Author: Admin

  • Pawan kalyan road show : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो

    Pawan kalyan road show आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर, रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, दुपारी दीड वाजता रोड शोच्या माध्यमातून ते आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार करणार आहेत.


    Pawan kalyan road show चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून त्यांच्या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    बहुजन समाज पक्षाने दिला अपक्ष उमेदवार डॉ. गावतुरे यांना पाठिंबा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहिर सभा पार पडल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे. Pawan kalyan road show


    दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पावर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे. येत्या 17 नोव्हेंबरला, रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत.

    आज डॉली चायवाला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात

    दुपारी दिड वाजता बागला चौक, गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस, बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे. तरी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Support of BSP : डॉ. गावतुरे यांना विधानसभेत पाठविणार, बसपाचा पाठिंबा

    Support of BSP डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यापासून विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष विविध पुरोगामी संघटना यांचा पाठिंबा रोज जाहीर होत आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आणि निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.


    Support of BSP EVM मशीन वरील अनु क्र. 8 वर त्यांचे बोध चिन्ह किटली आहे. बसपा ही एससी, एसटी ,ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक यांच्या सर्वांगीण विकासावर काम करणारी पार्टी आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे या स्वतः बहुजन ओबीसी आहेत.

    केटलीच्या प्रचारासाठी डॉली चायवाला मैदानात

    प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवारा विरुद्ध बहुजन समाजाचा त्या उमेदवार आहेत. त्यांना विधानसभेत पाठवून बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन समाज पार्टी त्यांना जाहीर पाठिंबा घोषित करीत आहे.


    आज देशात व राज्यामध्ये प्रतिगामी शक्तींनी हाहाकार माजवलेला आहे.भाजपा , कॉंग्रेस वाले ताई ची प्रतिमा मलीन करून पाहत आहे. हे आम्हास माहित आहे. डॉ. अभिलाषा ताई यांना मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांची झोप उडाली आहे. या मुळे विरोधी पक्ष ताई विरुद्ध भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत अश्या अफवा पसरवत आहे. मात्र जनतेला सत्य माहित आहे. Support of BSP

    तेव्हा प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवाराला हरविण्यासाठी व डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांना जिंकविण्यासाठी बहुजन समाज पार्टी च्या सर्व बूथ, सेक्टर, व विधानसभेतील पदाधिकारी ह्यांनी सहकार्य करावे असे आव्हान पक्षाद्रारे करण्यात येत आहे.


    प्रेस क्लब वरोरा नाका चंद्रपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बसपाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार गोगुलवार यांनी पक्षाचा पाठिंबा डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये रत्नाकर साठे जिल्हा उपाध्यक्ष आणि संजय मेश्राम जिल्हा सचिव तसेच डॉक्टर राकेश गावतुरे हजर होते. Support of BSP


    डॉ.अभिलाषा गावतुरे यांचे केवळ विधानसभा आणि जिल्ह्यामध्येच काम नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी बऱ्याच मंचावर काम केलेले आहे आणि त्यामध्ये बहुजन समाजामध्ये त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा अतुलनीय आहे त्यांचं सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यामध्ये अतुलनीय आहे. Support of BSP

    सामाजिक कार्यात त्यांनी कुठलेही जात पात धर्म लिंग पंथ प्रांत भाषा यांचा भेद न करता योगदान दिलेले आहे. अशा सक्षम बहुजन महिला ने बहुजन समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये करावे. या विश्वासाने आम्ही समर्थन जाहीर करीत आहोत अशी प्रतिक्रिया गोगुलवार यांनी दिली.

  • Power star pawan kalyan : किशोर जोरगेवार यांना मिळाली पॉवर स्टार ची साथ

    Power star pawan kalyan आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर,  रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, सकाळी  11 वाजता रोड शोच्या माध्यमातून ते आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार करणार आहेत.

    Power star pawan kalyan चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून त्यांच्या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटली च्या प्रचारासाठी येणार डॉली चायवाला

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चंद्रपूर मतदारसंघात जाहिर सभा पार पडल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असा शब्द भाजप नेत्यांकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आला आहे.

      दरम्यान, आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, जनसेना पार्टीचे अध्यक्ष तथा पावर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपूर दौरा नियोजित करण्यात आला आहे. Power star pawan kalyan

    येत्या 17 नोव्हेंबरला, रविवारी ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो करणार आहेत. सकाळी 11 वाजता बागला चौक, गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक, तुकूम मार्ग, ट्रॅफिक ऑफिस,  बसस्थानक मार्गे हा रोड शो एस.टी. वर्कशॉप येथे पोहोचणार आहे. येथे रोड शोचा समारोप होणार आहे.

