Author: Admin

  • Kishor Jorgewar social initiatives । किशोर जोरगेवार यांच्या सामाजिक कार्यामुळे दिव्यांग मुलांना मिळाली सशक्तता

    Kishor Jorgewar social initiatives

    Kishor Jorgewar social initiatives : चंद्रपूर – आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे स्थान मिळाले पाहिजे. बौद्विक दिव्यांग मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातात हात घालून या कार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Support for disabled children

    आमदार जोरगेवार मुले पहलगाम मधील कुटुंब परतले

    श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्विकार दुर्बल मनस्कर (मतिमंद) मुलांची निवास शाळा, ताडाळी येथे मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रेखाजाई पिंपळशेंडे, अ‍ॅड. अभय पाचपोर, समाजकल्याण विभागाचे उपयुक्त राजेशजी पांडे, डॉ. दिलीप चौधरी, शाश्वत शेरे, शेरे, नंदकुमार फुले, जैन, मुधोळकर, वैभव सनास्कर, नलगंटिवार, अमोल मारुतकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ज्या प्रकारे या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेम, सहकार्य आणि योग्य दिशा या मुलांसाठी येथे दिली जात आहे. आजच्या या कार्यक्रमात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही बस या मुलांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या स्वप्नांना गती देणारे साधन ठरेल. शिक्षणाचा आणि विकासाचा हा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. Mental disability education programs

    या मुलांसाठी केवळ भौतिक सुविधा पुरवणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेमाने, मायेने समजून घेऊन जगण्याची संधी देणे आवश्यक आहे. आम्हीही येथे आवश्यक त्या सर्व मदतीसाठी कटिबद्ध आहोत. ही मुले समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वेगळे न मानता, त्यांच्या गरजांनुसार विशेष प्रेम, काळजी आणि संधी देणे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sudhir Mungantiwar helping women । सुई-धाग्याने विणलेले स्वावलंबनाचे स्वप्न; सुधीर मुनगंटीवार यांचा मोलाचा हातभार

    Sudhir Mungantiwar helping women

    Sudhir Mungantiwar helping women : चंद्रपूर –  दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर येथील संगीता दासरवार यांना स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाले. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती संगीता दासरवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. Sewing machine help for women

    त्या ४५ कंत्राटी कामगारांना मुनगंटीवार यांनी मिळवून दिला न्याय

    संगीता विशाल दासरवार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होत्या. मात्र तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण होते. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात भेट घेऊन मदत मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.

    शिलाई मशीन मिळाल्याने संगीता दासरवार यांनी स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळविण्यात मोलाचा हातभार लागणार आहे.

    यावेळी संगीता दासरवार यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत, “ही मदत मला नवी उमेद आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी आहे,” असे भावनिक उद्गार काढले.

  • Sudhir Mungantiwar latest news । कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सुधीर मुनगंटीवार यांचा यशस्वी संघर्ष

    Sudhir Mungantiwar latest news

    Sudhir Mungantiwar latest news : चंद्रपूर –  राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ४५ कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त झाले आहेत. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले, अशी भावना व्यक्त करून कक्ष सेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत. Chandrapur medical college jobs

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाणीवरून निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर व्हा तयार

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गत १० ते १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल मार्फतीने नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आल्यामुळे उक्त ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. Contract workers appointment news

    या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत, मे.स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फतीने  सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याने या पदावर त्यांना सेवेची संधी मिळण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सफाई कामगारांना सदर कंपनीमार्फत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करून ४५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना मे. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांना न्याय मिळाला आहे.

    कंत्राटी तत्वावर कक्षसेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रूपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निमसरकार, पृथ्वीराज मरस्कोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे आदींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले

  • Chandrapur water conservation movement । चंद्रपूरमध्ये जलरथाचा शुभारंभ; तलाव व नाल्यांचे होणार पुनरुज्जीवन

    Chandrapur water conservation movement

    Chandrapur water conservation movement : (चंद्रपूर) महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृतीसाठी करणार्‍या जलरथाचे उद्घाटन ( चंद्रपूर विधानसभा आमदार) श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या वेळी महासचिव सकल जैन समाज चंद्रपूर –संदीपजी बांठिया, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गौतमजी कोठारी , सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कोठारी, बिजेस जिल्हाध्यक्ष दिपेंद्र भाई पारेख, जिल्हा सदस्य अनिकेत लूनावत, जिल्हा सचिव ऋषभ सकलेचा, सामाजिक कार्यकर्ते मोहित मोदी, तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक दीक्षांत जी बेले आदी मान्यवर उपस्थित होते. Pond rejuvenation scheme Maharashtra

    आमदार जोरगेवार मुळे पहलगाम मध्ये अडकलेले ते कुटुंब चंद्रपुरात परतले

    सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे. BJS water conservation initiative

    BJS water conservation initiative


    शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्‍यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.


