Author: Admin

  • Amma Ki Padhai initiative । 3,000 विद्यार्थ्यांचा सहभाग! Amma Ki Padhai च्या चाचणी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    Amma Ki Padhai initiative

    “Education is not a luxury – it’s a right! आणि हाच अधिकार मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘Amma Ki Padhai’ उपक्रम गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक नवा आशेचा किरण ठरतोय. या उपक्रमांतर्गत आयोजित चाचणी परीक्षेत चंद्रपूर शहरातील जवळपास 3,000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, जे मोफत कोचिंग, मार्गदर्शन, आणि शिक्षण साहित्याच्या संधीसाठी उत्सुक आहेत!”

    Amma Ki Padhai initiative : शहरातील गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अम्मा की पढाई या शैक्षणिक उपक्रमांतर्गत चाचणी परीक्षा रविवारी उत्साहात पार पडली. चंद्रपूर शहरातील चार परीक्षा केंद्रांवर एकूण ३ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

    अम्मा की पढाई या उपक्रमाची चाचणी परीक्षा जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालय आणि आंबेडकर महाविद्यालय या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य आणि वेळोवेळी करिअर मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. free coaching classes in Chandrapur

    मोहफूल वेचायला गेला आणि जीव गमावला

    अम्मा की पढाई हा उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केला असून, गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाईल. free coaching for competitive exams

    free coaching classes in Chandrapur

    शहरातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. शिक्षणाच्या संधी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून निसटतात, हे जाणूनच आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील शैक्षणिक वातावरण उन्नत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.

    या परीक्षेच्या आयोजनात परिक्षा प्रमुख म्हणून आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य संजय बेले यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेचे नियोजन व समन्वयक म्हणून सुमित बेले यांनी काम पाहिले. उपकेंद्र प्रमुख म्हणून सरदार पटेल महाविद्यालयात राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, आंबेडकर कॉलेजमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, जनता कॉलेजमध्ये नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, तर एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये तृपाल कोल्हे यांनी काम पाहिले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रमोद कातकर, प्राचार्य राजेश दहेगावकर, प्राचार्य आशिष महाताले, प्राचार्य राजेश चिमनकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

  • Summer camp for tribal students । शासनाची मोठी योजना: आदिवासी विद्यार्थ्यांना उद्योजक बनवणारे उन्हाळी शिबिर सुरू!

    Summer camp for tribal students

    Summer camp for tribal students : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पाटण येथे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रकल्प आधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी  पोलिस उपनिरीक्षक श्री. कोकोडे, उद्योजक प्रफुल खोब्रागडे, सहायक प्रकल्प अधिकारी डी. जी. एम. पोळ, आर. एस. बोंगिरवार, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. डी. गिरडकर, मुख्याध्यापक, प्रशिक्षक/मार्गदर्शक, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. Government residential school summer camp

    आंबेडकर जयंती, चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी खोब्रागडे यांनी उन्हाळी शिबिरातून उद्योजक तयार करण्याच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले. तर अशा उपक्रमातून आदिवासी विद्यार्थी हा समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकेल, असे मत श्री. कोकोडे यांनी व्यक्त केले.

    Government residential school summer camp

    अध्यक्षीय भाषण करतांना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, आदिवासी समाज हा प्रगतशील समाज म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. त्याकरीता अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांकरीता राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे या शिबिरात १. योगा प्रशिक्षण २. आर्चरी प्रशिक्षण ३. गोंडी व वारली पेटींग प्रशिक्षण ४. तायक्वांडो प्रशिक्षण ५. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ६. इंग्लीश स्पिर्कीग कोर्स ७. बांबु आर्ट ८. शिलाई मशीन प्रशिक्षण ९. अगरबत्ती तयार करणे, असे विविध उपक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली. आदिवासी विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहून आपली प्रगती करण्यासाठी त्याला खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे उन्हाळी शिबीर हे एक उत्तम मार्गदर्शक ठरेल असे श्री. राचेलवार यांनी सांगितले. Best vocational training for tribal communities

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी आर. एस. बोंगिरवार यांनी केले. संचालन श्री. पूणेकर यांनी तर आभार शिक्षिका दुर्गे यांनी मानले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच प्रकल्पातील मुख्याध्यापक/ अधिक्षक तथा शासकीय आश्रम शाळा येथील कर्मचारी आदी उपस्थित होते.

