Author: Admin

  • Chandrapur shivsena thackeray : बल्लारपूर येथील असंख्य युवकांच्या हाती शिवबंधन

    Chandrapur shivsena thackeray : बल्लारपूर येथील असंख्य युवकांच्या हाती शिवबंधन

    Chandrapur shivsena thackeray चंद्रपूर जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे.

     

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश केला. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांचा पक्षप्रवेश प्रस्थापित पक्षांना धक्का मानला जात आहे. Chandrapur shivsena thackeray

    हे अवश्य वाचा – तेली समाजाचा आमदार धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

    12 एप्रिलला बल्लारपूर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर युवासेना विस्तारक रियाज पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील असंख्य युवकांनी हाती शिवबंधन बांधले. Chandrapur shivsena thackeray

     

    गोरगरिबांचे काम कसे होणार याकडे सर्वांनी लक्ष देत पक्षवाढी कडे युवकांनी लक्ष द्यावे असा संदेश संदीप गिर्हे यांनी दिला. Chandrapur shivsena thackeray

     

    आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे बल्लारपूर तालुका प्रमुख नीरज यादव, शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे, सागर राऊत, बाबा साहू, प्रशांत मेश्राम व सोनू श्रीवास यांची उपस्थिती होती.

  • Teli community support for Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांना तेली समाजाने दिला पाठिंबा

    Teli community support for Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांना तेली समाजाने दिला पाठिंबा

    Teli community support for Dhanorkar चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी पुढे आलेली आहे, आज 12 एप्रिल रोजी मातोश्री विद्यालयात तेली समाज जिल्हा तर्फे सामाजिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या मेळाव्यात तेली समाजाने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा दिला, यावेळी पाठिंब्याचे पत्र कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना देण्यात आले. Teli community support for Dhanorkar

    हे ही वाचा – स्लॅब झाले हाऊसफुल्ल, प्रतिभा धानोरकर यांची प्रचारसभा

    आयोजित मेळाव्यात विदर्भ तेली समाज महासंघाचे धनराज मुंगळे, तेली युवक मंडळ, तेली समाज बहुउद्देशीय संस्था, संताजी स्नेही मंडळ भद्रावती, हनुमान मंदिर पंचतेली समाज जटपूरा, संताजी स्नेही मंडळ सिंदेवाही, संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूर, तेली युवक मंडळ राजुरा, श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज विसापूर, श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी, श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना, जय संताजी तेली समाज तळोधी बाळापूर अश्या असंख्य तेली समाजाच्या संघटनांनी आपला पाठिंबा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिला आहे. Teli community support for Dhanorkar

  • Pratibha dhanorkar speech : भाषण ऐकण्यासाठी स्लॅब झाले हाऊसफुल्ल

    Pratibha dhanorkar speech : भाषण ऐकण्यासाठी स्लॅब झाले हाऊसफुल्ल

    Pratibha dhanorkar speech चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे या तापमाणात यात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. नाक्यानाक्यावर मतदानाची बेरीज,वजाबाकी करताना मतदार दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महायुती, महाआघाडीत थेट लढतीचे चित्र आहे. मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतली आहे.

    हे ही वाचा – भीम जयंती ला दारू दुकाने बंद ठेवा

    आज वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला. या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून कॉर्नर सभा, मोठ्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना घराच्या स्लॅबवर बसून धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती. Pratibha dhanorkar speech

    हे सविस्तर वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा इशारा

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणात प्रतिभा धानोरकर यांनी गावभेटीचा धडाका लावला आहे. आज ( शुक्रवार ) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव, नंदोरी, कोंढा, माजरी वस्ती, कुचना, पाटाळा, घोडपेठ, तांडा, मांगरी, बेलगाव, पावना राय, सागरा, चोरा, वडेगाव, गूळगाव, वायगाव, आष्टा, शेगाव खुर्द, चंदनखेडा या गावात डोर टू डोर धानोरकर यांनी भेटी घेतल्या. या गावभेटीत गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Pratibha dhanorkar speech

    Loksabha pratibha dhanorkar
    बैलबंडीवरुन महाविकास आघाडी उमेदवार धानोरकर प्रचार करताना

    यावेळी संतोष तुराणकर, प्रफुल डोंगरे, भानुदास ढवस, शरद खामनकर, महेश मोरे, संजूभाऊ पोडे, दत्तात्रय महातळे, पांडूभाऊ आगलावे, गुड्डू एकरे, चंदू दानव, अशोकराव येरगुडे, प्रदीप घगी, मंगेश मत्ते, प्रफुल येवले, गजानन बांदुरकर, शैलेश चौधरी, मधुकर कुरेकर, चांगदेव रोडे, किशोर पडावे, महेश श्रिसागर, मोहित लबाने, सुमित मुडेवार, अनिल चौधरी, सुनील आगलावे, नरेशभाऊ हेलवटे, सुनील तेलंग, घनश्याम उताणे, राजू डोंगे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी धानोरकर यांचे जोरदार स्वागत केले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला.

