Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Vayoshri Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार 766 अर्ज प्राप्त

    Vayoshri Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार 766 अर्ज प्राप्त

    Vayoshri Yojana राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात म्हणून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 10766 अर्ज प्राप्त झाले असून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने केले आहे.

    अवश्य वाचा : जिवती तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, कारण काय?

    Vayoshri yojana ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे नागपूर विभागात एकूण 66898 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त अर्जांची संख्या 10766 आहे. ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणे, तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बचत खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे.

    ही उपकरणे खरेदी करता येणार : 

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनूसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर खरेदी करता येतील. तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मन:शक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

    लाभार्थी पात्रता : 

    31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांच्या आत असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

    आवश्यक कागदपत्रे : 

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.

    येथे करा संपर्क : 

    अधिक माहितीसाठी सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर तसेच शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा कार्यालयात संपर्क साधावा. सदर कार्यालयात पात्र ज्येष्ठ नागरीकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे.

    Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाईकाकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल. हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरिता असेल, तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरिता राहील. लाल रंगाच्या पास वर एकावेळी एका नातेवाईकाला रुग्णास भेटण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच आधी गेलेला नातेवाईक परत आल्यानंतर त्याच पासचा वापर करून दुसऱ्या नातेवाईकास आत प्रवेश देण्यात येईल. सदर पासची वैधता 7 दिवसांकरिता राहील.

    अवश्य वाचा : 3 वर्षांपासून रखडलेलं काम, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका झटक्यात केलं

    Gmc chandrapur रुग्ण जर 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीकरिता भरती राहिल्यास सदर पासवर आंतररुग्ण नोंदणी विभागातून नवीन तारखेचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. तसेच पास हरवल्यास 50 रुपये प्रतीपास दंड आकारण्यात येईल. दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाकडील दोन्ही पास वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करण्यात यावे. त्याशिवाय रुग्णास सुट्टी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

    तर होणार 500 रुपये दंड : रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा, याकरिता धूम्रपान करणे, पान, गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे. परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुंकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

    बाहेरील वाहनांना प्रवेश निर्बंध : रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने – आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वाहन पासेस उपलब्ध करुन दिल्या जाईल सदर पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.

    अवश्य वाचा : महाविकास आघाडीच्या आंदोलनात पालकमंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांचा निषेध

    विनापरवानगी फोटो /व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई : रुग्णालयाच्या आत तसेच परिसरात विनापरवानगी फोटो तसेच व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई असून असे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायची असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊनच काढण्यात यावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

    नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तैनात झालेले सुरक्षा रक्षक, रुग्णालय प्रशासन, तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी केले आहे.

  • security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

    security guards आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत सत्कार केला आहे.

    अवश्य वाचा : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

     security guards यावेळी कामगार संघटनेचे बाबु जावळे, समीर पठाण, राजेश गायकवाड, संजय नागपूरे, शरद मंचलवार, यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, माया पटले, करण नायर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       2015 मध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि 103 सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. त्यानंतर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडून मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु, तांत्रिक कारणांमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. पुढील चाचणीसाठी तारीख लवकर देण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले, मात्र आदेश काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले होते.

    अवैध बांधकाम : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

      आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मागणीच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. परिणामी मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावली. महानिर्मितीला 250 सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणीकृत 103 सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते. आता लवकरच हे सर्व कामगार कामावर रुजू होणार आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जवळपास 9 वर्षांची कामगारांची बहु प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी शुक्रवारी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.

     यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “हा विजय कामगार आणि कामगार संघटनेच्या जिद्दीचा आहे. आपण एकजुटीने राहिलो, त्यामुळे आपल्याला हे यश मिळाले आहे. आपण सदैव कामगारांसोबत आहोत. आपल्याला न्याय मिळवून देता आला याचा नक्कीच आनंद आहे. आता आपण लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. जिथे गरज भासेल तिथे मी तुमच्यासोबत उभा राहील.” असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

    illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

    illegal construction ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असुन पूररेषेतील ३ चालुस्थितीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. अवैधरितीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर व भिंतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

    कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू
      illegal construction अमृतसर हवेली हॉटेलमागे,आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर ८ व ९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे मनपा पथकास पाहणीदरम्यान आढळले. सदर भूखंड हा ब्लू लाईन मध्ये असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या सर्व बांधकामदारांना नोटीस देण्यात आली होती. मात्र विहीत मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे.