    आदिवासी उन्हाळी शिबिर कार्यक्रम, पाटण

  • Chandrapur traffic diversion April 14 । आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर-बल्लारपूरमध्ये वाहतूक बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

    Chandrapur traffic diversion April 14

    With Ambedkar Jayanti celebrations set to bring thousands of followers onto the streets of Chandrapur and Ballarpur on April 14, 2025, the district police have implemented strict traffic diversions to ensure public safety and smooth movement.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरातील काही मुख्य रस्ते वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
    To avoid traffic congestion and accidents, police have appealed to citizens to follow alternative routes and cooperate with the authorities during the movement hours.

    Chandrapur traffic diversion April 14 : भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकाने वाहनचालकांना पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आले.

    सुधीर मुनगंटीवार यांचे सामाजिक कार्य ठरले दीपस्तंभ

    १४ एप्रिल रोजी आंबेकर अनुयायी मोठ्या संख्येत बाबासाहेबाना आदरांजली वाहण्याकरिता एकत्र येतात, यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कसल्याही प्रकारचा अपघात होऊन जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता या संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मार्गाचा हा बदल १४ एप्रिल सकाळी ७ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. Ambedkar Jayanti 2025 traffic advisory Maharashtra

    चंद्रपुरातील वाहतुकीत नेमका बदल काय?

    • दस्तगीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
    • मिलन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
    • श्री टॉकीज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
    • हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद ठेवण्यात येत आहेत.
    • सदरचे मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    पर्यायी मार्ग कोणते?

    • नागरिकांनी शहराबाहेर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा.
    • कस्तुरबा चौक ते दस्तगीर चौक, मिलन चौक-डॉ. पोटदुखे ते श्री टॉकीज मार्गे बिनबा गेट किंवा एकविरा वार्ड-बँक ऑफ इंडिया मार्गे जटपुरा गेटकडून जावे.
    बल्लारपूर शहरातील वाहतुकीत बदल काय?
    • विसापूर टोल नाक्याकडून बामणीकडे जाताना पत्ता गोडाऊन चौक – गौरक्षण वॉर्ड ते फुटी दिवार पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद असणार आहे.
    • बामणीकडून विसापूर कडे जाणारा मार्ग हा दुहेरी वाहतुकीकरिता सुरु असणार आहे.
    • रॅली मध्ये गर्दी वाढल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास गरजेनुसार बामणी चौक व विसापूर टोलनाका येथे काही काळाकरिता जड वाहतूक थांबविण्यात येईल.

    जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत वेळेवर बदल होऊ शकतो, नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. Ballarpur traffic updates April 14

  • tiger attack in Brahmapuri forest । मोहफुलात मृत्यूची छाया! वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    tiger attack in Brahmapuri forest

    What started as a peaceful morning in the forest turned into a deadly encounter. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा गावातील ६० वर्षीय विनायक जांभुळे यांच्यावर आज रविवारी मोहफुले वेचत असताना वाघाने sudden and fatal attack केला. कालच नांदगाव-जानी भागात बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला होता.

    tiger attack in Brahmapuri forest : मोहफूले वेचायला गेलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (13 एप्रिल) ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे उघडली झाली आहे. विनायक विठोबा जांभुळे मृतकाचे नाव आहे. काल शनिवारी याच तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात एका बिबट्याने तीन शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज साठ वर्षीय व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा ११ वा बळी आहे. man killed by tiger

    चंद्रपुरात बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण


    दरवर्षी मोहा फुले वेचणीचा हंगामी सीजन येतो या योजनांमध्ये गोर गरीब व्यक्ती गावालगत च्या जंगलामध्ये जाऊन मोहबोल मोह फुले गोळा करतात त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा उदरनिर्वाह करतात. याच उद्देशाने आज रविवारी चिचखेडा येथील 60 वर्षीय विनायक जांभळे हा व्यक्ती परिसरातील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. मोहफुले वेचत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला.