    या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’वर ऑनलाइन भरावा. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.

    योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच www.shiwaar.com या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान बीजेएस च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

  • Chandrapur citizens rescued from terrorism । चंद्रपूरचे कुटुंबिय जम्मू काश्मीरमधून सुखरूप परत – आमदार जोरगेवारांचा विशेष पुढाकार

    Chandrapur citizens rescued from terrorism

    Chandrapur citizens rescued from terrorism : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या सात नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले.

    धानोरा बॅरेज साठी आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा, निधी मंजूर

    चंद्रपूर मधील नागीनाबग वार्ड येथील अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले होते. दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते. माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. Kishore Jorgewar Jammu Kashmir rescue

    यानंतर, आमदार जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधून संबंधित कुटुंबीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मागितली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या सर्व हालचालींनंतर, आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या सात नागरिकांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. Jammu Kashmir crisis rescue operation

    आज दुपारी १२ वाजता हे सर्वजण बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व कुटुंबीयांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले. हे कुटुंब सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत मी स्वतः सतत प्रशासनाशी संपर्कात होतो. त्यांच्या घरी सुखरूप परत येणं हेच माझं कर्तव्य होतं एक दोन दिवसात आणखी काही नागरिक चंद्रपुरात पोहोचणार असून आपण सतत संपर्कात असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार जोरगेवार यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

  • Tadoba Machan stay experience । बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबामध्ये जंगलाची मचानीवरून सफर!

    Tadoba Machan stay experience

    Tadoba Machan stay experience : चंद्रपूर –  वाघ व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत 12 मे 2025  ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे. Tadoba wildlife experience booking

    या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील 50 मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.

    ताडोब्यातील वाघोबाला उन्हाचे चटके, सफारी वेळापत्रकात बदल

    या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण 100 निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती 4500 रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे. Machan stay Tadoba

    सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत 1500 रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क  2 हजार रुपये, पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क  1 हजार रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.

    सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.

    सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री. सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.

  • Dhanora dam project । धानोरा बंधाऱ्याच्या प्रकल्पाला गती! आमदार किशोर जोरगेवारांचा मोठा पुढाकार

    Dhanora dam project

    Dhanora dam project : चंद्रपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या धानोरा बंधाऱ्याच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कार्यकारी संचालक श्री. राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता श्री. रवी पराते, अधीक्षक अभियंता श्री. माधव कदम, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. Dhanora irrigation scheme

    ताडोब्यातील वाघांना उन्हाच्या झळा, सफारीचे वेळापत्रक बदलले

    या बैठकीत प्रस्तावित धानोरा बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला धानोरा बंधाऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या आगामी टप्प्यातील कामकाज, तांत्रिक अडचणी, डीपीआरच्या अंतिम प्रक्रियेबाबत सखोल चर्चा झाली. डीपीआर अंतिम करून लवकरच हाय पावर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, कारण नायर आदींची उपस्थिती होती. 

    बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये यावर जोर दिला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या ठोस सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या. धानोरा बंधारा प्रकल्प हा केवळ सिंचनाची गरज भागवणारा प्रकल्प नसून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवणारा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur irrigation project

    सदर बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सदर विषयावर अनेकदा अधिवेशनात आवाज उठवत त्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

    धानोरा बंधाऱ्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. त्यामुळे या प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून कामाला गती देण्यासंदर्भातील अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सदर बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

  • Tadoba Safari Timing Change । उन्हाच्या झळांनी ताडोबा सफारीची वेळ बदलली; जाणून घ्या नवे वेळापत्रक

    Tadoba Safari Timing Change

    Tadoba Safari Timing Change : चंद्रपूर ताडोबा – 45 अंशापार गेलेल्या तापमानामुळे चंद्रपूर देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पलही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. Tadoba safari timing


    देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी शुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत.
    सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजिवन प्रभावीत होत आहे.

    वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गीक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Tadoba temperature April

    प्रेमात अडथळा निर्माण, चंद्रपुरात झाली एकाची हत्या


    हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.


    ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषीत करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. स्थानिक, राज्यातीलच नाही तर देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक् ताडोबा येऊन आपली पर्यटकनाची हौस भागवितात. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच चंद्रपूर तापायला लागले आहे. सुर्य चांगलाच कोपत असल्याने 45 अंशाच्या पार पारा गेला आहे. safari changed due to heatwave

    अंगाची लाही लाही होत आहे. जन जीवन विस्कळीत होत आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमानही देशात केंद्रस्थानी आले आहे. उन्हाचा सर्वांनाच फटका बसत आहे. शिवाय हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.