    राजकारण : उमेदवारी घोषित झाल्यावर चंद्रपुरातील मनसे मध्ये आपसात झालं खळखळखट्याक


        पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले असल्याने सदर बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.      


       सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते,अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. झोन क्र. १ प्रभागातील पूरग्रस्त भागात येणाऱ्या राष्ट्रवादी नगर परिसर,तुळशी नगर,आंबेडकर सभागृह परिसर,वडगाव जुनी वस्ती,सोमय्या पॉलीटेक्नीक, हवेली गार्डन,जगन्नाथ बाबा नगर,अग्रेसन भवन मागील परिसर,वक्रतुंड चौक,सिस्टर कॉलोनी, रहमत नगर, शांतीधाम मागील परिसर इत्यादी भागात पूररेषेत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत. सदर बांधकामे बांधकामदारांनी तात्काळ निष्कासित करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


        त्याचप्रमाणे केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    पूर रेषा कश्या आखतात? ब्लू लाईन म्हणजे काय?

    पूर रेषा कशा आखतात? धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणीपातळी वाढते. पाणी पातळी जेथे पोहचते ती रेषा ‘व्हाईट लाईन‘ अथवा ‘पांढरी रेषा‘ म्हणून ओळखली जाते. धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा ‘ब्लू लाईन‘ अथवा ‘निळी रेषा‘ म्हणून ओळखली जाते.

  • Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

    Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

    Home Guard Recruitment चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड  प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे.

    करीअर : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार व्यावसायिक पायलट

    Home Guard Recruitment होमगार्डचा पदावधी कालावधी हा 3 वर्षाचा असून ही नोकरी नाही. 22 ते  24 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांचाच होमगार्ड निवड  प्रक्रियेकरीता विचार केला जाईल. सकाळी 10 वाजता नंतर नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेकरीता प्रवेश दिला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे व धबधबे बंद

    रहिवासी भागातील पथक/ उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार कागदपत्र पडताळणी  मध्ये अपात्र ठरतील. तसेच इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. नोंदणीबाबत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.php  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 6197 पर्यंत महिला उमेदवार, 23 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 2964 पर्यंत पुरुष उमेदवार 24 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक  2966 ते 6200 पर्यंत पुरुष उमेदवार घेण्यात येणार आहे. नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे निकष खालील प्रमाणे असतील.

    आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत (बोनाफाईड ग्राहय धरले जाणार नाही.) 2) रहिवासी दाखला 3) तहसीलदार यांचे कडील राशन कार्ड  4) आधार कार्ड 5) 2 पासपोर्ट साईज फोटो.

    महिला सुरक्षा : 31 ऑगस्टला मध्यरात्री चंद्रपुरात निघणार रॅली

    उमेदवार वैद्यकीयदृष्टया पात्र असावा. पोलीस चारित्र्य अहवाल अनुकुल असावा. उमेदवार हे वेतनी सेवेत कार्यरत असतील तर  कार्यालयाचे अथवा मालकांचे संमती ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी देणे अनिवार्य आहे. उमेदवारांस नोंदणीचे वेळी तसेच उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर  करण्यांत येईल. तसेच खेळ, आय.टी.आय., जडवाहन चालक ड्रायव्हिंग लाइसन्स, एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. असल्यास सोबत आणावे. नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने यावे लागेल, असे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

  • Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

    Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

    tillu pump नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.

    महत्त्वाचे : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

       
     Tillu pump मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे,राजेश बागेल व सुरेश नत्थुजी इंगळे यांच्याद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.  


         सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  

    अतिशय महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.

  • Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

    Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

    Badlapur sexual assault case राज्यातील बदलापूर येथे प्राथमिक शाळेतील 4 वर्षीय 2 मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेचा संदेश देणारी निघणार रॅली

    त्यांनतर पालकांचा रोष उफाळून आला, 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, पीडित मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी 12 तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. 10 तास रेल्वे रोको आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आतापर्यंत या घटनेनंतर 38 आंदोलकांना अटक केली असून 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    Badlapur sexual assault case या घटनेचे पडसाद चंद्रपुरात पडले असून शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस गटाने राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.

    यावेळी बेबीताई उईके यांनी बदलापूर प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले, आम्हाला लाडकी बहीण योजना नको आधी लाडक्या बहिणीला सुरक्षित करा, या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

    राज्यात सध्या महिला अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सरकार अश्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरली आहे, सध्या राज्यात सरकार द्वारे लाडक्या बहीण योजनेचे इव्हेंट सुरू करण्यात आले मात्र अद्यापही लाडक्या बहिणीला सुरक्षित कसे ठेवणार यावर ठोस पावले उचलण्यात आली नाही.

    चंद्रपुरात जागृती मशाल मंच द्वारे 31 ऑगस्टला मध्यरात्री महिला सुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढण्यात येणार आहे, जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या व प्रत्येक महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे अशी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे निदर्शने

    राष्ट्रवादी कांग्रेसच्या निदर्शने आंदोलनात शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल, महिला अध्यक्ष शिल्पा कांबळे व राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • woman safety message : महिला सुरक्षा संदर्भात चंद्रपुरात निघणार जागरुकता रॅली

    woman safety message : महिला सुरक्षा संदर्भात चंद्रपुरात निघणार जागरुकता रॅली

    woman safety message कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती, या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पडले, या अमानुष घटनेनंतर देशभरातील आई-वडिलांना एकच प्रश्न पडला की आता आपण मुलींची सुरक्षा करायची कशी? अश्या घटनेतील आरोपीना आता ठेचायला हवे अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

    अवश्य वाचा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर


    woman safety message चंद्रपूर शहरात या घटनेचा अनेक सामाजिक संघटनांनी निषेध दर्शविला, पण आता चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी शहरात मध्यरात्री शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
    जागृती मशाल मंचाची संकल्पना कलकत्ता येथील घटनेनंतर आकारात आली.

    महत्वाचे : राखी च्या भरवश्यावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा, डॉक्टर बहिणीने दिला अनोखा संदेश


    विशेष म्हणजे या रॅलीत कुणाचाही विरोध होणार नाही तर स्त्री सुरक्षेची शपथ यामध्ये घेतल्या जाणार आहे.
    पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः या रॅली मध्ये सहभाग घेणार आहे.
    आज 20 ऑगस्टला याबाबत जागृती मशाल मंचतर्फे पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी माहिती दिली.


    31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत ही रॅली गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
    गोस्वामी पुढे म्हणाल्या की या रॅली चा एकच उद्देश्य आहे प्रत्येक महिलांच्या सुरक्षेची जबाबदार आपण सर्वांची आहे, महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांबद्दल जागरूकता पसरविणे.
    नागरिकांनी आता एकजूट व्हायला हवे, चंद्रपुरातील नागरिक महिला सुरक्षेच्या समर्थनात एकत्र आहे हे दाखवीत प्रत्येक महिला आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हे मानणे.

    रॅली चे स्वरूप काय?

    संघटित व असंघटित क्षेत्रात कण करणाऱ्या प्रत्येक महिला, रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे याची सार्वजनिक हमी देणे, संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, भीतीशिवाय महिकाना स्वतंत्र फिरण्याचा अधिकार असला पाहिजे.
    या पार्श्वभूमीवर सदर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
    ‘तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहो” हा नारा सर्व चंद्रपूर वासी देणार आहे, तुमची सुरक्षा आमची जबाबदारी हे मुली व स्त्रियांना आश्वासित करण्याचा एक उद्देश्य आहे.
    आयोजित पत्रकार परिषदेत एड प्रीतिशा साधना, अश्विनी खोब्रागडे, डॉ.नसरीन मावाणी आदि उपस्थित होते.