    या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली असता सदर वृद्धाचा मृतदेह कक्ष क्रमांक 1006 मधील जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. चिचखेडा गाव मेंडकी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे मृतक हा चिचखेडा येथील होता. chandrapur tiger attack

    या घटनेने चिचखेडा परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. काल शनिवारी याच तालुक्यात नांदगाव जानी शेत शिवारात तीन शेतकऱ्यांना बिबट्याने जखमी केले आहे. या परिसरात कर यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धानपिकाला पाणी देण्यासाठी तीन शेतकरी शिवारात गेले होते. तरस वन्य प्राण्यापासून स्वतःचा जीव वाचवीत पळतसुटलेल्या बिबट्याने या तीन शेतकऱ्यांना शेत शिवारात जखमी केले. ही घटना ताजी असताना आज पुन्हा 60 वर्षीय वृद्धाला वाघाने ठार केले. दिवसागणिक वाघ बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोरात सुरू असतानाही वनविभाग बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.

  • Sudhir Mungantiwar social initiatives । आराध्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य – मुनगंटीवारांचे सामाजिक कार्य ठरले दीपस्तंभ

    Sudhir Mungantiwar social initiatives

    “जेव्हा राजकारण संवेदनशील मनाने बोलते…”

    कधीकाळी hopeless वाटणाऱ्या परिस्थितीचा turning point ठरला, जेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. अवघ्या एका वर्षाची आराध्या, जिला complete hearing loss होता, तिच्या आयुष्यात एक miracle moment आला – जेव्हा कॉक्लियर इम्प्लांटसारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिने life’s first sounds ऐकले. वाघमारे कुटुंबासाठी तो क्षण emotional आणि unforgettable ठरला.

    Sudhir Mungantiwar social initiatives चंद्रपूर, दि. १३ – राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांसाठी १२ एप्रिल २०२५ हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्यांची मुलगी आराध्या मंगेश वाघमारे हिची कॉक्लियर इम्प्लांट ही अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला नसता तर आम्हाला आज हा आनंद अनुभवता आला नसता, या शब्दांत वाघमारे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत. Best ENT surgeon for cochlear implant

    चंद्रपुरात पोलिसांवर २ युवकांनी केला हल्ला

    आराध्या अवघी १ वर्षांची असताना दोन्ही कानांना पूर्णतः बहिरेपणा असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वाघमारे कुटुंब चिंतेत होते. प्राथमिक उपचारांमध्ये काहीच यश न मिळाल्यानंतर त्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष दिले. सागर खडसे यांना वाघमारे कुटुंबाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

    आ. श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी योग्य मदत व पाठबळ दिल्यामुळे टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ. श्वेता लोहिया यांच्या मार्गदर्शनात आराध्याचे ऑपरेशन पार पडले. आज आराध्या ऐकू शकते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू या यशोगाथेची साक्ष देतात. वाघमारे कुटुंबाने सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. Tata Trust cochlear implant program

    मंगेश वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आ. श्री. मुनगंटीवार यांना देवदूत म्हटले आहे. ‘आमच्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले आहेत. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आरोग्य सेवेत मानवी दृष्टीकोन व संवेदनशील नेतृत्व किती महत्त्वाचे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करणार आहो,’ अश्या भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केल्या.

    सुधीर मुनगंटीवार यांचे संवेदनशील नेतृत्व

  • CIPET Chandrapur plastic industry courses । महाज्योतीची ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! २००० जणांना मिळणार मोफत प्रशिक्षण.

    CIPET Chandrapur plastic industry courses

    CIPET Chandrapur plastic industry courses :  चंद्रपुर येथील सेंट्रल इन्स्टिट्‌युट ऑफ पेट्रोकेमिकल ऍण्ड  टेक्नॉलॉजी (सिपेट) या संस्थेच्या कार्याचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांनी दिनांक ०८ एप्रिल रोजी आढावा घेतला. वेकोलि वणी क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिपेटचे प्रमुख अवनितकुमार जोशी, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंह व सिपेट मधील प्रशिक्षित विद्यार्थी उपस्थित होते. ree skill training for OBC students

