Author: Admin

  • CISF jawan died in fire : चंद्रपुरात भीषण अपघात

    CISF jawan died in fire : चंद्रपुरात भीषण अपघात

    CISF jawan dies in fire
    भद्रावती – नागपूर – चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना भरधाव वेगात कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली, कार ने पेट घेतल्याने आगीत होरपळून कार चालकाचा मृत्यू झाला. 8 मार्च ला सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

     

    35 वर्षीय दीपक चरण बघेल असे मृतकाचे नाव आहे, मृतक हा CISF जामनगर गुजरात येथे कार्यरत होता, काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता, दीपक भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा येथे राहत होता. CISF jawan dies in fire

    वाचा – चंद्रपूर लोकसभेचा हा आहे कांग्रेस उमेदवार

    दीपक हा काही दिवसांपूर्वी रजा घेऊन भद्रावती येथे आला होता, मात्र काही कामासाठी तो नागपूरला गेला होता, 8 मार्च ला मध्यरात्री तो परत भद्रावती येथे होता.

     

    पहाटे ची वेळ असल्याने त्याचे चारचाकी वाहन क्रमांक 23BH-6855C हे अतिवेगात होते, भद्रावती जवळ पोहचताच त्याचे वाहनवरील नियंत्रण सुटले, सकाळी 6 वाजता दरम्यान कोंढा नाल्याजवळील पुलाच्या कठड्याला धडक देत वाहन खाली कोसळले. CISF jawan dies in fire

     

    दीपक ने वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेर पडू शकला नाही, तितक्यात शॉर्ट सर्किट झाल्याने कार ने पेट घेतला, यामध्ये दीपक चा आगीत होरपळून मृत्यू झाला.

     

    सकाळी 8 वाजता गावातील नागरिकांना वाहन व अर्धवट जळाळेला मृतदेह आढळल्याने त्यांनी सदर माहिती भद्रावती पोलिसांना दिली, माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

     

    घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला, घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

  • Bhajan Festival in Different Languages : चंद्रपुरात विविध भाषेत भजन महोत्सव

    Bhajan Festival in Different Languages : चंद्रपुरात विविध भाषेत भजन महोत्सव

    Bhajan festival in different languages
    दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा आपण भजन महोत्सव आयोजित केला आहे. दोन दिवस येथे टाळ, मृदंग वाद्यांच्या साथीत ईश्वराचे गुणवर्णन व नामस्मरण केल्या जाणार आहे. यातून धार्मिकता, सांस्कृतिक आणि सामूहिकतेचे वातावरण निर्माण होणार असुन हाच या आयोजना मागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
    यंग चांदा बिग्रेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर येथे आयोजित विविध भाषीय दोन दिवसीय भजन महोत्सवाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त सूर्यकांत खणके, गुरुदेव सेवा समितीचे ग्रामगितचार्य दादाजी नंदनवार, तालुका प्रचार प्रमूख धनराज चौधरी, गुणवंत चंदनखेडे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामीण शहर संघटक मुन्ना जोगी, सविता दंढारे, आशा देशमुख, चंद्रशेखर देशमूख, अस्मिता दोनारकर, सरोज चांदेकर, निलिमा वनकर, वंदना हजारे, गोपी मित्रा, सतनाम सिंह मिर्धा, हेरमन जोसेफ, कार्तिक बोरेवार, विनोद अनंतवार, किशोर बोलमवार, करण नायर, देवा कुंटा, प्रविण कुलटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. Bhajan festival in different languages
    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, यंदा या भजन महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. विविध भाषीय भजन मंडळांना एक मोठे व्यासपीठ आपण या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देत आहोत. मतदार संघात विविध विकासकामे होत असतांना असे आयोजनही आवश्यक आहे. भजन मंडळाना एकत्रित आणण्याचे कामही या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात भजन मंडळांचे योगदान आम्हाला लाभले आहे. श्री माता महाकाली महोत्सवातही भजन मंडळे नेहमी सक्रियरित्या समोर आली आहेत. मनाची एकाग्रता, शब्द, अर्थ, विचार, संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन, भजनातून परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता, आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, बुद्धिचा विकास होते. यातून  आपले दुःख विसरुन  सकारात्मकता निर्माण होते असे ते यावेळी म्हणाले.
    यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन आपण अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आलो आहे. आता भजन महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातही ही संघटना आपले योगदान देत असल्याचे समधान आहे. श्री माता महाकाली महोत्सवा नंतर विविध भाषीय भजन महोत्सवही चंद्रपूरची एक परंपरा बनणार आहे. आणि भजन मंडळांच्या सक्रिय सहभागातून हा महोत्सव भव्य होत चालला असल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर भजन महोत्सवात मराठी, तेलगु, बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी, छत्तीसगडी, गोंडी, मारवाडी यासह अनेक भाषीय 200 हुन अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे. Bhajan festival in different languages
  • Dam incomplete for irrigation : बंधारा बांधकामाचे आदेश निघाले पण….

