूक करीत असल्याची बोंब सुरू आहे.

     

    मूल तालुक्यात प्रस्थावित असलेल्या ९ रेती घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. लिलावाअभावी परवाना
    अभावी ट्रॅक्टर द्धारे रेतीघाट वाहतुक बंद आहे. मात्रं खाजगी बांधकामांसाठी रेती ची मोठी मागणी सुरू आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही रेती तस्करांनी बैलबंडया भाडयाने घेऊन बेभाव रेतीतस्करी सुरू केली आहे. मुल तालुक्यात प्रति बंडी ९०० रुपयावर रेती पुरविणे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज मोठ्या संख्येने बैलबंडीधारक तालुक्यातील अनेक घाटांवर उपसा करताना खूलेआम दिसतात. तालुक्यातील अनेक गावांमधून पहाटे व रात्रो रेती भरलेल्या बैलबंडयाचा लोंढा बघून रेतीचोर किती शातीर होऊन आपला फंडा चालवीत आहेत हे लक्षात येत आहे.

     

    गतवषीं सुदधा असाच प्रकार सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी बैलबंडीधारकाना वेठीस धरले होते मात्र काही राजकिय व्यक्ती यात हस्तेक्षेप करीत असल्याची चर्चा होती. बैलबंडीधारकांना काही ठरावीक
    रक्कम एका फेरीमागे देऊन तेवढीच रक्कम या रेती चोरांच्या घशात जात असल्याचे बोलल्या जाते.

     

    मूल तालुक्यात दिवसाकाठी शेकडो ब़ास रेतीचे अवैध उपसा सुरू असून यात शेकडो बैलबंडीधारकांना फुस लावून गुंतविण्यात आल्याचे कळते. सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान मुल शहरात सुद्धा रेती वाहतुक करणाऱ्या बंडीच्या टोळया हमखास आढळून येतात असे बोलले जाते.

  • 2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त मंगेश खवले, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आदी उपस्थित होते.

     

    राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

     

    दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील मतदार यद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या मोहिमेत नव मतदारांचा लक्षणीय टक्का वाढला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     

    27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला, यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील (वणी-आर्णी सोडून) एकूण 17 लक्ष 82 हजार 316 मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार 9 लक्ष 12 हजार 483 तर महिला मतदार 8 लाख 69 हजार 788 व तृतीयपंथी मतदार 45 असे आहे.

     

    सदर पुनर्निरीक्षण कार्यक्रम मोहिमेत 18 ते 19 वयोगटातील 15 हजार 27 नव्या मतदारांची भर पडली आहे, तसेच 20 ते 29 वयोगटातील 13 हजार 687 मतदारांची वाढ झाली, 22 हजार 200 मृत मतदारांचे नवे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.

     

    जिल्ह्यात एकूण 6 हजार 778 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था करण्यात आली आहे, मतदारांना मतदार यादीत आपले नाव तपासायचे असल्यास त्यांनी HTTPS://electoralsearch.eci.gov.in यावर ऑनलाइन तपासावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी केले.

    तसेच मतदार सेवा पोर्टल व व्होटर हेल्पलाईन ऐप यावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

     

    चंद्रपुरात एकूण 2 हजार 32 मतदान केंद्रे असून त्यामध्ये शहरी भागात 691 ग्रामीण भागात 1341 मतदान केंद्रे आहे.

  • ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    News34 chandrapur

    नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, कोलाऱ्याच्या श्रीमती शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, ट्रॅक्स संस्थेच्या श्रीमती पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     

    ताडोबा-अंधारी या प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे 82 गावे असून त्यापैकी 62 गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात.

     

    ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसीत केलेल्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक,स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रीया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

     

     

    रिसॉर्टमधील ध्वनीप्रदुषण प्रतिबंधासाठी समिती
    ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.

     

    आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 50 टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी. या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

     

    इरई सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. परंतु या क्षेत्रात तारेचे कुंपण टाकून शेती करण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाजनकोच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण काढुन तेथे वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी आवश्यक नियम तयार करुन त्यानुसार पर्यटनाचा मार्ग निश्चित करावा असेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

     

    प्रारंभी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी श्रीमती पूनम धनवटे, बंडू धोतरे, धनंजय बापट, योगेश दुधपजारे तसचे सरपंच श्रीमती शोभाताई कोचाडे व सुनिता कातकर यांनी विविध सूचना मांडल्या. त्याअनुषंगाने अहवाल सादर करावा असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सांगितले.

  • चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

     

     

    नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन युवकांनी सुरू केला होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेमुळे हे घबाड पुढे आले.

     

    असे होते गुन्हेगारीचे स्वरूप

    नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे राहणारा आरोपी क्रमांक 1 आशिष सहारे व त्याचे सहकारी आरोपी 2 मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील पवन साहू, आरोपी क्रमांक 3 संदीप कनासिया बालाघाट मध्यप्रदेश येथे राहणारे हे तिघेजण एकमेकांचे मित्र, तिघांनी मिळून नव्या गुन्ह्याची योजना आखली.

     

    नागभीड येथे राहणारा आशिष सहारे याने गावातील गरीब नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले, यामध्ये नारायण पर्वते यांच्या नावावर चारचाकी वाहन घेतले, पर्वते यांचे सर्व कागदपत्रे सोबत घेत त्यावर कर्ज सुद्धा घेतले, आणि नंतर तेच वाहन दुसऱ्याला विकले, वाहन घेणाऱ्याला त्या वाहनांचे कागदपत्रे मिळाले नाही.

     

    काही दिवसांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्वते यांच्याकडून वाहनांचे हफ्ते मागायला आले, मात्र मी वाहन घेतले नाही असे त्यांनी सांगितले, नंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती पर्वते यांना दिली, आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली.

     

    गुन्ह्याची गंभीरता बघता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे वर्ग केला.

    स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथक गठीत केले, सखोल तपास केल्यावर यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 1 स्कॉर्पिओ, 1 ट्रॅक्टर व 14 दुचाकी असे तब्बल 16 वाहने किंमत 32 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

     

    जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी याबाबत जनतेला आवाहन केले की वाहन खरेदी करताना शोरूम मधून वाहनाची सखोल माहिती घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी करावी, वाहन मिळवून देतो असे कुणी सांगितले तर पुढील व्यक्तीला आपली कागदपत्रे देऊ नका, त्यासंबंधाने कुणी आपल्याकडे आले की जवळच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी दीपक डोंगरे, गणेश भोयर, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, सतीश बगमारे, प्रदीप मडावी व सायबर पोलिसांनी केली.

  • चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

     

    प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली आहे. या सुट्ट्यांचे नियोजनही त्यांनी केलेले नसते. त्यामुळे कार्यालयात कामकाजाची अडचण निर्माण होते.
    याशिवाय, कार्यालयातील फील्ड अधिकारी देखील कामात दिरंगाई करीत आहेत. यामुळे कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांवर नियमांचे पालन केले जात नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.

     

    बेले यांनी प्रादेशिक अधिकारी आणि फील्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

  • विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

    विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

     

    तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघचे मुख्य संघटक प्रा रमेश पिसे यांच्या सिफारसीनुसार केंद्रीय अध्यक्ष रघूनाथ शेंडे यांनी चिमूर येथील श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती केली.

     

    श्रीहरी सातपुते राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष असून व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सहचिटणीस आहेत. मुख्य संघटक प्रा रमेश पिसे. केंद्रीय सचिव संजय सोनटक्के. सत्यशोधक महिला महासंघाच्या राज्य अध्यक्षा वंदना वंनकर. प्रा. महादेव पिसे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

     

    यावेळी धनराज मुंगले. राजू अगडे. भास्कर बावनकर. ईश्वर डुकरे. ऍडव्होकेट धनराज वंजारी. प्रवीण सातपुते. रामदास कामडी. प्राध्यापक पितांबर पिसे. कवडु लोहकरे. प्रभाकर पिसे. तुळसीदास भूरर्से माधुरी रेवतकर. ममता डूकरे. भावना बावनकर. वर्षा शेंडे. यामिनी कामडी. पुष्पा हरने. कांचन खाटीक. व सर्व समाज बांधवांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

  • चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रात सकाळी 2 वाघांचे मृतदेह आढळून आले, आतापर्यंत या महिन्यात तब्बल 4 वाघांचा मृत्यू तर 1 बिबट चा मृत्यू झाला.
    यामध्ये 1 बोर्डा,1 भद्रावती तर 2 कोळसा येथे वाघांचे मृत्यू झाले आहे.