    तरी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Exclusive Dolly Chaiwala : केटलीच्या प्रचारासाठी डॉली चायवाला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात

    Dolly Chaiwala बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हॉटसीट असलेल्या लढतीमध्ये सोशल मीडिया स्टार डॉली चायवाला केटलीच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबर रोजी येणार आहे.

    Dolly Chaiwala बल्लारपूर मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कांग्रेसचे संतोष रावत विरुद्ध अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांची तिरंगी लढत होणार आहे.

    वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचा वाद चव्हाट्यावर

    नुकताच लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झालेले सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे, आधी कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार असे चित्र होते मात्र अपक्ष उमेदवार गावतुरे यांच्या एंट्रीने प्रस्थापित पक्षांना घाम फुटला आहे.

    प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात असून कांग्रेस, भाजप पक्ष आपल्या स्टार प्रचारकांना मतदारसंघात प्रचार करायला लावत आहे, चळवळी मधून सामाजिक व आता राजकीय क्षेत्रात उदयास आलेले नाव म्हणजेच डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचार सभेला मिळत असलेला प्रतिसाद बघता चहा ची केटली ने वातावरण तापविले अशी चिन्हे आहे.

    तापलेल्या राजकीय वातावरणात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना चहा चा घोट पाजण्यासाठी नागपुरातील जगप्रसिद्ध डॉली चायवाला केटलीचा प्रचार करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दाखल होणार आहे.

    17 नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक आंध्रप्रदेश चे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सुद्धा बल्लारपूर शहरात येत आहे आणि याच दिवशी सायंकाळी डॉली चायवाला यांचं आगमन होणार असून दोघांपैकी कुणाची चांगली क्रेज आहे हे समजेल.

  • Important decision of Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाचा निर्णय

    Important decision of Sudhir Mungantiwar मुल शहराच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून आजपर्यंत कार्य करीत आलो आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन या पंचसूत्रीवर भर देण्यात येत आहे.

    Important decision of Sudhir Mungantiwar भविष्यात विकासाच्या मालिकेत मुल शहर वेगाने पुढे जाईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुल येथे नागरिकांशी संवाद साधताना ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते.

    चंद्रपुर जिल्ह्यात भाजपचा वाद चव्हाट्यावर

    आरोग्य सेवा अद्ययावत करण्यासाठी मुल व पोंभूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना मंजुरी दिली. मुल येथे 107 कोटी रुपये खर्चून 100 खाटांच्या सर्व सोयीसुविधायुक्त रुग्णालयाची निर्मिती होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलत देण्यात येत आहे.

    अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात काम होत आहे.शहरी भागातील आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना लागू करण्यात आली असून आवास योजनेचे अनुदान 2.50 लाखापर्यंत वाढविण्यात आल आहे.असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    गरिबांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन केले. गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. अतिवृष्टीमध्ये नागरिकांना आर्थिक सहकार्य केले. Important decision of Sudhir Mungantiwar

    दिव्यांगांना सायकल तसेच महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    कांग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करा – सुधीर मुनगंटीवार

    कांग्रेसच्या सत्तेच्या काळात विकासकामे झाली नाही

    या राज्यामध्ये 2 वर्षे 8 महिने काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसचा खासदार व पालकमंत्री असताना देखील विकास कामे केली नाहीत. मुल शहरातील जनता जातीपातीच्या राजकारणाला मत न देता, मुल शहराच्या विकासाला आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याला मत देतील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Important decision of Sudhir Mungantiwar

    मुलच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

    मुल शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी 80 टक्के रस्ते बांधून पूर्ण केले. येत्या पाच वर्षात शिल्लक रस्ते बांधून पूर्ण होतील. मुलमध्ये शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज उघडण्याचा निर्णय करण्यात आला आहे. तसेच मुल बायपासचा विषय निकाली काढण्यात येणार असून रेल्वे गेटवर ब्रिज करण्यास प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

    15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज

    मुल-पोंभुर्णाच्या मध्ये भारतातील सर्वात मोठा पोलाद उद्योग उभा राहत असून येथील तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. बचत गटासाठी बाजारपेठ उभारून महिला  सक्षमीकरणाचा प्रयत्न राहील. येत्या मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊन वर्षभरात कर्जमाफी करण्याचा निर्णय करण्यात येणार आहे. Important decision of Sudhir Mungantiwar

    विविध जाती प्रवर्गातील तरुण- तरुणींना 15 लाखापर्यंतचे व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • Controversy in BJP : चंद्रपूर जिल्ह्यातील “या’ विधानसभा क्षेत्रात भाजपचा वाद चव्हाट्यावर

    Controversy in BJP चंद्रपूर: वरोरा विधानसभा क्षेत्रातील भाजपमध्ये अंतर्गत कलह बघायला मिळत आहे. मात्र हा कलह आता चव्हाट्यावर आला असून ऐन निवडणुकीच्या काळातच असे प्रकार घडत असल्याने भाजप उमेदवाराच्या मताधिक्यावर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


    Controversy in BJP शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे संपर्कप्रमुख रमेश राजुरकर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेकरिता चंद्रपूरला आपल्या वाहनाने येत असताना बोर्ड या गावाजवळ त्यांच्याच पार्टीचे उमेदवार करण देवतळे यांच्या सोशल मीडिया प्रतिनिधीच्या वाहनाने कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला.

    वरोरा विधानसभा क्षेत्रातील मुख्य लढत

    या घटनेमध्ये रमेश राजूरकर यांच्यासह त्यांचा चालक थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे; रमेश राजुरकर यांनी वरोरा विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ऐनवेळी राजूरकर यांचे नाव कट करून करण देवतळे यांना उमेदवारी दिली. Controversy in BJP

    तेव्हापासून राजुरकर आणि देवतळे यांच्यामध्ये फारसे सौख्य नसल्याची चर्चा वरोरा विधानसभा क्षेत्रात आहे. विशेष म्हणजे; देवतळे यांच्या उमेदवारीवरून या क्षेत्रामध्ये नाराजी नाट्यही रंगल्याचे बघायला मिळाले. दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या तडजोडीनंतर हे नाट्य शमले.असे असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस सुरूच आहे. Controversy in BJP

    दरम्यान बोर्डा येथील घटनेवरून भाजप उमेदवार देवतळे आणि राजुरकर यांच्यातील वाद आता उघड होत आहे. या घटनेनंतर राजूरकर यांनी थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.

    किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅली मध्ये मी येणार – गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

    निवडणुकीच्या काळात असा प्रकार घडल्याने त्याचा परिणाम भाजप उमेदवारावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थेट उपमुख्यमंत्र्याकडेच राजूरकर यांनी निवेदन दिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस देवतळे यांना काय समज देतात याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे.
    —
    अशी झाली झटापट…..

    वरोरा येथून जवळच असलेल्या बोर्डा या गावाजवळ राजूरकर यांच्या वाहनाला देवतळे यांच्या सोशल मीडिया प्रतिनिधीच्या कार ने कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कार्यकर्त्यांना समजतात घोडपेठ गावाजवळ येऊन कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातील देवतळे यांच्या प्रतिनिधीला चांगला प्रसाद दिल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे देवतळे आणि राजुरकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचीही माहिती मिळाली आहे.

  • Fake narrative of Congress : कांग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करा – सुधीर मुनगंटीवार

    Fake narrative of Congress माझा बूथप्रमुख असो, पेजप्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, पक्षाचा पदाधिकारी असो वा सामान्य कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती पक्षाचा आत्मा आहे. आपण आजवर केलेला विकास व लोक कल्याणाची कामे हीच आपली शक्ती आहे.

    Fake narrative of Congress ही शक्ती घेऊनच आपल्याला जनतेसमोर जायचे आहे. विरोधकांचे फेक नरेटिव्ह हाणून पाडा. महायुती सरकारच्या लोक हिताच्या योजना जनतेपर्यंत पोचवा व विजयश्री खेचून आणा, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅली मध्ये मी येणार – गृहमंत्री अमित शाह

    भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख, पेज प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद सेतूच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,   लोकसभेत खोटं बोलत त्‍यांनी नरेटीव्‍ह सेट केला,  कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीत जाती-पातीचा आधार घेतला, संविधान बदलणार आहे असं खोटं रेटुन बोललेत मात्र त्‍यांनीच आज मध्‍यवर्ती बॅंकेच्या नोकर भरती मध्‍ये आता आरक्षण ठेवले नाही, हा कॉंग्रेसचा खरा चेहरा आहे, तो आपल्याला जनतेसमोर आणायचा आहे. Fake narrative of Congress

    अभिलाषा गावतुरे यांना मुस्लिम पर्सनल लॉ चे जाहीर समर्थन

    आपसामध्‍ये प्रेमभाव ठेवत, अथक परिश्रम घेत, सुक्ष्‍म नियोजनाच्‍या माध्‍यमातुन मतदार बंधू-भगिनींना मतदान केंद्रावर नेण्‍याची आपली जबाबदारी आहे,  यासाठी आपल्‍याला गावातील बुथचे राजकीय विश्‍लेषण करण्‍याची आवश्‍यकता आहे.  शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्‍ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटकांशी योग्य समनव्य राखण्याची आवश्यकता आहे, अडीच वर्ष काँग्रेसचा पालकमंत्री होता, पाच वर्षे काँग्रेसचा खासदार होता त्यांनी काय केले याचा जाब काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Fake narrative of Congress

     अनेक काँग्रेसी माळी समाजासाठी तुम्ही काय केले म्हणून विचारणा करतात. खरतर आपण महात्‍मा ज्‍योतीबा फुलेंच्‍या वंशजांना न्‍याय  दिला, क्रांतीज्‍योती सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला देण्‍यामध्‍ये माझा पुढाकार होता. पुण्यातील भिडे वाडयाचा काम व्‍हावे, भिडेवाड्यात स्‍मारक व्‍हावे यासाठी मी विधानसभेत चर्चा उपस्थित केली.

    महात्‍मा ज्‍योतिबा फुलेंच्या वाड्याचे नूतनीकरणाचे काम मी सुरू केले. हे सर्व काम जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आपण बारा हजारावरून पंधरा हजाराची मदत करणार आहोत, लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रु देणार आहोत ही माहिती जनतेला सांगा.

    बूथचे सूक्ष्म नियोजन करणे, स्लिप मतदारांपर्यंत पोचवणे, जाहीरनामा, प्रसिद्धी पत्रके मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम गतीने करावे असे आवाहन करत विजयासाठी सर्वशक्तीनिशी परिश्रम घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.

  • Warora Assembly Constituency : वरोरा विधानसभा मतदारसंघातील मुख्य लढत

    Warora Assembly Constituency वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात असून अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. परंतु मुख्य लढत ही महावीकस आघाडी व महायुती यांच्यात होईल असे चित्र निर्माण होत आहे.

    किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅलीत मी येणार – गृहमंत्री अमित शाह

    Warora Assembly Constituency 2019 च्या विधानसभा निवडणूकीत देखील वरोरा विधानसभेत काही उमेदवारांनी बंडखोरी केली होती. परंतु वरोरा विधानसभेतील सुज्ञ मतदारांनी अपक्ष उमेदवारांना नाकारले होते.

    या वर्षी होत असलेल्या निवडणूकीत देखील प्रत्येक उमेदवारांनी आपल्या विजयाचे गणित मांडायला सुरुवात केली असून, परंतु मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे व महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्यात होणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

    डॉ.अभिलाषा गावतुरे यांना जाहीर पाठिंबा

    दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक मतदारांपर्यंत उमेदवार पोहचतांना दिसत आहे. वरोरा विधानसभेतील आजवरच्या इतिहासात अपक्ष उमेदवारांना जनता नाकरत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. Warora Assembly Constituency

    राजकारणातील घोडेबाजार टाळण्यासाठी वरोरा-भद्रावती विधानसभेतील जनता अपक्षांना साथ देणार नाही हे मतमोजणी च्या दिवशी दिसणार आहे.

    महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी मागील दहा वर्षांच्या विकास कामांवर मते मागत असून महायुतीचे उमेदवार विविध प्रचारांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहे. काही दिवसात या दोन राष्ट्रीय पक्षापैकी कोण प्रचारात आघाडी घेईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    बॉटल नको

  • Home Minister Amit Shah : किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅली मध्ये मी नक्की येणार – अमित शाह

    Home Minister Amit Shah 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करणार असे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी चंद्रपुरात आयोजित महायुती उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केले.

    Home Minister Amit Shah विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा काही दिवसांनी थंडावणार आहे, तत्पूर्वी विविध पक्षाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लढत आता चुरशीची

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, राजुरा देवराव भोंगळे व वरोरा करन देवतळे आणि ब्रह्मपुरी कृष्णा सहारे या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह चंद्रपुरात दाखल झाले होते. मात्र अवघ्या 6 मिनिटात त्यांनी आपले भाषण गुंडाळल्याने हजारोच्या संख्येत एकत्र झालेल्या नागरिकांनी इतरांचे मार्गदर्शन ऐकणे टाळले, आणि हळूहळू कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला. Home Minister Amit Shah

    आपल्या 6 मिनिटांच्या संबोधनात शाह म्हणाले की राज्यातील महायुती सरकारला आपण पुन्हा निवडून द्यावे.

    ग्रामीण भागात आमदार जोरगेवार यांची पदयात्रा

    आपल्याला राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालणारी महायुती सरकार हवी की औरंगजेब फॅन क्लब च्या अध्यक्षांची सरकार हवी आहे, देशातील भाजप सरकारने राम मंदिराचे निर्माण केले, कलम 370 हटविली, तिहेरी तलाक, caa कायदा आणला आता आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा बदलविणार आहो. Home Minister Amit Shah

    शाह पुढे म्हणाले की आम्ही नागरिकांच्या हिताचे कायदे आणतो मात्र त्याला कांग्रेस, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा नेहमी विरोध असतो, आम्ही राज्यातील अनेक जिल्ह्याचे नाव बदलविले त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला.

    चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद मोदी जी यांनी संपुष्टात आणला आणि पुढे 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश नक्षलवाद मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

    केंद्राने महाराष्ट्र राज्याच्या 15 लाख कोटी दिले, असंख्य प्रकल्प महायुती सरकारने राज्यात आणले, त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी वाढतील यात काही शंका नाही. महाराष्ट्र राज्याचा गौरव महाविकास आघाडीने बुडविला तो गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा महायुती सरकारला निवडून द्यावे, आज मला लवकर जायचे असल्याने मी काही बोलणार नाही मात्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार किशोर जोरगेवार यांना आपण पुन्हा निवडून दिल्यास त्यांच्या विजयी रॅलीत मी नक्की चंद्रपुरात येणार.

    भाषण आटोपल्यावर अमित शाह सभास्थळावरून निघून गेले त्यानंतर स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी नागरिकांनी आवड दाखविली नाही आणि हळूहळू सभेतून काढता पाय घेतला.

  • All India Muslim Personal Law Board : अभिलाषा गावतुरे यांना मिळालं जाहीर समर्थन

    All India Muslim Personal Law Board 72 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधून उभ्या असलेल्या महिला उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना केवळ विधानसभेतील किंवा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळत असून आता थेट राष्ट्रीय स्तरावरील मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च पैकी एक असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे.

    नेत्यांच्या सभेत बॉटल ची नो एंट्री

    All India Muslim Personal Law Board आज आरएसएस आणि भाजपाच्या माध्यमातून देशामध्ये प्रतिगामी शक्तींनी हाहाकार माजवलेला आहे आणि रंगांचे शोषण करणारी व्यवस्था येथे पुनर स्थापित झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपाला हरवू शकेल अशा सशक्त उमेदवारांना समर्थन देऊन आपली मते त्यांना देण्यासाठी मुस्लिम समाजाला प्रवृत्त करण्याची मोहीम मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांनी चालविलेली आहे.



    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मुस्लिम समाजाने राज्यस्तरावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे त्यांना असं वाटते की जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपला हरवू शकत नाही तिथे त्यांनी दुसऱ्या सशक्त उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये एक 72 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उभे असलेल्या लोकप्रिय समाजसेविका डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला आहे.

    चंद्रपुरात पैश्यांचा पाऊस

    डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांचे केवळ विधानसभा आणि जिल्ह्यामध्येच काम नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी बऱ्याच मंचावर काम केलेले आहे. All India Muslim Personal Law Board

    त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा अतुलनीय आहे त्यांचं सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यामध्ये कुठेही तुलना करण्या सारखं नाही आणि ते करत असताना त्यांनी कुठलेही जात पात धर्म लिंग पंथ प्रांत भाषा यांचा भेद न करता योगदान दिलेला आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/11/latest-breaking-news-in-ballarpur-assembly/

    अशा कार्याची दखल घेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डचे देशांमध्ये प्रसिद्ध असलेले खलीलूलरहमान मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांनी समाज सर्व समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये करावे अशी अभिलाषा व्यक्त केली आहे. All India Muslim Personal Law Board