  • Bhim Jayanti chandrapur : दारू दुकाने बंद ठेवा

    Bhim Jayanti chandrapur : दारू दुकाने बंद ठेवा

    Bhim jayanti chandrapur वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांचा माध्यमातून घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांचा नेतृत्वात पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन घुग्घुस ला निवेदन देण्यात आले.

    हे ही वाचा : चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा

    या निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करण्यात आली की 14 एप्रिल 2024 रोजी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती हे घुग्घुस शहरामध्ये हजारो जनतेचा संख्येने खुप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.

     

    घुग्घुस मध्ये खुप मोठ्या प्रमाणात मिरवणूक डिजे वाद्य असते. या मिरवणुकीत कसलीही कुठलीही घटना होण्यास नाकारता येत नाही.
    म्हणून वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर चा वतीने पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की की दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी देशी दारू, व बार हे बंद ठेवण्यात यावे. Bhim jayanti chandrapur

     

    यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे जगदीश मारबते राकेश पारशिवे अशोक भगत आशिष परेकर यादी उपस्थित होते. Bhim jayanti chandrapur

  • Prakash ambedkar on narendra modi : पंतप्रधान मोदी गल्लीतला दादा – प्रकाश आंबेडकर

    Prakash ambedkar on narendra modi : पंतप्रधान मोदी गल्लीतला दादा – प्रकाश आंबेडकर

    Prakash ambedkar on narendra modi लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये 11 एप्रिलला रात्री 9 वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा पार पडली, या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती.

    Vanchit bahujan aghadi chandrapur

    चंद्रपूर लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

     

    आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी लायक माणूस नाही, कारण मोदी हे गल्लीतल्या दादासारखं वागत आहे, गल्लीतला दादा हा त्या वस्तीत असणाऱ्या दुकानदारांकडून हफ्ता वसूल करतो मात्र नरेंद्र मोदी त्या दादासारखं देशपातळीवर ईडी चा वापर करून हफ्ता वसूल करण्याचे काम करतो, ज्यांच्याकडून मोदी यांना पैसे घ्यायचे असतात त्यावेळी त्या कंपनीला ईडीची नोटीस दिल्या जाते, पैसे दिल्यावर मात्र चौकशी पूर्णतः थांबविण्यात येते, असाच प्रकार गल्लीतला दादा करतो. याला आपण आज इलेक्टरोल बॉण्ड म्हणतो. Prakash ambedkar on narendra modi

     

    मला कांग्रेस पक्षासोबत युती करायची होती मात्र ती काही कारणास्तव झाली नाही, देशात मोदी बॅकफूटवर आहे, त्यांच्याविरोधात अनेक मुद्दे आहे, ते मुद्दे आपण जनतेसमोर घेऊन जाऊ असं मी कांग्रेसला सांगितले मात्र ते काही तयार नव्हते. जेव्हा देशात घटना अस्तित्वात आली त्यावेळी त्या घटनेला सर्वात जास्त विरोध भाजप व आरएसएस ने केला होता, मोदी शाळेत न गेल्याने त्यांना इतिहास माहिती नाही. Prakash ambedkar on narendra modi

     

    आज पंतप्रधान मोदी हे आपली गॅरंटी देत आहे मात्र जो स्वतः आपल्या पत्नीला गॅरंटी देऊ शकत नाही ते देशाला कसली गॅरंटी देणार, लक्षात ठेवा मोदी हा खोटारडा माणूस आहे.

    सत्ता परिवर्तन सभेत नागरिकांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती.

  • Prachar Sabha Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद

    Prachar Sabha Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद

    Prachar Sabha Pratibha Dhanorkar चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील अनेक गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभा होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात आज ( गुरुवार ) सभा झाली. धानोरकरांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. कोठारी परिसरातील अनेक गावातील जनता, कार्यकर्ते, समर्थकांनी सभेला मोठी गर्दी केली होती.

