Author: Admin

  • Record of MLA Kishore Jorgewar : मतदारसंघात संघात आमदार जोरगेवार यांचा विक्रम

    Record of MLA Kishore Jorgewar : मतदारसंघात संघात आमदार जोरगेवार यांचा विक्रम

    Record of MLA Kishore Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून विविध विभागाच्या निधी अंतर्गत मंजुर मतदार संघातील 150 कोटी रुपयांच्या 192 विकासकामांच्या भूमिपूजनाला आज सुरवात झाली असून आज ८८ कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व भुमिपूजनाचा मान आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. या विकासकामांमुळे नागरिकांच्या सोयी सुविधेत भर पडणार आहे. सदर भूमिपूजन सोहळा पुढील चार दिवस चालणार असून हा भूमिपूजनाचा विक्रम असल्याचे बोलल्या जात आहे.

     

          चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचुन आणला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागात विकासकामे केल्या जात आहे. मतदार संघात अभ्यासिका आणि समाज भवन तयार करण्यावर आमदार किशोर जोरगेवार यांचा भर राहिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघात 11 अभ्यासिका तयार केल्या जात आहे. तर ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात समाज भवनांचे काम सुरु आहे. दरम्यान विविध विभागाच्या निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. या निधीतुन ग्रामीण व शहरी भागातील 192 विकास कामे केल्या जाणार आहे. आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी सदर कामांचे भुमिपूजन करण्यात आले आहे. हा भुमिपूजनाचा विक्रम असुन या कामांमुळे नागरिकांच्या सोयी सुविधेत भर पडणार आहे. Record of MLA Kishore Jorgewar

     

        चंद्रपूरच्या जनतेने अपक्ष आमदार म्हणून देशात सर्वाधिक मताधिक्य देत मला निवडून पाठविले आहे. स्वाभाविकच त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत. त्यामुळे नागरिकांना हवे त्या कामाला प्राधाण्य देण्याचा प्रयत्न आपला राहिला आहे. माझा कोणता पक्ष नाही. मात्र चंद्रपूरची जनता आणि कार्यकर्ते हा माझा पक्ष आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेल्या 192 विकासकामांचे भुमिपूजन कार्यकर्त्यांच्या हस्ते करत आहोत. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभागातील समस्या आमच्या प्रयत्न पोहचत असतात. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याचे ते यावेळी म्हणाले. Record of MLA Kishore Jorgewar

     

    आपण अपक्ष आमदार म्हणून निवडून पाठविले आहे. मात्र अपक्ष असुनही आपण चंद्रपूरच्या विकासासाठी कधिही निधी कमी पडू दिला नाही. आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. चंद्रपूरात सुरु झालेला विकासाचा झंझावात थांबणारा नाही. पूढेही आपण नागरिकांना अपेक्षित असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ असेही ते यावेळी म्हणाले.

     

      यावेळी बाबुपेठ, जुनोना चौक, भिवापूर, पठाणपुरा, जलगनर, तुकुम, वडगाव, रहमत नगर, मोहम्मदीया नगर, बंगाली कॅम्प, इंदिरा नगर, संजय नगर, दाताडा, वृंदावन नगर, तुलसी नगर, राष्ट्रवादी नगर, येरूर, घुघुस  यासह शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Nirbhay Bano Sabha in Chandrapur : 14 मार्च ला चंद्रपुरात

    Nirbhay Bano Sabha in Chandrapur : 14 मार्च ला चंद्रपुरात

    Nirbhay Bano Sabha in Chandrapur देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे वक्ते 14 मार्च ला चंद्रपुरात येत आहे, गुरुवारी चंद्रपुरात निर्भय बनो सभेचे आयोजन आम्ही निर्भय चंद्रपूरकर तर्फे करण्यात आले आहे.

     

    शहरातील नागपूर मार्गावर असणारे न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते , विचारवंत विश्वंभर चौधरी व कायदे तज्ञ, मानवाधिकार विश्लेषक ऍड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहे. Nirbhay Bano Sabha in Chandrapur

     

    वाचा – पोलिसांच्या कारवाईने कुणाचे धाबे दणाणले?