    Dam incomplete for irrigation : बंधारा बांधकामाचे आदेश निघाले पण….

    गुरू गुरनुले

    Dam incomplete for irrigation मुल तालुका हा धान उत्पादन करणारा तालुका आहे. परंतु शेतीच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात सिंचनाची सोय झालेली नाही. चिखली – मोरवाही भागात गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्याने या साझातील राजोली, डोंगरगाव, मुरमांडी,गोलाभुज, गांगलवाडी, बेलगाटा, चीतेगाव इत्यादी गावे सिंचन सोई पासून वंचित आहेत.

     

    अनेकदा मागणी करूनही शासनाने लक्ष दिले नाही म्हणून केवळ मामा तलावाच्या भरोषावर या भागातील शेतकरी विसंबून आहेत. यासाठी चिखली – मोरवाही परिसरातील शेतकरी बांधवांनी गावाला लागूनच वाहणाऱ्या उमा नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांची महत्वाची मागणी लक्षात घेऊन शासनाकडे मागणी ही मागणी मंजूर करुन चिखली घाटावर एक बंधारा व मोरवाही घाटावर एक बंधारा मंजूर करण्यात आला. Dam incomplete for irrigation

     

    हे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने कोटी रुपये खर्चाची निविदाही काढण्यात आली होती. या कामाचे कार्यारंभ आदेशही मे २०२३ लाच कंत्राटदार सहदेव कंत्रक्षण कंपनी नागपूर यांना देण्यात आले होते. कार्यारंभ आदेश प्राप्त होताच सहदेव कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली असती तर चिखली व मोरवाही बंधाऱ्याच्या पाण्याने हजारो हेक्टर जमिनीला याचा फायदा झाला असता व शेतकऱ्यांना धानाचे उत्पन्न उत्तम झाले असते.

    वाचा – चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार ठरला

    बंधाऱ्याचे काम कंत्राटदाराने केले नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे. पाण्याअभावी खरीप पिके गेलीच आणि यासोबत शेतकऱ्यांना रब्बीपिकेही गहू, चना,लाख, तूर, भाजीपाला,  मका अशी पिके घेता आली नाही. त्यामुळे चिखली मोरवाही गावातील व परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. मृद् व जलसंधारण विभागाने मजुरी दिलेल्या चिखली व मोरवाही बंधारा बांधकामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही कामाचे कार्यारंभ आदेश देऊनही जर कंत्राटदाराने बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले.

     

    याला जबाबदार सहदेव बांधकाम कंपणी नागपूर असून अशा कंपनीचे परवाने तात्काळ रद्द करावे अशी मागणी चिखली मोरवाही येथील शेतकरी व सरपंच नंदू नैताम,माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लहू कडस्कर व उपसरपंच दुर्वास कडस्कर यांनी केली असून शासनाने व मृद्द व जलसंधारण विभागाने संबंधित कंत्राटदाराला त्वरित काम सुरु करण्याची तंबी द्यावी अन्यथा चिखली व मोरवाही येथील शेतकरी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

  • Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित

    Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित

    Chandrapur Lok Sabha Congress Candidate आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या आणि उमेदवारी साठी इच्छुकांची गर्दी उसळू लागली.

