Author: Admin

  • Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस हवेत तर भाजप ग्राउंडवर

    Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस हवेत तर भाजप ग्राउंडवर

    Chandrapur lok sabha election पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता शेवटचे 3 दिवस उरले आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.

     

    भाजप कडून 2 वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले राज्याचे ताकदवर मंत्री सुधीर मुनगंटीवार तर कांग्रेसतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर हे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. Chandrapur lok sabha election

    ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरात विषबाधा, एकाचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हे दाखल

    कांग्रेस ची लोकसभेची तिकीट जाहीर झाल्यावर प्रतिभा धानोरकर यांच्या कुणबी समाज उभा झाला होता, मात्र आता शेवटच्या दिवसात भाजपचे पारडे जड झाले आहे.

     

    प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गेमचेंजर ठरली होती मात्र मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजप जिल्ह्यात बॅकफुटवर आली. Chandrapur lok sabha election

     

    कांग्रेसने त्या वादग्रस्त वक्तव्याचा फायदा घेत आई-बहिणींचा अपमान झाल्याचा कांगावा केला मात्र यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं स्पष्टीकरण देत तो प्रसंग कांग्रेसच्या आणीबाणीच्या काळात घडला असे सांगितले. Chandrapur lok sabha election

     

    आपली बाजू आता भक्कम आहे असा भ्रमनिरास कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सध्या झाला आहे, एकीकडे ग्रामीण भागातील कार्यकर्ते धानोरकर यांच्यावर नाराज होताना दिसत आहे.

     

    प्रतिभा धानोरकर मध्ये जनसंपर्काचा मोठया प्रमाणात अभाव आहे, दिवंगत बाळू धानोरकर हयात असताना शुद्ध हिचं परिस्थिती होती आजही ती कायमच आहे. Chandrapur lok sabha election

     

    मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील गावात जनसंपर्क अभियान वाढवीत आहे, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता थेट मतदारांपर्यंत पोहचत आहे, मात्र कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता यांना वाहनाशिवाय पर्याय नाही, अजूनही त्यांना वाहन प्रचार साहित्य मिळाले नसल्याची चर्चा आहे, ज्या प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी दिली ते ढिसाळपणे नियोजन पार पाडत आहे. Chandrapur lok sabha election

     

    आपला समाज मोठा आहे व पक्षाचे गठ्ठा मत आपल्याला सहज मिळणार हा अति आत्मविश्वास कांग्रेस पक्षाला जडला आहे, तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी सर्व जाती धर्मना सोबत कसे घेता येईल याकडे बारीक लक्ष देत आहे.

     

    मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांचे अनेक निर्णय चुकले अनेक प्रकल्प बंद पडले, बाबूपेठ उड्डाणपूल मागील 5 ते 6 वर्षांपासून अर्धवट परिस्थिती मध्ये आहे, प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे, दरवर्षी येणारा पूर, जटपूरा गेट येथील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते यावर उपाययोजना करण्यात मुनगंटीवार हे सपेशल अपयशी ठरले आहे. Chandrapur lok sabha election

     

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मी खासदार बनल्यावर माझ्या पगारातून शेतकऱ्यांचा विमा काढणार अशी घोषणा केली मात्र ती घोषणा हवेतच विरली, त्यांच्या कार्यकाळात एकही विकासकामे झाली नाही, कोरोना काळात चंद्रपूर ते मुंबई रेल्वे बंद झाली ती अजूनही सुरू झाली नाही.

     

    आज लोकसभेच्या रणसंग्रामात विद्यमान आमदार यांची टक्कर होत आहे, मात्र कांग्रेस पक्ष हा हवेत काम करीत आहे, घटक पक्ष आम आदमी पार्टी सोडली की दुसरे पक्ष कांग्रेसचा प्रचार करताना दिसत नाही आहे.

     

    दुसरीकडे भाजपची सुद्धा हीच परिस्थिती आहे, घटक पक्ष फक्त “राम नाम जपना पराया माल अपना” अशी भूमिका घेऊन आहे.