     

    देशात व राज्यात सुरू असलेल्या परिस्थिती वर अचूक मार्गदर्शन यावेळी हे दोन्ही वक्ते करणार आहे, सध्या राज्यात महापुरुषांचे होणारे अपमान, मीडियाची गळचेपी, जनतेच्या पैशातून सत्ताधारी करीत असलेली लूट, संवैधानिक संस्थेचा वापर, विरोधकांची मुस्कटदाबी, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, निवडणुकीत EVM चा वापर थांबविण्यासाठी, विद्वेष आधारित सांप्रदायिक ध्रुवीकरण अश्या विविध विषयांवर निर्भय बनो सभेत मार्गदर्शन होणार आहे. Nirbhay Bano Sabha in Chandrapur

     

    सध्या राज्यात निर्भय बनो सभेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, सभा होऊ नये यासाठी सत्ताधारी दबाव टाकत आहे, काही ठिकाणी प्रमुख वक्ते निखिल वागळे यांच्यावर हल्ला सुद्धा करण्यात आला होता, मात्र त्यानंतर सुद्धा सर्व संकटांना सामोरे जात आज राज्यात या सभा निर्भयपणे पार पडत आहे.

     

    वाचा – सोमवारी चंद्रपुरात बॉटनिकल गार्डनचे उदघाटन

     

    चंद्रपुरातील निर्भय जनतेने या सभेत येत आपली निर्भयता दाखवीत हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही निर्भय चंद्रपूरकर च्या वतीने करण्यात आले आहे.

  • Illegal minor mineral mining : धाबे दणाणले पण कुणाचे?

    Illegal minor mineral mining : धाबे दणाणले पण कुणाचे?

    Illegal minor mineral mining कोरपना – गौण खनिजाची अवैध रित्या उत्खनन करून मालामाल होण्याची जणू स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे. रॉयल्टी कमीची आणि उत्खनन जास्तीचे असा फंडा वापरून शासनाचा सर्रास महसुल बुडवून व्यवसायीक मालामाल होत आहेत.

     

     

    शुक्रवारी (8 मार्च) रात्री साडेकराच्या सुमारास जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील देवघाटावर नाल्यावर अवैद्य मुरुमाची चोरी होत असताना पोलिस व महसल विभागाने धाड टाकली. या संयुक्त कारवाईत 12 हायवा ट्रक पकडण्यात आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेले पाच हायवा ट्रक वरच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. Illegal minor mineral mining

     

    वर्षभरापासून राजुरा – गोविंदपुर (353 बी) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट जीआरआयएल (gril) या कंपनीला मिळाले आहे. रस्ता तयार करण्याकरीता कंपनीला गौण खनिजाची म्हणजे मुरुम माती व रेतीची आवश्यकता आहे.

     

    वाचा – चंद्रपुरात 24 लाख 75 हजारांची रोकड जप्त

    गौण खनिजाला कोरपना तालुक्यातील अंमलनाला, देवघाटनाला, पकडीगुड्डम, आदी ठिकाणावरून काढण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र कंपनीने परवानगी पेक्षा अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन करून बारमाही वाहणारे जिवंत नाले पोखरून काढले आहेत. Illegal minor mineral mining

     

    संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार वाढल्याने गौण खनिज तस्करांचे फावत आहे. चोरी प्रकरणात अनेक तक्रारी झाल्या, परंतु प्रशासनाने छोट्या मोठ्या कारवाईचा फार्स दाखविला. दबावापोटी कारवाईला ठेंगा दाखविल्याने गौण खनिजाची तस्करी सर्रास सुरूच आहे.

     

    नव्यानेच रूजू झालेले पोलीस अधिक्षक ममुका सुदर्शन यांना तक्रारी प्राप्त होताच त्यांनी पोलिस व महसूल विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस अधिक्षकाच्या निर्देशानुसार शुक्रवारी पोलिस व महसूल विभागाने कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्यावर मुरूमाची तस्करी होत असताना धाड टाकली. या कारवाईत 12 हायवा ट्रक घटणास्थळी पकडण्यात आले.