    भाजप व कांग्रेस पक्षात उमेदवारीसाठी सध्या जिंकू किंवा मरु असे वातावरण तयार झाले आहे, भाजप पक्षात हंसराज अहिर किंवा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

    खासदार धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी पक्ष श्रेष्ठीने आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते, जर कुटुंबातील राजकीय पदावर असलेल्या नेत्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्या जागेचे तिकीट मिळते, अशी परंपरा कांग्रेस पक्षात आहे. Chandrapur Lok Sabha Congress Candidate

    त्याअनुषंगाने आमदार धानोरकर यांनी तयारी सुद्धा केली मात्र अचानक विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाला चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले.

    तिकिटांची मागणी केल्यावर शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात तसे वातावरण सुद्धा तयार करायला सुरुवात केली, मात्र मुंबई येथे झालेल्या पक्ष श्रेष्ठीच्या बैठकीत आमदार धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा – चंद्रपुरातील VVIP कोण?

    मात्र असे असताना सुद्धा शिवानी वडेट्टीवार यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक आहे असे विधान कायम ठेवले, ज्यामुळे कांग्रेस पक्षात पुन्हा धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुढे आला आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, उद्या जर कांग्रेस पक्षाने लोकसभेवर ओबीसी उमेदवार उभा केल्यास त्याला पाडण्यासाठी पक्षातील व इतर 10 ओबीसी उमेदवार निवडणूक लढायला तयार होतील, याचा फायदा भाजपला नेहमीप्रमाणे मिळेल हे मात्र खरे.

     

    9 मार्च रोजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्ष श्रेष्ठीने मुंबईला बोलाविले आहे, आमदार धानोरकर यांची कांग्रेस पक्षाने उमेदवारी पूर्णतः फायनल केली असल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. आमदार धानोरकर यांचं नाव कांग्रेसच्या पहिल्या यादीत येण्याची शक्यता आहे, विधानसभा निवडणुकीत सुद्धा आमदार धानोरकर यांचं नाव पहिल्या यादीत समाविष्ट होतं.

     

    तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं नसत तर आज जे कांग्रेस पक्षात राजकीय वातावरण तापलेले आहे ते पूर्णतः थंड अवस्थेत दिसलं असतं, काहीही असो येणारी लोकसभा निवडणुक देशात अटीतटीची असणार पण सर्वात जास्त महत्वाची लोकसभा जागा ही चंद्रपूरची असणार हे विशेष, कारण 4 वेळा खासदार व केंद्रात मंत्री असलेले हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ बाळू धानोरकर यांनी चाखायला लावली होती, राज्यात एकमेव कांग्रेस खासदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.

  • Election Victory Machine : बल्लारपूर येथे EVM विरोधात भव्य मोर्चा

    Election Victory Machine : बल्लारपूर येथे EVM विरोधात भव्य मोर्चा

    Election Victory Machine (EVM) देशात लोकशाही वाचवायची असेल तर सरकारने निवडणुका बॅलेट पेपरने घ्यावा, कारण ईव्हीएम ही निवडणूक जिंकण्याची मशीन बनली आहे, अशी प्रतिक्रिया भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी दिली. 7 मार्च ला बल्लारपूर येथे ईव्हीएम विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या नेतृत्वात आज (गुरुवार) ईव्हीएम हटाव अशी मागणी करत मोर्चा काढला. सोबतच शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी व केजी टू पीजी शिक्षण फ्री व्हावे आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद व्हावे या मागण्या सुद्धा करण्यात आल्या.या माेर्चात हजारो नागरिक सहभागी झाले हाेते. हा माेर्चा काटा गेट पासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. Election Victory Machine (EVM)

     

    आंदाेलकांनी आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनास केली.देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार मतदान यंत्राच्या (evm) साहाय्याने आले असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले. मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे. मतदान यंत्राच्या बळावर सत्ताधारी भाजप आज चारशे पारचा नारा देत आहे. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे म्हणाल्या की देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात हे कळण्याचा मार्ग नाही
    शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे.