    चंद्रपुरात पोलिसांवर हल्ला


                       यावेळी हंसराज अहीर यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्यविकास कार्यकमाची माहिती जाणून घेतली तसेच प्रशिक्षणानंतर निर्माण झालेल्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक संधीचा  आढावा सुध्दा घेतला. सन २०२१-२२ पासून आजपर्यंत सिपेट मार्फत एकूण ७७५१ युवक-युवतींनी विविध प्रशिक्षण कार्यकम पुर्ण केलेले आहे. सोबतच प्लास्टिक उद्योग क्षेत्रात रोजगाराची संधी सुध्दा त्यांना मिळाली असल्याची संस्थेच्या माध्यमातून अहीर यांना माहिती देण्यात आली. CIPET Chandrapur placement opportunities


    हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून सिपेटची चंद्रपुरात उभारणी झाली असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी इथे प्रशिक्षण घेवून रोजगार व स्वयंरोजगार मिळविला आहे. संस्थेच्या रोजगाराभिमुख उपक्रमाबद्दल अहीर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. सिपेटसोबत नुकताच पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नागपुर द्वारा सिएसआर अंतर्गत २०० सुशिक्षित युवक-युवतींसाठी सहा महिन्यांच्या अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यापुर्वी महाज्योती नागपुर संस्थेमार्फत विदर्भातील २००० ओबीसी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचेही अहीर यांना श्री जोशी यांनी सांगीतले. सदर प्रशिक्षणास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले, प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन, प्रशिक्षण किट आदी बाबी मोफत देण्यात येणार असून या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना सिपेट मार्फत प्लास्टीक उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही सिपेट द्वारा सांगण्यात आले.


                  यावेळी हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रायोजित कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थीसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. अमित मेश्राम, सौरभ भजनकर, ऋतु दडमल या विद्यार्थ्यांनी टाकावु वस्तुपासून सायकल तयार केली. त्यांना चंद्रपुर मनपा द्वारा रु. ५०००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांचा अहीर व वेकोलि मुख्य महाप्रबंधकांनी प्रशस्तीपत्र देवून सम्मानित केले.


               प्रसार व जनजागृतीचे सिपेट मार्फत प्रयत्न होत असले तरी अजुनही विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षण व रोजगार संधीब‌द्दल पुरेशी माहिती मिळत नसल्याने सिपेट ने प्रशिक्षण कार्यक्रमाचा व्यापक स्तरावर प्रचार करावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी सिपेट प्रमुखांना केली. त्यांनी येथे कार्यरत सुरक्षाकर्मी व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार वेतन व भत्ते दिल्या जातात कां या विषयी चौकशी करुन शासन नियमानुसार वेतन, भत्ते देण्याची सुचना केली. स्थानिकांना प्रशिक्षणात प्राधान्य देण्याविषयी सुचित केले.

  • Attack on police officer in Chandrapur । चंद्रपूर पोलिसांवर पुन्हा हल्ला, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

    Attack on police officer in Chandrapur

    पोलिसांना शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

    Attack on police officer in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी ने राक्षसी रूप धारण केले असून या राक्षसी रूपाच्या विळख्यात पोलीस कर्मचारी सुद्धा पिसल्या गेले आहेत. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिना भरापूर्वी पोलीस शिपायाची हत्या झाली होती. आता पुन्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षाला मारहाण केल्याची धक्कादायक १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. Chandrapur police attack

    चैत्र नवरात्री निमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी महाकाली मंदिर परिसरात जिल्हाभरातून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहे, भाविकांची सुरक्षा करतेवेळी पोलीस सुद्धा असुरक्षित झालेले आहे असे चित्र या घटनेतून पुढे आले आहे.

    चंद्रपुरातील इरई नदी होणार स्वच्छ

    १० एप्रिल रोजी अंचलेश्वर गेट जवळ पोलीस आपलं कर्तव्य बजावीत होते, यावेळी त्याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, वाहतूक पोलीस नितीन दुभे व सुधीर रणदिवे उपस्थित होते. रात्री ९.३० वाजता मालवाहू चारचाकी वाहन त्याठिकाणी आले. पोलिसांनी नियमांप्रमाणे वाहन चालकाला कुठे जायचं आहे, पास आहे का असे विचारले मात्र वाहनातील दोघांनी पोलिसांना अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Chandrapur law and order

    कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा विरोध करीत समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोन्ही इसम पोलिसांवर धावून गेले त्यातील एकाने पोलीस उपनिरीक्षक दराडे यांची गच्ची पकडत मारहाण करीत शिवीगाळी केली. त्या पोलिसाला मारलं ती घटना तुम्ही विसरले काय? तुमची अवस्था तशीच करणार अशी जीवे मारण्याची धमकी त्या दोघांनी पोलीस कर्मचारी व पोउपनि यांना दिली.