     

    राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरीता जीआरआयएल कंपनीला नाल्यावरून मुरुम माती उत्खनना परवानगी मार्च २४ पर्यंत मिळालेली आहे. या कालावधीत कंपनीला ५३ हजार ब्रासचे उत्खनन करायचे होते. परंतु वाजवीपेक्षाही जास्तीचे उत्खनन करून नालाच पोखरून टाकला आहे. 53 हजाराच्या ऐवजी लाखों ब्रास अवैद्यरित्या दिवस रात्र उत्खनन करण्यात आले आहे.

     

    मंजुरी नुसार 30 सप्टेबर पर्यंतच 52 हजार 500 ब्रास उत्खनन झाले आहे. त्यानंतरही मागील चार महिण्यापासून 24 तास गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला चुना लावण्यात आला आहे. रात्री गौण खनिजाची वाहतूक करता येत नाही परंतू अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा वाहतुकीचा गोरखधंदा दिवस रात्र सुरूच आहे.

     

    पोलिस अधिक्षकांच्या निर्देशानंतर शुक्रवारी रात्री अकराचे सुमारास तहसिलदार व्हटकर व ठाणेदार एकाडे यांनी कोरपणा तालुक्यातील देवघाट नाल्यावर ताफ्यासह धाड टाकली. घटनास्थळावर पोकलेन व हायड्रा मशीन तसेच वाहतूक होत असलेले 12 हायवा आढळून आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेले 5 हायवावरच कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित खाली हायवा व मशीन सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र खाली हायवा आणि उत्खनन करणारे मशीन का सोडून देण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे.

    राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेले कोरपना, या तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठा जोर आहे, विशेष म्हणजे कोरपना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकाडे यांच्यावर अनेकांनी गंभीर आरोप केले, विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सुद्धा करण्यात आली आहे, इतके दिवस ग्रील कंपनीने अवैध गौण खनिजाचे उत्खनन केले ते कुणाच्या आशीर्वादाने? स्थानिक प्रशासनाचा सहभाग असल्याशिवाय बाहेरच्या कंपनीची हिंमत वाढली कशी?  प्रशासनाला चुना लावणारे प्रशासनातील अधिकारीच आहे.

     

    पोलीस प्रशासनाला 5 हायवा ट्रक वर कारवाई केली तर उर्वरित हायवा ट्रक का सोडले ? अशी विचारणा केल्यावर त्याबाबत उत्तर महसूल प्रशासन देणार असे सांगण्यात आले हे विशेष.. एकंदरीत अनेक दिवसांनी जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई केल्यावर प्रशासनाचेच धाबे दणाणले हे वाक्य प्रयोग केल्यास फारकत नाही.

  • Leader of Opposition Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांच्यामुळे त्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत

    Leader of Opposition Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांच्यामुळे त्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत

    Leader of Opposition Vijay Wadettiwar सावली जवळ राष्ट्रीय महामार्गावरील एका रस्ते अपघातात विहीरगांव येथील तीन  व्यक्तींचा अपघात मागील 22 जानेवारी रोजी झाला होता.  त्यामध्ये  शोभा नामदेव धारणे, यांचा घटना स्थळी, व चुलत भाऊ धर्मराज पांडुरंग गायकवाड यांचा नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर तिसरा भाचा निखील हीवराज गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता. अपघाती मृत्युने त्यामागे असलेल्या कुटुंबातील सदस्यांची हताहत लक्षात घेता ही बातमी गिरगाव येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेता ना.विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत पोहचवली.
    यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न करताअपघात करणा-या वाहन मालकास संपर्क साधून अपघातात मृत पावलेल्या व जखमी झालेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थिती बाबत जाण करून देऊन सदर अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी सुचना दिल्या. यावर वाहन मालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मृतदांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर अपघातात जखमी याला एक लाख रुपये देण्याची कबूल केले. Leader of Opposition Vijay Wadettiwar
    दिनांक 8 मार्च 2023 रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे सावली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना संबंधित ट्रक मालक यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मृतांच्या कुटुंबियांना प्रती दोन लाख रुपयांचा धनादेश  देण्यात आला. तसेच जखमी असलेल्या युवकाच्या कुटुंबीयास एक लक्ष रुपये देण्याचे कबूल करण्यात केलें.
    यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती दिनेश चीटनुरवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, महिला अध्यक्षा उषा भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निखिल सुरुरमवार, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, पत्रकार दिलीप फुलबांदे , तथा बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • Domestic Violence in Chandrapur : आमदार प्रतिभा धानोरकर यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