     

    आज देशातील शेतकरी विद्यार्थी महिला शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सगळे आंदोलन करून राहिले आहेत पण या देशातल्या सरकारला कोणाचीही सूध घेण्याची काळजी नाहीये किंबहुना यांच्या शोषण करण्याचे ,शेकडो शेतकऱ्यांचे प्राण त्यांनी घेतले ,शिक्षकांवर लाठी हल्ला करतात विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करतात कारण त्यांना आता त्यांच्या मताची गरज राहिली नाही कारण त्यांच्या विरोधात जरी मतदान झाले तरी ते सत्ताधारी ईव्हीएम च्या माध्यमातून स्वतःकडे वळते करतात आणि म्हणून देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या बद्दल सरकारला कुठलीही आस्था नाही त्यांना फक्त त्यांच्या भांडवलदार मित्रांच्या घशामध्ये या देशातील अरबोची संपत्ती टाकायची आहे आणि त्यासाठी ईव्हीएम हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र ठरलेले आहे म्हणून ते हटले पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे.

    लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर लोकांना त्यांचा मतदानाचा खरा अधिकार प्राप्त झाला पाहिजे आणि हा अधिकार केवळ बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मिळू शकतो.
    यामुळे ईव्हीएम बंद करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

     

    मोर्चाला ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई हजारे ,चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे, बल्लारशाचे भास्कर भगत, प्रा. विजय लोणबले, रितेश बोरकर यांनी सुद्धा संबोधित केले, या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक उंचावत, घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

     

    सोबतच जवळपास 28 हजार नागरिकांनी स्वतंत्ररीत्या स्वाक्षरी केलेले 28 हजारो निवेदने यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले मोर्चाच्या यशस्वीतेसाठी भूमि पुत्र ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विवेक खुठेमाटे, विजय मुसळे, विश्वास निमसरकर, ताहीर हुसेन, अनिस खान, रितेश बोरकर, राहुल मोहरले, नितेश म्याकलवार, राहुल दहिवले, अमोल काकडे, सतीश नेवारे, श्रीकांत शेंडे, शंकर काळे, श्रीनिवास मासे, शितलताई हस्ते, संगीताताई देठे, रेखाताई कोरे, रक्षा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

  • Woman Talathi Arrested While Accepting Bribe : 4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    Woman Talathi Arrested While Accepting Bribe : 4 हजाराची लाच घेताना महिला तलाठी अडकल्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    Woman Talathi arrested while accepting bribe

    चंद्रपूर – Woman Talathi arrested while accepting bribe महिला दिनाच्या पूर्व संध्येला चंद्रपुरात महिला तलाठी ला 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

    सदर प्रकरणी तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी मौजा सिदूर पिपरी येथील शेती पत्नी व मुलांच्या नावे बक्षिस पत्र करून दिले होते, बक्षीस पत्राच्या आधारे शेतीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालयात जात तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडूंरवार यांच्याकडे अर्ज केला, काही दिवस झाल्यावर अर्जाचे काय झाले याबाबत फिर्यादी हे तलाठी कार्यालयात गेले, त्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी फेरफार व सातबारा तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.

     

    फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली, 7 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सापळा रचला, त्यावेळी तलाठी प्रणाली तुडूंरवार यांनी तडजोडीअंती 4 हजाराची लाच मागितली. Woman Talathi arrested while accepting bribe

     

    तलाठी कार्यालय नागाळा येथे प्रणाली तुडूंरवार यांना 4 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
    तलाठी तुडूंरवार यांना शासनाची सेवा करताना अंदाजे 40 हजार रुपये पगार मिळतो तरी त्यांनी शेतकऱ्याला 4 हजाराची लाच मागितली हे विशेष.

    सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.

