Raju Reddy Congress Leader News : चंद्रपूर: घुग्गुस येथील काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरी 9 मार्च 2025 रोजी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांना प्राथमिक तपासात असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
घटना कशी उलगडली? 9 मार्च रोजी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, घुग्गुसमध्ये राजू रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाला अशी बातमी पसरली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले होते. ghuggus shooting incident
गोळीबाराच्या अफवेचा पर्दाफाश पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावर किरायाने राहणाऱ्या अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्चमध्ये रिकाम्या काडतुसाचा केस आढळून आला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर कोणत्याही पुराव्यांमध्ये गोळीबार झाल्याचे संकेत आढळले नाहीत. gunfire news in maharashtra
पोलिसांचा पुढील तपास सुरू भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, रिकामा काडतुस केस तिथं कसा आला? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षकांनी जनतेला गोळीबारासंदर्भात अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
Chandrapur shooting incident : चंद्रपूर/ घुग्घुस : शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने पिस्तूलने गोळीबार केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Chandrapur crime news
गोळीबार आणि पोलिसांचा तपास
घुग्घुस येथील तुकडोजी महाराज वॉर्डात राजू रेड्डी यांचे घर आहे. ते आपल्या मोठ्या मुलासोबत राहतात. रविवारी रात्री घरी असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरावर गोळी झाडली, जी वरच्या माळ्यावर लागली. विशेष म्हणजे, हा माळा त्यांनी किरायाने दिला आहे. गोळीबाराच्या आवाजाने रेड्डी यांनी घराबाहेर येऊन पाहिले, मात्र हल्लेखोर पसार झाले होते. Chandrapur criminal activities
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. फायरिंग झालेली एक गोळी पोलिसांना मिळाली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला, ज्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. पोलीस यंत्रणेवर हल्ले होणे आणि आता काँग्रेस नेत्याच्या घरावर थेट गोळीबार होणे, या घटना गुन्हेगार आता पोलिसांनाही जुमानत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करतात.
चंद्रपूर शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलून गुन्हेगारांना तातडीने गजाआड करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
Padoli traffic signal : पडोली गावाच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, आणि वाचनालय उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पडोली चौकातील वाहतूक सिग्नलचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, नामदेव डाहुले, पडोलीचे सरपंच विक्की लाडसे, माजी सैनिक मनोज ठेंगणे, अनिल डोंगरे, रणजीत डवरे, सुरज पेद्दूलवार, प्रज्वलंत कडू, शोभाताई पिदुरकर, अनुताई ठेंगणे तसेच पडोली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sudhir Mungantiwar news
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “सत्तेत असो किंवा नसो, जनतेच्या हितासाठी मी नेहमीच लढा दिला आहे. जनतेकडून एखादी मागणी केली जाते. ती मागणी संसदीय आयुधांचा वापर करून आणि आवश्यकता असल्यास आंदोलन करीत ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजपर्यंत काम केले आहे. Padoli village news
पडोली चौकाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या चौकात ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने झाली. अनेक प्रश्न चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून सोडवली गेली. विशेषतः माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी या चौकात वारंवार होणारे अपघात, वाढती वर्दळ आणि जड वाहतूकीच्या समस्येवर तोडगा म्हणून वाहतूक सिग्नल बसवण्यासाठी उपोषण केले. त्यांच्या मागणीची दखल घेत स्वतः उपोषण स्थळी भेट देत या मतदारसंघाचा आमदार नसताना देखील या चौकाचे सौंदर्यीकरण व वाहतूक सिग्नलसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले. Chandrapur development
पडोली गावाच्या विकासासाठी यापूर्वीच पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, बोरवेल आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. रेल्वे विभागामार्फत हटविल्या जाणाऱ्या घरांचा प्रश्न सोडविला. पडोली येथे 1 कोटी 47 लाख रुपये खर्चून वाचनालय उभारले जात आहे. या गावाच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देईल. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना सर्वात पहिले दर्शन पडोलीचे होते आणि पडोली गाव जितके चांगले करता येईल त्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील, असा विश्वास देखील आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar news
राजकारणात दिलेला शब्द पाळला पाहिजे, यादृष्टीने आजवर काम केले. मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. एखाद्या प्रश्न कायदेशीर अडचणीने राहिला तेवढाच राहिला असेल, असेही ते म्हणाले.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल:
महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक शक्ती असून त्या सक्षम झाल्याच पाहिजेत, असे श्री. मुनगंटीवार सांगितले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्यभागी एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र उभारले जात असून येथे 62 कौशल्य आधारित कोर्सेस असणार आहेत. तसेच स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होत असून, विशेष बाब अंतर्गत मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.याशिवाय, मोरवा येथे फ्लाइंग क्लबमुळे या भागातील मुलींना पायलट बनण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः पडोलीच्या मुलींनी पायलट व्हावे, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अधिक पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
पडोली ग्रामपंचायतने या चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचा निर्णय केला आहे. या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड उभारावा. यासाठी लागणारा आवश्यक निधी स्वतः उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
MHT CET free mock test : शिवसेना युवासेना दरवर्षी महाराष्ट्रभर आरोग्य, रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षणाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, यावर्षी एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे.
राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी तसेच विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET आणि MHT-CET सराव परीक्षा (Mock Test) मोफत आयोजित केली जात आहे. या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी स्वतःच्या तयारीचा आढावा घेण्याची संधी मिळेल तसेच परीक्षेतील अडचणी समजून त्यावर मात करता येईल. NEET mock test free
मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे
सराव परीक्षेचे महत्व आणि उद्दिष्टे:
वास्तविक परीक्षेचा अनुभव: विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना येईल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
वेळ व्यवस्थापन कौशल्य: विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत प्रश्न सोडवण्याची सवय लागेल, जे अंतिम परीक्षेत उपयुक्त ठरेल.
स्वतःच्या तयारीचा आढावा: या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आपली बलस्थाने आणि दुर्बलता ओळखता येतील.
स्पर्धात्मक परीक्षेची मानसिक तयारी: परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याचे मार्गदर्शन मिळेल.
शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी संधी: महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना हा उपक्रम मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरेल. NEET mock test online free
परीक्षा कोणांसाठी आहे?
१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी
NEET आणि MHT-CET परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी
वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी
विद्यार्थ्यांसाठी संधी – मोफत सराव परीक्षा
शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आयोजित या मोफत Mock Test मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संपूर्ण स्वरूपाचा अनुभव घेता येणार आहे. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा, गुणांकन पद्धती आणि निकालानुसार मिळणारे परामर्श हे सर्व घटक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची योग्य दिशा ठरविण्यास मदत करतील. MHT CET mock test with solution
पालक आणि शिक्षक यांच्यासाठी आवाहन
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांनी या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची माहिती द्या आणि त्यांच्या भविष्यासाठी मोलाची साथ द्या.
तुम्हाला काय करायचे आहे?
१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेबद्दल माहिती द्या.
इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून परीक्षा द्यावी.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून द्या.
शिवसेना युवासेनेच्या या उपक्रमामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेच्या दडपणाशिवाय योग्य तयारी करू शकतील. NEET आणि MHT-CET Mock Test हे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक महत्वाचे पाऊल ठरेल. सदर आयोजन यशस्वीरीत्या पार पडावे व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, विभागीय सचिव निलेश बेलखेडे, शहर प्रमुख शहाबाज शेख यांनी चंद्रपूर, राजुरा व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बैठक घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशित केले आहे.
सदरील आयोजन युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे, मागील वर्षी सुद्धा मॉक टेस्ट चा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://yuvasenacet.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Chimur Protest : छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) अवमानकारक मजकूर टाकुन समाजात तेढ पसरविणाऱ्या चिमुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रविवारी (9 मार्च) चिमूर शहरातून निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये याकरीता प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली. चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेच्या निषेधार्थ नागरिक मोर्च्यात सहभागी झाले.
येथील आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेख याने गुरूवारी सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) छत्रपती संभाजी महाराजाच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) विरोधात अवमानकारक पोस्ट केली. दिवसभरानंतर या पोस्टच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले. त्याच रात्री संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठाणचे कार्यकर्त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याकरता तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिमूर पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेख (वय 21) याला अटक केली. त्याच रात्री संभाजी चौकात संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन घटनेचा कडाडून निषेध केला. त्यानंतर आरोपीच्या चिकन दुकानाची तोडफोड करीत टायर जाळले. लगतच्या दुकानाचीही नासधूस झाली. रात्री बारा ते एकच्या सुमारास चिमूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने वेळीच घटना नियंत्रणात आणली. Marathi News
या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले, आज रविवारी चिमूर शहरात सकाळी हिंदू समाजाच्या वतीने आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याकरिता आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. बालाजी मंदिर मंदिरापासून मोर्चाला सकाळी 10 वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी शहरातून सकाळी 9 वाजता बाईक रॅली काढून सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली. मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा डोंगरवार चौक, नेहरु चौक, इंदिरा नगर नंतर तहसील कार्यालयात पोहचला. या ठिकाणी तहसीलदार श्रीधर राजमाने यांना निवेदन देण्यात आले. Religious Tension
हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट समाज माध्यमावर टाकल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात देशद्रोहाची कठोरकारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी निवेदनातून केली.त्यानंतर मोर्चा परत मासळ रोड, चावळी चौक, शिवाजी महाराज चौक, मुख्य बालाजी मंदिर येथे पोहचला. Hindu Community Protest
या ठिकाणी मोर्चा विसर्जित करण्यात आला. हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामुळे आज चिमूर शहरातील बाजारपेठ सकाळपासून पुन्हा बंद ठेवण्यात आली. नागरिकांनी मोर्चा सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. पार्श्वभूमी लक्षात घेता चिमूर शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 16 अधिकारी, 82 अमलदार, 1आरसीपी पथक , 44 सैनिक, 44 होमगार्ड आदींची तैनाती करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
chandrapur sand smuggling : चंद्रपूर जिल्ह्यातील जमनजेट्टी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीला आळा घालावा आणि तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी, चंद्रपूरच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. Chandrapur illegal sand mining
अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तसेच शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुली तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्करी निर्भयपणे सुरूच आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी यांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आम आदमी पार्टीने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.