    सुरुवातीच्या काळात कांग्रेस पक्षासोबत असलेले ग्रामीण भागातील नागरिक आता भाजपकडे वळू लागले आहे, एकीकडे अनुभवी व मातब्बर राजकारणी तर दुसरीकडे नवखे राजकारण याचा फरक जनतेला कळू लागला आहे. Chandrapur lok sabha election

     

    मात्र एकीकडे महागाई, बेरोजगारी ने त्रस्त जनता आता कांग्रेस शिवाय दुसऱ्या पक्षाला मतदान करू शकतो अशी परिस्थिती सध्या लोकसभा क्षेत्रात निर्माण व्हायला लागली आहे.

     

    प्रतिभा धानोरकर यांच्या सभोवताल फिरणारी चौकडी त्यांना नुकसांदायक ठरणार हे नक्कीचं मात्र तोपर्यंत वेळी हातून निघून गेली असणार.

     

    एकीकडे महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार प्रत्येक सभा आपल्या सोशल मीडियावर थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभा समाजमाध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचत नाही आहे, धानोरकर यांच्या सभा फक्त रिल्स च्या माध्यमातून बाहेर येत आहे पण ग्रामीण भागातील कार्यकर्ते व कास्तकार हे थेट संपर्कात असनाऱ्या उमेदवाराकडे लक्ष देत आहे.

     

     

    येणारे 2 दिवस हे भाजप व कांग्रेस साठी “ये राह नही आसान” याकडे इशारा करीत आहे.

    तूर्तास इतकेचं

  • Chandrapur Food Poisoning : विषबाधा प्रकरणी आयोजक व आचारी वर गुन्हा दाखल

    Chandrapur Food Poisoning : विषबाधा प्रकरणी आयोजक व आचारी वर गुन्हा दाखल

    Chandrapur Food Poisoning भद्रावती तालुक्यातील माजरी येथे दिनांक 13/04/2024 रोजी काली माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    रात्री महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री लोकांना अन्नातून विषबाधा होऊन उलट्या व जुलाब याचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी एरिया हॉस्पिटल माजरी येथे दाखल करण्यात आले. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती व उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले. Chandrapur Food Poisoning

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरातील तेली समाज म्हणतो आम्हाला बदनाम करू नका, आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही

    बाधित अन्न खाल्याने 250 लोकांना त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे 57 रुग्ण दाखल असून एरिया हॉस्पिटल माजरी येथे 7 रुग्ण ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे 4 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. Chandrapur Food Poisoning

    हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस व भाजपची परिस्थिती काय? वाचा ही बातमी

    विषबाधा झाल्याने 3 रुग्ण अत्यवस्थ झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे वर्ग करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान गुर्फेक शिवनाथ यादव वय 80 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक शर्मा वय 5 वर्ष व अनया राजपूत वय 5 वर्ष यांची प्रकृती स्थिर आहे.

     

    पोलिस विभागामार्फत रुग्णांसाठी तत्काळ अँब्युलन्स ची व्यवस्था करण्यात आली. तसेच घटना स्थळी तालुका आरोग्य अधिकारी संजय असुटकर व त्यांची टीम रात्रीपासून हजर राहून बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले. तसेच आशा वर्कर मार्फत घरोघरी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ors वाटप करण्यात आले. व सर्वेक्षण करण्यात आले. सकाळपर्यंत 258 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. पाणी व अन्नाचे नमुने पुढील तपासणीसाठी FDA ला पाचारण करण्यात आले आहे. Chandrapur Food Poisoning

     

    तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव इंगोले यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

     

    मा. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन आढावा घेतला.

     

    सदर घटनेबाबत आयोजक बुल्लुराम दर्शनराम व आचारी छाया तिखट यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माजरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सारंग मिराशी करत आहेत.

  • Chandrapur loksabha Election : नागरिकांनो मतदार चिठ्ठी मिळाली काय?

    Chandrapur loksabha Election : नागरिकांनो मतदार चिठ्ठी मिळाली काय?

    Chandrapur loksabha Election लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची पडताडणी केली.

