Nomination application filed महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या तिस-या दिवशी आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
Nomination application filed यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात निरंक, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी) आणि सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले.
तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 19 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 20 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 20 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल करण्यात आली आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांना डावलून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Chandrapur Municipal Corporation येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असुन अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
Chandrapur Municipal Corporation मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने लावण्यास निश्चित करण्यात आली आहेत. जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.
परवानगी नअसलेल्या ठिकाणांहुन फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अश्या प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.
भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. Chandrapur Municipal Corporation
या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी व फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्याचे तसेच ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असल्याचे नमुद असेल तेच फटाके घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
health insurance scam बल्लारपूर नपा येथील कर्मचारी आरोग्य विमा निविदेत भ्रष्टाचार, भ्रष्टाचारात सहभागी कर्मचारी व अधिकायांवर कारवाई करा मनसे कामगार नेते जिल्हाध्यक्ष अंधेवार यांची पत्रकार परिषदेत मागणी
health insurance scam चंद्रपूर – बल्लारपूर नगरपालिका कार्यालयातील कर्मचायांच्या आरोग्य विम्यासाठी सन 2024_25 साठी निविदा काढण्यात आली होती. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि इफको टोकियो यांनी ही निविदा भरली होती. नियमानुसार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या निविदा ऑनलाइन मागवणे बंधनकारक आहे असे असतानाही निविदेची रक्कम जास्त असतानाही लेखापालाने ऑफलाइन पद्धतीने निविदा चालवून या प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन गंधेवार यांनी केला आहे. Health Insurance Scam
या संदर्भात भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लेखापाल व संबंधित अधिकायांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, कोणतीही निविदा प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक होण्यासाठी निविदा प्रक्रिया ऑनलाइन करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता ऑफलाइन प्रक्रिया करून निविदा प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करताना प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण माहिती आणि रेट संबंधित बॉक्स भरणे आवश्यक आहे.
परंतु स्टार हेल्थ फायनांस इन्शुरन्स कंपनीने लिफाफ्यात दर पत्रकात चार पैकी दोन दर सादर केल्यामुळे हे दरपत्रक अपात्र ठरले आहे. उर्वरित 2 निविदाधारक एचडीएफसी लाईफ आणि इफको टोकियो पात्र असूनही, त्यांना जाणीवपूर्वक अपात्र दाखवून अपात्र असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला निविदा दिल्याची पुष्टी झाली आहे. प्रक्रियेदरम्यान, निविदाधारकांनी देऊ केलेल्या दरांमध्ये, विशेषत: एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने देऊ केलेल्या दरांमध्ये अनावश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या हिताचे हे टेंडर पास करून या कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी हा भ्रष्टाचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली. Health Insurance Scam
यात गोरगरीब कर्मचायांचे अतोनात हाल होत आहेत. या संदर्भात महापालिकेच्या लेखापाल यांना आरोग्य विमा वर्ष २०२४_२५ च्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, ती कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती गंधेवार यांनी दिली.
यामध्ये संबंधित लेखापालाने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या निधीचा गैरवापर करून शासनाचे नुकसान केले आहे, निविदा प्रक्रियेच्या दरात फेरफार करून गैरव्यवहार केला आहे, शासनाची दिशाभूल करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे आदी गंभीर गुन्हे करून चौकशीअंती कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मागणी करण्यात आली आहे, अन्यथा मनसे कामगार सेनेतर्फे जनआंदोलन उभारण्याचे संकेत अमन गंधेवार यांनी पत्रपरिषदेत दिले आहेत.
Election nomination form महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी आज (दि. 23) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर बुधवारी इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली.
Election nomination form विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 16 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 48 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 24 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 27 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 36 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
cotton procurement राज्यकर्त्यांच्या साठमारीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, कापूस खरेदी केंद्र सुरू करा व सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची आमदार सुधाकर अडबाले यांची मागणी
cotton procurement चंद्रपूर : दिवाळी तोंडावर आली असताना अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. सोबतच सोयाबीनला भाव नाही. मात्र, राज्यकर्ते स्वतःची पोळी शेकण्यात मग्न असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे व सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
केंद्र व राज्य सरकारने घोषणा करूनही कापूस खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नाही. दिवाळी तोंडावर आली असताना सोयाबीनलाही हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नाईलाजाने ३५०० ते ३८०० रुपये या भावाने व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे.
प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्यांना १००० ते ११०० रुपयांचे नुकसान होत आहे. राज्यकर्ते स्वतःची पोळी शेकण्यात इतके मग्न आहे की, शेतकऱ्यांकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीत कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे आमदार अडबाले यांनी सांगितले. cotton procurement
कापूसाचा १० वर्षांपूर्वीचा भाव ७ हजार रुपये होता. आज उत्पादन खर्च दुपटीने वाढले असताना केंद्र सुरू न झाल्याने व्यापारी ६००० ते ६५०० रुपयांच्या भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहे. त्यामुळे कापूसाचा उत्पादन खर्चही निघत नाही. आज २०१२ ला असणारा रासायनिक खताचा व फवारणी औषधीचा खर्च तिपटीने वाढला आहे. भाव मात्र ‘जैसे थे’च आहे.
सोयाबीन बियाणांचे व खताचे भाव प्रचंड वाढल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३५०० ते ३८०० हा भाव परवडत नाही, ही वास्तविकता आहे. शेतमजुरांचे वाढलेले दर, सोयाबीन कापणी व काढणी यांचे वाढलेले दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि शेतकऱ्यांच्या या दयनीय परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही. जी गत सोयाबीनची झाली आहे तीच गत कापूसाचे होण्याची शक्यता आहे. cotton procurement
शिताईचा (पहिली वेचणी) कापूस घरी येऊन पडत असताना आणि दिवाळी तोंडावर आली असताना अजूनही राज्यकर्त्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दिवाळीपूर्वी कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावे व सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या चार दिवस बंद राहणार आहेत.
Prohibition of alcohol 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून 19 व 20 नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.
Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागांकरीता बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 नियम 26(1)(सी) (1) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम 1969 मधील नियम 9 ए (2) (सी )(1) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 चे नियम 5(10) (बी) (सी) (1) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 5 (अ) (2) मधील तरतुदीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-2, सीएल-3, सीएल/ एफएल/टिओडी-3 एफएल-1, एफएल-2 एफएल-3 एफएल-4, एफएल/बीआर-2, टिडी-1 (ताडी) इत्यादि सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या खालीलप्रमाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
नमुद कालावधीत सदर ओदशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कारवाई करण्यांत येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्यात येईल, त्यांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.
10th ssc board exam दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?
10th ssc board exam राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात ( SSC ) महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.
सुकाणू समितीने कुठल्या आराखड्याला दिली मंजुरी?
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा ( SSC ) घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो. पण, पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते. 10th ssc board exam
गणित आणि विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळाले तरी काळजी नाही
आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत ( SSC ) विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयांवर आधारित विषय घेता येणार नाहीत असा शेरा गुणपत्रिकेवर नमूद केला जाईल. तसेच गणित, विज्ञान या विषयांतील अभ्यासक्रम घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत त्या विषयांत उत्तीर्ण ( SSC ) व्हावे लागणार आहे. 10th ssc board exam
तज्ञ काय म्हणतात? या बदलाबाबत माजी मुख्याध्यापक म्हणाले, की दहावीला अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणित आणि विज्ञान विषयांत तांत्रिकदृष्ट्या अनुत्तीर्ण झाल्यास गणित आणि विज्ञान विषयांशी संबंधित उच्च शिक्षण घ्यायचे नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण सुरू ठेवता येऊन उच्च शिक्षण घेता येऊ शकेल. मात्र, गणित आणि विज्ञानाशी संबंधित विषयांत उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विषयांसाठी पुनर्परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सध्याही ही पद्धती वापरली जाते आहे.
पुस्तकासहित परीक्षा राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी केले पाहिजे. त्या दृष्टीने भविष्यात पुस्तकासहित, वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न, ओएमआर शीटद्वारे परीक्षा घेण्याचा विचार भविष्यात करता येईल. विषय, परीक्षेच्या स्वरुपाप्रमाणे लॉग टेबल, योग्य स्वरुपाचे गणकयंत्र वापरण्यास परवानगी देण्याचा विचार करावा. मात्र, या मुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांशी तडतोड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
crime news पोलीस स्टेशन जिवती हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्न करतो म्हणुन फुस लावुन पळवुन नेवुन तिचेशी जबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Crime news वर्ष 2020 मध्ये जिवती येथील 21 वर्षीय आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळखी करीत तुझ्यासोबत लग्न करतो म्हणत फुस लावत तिच्याशी जबरीने लैंगिक अत्याचार केला होता.
याबाबत मुलगी व कुटुंबाने जिवती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, पोलिसांनी कलम 376, 376 (2) (एन), (जे), 506 भांदवी सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अनव्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा विशेष सत्र न्यायाधीश दीक्षित यांनी निकाल देत 21 वर्षीय आरोपीला 20 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली.
सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा.सरकारी अभियोक्ता श्री डी.व्ही. महाजन आणि पैरवी अधिकारी म्हणुन पोअं/1117 दिनेष गरमडे पोस्टे जिवती यांनी कामगिरी बजावली आहे.
Teacher training राज्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले आहे.
Teacher training या कालावधीत दिवाळी सुट्ट्या व निवडणुक ड्युट्या असल्याने सदर प्रशिक्षण स्थगित करून विधानसभा निवडणुकीतनंतर घेण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे (५० तासांचे) प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेच्या वतीने आयोजित केले आहे.
सदर कालावधीमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक बाहेरगावी जात असतात. तसेच या कालावधीदरम्यान विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्या आहेत.
अशावेळी सदर प्रशिक्षण योग्यरित्या होणे शक्य नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण तात्पुरते स्थगित करून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक, प्रधान सचिव, आयुक्त (शिक्षण), संचालक (प्राथ./माध्य/उच्च माध्य.) यांच्याकडे केली आहे.
nomination of candidates महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली.
वाहन चालक देणार टक्कर
nomination of candidates विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. nomination of candidates
सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार, चिमूर मधून भाजपचे बंटी भांगडीया, राजुरा मतदार संघात स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, मनसेचे सचिन भोयर व चंद्रपुर विधानसभा क्षेत्रातून मनसेचे मनदिप रोडे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.