गँगवारला मिळतंय खतपाणी! जिल्ह्यात अवैध धंद्यांमधून गँगवार उदयास येत असून अधिकारी व तक्रारदारांवर भविष्यात हल्ले होऊ शकतात. त्यामुळे अवैध धंद्यांचे प्रमुख सूत्रधार आणि त्याचा आका यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे दिला आहे. Gang wars due to sand smuggling
जमनजेट्टी परिसरात अवैध रेती तस्करी सुरू असून तो परिसर सिटी पोलीस स्टेशनपासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. एवढ्या जवळ असतानाही ही अवैध वाहतूक कशी सुरू आहे? असा सखोल प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.
यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर महिला अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Inspirational study center for students चंद्रपूर – विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लायब्ररी आणि अभ्यासिका अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी लायब्ररी सुरू होत असताना शासनाच्या लायब्रऱ्या मात्र दुर्लक्षित आहेत. मात्र, दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिका हे याचे अपवाद ठरले असून, पुढील काळात ही अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन प्राध्यापक राजेश पेचे यांनी केले. Career success stories of students
दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिकेच्या माध्यमातून दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कुमारी समिक्षा राजेंद्र आखरे हिची सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये निवड झाली आहे. तसेच, कुमारी नेहा खुशाल आंबोरकर हिची भद्रावती तालुका आरोग्य पथकात एंटोमोलॉजिस्ट (Entomologist) पदावर निवड झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या सन्मानार्थ रविवार, 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता साई मंदिर, दिवंगत माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर अभ्यासिकेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांनी या विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Balubhau Dhanorkar Study Center
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राजेश पेचे, गणपर्व चॅरिटेबल ट्रस्ट,साई मंदीर भिवापूर वॉर्ड चंद्रपूर चे अध्यक्ष अशोक कोटकर, काँग्रेस अल्पसंख्यक नेते सोहेल रजा शेख, जिल्हा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, गुरुदेव सेवा मंडळ भिवापूर वॉर्ड महिला अध्यक्षा पुष्पा पायघन, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेश आखरे, माजी नगरसेविका मंगला आखेर, नमस्ते चांदा फाउंडेशन चे सचिव गोविल मेहरकरे, नमस्ते चांदा फाउंडेशन चे कोषाध्यक्ष सागर महाडोळे, ॲड. गणेश अमृतकर, पांडूरंग आदे, संजू धोबे, दर्शन बुरडकर, योगेश देवतळे, सचिन किरणे, हर्षल विधाते, श्रेयस मैत्र यांची उपस्थिती होती.
Chandrapur law and order : चंद्रपूर : जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढला असून आता पोलिसांवरच हल्ले होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच जटपूरा गेटजवळ एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच, पठाणपुरा गेटजवळील एका बार बाहेर दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे. Chandrapur Ritesh Tiwari
तिवारी यांनी सांगितले की, गुन्हेगारांचा वाढता आत्मविश्वास आणि कायदा-सुव्यवस्थेचा बिघडलेला धागा, हे सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे. आता प्रश्न असा आहे की, या गुन्हेगारांना नेमका कोणाचा आश्रय मिळतोय? चंद्रपूर शहरात दिवसाढवळ्या गुन्हे घडत असताना, पोलिसांवरच हल्ले होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णत: बिघाड झाल्याचे स्पष्ट होते. Chandrapur crime
राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आपण त्वरित कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा पोलिसांवरील आणि प्रशासनावरील विश्वास उडण्याचा धोका आहे. चंद्रपूरला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. Chandrapur police attack
या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांवरच होणाऱ्या हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही, तर जनतेचा रोष उफाळून येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.
Child care jobs : नागभीड: गरजू आणि निराधार मुलांच्या जीवनाला आकार देणाऱ्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह, नागभीड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त (अनुदानित) या संस्थेत रिक्त असलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Health worker jobs
मुलांशी संवाद साधण्याची आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची क्षमता आवश्यक.
योगा शिक्षक:
बी.पी.एड. (B.P.Ed.) पदवी आवश्यक.
मुलांना योगाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता आवश्यक.
मदतनीस कम चौकीदार:
एस.एस.सी. (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
संस्थेच्या सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आवश्यक.
सफाई कर्मचारी:
4थी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक.
संस्थेच्या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आवश्यक.
आरोग्य कर्मचारी:
एच.एच.सी. (H.H.C.) किंवा एम.पी.डब्ल्यू. (M.P.W.) पदवी आवश्यक.
मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि प्राथमिक उपचार करण्याची क्षमता आवश्यक.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे अधीक्षक, स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह, नागभीड यांच्याकडे जमा करावेत. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी, कृपया मोबाईल क्रमांक 9529282627 वर संपर्क साधावा. Nagbhid jobs
महत्वाचे:
ही भरती प्रक्रिया तात्काळ स्वरूपाची असल्याने, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
संस्थेच्या नियमानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना योग्य वेतन आणि सुविधा दिल्या जातील.
CSTPS workers police verification rule : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांसाठी दर सहा महिन्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन जमा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, ही अट अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना तातडीने पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर येथील कामगारांना आता दोन वर्षांनी एकदाच पोलिस व्हेरिफिकेशन द्यावे लागणार आहे.
कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी हिराई विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड, उप मुख्य अभियंता श्याम राठोड, उप मुख्य अभियंता अमित बंकर, उप मुख्य अभियंता नितीन रोकडे, प्रभारी उप मुख्य अभियंता अशोक उमरे, अधीक्षक अभियंता महेश राजूरकर, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नंदकिशोर चन्ने, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, प्रकाश देवतळे, एमआयडीचे सचिव संदीप बांटीया भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, कामगार संघटनेचे हेरमन जोसेफ, करण नायर, अमोल शेंडे, विश्वजित शहा, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, कार्तिक बोरवार उपस्थिती होती. Kishor Jorgewar workers meeting Chandrapur
सीएसटीपीएस येथील कामगारांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सीएसटीपीएस प्रशासनाकडून दर सहा महिन्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सादर करण्याचा नियम लागू करण्यात आला होता, त्यामुळे अनेक वर्षांपासून कामगारांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता. ही अट कामगारांसाठी अडचणीची ठरत असल्याने, सदर नियम बदलण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. त्यामुळे आता कामगारांना दर दोन वर्षांनी एकदाच पोलिस व्हेरिफिकेशन सादर करावे लागणार आहे. याशिवाय, यापूर्वी कामगारांना एक महिन्याचे गेट पास देण्यात येत होते, मात्र आता त्याची मर्यादा वाढवून तीन महिने करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगारांवरील अनावश्यक बोजा हलका होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Chandrapur power plant employment news
या बैठकीत तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अमोल बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या युनिट ८ व ९ बेल्ट ऑपरेटर यांना १९ टक्के वेतनवाढ अद्याप मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दि. १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत थकीत वेतन भागविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. तसेच नवीन टेंडर लागू झाल्यानंतरही वेतनवाढ लागू न झाल्याने जानेवारी महिन्यापासून वाढीव वेतन देण्याची मागणी कामगारांनी केली होती. यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कुणाल एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळणे, फक्त ५०% वेतन देणे आणि पीएफ संदर्भातील तक्रारी यासारख्या गंभीर विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली. CSTPS environmental issues and solutions
या प्रकरणाची चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. युनिट ८ आणि ९ मधील बेल्ट ऑपरेटर व बंकर ऑपरेटर यांना त्यांच्या कौशल्यानुसार वेतन मिळावे, यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.
द्वारका लेआउट आणि राऊत लेआउटमधील पावसाळी पाणी तुंबण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिमेंट काँक्रीट आणि आरसीसी बॉक्स बांधणीच्या प्रस्तावावर विचार झाला. तसेच सीएसटीपीएसमधून वाहणाऱ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता व खोलीकरण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण, कार्बन उत्सर्जन कमी करणे, फ्लाय ऍश व्यवस्थापन आणि स्थानिक भागात राख पडल्यामुळे होणारे आरोग्य व शेतीवरील परिणाम यावर उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. स्थानिक विकास आणि रोजगाराच्या अनुषंगाने, सध्या कार्यरत असलेल्या कामगारांपैकी स्थानिक व बाहेरून आलेल्यांचे प्रमाण स्पष्ट करण्यासाठी माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. Chandrapur power plant employment news
ही बैठक कामगार हक्क, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यांसाठी महत्त्वाची ठरली असून, बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बैठकीला सीएसटीपीएसमधील कामगार, शेतकरी बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही बैठक कामगार हक्क, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यासाठी महत्त्वाची ठरली असून, बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बैठकीला सीएसटीपीएसमधील कामगार, शेतकरी बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.