    Domestic Violence in Chandrapur : आमदार प्रतिभा धानोरकर यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

    Domestic violence in chandrapur चंद्रपूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून महारष्ट्रात ओळखला जातो. परंतू अलिकडे सतत होत असलेल्या हत्यांमुळे नविन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करण्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृह मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

    मागील दोन महिन्यांच्या काळात विविध कारणातून जवळपास 15 जणांच्या हत्या झाल्या आहेत. यापैकी काही गुन्हे हे कौटुंबिक वादातून तर इतर गुन्हे वेगवेगळ्या कारणातून झाले आहे. कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन मधे समुपदेशन कक्ष उभारल्यास होणाऱ्या घटना टाळता येईल, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता अवैध धंद्यावर आळा बसविणे गरजेचे आहे. कारण यातूनही अनेक गुन्हे घडतांना दिसुन येत आहे. Domestic violence in chandrapur

    युवकांना देखील गुन्ह्यापासून दुर करण्याकरीता योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाविद्यालयीन स्तरावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून युवकांना योग्य असे मार्गदर्शन झाल्यास भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालता येईल यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी महीला सुरक्षतेच्या संदर्भाने देखील चर्चा करणार असल्याचे सांगितले.

  • Marathi movie poster launch : कांचन अधिकारी यांचा नवा मराठी चित्रपट “जन्मऋण”

    Marathi movie poster launch : कांचन अधिकारी यांचा नवा मराठी चित्रपट “जन्मऋण”

    Marathi movie poster launch मुंबई: अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी  ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. 

     

    ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा अष्टपैलू अभिनय पाहण्याची पर्वणी २२ मार्च पासून पुन्हा एकदा या चित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. Marathi movie poster launch

     

    या चित्रपटाविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “कांचन अधिकारी यांच्या या चित्रपटाने अत्यंत वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा लाजवाब अभिनय, उत्कृष्ट सामाजिक आशयाच्या कथेसोबत कोकणाचे मोहक रूप प्रेक्षकांनी या चित्रपटातून नक्की अनुभवावे” Marathi movie poster launch

     

    अंधकारमय शून्यात हरवलेली सुकन्या कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरील आर्तता आणि शांत, संयमी, सारं काही निसटून गेल्याने कष्टी झालेल्या मनोज जोशींच्या चेहऱ्यावरील भाव चित्रपटातील आशयाची खोली दर्शवतात. नव्या क्षितिजाकडे वाटचाल करण्यासाठी निघालेला अभिनेता तुषार आरकेच्या चेहऱ्यावरील आनंद कुतूहल जागवतो. तांबडं फुटलेलं आकाश आणि त्यात झेपावलेलं विमान चित्रपटाच्या गहिऱ्या आशयाची ओळख करून देते.

     

    पुसटश्या काळ्या गोल कडेच्या आत लाल गडद रंगावर सफेद ‘जन्मऋण’चा लोगो भलताच उठावदार दिसत असून तो आईवडिलांच्या नितळ शांत संयमी प्रेमाचे प्रतीक वाटतो. सुंदर खेड्यातील परिसर-घरे यातील स्थळकाळाची खूणगाठ करून देतात.