    पोलिसांनी तात्काळ शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना संपर्क करीत घडलेला प्रकार सांगितला, पोलीस कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले व त्या दोघांना आपल्या ताब्यात घेतले. २८ वर्षीय आदिल अल्ताफ आरा, २२ वर्षीय अयान अल्ताफ आरा दोघे राहणार भावसार चौक घुटकाला यांच्यावर कलम १३२ , २२३, २९६, ३५१ (३), ११५ (२) शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    या घटनेवरून चंद्रपूर पोलिसही आता असुरक्षित आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

  • Maharashtra 100-day action plan । चंद्रपूर जिल्ह्यात 100 दिवसांच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी

    Maharashtra 100-day action plan

    Maharashtra 100-day action plan : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने सर्व शासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात उत्तम सेवा मिळावी, हा संकल्प कृती आराखड्यामागे असून आतापर्यंत विविध विभागामार्फत जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला. Maharashtra government digital services

    चंद्रपुरातील इरई नदीचे होणार पुनरुज्जीवन

    वन अकादमी येथे आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, गिरीश धायगुडे पालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

    maharashtra government digital services

    यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने ई-ऑफिस ही संकल्पना प्रभावीपणे राबवली असून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालय ई -ऑफिसने जोडली आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. कृती आराखड्यांतर्गत सर्व शासकीय विभागांनी आपापले संकेतस्थळ अद्यावत करून नागरिकांना उत्तम सेवा मिळेल, यासाठी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच उत्तम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय सुध्दा असावे.

    राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसारच सर्व विभागांनी कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमध्ये नियमितपणे स्वच्छता, स्वतंत्र शौच्छालये असली पाहिजे. तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी भेटीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. जिल्हा परिषदेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे. आरोग्य संस्थेत आलेल्या गोरगरिबांना चांगली सेवा द्यावी. पोलिस विभागाने नागरिकांसोबत सुसंवाद वाढवावा, यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. Infrastructure development in Chandrapur

    सादरीकरण करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी संकेतस्थळ अद्यावत करणे, केंद्र शासनासोबत सुसंवाद, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमान, ऑनलाईन शस्त्र परवाना, बळीराजा समृद्ध मार्ग, जिल्हा प्रशासनाचे व्हाट्सअप चॅटबोट, शासकीय कामकाजात अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक न्यायालयीन बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब आदींबाबत माहिती दिली. तसेच जिल्हास्तरावरील कार्यालयांनी पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपर्यंत तर त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी 30 एप्रिलपर्यंत 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिले.

  • irai River rejuvenation in chandrapur । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी – इरई नदीचे १७ किमी पात्र होणार स्वच्छ व विस्तृत!

    irai River rejuvenation in chandrapur

    17 किमी नदीपात्रात गाळ, झुडपे आणि अतिक्रमण हटविण्याची मोहीम

    irai River rejuvenation in chandrapur : इरई नदी ही चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहते. चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या 17 किमी नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच इराई नदीपात्राची पूरवहन क्षमता वाढविणे यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.  Flood Prevention & Management

    ४ लाखांची लाच मागणारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्या घरी मिळाली ८ लाखांची रोकड