     

    हे ही वाचा : चंद्रपुरात मोठी राजकीय घडामोड

     13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली. यावेळी त्यांनी देवई गोविंदपूर येथील मतदान केंद्र क्रमांक 74, 75 आणि 42 या मतदान यादीतील समाविष्ट भागाला भेट दिली. तसेच शहरातील शास्त्रीनगर, बागला चौक या भागाला सुध्दा भेटी दिल्या. Chandrapur loksabha Election

     

    यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठ्या वाटपाची प्रगती, तसेच शिल्लक असलेल्या मतदार चिठ्ठ्या याबाबत संबंधित केंद्रस्तरीय अधिका-यांकडून सविस्तर आढावा घेतला. मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम वेळेत 100 टक्के पूर्ण होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.  ज्या क्षेत्रात मतदार चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते. Chandrapur loksabha Election

     

    याप्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले यांच्यासह पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

  • AIMIM’s support to BSP : चंद्रपुरात मोठी राजकीय घडामोड

    AIMIM’s support to BSP : चंद्रपुरात मोठी राजकीय घडामोड

    AIMIM’s support to BSP देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत उभे असलेले बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके यांना 14 एप्रिल ला दुपारी तीन वाजता च्या पत्रकार परिषदेत बिनशर्त पाठिंबा दिल्याचे एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद अमान अहमद यांनी सांगितले.

     

    देशातील काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम बांधवांसाठी काहीही केलेले नाही. AIMIM’s support to BSP

    ही बातमी अवश्य वाचा – माता महाकालीची चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात

    देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा देशातील मुस्लिम समाजाच्या समस्या व मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे आज एआयएमआयएम ने पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीला पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.

    यावेळी एमआयएम चे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके बसपा चे शहर अध्यक्ष शिराजकुमार गोगुलवार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. AIMIM’s support to BSP

     

    AIMIM चे जिल्हाध्यक्ष सैय्यद अमान अहमद यांनी सांगितले की हा पाठिंबा राज्य व देशव्यापी नाही आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला आहे, याबाबत आम्ही राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावरचं सदर पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.

  • Chaitra Navratri Festival Chandrapur : आजपासून लाखो भाविक करणार माता महाकालीची वारी

    Chaitra Navratri Festival Chandrapur : आजपासून लाखो भाविक करणार माता महाकालीची वारी

    Chaitra Navratri Festival Chandrapur चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा 14 एप्रिल सकाळी घटस्थापना करीत प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात.

    चंद्रपुरातील महत्वाच्या बातम्या : तेली समाज म्हणतो आम्हाला बदनाम करू नका

    पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या सावटात महाकाली यात्रा सुरू झाली आहे, निवडणूक संपेपर्यंत ही यात्रा सुरू असणार आहे, यात्रा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर 19 एप्रिलला परिसरात मतदार शिवाय कुणाला प्रवेश नसणार, याबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. Chaitra Navratri Festival Chandrapur

     

    आंध्र-छत्तीसगड- मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या या भागात हजारो वर्षा पूर्वी गोंड राजांची सत्ता होती. या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती. या शासकांची मार्गदर्शक देवी म्हणून माता महाकाली ओळखली जाते.एक छोटे मंदिर असलेले हे क्षेत्र गोंड साम्राज्याची शूरवीर “राणी हिराई” ने आपल्या संपन्न कार्यकाळात आजच्या भव्य रूपात बांधले.आणि सुरु केली देवी महाकालीची यात्रा. पूर्वी पेक्षा दळण -वळण सुलभ झाल्याने ही यात्रा अधिक यात्रेकरूना आकर्षित करीत आहे. Chaitra Navratri Festival Chandrapur

    चंद्रपुरातील महत्वाची घडामोड – सुधीर मुनगंटीवार म्हणतात, धृतराष्ट्र सांगेल इतकी विकासकामे

    विविध अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रमांनी हि वार्षिक यात्रा लाखो भाविकांचा केंद्रबिंदू ठरली आहे. देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात.

     

    चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक व्यक्त करतात.
    प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिसरात पुरेशी व्यवस्था केली आहे, बुद्ध पौर्णिमा पर्यंत चालणाऱ्या या महाकाली यात्रेत आंध्रप्रदेश व मराठवाडा येथील लाखो भाविक दर्शनाला येतात, अशी माहिती पुजारी सुनील महाकाले यांनी दिली.