  • Illegal Liquor Smuggling in Chandrapur : चंद्रपुरात अवैध दारू तस्करी

    Illegal Liquor Smuggling in Chandrapur : चंद्रपुरात अवैध दारू तस्करी

    चंद्रपूर – Illegal liquor smuggling in Chandrapur अवैध मद्य विक्री व निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने आता धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

     

    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

     

    7 मार्च ला सकाळी 10 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातून चंद्रपूर मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक होणार आहे, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला. Illegal Liquor Smuggling in Chandrapur

     

    त्यावेळी बोलेरो पिकअप वाहन संशयास्पद येत असताना दिसले, पोलिसांनी वाहनाला थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये गोवा ब्रँड दारूने भरलेल्या 180 एमएल च्या 39 पेट्या, पिकअप वाहन व मोबाईल सहित तब्बल 10 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर येथील वाहन चालक 21 वर्षीय फारुख शेख मुमताज शेख, 23 वर्षीय तुषार संतोष नेहारे यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक करीत बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

     

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे व सायबर गुन्हे शाखेचे राहुल पोंदे यांनी केली.

  • Chandrapur Lok Sabha India Alliance in danger : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला धोका – सुनील मुसळे

    Chandrapur Lok Sabha India Alliance in danger : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला धोका – सुनील मुसळे

    Chandrapur LokSabha India Alliance in danger

    संविधान विरोधी भाजपाला सत्तेपासून दूर करण्याकरीता आम आदमी पार्टी इंडिया आघाडीत सहभागी झाली आहे.  मात्र कॉंग्रेसकडून राजकारणाचा अनुभव नसलेल्यांना लोकसभा उमेदवारी देत असेल तर, आम आदमी पार्टी याचा विरोध करेल आणि ईतर घटक पक्षांना सोबत घेऊन चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी दाखल करेल असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

     

    कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मागीतली आहे.  विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते असले तरी, भाजपाच्या विरोधात मिळमिळीत भूमिका घेत असल्यांचे दोनही अधिवेशनातून स्पष्ट झाले आहे.  भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात सहभागी होत असल्याचे जाहीररित्या सांगीतले आहे. Chandrapur Lok Sabha India Alliance in danger

    विजय वडेट्टीवार यांनी त्या वक्तव्याबाबत ब्र सुद्धा काढला नाही.  विजय वडेट्टीवार हे भाजपात प्रवेश करण्यांच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत.  अशा परिस्थितीत भाजपाच्या प्रेमात असलेल्या विजय वडेट्टीवारांच्या मुलीला कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यास, भविष्यात कॉंग्रेसला व इंडिया आघाडीला निश्चितच धोका निर्माण होवू शकतो.

    चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात सध्या मोदी विरोधात लाट आहे, इंडिया आघाडीला चांगली संधी आहे. अशा परिस्थितीत भाजपाला लाभ व्हावा यासाठी शिवाणी वडेट्टीवार सारख्या कमजोर उमेदवारांस कॉंग्रेसने निवडणूकीत उभे केल्यास, आम आदमी पार्टी याचा ताकदीने विरोध करेल असेही मुसळे यांनी म्हटले आहे.

    या अगोदर आम आदमी पार्टीने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती त्यात दोन लाखा पेक्षा अधिकची मते आम आदमी पक्षाला मिळाली होती. आम आदमी पार्टी चा झाडू हा घराघरात पोहोचला आहे. काँग्रेसने वेळीच सावध होऊन जिंकणारा उमेदवार द्यावा व भाजपाला छुपा पाठिंबा देने बंद करावे असेही प्रसिद्धी पत्रकात सुनील मुसळे यांनी म्हटले आहे.

  • Shocking incident in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना

    Shocking incident in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना

    Shocking incident in Chandrapur district चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी शिवारात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे, आईने 14 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलत स्वतः आत्महत्या केली.

    6 मार्च रोजी घडलेली ही घटना नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे, 35 वर्षीय दर्शना दीपक पेटकर, 14 वर्षीय समिक्षा दीपक पेटकर असे मृत आई-मुलीचे नाव आहे. Shocking incident in Chandrapur district

    मूल तालुक्यातील दीपक पेटकर यांचं शेत खेडी शिवारात आहे, दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास आई दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते.

    पेटकर यांच्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्याच्या शेतातील विहिरीत दर्शनाने 14 वर्षीय मुलीला ढकलले, त्यानंतर दर्शनाने मुलगा सोहन ला सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सोहन ने हात झटकत तिथून पळ काढला.