    इरई नदीच्या पुनरुज्जीवन अभियानसंदर्भत वन अकादमी येथे आयोजित बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून इरई नदी पुनरुज्जीवन अभियान जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी होणार आहे. इरई नदी खोलीकरण लोक चळवळ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी –कर्मचारी, जिल्ह्यातील सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी यात हिरहिरीने भाग घेऊन आपले योगदान द्यावे. हे अभियान आपले आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे.  नदी काठावरील जागेवर असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खाली भूखंडावर यापुढे कोणतीही बांधकाम होणार नाही, यासाठी प्रभावी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच सद्यस्थितीत नदीकाठावर असलेल्या अतिक्रमणबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिल्या. River desilting techniques

    flood prevention& management

    आमदार मुनगंटीवार यांनी केल्या सूचना : डब्ल्यूसीएल ने या उपक्रमात उदार होऊन साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत करावी. सीटीपीएस ने सुद्धा गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. यातून निघणारा गाळ हा शहरातील खोलगट भाग असलेल्या जागेवर टाकून मैदान तयार करता येईल का, याबाबत नियोजन करावे. नदी पात्रामधील अतिक्रमणाच्या विषयाचे योग्य नियोजन करावे. 17 किलोमीटर मध्ये झुडपे आणि गाळ काढण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे. तसेच इरई नदी निरंतर वाहण्यासाठी बंधारे बांधावे. नदी पुनरुज्जीवनासाठी पाच वर्षाचा कार्यक्रम ठरवावा. Chandrapur environmental initiatives

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, इराई नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत पाच लक्ष ब्रास गाळ काढण्याचे नियोजन आहे. सदर काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. नदीच्या पात्रातून निघणारा गाळ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच यातून निघणारी वाळू ही घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. डब्लूसीएल आणि औष्णिक विद्युत केंद्राने गाळ काढण्यासाठी साहित्य तसेच आर्थिक मदत करावी, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मशीन उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

    जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन : इरई नदीचे पुनरुज्जीवन हा एक सामाजिक उपक्रम आहे. शहराला पडणारा पुराचा वेढा, यापासून मुक्ती मिळण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध स्तरावरून निधीचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा मानस असून सर्वात प्रथम शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी या उपक्रमासाठी आपला एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

    प्रशासनाचे नियोजन – 45 दिवसात 5 लाख ब्रास गाळ काढण्याचे लक्ष्य

  • Shehnaz Akhtar live in Chandrapur । भक्ती आणि सूरांचे संगम: महाकाली यात्रेत शहनाज अख्तर यांच्या आवाजाची जादू!

    Shehnaz Akhtar live in Chandrapur

    महाकाली यात्रेतील भव्य भक्ती संगीत संध्या

    Shehnaz Akhtar live in Chandrapur : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात आयोजित करण्यात आलेला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला चंद्रपूरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव घेतला. Shehnaz Akhtar Bhajans

    चंद्रपुरात जय भीम यात्रा

      या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक, 

    विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख रविंद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांची उपस्थिती होती. यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    shehnaz akhtar bhajans

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण होते. अशा उपक्रमांद्वारे चंद्रपूरमध्ये भक्ती आणि संस्कृती यांचे संतुलन राखले जात आहे. यंदा यात्रा परिसरात प्रशासनाच्या सहकार्याने आपण उत्तम व्यवस्था उभी करू शकलो. यात्रा परिसराचा विस्तार केल्यामुळे भाविकांना राहण्याची सोय झाली. पिण्याच्या पाण्याची, पूजा साहित्य खरेदीची, आंघोळीची, चेंजिंग रूमची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. Bhajan Sandhya Event

    या वर्षीच्या यात्रेचे आयोजन विशेष ठरले. प्रशासनाच्या सक्रिय सहकार्यामुळे यात्रा परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकाने, अन्नदान वितरण व्यवस्था, आणि भाविकांसाठी मार्गदर्शक स्वयंसेवक यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुसंगठित झाली. ही सर्व व्यवस्था करताना जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसत होता, हीच आपल्या प्रयत्नांची खरी पावती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Bhakti Geet Program

    शहनाज अख्तर यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या संतवाणी, भक्तिगीते आणि भावगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अल्पावधीत सदर व्यवस्था उभारण्यात आल्याचे सांगितले. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

    या कार्यक्रमाला मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर आहिर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्री माता महाकाली महोत्सवचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, मोनू चौधरी, प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, पुरुषोत्तम राऊत, कल्पना बबूलकर, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे विश्वस्त वंदना हातगावर, सविता दंढारे, श्याम धोपटे, चंदू वासाडे, अजय वैरागडे, संजय बुरघाटे, रूपेश भुते, रंजन ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.

    शहनाज अख्तर Live – भावगीते आणि संतवाणींचा संगम