  • Haryana Pattern: वीज कंत्राटी कामगार म्हणतात राज्यात ‘हरयाणा पॅटर्न” लागू करा

    Haryana Pattern: वीज कंत्राटी कामगार म्हणतात राज्यात ‘हरयाणा पॅटर्न” लागू करा

    Haryana Pattern वीज कंत्राटी कामगारांनी 12 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे, 12 ऑगस्ट पासून चंद्रपूर वीज वितरण कार्यालय समोर साखळी उपोषण करीत आज 20 ऑगस्टला पालकमंत्री यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे यांनी दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला नकार दिल्याने मनपा समोर आंदोलन करण्यात आले.

    महत्त्वाचे : महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर यांची पंतप्रधान मोदी कडे मागणी


    Haryana Pattern राज्याचे तीन वीज उद्योग महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी बरेच वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे मात्र वीज कामगाराना अद्यापही न्याय मिळाला नाही.


    त्यामुळे साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन असे नियोजन करण्यात आले होते मात्र आज पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन कर्त्यांनी मनपसमोर ठिय्या आंदोलन करीत नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे कार्यकारी अधिकारी यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
    प्रत्येक वीज वितरण कंपनी मध्ये हरियाणा पॅटर्न राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
    जर मागण्या आंदोलनामुळे मान्य झाल्या नाही तर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ पायी मोर्चा व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार अशी माहिती हेमराज गेडे यांनी दिली.

    काय आहे हरियाणा पॅटर्न?

    कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत, असे विविध कंत्राटी कामगारांच्या हिताचे निर्णय हरियाणा राज्यात घेतले जातात ती पद्धत आपल्याकडे हरियाणा पॅटर्न म्हणून राबवावी अशी मागणी कामगारांनी केलेली आहे.

  • Raksha Bandhan : दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा

    Raksha Bandhan : दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा

    Raksha bandhan रक्षाबंधन हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो केवळ बंधुत्वाच्या नात्याला साजरा करत नाही, तर प्रेम,  विश्वास,  आणि संरक्षणाची भावना जागृत करतो. आज दिव्यांग बहिणींनी मला राखी बांधली. दिव्यांग भगिनींच्या संरक्षणाचे आमचे कर्तव्य आहे. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे बंधुत्वाच्या धाग्यात दिव्यांग भगिनींचा सन्मान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


    Raksha bandhan आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी शेकडो दिव्यांग बहिणींनी एकत्र येत आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या प्रसंगी भावना व्यक्त करताना ते बोलत होते.


    “भगिनीला सन्मानाने वागवावे, तिच्या हक्कांचे रक्षण करावे, आणि तिच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांग महिलांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागते, परंतु त्यांनी आपल्या मनाची आणि शरीराची ताकद दाखवून आपल्या ध्येयांच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल केली आहे. त्यांचे साहस, आत्मविश्वास, आणि अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती ही उर्जा देणारी आहे. आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, एकमेकांचे रक्षण केले पाहिजे, आणि एकमेकांप्रती प्रेम, आदर, आणि समर्पणाची भावना ठेवली पाहिजे,” हे आजचा सण आपल्याला आठवण करून देतो. यातून आपण त्यांच्यासाठी एक सुरक्षित, समर्थ, आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    राजकारण : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर खासदार धानोरकरांची टीका, लोकसभे सारखं आता विधानसभा निवडणुकीतही तेच होणार


    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधण्यासाठी शेकडो दिव्यांग महिला राजमाता निवासस्थानी एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्यांना राखीचा पवित्र धागा बांधला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही भेटवस्तू देत आपल्या बहिणींचा आशीर्वाद घेतला.

    योगा ग्रुपच्या सदस्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधली राखी

    जिव्हाळा परिवर्तन योगा फाउंडेशन ग्रुपच्या वतीने सकाळी सहा वाजता राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोरील बागेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली तर तुकूम येथील हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थ महिला मंडळ योगा ग्रुपच्या वतीनेही कार्यक्रम आयोजित करून आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचा धागा बांधला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.