     

    आई वडील मुलांना जन्म देतात व मुलं मोठी झाली तरी पालकांच मुलांवरच प्रेम तसंच असतं अगदी त्यांच्या म्हातारपणी सुद्धा. पण मुलांच्या बाबतीत मात्र वेगळेपणा दिसून येतो. आई बापाची मुलांना अडगळ होऊन जाते व मग सुरू होते ती पालकांची शोकांतिका. मग अशा अवस्थेत पालकांनी काळाची पावलं ओळखून अगोदरच कोणत्या खबरदाऱ्या घ्यायच्या? आपल्या मालमत्तेचे रक्षण आपल्या अंतकाळापर्यंत कसे करायचे? मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यात होणारे बदल कसे ओळखायचे?  नातेसंबंधाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारा चित्रपट ‘जन्मॠण’ घेऊन येत आहेत लेखिका, निर्माती, दिग्दर्शक कांचन अधिकारी.

     

    या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे.

     

    जन्म ऋणचे कथा – संवाद कांचन अधिकारी, मंजुश्री गोखले यांचे असून डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून अखंड कोंकणचे सौन्दर्य खुलले आहे. संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा ह्रदयाला थेट भिडते. २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.

  • Botanical Garden Opening Chandrapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

    Botanical Garden Opening Chandrapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

    Botanical Garden Opening Chandrapur चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथे 11 मार्च सोमवारी बॉटनिकल गार्डन चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, त्याकरिता प्रशासनाने सदर मार्गावरून अवजड वाहनाचा मार्ग बदलला आहे.

     

    चंद्रपुरात अनेक वर्षांपासून निर्माण होणाऱ्या आधुनिक बॉटनिकल गार्डनचे काम पूर्णत्वास आल्याने 11 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. Botanical Garden Opening Chandrapur

     

    चंद्रपूर ते बल्लारपूर या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक 11 मार्च रोजी पूर्णतः बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे.

    अवश्य वाचा – चंद्रपुरात येणार उष्णतेची लाट

     

    मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी वाहन चालकाना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असेही यावेळी सूचित केले आहे.

    11 मार्च ला मुख्यमंत्री शिंदे सह इतर मंत्र्यांची उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद राहतील, सदर आदेशाची अंमलबजावणी ही 11 मार्च ला दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहतील.

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आपल्या अधिकारातील मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) व मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 115 चा वापर करीत सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत रहावी यासाठी वापर केला आहे.

     

    अवजड वाहन चालकांचा हा असेल पर्यायी मार्ग

     

    वरोरा भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा किंवा गडचांदूर कडे जाण्यासाठी पडोली-धानोरा फाटा भोयगाव मार्गाचा अवलंब करावा. गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडे येण्यासाठी भोयगाव-धानोरा फाटा -पडोली या मार्गाचा वापर करावा. गोंडपीपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मूल जाण्यासाठी येनबोडी-पोम्भूर्णा या मार्गाचा वापर करावा, चंद्रपूर व मुल कडून बल्लारपूर, गोंडपीपरी व राजुरा जाण्याकरिता पोम्भूर्णा मार्गाचा अवलंब करावा असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काढले आहे.

    त्यानुसार बामणी फाटा बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश गौडा यांनी दिले आहे.

  • Heatwave in chandrapur district : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी काय?

    Heatwave in chandrapur district : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी काय?

    Heatwave in chandrapur district मार्च ते 15 जून 2024 पर्यंतच्या कालावधीत संभाव्य उष्मालाटेच्या सौमीकरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मालाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

     

    आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयांमध्ये कुल वॉर्ड तयार करावे. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले. Heatwave in chandrapur district

     

    संभाव्य उष्णतेच्या लाटेसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात.

     

    काय करावे : तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर. एस., घरी बनवलेली लस्सी,  तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा. Heatwave in chandrapur district

    अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

    काय करू नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नये.