    हे ही वाचा – चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी येथे आज दौरा केला. यावेळी धानोरकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला. त्यानंतर कोठारी येथे सभा झाली. Prachar Sabha Pratibha Dhanorkar

    हे ही वाचा – विविध सामाजिक संघटनांचा मुनगंटीवार यांना पाठिंबा

    आमदार सुधाकर अडबाले, संदिप गिर्हे शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), घनश्याम मुलचंदानी (काँग्रेस नेते), दिलीप चौधरी(संभाजी ब्रिगेड) , प्रकाश पाटील मारकवार, गोविंदा उपरे (बल्लारपूर तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस), संतोष इटनकर, सुरेश चहारे, मिंटू गेडाम, संजय खोडीलकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास राजूरकर यांनी केले. Prachar Sabha Pratibha Dhanorkar

     

    इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार गट), द्रमूक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुकूमशाही विरोधातील ही लढाई आहे. देश्यातील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय केंद्रातील सरकारने घेतले. मात्र देश्यातील तरुणांचा पुढे रोजगाराची मोठी समस्या उभी आहे. महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. हे प्रश्न सरकारला महत्वाचे वाटू नये, ही मोठी शोकांतिका आहे,असे धानोरकर म्हणाल्या.

  • Chandrapur whether alert : चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट

    Chandrapur whether alert : चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट

    Chandrapur whether alert नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 किमी वेगाने) गडगडाटी वादळासह गारपीट ची शक्यता वर्तवली आहे.

    तसेच 13 व 14 एप्रिल, 2024 या कालावधीकरीता यलो अलर्ट असून एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.

    हे ही वाचा – बहीण भावाच्या नात्यावर चिखलफेक, जागा दाखवा – प्रतिभा धानोरकर

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी घ्यावयाची : संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. Chandrapur whether alert

    वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. Chandrapur whether alert

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात बाल विवाह, कुटुंब ताब्यात

    पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. Chandrapur whether alert

    जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • Sudhir Mungantiwar Bjp : सामाजिक संघटनांचा सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा

    Sudhir Mungantiwar Bjp : सामाजिक संघटनांचा सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा

    Sudhir mungantiwar bjp चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देत आहेत. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा,विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सुधीरभाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत.

     

    चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात आता निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, माफियाराज विरुद्ध गुंडाराज असं चित्र यावेळी पाहायला मिळत असून सुधीर भाऊंची बाजू भक्कम दिसत आहे. ना. मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, त्यामधून त्यांनी केलेली अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे.ते सलग निवडून येत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मतदारसंघात आहे. Sudhir mungantiwar bjp

    हे ही वाचा – सुधीर मुनगंटीवार करणार सायबर क्राईम मध्ये तक्रार

    विमानतळ, वेकोलीचे भूमिअधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न कळीचा सातत्याने ते लावू धरत आहेत. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या माध्यमातून सोनार व्यावसायिकांसाठी जाचक असणारी कलम ४११ रद्द करण्यात आली त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व सोनार समाज बांधव कार्यकारी अध्यक्ष प्रफुल चावरे, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हाध्यक्ष सुधाकर त्रिपुरवर, कोषाध्यक्ष सुमेध कसुळ्कर पाठींबा देत असल्याचे समर्थन पत्रात त्यांनी सांगितले आहे. Sudhir mungantiwar bjp

     

    विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांनी समाज बांधवानी सभा घेऊन ना. मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यावेळी सुधाकर श्रीपुरवार, रविंद्र मुकुलवार, गिरीश कंठीवार, सचिव बंडोपंत देवोजवार, दिलीप लिंगोजवर यांच्यासह अनेक सदस्यगण उपस्थित होते. राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, पुरुषोत्तम राऊत, अरुण जमदाडे, दीपक जोगी, वसंत शिकारे कृष्णा बागुलकर आदींनी ना. मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत) चे प्रदेश अध्यक्ष शिवदास शर्मा यांनी समर्थनपत्र देऊन सुधीर भाऊंच्या विजयाचा संकल्प केला आहे. Sudhir mungantiwar bjp

     

    चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष उमेश लांडगे, देवाशिष गांगुली, अभिजित बेले, हर्षद साखरकर, एड मनीष शर्मा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. पालेवार भोई समाज चंद्रपूर चे अध्यक्ष अभय बडकेलवार, सचिव राजेंद्र गर्गेनलावर, अजय कोतपल्लीवार, अरुण गर्गेनलावर, प्रदीप गर्गेनलावर यांच्यासह अनेक सदस्यांनी आम्ही ना. मुनगंटीवार यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार केला. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्रच्या नसरीन शेख, स्मिता रेभनकर, वंदना भुशांवर, प्रतिभा रोकडे, स्मिता श्रीगडीवार, सविता मसराम, ज्योती कुंभार, मनीषा गौरकार आदींनी आम्ही सुधीर भाऊंना निवडून आनण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन समर्थन पत्र दिले आहे.