  • Teli community does not support MVA : चंद्रपुरात तेली समाजाने केला खुलासा

    Teli community does not support MVA : चंद्रपुरात तेली समाजाने केला खुलासा

    Teli community does not support MVA 12 एप्रिलला रात्री मातोश्री विद्यालय येथे तेली समाजाचा सामाजिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या मेळाव्यात 12 तेली समाज संघटनांनी चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

     

    मात्र त्या बैठकीत तेली समाजातील विविध गटाने गदारोळ केला, आम्हाला न सांगता तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाचं कसा? असा प्रश्नांचा भडिमार आयोजक सूर्यकांत खणके यांना करण्यात आला. Teli community does not support MVA

    हे ही वाचा – विदर्भातील 12 तेली समाज संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

    दुसऱ्या दिवशी सकाळपासून खणके यांचा समाजमाध्यमावर तेली समाजाने निषेध दर्शविला, मात्र संत श्री संताजी मंडळ बल्लारपूर ने याबाबत मोठा खुलासा केला आहे. Teli community does not support MVA

     

    मंडळाचे अध्यक्ष अशोक झोडे म्हणाले की आम्हाला समाजातील काही लोकांचा सत्कार करण्यात येत असल्याचे निमंत्रण मिळाले होते, मात्र काही कारणास्तव मी आणि सचिव यशवंत बोंबले हे त्या मेळाव्यात जाऊ शकले नाही.

    राजकारणाची बातमी अवश्य वाचा – चंद्रपुरात ठाकरे गटाने भाजपला दिला जोर का झटका

    मात्र सदर कार्यक्रमात तेली समाजातील विविध संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला अशी माहिती पुढे आली त्यामध्ये आमच्या संघटनेचे नाव आणि अध्यक्ष व सचिव यांची सही होती. Teli community does not support MVA

     

    आम्ही दोघे गेलो नसताना आमच्या खोट्या सह्या कुणी व का केल्या? याबाबत आम्ही माहिती काढत आहो, आम्ही कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाला पाठिंबा दिला नाही अशी प्रतिक्रिया झोडे यांनी दिली आहे.

     

    याबाबत आम्ही तेली समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेत खुलासा करणार अशी माहिती झोडे यांनी दिली. पाठिंबा नाट्य मध्ये 12 पैकी एका संघटनेने पाठिंबा दिली नसल्याची कबुली दिली आहे, उर्वरित 11 संघटना याबाबत काय खुलासा करतात याकडे तेली समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

  • Teli Community Supports MVA : विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

    Teli Community Supports MVA : विदर्भातील 12 तेली समाज संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

    Teli Community Supports MVA गडचिरोली -: केंद्रातील भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी सरकार असून तेली समाज ओबीसी प्रवर्गात येत असताना आजवर या समाजावर सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे. तर हुकूमशाही धोरणाने चालणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. ती अबाधित राखण्याकरिता आज विदर्भातील 12 तेली समाज संघटनांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व चंद्रपूर- वनी – आर्णी लोकसभा उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांना लेखी पत्रातून पाठिंबा जाहीर केला. Teli Community Supports MVA

     

     

    याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ तेली महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष धनराज मुंगले, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान , तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर तसेच पाठिंबा दर्शविणारे तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. Teli Community Supports MVA

     

    ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजाला आजवर केंद्र सरकारने कुठल्याही कल्याणकारी योजनांचा लाभ दिलेला नाही. तर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकारकडून तेली समाजाची आजवर अवहेलनाच होत आली आहे. देशात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ हुकूमशाही धोरण राबवून बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचे कार्य करीत आहे. यामुळे देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आल्याची परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. Teli Community Supports MVA

     

    देशाचे सर्वांना समान हक्क देणारे संविधान कायमस्वरूपी टिकावे व देशातील लोकशाही अबाधित राहावी याकरिता विदर्भातील तेली समाजाच्या 12 संघटनांनी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी यांची हात बळकट करण्यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन लेखी पत्रातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. Teli Community Supports MVA

     

    सर्व तेली समाज संघटनाचे आभार व्यक्त करतो…

    देशात ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लढाई सुरू केली आहे. तर आम्ही महाराष्ट्रात लढत आहोत.
    ओबीसी समाजबाबत मोदी सरकारची अनास्था आहे.
    हे ओळखून तेली समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे
    या पाठिंब्याचा इंडिया आघाडीच्या दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी सिंहाचा वाटा असणार.

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

     

    तेली समाजाने पाठिंबा दिल्याने आमचा विजय सुकर…

    विदर्भ तेली समाजाने इंडिया आघाडी उमेदवाराना पाठिंबा दिला, मी त्यांचा आभारी आहे.
    ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबध्द आहे.
    जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्येनुसार त्यांना त्याचे अधिकार देणार हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे.
    डॉ. नामदेव किरसान
    इंडिया आघाडी उमेदवार

  • Chandrapur Development : धृतराष्ट्र सांगणार चंद्रपुरात इतकी विकासकामे

    Chandrapur Development : धृतराष्ट्र सांगणार चंद्रपुरात इतकी विकासकामे

    Chandrapur development चंद्रपूर : धृतराष्ट सांगू शकतील एवढी विकासकामे, मी चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या मतदार संघात केली आहेत. मी फक्त विकासाचं राजकारण करतो, जातीपातीच घाणेरडे राजकारण उभ्या आयुष्यात केले नाही. मी तीनशेच्या वर विकासकामे केली आहेत, त्याची यादी तुमच्यासमोर वाचून दाखवितो. पण विरोधकांनी त्यांच्या काळात २१ कामे केली आहेत का? हे जनतेला त्यांनी सांगावं, असं म्हणत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार जाहीर सभेत विरोधकांवर चांगलेच कडाडले.

     

     

    राजुरा विधानसभा मतदार संघात गुरुवारी त्यांनी झंझावाती प्रचारदौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावांमध्ये जाहीर सभा, प्रचार यात्रा घेऊन खेड्यापाड्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. ते बोलतांना म्हणाले की, जनतेसमोर मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करीत आहो. पण माझे प्रतिस्पर्धी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. मागील पाच वर्षात राजुरा विधानसभा मतदार संघाचा विकास रखडला आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी साधे रस्ते करता आले नाहीत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. Chandrapur development

     

    ही बातमी अवश्य वाचा – चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाने भाजपला दिला जोरदार धक्का

    या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल मी लोकसभेत निवडून आल्यानंतर तातडीने मार्गी लावणार पण त्यासाठी आपण मला आशीर्वाद रूपी मत दिले पाहिजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी हात वर करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगत जोरदार घोषणा दिल्यात. ना. मुनगंटीवार यांनी सास्ती,तोहगाव, लाठी, धाबा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तर गोवरी, चुनाळा, विरूर, चकदरूर, भंगाराम तळोधी, विठ्ठलवाडा, वढोली, खरारपेठ आदी ठिकाणी प्रचार यात्रा घेतल्या. तसेच गोवरी, माथरा, रामपूर, विहीरगाव, मूर्ती, नलफ़डी, सिंधी, धानोरा, धानापूर, करंजी, आक्सापुर, सरांडी, सोनापूर देशपांडे, सकमुर, दरुर, चकपारगाव, खराळपेठ आदी गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेतले. Chandrapur development

    हे ही वाचा : बंगाली नववर्ष चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

    यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बंडू हजारे,सुरेश धोटे, सुरेश रागीट,मधुकर नरड, सुनील उरकुडे, सुभाष बोनगिरवार, सचिन शेंडे,अरुण लोखंडे, सरपंच सुचिता मावलीकर, प्रतीक चन्ने, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपल्लीवार, गणेश पिसे, महेंद्र बोबडे, प्रवीण मुनगंटीवार, विपुल भडी, गजानन झाडे, भारत कुळसंगे, बंडू धोटे, सुरेश वांढरे, सुनीता उरकुडे, प्रकाश फुटाणे, स्नेहा दरेकर, मीरा वांढरे, सरपंच बाळू वडस्कर, सिद्धार्थ पथोडे, अरुण मस्की, विलास बोनगीरवार, संजय पावडे, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, बबन निकोडे, अमर बोडलावार, दीपक सातपुते, निलेश पुलगमकार, स्वप्नील अनमुलवार, राजेंद्र गोहणे, हिरा कंदिगुरवार, निळकंठ लखमापुरे, रुपेश लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. Chandrapur development