  • LCB big action in Chandrapur : लोकसभा निवडणुकीची चाहूल आणि चंद्रपुरात 24 लाख 75 हजार जप्त

    LCB big action in Chandrapur : लोकसभा निवडणुकीची चाहूल आणि चंद्रपुरात 24 लाख 75 हजार जप्त

    LCB big action in Chandrapur देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला पध्दतीने पैश्याची देवाण-घेवाण करण्याचे प्रकार वाढत असतात, या सर्व अवैध प्रकारावर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस सजग असून त्यांनी आपलं नेटवर्कही मजबूत केलं आहे.

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करीत 24 लाख 75 हजारांची रोकड जप्त केली आहे, एक इसम दुचाकीवर बॅग मध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती 7 मार्च ला स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. LCB big action in Chandrapur

     

    माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला, दुपारच्या सुमारास एक इसम पाठीवर बॅग लटकवून दुचाकीवर येत होता, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला थांबवित विचारपूस केली असता त्याने आपले नाव 34 वर्षीय ज्ञानेश्वर रमेश चनंदबटवे असे सांगितले, त्याच्याजवळ असलेली काळ्या रंगाची बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये 24 लाख 75 हजारांची रोकड पोलिसांना आढळली. LCB big action in Chandrapur

     

    ज्यामध्ये 500 रुपयांच्या 4 हजार 652 नोटा एकूण 22 लाख 26 हजार, 200 रुपयांच्या 745 नोटा एकूण 1 लाख 49 हजार रुपये असे एकूण 24 लाख 75 हजार रुपयांची रोकड मिळून आली.

     

    इतक्या मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम आढळल्याने पोलिसांना सदर रक्कम चोरी किंवा अवैध मार्गाने प्राप्त केली असा संशय आल्याने सदर रोख रक्कम कलम 41(1) ड अंतर्गत ताब्यात घेण्यात आली असून ज्ञानेश्वर चंदनबटवे याना सोडण्यात आले आहे.

     

    इतक्या मोठ्या प्रमाणावरील नगदी कोणत्या मार्गाने व कुठून आली याबाबत ज्ञानेश्वर चंदनबटवे यांना पुरावा सादर करण्यास सांगितले आहे, ज्ञानेश्वर यांनी सांगितले की माझें नंदनवन सदभावना नगर प्लॉट येथे आयुर्वेदिक दुकान आहे, त्याचे हे पैसे आहे, मात्र त्याबाबत त्यांच्याकडे पुरावे नव्हते.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, संतोष यलपुलवार, नितीन रायपुरे यांनी केली असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले करीत आहे.

  • Lok Sabha Election Congress Candidate List : कांग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

    Lok Sabha Election Congress Candidate List : कांग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

    Lok Sabha Election Congress Candidate List लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, आता कांग्रेस पक्षाने 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

     

    कांग्रेसने आपल्या X या समाजमाध्यमावरील अधिकृत खात्यावर यादी जाहीर केली आहे, सदर यादी मध्ये राहुल गांधी, शशी थरूर यांच्या नावाचा समावेश आहे. Lok Sabha Election Congress Candidate List

    वाचा – चंद्रपुरात CISF जवानांचा आगीत होरपळून मृत्यू

     

    15 उमेदवार जनरल कॅटेगरी, 20 उमेदवार sc, st, ओबीसी व अल्पसंख्याक समाजातील, 50 वर्षाखालील 12 उमेदवार, 8 उमेदवार 50 ते 60 वर्ष वयोगटातील, 7 उमेदवार हे 71 ते 75 वयोगटातील आहे.

     

    या राज्यातील उमेदवारांचा आहे समावेश

    छत्तीसगड राज्यातील 6 उमेदवार, 7 कर्नाटक, 16 केरळ, लक्षदीप 1, मेघालय 2, नागालँड 1, सिक्कीम 1, त्रिपुरा 1 व तेलंगणा राज्यातील 4 उमेदवारांचा समावेश आहे.

    Congress candidate lok sabha

    महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या जागेवर तिढा कायम असल्याने राज्यातील उमेदवार अजून ठरले नाही, दुसऱ्या यादीत महाराष्ट्र राज्यातील उमेदवार यांचा समावेश असणार अशी माहिती आहे.