महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.
Sudhir mungantiwar loksabha nomination भाजपा चे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यकर्ते व नागरिकांच्या भव्य उपस्थिती मध्ये नामांकन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Sudhir mungantiwar loksabha nomination
सध्या तर भाजप कडून सुधीर मुनगंटीवार एकमेव निवडणुकीच्या रिंगणात आहे अजूनही कांग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. Sudhir mungantiwar loksabha nomination
मंगळवारी सकाळी 11 वाजता सुधीर मुनगंटीवार वणी-आर्णी व चंद्रपुरातील दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थिती मध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात अनेक मोठे नेते व सेलिब्रिटी सुद्धा चंद्रपुरात प्रचाराला येणार असल्याची माहिती आहे.
What kind of development man is Sudhir Mungantiwar? नुकतेच खासदार पदाच्या शर्यतीत उतरलेले जिल्हयाचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
“फक्त करोडोंच्या इमारती, रस्ते ,सौंदर्यीकरण यालाच विकास म्हणायचा का? या विकासामुळे सामान्य जनतेला काय मिळाले? विकासपुरूष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीरभाऊंनी शहरातील सरकारी शाळांमधील अवस्था सुधारण्याकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही? पण विद्यार्थांना देणाऱ्या बुकांमध्ये आपले फोटो छापून प्रचार केला,यालाच विकास म्हणतात का.? What kind of development man is Sudhir Mungantiwar?
शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधली गेली आहे परंतु या सामान्य जनतेसाठी रूग्णालयात वैद्यकीय सोय-सुविधांचा अभाव आहे. त्याकडेही सुधीरभाऊंनी कधीच लक्ष दिले नाही. बल्लारपूर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अवाढव्य पाणी बिले जनतेला पाठवली जात आहे. चंद्रपूर व राजुरा शहराप्रमाणे वार्षिक सरासरी पाणी बिलाची सोय बल्लारपूर शहरातील नळ धारकांना करून देण्यासाठी आमदार साहेबांनी आजपर्यंत दुर्लक्ष का केला? What kind of development man is Sudhir Mungantiwar?
औद्योगिक शहर म्हणून गणल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरात शिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. या 15 वर्षांच्या आमदार पदाच्या कारकीर्दीत त्यांनी रोजगार वाढविण्यासाठी अयशस्वी रोजगार मेळावा घेण्या शिवाय काय प्रयत्न केले? असा सवाल पुप्पलवार यांनी उपस्थित केला.
पेपरमीलमुळे होणारे प्रदूषण यावर कोणतेही पाऊले उचलली नाही. पेपरमीलच्या स्टॉक यार्डमुळे शहरात प्राण्यांचा हैदोस वाढला असतांना देखील वनमंत्री म्हणून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शहरातील नागरिकांना अवाढव्य घर टॅक्स पाठिला जातो त्यावर भाऊंनी कोणतेही कार्य केले नाही. विकासपुरुषांचा विकास सामान्य जनतेच्या कधीही कामी आला नाही, हिच परिस्थिती असल्याचे पुप्पलवार म्हणाले. What kind of development man is Sudhir Mungantiwar?
आमदार, जिल्हयाचे पालकमंत्री, राज्यात अनेक मंत्रीपदे उपभोगल्यानंतर आता ते खासदार पदाच्या मैदानात आहेत. आता खासदार बनून सामान्य नागरिकांचा विचार करतील कि फक्त विकासाचा देखावाच्या मागे कमिशनचा कारभार करतील हे आपल्याला बघावे लागेल असे देखील रविभाऊ पुप्पलवार म्हणाले.
Dictatorship in the country दिल्ली सरकारच्या बनावट मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे.
जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पार्टीला दबावात आणत आहे. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र रचन्यात येत आहे. निवडणूक काळात भाजपाने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्वास दाखवला. याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांच नेतृत्व मान्य आहे. परंतु, तुम्ही (भाजपा) एका चांगल्या माणसाला खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकता, त्याचा लोकशाहीचा अधिकार हिरावता. येना-या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवण्यात मतदार मागे पुढे पाहणार नाही. Dictatorship in the country
या आंदोलनात आप चे वरीष्ठ नेते सुनिल
देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, भूमिपुत्र ब्रिगेड च्या डॉ अभिलाषा ताई गावतुरे, डॉ राकेश गावतूरे,CPM चे रमेशचंद्र दहीवळेसर ,अरुन भेलके सुरेश विधाते आप चे संगठन मंत्री योगेश मुर्हेकर,शंकर सरदार,महानगर अध्यक्ष योगेश गोखरे ,युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गडलेवार,सुरज शाह,जिल्हा सचिव राजकुमार नगराळे,बल्लारपूर अध्यक्ष रवी पुप्पलवार,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ताई बावरे,महिला महानगर अध्यक्ष एड तब्स्सुम शेख,शहर संगठन मंत्री संतोष बोपचे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभेय्या, राजेश चेटगुलवार, महानगर कोषध्यक्ष पवन कुमार प्रसाद,महानगर शिक्षक आघाडी अध्यक्ष ऐकनाथ हांडेकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने,राहुल चाव्हण, प्रा किशोर दहेकर,दिपक बेरशेट्टीवार,सुमित हस्तक,महानगर सहसंघटणमंत्री नागसेन लभाने,महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष अलंकार सावळकर, संतोष दोरखंडे, अफजल अली, डॉ सलिम तुकडी,सुनिल भोयर, बबन कृष्णपल्लीवार, प्रशांत रामटेके, इत्यादी उपस्थित होते.
Congress workers will resign en masse चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली मात्र कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे.
कांग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी मात्र ऐनवेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीचे नाव समोर केले. Congress workers will resign en masse
शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्ष श्रेष्ठीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती, त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली.
20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली. Congress workers will resign en masse
21 मार्च ला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार, व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
वडेट्टीवार यांनी राज्यातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे मात्र आज कांग्रेस पक्षात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे, जर आमदार धानोरकर यांना तिकीट मिळाली नाही तर आम्ही कांग्रेस पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. Congress workers will resign en masse
Lok Sabha Candidate of Congress Party चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला मात्र कांग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्यापही केली नाही.
भाजप पक्षाने आपले उमेदवार घोषित केले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे, कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे. Lok Sabha Candidate of Congress Party
सूत्रांच्या माहितीनुसार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर कांग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती पुढे आली आहे, फक्त अधिकृत नावाची घोषणा बाकी आहे, आज रात्री किंवा 21 मार्च रोजी कांग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. Lok Sabha Candidate of Congress Party
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सुद्धा कांग्रेस पक्षाने वेळेवर लोकसभेचे तिकीट दिले होते, तिकीट मिळाल्यावर धानोरकर यांनी 12 दिवसात निवडणूक जिंकत राज्यातील कांग्रेस पक्षाचे एकमेव खासदार म्हणून ते प्रचलित झाले. Lok Sabha Candidate of Congress Party
बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करीत जायंट किलर बनले, आजही तशीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
राज्यात सोलापूर मधून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर मधून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Vanchit bahujan aghadi चंद्रपुरातील बहुजन समाजाचे नेते व संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेले यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला आहे, जर राज्यात महाविकास आघाडी सोबत वंचित ची युती झाली नाही तर तिन्ही पक्षाला याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. vanchit bahujan aghadi
राजेश बेले यांच्या पक्षप्रवेश वेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर पश्चिम प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे, पूर्व चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, चंद्रपूर महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Vanchit bahujan aghadi
Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar चंद्रपूर लोकसभेसाठी भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर नामदार सुधीर मुनगंटीवारयांचं आज चंद्रपुरात आगमन झालं.
मुनगंटीवार यांचे नागपूर ते चंद्रपूर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला. 18 मार्च ला गांधी चौकात भव्य आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar आयोजित सभेत महायुती मधील शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने मुनगंटीवार यांचा सत्कार केला, यावेळी नागरिकांना संबोधित करताना मुनगंटीवार यांनी वणी तालुक्यासोबत आपलं जुनं नातं असल्याचा उल्लेख करीत आज त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली असून मी आपल्या लोकसभा क्षेत्राचे नाव दिल्लीच्या शिखरावर पोहचविणार असा विश्वास व्यक्त केला.
आयोजित आशीर्वाद सभेत असंख्य नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Chandrapur-wani-Aarni Lok Sabha चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विजय संकल्पासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दि. १९ मार्च २०२४ ला एकाचवेळी सायंकाळी ६ वाजता परमेश्वराची आराधना करण्यात येणार आहे. सामान्य कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आयोजन केले आहे.
Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर – पूर्व विदर्भात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभेची जागा तेली समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी आज 17 मार्च ला तेली समाजाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
17 मार्च ला आयोजित पत्रकार परिषदेत तेली समाजाचे पदाधिकारी प्रकाश देवतळे यांनी भाजप पक्षाचे आभार मानले, कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात तेली समाजाचे रामदास तडस यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, पूर्व विदर्भात काही ठिकाणी विविध निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. Chandrapur Lok Sabha Constituency
मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष कांग्रेसने तेली समाजाची दखल घेत चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाचे विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र वेळेवर त्यांना तिकीट नाकारत उमेदवारी धानोरकर यांना देण्यात आली होती, तो राग आमच्या मनात आहे, त्याकरिता यंदा 2024 मध्ये तेली समाजाची दखल घेत कांग्रेसने तेली समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जर कांग्रेस पक्षाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही वेळेवर वेगळी भूमिका घेऊ असा इशारा सुद्धा यावेळी तेली समाजाच्या जेष्ठ सदस्यांनी दिला आहे. Chandrapur Lok Sabha Constituency
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाने केलेली मागणी राष्ट्रीय पक्षांना अडचणीत आणणारी आहे, याबाबत तेली समाजाने कांग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणारे पत्र लिहले आहे. तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडणुकीत जिंकून दाखवू असा सूर पत्रकार परिषदेत लगावण्यात आला. जिल्ह्यात तेली समाजाची संख्या लाखोंच्या वर आहे, आता कांग्रेस पक्ष तेली समाजाच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे शांताराम पोटदुखे यांच्यानंतर एकही खासदार तेली समाजातून प्रतिनिधित्व करायला आलेला नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाची ही मागणी आश्चर्यकारक आहे, कारण मागच्या निवडणुकीत तेली समाजाचे राजेंद्र हजारे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना समाजाने जाहीर पाठिंबा दिला नव्हता, मात्र आजच्या स्थितीत तेली समाजाचे राजेश बेले हे लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे, मात्र त्यांच्या नावावर अप्रत्यक्षपणे समाजाने “ना” असे म्हटले आहे.
बेले यांनी आधी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरावा तेव्हा विचार करू असे म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाला देवतळे यांनी टाळले.
Congress victory will be repeated कोणतीही निवडणूक ही स्पर्धात्मक होत असते. विरोधी पक्ष म्हणून आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे हे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे वायफळ, पालाड विधान करू नये, देवरावजी, बधीरभक्तीचा भोंगा आवरा असे प्रत्युत्तर शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर 2019 ची पुन्हा पुनरावृत्ती करून काँग्रेसचा झेंडा रोवला जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
चंद्रपुरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या लोकसभा निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा ध्येय आम्ही ठेवला आहे. त्यात गैर काय? मागील १० वर्षातील केंद्रातील भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. आता बदल हवा आहे. भाजप सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकांना विकासाचा अनुभव आला नाही. Congress victory will be repeated
भाजप सरकारने धार्मिक ध्रुवीकरण वाढवले आहे आणि सामाजिक सलोखा बिघडवला. भाजप सरकारवर अनेक आर्थिक धोरणांमध्ये अपयश आले. केवळ ईडीचा धाक दाखवून आमदारांची टोळी फोडण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही विकासाची कोणतीही पाहिजे तसे काम झालेले नाही. केवळ बल्लारपूर आणि मुल तालुक्यात दोन-चार कामे करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, हीरो हीरोइनला बोलवणे, म्हणजे लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे. Congress victory will be repeated
मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहराचा विकास झालेला नाही. महानगरपालिका भाजपच्या ताब्यात असताना देखील केवळ आणि केवळ भ्रष्टाचार झाला. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा यासाठी कुठलाही राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थमंत्री असताना देखील निधी दिलेला नाही. या निवडणुकीमध्ये बाळूभाऊ धानोरकर यांनी बघितलेले स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी एकत्रितरित्या, एकजुटीने, एकसंघपणे काम करणार आहे. त्यामुळे देवराव भोंगळे यांनी विनाकारण नाक खुपसू नये. Congress victory will be repeated
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीत भाजपची स्थिती काय झाली होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती करून काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा पलटवार देखील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.