    मुलगा गावात गेल्याने दर्शनाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली, गावातील नागरिकांना सोहन ने ही बाब सांगितल्यावर ते तात्काळ शेताकडे आले, मात्र तोपर्यंत दर्शना व समिक्षाचा मृत्यू झाला होता.

    गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. व शवविच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

    मृतक दर्शना ही किडनीच्या आजाराने ग्रस्त होती, काही महिन्यांपूर्वी दर्शना वर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या यामागील कारण अद्याप कळले नाही, घटनेचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

  • Kharra Shortage in Chandrapur District : चंद्रपुर जिल्ह्यात खर्र्याचा शॉर्टेज

    Kharra Shortage in Chandrapur District : चंद्रपुर जिल्ह्यात खर्र्याचा शॉर्टेज

    Kharra shortage in chandrapur district – चंद्रपूर जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन रुजू होताच त्यांनी अवैध धंद्यावर प्रतिबंध लावण्यास सुरूवात केली आहे.

    वर्ष 2012 पासून राज्यात शासनाने सुगंधित तंबाखू प्रतिबंधित केला होता, मात्र त्यानंतर आजही कॅन्सरला निमंत्रण देणारा सुगंधित तंबाखू खुलेआम मिळत आहे. Kharra Shortage in Chandrapur District

    सध्या जिल्ह्यात पोलिसांनी सुगंधित तंबाखू विरोधात मोहीम हाती घेतली आहे, त्यामुळे खर्रा शौकिनांचे चांगलेच धाबे दणाणले आहे, एकेकाळी सहज उपलब्ध होणारा खर्रा चंद्रपूर जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे.

     

    विदर्भात सर्वात जास्त खर्रा शौकीन आहे, सकाळ, दुपार व सायंकाळ या तिन्ही वेळेत नागरिकांच्या तोंडात कॅन्सर सारख्या भयावह आजाराला निमंत्रण देणारा खर्रा असतो, सुगंधित तंबाखू मिक्स करीत हा खर्रा तयार केला जातो, मात्र आता खर्र्यात सुगंधित तंबाखूचे मिश्रण करण्यासाठी पान ठेला धारकांना कमालीची मेहनत करावी लागत आहे.

    सध्या पान ठेला धारकांवर कारवाई केल्या जात आहे, मात्र या सुगंधित तंबाखूचे केंद्र असलेलं बल्लारपूर येथील जयसुख वर पोलीस प्रशासनातर्फे ठोस कारवाई केल्या जात नसल्याने अजूनही शंका कुशंका निर्माण होत आहे.

    बल्लारपूर नंतर चंद्रपुरातील बिनबा गेट येथील वसीम हा सुद्धा सुगंधित तंबाखू तस्करीचे काम करतो, यावर सुद्धा पोलिसांनी ठोस अशी कारवाई केली नाही, सध्या सुगंधित तंबाखूचा साठा यांच्याकडे जमा जरी असल्यास तो माल पान ठेला धारकांपर्यंत पोहचत नाही आहे. Kharra Shortage in Chandrapur District

    पोलिसांच्या धडक कारवाईमुळे पान ठेला धारक आता कमालीचे दहशतीत आले आहे, आमच्यावर कारवाई का करता हे तस्करी करतात त्यांच्यावर कारवाई करा अशी चर्चा आता जिल्ह्यात पान ठेला धारक करीत आहे.

     

    पूर्वी 5, नंतर 10 तर आता 30 रुपयांचा 1 खर्रा मिळतो, सुगंधित तंबाखू नसल्याने आता हा खर्रा 50 रुपयांपर्यंत पोहचला आहे, पोलीस अधीक्षकांनी मोठ्या माश्यावर कारवाई केल्यास अनेक अनुत्तरित प्रश्नांचा उलगडा त्या माध्यमातून होणार.

     

    कन्फेक्शनरी च्या नावाखाली हे दोन्ही विक्रेते बेधडक जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी करीत आहे, कारण त्यांना राजकीय आश्रय प्राप्त आहे.

    सध्या जिल्ह्यातील सर्व पान ठेले हे बंद अवस्थेत आहे.

    या तस्करीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिक करीत आहे, नाहीतर काही दिवस हे धंदे बंद करीत पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.