    त्यापाठोपाठ ताडोबा व्यवस्थापनानेही वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या पर्यटन सफारीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेऊन सफारीची वेळ अर्धातास केली आहे. त्यामुळे पर्यटकांची उन्हापासून सुटका होणार आहे. अनेक पर्यटकांनी तर बुकींग रद्द करून चंद्रपूरातील उन्हापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. काही पर्यटक् “कडक उन्हात नको रे बाबा पर्यटन सफारी‘ म्हणून ताडोबात सध्यातरी येण्याचे टाळत आहेत.

  • chandrapur love affair murder । प्रेमात अडथळा, चंद्रपुरात एकाची हत्या

    chandrapur love affair murder

    chandrapur love affair murder : सुमठाणा (राजुरा): पत्नीच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच पतीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) सुमठाणा येथे उघडकीस आली. नितेश किसन निमकर (वय ३३) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी राजुरा पोलिसांनी नंदकिशोर चरणदास सोयाम (वय २५, रा. सुमठाणा) याला अटक केली आहे. rajura police murder investigation

    पार्टीचं आमिष देऊन बोलावलं…

    मृतक नितेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी नंदकिशोर सोयाम याने नितेशला फोन करून पार्टीचे आमिष दाखवले व घराबाहेर बोलावले. नितेश एमएच ३४ एई ६३२८ या क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही.

    आमचं पवित्र स्थळ परत करा, चंद्रपुरात भव्य शांती मार्च

    शरीर रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यावर घातक प्रहार

    दुसऱ्या दिवशी गावाबाहेरील रस्त्यालगत नितेशचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या डोक्यावर घातक वस्तूने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

    प्रेमसंबंध होते कारण…

    आरोपी नंदकिशोर सोयाम याचे नितेशच्या पत्नीशी गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तो सातत्याने नितेशच्या घरी येत असे. मृतकाचे वडील किसन निमकर यांनी पोलिसांना सांगितले की, एकदा त्यांनी स्वतः आरोपीला त्यांच्या घरी पकडले होते. chandrapur husband killed by lover

    प्रथम अपघात, मग उलगडला खूनाचा कट

    सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र राजुरा पोलिसांनी संशयाच्या आधारे तपास सुरू ठेवला असता या घटनेमागे प्री-प्लॅन्ड मर्डर असल्याचे उघड झाले.

    गुन्हा दाखल, आरोपीला अटक

    या प्रकरणात आरोपी नंदकिशोर सोयाम याच्याविरुद्ध कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश नन्नावरे करीत आहेत.

  • skill training for forest villagers । चंद्रपूर वन अकॅडमीकडून ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी – मिळणार नोकरी आणि कौशल्य प्रशिक्षण

    skill training for forest villagers

    skill training for forest villagers : चंद्रपूर –  पंतप्रधान यांच्या ‘स्किल इंडिया मिशन’शी सुसंगत राहून चंद्रपूर वन अकॅदमीने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हाऊसकीपिंग व फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सेवा या आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहे. या अनुषंगाने ‘प्रथम’ या राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. forest academy Chandrapur training

    इरई नदी खोलीकरणाची सुरुवात

    या करारावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी स्वाक्षरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 60 दिवसांचा असून प्रशिक्षण, निवास, भोजन व नोकरीची व्यवस्था याचा संपूर्ण खर्च अकादमी आपल्या आंतरिक निधीतून करत आहे. ही योजना वनालगताच्या गावातील तरुणांना सक्षम बनवते, तसेच पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन वनसंवर्धनालाही हातभार लावते. Skill India hospitality program

    मेलघाट व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांतील 12 तरुणांचा आठवी हाउसकीपिंग बॅच 20 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर अकॅदमीत उपस्थित होती. आतापर्यंत हाऊसकिपिंग बॅचेस मध्ये एकूण 110 तसेच फूड आणि बेवरेज मधील एकूण 99 जणांना यशस्वीरित्या प्रशिक्षण करून थ्री, फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स, रिझॉर्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. तसेच  हाउसकीपिंग सहाय्यकाचे  दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना उदयपूर, लोणावळा, ताडोबा, चंद्रपूर या ठिकाणी जॉब प्लेसमेंट देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक एस के. गवळी  यांच्या हस्ते प्रशिक्षण  प्रमाणपत्र, जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात करण्यात आले व नेमणूकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले.

    forest academy Chandrapur training

    चंद्रपूर वन अकादमी मार्फत हा कार्यक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्याशी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी समझोता केला असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या पाच कौशल्य कामासाठी जसे की, फोर व्हीलर टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हॉस्पिट्यालिटी असिस्टंट व मल्टी फंक्शन ऑफिस असिस्टंट आणि  ब्युटीशियन अशा कौशल्य कामी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. तरी त्याचा फायदा सर्व संबंधित गावातील तरुणांनी घ्यावा,असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले आहे.