  • Sudhir mungantiwar : मुनगंटीवार करणार सायबर क्राईम कडे तक्रार

    Sudhir mungantiwar : मुनगंटीवार करणार सायबर क्राईम कडे तक्रार

    Sudhir mungantiwar आज गुढीपाडवा सण आहे, गुढीपाडवा म्हणजे मांडवस. पूर्वीपासुन शेतकरी बांधव हा सण साजरा करतात.  या उत्सवामध्ये आपल्या शेतीत जो वर्षभर प्रामाणिक, उत्तम काम करतो.  त्याला आपण मांडवसला पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देतो. आणि जो काम चुकारपणा करतो, त्याला कायमची सुट्टी देतो.

     

    आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा लेखा जोखा बघितला तर विकास कामे झालेली दिसत नाही. त्यामुळे आज मांडवस उत्सव आहे, याच महिन्यात लोकसभा निवडणुक आहे.  तुम्ही सर्व मला लोकसभेत पाठवून मांडवसची भेट द्या. आपण माझ्यावर विश्वास ठेवून या मांडवसला लोकसभेत पाठवले तर मी जीव ओतून काम करेल, असे आवाहन भाजपा लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Sudhir mungantiwar

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर वरोरा तालुक्यातील सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा आणि बारव्हा येथे प्रचार आणि जाहीर सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गुढीपाडवा आणि मांडवसचा अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे.  Sudhir mungantiwar

     

    कष्टकरी शेतकरी मजूर बेरोजगार बेघर वंचित लोकांसाठी मी जीव तोडून काम करेल. जर मी काम केलें नाही तर मला पण सुट्टी द्या, असे भावनिक आवाहन ना.  मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आज मला येथील अनेक लोकांनी भेटून वरोरा ते शेगाव रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली  व काही नागरिकांनी निवेदन दिले.  मागील साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार यांनी काहीही काम केले नाही. त्यामुळे आज येथील रस्त्यात चालताना उडी मारतो की काय? असे चित्र दिसून येते. आपण निवडून आल्यानंतर प्राधान्याने येथील रस्त्याचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.  पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, घाणेरडे राजकारण केले नाही.  Sudhir mungantiwar

     

    मला एक दिवस ताप आला तरी काँग्रेसने त्याचे घाणेरडे राजकारण केले, पण मी विकासाचा राजकारण करतो विकासावर बोलतो. विकास हाच माझा प्रमुख मुद्दा आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना माझा आदर्श आमदार म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. मागील २९ वर्षापासून मी आमदार आहे मला विधानसभेत काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करेल याचा तुम्हाला विश्वास देतो असे ते म्हणाले. वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारव्हा येथे आयोजित सभेला विजय राऊत, डॉ. बोदकुलवार, इंजी. बोदकुलवार, रमेश राजूरकर, सागर कोहळे, गौरव हेकाळे, नितीन मते, सदाशिव ताजने, किशोर टोंगे, भगवान गायकवाड, डॉ. अंकुश आगलावे, वंदना दाते, संगीता निंबाळकर, ओम मांडवकर, अमित चवले, आशिष ठाकरे, स्वाती बावने, कल्पना तुमरे, अर्चना चौधरी, अती शाम अली, सुनील वर्धे, सुमित वर्धे, निर्मला वर्धे, किसन वर्धे, मंजुळा दडमल, वनिता नरड, रूपाली नरड, स्नेहा लोकरे, चंदा खारकर, मंजुषा ताजने, शीतल साळवे, शिवानी साळवे, राजु गायकवाड, किरन ढोक, मारोती जांभळे, सरपंच वर्षा सरतापे, वासुदेव शेंडे, उमेश भुते, मोरेश्वर डुकरे, सिंधु जुमले, शुभम डाफ, विजय बोकासे, करन देवतळे, कविता बोराडे, गोपाळ गोगावले, किशोर पडोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    सायबर क्राईमकडे करणार काँगेसची तक्रार…
    काँग्रेसने दंगल घडवून १९८४ ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या दंगलीत काँग्रेसने किती अन्याय अत्याचार केले हे सर्वश्रुत असताना मीडियामध्ये कुठलाही विपर्यास केलेला नाही. पण काँग्रेस मुद्दामपणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करने सुरू केले आहे. त्यामुळे याची आपण सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करू असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

    शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…
    देशाचे कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर, लोकसभा उमेदवार ना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते रोज भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. आज वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारर्व्हा आदी क्षेत्रांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. यामध्ये अनिल लोळे, मंगेश फुलकर, देवराव ढोके, नंदु फुलकर, देवराव नलावटे, प्रदीप चवरे, प्रणय नरड, नवजीवन मत्ते, दिनेश कावळे, भाउराव सोनुने, सूरज सहारे, आनंद पेटकर, विकास कष्टी, गुणवंत देहरकर, तुळशीराम साखरकर, प्रभाकर पेंदोर, भारत कुमरे, राजेंद्र जुगणाके, सुरेश किंन्नाके, आकाश ओयाम,  आकाश भगत, रीतिक सोयाम, निलेश पेंदोर, मनोहर मेश्राम, अरूण चांभारे, दिवाकर जुमणाके, नंदकिशोर चिडे, प्रभाकर नाथे, कैलास येरमे, सौरभ टोंगे, सौरभ जुमणाके यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालिकरिता शुभेच्छा दिल्या.

    Sudhir mungantiwar
    सभेत मार्गदर्शन करताना


    वरोरा येथे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत..
    .
    चंद्रपूर लोकसभा भाजपा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आज मंगळवारी सकाळी वरोरा येथे आगमन होताच भगव्या सांस्कृतिक वाद्य पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी श्री राम मंदिर येथे पुष्पहार अर्पण करून श्रीराम यांचे दर्शन आशीर्वाद घेतले. तसेच मुख्य चौकातील स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी राम मंदिर वरोराचे अध्यक्ष ऍड. जयंता ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉ. सागर वझे, बाबा भाकरे, गोडे मॅडम, घनश्याम गोडे उपस्थित होते.

    काँग्रेसला मत म्हणजे विनाशच विनाश..
    कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तरी ते कडूच राहते गोड होत नाही.  तशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे, आज पर्यंत काँग्रेसने जनतेची निराशा केली आहे. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचा विकास  खुंटला आहे. या विभागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळला मतदान करा,  विकास म्हणजे कमळ आणि काँग्रेस म्हणजे विनाशच विनाश, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

  • Pratibha Dhanorkar : बहीण-भावाच्या नात्यावर चिखलफेक, ही खरी वेळ आहे – प्रतिभा धानोरकर

    Pratibha Dhanorkar : बहीण-भावाच्या नात्यावर चिखलफेक, ही खरी वेळ आहे – प्रतिभा धानोरकर

    Pratibha dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघात आज झंझावाती दौरा केला. या दरम्यान झालेल्या सभाना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी संवाद साधला.

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात भाजपला बीआरएस पक्षाचे समर्थन नाही चं – भूषण फुसे

    सभेला पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर चिखलफेक करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच खरी वेळ असल्याची गर्जना राजुरा येथे झालेल्या सभेत धानोरकर यांनी केली. Pratibha dhanorkar

    हे ही वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्या आरतीमध्ये पोलिसांनी टाकला विघ्न

    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, महाविकास आघाडीचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघाचा मंगळवारला दौरा केला. मतदार संघातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या करंजी, वढोली, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, लाठी, सकमुर, तोहोगाव,चक तळोधी या गावांना भेट दिली. Pratibha dhanorkar

    Chandrapur pratibha dhanorkar

    राजुरा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विरूर गावातील ग्रामस्थांची संवाद साधण्यात आला. राजुरा येथे भव्य अशी सभा झाली. ही लढाई माझी व्यक्तिगत नाही. ही लढाई आपल्या सर्वांची आहे. हुकूमशाहीच्या विरोधात एकमताने आवाज बुलंद करायला हवा. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून हा आवाज बुलंद होत आहे. या आवाजात तुमचा आवाज मिळाला तर हुकूमशाहीचे तक्त थरथर कापायला लागेल, असे आव्हान धानोरकर यांनी केले. Pratibha dhanorkar

     

    पुढे त्या म्हणाल्यात, बहिणीसाठी भाऊ जीव ओवाळून टाकत असते. आई-वडिलांनंतर भाऊ हाच बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मात्र भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्यावर मुनगंटीवार यांनी चिखलफेक केली. प्रत्येक बहिणीचं मन दुखावल आहे. ज्यांनी भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अनादर केला त्यांना त्यांची खरी जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, अशी गर्जना धानोरकर यांनी केली.यावेळी राजुरा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती.