Political criticism उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान माजविले आहे, त्यांच्या क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असून महायुतीने राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात टाकलेलं आहे असे चित्र आपल्यापुढे तयार झाले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली, चंद्रपुरात कांग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी वडेट्टीवार प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.
Political criticism वडेट्टीवार पुढे म्हणाले की नागपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मात्र गृहमंत्री फडणवीस यावर दुर्लक्ष करीत आहे, गृहमंत्री फडणवीस राज्यभर दौरे करीत असताना नागपूर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यँत 6 हजार 883 गुन्ह्यांची नोंद झाली, त्यामध्ये खून 165, बलात्कार 268, महिलांवर अत्याचाराचे प्रकरण 300 च्या पुढे आहे, कायदा व सुव्यवस्था यावर गृहमंत्री दुर्लक्ष करीत आहे, ही सर्व आकडेवारी माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.
जोरदार टीका
गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे उडत आहे, तर राज्यात काय अवस्था आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय? राज्यात दररोज 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहे, 15 लोकांची रोज हत्या होत आहे, हे महाराष्ट्र राज्याचं विदारक चित्र आहे. महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त केले असून राज्याला खड्ड्यात टाकलं आहे.
Dhangar Reservation धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी करिता शेणगाव येथे रास्तारोको . (सकल धनगर समाज जिवती यांच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर)
Dhangar reservation जिवती: धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले आणि मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगड व धनगर हे एकच असल्याचे म्हटले आहे.
मुळात राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही जे आहे ते धनगर असल्याचे शपथपत्र सुद्धा शानसांने तीन वेळा मुबंई उच्च न्यायालयाला सादर केलेले आहे.धनगर च्या ऐवजी चुकीने धनगड झाले असल्याने व आता च्या अभ्यास गटाने सुद्धा महाराष्ट्रात धनगड हे धनगर असल्याचे स्पष्ट केले असल्याने आता धनगर जातीला त्वरित अनुसूचित जामातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत या संदर्भात तालुक्यातील मुख्य ठिकाण शेणगाव येथे धनगर समाजातील लोकांनी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्फत तहसीलदार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. Dhangar reservation
Underground drainage line 100 कोटीच्या भूमीगत गटर योजनेला भगदाड पडले, चंद्रपूर शहराच्या दाताळा मार्गावरील घटना नागरिकांच्या प्रसंगावधानाने अपघात टळला
Underground drainage line चंद्रपूर: 15 वर्षांपूर्वी चंद्रपूर नगरपालिकेने 100 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या भूमिगत गटार योजनेला शहराच्या दाताळा मार्गावरील हनुमान मंदिरासमोर काल मोठे भगदाड पडले. या भगदाडाची खोली दहा फुटापेक्षा जास्त आहे. रामनगर मधील संत कवंरराम चौक ते दाताळा या मार्गावर दिवसभर व रात्री सुद्धा मोठी वर्दळ असते. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखून या ठिकाणी दगड ठेवले,त्यामध्ये लाल कापडा चा झेंडा लावला.त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही.मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या ठिकाणाची पाहणी केली.
सुमारे 15 वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपयांच्या वर खर्च करून चंद्रपूर नगरपालिकेने भूमिगत गटर योजनेचे काम केले होते. योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची संपूर्ण देयके सुद्धा नगरपालिकेने अदा केली. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ही योजना आजपावेतो सुरू होऊ शकली नाही. (Underground drainage line)
या योजनेसाठी चार ते पाच वर्षे संपूर्ण शहरात खड्डे व धुळीचे साम्राज्य तयार झाले होते. त्यामुळे अनेक लहान मुले तसेच नागरिकांना कायमस्वरूपी श्वसनाचा त्रास तसेच मानेचे,मणक्याचे विकार झाले. मात्र आजपर्यंत शासनाने या योजनेच्या भ्रष्टाचाराची साधी चौकशी केली नाही. या योजनेतील दोषी अधिकारी व कंत्राटदाराची पाठराखण करण्याचे काम राज्य सरकार करित असल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.
चंद्रपूरकरांवर 506 कोटीची नवीन गटर योजना लादल्यास परिणाम भोगावे लागतील… पप्पू देशमुख यांचा इशारा
100 कोटी रुपयांच्या जुन्या गटार योजनेला आता भगदाड पडणे सुरू झाले. या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करण्याची आम्ही वारंवार मागणी करत आहोत. मात्र सरकार दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे राज्य सरकारने 506 कोटीची नवीन भूमिका गट योजना चंद्रपूरकरांवर लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या नविन योजनेच्या निविदा प्रक्रियेतील गैरप्रकारमुळे 448 कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले काम कंत्राटदाराला 506 कोटी मध्ये मिळाले. 100 कोटींच्या जुन्या भूमिगत गटार योजनेची तसेच नवीन भूमिगत गटार योजनेच्या निविदा प्रक्रियेतील 50 कोटी रूपयांच्या गैरप्रकारची चौकशी करून शासनाने दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरूध्द कठोर कारवाई करावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे. या दोन्ही योजनेच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्यास व 506 कोटी रुपयांची नवीन भूमिगत गटार योजना चंद्रपूरकरांवर लादण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देशमुख यांनी राज्य सरकारला दिला.
chandrapur live news नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात जाणारे मानव बळी वाचवण्याकरिता मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव, वाघांचे लाड पुरवणाऱ्या वनमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून द्यावा राजीनामा; आंदोलनकर्त्यांची मागणी
chandrapur live news चंद्रपूर :- मुल तालुक्यात दिवसेंदिवस नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाची थातुरमातुर भुमीका व वाघांचे लाड पुरवणारे कायदे यामुळे नरभक्षी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात मुल वनपरिक्षेत्रात वाढत आहे. होणारे वाघाचे हल्ले रोखण्यासाठी व मनुष्य जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाकडे वेळो-वेळी पाठपुरावा करण्यात येत होते. मात्र लोकांच्या जीवाची पर्वा न कलणाऱ्या वनविभाग कानाडोळा करून गप्प बसले होते.
यामुळे दिड महिन्यात ५ लोकांचे वाघाच्या हल्ल्यात जीव गेले.त्यांचे परिवार उघड्यावर पडले.वारंवार होणारी घटना रोखण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दि.२३ सप्टेंबरला चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षण कर्यालयाला घेराव आंदोलन करून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा जनतेला घेऊन आम्हीच वाघाचा बंदोबस्त करू असा इशारा देण्यात आला.तसेच वाघाच्या हल्ल्यात ज्या लोकांचे बळी गेले त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा तसेच जनतेच्या भौतिक संरक्षणाची जबाबदारी स्वतः राज्य सरकारने व वनसंरक्षण अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन, प्रादेशिक, सामाजिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल लाभले आहे. या चारही भागात वाघांचा मोठा संचार आहे. (chandrapur live news)
आता मिळणार 10 हजार पेन्शन
जंगलालगत बराचसा शेतशिवार असल्याने तसेच जंगलाशेजारी जनावरांचे चराई क्षेत्र असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाकडून नियमित हल्ले होत आहे. त्यात निष्पाप शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांचे बळी जात आहे.यावर शासनस्तरावरून आणि वनविभागातर्फे कोणतेही ठोस उपाययोजना केल्या गेले नाही.मूल तालुका वाघाच्या दहशतीत सापडला असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
रोज ऐक दुर्दैवी घटना घटना घडत आहे.याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे संतप्त मुल वासियांनी मुख्य वनसंरक्षकाच्याच कार्यालयाला घेराव घालून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
मुल तालुक्यातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करा,नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास विना विलंब तात्काळ आर्थिक मदत करा,जंगली प्राण्यांमुळे पिकांची झालेली नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करा,या सगळ्या प्रकरणात चुप्पी साधलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी स्वीकारून वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, मुल येथे वनपरीक्षेत्र कार्यालयात निर्माण करण्यात यावे,मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी तात्काळ आर्थिक मदत व वनविभागात शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी अश्या विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक कार्यालयास घेराव घालण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर संदिप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राज ठाकरे, विनय धोबे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गारघाटे,ज्योती गहलोत, मीनाक्षीताई गलगट,प्रशांत मेश्राम युसूफ शेख,सागर राऊत,विनोद बुराडे व आदी उपस्थित होते.
flood affected farmers भोयेगाव वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आथिर्क पॅकेज द्या –भूषण फुसे व शिष्ट मंडळाची निवेदनाद्वारे मागणी
Flood affected farmers कोरपना – कोरपना तालुक्यातील गडचांदूरला चंद्रपूरशी जोडणाऱ्या भोयेगाव येथील वर्धा नदीचा पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात वर्धा नदीची पाण्याची पातळी थोडीशीही वाढली कि सदर पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरून रहदारी बंद होते. त्यामुळे वाहनचालकांना राजूराहून अधिक अंतर गाठून चंद्रपूरला जावे लागते. कोरपना तालुक्यात मोठ्या चार सिमेंट कंपन्या, कोळसा खाणी व त्यांच्याशी निगडित असल्याने या मार्गावरून वाहतूक खोळंबल्याने त्रास सहन करावा लागतो. याकरिता भोयेगाव वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
तसेच यावर्षीच्या सततच्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला तीन वेळा पूर आल्याने नदीकाठच्या शेती पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरपीडित शेतकऱ्यांना शासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही. शेतकरी हवालदिन झालेला असून मानसिक रित्या खचला आहे. तसेच अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे प्रवृत्त होत असल्याचे दिसून येत आहे. Flood affected farmers
शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे. अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना कोरपना चे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. सदर रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने सकारात्मक प्रदिसाद दिला नाही तर सर्व पीडित सर्व शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला आहे. निवेदन देताना रामदास चौधरी, भोयेगाव, प्रवीण पेंदोर, सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे व सहकारी उपस्थित होते.
social activities चिमूर – नुकतेच पहिल्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असून आता मस्कऱ्या गणपतीच्या स्थापनेला सुरुवात झाली असून जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील गणेश मंडळाच्या वतीने अंध. अपंग. व मुक बधीर विद्यार्थ्यांचे हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
social activities टिळक वॉर्ड चिमूर येथील जय श्रीराम बाल गणेश मंडळ नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात व अग्रेसर असते. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांचे विचार या मंडळाच्या पदाधीकऱ्यानी अंगीकरल्याने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गणेश मूर्तीची स्थापना असल्याने गणेश मूर्ती बंडी बैल सज्ऊन अगदी साध्या पद्धतीने मूर्ती मंडपात आणण्यात आली.
मूर्तीची विधिवत पूजा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. आरती नंतर विद्यार्थ्यांना भोजन दान करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी सहित सर्व कर्मचारी व जय श्री राम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
One day workshop गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर, सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
One day workshop जटपुरा गेटजवळील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ही कार्यशाळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अजय कुशवाह (नोएडा), कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. मा.राजेश्वर सुरावार (श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे. डॉ. पी. एम. काटकर (प्राचार्य, सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर) आणि संतोष शिंदे (प्रभारी प्राचार्य, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज चंद्रपूर) हे कार्यशाळेचे प्रमुख आयोजक आहेत.
या कार्यशाळेत तीन सत्र आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये नवीन संशोधन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि वाङ्मय चौर्य होऊ न देण्याकरिता उपाययोजना यावर मार्गदर्शन डॉ. अजय कुशवाहा, श्री. जयंत बेलवाडी आणि डॉ. सौम्या राणी करणार आहेत.
आता या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार पेंशन, बघा व्हिडीओ
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश पी. इंगोले (केंद्र संचालक, एसएनडीटी, बल्लारपूर), डॉ. श्रीराम कावळे (प्रभारी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), डॉ. अनिल बोरगमवार (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय प्रतिष्ठान), डॉ. आभा खंडेलवाल (संस्थापक असोसिएशन ऑफ ऑल कॉम्प्युटर सायन्स टीचर्स, नागपूर), डॉ. दिनेश गभणे (प्राचार्य राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई) आदी उपस्थित राहणार आहेत.
आयोजित कार्यशाळेत आपण नोंदणी करावी असे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्व शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. कार्यशाळेत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://tinyurl.com/IRMPPT2K24 या लिंक वापर करावा.
janjatiy unnat gram abhiyan दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63 हजार तर महाराष्ट्रातील 4 हजार 976 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे.
janjatiy unnat gram abhiyan या माध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार 702 आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली.
या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ‘पीएम-जनमन’ अभियानात 17 मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध 25 उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, अजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे. (janjatiy unnat gram abhiyan)
आता मिळणार 10 हजार पेन्शन, बघा हा व्हिडीओ
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर पुढील 5 वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्याच्या योजनेतून मॅप केल्या जातील. पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. (janjatiy unnat gram abhiyan)
या सुविधा मिळणार : पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल, ॲनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे इत्यादी.
Guru dakshina शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी भरारी घेतात. नाव कमावतात. आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण मोजकेच विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव ठेवतात. त्यातही ना. सुधीर मुनगंटीवार त्या शाळेचे माजी विद्यार्थी असतील, तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेला किती अधिक देता येईल याचा विचार करतात. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलसाठी ज्या भावनेतून परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे, ती कुठल्याही माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्श बाब ठरावी.
Guru dakshina राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी आणि पाचवे सरसंघचालक प.पू के.सुदर्शन यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील बाकांवर श्री. सुधीर मुनगंटीवार यांना शैक्षणिक, सामाजिक धडे गिरवता आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण या शाळेत झाले. त्यानंतरचा ना. मुनगंटीवार यांचा लोकनेता म्हणून प्रवास साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करावे, अशी जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.
एका माजी विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा म्हणून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद (मा.शा) ज्युबिली हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला. ही खऱ्या अर्थाने एका माजी विद्यार्थ्याची आदर्श गुरुदक्षिणा ठरत आहे. नूतनीकरणांतर्गत इमारतीची संपूर्ण दुरुस्ती, नवीन फ्लोरिंग, नवीन छत, फॉल सीलिंग, दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, अनेक ठिकाणी प्लास्टर, डिजिटल क्लासरूम, आधुनिक फर्निचर, प्रयोगशाळा दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. (Guru dakshina)
राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये पेन्शन
ना. श्री. मुनगंटीवार यांनी आज महाविद्यालयाच्या नुतणीकरणाच्या कामाची पाहणी केली आणि माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वाचनालयाचा विशेष उल्लेख केला. 14 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून अत्याधुनिक वाचनालय येथे तयार करण्यात येणार आहे. ई -लायब्ररी पासून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होतील. या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून विद्यार्थ्यांना येथे शिकता येईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. (Guru dakshina)
संस्कारांचं माहेरघर
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळले. पण ते ज्युबिली हायस्कूलच्या बाकांवर घडले. याच बाकांवर त्यांना पर्यावरणाचे धडे मिळाले आणि इथेच त्यांच्यातील गुणी विद्यार्थी घडला. आणि आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य बघितले तर शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासाठी त्यांची शाळा खऱ्या अर्थाने संस्कारांचं माहेरघर ठरले आहे.
Wild animals काँग्रेस नेत्या व भूमिपुत्र ब्रिगेड च्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतूरे यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधिक शिष्टमंडळ वन विभागाचे प्रधान सचिव श्री. बी वेणुगोपाल रेड्डी यांची वन अकॅडमी चंद्रपूर येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. अभिलाषा गावतूरे समवेत भादूर्णी, बेंबाल ,चिंचोली, केळझर, चिचाळा, मरेगाव, जानाला, बेंबाळ, बोरचंदली गावातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.
जिल्ह्यातील विशेषतः बल्लारपूर विधानसभेतील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. Wild animals
वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देणे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मोबदला म्हणून मिळणाऱ्या पंचवीस लाख रक्कम त्वरित देण्यात यावी व रकमेत वाढ करण्यात यावी.
गाय, बैल, शेळी, मेंढी, म्हैस, बकरी च्या चराईसाठी गावनिहाय चराई कुरण करून मोफत चराई करण्याची परवानगी द्यावी.
वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राणी यांची निश्चित आकडेवारी शोधून चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्र तुलनेत संख्या जास्त झाल्यास अन्यत्र हलवण्याची कारवाई करावी.
सर्व हिंस्र पशूंना कॉलर आयडी लावून त्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवून ते गावाजवळ आल्यास त्यासंबंधी सूचना गावकऱ्यांना करणे व याबाबत यंत्रणा विकसित करणे. (Wild animals)
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका वन विभागात द्वारे उपलब्ध करून देणे व नामांकित खाजगी रुग्णालय यांचे नामांकन करून रुग्णालय उपलब्ध करून देणे जेणेकरून जखमी व्यक्तीस दर्जेदार उपचार मिळेल.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी चे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक गावकऱ्यांच्या हाती देणे व कम्युनिटी सफारी सुरू करणे त्याचे उत्पन्न स्थानिक गावकऱ्यांना मिळेल.
सराई कुरण बाबत वारंवार पाठपुराटा करून देखील चराई कुरण निर्माण न करणाऱ्या वन अधिकाऱ्याचा आढावा घेऊन निलंबनाची कारवाई करावी.
सोलर झटका मशीन वा निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याने सदर भ्रष्टाचाराची उच्च चौकशी करून व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. Wild animals
बॉटनिकल गार्डन वन उद्यान व अकॅडमी यामध्ये निर्माण केलेले हॉटेल पब्लिक रेस्टॉरंट व व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाचखोरी होत असल्याने याची उच्चस्तरीय समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
वन विभागाच्या सर्व प्रकल्पांचे सोशल ऑडिट करून रिपोर्ट सार्वजनिक करावी. सोशल ऑडिट कमेटी मध्ये सर्व स्टेकहोल्डर्स चा समावेश असावा.
वन हक्क कायदा 2006 मध्ये संशोधन करून वन जमिनी वरती शेती व घरगुती वापरासाठी 2024 पर्यंत झालेले अतिक्रमण कायदा करून वन हक्काने पट्टे वाटप करण्यात यावे.
वन हक्क कायदा 2006 मध्ये गैर आदिवासी समाजाच्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी. या मागण्यांना घेऊन प्रधान सचिव वन विभाग व वनबल प्रमुख व वन विभागातील विशिष्ट अधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. सर्व मागण्या योग्य असल्याचे प्रधान सचिव यांनी मान्य केले व सदर समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच वन विभाग अधिकाऱ्याची नियोजन शून्य व कमिशन कारभार याविषयी वन सचिवाशी झालेल्या चर्चेमुळे वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकरी, गुराखी व सामान्य नागरिक यांच्या प्रश्नाला काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाचा फोडली. या महत्वपूर्ण मागण्याबाबत राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ, बिबट, अस्वल या हिंस्र प्राण्याचे बंदोबस्त तसेच बैल, गाय मेंढी, शेळी, बकरी म्हैस यांच्या चराईचा प्रश्न व वन विभागातील कमिशन खोरी, भ्रष्टाचार या समस्या 100% सुटतील असा आशावाद डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी व्यक्त केला व यास समस्या करिता राजकीय पक्ष राजकारण यांच्या सीमा ओलांडून जमिनीचे जन आंदोलन करण्याचा आव्हान याप्रसंगी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला केले. या समस्यांवर होणाऱ्या प्रत्येक जन आंदोलनात सर्वात पुढे राहण्याचा निश्चय याप्रसंगी केला.