     

    राज्यात सर्वाधिक जास्त संख्या असलेल्या वाघाचा जिल्हा म्हणून ताडोबा अभयारण्य याचं नाव येत, मात्र या ताडोब्यात वाघाला अधिवास क्षेत्र कमी पडत आहे, त्यामुळे वाघांच्या झुंजी वाढत आहे.

     

    कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी पाणघाट खातोडा तलाव क्षेत्रात आज सकाळी वनरक्षक गस्त करायला गेले असता त्यांना 2 वाघांचे मृतदेह त्याठिकाणी आढळून आले.

     

    2 वाघाचा मृत्यू हा झुंजीत झाला असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे, पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा T-142 नर असून त्याचे अंदाजे वय 6 ते 7 वर्षे आहे.

     

    दुसरा वाघ हा कमी वयाचा असून त्या वाघांचे अंशतः मास भक्ष्य केले आहे, दुसरा वाघ हा T-92 या वाघिणीचा मादी बच्चा आहे, त्याच वय हे अंदाजे 2 वर्षे आहे.

     

    दिनांक 20 जानेवारी ते 21 जानेवारीला रात्रीच्या दरम्यान वाघांची झुंज झाली असावी असा अंदाज आहे, सदरील वाघांचे मृतदेह TTC सेंटर येथे शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून 23 जानेवारीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.

    दोन्ही वाघांचे DNA नमुने सुद्धा घेण्यात आले आहे, मोका पंचनामा करतेवेळी कोर चे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृंदन कातकर, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर, डॉ खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

  • प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक दिनी आमदार किशोर जोरगेवार यांचा अनोखा उपक्रम

    प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक दिनी आमदार किशोर जोरगेवार यांचा अनोखा उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 प्रकारच्या भातांचा महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरित करण्यात आला.

     

    यंग चांदा ब्रिगडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने महानगर पालिकेच्या पटांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.00 वाजता पासून भव्य एलईडी स्क्रीन वर अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्यात आले.

     

    सकाळी 8.30 वाजता लखमापूर भजन मंडळाच्या वतीने सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजेपासून संस्कार टिव्ही फेम भजन सम्राट दिनेशजी शर्मा याच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादक जिल्हा असल्याने 11 प्रकारच्या भातांचे महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरीत केल्या गेले.

     

    आपल्या विविध कार्यक्रमात नेहमी वेगळेपण जपण्याचा आमदार जोरगेवार हे प्रयत्न करीत असतात यावेळी त्यांनी भात उत्पादक जिल्ह्यातील विविध 11 प्रकारच्या भाताचा महाप्रसाद नागरिकांमध्ये वितरित केल्याने नागरिकांना सुद्धा भाताच्या विविध जातीबद्दल माहिती मिळाली.

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशातून विलुप्त होत असलेली प्रजाती म्हणजे गिधाड ज्याला आपण रामायणात जटायू म्हणून बघितले आहे, त्याच्या संवर्धनाचा विडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे.

    22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा पूर्वी आज ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील झरी कोर झोन मध्ये 10 जटायू संवर्धनासाठी सोडण्यात आले.

     

    बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी तर्फे ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मध्ये 10 गिधाड पक्षी संवर्धनासाठी देण्यात आले यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी सह वनविभागाचे बडे अधिकारी चंद्रपुरात दाखल झाले होते.

     

    वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते आज 10 गिधाड पक्ष्यांना संवर्धनासाठी मुक्त करण्यात आले, सदर जटायू हे राजस्थान राज्यातून आणण्यात आले असल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.

     

    देशात आधी 4 कोटी संख्या असलेल्या गिधाड पक्षी (स्वच्छता दूत) आज 60 हजाराच्या संख्येपेक्षा खाली आला आहे, या पक्षाचे जलद संवर्धन व्हावे यासाठी वनविभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे, या प्रजातीचे योग्य संवर्धन झाले तर ताडोब्यात येणाऱ्या पर्यटकांना गिधाडाचे दर्शन होणार. अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.