Pratibha dhanorkar speech : भाषण ऐकण्यासाठी स्लॅब झाले हाऊसफुल्ल

Loksabha nivadnuk chandrapur

Pratibha dhanorkar speech चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे या तापमाणात यात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. नाक्यानाक्यावर मतदानाची बेरीज,वजाबाकी करताना मतदार दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महायुती, महाआघाडीत थेट लढतीचे चित्र आहे. मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतली आहे.

हे ही वाचा – भीम जयंती ला दारू दुकाने बंद ठेवा

आज वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला. या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून कॉर्नर सभा, मोठ्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना घराच्या स्लॅबवर बसून धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती. Pratibha dhanorkar speech

हे सविस्तर वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा इशारा

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणात प्रतिभा धानोरकर यांनी गावभेटीचा धडाका लावला आहे. आज ( शुक्रवार ) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव, नंदोरी, कोंढा, माजरी वस्ती, कुचना, पाटाळा, घोडपेठ, तांडा, मांगरी, बेलगाव, पावना राय, सागरा, चोरा, वडेगाव, गूळगाव, वायगाव, आष्टा, शेगाव खुर्द, चंदनखेडा या गावात डोर टू डोर धानोरकर यांनी भेटी घेतल्या. या गावभेटीत गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Pratibha dhanorkar speech

Loksabha pratibha dhanorkar
बैलबंडीवरुन महाविकास आघाडी उमेदवार धानोरकर प्रचार करताना

यावेळी संतोष तुराणकर, प्रफुल डोंगरे, भानुदास ढवस, शरद खामनकर, महेश मोरे, संजूभाऊ पोडे, दत्तात्रय महातळे, पांडूभाऊ आगलावे, गुड्डू एकरे, चंदू दानव, अशोकराव येरगुडे, प्रदीप घगी, मंगेश मत्ते, प्रफुल येवले, गजानन बांदुरकर, शैलेश चौधरी, मधुकर कुरेकर, चांगदेव रोडे, किशोर पडावे, महेश श्रिसागर, मोहित लबाने, सुमित मुडेवार, अनिल चौधरी, सुनील आगलावे, नरेशभाऊ हेलवटे, सुनील तेलंग, घनश्याम उताणे, राजू डोंगे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी धानोरकर यांचे जोरदार स्वागत केले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *