Author: Admin

  • Chandrapur Leprosy Awareness Marathon | ‘स्पर्श-2025’ कुष्ठरोग जनजागृती अभियान: चंद्रपुरात ‘रन फॉर लेप्रसी’

    Chandrapur Leprosy Awareness Marathon

    Chandrapur Leprosy Awareness Marathon : सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता चंद्रपूर जिल्हयात स्पर्श -2025 अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर, तालुका  आरोग्य अधिकारी, वरोरा व महारोगी सेवा समिती संचालीत आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘रन फॉर लेप्रसी’ मॅराथॅानचे आयोजन 16 मार्च 2025 ला सकाळी 7 वाजता आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे करण्यात आलेले आहे. स्पर्धकांनी सकाळी 6.30 वाजता मॅराथॉन  ठिकाणी उपस्थित राहावे. (Anandvan Run for Leprosy)

    वरोरा शहरात 2 किलो गांजा जप्त

     या मॅराथॉन स्पर्धेत 15 वर्षावरील सर्व मुला- मुलींना सहभाग घेता येणार असून माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व सामान्य नागरीक,  कुष्ठरोगाबाबत कार्य  करणाऱ्या स्वयंसेवा संस्था, शासनाचे विविध विभाग , डॉक्टर संघटना , पुरस्कार प्राप्त खेळाडु, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचाही समावेश राहणार आहे. (Leprosy Awareness Campaign)

    सदर मॅराथॉन करीता Free Registration Scanner उपलब्ध करूण देण्यात आले आहे. त्याद्वारे विनामुल्य नोंदणी करायची आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियाना अंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य “कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृध्दींगत करु, त्याबाबतचा गैरसमज दूर करू व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती राहणार नाही याची दक्षता घेऊ” या उपक्रमात नागरीकांनी उत्स्फुर्तपणे  सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोले,  जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. अशोक कटारे , महारोगी सेवा समिती आंनदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, सहाय्यक संचालक( कुष्ठरोग) चंद्रपूर चे डॉ. संदीप गेडाम यांनी केले आहे.

  • Warora crime news । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – वरोऱ्यात गांजासह आरोपी गजाआड!

    Warora crime news

    Warora crime news : होळी सणाच्या पार्शवभूमीवर चंद्रपूर पोलिसांचे अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम सुरु आहे. १३ मार्चला वरोरा पोलिसांनी गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया असा एकूण १ किलो ९९२ ग्राम जप्त करण्यात आला, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

    धुलीवंदनाच्या दिवशी दारू प्यालं तर…

    १३ मार्च वरोरा पोलीस पेट्रोलिंग करीत असतानां एक इसम टेम्भूर्डा चौकात संशयास्पद रित्या उभा होता, त्या इसमाच्या हातात बॅग बघून पोलिसाना संशय आला. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करीत बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये १ किलो ९९२ ग्राम गांजा वसंपत्ती व बिया आढळून आली. Drug smuggling latest news

    पोलिसांनी आरोपी प्रफुल किशोर रामटेके ला अटक करीत त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोउपनि दीपक ठाकरे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, विशाल राजूरकर, मोहन निषाद, दिलीप सूर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे व महेश गावतुरे यांनी केली.

  • Chandrapur Holi Safety । चंद्रपूर पोलिस सज्ज

    Chandrapur Holi Safety
    होळीत मद्यपी वाहनचालकांवर करडी नजर! होळीत रॅश ड्रायव्हिंग? पोलिसांचा इशारा, कारवाई अटळ!

    Chandrapur Holi Safety :  होळी व धुलीवंदन हा उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सवादरम्यान मोठ्या  प्रमाणात रंगाची उधळण  होते.  तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते.  या कालावधीत काही अतिउत्साही तरुणमंडळी  मद्य प्राशन करून दुचाकी / चारचाकी  वाहने भरधाव  वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने 13 आणि 14 मार्च  या कालावधीत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी  नाकेबंदी लावण्यात येणार आहे. (Drunk Driving Chandrapur)

    चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल

    त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य  प्राशन करून  वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची सर्वांनी नोंद  घ्यावी. जिल्हयातील वाढते अपघात कमी करण्याकरीता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक  अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Holi Festival Drunk Driving)

    तरी होळी व  धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जाऊ नये, याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या  नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur ranking Maharashtra । चंद्रपूरने राज्यात रचला इतिहास – विकास निर्देशांकात मिळवला पहिला क्रमांक

    Chandrapur ranking Maharashtra

    Chandrapur ranking Maharashtra : विकासाच्या विविध निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याची दखल शासन स्तरावरून होत असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. (Vinay Gowda IAS achievements)

    ३ एप्रिलपासून चंद्रपुरात चैत्र नवरात्री यात्रा, प्रशासन सज्ज, आमदार जोरगेवार यांनी घेतला आढावा

    सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र  संस्थेतर्फे’ विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात विविध विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या निर्देशांकाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडले. याच कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गौडा यांना सन्मानित करण्यात आले. (Chandrapur smart governance)

    होळी व धूलिवंदन मध्ये मद्यपी वाहन चालकांवर पोलीस प्रशासनाची राहणार नजर

    चंद्रपूरने या बाबींमध्ये पटकाविला प्रथम क्रमांक : कार्यात्मक एफआरयु (प्रथम संदर्भ युनीट्स्‍) चे प्रमाण (आरोग्य विभाग), गर्भवती महिलांमधील ॲनिमिक महिलांची टक्केवारी (आरोग्य विभाग), सबसिडी वितरणातील साधलेल्या टक्केवारीची प्रगती (कृषी विभाग), लक्ष्याच्या तुलनेत ड्रीप सिंचनासाठी डीबीटी द्वारे निधी प्राप्त करणा-या लाभार्थ्यांची टक्केवारी (कृषी विभाग), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक लेखा अहवालाची वेळेत प्रसिध्दी (चंद्रपूर महानगरपालिका), प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी (ग्रामीण विकास), सुधारीत स्वच्छता सुविधा असलेल्या कुटुंबाची टक्केवारी (ग्रामीण विकास), विशाखा तक्रारींची निस्तारणाची टक्केवारी आणि सुधारीत दुर्घटना स्थळांची टक्केवारी व सुधारणा करणे बाकी असलेली स्थळे (परिवहन विभाग) या निर्देशांकात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

  • kishor jorgewar on mahakali yatra । चैत्र नवरात्र: चंद्रपूर सज्ज, भाविकांसाठी विशेष सुविधा!

    kishor jorgewar on mahakali yatra

    आमदार जोरगेवारांनी घेतला तयारीचा आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश!

    kishor jorgewar on mahakali yatra :  3 एप्रिल पासून चंद्रपूरात सुरु होणार असलेल्या चैत्र नवरात्र यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या अधिका-यासंसह यात्रा परिसराची पाहणी केली. ही यात्रा आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली असून, भाविकांना आध्यात्मिक शांती आणि सुरक्षित दर्शन अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. Chandrapur Navratri Yatra

    चंद्रपूर-यवतमाळ करांची व्यथा, खासदार धानोरकर यांचा रेल्वे विभागाला सवाल

      या  यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी यादव, शहर पोलिस निरिक्षक प्रभावती ऐकुरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, शहर अभियंता विजय बोरीकर, यांच्यासह वेकीलीचे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आदि अधिका-यांची उपस्थिती होती.

     आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनांनतंतर चैत्र नवरात्र यात्रेत येणा-या भाविकांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात बैठक घेत अधिका-यांना महत्वाच्या सुचना केल्या होत्या. तर आज त्यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसराला भेट देत सर्व विभागाच्या अधिका-यांसह परिसरात करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली आहे. Mahakali Temple Chandrapur

       पार्किंग व्यवस्था, यात्रा परिसराचा विस्तार, राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता, ट्रॅफिक नियंत्रण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. श्री महाकाली माता यात्रा ही चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक यात्रा असून, राज्यभरातून लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सुसज्ज नियोजन करणे ही आपली जबाबदारी आहे. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे होईल आणि सर्व सुविधांची पूर्तता होईल असे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

    chandrapur navratri yatra

      यात्रेच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येताना आणि परत जाताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे नियोजित केली पाहिजे. कोणत्याही प्रकारे ट्रॅफिक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाहेरून येणार्या भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. Navratri Yatra Traffic Control

      पिण्याच्या पाण्याची सोय पुरेशा प्रमाणात असावी. उन्हाच्या झळा वाढलेल्या असताना, भाविकांना शुद्ध आणि थंड पाणी सहज उपलब्ध होईल, यासाठी यात्रा मार्गावर आणि मंदिर परिसरात भरपूर पाण्याचे ठिकाणे असावीत. यात्रा परिसरात कचरा साचणार नाही, यासाठी नियमित साफसफाई आणि कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था महापालिका आणि मंदिर प्रशासनाने उभारावी, यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे.

    गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असावा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस विभागाला केल्या आहे. व्यवसायिक आणि दुकानदारांनी देखील यात्रेच्या वेळेस शिस्तबद्ध पद्धतीने आपला व्यवसाय करावा. वीज वितरण आणि इतर महत्त्वाच्या सुविधा पुरवणार्या यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. Chandrapur Temple Crowd Management

    रस्ते व्यवस्थित असावेत, प्रकाशयोजना योग्य प्रकारे कार्यरत असावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी सर्व स्तरांवर योग्य नियोजन असावे अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.  यावेळी  श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनिल महाकाले, मिलिंद गंपावार, पवन सराफ, अजय वैरागडे, सुरेश महाकुळकर, अॅड. विजय मोगरे, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकुर, मनोज पाल, छबु वैरागडे, सविता दंढारे, अमोल शेंडे, करणसिंग बैस, नकुल वासमवार, सलीम शेख, कालीदास धामनगे, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.

  • Chandrapur Yavatmal train services । रेल्वे सुविधांचा अभाव: चंद्रपूर-यवतमाळकरांची व्यथा

    Chandrapur Yavatmal train services
    प्रवाशांच्या हक्कासाठी खासदार आक्रमक!

    Chandrapur Yavatmal train services : चंद्रपूर व यवतमाळ हे औद्योगीक जिल्हे असून पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही रेल्वे सेवा योग्य प्रमाणात मिळत नसल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत शुन्य काळात प्रश्नाद्वारे व्यक्त करीत दोन्ही जिल्ह्यात रेल्वे सेवा मजबुत करण्याची मागणी सभागृहात केली.

    चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात अनेक उद्योग असून या ठिकाणी रेल्वे सुविधा अपुऱ्या आहेत. विद्यार्थी, नागरीक व व्यापारी वर्गाला पुणे, मुंबई जाण्याकरीता रेल्वे सुविधा नसल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी तथा निवेदने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.

    चंद्रपुरात युवकाजवळ मिळाला देशी कट्टा

    त्यासाठी चंद्रपूर व यवतमाळ येथे रेल्वे च्या सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे या करीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 12 मार्च रोजी संसदेत प्रश्न उपस्थित करुन बल्लारपूर-मुंबई तसेच, बल्लारपूर-पुणे या मार्गावर जलद, अतिजलद किंवा वंदे भारत सारख्या रेल्वे सेवा देण्यात याव्या. त्या सोबतच बल्लारपूर ते नागपूर या मार्गावर डेमु ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील संसदेत केली.

    त्यासोबतच, कोरोना कालावधीत बंद झालेल्या रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या मागण्यांवर रेल्वे मंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Illegal firearms seizure | चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध कट्ट्यासह युवक अटकेत

    Illegal firearms seizure

    Illegal firearms seizure : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई बाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित केले आहे. या अनुषंगाने 12 मार्च ला 28 वर्षीय युवकांकडून देशी कट्टा व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

    नियम मोडणाऱ्या 15 प्रतिष्ठानावर पोलिसांची कारवाई


    बल्लारपूर मार्गावरील चुनाभट्टी येथे युवक आपल्यासोबत देशी कट्टा घेऊन वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
    माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चुनाभट्टी पोहचत बस स्टॉप वर असलेला 28 वर्षीय संगम संभाजी सागोरे राहणार मित्रनगर, आंबेडकर कॉलेजच्या मागे चंद्रपूर याला अटक केली. Local crime branch


    आरोपी युवकाकडून लोखंड गावठी बनावटीचा देशी कट्टा व 1 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
    आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपासासाठी आरोपीला बल्लारपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे व दिनेश अराडे यांनी केली.

  • Chandrapur police action | चंद्रपूर पोलिसांचं धडक अॅक्शन! नियम मोडणाऱ्या 15 प्रतिष्ठानांवर कारवाई

    Chandrapur police action

    Chandrapur police action : चंद्रपूर शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बे-लगाम व बेशिस्त प्रतिष्ठानावर चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांनी कारवाई केली.


    7 मार्च ला पिंक पॅराडाईज बार मध्ये झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती.
    त्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि नियमांचे व अनुज्ञप्ती चे उल्लंघन केले म्हणून पिन पॅराडाईज बार ला टाळे ठोकण्यात आले.

    प्रदूषणाच्या आगीत सापडलं चंद्रपूर


    शहरात असे अनेक नियमांना डावलत आपली प्रतिष्ठाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवतात अश्या एकूण 15 प्रतिष्ठानावर पोलिसांनी कारवाई केली.
    शहर हद्दीतील फ्रेंड्स बार, सिटी बार, करन बार, दीपक बार तर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहुल धाबा, टू-किचन हॉटेल, मेजबाण बिर्याणी, आईस्क्रीम पार्लर, इटनकर पानठेला, सपना टॉकीज जवळील पान ठेला अश्या विविध प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. Chandrapur establishments violating norms


    पोलिसांनी प्रतिष्ठान चालकाना नियमानुसार वेळेवर प्रतिष्ठान बंद व सुरू करण्याच्या सूचना केल्या.
    शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सण व उत्सव काळात कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिला. Chandrapur police

  • Biggest Thermal Power Plant in Asia । चंद्रपूर वीज केंद्र प्रदूषणाचा केंद्रबिंदू – आमदारांचा सरकारला सवाल!

    Biggest Thermal Power Plant in Asia

    Biggest Thermal Power Plant in Asia :  चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्राच्या रोपवे प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा साठवला जातो, जो रोपवेच्या माध्यमातून महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवला जातो. मात्र, या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि प्रदूषण पसरत आहे. यामुळे ऊर्जानगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना न केल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आरोप आमदार सुधाकर अडबाले यांनी आज विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.

    प्रदूषणाच्या आगीत सापडला चंद्रपूर

    विधान परिषद सभागृहात बोलताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, “महाऔष्णिक वीज केंद्रात वापरला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे, ज्यामुळे संचांमधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेत पसरते. (Chandrapur Power Plant Air Quality) यामुळे १० किलोमीटरपर्यंत प्रदूषण पसरत असून, नागरिकांच्या घरांमध्येही राख साचत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, अनेकांना श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार होत आहेत. (Health Issues from Thermal Power Plants) काही दिवसांपूर्वी महाऔष्णिक वीज केंद्राने इरई नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने जलप्रदूषण झाले. परिणामी, चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आणि हजारो नागरिकांना स्वच्छ पाणी मिळवण्यात अडचणी आल्या. प्रशासन वारंवार होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.”

    निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषण वाढवणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अधिकारी आणि यास पाठबळ देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? हवा प्रदूषण कायदा १९८१ च्या कलम २२ आणि २४ नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाऔष्णिक वीज केंद्राची आजपर्यंत तपासणी केली का? तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत का? असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केले.

    त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि त्यावर तपासणी केली असता प्रदूषण रोखण्यासाठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ८ नंबर संचाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून, इलेक्ट्रो स्टॅटिक प्रिसिपेटटरचे परीक्षण केले जाईल. याशिवाय, नऊ चा संच बंद आहे. संबंधित दुरुस्त्या केल्यानंतर संच सुरू करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनी योग्य निकष पाळावेत. कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मी आश्वासन देते की, भविष्यात या बाबींबाबत बदल होईल. १५ लाख रुपयांची बँक हमी जप्त करणे हे पुरेसे नाही. चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठित केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. Government Action on Thermal Power Plant Pollution

  • Construction material distribution । कामगार हितासाठी खासदार धानोरकरांचा पुढाकार: तालुका स्तरावर होणार बांधकाम साहित्याचे वाटप

    Construction material distribution

    Construction material distribution : महाराष्ट्र शासनातर्फे नोंदणीकृत मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य देण्यात येते. त्या साहित्याचे वितरण एमआयडीसी येथून होत आहे. परंतु, पोर्टल च्या तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून बांधकाम साहित्याचे वितरण बंद आहे. अनेक बांधकाम मजुर जिल्हाभरातून साहित्य घेण्याकरीता रोजगार सोडून एमआयडीसी येथे उपस्थित झाले. परंतु पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद (Labor portal technical problem)असल्याचे कारण सांगुन मजुरांना माघारी जावे लागले.

    पोलिसांची हत्या झाली आणि चंद्रपूर पोलिसाना नियमांची आठवण झाली

    या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सहायक आयुक्ताशी चर्चा करुन जिल्हास्तरावरुन बांधकाम साहित्याचे वितरण न करता तालुकास्तरावर बांधकाम साहित्याचे वितरण करण्यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या.

    कामगार विभागाच्या माध्यमातून मजुरांना वितरीत करण्यात येणारे साहित्य घेऊन जाण्याकरीता जिल्हातून महिला व पुरुष मजुर मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. काही मजुरांनी सदर साहित्य घेण्याकरीता दोन ते तीन दिवसांपासून एमआयडीसी (MIDC distribution issues)येथील साहित्य वितरण परिसरात तळ ठोकून बसले आहे. परंतु, पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मजुरांचा भ्रमनिरास झाला.

    या संदर्भात खासदार धानोरकर यांनी  सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र पाठवून तसेच, त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हातून कुठलाही कामगार साहित्य घेण्याकरीता चंद्रपूर ला येऊ नये. तसेच, बांधकाम साहित्याचे वाटप तालुकास्तरावरुन करावे अशा सुचना दिल्या. तसेच पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यास मजुरांना त्रास होऊ नये या करीता मोबाईल वर संदेश पाठवावा अशा देखील सुचना खासदार धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांनी केल्या. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे  सहाय्यक कामगार आयुक्त श्री. धुर्वे यांनी सांगितले.