     

    सुधीर भाऊ राजुरा मतदार संघातील प्रश्न सोडवतील माजी आ. संजय धोटे

    राजुरा विधानसभा मतदार संघ विकासापासून कोसो दूर आहे. या मतदार संघात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद असेल तर ती फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन सुधीरभाऊंना लोकसभा निवडणुकीत लाखो मतांनी विजयी करून त्यांना संसदेत पाठविले तरच केंद्रातील निधी आपल्या जिल्ह्याला आणि विधानसभा मतदार संघाला मिळेल आणि आपल्या क्षेत्राचा विकास होईल अशी भावना माजी आमदार संजय धोटे यांनी बोलून दाखविली. Chandrapur development

     

    विकासासाठी एकच पर्याय सुधीरभाऊ – माजी आ. सुदर्शन निमकर

    आजवर आम्ही अनेक नेते बघितले आहेत. शब्द देतात आणि वेळ आली की विसरून जातात. पण आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार इथे अपवाद ठरतात. आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे विषय ठेवला तेव्हा-तेव्हा त्यांनी दिला शब्द केला पूर्ण या उक्तीप्रमाणे सर्व प्रश्न आणि अडचणी मार्गी लावल्या आहेत. त्यांच्याकडे समस्या गेली कि त्यावर शंभर टक्के इलाज असतो. असा एक हि प्रश्न नसेल की जो सुधीर भाऊंनी सोडविला नसेल. त्यामुळे लोकसभेत आपल्या हक्काचा उमेदवार निवडून पाठविणे गरचेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले.

  • Shivsena thackeray chandrapur : शिवसेना ठाकरे गटाने दिला भाजपला धक्का

    Shivsena thackeray chandrapur : शिवसेना ठाकरे गटाने दिला भाजपला धक्का

    Shivsena thackeray chandrapur पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, मात्र या रणधुमाळी मध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

    हे ही वाचा – धृतराष्ट्र सांगणार चंद्रपुरात इतकी विकासकामे

    चंद्रपूरातील निंबाळा गावातील भाजपचे सरपंच सौरभ संतोष दुपारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्ह्यातील नेतृत्व संदीप गिर्हे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. Shivsena thackeray chandrapur

     

    जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सरपंच दुपारे यांचं पक्षात स्वागत करीत पक्ष वाढीसाठी जोमात कार्य करावे अश्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी गावातील नागरिक व युवासेनेचे विनय धोबे उपस्थित होते.

  • Poila Baisakh 2024 : बंगाली नववर्ष निमित्त चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

    Poila Baisakh 2024 : बंगाली नववर्ष निमित्त चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

    Poila baisakh 2024 15 एप्रिलला देशात बंगाली समाजाचे नववर्ष म्हणजे पोहेला बैसाख साजरा करण्यात येत आहे.

    हे वाचा : शिवसेनेचा भाजपला धक्का

    शुभ कार्य करण्यासाठी पोहेला बैसाख ला बंगाली समाज शुभ मानतात, यादिवशी लग्न कार्य, गृहप्रवेश असे विविध कार्यक्रम बंगाली समाजाच्या वतीने करण्यात येते. Poila baisakh 2024

     

    15 एप्रिलला चंद्रपुरात बंगाली समाज नवं वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    हे ही वाचा : मी 300 कामे केली तुमची 21 कामे सांगा

    या कार्यक्रमात गीत-गायन, नृत्य स्पर्धा, कविता, समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Poila baisakh 2024

     

    शहरातील मयूर हॉटेल समोरील इंडस्ट्रीयल एरिया मैदानात सायंकाळी 6 वाजतापासून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली असून सदर कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक मनोज पाल यांनी केले आहे.